बच्चू कडूंनी पहिल्यांदाच सांगितलं पराभवाचं राज’कारण’; भाजपच्या अजेंड्यावर टीका, म्हणाले….

बच्चू कडूंनी पहिल्यांदाच सांगितलं पराभवाचं राज’कारण’; भाजपच्या अजेंड्यावर टीका, म्हणाले….


अमरावती: लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश बाजूला सारुन महायुतीने विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय चमत्कार करुन दाखवला. विशेष म्हणजे या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांनाही दारुण पराभवाला समोर जावे लागले होते. दरम्यान, राज्याचे लक्ष लागून राहीलेल्या अचलपूर विधानसभा मतदारसंघातही असाच धक्कादायक निकाल लागल्याचे बघायला मिळाले. यात परिवर्तन महाशक्तीचे (Parivartan Mahashakti) घटक असलेले आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे (Prahar Janshakti Party) अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना परभवाचा जबर धक्का बसला. तर अचलपूर विधानसभेत भाजपचे प्रवीण तायडे यांनी दणदणीत विजय मिळवत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. दरम्यान या पराभवानंतर बच्चू कडूंनी पहिल्यांदाच आपल्या पराभवाचं कारण सांगत भाजपच्या अजेंड्यावर टीका केली आहे. तसेच सेवेचा झेंडा हरल्याची प्रतिक्रिया ही त्यांनी या वेळी दिली आहे.

धार्मिक राजकारणात आमचा सेवेचा झेंडा हारला – बच्चू कडू

धार्मिकता, मुस्लिमांचा फतवा आणि हिंदूंचा बटेंगे तो कंटेंगे या सगळ्या धार्मिक राजकारणात आमचा सेवेचा झेंडा हारला. इतका निधी आणूनही मला 67 हजार मत भेटली. अशी खंत विधानसभेच्या पराभवानंतर  पहिल्यांदाच बच्चू कडूंनी बोलून दाखवली आहे. दरम्यान, पुढील रूपरेषा ठरवण्यासाठी लोकांच्या प्रतिक्रिया घेऊन येत्या 2 तारखेला शेगाव या ठिकाणी अधिवेशन घेणार आणि त्यापूर्वी 29 तारखेला जिल्हा प्रमुखांची मुंबईत बैठक घेणार. असेही बच्चू कडू म्हणाले. 

शिंदे साहेबांची दावेदारी एकदम बरोबर- बच्चू कडू

पुढील बैठकीत चार प्रश्न आम्ही लोकांना विचारणार आहोत. सत्ता का सत्तेच्या बाहेर, झेंडा का सेवा. यावर ज्या प्रतिक्रिया येतील त्यावर आम्ही समोर जाऊ. बंडखोरी जर एकनाथ शिंदे यांनी केली नसती तर भाजप सत्तेत आली नसती. त्यामुळे शिंदे साहेबांची दावेदारी बरोबर आहे. असेही बच्चू कडू म्हणाले. 

मानहानीजनक पराभवानंतर बच्चू कडू ‘ॲक्शन मोड’वर

विधानसभेतील मानहानीजनक पराभवानंतर बच्चू कडू ‘ॲक्शन मोड’वर आले आहे. दरम्यान 29 नोव्हेंबरला राज्यातील पक्षाच्या सर्व पराभूत उमेदवारांची बैठक बच्चू कडूंनी मुंबईला बोलवली आहे. या बैठकीत पराभूत उमेदवारांसह पक्षाचे राज्यभरातील पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष हे उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरला प्रहारची चिंतन बैठक होणार आहेत. तर या बैठकीत बच्चू कडू पक्षाची पुढची दिशा ठरवणार आहे. बच्चू कडू स्वतः अचलपूर मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष होता परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीत सहभागी होता. या दरम्यानच्या काळात तिसऱ्या आघाडीच्या प्रचारासाठी बच्चू कडूंनी राज्यभरात विक्रमी सभा घेतल्या होत्या. तरीही त्यांना मोठ्या पराभवाला समोर जावे लागले आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

घरात बसून शेतीला पाणी देऊ शकतो, तर ईव्हीएम मशीन कंट्रोल करणं काय अवघड? नितीन देशमुख यांची शंका

घरात बसून शेतीला पाणी देऊ शकतो, तर ईव्हीएम मशीन कंट्रोल करणं काय अवघड? नितीन देशमुख यांची शंका


मुंबई : विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचंड अशा असतानाही दारुण पराभवला सामोरे गेलेल्या शिवसेना ठाकरे गटाकडून आज नवनिर्वाचित 20 आमदारांची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांना पुन्हा एकदा आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आज शिवसेना ठाकरे गटाकडून ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. पक्ष प्रतोदपदी सुनील प्रभू यांचीच निवड करण्यात आली. आदित्य ठाकरे यांची यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

दरम्यान, याच बैठकीसंदर्भात बोलताना बाळापूरचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी ईव्हीएम संदर्भात भाष्य करत शंका उपस्थित केली आहे. ईव्हीएमचा घोळ अनेक ठिकाणी आमच्या इथे सुद्धा पाहायला मिळाला. हा महायुतीचा विजय फक्त ईव्हीएम मशीन मुळेच झाला आहे. जर आपण घरात बसून शेतात पाणी देऊ शकतो, तर ईव्हीएम (EVM machine) मशीन कंट्रोल करणं काय अवघड आहे? असा प्रश्न करत त्यांनी विधानसभेच्या निकालाबाबत संशय व्यक्त केला आहे. दरम्यान राज्यात सगळ्या ईव्हीएम गुजरातमधून आल्या होत्या, असेही ते म्हणाले.  

ईव्हीएम संदर्भात आमच्याकडे साडेचारशे तक्रारी – संजय राऊत

ईव्हीएम संदर्भात बोलताना  शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ईव्हीएमवर शंका व्यक्त करत टीका केली आहे. ईव्हीएम बाबत आमच्याकडे जवळजवळ 450 तक्रारी आहेत. त्यावर वेळोवेळी आक्षेप घेऊन सुद्धा या तक्रारींची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे या निवडणुका सरळ मार्गाने झाल्या, असं आपण कसं काय म्हणू शकतो? म्हणून माझी परत मागणी आहे की, हा निकाल तसाच ठेवून पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.  

ईव्हीएम बाबत झालेल्या घोळ बाबत उदाहरण द्यायचं झालं तर नाशिक मध्ये एक उमेदवार आहे ज्याच्या घरात 65 मत असताना त्याला केवळ चार मतं पडली. डोंबिवलीत आमच्या कार्यकर्त्यांना असे आढळून आले की तिथे ईव्हीएम मशीनचे  आकडे मॅच होत नाहीत, आणि त्यावर आक्षेप घेतला तर निवडणूक आयोगचे अधिकारी तो आक्षेप मानायला तयार नाही. असे अनेक उदाहरणं पुढे आले आहेत. त्यांचे पुरावे ही पुढे आले आहेत. ज्यांनी कुठले असे क्रांतिकारी कार्य केले ज्यांना दीड दीड लाख मते मिळाली? काल पक्षात गेलेले लोक आमदार झाले, असा काय पराक्रम यांनी केला, जे यांना यश आलं. म्हणून कुठेतरी शंकेला जागा आहे.  प्रथमच शरद पवार सारख्या ज्येष्ठ नेत्याने ईव्हीएम वर संशय घेतली आहे. असेही खासदार संजय राऊत यांनी  शंका व्यक्त करत टीका केली

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

नणंदबाई कडून दबावचे राजकारण, तर बच्चू भाऊंनी अगाऊपणा नडला; नवनीत राणांची बोचरी टीका 

नणंदबाई कडून दबावचे राजकारण, तर बच्चू भाऊंनी अगाऊपणा नडला; नवनीत राणांची बोचरी टीका 


Maharashtra Assembly Election 2024 अमरावती : लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश बाजूला सारुन महायुतीने विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय चमत्कार करुन दाखवला आहे. विशेष म्हणजे गेल्या लोकसभेत भाजप आणि महायुतीला विदर्भात दारुण पराभवाला समोर जावे लागले होते. मात्र यंदा भाजपने योग्य नियोजन आणि रणनीती आखत घवघवीत यश मिळवले आहे. दरम्यान, अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथा पालथ झाल्याचे चित्र असून धक्कादायक निकाल आले आहे. यात अचलपूर मतदारसंघात प्रहारच्या बच्चू कडू यांच्यासह काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर अमरावती विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या अजित पवार गटाच्या सुलभा खोडके, बडनेरा येथून युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा 37 हजार मतांनी चौथ्यांदा विजयी झाले आहे. 

दरम्यान, अमरावतीत महायुतीलला मिळालेल्या यशाचे श्रेय नवनीत राणा यांना दिलं जात असून त्या किंगमेकरच्या भूमिकेत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान यावर स्वत:नवनीत राणांनी आपली प्रतिक्रिया दिली असून मी किंगमेकर नव्हे तर आमचे विचार किंगमेकर आहेत. जो विचार घेऊन आम्ही लोकसभा आणी विधानसभा लढलो. या विजयाचे श्रेय बराच अशा लोकांना आहे, ज्यांनी पडद्यामागे राहून काम केलंय. मात्र यावेळी पहिल्यांदा पाडण्यासाठी नाही तर निवडून आणण्यासाठी काम झालंय. बऱ्याच लोकांना मुख्यमंत्री बनायचं होतं. त्यात बच्चू भाऊंना इतकंच सांगेल की जरा कमी बोलले असते, अगाऊपणा कमी केला असता, तर आज ते आमदार राहिले असते. असा टोला ही  नवनीत राणांनी बच्चू कडू यांना लगावला आहे.

माझ्या नणंद बाई खूप कमाल आहे- नवनीत राणा 

दुसरीकडे तिवसा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांना पराभवाचा धक्का बसला आहे. पराभवानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ज्या ज्या मतदारांनी मला आणि महाविकास आघाडीला मतदान केलं, त्या सर्व मतदारांचे मी आभार मानते असं त्या म्हणाल्या. विधानसभा निवडणुकीचे लागलेले निकाल आश्चर्यजनक आहेत, हे अपेक्षित नव्हते असे त्या म्हणाल्या. पुरोगामी महाराष्ट्रात काय खेळी खेळली, हे समजण्याच्या पलीकडे आहे. जे झालं ते संपूर्ण लोकशाहीच्या विरोधात झाल्याचे यशोमती ठाकूर म्हणाल्या. दरम्यान यावर आता नवनीत राणांनी प्रतिक्रिया देत बोचरी टीका केली आहे. माझ्या नणंद बाई खूप कमाल आहे. त्या ज्या पद्धतीने दबावाचे राजकारण करत होत्या त्याला काँग्रेसचे लोकं कंटाळले होते. त्यांनी राजेश वानखडे यांचं काम केलं. असे त्या म्हणाल्या.

माझी इच्छा देवेंद्रजींना मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी- नवनीत राणा  

काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांनी जे आरोप केले त्याला नवनीत राणा यांनी उत्तर देत म्हणाल्या की, ते निवडून आले तर लोकशाही जिवंत आणि आम्ही आलो तर लोकशाहीवर अत्याचार हा कुठला न्याय? रवी राणा यांना पुढे जाताना पाहून बायकोला आनंद होतोच. सगळ्या बहिणींची मी मनापासून खूप आभारी आहे. आमचं पहिलं स्वप्न आहे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री झालेलं पाहणं. मी जास्त अपेक्षा करत नही. माझी इच्छा देवेंद्रजींना मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना पाहायची आहे. असेही नवनीत राणा म्हणाल्या. 

हे ही वाचा 

 

अधिक पाहा..



Source link

पुरोगामी महाराष्ट्रात काय खेळी खेळली हे समजण्यापलीकडचे, हे निकाल लोकशाहीविरोधी : यशोमती ठाकूर

पुरोगामी महाराष्ट्रात काय खेळी खेळली हे समजण्यापलीकडचे, हे निकाल लोकशाहीविरोधी : यशोमती ठाकूर


Yashomati Thakur : तिवसा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांना पराभवाचा धक्का बसला आहे. पराभवानंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ज्या ज्या मतदारांनी मला आणि महाविकास आघाडीला मतदान केलं त्या सर्व मतदारांची मी आभार मानते असं त्या म्हणाल्या. विधानसभा निवडणुकीचे लागलेले निकाल आश्चर्यजनक आहेत, हे अपेक्षित नव्हते असे त्या म्हणाल्या. पुरोगामी महाराष्ट्रात काय खेळी खेळली, हे समजण्याच्या पलीकडे आहे. जे झालं ते संपूर्ण लोकशाहीच्या विरोधात झाल्याचे यशोमती ठाकूर म्हणाल्या. 

विरोधी पक्ष पूर्ण गिळून टाकण्याचा प्रयत्न झाला आहे. जे झालं ते संपूर्ण लोकशाहीच्या विरोधात आहे हे माझं मत असल्याचे ठाकूर म्हणाल्या. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर यशोमती ठाकूर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तिवसा विधानसभा मतदारसंघात भाजपने यशोमती ठाकूर यांच्याविरोधात राजेश वानखेडे यांना उमेदवारी दिली होती. अटितटीच्या लढतीत अखेर राजेश वानखेडे विजयी झाले आहेत. 

 अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथा पालथ 

लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश बाजूला सारुन महायुतीने विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय चमत्कार करुन दाखवला आहे. विशेष म्हणजे गेल्या लोकसभेत भाजप आणि महायुतीला विदर्भात दारुण पराभवाला समोर जावे लागले होते. मात्र यंदा भाजपने योग्य नियोजन आणि रणनीती आखत घवघवीत यश मिळवले आहे. दरम्यान, अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथा पालथ झाल्याचे चित्र असून धक्कादायक निकाल आले आहे. यात अचलपूर मतदारसंघात प्रहारच्या बच्चू कडू यांच्यासह काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर अमरावती विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या अजित पवार गटाच्या सुलभा खोडके, बडनेरा येथून युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा 37 हजार मतांनी चौथ्यांदा विजयी झाले आहे. 

अधिक पाहा..



Source link

Akola Vidhansabha Winner List : अकोला जिल्ह्यातील विजयी उमेदवारांची यादी; भाजपचा एक गड काँग्रेस

Akola Vidhansabha Winner List : अकोला जिल्ह्यातील विजयी उमेदवारांची यादी; भाजपचा एक गड काँग्रेस


अकोला: विधानसभा निवडणुकांचा निकाल काल (शनिवारी) समोर आला आहे. राज्यात महायुती सरकारने मोठ्या प्रमाणावर विजय मिळवला आहे. अकोला जिल्ह्यामध्ये एकूण 5 विधानसभा मतदारसंघ आहेत. दरम्यान अकोला जिल्ह्यामध्ये 5 पैकी 3 मतदारसंघामध्ये भाजपने विजय मिळवला आहे.(Akola Vidhan Sabha Election 2024) 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या विधानसभेला 4 मतदारसंघ हे भाजपकडे गेले होते. तर एक मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटाकडे होता. आता भाजपचा एक मतदारसंघ काँग्रेसने जिंकला आहे. 

अकोला पश्चिम मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार साजीद खान पठाण यांनी भाजपला धक्का देत निसटता विजय मिळवला. जिह्यातील पाच मतदारसंघांपैकी तीन भाजपच्या कमळाने फुलले आहे, तरी अकोला पश्चिममध्ये काँग्रेसच्या ‘पंजा’ने विजय मिळवला. बाळापूरात नितीन देशमुख यांच्या विजयानंतर मशाल पेटल्याने महाविकास आघाडीला दिलासा मिळाला. भाजपच्या बालेकिल्ल्यात हा निकाल पक्षासाठी धक्कादायक ठरला असून आगामी राजकीय रणनीतीसाठी महत्त्वाचा ठरेल. मात्र एकंदरीत जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व दिसून येत आहे.

अकोला जिल्ह्यात कोणत्या पक्षाला किती जागा?

भाजप – 3
काँग्रेस – 1
शिवसेना ठाकरे गट – 1 

कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा गुलाल
1) अकोट : 

एकूण मतदार : 311972
झालेले एकूण मतदान : 213382
नोटा : 1161
अवैध मते : 121
रद्द केलेली मते : 06

प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते 

उमेदवार                      पक्ष          मिळालेली मते 
प्रकाश भारसाकळे        भाजप        93338
महेश गणगणे              काँग्रेस         74487
दीपक बोडखे               वंचित          34135

भाजपाचे प्रकाश भारसाकळे हे 18851 मतांनी विजयी
 

2) अकोला पुर्व : 

एकूण मतदार : 355797
झालेले एकूण मतदान : 220360
नोटा : 1510
अवैध मते : 81
रद्द केलेली मते : 09

प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते 

उमेदवार                   पक्ष          मिळालेली मते 

रणधीर सावरकर        भाजप          108619
गोपाल दातकर          सेना ठाकरे     58006
ज्ञानेश्वर सुलताने        वंचित            50681

भाजपाचे रणधीर सावरकर 50613 मतांनी विजयी

3) बाळापूर : 

एकूण मतदार : 311167
झालेले एकूण मतदान : 221042
नोटा : 289
अवैध मते : 03
रद्द केलेली मते : 05

प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते 

उमेदवार                   पक्ष          मिळालेली मते

नितीन देशमुख         सेना ठाकरे  82088
नातिकोद्दीन खतीब    वंचित         70349
बळीराम सिरस्कार    सेना शिंदे      61192

ठाकरेंच्या शिवसेनेचे नितीन देशमुख 11739 मतांनी विजयी.

4) मुर्तिजापूर (राखीव – अनुसूचित जाती) : 

एकूण मतदार : 311175
झालेले एकूण मतदान : 207868
नोटा : 886
अवैध मते : 94
रद्द केलेली मते : 00

प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते 

उमेदवार                  पक्ष          मिळालेली मते

हरीश पिंपळे           भाजप       91820
सम्राट डोंगरदिवे       राष्ट्रवादी शरद 55956
डॉ. सुगत वाघमारे    वंचित         49608

भाजपचे हरीश पिंपळे 35864 मतांनी विजयी 

एकूण मतदार : 351092
झालेले एकूण मतदान : 204060
नोटा : 1257
अवैध मते : 172
रद्द केलेली मते : 44

प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते 

उमेदवार                  पक्ष          मिळालेली मते

साजिदखान पठाण काँग्रेस       88718
विजय अग्रवाल       भाजप       87435
हरीश आलिमचंदानी अपक्ष        21481
डॉ. अशोक ओळंबे    प्रहार         2127
राजेश मिश्रा              अपक्ष        2653

काँग्रेसचे साजीदखान पठाण 1283 मतांनी विजयी.

 

अधिक पाहा..



Source link

अमरावती जिल्ह्यात यशोमती ठाकूर, बच्चू कडूंसह मविआला धक्का, रवी राणांचा चौथ्यांदा दणदणीत विजय

अमरावती जिल्ह्यात यशोमती ठाकूर, बच्चू कडूंसह मविआला धक्का, रवी राणांचा चौथ्यांदा दणदणीत विजय


Amravati District Vidhan Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश बाजूला सारुन महायुतीने विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय चमत्कार करुन दाखवला आहे. विशेष म्हणजे गेल्या लोकसभेत भाजप आणि महायुतीला विदर्भात दारुण पराभवाला समोर जावे लागले होते. मात्र यंदा भाजपने योग्य नियोजन आणि रणनीती आखत घवघवीत यश मिळवले आहे. दरम्यान, अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथा पालथ झाल्याचे चित्र असून धक्कादायक निकाल आले आहे. यात अचलपूर मतदारसंघात प्रहारच्या बच्चू कडू यांच्यासह काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर अमरावती विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या अजित पवार गटाच्या सुलभा खोडके, बडनेरा येथून युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा 37 हजार मतांनी चौथ्यांदा विजयी झाले आहे. 

बडनेरा विधानसभेचे आमदार आणि महायुतीतील घटक पक्ष असलेल्या युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रवी राणा (Ravi Rana) यांनी 37 हजार मतांच्या मताधिक्यांनी  चौथ्यांदा विजय संपादन केला  आहे. यावर बोलताना रवी राणा यांनी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू यांच्यावर टिका केली. लोकसभेत नवनीत राणांना पराभूत केलं, हा पराभव जिव्हारी लागला होता. त्यामुळे जनतेनी यशोमती ठाकूर आणि बच्चू कडू यांना दणका दिला. बच्चू कडू यांनी चिंतन करावं आणि जनतेची सेवा करावी, असा टोला ही रवी राणा यांनी बच्चू कडू यांना लगावला.

अमरावती जिल्हा निकाल

भाजप – 5
युवा स्वाभिमान – 1
राष्ट्रवादी अजित पवार – 1
उबाठा गट – 1

अमरावती विधानसभा – महायुतीतील अजित पवार गटाच्या सुलभा खोडके 5413 मतांनी विजयी

बडनेरा –  युवा स्वाभिमान पक्षाचे रवी राणा 37 हजार मतांनी चौथ्यांदा विजयी 

धामणगाव रेल्वे – महायुतीतील भाजपचे प्रताप अडसड 15950 मतांनी दुसऱ्यांदा विजय.. 

दर्यापूर – महाविकास आघाडीचे उबाठा गटाचे गजानन लवटे विजयी…

तिवसा – महायुतीतील भाजपचे राजेश वानखेडे  विजयी..

अचलपूर – महायुतीतील भाजप उमेदवार प्रवीण तायडे 12435 मतांनी विजयी 

मोर्शी – महायुतीतील भाजप उमेदवार उमेश यावलकर 61863 मतांनी विजयी 

मेळघाट – महायुतीतील भाजप उमेदवार केवलराम काळे 107233 मतांनी विजयी

यशोमती ठाकूर यांचाही पराभव 

माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. तिवसा विधानसभा मतदारसंघात भाजपने यशोमती ठाकूर यांच्याविरोधात राजेश वानखेडे यांना उमेदवारी दिली होती. राजेश वानखेडे यांच्याकडे 21 फेऱ्यांनंतर 8195 मतांचा लीड होता. अखेर आता यशोमती ठाकूर यांचा पराभव झाल्याचे निश्चित मानले जात आहे. 

कोण कोणते नेते पराभूत ? 

राजेश टोपे
बाळासाहेब पाटील
पृथ्वीराज चव्हाण 
बाळासाहेब थोरात 
धीरज विलासराव देशमुख
ऋतुराज पाटील  
रोहित पवार 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

 

 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp