अमरावतीच्या दर्यापूर-अकोला मार्गावर भीषण अपघात; दोन वाहनांच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू

अमरावतीच्या दर्यापूर-अकोला मार्गावर भीषण अपघात; दोन वाहनांच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू


Accident News अमरावती : अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर-अकोला मार्गावर भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. यात दोन वाहनात अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. आज दुपारी 3 वाजता दर्यापूर-अकोला मार्गावरील लासुर फाट्याजवळ दोन चारचाकी वाहनात जोरदार धडक झाली.  ही धडक इतकी भीषण होती की ज्यामध्ये तिघांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एका वाहनात चार जण होते तर दुसऱ्या वाहनात दोन जण होते. जखमींना अकोला येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी  भेट देत पुढील कारवाई सुरू केली आहे. मात्र या अपघातामागील नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. सध्या पोलीस प्रकरणाचा तपास करत असून या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  

रत्नागिरी – मुंबई गोवा महामार्गावर डंपरने दुचाकीस्वाराला चिरडलं

दुसरीकडे, रत्नागिरी – मुंबई गोवा महामार्गावर संगमेश्वर येथे देखील असाच एक अपघात झाल्याचे समोर आले आहे. यात एका डंपरने धडक दिल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. महामार्गावरील काम करणा-या डंपरने दुचाकी स्वाराला धडक दिली आहे. बेजबाबदारपणे डंपर चालक गाडी चालवत असल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला असून मृत झालेल्या दुचाकी स्वाराचा मृतदेह ताब्यात घेण्यास ग्रामस्थांनी नकार दिला आहे. महामार्गावर सध्या चौपदरीकणाचं काम सुरु आहे. दरम्यान, संतप्त जमावाने मुंबई गोवा हायवे रोखून धरला. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूकीवर परिणाम झाल्याचेही दिसून आले  आहे.  

भरधाव ट्रकनं मोहाडीत दुचाकीस्वाराला चिरडलं

भंडारा येथील मोहाडीकडून तुमसरकडं जाणाऱ्या दुचाकीस्वारांना भरधाव ट्रकनं जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा घटनास्थळीस मृत्यू झाला. तर, दुसरा तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना मोहाडी – तुमसर मार्गावरील एमआयडीसी परिसरात घडली. अनिल गौतम असं मृतकाचं नाव असून अमोल पटले हा तरुण गंभीर जखमी आहे. दोघेही गोंदिया जिल्ह्यातील मुंडीकोटा येथील रहिवासी असून जखमी तरुणावर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. मोहाडी पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

हे ही वाचा 

 

अधिक पाहा..



Source link

Bacchu Kadu :  गरज सरो वैद्य मरो, हीच भाजपची भूमिका; बच्चू कडूंचा ‘प्रहार’, म्हणाले….

Bacchu Kadu : गरज सरो वैद्य मरो, हीच भाजपची भूमिका; बच्चू कडूंचा ‘प्रहार’, म्हणाले….


Bacchu Kadu अमरावती :देवेंद्र फडणवीस यांनी मला सत्तेसाठी फोन केला होता. मात्र माझ्या मतदारसंघासाठी काही मदत हवी आहे का? काही निधी हवा आहे का? यासाठी कधीही त्यांनी फोन केला नाही. किंबहुना मित्रता टिकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एकदाही मला फोन केला नाही. त्यामुळे गरज सरो आणि वैद मरो! ही भाजपची नेहमीची भूमिका असल्याची टीका करत बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.

जाती-धर्माकडे एकंदरीत निवडणूक नेण्याचा परिणाम झाला. त्यामुळे माझा पराभव हा तांत्रिक पराभव आहे. ईव्हीएम मशीनचा ही त्यात सहभाग आहे. माझी ही गफलत झाली. मात्र मी पराभूत झालो असलो तरी माझा वेग आता  वाढेल. मला पराभूत झाल्यावर ही आनंद आहे कारण मी दिव्यांगांसाठी काम करतोय. अशी प्रतिक्रिया देत बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी ही आपल्या पराभवाचे कारण सांगत ईव्हीएम मशीनला जबाबदार ठरवले आहे.    

भाजप म्हणजे ‘गरज सरो वैद्य मरो’

राज्यात दिव्यांगांचे लवकरच मोठे आंदोलन उभारणार आहोत. त्यात दिव्यांग, शेतमजूर व शेतकऱ्यांसाठी सतत कार्यरत राहण्याचा विश्वास आहे. माझ्या मतदारसंघात पैसा आणि जात माझ्या विजयाच्या वाटेत आली. विरोधकांनी बच्चू कडूला टार्गेट करून अभियान राबवविलं.  तसेच भारतीय जनता पार्टी म्हणजे “गरज सरो वैद्य मरो” मलाही याचा अनुभव आलेला आहे. त्यांच्या मदतीसाठी फडणवीस यांचा फोन येतो, मात्र त्यानंतर ते बच्चू कडूंना विसरले.

मोहन भागवत यांनी स्वतः पासून सुरुवात करायला पाहिजे

दरम्यान, घटत्या लोकसंख्या वाढीच्या दरावरुन सरसंघचालकांनी मोहन भागवतांनी चिंता व्यक्त केली आहे. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत असं भागवतांनी म्हटलं आहे. लोकसंख्या शास्त्राच्या आकड्यांचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांनी यावर भाष्य केलं आहे. दरम्यान यावरून बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देत संघ प्रमुख मोहन भागवत यांनी स्वतः पासून सुरुवात करायला पाहिजे, असा सल्ला दिला आहे. भाजपच्या आमदार खासदारांनी आधी हे केलं पाहिजे. एकीकडे तीन अपत्य असेल तर निवडणूक लढवता येत नाही. महत्त्वाचं राष्ट्रहित आहे. राष्ट्र आहे तर धर्म आहे. असेही बच्चू कडू म्हणाले.

सत्तेतला दांडुक म्हणजे हे मंत्रालय- बच्चू कडू 

राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्तास्थापनेबाबतही  बच्चू कडू यांनी भाष्य केलंय.  गृह मंत्रालय या साठी महत्त्वाचं आहे की कुणाला ठेचायच, कुणाच्या नाग्या नडवायच्या ते या गृह मंत्रालयकडून केल्या जातात. सत्तेतला दांडुक म्हणजे हे मंत्रालय. गावात कितीही खून होऊ द्या, त्याच्याशी पार्टीला काही घेणे देणे नसतं. असंख्य खूनातून पार्टी कशी निर्माण करता येईल, हा भाव त्या गृह मंत्रालयाच्या माध्यमातून असतो. असेही बच्चू कडू म्हणाले.

एकनाथ शिंदे माझे मित्र, मात्र…  

लाडकी बहीण योजना आणून वेळेवर तिजोरी खाली केली आणि नंतर फोन केल्या गेले की तुमच्या खात्यात सात हजार रुपये आले, हे काय? त्यामुळे जिसकी सत्त्ता उसकी भैंस. असेही बच्चू कडू म्हणाले. तर मुख्यमंत्री कुणीही होवो, जो जनतेची काम करेल तो आवडेल. असेही ते म्हणाले. माध्यमांनी खोटी माहिती जाहीर केली की मी शिंदेंना भेटलो. मात्र माझी आणि एकनाथ शिंदे यांची भेट झालेली नाही. ते माझे मित्र जरूर आहेत. मात्र आमची भेट झालेली नाही. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..



Source link

ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा

ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा


अकोला : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता 5 डिसेंबर रोजी नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाची स्थापना होणार असून मुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. भाजप नेताच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेईल हे जवळपास निश्चित झालं आहे. मात्र, मुख्यमंत्रीपद भाजपला मिळत असेल तर गृहमंत्रीपद शिवसेनेला मिळावे, अशी अपेक्षा शिवसेना (Shivsena) शिंदे गटाची आहे. मात्र, गृहमंत्रीपद हेदेखील भाजपकडेच आणि मु्ख्यमंत्र्यांकडेच ठेवण्याचा आग्रह असल्याची माहिती आहे. मात्र, गत महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री शिवसेना पक्षाचा असताना, गृहमंत्रीपद हे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. त्यामुळे, शिवसेना ह्या पदासाठी आग्रही आहे. त्यातच, आज पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी महायुतीमध्ये गृहमंत्रीपदावरुन चर्चा सुरू असल्याचं म्हटलं. त्यामुळे, गृहमंत्रीपदाचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्रीपद ज्या पक्षाकडे असते त्यांच्याकडेच आत्तापर्यंत राहिल्याचे सांगत, शिवसेनेला चिमटा काढला आहे. 

अमोल मिटकरी यांनी पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेचा संदर्भ देत उपमुख्यमंत्री व गृहमंत्रीपदाबाबत भाष्य केलं. डॉ.श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील या बातम्यांत तथ्य नसल्याचे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. या फक्त माध्यमांतील आणि सोशल मीडियातील बातम्या असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान, गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्रीपद ज्यांच्याकडे असते त्यांच्याकडेच हे पद असल्याने ते पद फडणवीसांकडेच राहील, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केलाय. त्यामुळे, मुख्यमंत्रीपदानंतर गृहमंत्रीपदासाठी आग्रही असलेल्या शिवसेना शिंदे गटाला एकप्रकारे अमोल मिटकरी यांनी चिमटा काढला आहे. आधीच शिवसेना पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळणार नसल्याने शिवसेनेचे अनेक नेते नाराज आहेत, स्वत: एकनाथ शिंदे हेही नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, आपण नाराज नसून महायुतीचे केंद्रातील नेते जो निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य आहे, माझा व शिवसेनेचा त्या निर्णयाला पाठिंबा आहे, असे एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरेगावमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी, तुम्ही गृहमंत्री, विधानसभा अध्यक्षपदाची मागणी केली आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर, उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘याबाबतची चर्चा महायुतीमध्ये होईल, चर्चेतून बऱ्याचशा गोष्टी सुटतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला मतदारांनी महायुतीला निवडून दिलेलं आहे. त्या मतदारांना केलेल्या कमिटमेंट त्या राज्याच्या विकासाच्या दृष्टीने त्या पूर्ण करायच्या आहेत. मला काय मिळालं कोणाला काय मिळालं यापेक्षा जास्त जनतेला काय मिळणार आहे. महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला भरभरून मतदान केलेलं आहे. मतांचा वर्षाव केलाय. आता त्यांना आमच्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेही शिंदेंनी स्पष्ट केले. 

अधिक पाहा..



Source link

वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला

वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला


अकोला : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर पराभूत उमेदवार आणि पक्षातील नेत्यांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी थेट हा निकालचा आम्हाला मान्य नसल्याचं म्हटलं,  तर काँग्रेसनेही ईव्हीएमबाबत (EVM) शंका उपस्थित केल्या आहेत. राज्यातील काही मतदारसंघात पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएम व मतमोजणीवर संशय व्यक्त करत फेरमतमोजणीची मागणी केली जात आहे. त्यातच, अकोला येथील वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) कार्यकर्त्यांनी देखील मतदान व मतमोजणीच्या प्रक्रियेत घोळ असल्याचं म्हटले आहे. वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी आज थेट जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन गोंधळ घातला. 

विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांचा गड असलेल्या अकोला जिल्ह्यात वंचितने सपाटून मार खाल्ला आहे. या पराभवानंतर आता पक्षातील वाद चव्हाट्यावर यायला लागले आहेत. अकोट विधानसभा मतदारसंघातील वंचितच्या पराभवाची विचारणा करण्यासाठी वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी आज थेट जिल्हा परिषद अध्यक्षांचा निवासस्थान गाठलं. या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि वंचितच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाले आहेत. वंचितच्या जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना अढाऊ यांच्या शिवाजीनगर या गावातच वंचितला फक्त 99 मतं मिळाली. शिवाजीनगर हे गाव अकोट मतदारसंघात येतंय. अकोट मतदार संघात वंचितचे दीपक बोडखे हे उमेदवार होते. विशेष म्हणजे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ते तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले आहेत. शिवाजीनगर गावात बुथ क्रमांक 104 आणि 105 वर काँग्रेसला 951, भाजपला 475 तर वंचितला केवळ 99 मतं मिळाली आहेत. त्यामुळे, याचा जाब विचारण्यासाठी वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी रतनलाल प्लॉट चौकातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या शासकीय निवासस्थानी धाव घेतली. 

वंचितला येथील मतदान केंद्रावर फक्त 99 मतं मिळाल्यावरुन, कमी मतदानावरून वंचितचे पदाधिकारी आणि जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना अढाऊ यांच्यात प्रचंड शाब्दिक वाद झाला. जिल्ह्यातील पराभवावरून वंचितमध्ये सध्या मोठा असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात वंचितमध्ये मोठा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, येथील मतदारसंघात केवळ 99 मतं कशी पडली याचं कारणही शोधण्याचा प्रयत्न वंचितकडून होत आहे. दरम्यान, राज्यातील काही मतदारसंघात मतमोजणी व मतदान यामध्ये तफावत दिसत असल्याने पराभूत उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी करत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज केले आहेत. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देत, त्याचे निरासन करण्याचा प्रयत्न केला. तसेच, ईव्हीएममध्ये कुठलाही बिघाड नसल्याचंही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. 

हेही वाचा

लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आंळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं

अधिक पाहा..



Source link

नोकरीसाठी कबड्डीतही बोगस खेळाडूंचा सुळसुळाट; विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गडांतर; चौकशीही मागणी

नोकरीसाठी कबड्डीतही बोगस खेळाडूंचा सुळसुळाट; विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गडांतर; चौकशीही मागणी


अकोला : निवडणुकांच्या काळात गेल्या काही दिवसांपासून बोगस मतदान, बोगस मतदार हा शब्द चांगलाच प्रचलित झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, हीच बोगसगिरी आता खेळामध्येही दिसून येत आहे. अकोला (Akola) येथे सध्या 19 वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा सुरू आहेत. मात्र, या स्पर्धेतील सहभागी अनेक संघांनी आपल्या संघांत बोगस खेळाडूंचा भरणा केल्याचा आरोप प्रशिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केला आहे. तसेच, या स्पर्धेत वयाची खोटी प्रमाणपत्र सादर करत 19 वर्षांवरील खेळाडूंचा सहभाग स्पर्धेत असल्याचेही आरोप कबड्डी (Kabaddi) प्रशिक्षक गुड्डू देशमुख यांनी केले आहेत. या आरोपाला येथील काही खेळाडूंनीदेखील दुजोरा दिला आहे. 

अकोल्यात कालपासून 19 वर्षाखालील राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. शहरातील वसंत देसाई शासकीय क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू असून खेळाडूप्रेमींचे व शालेय शिक्षकांचेही लक्ष याकडे लागले आहे. या स्पर्धेत राज्यभरातील शेकडो संघांनी आपला सहभाग नोंदवला. स्पर्धेतून राज्यस्तरावरचा संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडला जाणार आहे. मात्र, 19 वर्ष वयोगटातील खेळाडूंच्या नावावर जास्त वय असलेल्या खेळाडूंना घुसवल्याचा गंभीर आरोप होत आहे. राज्यातील काही व्यावसायिक खेळाडूंचा शाळांमध्ये कागदोपत्री प्रवेश दाखवून हे खेळाडू स्पर्धेत घुसवण्यात आल्याचं बोललं‌ जातंय. याबाबत, यवतमाळ येथील दुर्गेश मेंढे या सहभागी कबड्डी खेळाडूने संताप व्यक्त केला आहे. तसेच, असा प्रकार घडत असल्यास आमच्यासमोर पर्यायच उरत नाही, असेही त्यांने म्हटलंय. तसेच, कबड्डी प्रशिक्षक गुड्डू देशमुख, यांनीही हा प्रकार गंभीर असल्याचे सांगत चौकशीची मागणी केली आहे.
 
शालेय क्रीडा स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या नावावर व्यावसायिक क्रीडापटूंचा भरणा केला जात असल्याचा हा आरोप आहे. कबड्डीच्या एका संघात 12 जणांची निवड केली जाते. विजयी संघाच्या बाराही खेळाडूंना राज्यस्तरीय खेळाडूचे प्रमाणपत्र मिळते. याच प्रमाणपत्राच्या आधारावर नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिले जाते. या प्रमाणपत्रातून क्रीडा आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी मोठा आर्थिक गोरखधंदा होत असल्याचा आरोपही संबधितांकडून होत आहे. दरम्यान, यासंदर्भात पुराव्यांसह तक्रार केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचं आश्वासन क्रीडा विभागांनं दिलं आहे. डॉ.सतिशचंद्र भट, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी याची दखल घेतली आहे. दरम्यान, अशा प्रकाराची व गंभीर आरोपाची उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे, तरच चांगले खेळाडू या खेळात समोर येऊ शकतील. अन्यथा क्रीडा प्रकारावरूनही गोरगरीब व सर्वसामान्यांचा विश्वास उडेल. 

हेही वाचा

राष्ट्रवादी अन शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद; शिंदेंना स्थान?; महाराष्ट्रातील विजयानंतर दिल्लीत खलबतं

 

अधिक पाहा..



Source link

एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्पत्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या

एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्पत्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या


अमरावती : प्रहार संघटनेचे प्रमुख आणि परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार बच्चू कडू यांना यंदाच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे. अचलपूर मतदारसंघातून गेल्या 4 टर्म ते येथील मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले असून दिव्यांगांसाठी व रुग्णसेवेसाठी त्यांनी मोठं काम उभारलंय. मात्र, यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने अमरावती जिल्ह्यातील राणा आणि कडू यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. राणा दाम्पत्याने बच्चू कडूंना पाडण्यासाठी काम केल्यानेच कडू यांचा पराभव झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, माझ्या पराभवाचं कुणीही श्रेय घेऊ नये, असे म्हणत बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी  राणा दाम्पत्यावर हल्ला केला. तसेच, मुस्लिमांचा फतवा आणि कटेंगे तो बटेंगेमुळे आमचा सेवेचा झेंडा हरल्याची प्रतिक्रिया कडू यांनी दिली. तसेच, माझ्या पराभवानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा मला फोन आला होता, त्यांनी विचारपूस केली, असेही कडू यांनी सांगितले.    

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर मला खूप कॉल आले, त्यामुळे आम्ही जनतेकडून अभिप्राय घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. गेल्या 20 वर्षात लाखांपेक्षा अधिक लोकांच्या आम्ही शस्त्रक्रिया केल्या आहेत, कामात आम्ही महाराष्ट्रात अव्वल आहोत. पण, मुस्लिमांचा फतवा आणि कंटेंगे तो बटेंगे, यामुळे आमचा सेवेचा झेंडा हरला आहे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली. तसेच, एकनाथ शिंदे यांनी माझ्याशी संपर्क केला, आणि निवडणुकीबाबत माहिती घेतली, असेही कडू यांनी सांगितले. माझा पराभव त्यांनी करावा, एवढी राणा दाम्पत्यांची इतकी औकाद नाही. EVM च्या जागी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या आणि आजमावून घ्या. खरे मर्द असाल तर पुन्हा निवडणूक घ्या, आत्ताच सांगावं रवी राणाने पाच वर्षे कशासाठी थांबता, अशा शब्दात बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला टार्गेट करत चॅलेंज दिलंय. 

5 वर्षांनी मी कडू यांचे आव्हान स्वीकारतो

मी मागील 15 वर्षांपासून देवेंद्र  फडणवीस यांच्यासोबत आहेत, महायुती सरकारचे तेच मुख्यमंत्री राहतील असा मला विश्वास आहे, असे आमदार रवि राणा यांनी म्हटलंय. आम्हाला श्रेय घेण्याची गरज नाही, लोकांनी त्यांना हटवलं आहे. बच्चू हटाव हा नारा लोकांनीच दिला, असे म्हणत रवि राणा यांनी बच्चू कडूंवर प्रहार केला. ते म्हणाले होते मी मुख्यमंत्री होईन पण त्यांनी आता बोलणे बंद करायला हवं.  पाच वर्षानंतर मी बच्चू कडू यांचे आव्हान स्वीकारेन, ते सांगतील तिथे मी उभा राहीन, असं चॅलेंजही त्यांनी कडू यांचं स्वीकारलं आहे. दरम्यान, बच्चू कडू कुणाच्या तरी पक्षात प्रवेश करतील, लोकसभेला त्यांनी मतांचे विभाजन केल्यामुळे जनतेने त्यांचा बदला घेतला.  मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे, मी मंत्रिपद मागितलं नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा

नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp