वडिलांनी आंबेडकर या ‘ब्रँड नेम’ ला धक्का लागू दिला नाही, ठरवलं असतं तर.., : सुजात आंबेडकर

वडिलांनी आंबेडकर या ‘ब्रँड नेम’ ला धक्का लागू दिला नाही, ठरवलं असतं तर.., : सुजात आंबेडकर


Sujat Ambedkar : ऐन निवडणुकीच्या (Maharashtra Election 2024) तोंडावर प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) आजारपणावेळची परिस्थिती ही आंबेडकर कुटुंबीयांसाठी सर्वच मोर्चांवर आव्हानात्मक होती, असं वक्तव्य त्यांचे सुपुत्र आणि वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) युवा नेते सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी केलंय. ते अकोला येथे ‘एबीपी माझा’शी खास बातचीत करताना बोलत होते.

प्रकाश आंबेडकरांच्या आजारपणावेळच्या परिस्थितीवर पहिल्यांदाच त्यांच्या कुटुंबीयांतील प्रतिक्रिया पुढे आलीय. आपल्या वडिलांनी सातत्याने ‘आंबेडकर’ या ‘ब्रँड नेम’ला धक्का लागू नये, याची काळजी घेतल्याचं‌ही ते म्हणालेय. मात्र विरोधक सातत्याने कायम त्यांची बदनामी करत असल्याची खंत सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केलीये. आपल्या बापाने ठरवलं असतं तर ते कायम सत्तेत मंत्री राहिले असतेय. मात्र, त्यांची बांधिलकी सर्वसामान्य माणूस आणि वंचित घटकांशी असल्याचं सुजात आंबेडकर म्हणालेत. 

सत्ताधारी आणि विरोधकांच्या घराणेशाहीने हा मुद्दा निकालात

दरम्यान, राज्याच्या प्रत्येक भागात विधानसभा निवडणुकीत वंचितला मिळणारा प्रतिसाद प्रचंड असल्याचे ते म्हणाले. सुजाता आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीत 40 वर सभा घेतल्यात. वंचित वर विरोधकांकडून होणारा बी टीमचा आरोप या निवडणुकीत पोचला गेल्याचं‌ ते म्हणालेय. सत्ताधारी आणि विरोधकांच्या घराणेशाहीने हा मुद्दा निकालात काढल्याचं ते म्हणालेय.

हल्ल्यांचा हिशेब निवडणूक झाल्यावर घेऊ- सुजात आंबेडकर

दरम्यान, ऐन निवडणुकीच्या काळात राज्यभरात अनेक ठिकाणी वंचितचे उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर हल्ल्यांच्या घटना घडल्यायेत. झालेल्या या हल्ल्यांचा हिशेब निवडणूक झाल्यावर घेऊ, असा इशारा त्यांनी दिलाय. येत्या निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात वंचितची भूमिका महत्त्वाची असेल असं ते म्हणालेय. निकालानंतर वंचित सरकारमध्ये असेल असेही ते म्हणालेत. कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असल्यास ते म्हणालेय. दरम्यान, वडील म्हणून प्रकाश आंबेडकरांना कराव्या लागत असल्यास संघर्षावर एक मुलगा म्हणून सुजाता आंबेडकर पहिल्यांदाच भरभरून बोललेय.

राहुल गांधी यांचा प्रकाश आंबेडकरांना फोन, म्हणाले….;

काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांना फोन केल्याची माहिती पुढे आली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी प्रकाश आंबेडकरांच्या प्रकृतीची विचारणा करत चौकशी केलीय. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रकाश आंबेडकरांवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेनंतर प्रकाश आंबेडकर पुन्हा नव्याने निवडणूक प्रचारात सक्रिय झाल्याचे बघायला मिळाले आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)  नुकतेच बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे सभेसाठी आले असताना आंबेडकरांना राहुल गांधीचा यांचा फोन आला आहे. यावेळी राहुल गांधींनी प्रकाश आंबेडकर यांना चांगल्या प्रकृतीसाठी शुभेच्छा देत स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

राज्यातील सत्ताधाऱ्यांचे पैसे पोहोचविण्याचे काम पोलीस करताय; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप 

राज्यातील सत्ताधाऱ्यांचे पैसे पोहोचविण्याचे काम पोलीस करताय; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक आरोप 


Prakash Ambedkar : राज्यात विधानसभा निवडणुकीचा (Vidhan Sabha Election 2024) प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीत प्रचारादरम्यान नेतेमंडळी एकमेकांवर गंभीर स्वरुपाचे आरोप करताना दिसतायत. दरम्यान, अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची निवडणूक विभागाच्या पथकाकडून तपासणी करण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकरांची (Prakash Ambedkar) आज बाळापुरात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सय्यद नातिकोद्दीन खतीब यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आहे.

अशातच अकोल्यातील मन नदीच्या काठावर असलेल्या हेलिपॅडवर आंबेडकरांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली. दरम्यान, राज्यातील नेत्यांच्या बॅगांच्या होत असलेली तपासणी योग्य असल्याचे भूमिका प्रकाश आंबेडकरांनी आधीच केली व्यक्त केली होती. मात्र, राज्यातील सत्ताधाऱ्यांचे पैसे पोहोचवण्याचं काम निवडणूक विभाग आणि पोलीस करत असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. बाळापुरातील पत्रकार परिषदेत बोलत असतांना त्यांनी हा खळबळजनक आरोप केला आहे.

मुंबईतील 1992 च्या बाँबस्फोटातील 300 लोक अद्याप बेपत्ता

आकोला जिल्ह्यातील बाळापुर येथील पत्रकार परिषदेत बोलत असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी गंभीर आरोप करत विविध मुद्यांवर भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले की, मुंबईत 1992 मध्ये बाँबस्फोट झाला होता. त्यात जवळपास 1 हजार मुस्लिम मारले गेले होते, त्यातील जवळ जवळ 300 लोक आतापर्यंत बेपत्ता आहेत. काँग्रेस सरकारने श्रीकृष्ण आयोग बसवला होता. त्यानंतर या आयोगाने अनेकांवर दोषारोप केले होते. या दोषरोपानंतर काँग्रेस सरकारने नसीम आरीफखान यांना याचिकाकर्ता केले.

तर यातील सुनावणीत महाराष्ट्र सरकारने शपथपत्रात म्हटले की आमचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही, म्हणून सीबीआय चौकशी व्हावी. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने श्रीकृष्ण आयोगाच्या शिफारसी अंमलात आणण्याचे वचन दिले होते. मात्र या याचिकेला महाराष्ट्र सरकारने गांभिर्याने चालवले नाही. त्यामूळे 12 ऑगस्ट 2012 ला कोर्टाने यातील कागदपत्र न पुरवल्याने कोर्टाने ही केस डिसमिस्ड केली. यानंतरच्या सरकारांनी याला नजरअंदाज केले असल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.  

आरोपीत बाळासाहेब  ठाकरे, शिवसेनेचाही समावेश- प्रकाश आंबेडकर  

यानंतरच्या सरकारांनी देखील याला नजर अंदाज केले. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला माझा सवाल आहे की 1 हजार हत्या आणि कित्येक बेपत्ता हे कुणी घडवून आणले. यातील आरोपींत बाळासाहेब  ठाकरे, शिवसेना होती. आज त्याच सेनेसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे. 20 तारखेपुर्वी या प्रकरणात काँग्रेसने पुढाकार का घेतला नाही? यावर स्पष्टीकरण द्यावे. यातील मृत 1 हजार लोकांना नुकसान भरपाई द्यावी. तसेच या प्रकरणात शरद पवारांचा रोल काय होता? हे शोधावं. असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

राहुल गांधींना सत्ता असलेल्या कर्नाटकचा विसर; भाजप नेते अनिल बोंडेंनी सुनावले खडेबोल, म्हणाले..

राहुल गांधींना सत्ता असलेल्या कर्नाटकचा विसर; भाजप नेते अनिल बोंडेंनी सुनावले खडेबोल, म्हणाले..


Maharashtra Politics अमरावती :  संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विदर्भातील प्रचारसभांमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल सात हजार रुपयांचा भाव देण्याचे आश्वासन दिले आहे. पण, काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला बाजारात साधारणत: 3 हजार 751 रुपये प्रति क्विंटलचा दर दिला जात आहे. हमीभावापेक्षा जवळपास १ हजार १४१ रुपयांनी हे दर कमी आहेत. केवळ निवडणुकीत मते मिळविण्यासाठी राहुल गांधी शेतकऱ्यांना भाववाढीचे स्वप्न दाखवित असल्याचा आरोप भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केला आहे. काँग्रेसने आधी कर्नाटकात सोयाबीनला सात हजार रुपयांचा भाव मिळवून द्यावा, असे आव्हान शेतकऱ्यांकडून दिले जात आहे. तर दुसरीकडे कर्नाटकात सोयाबीनला दिल्या जाणाऱ्या दरावरून भाजप नेत्यांनीही काँग्रेसवर निशाणा साधला आहे. 

कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर- डॉ. अनिल बोंडे 

जगात वर्षाला 35 कोटी टन सोयाबीनचे उत्पादन होते. यातील भारताचा वाटा साधारणत: एक कोटी टनपर्यंत आहे. मध्य प्रदेशात सर्वाधिक 55 लाख हेक्टरवर तर महाराष्ट्रात 45 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली जाते. मध्य प्रदेशात 50.60 लाख टन तर महाराष्ट्रात 40-45 लाख टन उत्पादन अपेक्षित असते. मागील काही वर्षांत सोयाबीनने मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील सर्वाधिक क्षेत्र व्यापले असल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे. हे व्यापक क्षेत्र लक्षात घेऊन काँग्रेसने महायुतीवर टीका करण्यासाठी सोयाबीनचा मुद्दा प्रचारात अग्रस्थानी ठेवला आहे. महायुती सरकारवर टीका करताना राहुल गांधी यांनीही सोयाबीनची कास धरली.

महायुतीने जाहीर केलेल्या सहा हजार रुपये प्रति क्विंटलची घोषणा पुढे नेत सात हजार रुपये केली. हे करताना त्यांना आपल्या पक्षाची सत्ता असलेल्या कर्नाटकचा विसर पडला आहे. कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यातील बसवा कल्याण, गुलबर्गा बाजारात सोयाबीनला सुमारे 3 हजार ७५१रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. कलबुर्गीत हे दर आणखी खाली आल्याचीही माहिती आहे. आधी कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या सोयाबीनला सात हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव काँग्रेसने देऊन दाखवावा, नंतरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आशवासन द्यावे, असे आव्हान विदर्भातील शेतकऱ्यांनी दिले आहे. या फसव्या आश्वासनांवरून काँग्रेसचे शेतकरीविरोधी धोरणा पुन्हा एकदा उघड झाल्याची चर्चा होऊ लागली आहे.

आधी कर्नाटकात सात हजारांचा भाव द्या –  डॉ. अनिल बोंडे

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे अमरावती जिल्ह्यातील तिवसाला आले. सोयाबीनला सात हजार रुपये प्रति क्विंटलचे दर देऊ म्हणाले. एक शेतकरी या नात्याने देशातील सोयाबीनचे भाव पाहिले. संपूर्ण कर्नाटकात ३,८०० रुपयांपेक्षा सोयाबीनला भाव नाही. खर्गे यांच्या गुलबर्ग्याच्या बाजारात हे भाव दिले जात आहेत. तरीही कर्नाटक सरकार दखल घेत नाही, सोयाबीनची खरेदी करीत नाही. ‘भावांतर’ योजनाही राबवित नाही. खर्गे मात्र निवडणुकीच्या प्रचारासाठी येऊन खोटे बोलतात. लोकांची फसवणूक करतात. आपल्या गावातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या कमी भावाची चिंता करीत नाहीत, अशी टीका भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच हजार रुपये प्रति हेक्टरी सोयाबीन उत्पादकांना मदत दिली होती. आता भावांतर योजना लागू करून हमीभावापेक्षा कमी दरातील फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकणार आहेत. असे काही तरी कर्नाटकच्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना खर्गे यांनी सांगावे असा टोलाही डॉ. बोंडे यांनी लगावला आहे. काँग्रेसमधील ८३ वर्षांचा माणूसही शेतकऱ्यांशी खोटे बोलू शकतो हे लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी सावध व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

हे ही वाचा 

 

अधिक पाहा..



Source link

Rahul Gandhi : पत्रकारांना व्यवस्थेला शरण जावे लागते, अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं टीकास्त्र

Rahul Gandhi : पत्रकारांना व्यवस्थेला शरण जावे लागते, अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं टीकास्त्र


Maharashtra Vidhan Sabha Election 2024: पत्रकारांना पगार घेऊन मुलांचे शिक्षण करायचे आहे. पोटाची भूक भागवायची आहे. हे करण्यासाठी त्यांना पगार हवा असल्याने त्यांना मालकाचे ऐकावेच लागते. एक तऱ्हेने पत्रकार हे गुलाम आहेत, अशी जहरी टीका संसदेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकारांवर (Journalists) केली आहे. त्यांच्या या टीकेवरून पत्रकारांमध्ये संताप वाढू लागला आहे. अमरावती (Amravati) जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथे काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची शनिवारी जाहीर सभा झाली. या सभेत मोदी यांच्यावर टीका करताना राहुल गांधी यांनी मीडियालच लक्ष्य केले. 

पत्रकारांना मालकांचे ऐकावेच लागतं, एक तऱ्हेने ते गुलाम आहेत

ते म्हणाले, मागच्या वर्षभरापासून संविधान, जातनिहाय जनगणना आणि 50 टक्के आरक्षण मर्यादेची भिंती तोडणार आणि हे लोकसभेत  करून दाखविणार असे सांगत आहे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी आरक्षणाच्या विरोधात असल्याचे सांगत आहेत. त्यांची मेमरी लॉस झाली आहे. त्यांच्यासमोरच हे सर्व मुद्दे मांडत असतानाही त्यांना याचा विसर पडला आहे. हे सर्व मीडियावले दाखवित नाही. हे सर्व त्यांचेच आहेत. हे मी जेव्हा म्हणतो तेव्हा हे सर्व माझ्याकडे पाहून हसतात. आम्ही त्यांचेच असल्याचे सांगत हसतात. तुमचे नाहीच असेही सांगतात. मात्र त्यांची चूक नाही. हे मला आवडतात.

पण, त्यांना पगार घ्यायचा आहे. मुलांचे शिक्षण करायचे आहे. त्यांच्या पोटाची भूक शमवायची आहे. हे करण्यासाठी त्यांना मालकांचे ऐकावेच लागते. एक तऱ्हेने हे गुलाम आहेत. त्यामुळे यांच्याशी माझी लढाई नाही. हे आमचे काहीही दाखविणार नाही. असे म्हणत राहुल गांधी यांनी मीडियालच लक्ष्य केलंय. मात्र पत्रकारांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळल्याचे दिसते आहे.

पत्रकारांमध्ये संतापाची लाट

दरम्यान, याच मुद्यावरून महाराष्ट्र संपादक परिषद मुंबईचे कार्याध्यक्ष प्रकाश कुलथे यांनी प्रतिक्रिया देत राहुल गांधी यांच्या विधानाचा निषेध केला आहे. राहुल गांधीजी आपण लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहात.आपण सत्ताधाऱ्याविरुद्ध आवाज उठवण्याचे काम करणे अपेक्षित आहे. मात्र आपण पत्रकारांविरुद्धचा आवाज उठवत आहात, त्यांना गुलाम म्हणत आहात. वर्षानुवर्षे निष्ठेने आपली लेखणी जिझवणाऱ्या तमाम पत्रकारांचा हा जाहीर अपमान आहे. आपल्या विधानाचा आम्ही जाहीर निषेध करतो. 

समाजाच्या समस्या चव्हाट्यावर आणणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यापेक्षा आपण प्रत्येक सभेत पत्रकारांना गुलाम म्हणता. ग्रामीण व शहरी भागातील सर्वच पत्रकार आपल्या या विधानाने कमालीचे दुखावलेले आहेत. राजकारणात तुम्ही कोणत्या पक्षावर टीका करायची कसे बोलायचे हा तुमचा अधिकार आहे. पण तुमच्या व कोणत्याही पक्षाच्या राजकारणाशी घेणेदेणे नसणाऱ्या पत्रकारांचा असा जाहीरपणे पाणउतारा करणे योग्य नसल्याचे प्रकाश कुलथे म्हणाले. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील…; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा

ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील…; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा


अमरावती : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चा (Maharashra Assembly Election 2024) प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यात सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. काल अमरावतीच्या दर्यापूरमधील खल्लार गावात भाजप नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांची सभेत मोठा राडा झाला. काही लोकांनी सभेत खुर्च्या फेकत राडा घातला होता. या हल्यात नवनीत राणा थोडक्यात बचावल्या. आता या प्रकरणी नवनीत राणा यांनी आरोपींना जर अटक झाली नाही तर अमरावती जिल्ह्यातील सगळा हिंदू समाज या ठिकाणी एकत्र येईल, असा इशारा दिला होता. आता ते कापाकापाची भाषा करत असतील तर आमची देखील भाषा कापण्याची राहील, अस इशारा नवनीत राणा यांनी दिलाय. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवरही (Uddhav Thackeray) नवनीत राणांनी गंभीर आरोप केलाय. 

नवनीत राणा म्हणाल्या की, पोलिसांची सगळे टीम काम करत आहे. आम्ही एकालाही सोडणार नाही, असे पोलिसांनी मला सांगितले आहे. आम्ही लोकसभेत शांतीप्रिय प्रचार केला होता. आता सुद्धा आम्ही शांतीप्रिय पद्धतीने प्रचार करत होतो. त्या लोकांनी गोंधळ सुरू केला होता. मी शांततेत भाषण करत होते. माझ्या सभेत दोनशे ते अडीचशे अपंग व्यक्ती बसलेल्या होत्या. मी भाषण करताना ते लोक माझ्याबाबत आक्षेपार्ह पद्धतीने बोलत होते. 

आम्ही शांत बसणार नाही

सभा झाल्यानंतर मी लोकांना भेटत असताना मला पाहून त्या लोकांनी शिवीगाळ केली. आम्ही तुम्हाला मारून टाकू, असे म्हटले. त्यानंतर त्या लोकांनी खुर्च्या उचलून आमच्या लोकांना मारण्यास सुरुवात केली. माझ्या पोलीस सुरक्षा रक्षकांना देखील मारहाण झाली. माझ्यावर थुंकण्याचा प्रयत्न झाला. जर त्यांची भाषा कापण्याची असेल तर आमची देखील भाषा कापण्याची राहील, आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा नवनीत राणा यांनी दिला. 

ते उद्धव बाळासाहेब ठाकरे नव्हे तर…

या प्रकरणी तुमचा कोणावर आरोप आहे? असे विचारले असता त्या म्हणाल्या की, ते गाव उद्धव ठाकरे यांच्या तालुकाध्यक्षांचे गाव आहे. उद्धव ठाकरे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे नाहीत, ते जनाब उद्धव ठाकरे झाले आहेत. त्यांना आमच्या बाबतची चिड होती, त्याबाबतचे दृश्य महाराष्ट्राला दिसलेला आहे. पण ते विसरले की, आम्ही सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन चालत आहोत. बाळासाहेब ठाकरे जेव्हा मंचावर उभे राहून पाकिस्तानला सरळ उत्तर देण्याचे काम करत होते. तसे मी सुद्धा त्यांचीच मुलगी म्हणून त्यांचे विचार घेऊन मैदानात उतरली आहे. 

आणखी वाचा 

मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले

अधिक पाहा..



Source link

अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्

अमरावतीत नवनीत राणांच्या सभेत जोरदार राडा, राणांच्या अंगावर खुर्च्या भिरकावल्या, 40 जणांवर गुन्


अमरावती: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना दर्यापूर मतदार संघातील रवी राणा (Ravi Rana) यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदीले यांच्या प्रचारार्थ नवनीत राणा (Navneet Rana) यांच्या उपस्थितीत खल्लार येथे जाहिर सभेचे आयोजन खल्लार येथे करण्यात आले होते. शनिवारी रात्री प्रचारसभा आटोपल्यानंतर नवनीत राणा परत निघाल्या असताना अज्ञात विशिष्ट एका गटाने नवनीत राणा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यामुळे खल्लार गावात चांगलेच वातावरण तापले होते. यावेळी खुर्च्यांची फेकफाक करुन अज्ञातांनी चांगलाच गोंधळ घातला होता. काही जण तर नवनीत राणाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करीत होते. एका जमावाने नवनीत राणा यांच्यावरही खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न केला.  मात्र, नवनीत राणा यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांनी या खुर्च्या अडवल्या. या हल्ल्यात युवा स्वाभिमान पक्षाचे (Yuva Swabhiman) युवा जिल्हाप्रमुख आणि काही अन्य पदाधिकाऱ्यांना दुखापत झाल्याचे समजते. 

यावेळी मोठ्या संख्येने संतप्त कार्यकर्त्यांनी आणि नवनीत राणा यांनी पोलीस स्टेशनमध्ये धडक दिली. दोन तासानंतर हा हल्ल्याप्रकरणी खल्लार पोलीसांनी तक्रार दाखल करून 30 ते 40 जणांवर गुन्हे दाखल केले. पण आरोपींना सकाळी 10 वाजेपर्यंत अटक केली नाहीतर अमरावती जिल्ह्यातील सगळे हिंदू याठिकाणी दाखल होतील असा इशारा नवनीत राणा यांनी दिला आहे. त्यामुळे आता पोलीस याप्रकरणी काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

नवनीत राणा यांना धमक्या

नवनीत राणा यापूर्वी अनेक धमक्या मिळाल्या आहेत. 10 ऑक्टोबरला नवनीत राणा यांना धमकीचे पत्र आले होते. यामध्ये 10 कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी नवनीत राणा यांनी पोलिसांत तक्रार केली होती. दरम्यान, दर्यापूर येथील राड्यानंतर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. घटनास्थळावरील व्हिडीओच्या आधारे आरोपींची ओळख पटवली जात आहे. या घटनेनंतर पोलिसांनी दर्यापूरमध्ये सुरक्षा वाढवली आहे.

आणखी वाचा

भाषण संपताच स्टेज खचला; उद्धव ठाकरे कडेकडेनं उतरले, ठाण्यात नेमकं काय घडलं?, Video

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp