अकोला जिल्ह्यातील दोन गावांत बॅलेटवर मॉक पोलची घोषणा; गावकरी अनभिज्ञ, प्रसिद्धी स्टंटची चर्चा

अकोला जिल्ह्यातील दोन गावांत बॅलेटवर मॉक पोलची घोषणा; गावकरी अनभिज्ञ, प्रसिद्धी स्टंटची चर्चा


Maharashtra Election 2024 अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातल्या दोन गावांत आज ‘बॅलेट’वर ‘मॉक पोल’ची घोषणा करण्यात आली होती. बाळापूर मतदारसंघातल्या पातूर तालूक्यातील तुळजापूर आणि बेलताडा या गावात हे मतदान होणार होतं. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार प्रकाश पोहरेंनी या दोन्ही गावांत ‘मॉक पोल’ची घोषणा केली होती. मात्र, घोषणा करूनही या गावात गावकऱ्यांनाही कोणतीच माहिती नव्हती. त्यामुळे बॅलेट मतदानाची कोणतीच तयारी नव्हती. त्यामूळे हा  प्रसिद्धी स्टंट असल्याचं बोलले जात असून या प्रकरणाची एकच चर्चा सध्या रंगते आहे.

पोलिसांसह महसूल प्रशासनाने रात्रीपासूनच ठिय्या

सोलापुरातील मरकडवाडी गावातील बॅलेट पेपरवरील ‘मॉक पोल’ मोठ्या वादाचा विषय ठरला होता. अशातच अकोला जिल्ह्यातील दोन गावांसंदर्भात अशाच पद्धतीने ईव्हीएमला आव्हान देण्याची घोषणा करण्यात आली. पातुर तालुक्यातील तुळजापूर आणि बेलताडा या गावात हे मतदान होणार असल्याचं सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोहरेंकडून जाहीर करण्यात आलं होतं. त्यांच्या या घोषणेनंतर गावात पोलिसांसह महसूल प्रशासनाने रात्रीपासूनच ठिय्या दिला होता. आज या दोन्ही गावात मतदानाची कोणतीच तयारी नसल्याने मतदान झालं नाहीय.

प्रशासनाकडून सुटकेचा नि:श्वास

या दोन्ही गावात महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे उमेदवार नितीन देशमुख यांना आघाडी मिळालीय. आज तुळजापूर गावात दुपारी 12 ते 2 तर बेलताडा गावात दुपारी दोन ते चार या वेळेत हे मतदान होणार होतंय. यासाठी महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी अशा तीन पेट्या ठेवल्या जाणार होत्या. यात उमेदवारांच्या नावाचे बॅलेट वापरले जाणार नव्हते. तर मतदारांनी आपला आधार नंबर किंवा मतदान यादी क्रमांक लिहून बॅलेट आपलं मतदान असलेल्या तीन पैकी एका बॉक्समध्ये टाकायचं होतंय. मात्र आयोजकांनी यातल्या कोणत्या गोष्टीची गावकऱ्यांसोबत चर्चा न केल्याने हे सारं बारगळलंय.

दरम्यान, मरकडवाडीत मॉक पोल वरून मोठा वाद झाल्याने अकोल्यात जिल्हा आणि पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली होतीय.‌ महसूल आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी रात्रीपासूनच गावात मुक्काम ठोकून होतेय. शेवटी मतदानच न झाल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडलाय.

राष्ट्रपती, पंतप्रधान आणि राज्यपालांना थेट रक्ताने स्वाक्षरीचे पत्र

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नीरज वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएम विरोधी जनआंदोलन मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे. थेट रक्तानेच स्वाक्षरी महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महामहिम राज्यपाल यांना पत्र पाठविण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला जे यश मिळालं यात ईव्हीएम मध्ये छेडछाड करण्यात आल्याचेही यावेळी आरोप करण्यात आला. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या, अशी मागणी यातून करण्यात आली.

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान

मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान


अकोला : सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावातील बॅलेट पेपरवरील ‘मॉक पोल’ मोठ्या वादाचा विषय ठरलं होता. ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान (Voting) घेण्याची संपूर्ण तयारी केली होती. मात्र, पोलीस प्रशासनाने गावात जमावबंदी आदेश लागू करत ही मतदान प्रक्रिया थांबवली, त्यामुळे ग्रामस्थांना बॅलेटपेपरवरील इच्छा मतदान घेताच आले नाही. आता, अकोला जिल्ह्यातील दोन गावांनी अशाच पद्धतीने ईव्हीएमला (EVM) आव्हान देण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत या दोन्ही गावात उद्या शुक्रवार 6 डिसेंबर रोजी गावात मॉक पोल घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

माळशिरस मतदारसंघातील विजयी उमेदवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या नेतृत्वात मारकडवाडी ग्रामस्थांनी दूध का दूध, पाणी का पाणी म्हणत ईव्हीएम व बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रियेतील तुलना आणि सत्यता पडताळण्यासाठी बॅलेट पेपवरील मतदान प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, प्रशासनाने या मतदान प्रक्रियेला परवानगी नाकारल्यानंतर अखेर ही प्रक्रिया रद्द करण्यात आली. मात्र, आता अकोला जिल्ह्यातही पुन्हा एकदा अशाच पद्धतीने बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात येत असल्याचे दिसून येते.

पातुर तालुक्यातील तुळजापूर आणि बेलताडा या गावात हे मतदान होणार आहे. तुळजापूर गावात दुपारी 12 ते 2 तर बेलताडा गावात दुपारी दोन ते चार या वेळेत हे मतदान होणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यासाठी महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी अशा तीन पेट्या ठेवल्या जाणार आहेत. यात उमेदवारांचे नाव असलेले बॅलेट वापरले जाणार नाहीत. तर मतदारांनी आपला आधार नंबर किंवा मतदान यादी क्रमांक लिहून आपलं मतदान असलेल्या तीन पैकी एका बॅलेट बॉक्समध्ये टाकायचं आहे. मतदानानंतर लगेच मतमोजणी होणार आहे. विधानसभेत झालेले मतदान आणि उद्याच मतदान याचा तुलनात्मक अभ्यास करण्यात येणार आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र, मारकडवाडीत पोलिसांनी मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी पुढाकार घेतलेल्या आणि जमावबंदी आदेशाचे पालन न केलेल्या ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे, आता अकोला तालुक्यात पोलीस काय भूमिका घेतात ते पाहावे लागेल.

मारकडवाडीत गुन्हा दाखल

बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्या मारकडवाडीतील 17 जणांसह अन्य 100 ते 200 ग्रामस्थांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर परिणाम करण्याच्या उद्देशाने ईव्हीएम मशीन संदर्भात अफवा पसरवून फेर मतदानाची तरतूद नसताना प्रशासनाचे आदेश डावलल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच बॅलेट पेपरवर मतदान करण्यासाठी नागरिकांना आवाहन करुन भीती निर्माण करत समाजात द्वेषाची भावना निर्माण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. बीएनएस 353(1) (ब), 189 (1), (2), 190, 223 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. माळशिरसच्या नातेपुते पोलीस ठाण्यात सर्व आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. 

हेही वाचा

पुण्यात धावत्या स्कूल बसला भीषण आग; ड्रायव्हरच्या प्रसंगावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला

अधिक पाहा..



Source link

Accident News : मालवाहू वाहनाची दुचाकीस्वाराला धडक; भीषण अपघातात एक जण जागीच ठार 

Accident News : मालवाहू वाहनाची दुचाकीस्वाराला धडक; भीषण अपघातात एक जण जागीच ठार 


Akola Accident News: अकोला: अकोल्यातल्या अकोला पातुर राज्य महामार्गावर भीषण अपघात झालाय. चार चाकी आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच दुर्देवी मृत्यू झालाय. तर हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये चक्क चारचाकी वाहन रस्त्यावरील डिवाइडरला लागून पलटी झालेय. या अपघातात मालवाहू वाहनासह वाहनातील वाहून येणाऱ्या वस्तूंचेही  मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तर वाहनचालक हा गंभीर स्वरूपात जखमी झाला असून त्यांना तातडीने स्थानिक नागरिकांनी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील कारवाई सुरू केली आहे. मात्र हा अपघातामागील नेमकं कारण अद्याप पुढे आलेले नाही. 

भीषण अपघातात एक जण जागीच ठार

मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातल्या पातुर-अकोला राज्य महामार्गावरील हिंगणा फाटा येथे हा भीषण अपघात झालाय. आज दुपारी 12 वाजताच्या सुमाराचा अपघात झाल्याच समजतेये. दरम्यान, अद्यापपर्यंत दुचाकीवर स्वार असलेल्या आणि यात मरण पावलेल्या तरुणाची ओळख समोर आली नाहीये. याप्रकरणी अधिक तपास जुने शहर पोलीस करतायेत. मात्र या भीषण अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

बियरशॉपी समोर वाद, पोलिसांचा लाठीचार्ज 

अकोल्यात एका बियर शॉपी समोर सुरु असलेल्या वादादरम्यान खदान पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलाय. बिअर शॉपी  मालक आणि एका ग्राहकांमध्ये हा वाद होता. बिअर शॉपी समोर उभी केलेली दुचाकी चोरी झाल्याच्या संशयावरून ग्राहकाने सीसीटीव्ही तपासण्यासाठी हट्ट धरला. याच कारणावरून हा संपूर्ण वाद सुरू होता. त्यानंतर शाब्दिक वाद हाणामारी सुरू झाला,  अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत लाठीचार्ज करावा लागलाय. इतकच नाही तर बनणार्‍यांवर सुद्धा  लाठीचार्ज करून पोलिसांनी पांगवले आहे. त्यानंतर प्रकरण शांत झालेय. दरम्यान, अकोल्यातल्या सिंधी कॅम्प भागात काल रात्री उशिरा 1 वाजता सुमारास हा वाद झाला होता.  

दरम्यान, स्थानिक पत्रकार या संपूर्ण प्रकरणाचे चित्रकरण करत असतानाच पोलिसांनी त्यांच्यावर देखील दमदाटी केली, आणि त्यांचा मोबाईल हिसकावून घेतलाये. इतकंच नाही तर व्हिडिओ डिलीट करण्याचा प्रयत्न सुद्धा केलाय.

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

EVM विरोधात स्वाक्षरी अभियानाला सुरुवात करताच प्रकाश आंबेडकरांनी मांडली भूमिका; म्हणाले…

EVM विरोधात स्वाक्षरी अभियानाला सुरुवात करताच प्रकाश आंबेडकरांनी मांडली भूमिका; म्हणाले…


अकोला : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीला (Mahayuti) मोठे यश मिळाले तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला. यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएम (EVM) मशीनवर आरोप केले जात आहेत. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राज्यव्यापी ईव्हीएमविरोधी स्वाक्षरी अभियानाला आजपासून सुरूवात केली आहे. आंबेडकरांनी आपल्या अकोल्यातील ‘यशवंत भवन’ निवासस्थानी स्वाक्षरी करीत अभियानाचा प्रारंभ केला असून 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान राज्यभरात वंचितचे हे स्वाक्षरी अभियान चालणार आहे.  

ईव्हीएमसंदर्भात भूमिका घेण्यासाठी काँग्रेसची 10 डिसेंबरपर्यंत वाट पाहणार आहोत. त्यानंतर ईव्हीएमच्या मुद्द्यावर लढा उभारण्यासाठी स्वतःच पुढाकार घेणार आहोत, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. तसेच ईव्हीएमच्या मुद्द्यावर देशव्यापी यात्रा काढण्याची काही गरज नसल्याचं सांगत त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या यात्रेला विरोध केलाय.

अकोला येथे झालेली पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ईव्हीएम संदर्भात काँग्रेसने पुढाकार न घेतल्यास आम्ही पुढाकार घेऊ. आम्ही काँग्रेसची 10 तारखेपर्यंत वाट पाहू. त्यानंतर ईव्हीएमच्या मुद्द्यावर लढा उभारण्यासाठी स्वतःच पुढाकार घेणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाने ती याचिका खारीज करायला नको होती. याचिका खारीज करणे न्यायाला धरून नाही. नवीन सभागृह गठीत करता येऊ शकते का? असा सवाल आंबेडकरांनी राज्यपाल आणि निवडणूक आयोगाला केला. 

ईव्हीएम संदर्भात कोणीही सर्वोच्च न्यायालयात जाऊ नये

29 नोव्हेंबरला दुपारी बारा वाजेपर्यंत सरकारचा शपथविधी होणे आवश्यक होते. आता सभागृह स्थापन होऊ शकते का?, याचे उत्तर महाराष्ट्राच्या अ‍ॅडव्होकेट जनरल यांनी द्यावे. काही उमेदवार ज्या मतदारांनी आपल्याला मतदान केलं आहे त्यांचे एफिडेव्हीट घेऊन हा सर्व प्रकार पत्रकार परिषद घेऊन जाहीर करण्याच्या तयारीत आहेत. निवडणुकीच्या काळात केंद्रीय आणि महाराष्ट्र गुप्तचर यंत्रणेने संभाव्य विजेत्या उमेदवारांची यादी तयार केली होती ती यादी जाहीर करावी. जे अधिकारी दबाव मानणार नाहीत त्यांनी यासाठी पुढाकार घ्यावा. नांदेडमध्ये काही ईव्हीएमचे नंबर मॅच झाले नाहीत. व्हीव्हीपॅट मोजण्याची किंमत आणि लागणारा खर्च अधिक असल्यामुळे कोणी ते करण्यासाठी धजावत नाहीत. ईव्हीएम संदर्भात कोणीही सर्वोच्च न्यायालयात जाऊ नये. जे सर्वोच्च न्यायालयात जातील ते भाजपाचे दलाल आहेत. याचा जाब निवडणूक आयोगाला विचारा, असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा 

मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना

अधिक पाहा..



Source link

मोठी बातमी :  खासदारकीला आव्हान, महाराष्ट्रातील भाजपच्या तरुण खासदाराला हायकोर्टाची नोटीस 

मोठी बातमी :  खासदारकीला आव्हान, महाराष्ट्रातील भाजपच्या तरुण खासदाराला हायकोर्टाची नोटीस 


Akola Lok Sabha Election 2024 अकोला : अकोल्याचे भाजप खासदार अनुप धोत्रे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावलीये.‌ त्यांच्या खासदारकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरून ही नोटीस बजावण्यात आलीये. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते गोपाल चव्हाण यांनी खासदार अनुप धोत्रे यांच्या लोकसभेवरील निवडीला आव्हान दिलंय. या नोटिसीला 2 जानेवारीपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने धोत्रे यांना दिलेयेत. धोत्रे यांनी निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्ट व्यवहार केला, असा आरोप करत त्यांची निवड रद्द करण्याची मागणी चव्हाण यांनी याचिकेत केलीये.

लोकसभा निवडणुकीत खर्चाची मर्यादा 95 लाख इतकी होती. मात्र धोत्रे यांनी निवडणुकीत 1 कोटी 24 लाख 60 हजार 590 रुपयांच्या जाहिराती प्रसिद्ध केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते गोपाल चव्हाण यांनी केलाय. धोत्रेंनी हा खर्च दडवून ठेवण्याचा आरोपही त्यांनी केलाय. खासदार अनुप धोत्रे आता न्यायालयाला काय उत्तर देणार?, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणारेय.

याचिकाकर्त्याचे नेमकं म्हणणं काय?

खासदार अनुप धोत्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर केलेल्या खर्चाच्या माहितीमध्ये स्वत: 81 लाख 17 हजार 102 रुपये खर्च केल्याचे नमूद केले आहे. यासोबतच भाजपने त्यांच्यासाठी 6 लाख 55 हजार 830 रुपये खर्च केल्याची माहिती त्यांनी सादर केली आहे. हा एकूण खर्च त्यांनी 87 ला 72 हजार 932 एवढा दाखवला आहे. मात्र भाजपने धोत्रे यांच्या प्रचारासाठी प्रत्यक्षात 1 कोटी 24 लाख 60 हजार 590 रुपयांच्या जाहिराती प्रसिद्ध केल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. धोत्रे यांनी ही माहिती निवडणूक विभागाला खर्चाच्या हिशोबात देणे आवश्यक होती. परंतु त्यांनी तसे न करता ही माहिती लपवून  निवडणुक आयोगाची दिशाभूल केली असून  त्यांची निवड रद्द करण्यात यावी, असे याचिकाकर्ते गोपाल चव्हाण यांचे याचिकेमधून म्हणणे आहे.

पहिल्याच निवडणुकीत अनुप धोत्रे ठरलेत जायंट किलर 

अकोल्यातून भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या डॉ. अभय पाटील यांचा पराभव केलाय. शिवाय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर देखील पराभूत झाले आहेत. चाळीशीतील  अनुप धोत्रे ठरलेत जायंट किलर ठरले आहेत. त्यांनी पहिल्याच निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांसह काँग्रेस उमेदवाराचा दारूण पराभव केला. अनुप धोत्रे यांचे वडील संजय धोत्रे याआधी सलग चार वेळेस खासदार झाले होते. संजय धोत्रे आजारी असल्याने अनुप धोत्रेंना भाजपनं मैदानात उतरवलं होतं. त्यात त्यांनी एकहाती यश खेचून आणले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..



Source link

Vanchit Bahujan Aghadi : EVM विरोधात वंचित बहुजन आघाडीचीही उडी, राज्यभरात उभारणार जनआंदोलन

Vanchit Bahujan Aghadi : EVM विरोधात वंचित बहुजन आघाडीचीही उडी, राज्यभरात उभारणार जनआंदोलन


Vanchit Bahujan Aghadi on EVM अकोला : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरात EVM विरोधी जनआंदोलनाची हाक देण्यात आली आहे. स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्या टप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर पर्यंत राज्यात EVM विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. 

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील मतदारांना EVM विरोधात स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 2004 पासून ऍड. बाळासाहेब आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या नेतृत्वात EVM विरोधात आंदोलन करण्यात येत आहे. EVM च्या विरोधात न्यायालयीन लढाई सुद्धा ते लढत आहेत. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून EVM वापरामधील मधील अनेक घोळ त्यांनी माध्यमासमोर मांडले आहेत. EVMच्या विरोधात आरपारची लढाई लढण्याचा निर्णय ही वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे. 

वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते हे आपापल्या विभागात ही मोहीम राबविणार आहेत. सर्व मतदारांनी या मोहिमेत सहभागी होऊन EVM ला हद्दपार करण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.

विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर आरोप केले जात आहेत. आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी पोस्टल मते आणि ईव्हीएम मतांमधील ट्रेंड इतका कसा बदलला? असा सवाल उपस्थित करत धक्कादायक आकडेवारीच मांडली आहे. तसेच हीव्हीपॅट मतमोजणीची मागणी देखील त्यांनी केली आहे. 

EVM वरुन ठाकरे गट आक्रमक, आकडेवारी देत थेट प्रेझेंटेशन मांडलं!

ठाकरे गटाच्या पत्रकार परिषदेत वरूण सरदेसाई म्हणाले की, विधानसभेचा निकाल लागला. पण, त्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाहीत. विरोधी पक्षातील अनेक उमेदवारांना सम-समान आकडेवारी पाहायला मिळाली. एक महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे तो म्हणजे पोस्टल आणि बॅलेट मतदान. पोस्टल, बॅलेट मतदान हे ट्रेंडचं रिप्रेझेंटेशन असतं. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मविआचा 31 जागांवर लीड होतं तर 16 जागांवर महायुतीला लिड होतं. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत पोस्टल मतदानामध्ये महाविकास आघाडी 143 जागांवर लीडवर आहे. तर महायुती 140 जागांवर आघाडीवर आहे. तर ईव्हीएमच्या आकडेवारीत 143 वरून 46 जागांवर महाविकास आघाडीला लीड आली आहे, असे त्यांनी म्हटले.  

आणखी वाचा 

 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp