अचलपूर विधानसभेचा धक्कादायक निकाल, सरकार स्थापनेच्या तयारीत असलेल्या बच्चू कडूंचा पराभव

अचलपूर विधानसभेचा धक्कादायक निकाल, सरकार स्थापनेच्या तयारीत असलेल्या बच्चू कडूंचा पराभव


Achalpur Vidhan Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश बाजूला सारुन महायुतीने विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय चमत्कार करुन दाखवला आहे. विशेष म्हणजे गेल्या लोकसभेत भाजप आणि महायुतीला विदर्भात दारुण पराभवाला समोर जावे लागले होते.  दरम्यान आज  (शनिवारी) सकाळी आठ वाजल्यापासून विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच महायुतीला (Mahayuti) बहुतांश ठिकाणी प्रचंड मोठे यश मिळताना दिसत आहे. दरम्यान, राज्याचे लक्ष लागून राहीलेल्या अचलपूर विधानसभा मतदारसंघातून एक धक्कादायक बातमी समोर आली. परिवर्तन महाशक्तीचे (Parivartan Mahashakti) घटक असलेले आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे (Prahar Janshakti Party) अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना परभवाचा जबर धक्का बसला आहे. तर अचलपूर विधानसभेत भाजपचे प्रवीण तायडे यांचा विजय जवळ जवळ निश्चित झाला आहे. 

भाजपचे प्रवीण तायडे यांचा विजय

अचलपूर विधानसभा मतदारसंघात बच्चू कडू विरुद्ध भाजपचे प्रवीण तायडे यांच्यासह काँग्रेसच्या अनिरुद्ध देशमुख यांच्यात तिरंगी लढत होती. यात मात्र भाजपचे प्रवीण तायडे यांनी  विजय संपादन करत मोठे यश आपल्या परड्यात खेचून आणले आहे. तर अमरावती विधानभेतून अखेर महायुतीच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुलभा खोडके 2258 मतांनी विजयी झाला आहे. 

सरकार स्थापनेच्या तयारीत असलेल्या बच्चू कडूंचा पराभव

कोणत्याही पक्षाजवळ बहुमत राहणार नाही, मात्र अमच्याशिवाय सरकार बसणार नाही, असा दावा बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केला होता.  यावेळी आर्वी येथे जयकुमार बेलखडे या प्रहारच्या उमेदवारासाठी आर्वी येथे सभा घेण्यात आली होती. यावेळी बच्चू कडू शेतकऱ्यांसाठी आक्रमक झाले असून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही 122 जागा उभ्या केल्या, त्यात 40 जागा प्रहारच्या आहे. त्यातल्या त्यात प्रहार 10-15 जागावर दणका ठेवणार आहे. त्यात आर्वीचा समावेश असल्याचंही ते म्हणाले होते. तर बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना महाविकास आघाडी आणि महायुती सोबत येण्यासंदर्भात फोन आल्याची माहिती पुढे आली होती. बच्चू कडू यांनी स्वत: फोनद्वारे या बाबत माहिती दिली होती. त्यामुळे सरकार स्थापनेच्या तयारीत असलेल्या बच्चू कडूंचा पराभव झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

 

अधिक पाहा..



Source link

मुझको राणाजी माफ करना… रवी राणा यांच्या विजयाचा जल्लोष, नवनीत राणांचा भन्नाट डान्स

मुझको राणाजी माफ करना… रवी राणा यांच्या विजयाचा जल्लोष, नवनीत राणांचा भन्नाट डान्स



Navneet Rana : मुझको राणाजी माफ करना… रवी राणा यांच्या विजयाचा जल्लोष, नवनीत राणांचा भन्नाट डान्स



Source link

नागपूरसह विदर्भात कोणाची हवा? कोण उधळणार गुलाल? जाणून घ्या सविस्तर निकाल एका क्लिकवर

नागपूरसह विदर्भात कोणाची हवा? कोण उधळणार गुलाल? जाणून घ्या सविस्तर निकाल एका क्लिकवर


क्रमांक

विधानसभा मतदारसंघ

महायुती उमदेवार

महाविकास आघाडी

वंचित/अपक्ष/इतर

विजयी उमेदवार


60

तुमसर

चरण वाघमारे (राष्ट्रवादी – एसपी)

राजू कारेमोरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

 

राजू कारेमोरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)


61

भंडारा

श्रीमती पूजा ठावकर (काँग्रेस)

नरेंद्र भोंडेकर (शिवसेना)

 

नरेंद्र भोंडेकर (शिवसेना)


62

साकोली

नानाभाऊ पटोले (काँग्रेस)

अविनाश ब्राह्मणकर (भाजप)

 

नानाभाऊ पटोले (काँग्रेस)


63

अ. मोरगाव

दिलीप बनसोड (काँग्रेस)

राजकुमार बडोले (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

 

राजकुमार बडोले (राष्ट्रवादी कॉँग्रेस)


64

तिरोरा

रविकांत बोपचे (राष्ट्रवादी – एसपी)

विजय रहांगडाले (भाजप)

 

विजय रहांगडाले (भाजप)


65

गोंदिया

गोपालदास अग्रवाल (काँग्रेस)

विनोद अग्रवाल (भाजप)

 

विनोद अग्रवाल (भाजप)


66

आमगाव

राजकुमार पुरम (काँग्रेस)

संजय पुरम (भाजप)

 

संजय पुरम (भाजप)


67

आरमोरी

रामदास मेश्राम (काँग्रेस)

कृष्णा गजबे (भाजप)

 

रामदास मेश्राम (काँग्रेस)


68

गडचिरोली

मनोहर पोरेटी (काँग्रेस)

डॉ. मिलिंद नरोटे (भाजप)

 

 


69

अहेरी

भाग्यश्री आत्राम (राष्ट्रवादी – एसपी)

धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

 

धर्मरावबाबा आत्राम


70

राजुरा

सुभाष धोटे (काँग्रेस)

देवराव भोंगळे (भाजप)

 

देवराव भोंगळे (भाजप) 


71

चंद्रपूर

प्रवीण पाडवेकर (काँग्रेस)

किशोर जोरगेवार (भाजप)

 

किशोर जोरगेवार (भाजप)


72

बल्लारपूर

संतोषसिंग रावत (काँग्रेस)

सुधीर मुनगंटीवार (भाजप)

 

सुधीर मुनगंटीवार (भाजप)


73

ब्रह्मपूरी

विजय वडेट्टीवार (काँग्रेस)

कृष्णालाल सहारे (भाजप)

 

विजय वडेट्टीवार (काँग्रेस)


74

चिमुर

सतीश वारजूकर (काँग्रेस)

बंटी भांगडिया (भाजप)

 

बंटी भांगडिया (भाजप)


75

वरोरा

प्रवीण काकडे (काँग्रेस)

करण देवतळे (भाजप)

 

करण देवतळे (भाजप)


76

वणी

संजय दरेकर (शिवसेना – यूबीटी)

संजीवरेड्डी बोडकुरवार (भाजप)

 

 


77

राळेगाव

वसंत पुरके (काँग्रेस)

डॉ. अशोक उइके (भाजप)

 

 


78

यवतमाळ

अनिल मंगूळकर (काँग्रेस)

मदन येरावार (भाजप)

 

 


79

दिग्रस

पवन जयस्वाल (शिवसेना- यूबीटी)

संजय राठोड (शिवसेना)

 

पवन जयस्वाल (शिवसेना- यूबीटी)


80

आर्णी

जितेंद्र मोघे (काँग्रेस)

राजू तोडसांब (भाजप)

 

 


81

पुसद

शरद मैंद (राष्ट्रवादी – एसपी)

इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

 

 


28

अकोट

महेश गंगणे (काँग्रेस)

प्रकाश भारसाकळे (भाजप)

 

प्रकाश भारसाकळे (भाजप)


29

बाळापूर

नितीन देशमुख (शिवसेना- यूबीटी)

बळिराम शिरसकर (शिवसेना)

 

नितीन देशमुख (शिवसेना- यूबीटी)


30

अकोला पश्चिम

साजिद खान मन्नन खान (काँग्रेस)

विजय अग्रवाल (भाजप)

 

साजिद खान मन्नन खान (काँग्रेस)


31

अकोला पूर्व

गोपाल दातकर (शिवसेना- यूबीटी)

रणधीर सावरकर (भाजप)

 

रणधीर सावरकर (भाजप)


32

मूर्तिझापूर

सम्राट डोंगरदिवे (राष्ट्रवादी – एसपी)

हरिश पिंपळे (भाजप)

 

हरिश पिंपळे (भाजप)


33

रिसोड

अमित झनक (काँग्रेस)

भावना गवळी (शिवसेना)

 

अमित झनक (काँग्रेस)


34

वाशिम

डॉ. सिद्धार्थ देवळे (शिवसेना- यूबीटी)

श्याम खोडे (भाजप)

 

श्याम खोडे (भाजप)


35

कारंजा

ज्ञायक पटनी (राष्ट्रवादी – एसपी)

सई डहाके (भाजप)

 

सई डहाके (भाजप)


36

धामणगाव रेल्वे

वीरेन्द्र जगताप (काँग्रेस)

प्रताप अडसड (भाजप)

 

प्रताप अडसड (भाजप)


37

बडनेरा

सुनील खराटे (शिवसेना- यूबीटी)

रवी राणा (महायुती पुरस्कृत)

 

रवी राणा (महायुती पुरस्कृत)


38

अमरावती

डॉ. सुनील देशमुख (काँग्रेस)

सुलभा खोडके (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

 

सुलभा खोडके


39

तिवसा

यशोमती ठाकूर (काँग्रेस)

राजेश वानखेडे (भाजप)

 

राजेश वानखेडे (भाजप)


40

दर्यापूर

गजानन लवटे (शिवसेना – यूबीटी)

अभिजीत अडसूळ (शिवसेना)

 

गजानन लवटे (शिवसेना – यूबीटी)


41

मेळघाट

डॉ. हेमंत चिमोटे (काँग्रेस)

केवलराम काळे (भाजप)

 

केवलराम काळे (भाजप)


42

अचलपूर

बबलूभाऊ देशमुख (काँग्रेस)

प्रवीण तायडे (भाजप)

बच्चू कडू (प्रहार)

प्रवीण तायडे


43

मोर्शी

गिरीश कराळे (राष्ट्रवादी – एसपी)

उमेश यावलकर (भाजप)

देवेंद्र भुयार (एनसीपी)

उमेश यावलकर (भाजप)


44

आर्वी

मयूरा काळे (राष्ट्रवादी – एसपी)

सुमित वानखेडे (भाजप)

 

सुमित वानखेडे (भाजप)


45

देवळी

रणजीत कांबळे (काँग्रेस)

राजेश बकाने (भाजप)

 

राजेश बकाने (भाजप)


46

हिंघणघाट

अतुल वांदिले (राष्ट्रवादी – एसपी)

समीर कुणावार (भाजप)

 

समीर कुणावार (भाजप)


47

वर्धा

शेखर शेंडे (काँग्रेस)

डॉ. पंकज भोयर (भाजप)

 

डॉ. पंकज भोयर (भाजप)




Source link

Akola Assembly Election : अकोला जिल्ह्यातील मतदारसंघामध्ये कोणी मारली बाजी? जाणून घ्या विजयी उम

Akola Assembly Election : अकोला जिल्ह्यातील मतदारसंघामध्ये कोणी मारली बाजी? जाणून घ्या विजयी उम


अकोला : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणूक 2024 ची मोठी धामधूम सुरु होती. राज्यात महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सामना झाला. तर दुसरीकडे प्रहारचे बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांची तिसरी आघाडी देखील निवडणुकीच्या मैदानात आहे. तिसरीकडे मनसे आणि प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी (VBA) देखील जोरदार तयारीसह निवडणुकीला सामोरी गेली. आता राज्यभराचे लक्ष निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. टप्याटप्याने विविध मतदारसंघातील कल हाती येत आहेत. जाणून घेऊयात उत्तर महाराष्ट्रातील कुठल्या मतदारसंघात कोण आघाडीवर आहेत. (Akola Vidhan Sabha Election 2024) 

अकोल्यामध्ये (Akola Vidhan Sabha Election 2024) एकूण 5 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी 2019 मध्ये झालेल्या विधानसभेला 4 मतदारसंघ हे भाजपकडे गेले होते. तर एक मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटाकडे होता. आता नेमकं कोण बाजी मारणार आणि भाजप आपल्या जागा राखण्यात यश मिळवणार का याकडे लक्ष्य लागलं होतं.

(ही यादी निवडणूक आयोगाकडून येणाऱ्या माहितीनुसार अपडेट होत आहे. ताज्या अपडेट्ससाठी ही बातमी रिफ्रेश करत राहा)

अकोला जिल्ह्यातील लढती :

एकूण मतदारसंघ : 05
मतदारसंघांची नावे : अकोला पश्चिम, अकोला पूर्व, अकोट, बाळापूर, मुर्तिजापूर (राखीव – अनुसुचित जाती) 

1) अकोला पश्चिम :

प्रमुख उमेदवार :
1) साजिदखान पठाण : काँग्रेस 
2) विजय अग्रवाल : भाजप 
3) डॉ. अशोक ओळंबे : प्रहार
4) हरीश आलिमचंदानी : भाजप बंडखोर अपक्ष
5) राजेश मिश्रा : शिवसेना ठाकरे गट बंडखोर अपक्ष

2) अकोला पूर्व :
प्रमुख उमेवार :
1) गोपाल उर्फ आशिष दातकर : शिवसेना ठाकरे गट
2) रणधीर सावरकर : भाजप
3) ज्ञानेश्वर सुलताने : वंचित बहुजन आघाडी

 

3) अकोट :
प्रमुख उमेदवार :
1) महेश गणगणे : काँग्रेस 
2) प्रकाश भारसाकळे  : भाजप
3) दिपक बोडखे : वंचित बहुजन आघाडी
4) ललित बहाळे  : स्वतंत्र भारत पक्ष – प्रहार आघाडी 

4) बाळापूर :
प्रमुख उमेदवार :
1) नितीन देशमुख : शिवसेना ठाकरे गट
2) बळीराम सिरस्कार : शिवसेना शिंदे गट
3) नातिकोद्दीन खतीब : वंचित बहुजन आघाडी 
4) कृष्णा अंधारे : राष्ट्रवादी अजित पवार बंडखोर अपक्ष

5) मुर्तिजापूर : (राखीव – अनुसुचित जाती)
प्रमुख उमेदवार :
1) सम्राट डोंगरदिवे : राष्ट्रवादी शरद पवार
2) हरीश पिंपळे : भाजप
3) डॉ. सुगत वाघमारे : वंचित बहुजन आघाडी. 
4) रवी राठी : प्रहार

(ही यादी निवडणूक आयोगाकडून येणाऱ्या माहितीनुसार अपडेट होत आहे. ताज्या अपडेट्ससाठी ही बातमी रिफ्रेश करत राहा)

अधिक पाहा..



Source link

मनसे उमेदवाराचा परस्पर भाजपला पाठिंबा, मनसैनिक संतापले, फोनवर शिवीगाळ; मनसेस्टाईल उत्तर देणार

मनसे उमेदवाराचा परस्पर भाजपला पाठिंबा, मनसैनिक संतापले, फोनवर शिवीगाळ; मनसेस्टाईल उत्तर देणार


Akola Vidhan Sabha Election 2024 : अकोल्यात (Akola) मनसेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असल्याचे बघायला मिळाले आहे. त्यासाठी कारण ठरलंय ते मनसे उमेदवार. झालं असे की मुर्तीजापुर मतदारसंघाचे मनसेचे (MNS) उमेदवार भिकाजी अवचार यांनी भाजपचे उमेदवार हरीश पिंपळे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर मनसेमध्ये भिकाजी अवचारांनी घेतलेल्या भूमिके विरोधात मनसे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अवचारांनी भाजपला पाठिंबा जाहीर करताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना फोनवर शिवीगाळ केलीए. त्याची एक ऑडिओ क्लिप देखील सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतोय. 

दरम्यान, मनसेचे उमेदवार भिकाजी अवचार हे सध्या नॉट रिचेबल आहेत. ते मिळाल्यानंतर मनसे स्टाईलमध्ये त्यांना उत्तर देऊ. असा थेट इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी दिलाय.

मनसे उमेदवाराचा परस्पर भाजपला पाठिंबा, मनसैनिक संतापले

संपूर्ण राज्यासह देशाला आतुरता लागून राहिलेला विधानसभा निवडणुकीची(Vidhan Sabha Election 2024) रणधुमाळी आज रंगते आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठीचे आज (बुधवारी) मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत सत्ताधारी महायुती आघाडी सत्ता राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर विरोधी महाआघाडी महाविकास आघाडी (MVA) ला पुन्हा सत्तेत येण्याची आशा आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व 288 जागांसाठी मतदान सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. तर संध्याकाळी 6 वाजता ही निवडणुकीची सांगता होत मतदारांचा अंतिम कौल मतपेटीत कैद होणार आहे आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी नंतर राज्याच्या सत्तेच्या सिंहासनावर कोण विराजमान होणार हे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान अकोल्याच्या मुर्तीजापुर मतदारसंघाचे मनसे उमेदवाराने परस्पर भाजपला पाठिंबा दिल्याने जिल्ह्यातील राजकारणाला वेगळे वळण लागले असून अनेक उलट सुलट प्रश्न आता विचारले जाऊ लागले आहे.  

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज अकोला जिल्ह्यातील कुटासा गावात सहकूंब आपला मतदानाचा हक्क बजावलाय. त्यांचं गाव हे अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघात येतंय. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची आई आणि पत्नीनंही मतदान केलंय. मिटकरी़नी कुटासा गावातील शिवाजी विद्यालय मतदान केंद्रावर मतदान केेेेलंय. अकोटमधून महायुतीने भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांना तिसर्यांदा संधी दिलीये. तर येथून वंचितचे दीपक बोडखे आणि काँगेसचे महेश गणगणे रिंगणात आहेयेत. याच मतदारसंघावर महायुतीकडून अमोल मिटकरींनी दावा केला होता. मात्र , अजित पवारांना हा मतदारसंघ सुटला नाहीये. दरम्यान, राज्यात अजित पवारांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

मेळघाट परिसरातील 6 गावांनी मतदानावर टाकला बहिष्कार, सुविधा नसल्यानं आदिवासी बांधव आक्रमक

मेळघाट परिसरातील 6 गावांनी मतदानावर टाकला बहिष्कार, सुविधा नसल्यानं आदिवासी बांधव आक्रमक


Maharashtra Vidhansabha Election 2024 Amravati : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhansabha Election) साठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मतदानासाठी नागरिकांचा कुठं चांगला तर कुठं अल्प प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दरम्यान, मेळघाटमधील (Melghat) आदिवासींना सुविधा नसल्यानं मतदानावर बहिष्कार टाकला आहे. आज मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर शुकशुकाट असल्याचं चित्र पाहायला मिळालं. 

अमरावतीच्या मेळघाट परिसरातील 6 गावांनी निवडणुकीवर टाकला बहिष्कार 

अमरावतीच्या मेळघाट परिसरातील 6 गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. रंगूबेली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खामदा, किन्हीखेडा, धोकरा, कुंड आणि खोकमार या 6 गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. या 6 गावामध्ये 1 हजार 300 मतदार आहे. या सर्वच मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. मूलभूत सुविधा, पाणी, रोड, नाल्या, वीज नसल्याने नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. केवळ घोषणा होतात मात्र सुविधा मिळत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आधी सुविधा द्यावी आणि त्यानंतर मग मतदान करावं असा निर्धात गावकऱ्यांनी केला आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळी सात वाजता सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी मतदानासाठी मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तर कुठे कमी प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत कोणत्या मतदारसंघात किती मतदान झालं याची माहिती समोर आली आहे. पाहुयात याबाबतची सविस्तर माहिती. 

अमरावती जिल्ह्यातील सकाळी 11 वाजेपर्यंत मतदान टक्केवारी 

अचलपूर – 22.29 %
अमरावती – 17.33 %
बडनेरा – 16.20 %
दर्यापूर – 15.40 %
धामणगाव रेल्वे- 15.41 %
मेळघाट – 18.16 %
मोर्शी – 19.99 %
तिवसा – 15.47 %

या मतदारसंघात मतदानासाठी लोकांचा चांगला प्रतिसाद

१ आरमोरी  ३०.७५
२ अहेरी   ३०.०६
३ उरण    २९.२६
४ आमगाव   २९.०६
५ अर्जुनी-मोरगाव २७.४
६ दिंडोरी  २६.४१
७ सिल्लोड  २६.२८
८ करवीर  २६.१३
९ शहादा २४.९८
१० वणी २४.८८
११ चिमूर २४.६८
१२ नवापूर २४.५८
१३ चिपळूण २४.५७
१४ गुहागर २४.३६
१५ ब्रह्मपुरी २४.१५

मुंबईत किती झालं मतदान?

राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सकाळी ७ ते ११ दरम्यान 15.78 टक्के मतदान झाले. तर मुंबई उपनगरात सकाळी 11 वाजेपर्यंत 17.99 टक्के मतदान झाले. मुंबई शहरात सर्वाधिक मतदान मलबार हिल मतदारसंघात झाल्याचे दिसून आले. सकाळी 11 वाजेपर्यंत मलबार हिल मतदारसंघात १९.७७ टक्के मतदान झाले. सर्वात कमी मतदान सायन कोळीवाडा मतदारसंघात झाले. याठिकाणी 12.82 टक्के इतका मतदानाचा टक्का नोंदवण्यात आला. मुंबई उपनगरात भांडुप पश्चिम मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 23.42 टक्के मतदान झाले. वांद्रे पूर्व येथे मुंबई उपनगरातील सर्वात कमी मतदान झाले. याठिकाणी १३.९८ टक्के मतदानाची टक्केवारी नोंदवण्यात आली.

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp