राज्यात विधानसभा निवडणुक निकालानंतर सत्तेसोबत जाणार; वंचित नेते प्रकाश आंबेडकरांचे सूचक वक्तव्य

राज्यात विधानसभा निवडणुक निकालानंतर सत्तेसोबत जाणार; वंचित नेते प्रकाश आंबेडकरांचे सूचक वक्तव्य


Prakash Ambedkar : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) राज्यभरात जोरदार प्रचार केला जात आहे. या निवडणुकीच्या दरम्यान प्रचाराला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना राजकीय खलबत देखील रंगू लागली आहे. अशातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) मोठे विधान केलं आहे. राज्यातील विधानसभा निवडणुक निकालानंतर आम्ही सत्तेसोबत जाणार असल्याचे मोठे संकेत प्रकाश आंबेडकरांनी दिले आहे. अकोल्यात माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकरांनी हे मोठं वक्तव्य केलंय. त्यामुळे वंचित आगामी काळात नेमका काय पवित्रा घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.        

निकालानंतर महायुती आणि मविआचे पर्याय खुले- प्रकाश आंबेडकर

राज्यातील विधानसभा त्रिशंकू राहणार असल्याचा अंदाज  प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला आहे. राज्यातील सध्याचे राजकारण तत्वहीन असून सध्याच्या परिस्थितीत कोणीही कुठेही जाऊ शकतं. सध्याच्या परिस्थितीत आम्हाला सत्तेसोबत जाणं महत्त्वाचं वाटतं. या वक्तव्यातून प्रकाश आंबेडकरांनी निवडणूक निकालानंतर महायुती आणि महाविकास आघाडीचे पर्याय खुले असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. तर ‘बटेंगे तो कटेंगे”च्या मुद्द्यावरही आंबेडकरांनी भाजपवर प्रहार केला आहे. विकासाचे मुद्देच नसल्यामुळे भाजप मतांचे धार्मिक ध्रुवीकरण करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. माध्यमं जाणीवपूर्वक वंचितकडे दुर्लक्ष करत असल्याचा गंभीर आरोपही आंबेडकरांनी यावेळी बोलतांना केला आहे. ते अकोला येथे बोलत होते.

सत्ताधारी पक्ष अळ्या पेक्षा अळ्या झाला आहे-प्रकाश आंबेडकर

तुम्ही सभागृहात गेल्याशिवाय तुमच्या समस्या सुटणार नाहीत. तरीही तुम्ही भाजपाला मतदान करत असाल तर तुम्हाला कोण वाचवेल? अनेक वर्ष काँग्रसने सत्ता केली. त्यानंतर भाजप आल मात्र काय बदल झाला? तरी तुम्ही काँग्रेस आणि भाजपाला मतदान करता. साचलेल पाणी गढूळ होतं, त्यामुळे ते पाणी आपण पित नाही. कारण त्यात अळ्या असतात. असाच सत्ताधारी पक्ष अळ्या पेक्षा अळ्या झाला आहे. अशी टीका ही प्रकाश आंबेडकरांना बुलढाणा येथील सभेतून सरकारवर केली आहे. मी ओबीसींना सांगतो. स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण गेलं. आता सुप्रीम कोर्टाच्या नावाने विधानसभा झाल्या की शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण घालवतील, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

मी औरंगजेबाच्या कबरीवर गेल्यामुळे राज्यातील दंगली थांबल्या;  प्रकाश आंबेडकरांचा दावा

मी औरंगजेबाच्या कबरीवर गेल्यामुळे राज्यातील दंगली थांबल्या; प्रकाश आंबेडकरांचा दावा


अकोला : आपण औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवल्याच्या कृतीमुळे राज्यातील दंगली थांबल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. ते अकोला जिल्ह्यातील कुरणखेड येथे अकोला पूर्व आणि मुर्तीजापुर मतदारसंघातील वंचितच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलत होते. गेल्या वर्षी प्रकाश आंबेडकरांनी खुल्ताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यानंतर राज्यात मोठा राजकीय गदारोळ उडाला होता.

जातीच्या आधारावर मतदान करत असाल तर माती खाल असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी मतदारांना दिला. निष्ठावंत कार्यकर्ते आणि पक्षाला मतदान केलं तरच तुमचा विकास होऊ शकतो असं आवाहनही आंबेडकरांनी मतदारांना केलं. 

ठाकरे-शिंदेंच्या जागी वंचितला मतदान करा

दरम्यान, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये लढत असलेल्या राज्यातील 32 मतदारसंघात मुस्लिमांनी आपल्याला पाठिंबा द्यावं असं आवाहन आंबेडकरांनी केलंय. हे दोन्ही पक्ष बाबरी मस्जिद विद्ध्वंसासाठी कारणीभूत असल्याचं आंबेडकर म्हणाले. जर या मुद्द्यावर मुस्लिमांकडून मदत मागणे हा गुन्हा असेल तर तो गुन्हा मी शंभरदा करेन असंही आंबेडकर म्हणाले. राज्यात आपले 35 आमदार आले तर आपण विधानसभेत मोहम्मद पैगंबर बिल आणणार असल्याचेही आंबेडकर म्हणाले. 

दंगली थांबवण्यासाठी औरंगजेबाच्या कबरीवर

गेल्या वर्षी जून महिन्यात प्रकाश आंबेडकरांनी खुल्ताबाद या ठिकाणी जाऊन औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवली होती. त्यावर बोलताना आंबेडकर म्हणाले होते की, या आधी जो चुकीचा समज तयार करण्यात आला आहे किंवा हिंदू मुस्लिमांमध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न के जात आहे तो थांबवण्यासाठी मी हे कृत्य केलं. माझ्या या प्रयत्नांना यश आलं असं मी समजतो. औरंगजेबाच्या नावाने ज्या दंगली होत आहेत त्या आता होणार नाहीत. 

मुस्लीम समाजाला आवाहन

या आधीही प्रकाश आंबेडकरांनी मुस्लिम समाजाला आवाहन केलं होतं. ते म्हणाले होते की, “नरेंद्र मोदी प्रत्येक सभेत संविधान डोक्यावर घेतात, बायबल आहे असे सांगतात. मी मुस्लिम समाजाला आव्हान करतो, मागच्या पाच वर्षात खूप हल्ले झाले आहेत. त्यावेळी, वंचित बहुजन आघाडीच आपल्या पाठीमागे उभी राहिली, बाकी कोणी आले नाहीत. राज्यातील विधानसभा मतदारसंघात 32 जागा अशा आहेत, जिथे शिवसेनेच्या दोन गटांमध्ये थेट लढत होत आहे. तेथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारही मैदानात आहेत. शिवसेनेचे दोन्ही गट तुमच्या बाजूने नाहीत, म्हणून मौलविना माझा प्रश्न आहे आमच्या बाजूने या.”

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..



Source link

राहुल गांधी यांचा प्रकाश आंबेडकरांना फोन, म्हणाले….; वंचित आणि काँग्रेसमधील कटुता कमी होणार?

राहुल गांधी यांचा प्रकाश आंबेडकरांना फोन, म्हणाले….; वंचित आणि काँग्रेसमधील कटुता कमी होणार?


Rahul Gandhi : काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांना फोन केल्याची माहिती पुढे आली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी प्रकाश आंबेडकरांच्या प्रकृतीची विचारणा करत चौकशी केलीय. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रकाश आंबेडकरांवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेनंतर प्रकाश आंबेडकर पुन्हा नव्याने निवडणूक प्रचारात सक्रिय झाल्याचे बघायला मिळाले आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे सभेसाठी आले असताना आंबेडकरांना राहुल गांधीचा यांचा फोन आला आहे. यावेळी राहुल गांधींनी प्रकाश आंबेडकर यांना चांगल्या प्रकृतीसाठी शुभेच्छा देत स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

लोकसभा निवडणुकीत वंचित महाविकास आघाडी झाल्यामुळे काँग्रेस आणि वंचितमध्ये दुरावा वाढला होता. अकोल्यात लोकसभेला काँग्रेसने आंबेडकरांविरोधात उमेदवार दिला होता. त्यामुळे लोकसभेत आंबेडकर पराभूत होत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते. त्यात राहुल गांधींच्या फोननंतर वंचित आणि काँग्रेसमधील कटुता आता काही प्रमाणात कमी होणार का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले आहे.

सत्ताधारी पक्ष अळ्या पेक्षा अळ्या झाला आहे-प्रकाश आंबेडकर

तुम्ही सभागृहात गेल्याशिवाय तुमच्या समस्या सुटणार नाहीत. तरीही तुम्ही भाजपाला मतदान करत असाल तर तुम्हाला कोण वाचवेल? अनेक वर्ष काँग्रसने सत्ता केली. त्यानंतर भाजप आल मात्र काय बदल झाला? तरी तुम्ही काँग्रेस आणि भाजपाला मतदान करता. साचलेल पाणी गढूळ होतं, त्यामुळे ते पाणी आपण पित नाही. कारण त्यात अळ्या असतात. असाच सत्ताधारी पक्ष अळ्या पेक्षा अळ्या झाला आहे. अशी टीका ही प्रकाश आंबेडकरांना बुलढाणा येथील सभेतून सरकारवर केली आहे.

तर शिक्षण आणि नोकरीतील आरक्षणही घालवतील 

सत्ताधारी आता सरळ पैसे वाटतील. प्रत्येक मताला चार हजार देतील. फक्त 80 हजार मत पाहिजे करा हिशोब. नंतर कमिशन घेऊन ते भरून काढतात. पाच टक्के तुम्हाला दिलं तरी पंधरा टक्के हे सत्ताधारी खातात. शेतमाल घेणारा मारवाडी का असतो? इथल्या बेरोजगारांना अनुदान का देत नाही. म्हणून तुमची प्रगती करायची असेल तर राज्यात बदल आवश्यक आहे. ते म्हणतात तुम्ही कितीही बोंबला. सत्ता आमच्याकडेच येईल. कारण ते सर्व आमचे जातीचे आहेत. त्यांना विकास नकोय. मी ओबीसींना सांगतो. स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण गेलं. आता सुप्रीम कोर्टाच्या नावाने विधानसभा झाल्या की शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण घालवतील, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

इतर बातम्या :

अधिक पाहा..



Source link

सर्वांनी मिळून माझा लोकसभा निवडणुकीत पराभव केला; नवनीत राणा यांचे महायुतीला आव्हान

सर्वांनी मिळून माझा लोकसभा निवडणुकीत पराभव केला; नवनीत राणा यांचे महायुतीला आव्हान


Navneet Rana: भाजप नेत्या नवनीत राणा (Navneet Rana) यांचा महायुतीच्या विरोधात प्रचार सुरु आहे. दर्यापूरमधील महायुतीचे (Mahayuti) उमेदवार अभिजित अडसूळ यांच्या विरोधात उभे असलेले भाजप बंडखोरी करणारे रमेश बुंदीले यांच्या प्रचाराला नवनीत राणा सहभागी झाल्या होत्या. यावेळी नवनीत राणा यांनी जाहीर सभा घेत भाषण देखील केलं. 

दर्यापूरमध्ये महायुतीकडून शिंदे शिवसेनेने अभिजित अडसूळ (Abhijeet Adsul) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपचे माजी आमदार रमेश बुंदीले यांनी बंडखोरी करत युवा स्वाभिमान पार्टीकडून उमेदवारी घेतली. त्याच रमेश बुंदीले यांचा प्रचार करण्यासाठी भाजप नेत्या नवनीत राणा यांनी दर्यापूर मतदार संघात प्रचार सभा घेतल्या.

एकनाथ शिंदेंनी दिला होता दम-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दर्यापूरमध्ये सभा झाली ज्यामध्ये महायुतीचा धर्म पाळावा, असा दम एकनाथ शिंदेंनी राणा दाम्पत्यांना दिला. तरीही नवनीत राणा यांनी रमेश बुंदीले साठी दोन ठिकाणी सभा घेतल्या. 

सर्वांनी मिळून माझा पराभव केला- नवनीत राणा

मी कुठल्याही वादळाला घाबरत नाही. मी हा मतदारसंघ दत्तक घेतला असून युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदीले यांच्या पाठीशी उभे असल्याचं नवनीत राणा यांनी सांगितले. तसेच सर्वांनी मिळून माझा लोकसभा निवडणुकीत पराभव केला. यानंतरही मी अजिबात खचले नाही, असंही नवनीत राणा यांनी सांगितले. 

नवनीत राणा यांची महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांवर टीका-

नवनीत राणा यांनी दर्यापूरच्या उबाठा गटाचे उमेदवार गजानन लवटे यांच्यावर देखील टीका केली आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार अभिजित अडसूळ यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. एक बँक लूटमारा आणि दुसरा दारू विकणारा आहे, अशा हल्लाबोल नवनीत राणा यांनी केला. तसेच दर्यापूरमध्ये उबाठा गटाच्या उमेदवाराचा व्यवसाय काय…?, असा सवाल उपस्थित करत महिला माझ्याकडे नेहमी यायचे की अवैध दारू बंद करा..या मतदार संघात मशाल घेऊन उद्धव ठाकरे यांनी जो उमेदवार दिला त्याचा व्यवसाय दारूचा आहे. त्या उमेदवाराला जर मतदान दिलं तर गावात तो पाईप लाईन टाकून दारू विकेल. त्यामुळे तुम्हाला कोण आमदार म्हणून हवा आहे, हे तुम्ही ठरवा, असं विधान नवनीत राणा यांनी केलं.

Eknath Shinde Amravati : त्यांना कायमचे बाहेर पाठवून द्या; शिंदेंची राणा दाम्पत्यावर जहरी टीका, Video:

संबंधित बातमी:

Ajit Pawar: चकली, गुलाबी जॅकेटपासून थंड पाणी…अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना काय काय सापडलं?

अधिक पाहा..



Source link

पक्ष सांगेल त्याचा प्रचार करणार, संजय राठोड यांच्यावर काय म्हणाल्या चित्रा वाघ?

पक्ष सांगेल त्याचा प्रचार करणार, संजय राठोड यांच्यावर काय म्हणाल्या चित्रा वाघ?


अकोला : यवतमाळमधील एका मुलीच्या आत्महत्येनंतर संजय राठोड यांच्यावर सर्वाधिक टीका केलेल्या चित्रा वाघ यांनी पक्षाने आदेश दिला तर त्यांच्या प्रचाराला जाण्याचे संकेत दिले आहेत. संजय राठोड यांच्या प्रचाराला जाणार का असा प्रश्न विचारल्यानंतर महायुतीच्या उमेदवारांना जिथे जिथे गरज असेल त्या ठिकाणी प्रचाराला जाणार असल्याचं चित्रा वाघ म्हणाल्या. अकोल्यात त्या माध्यमांशी बोलत होत्या. 

चित्रा वाघ अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर येथे भाजप उमेदवार हरीश पिंपळे यांच्या प्रचारासाठी आल्या होत्या. त्यावेळी संजय राठोड यांच्या प्रचाराला जाणार का? असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर त्या म्हणाल्या की, “आम्ही ही निवडणूक सिरीयस नोटवर घेतली आहे. मी राज्यभर प्रचारासाठी फिरत आहे. त्यामुळे पक्ष पाठवेल, जिथे गरज असेल तिथे प्रचाराला जाणार.”

भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी यवतमाळ मुलीच्या आत्महत्या प्रकरणानंतर त्यावेळचे ठाकरेंच्या मंत्रिमंडळातील मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात मोठी मोहीम उघडली होती. पण शिवसेनेच्या फुटीनंतर संजय राठोड यांनी शिंदेंना साथ दिली आणि महायुतीच्या सरकारमध्ये ते मंत्रीही झाले. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणाऱ्या चित्रा वाघ यांची अनेकदा या मुद्द्यावर पंचाईत झाली होती.

नेमकं प्रकरण काय? 

बीड जिल्ह्यातील एका 22 वर्षीय तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी संजय राठोड संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. ही तरूणी इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी भाऊ आणि मित्रासोबत पुण्याला राहत होती. सोशल मीडियात विशेषत: टिकटॉक अॅपमुळं ती प्रचंड लोकप्रिय झाली होती. 7 फेब्रुवारी 2021 च्या रात्री तिनं पुण्यातील इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर काही दिवसांतच या प्रकरणाशी त्यावेळचे मंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आलं होतं. 

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर सडकून टीका केली होती. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली होती. 

याचिका मागे घेण्यावरून न्यायालयाने चित्रा वाघ यांना फटकारले

या प्रकरणात चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली होती. मात्र संजय राठोड महायुतीच्या मंत्रिमंडळात सामील झाल्यानंतर राजकारण बदललं. काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी आपल्या वकिलांमार्फत संजय राठोड यांच्याविरोधातील जनहित याचिका मागे घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने चित्रा वाघ यांच्या वकिलाला खडे बोल सुनावले होते. 

राजकारण्यांनी जनहित याचिकांच्या माध्यमातून राजकारण करत न्यायालयांना त्यात विनाकारण ओढू नये. बदललेल्या राजकीय स्थितीनुसार तुमची भूमिका बदलते आणि राजकारण करण्यासाठी जनहित याचिकांचा माध्यम म्हणून वापर करून न्यायालयांना त्यात ओढले जात आहे. न्यायालयं हा राजकारण करण्याचा मार्ग नाही, अशा शब्दांत मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाने फटकारले होते.

अधिक पाहा..



Source link

उगाच कांगावा करणाऱ्यांच्या बुद्धीची किव येते; बॅगच्या झाडाझडतीवरुन देवेंद्र फडणवीसांनी सुनावलं

उगाच कांगावा करणाऱ्यांच्या बुद्धीची किव येते; बॅगच्या झाडाझडतीवरुन देवेंद्र फडणवीसांनी सुनावलं


Devendra Fadnavis मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या स्थिर पथकाकडून सध्या बड्या राजकीय नेत्यांच्या बॅगा तपासणीचं काम सुरू आहे. थेट हेलिपॅडवरच निवडणूक आयोगाचे कर्मचारी बॅगा तपासतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. दरम्यान याच मुद्यावरून राज्याच्या राजकारणात नवा वाद रंगत असल्याचे बघायला मिळत आहे. दरम्यान याच मुद्यावरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांवर टीका करत खडे बोल सुनावले आहे.

बॅगा तपासण्याच्या मुद्द्यावरून विरोधक कारण नसताना राजकारण करताय. माझ्यासह मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या देखील बॅगा नियमित तपासल्या जातात. मात्र आम्ही कधी या गोष्टीचा कांगावा केला नाही. ज्या पद्धतीने बॅगा तपासणाऱ्यांना बोललं जातं त्यावरून विरोधकांच्या बुद्धीची किंवा येते.असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर येथे प्रतिक्रिया देत या मुद्द्यावर भाष्य केलंय.

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यवतमाळमधील वणी मतदारसंघात आणि लातूरच्या औसा मतदारसंघातील सभेसाठी जात असताना त्यांच्या बॅगा तपासण्यात आल्याचा व्हिडिओ स्वत: शूट केला होता. तसेच, ज्याप्रमाणे माझ्या बॅगा तपासल्या तशाच मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही बॅगा तपासा. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या बॅगा तपासल्याचे व्हिडिओही मला पाठवा, असेही त्यांनी म्हटले होते. उद्धव ठाकरेंच्या या व्हिडिओनंतर आता पालघर मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याही बॅगांची झाडाझडती घेण्यात आली आहे. यावेळी, मुख्यमंत्र्‍यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

निवडणूक आयोगाचा अधिकार, यात सरकारचा काय संबंध?- रामदास आठवले

तर दुसरीकडे  बॅगा तपासणे हा निवडणूक आयोगाचा अधिकार आहे, त्यात सरकारचा काय संबंध, माझी आणि देवेंद्र फडणवीस यांचीही बॅग तपासली. असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बोलताना व्यक्त केले आहे.   

सध्या प्रचाराला फिरणाऱ्या मोठमोठ्या नेत्यांच्या विमानातील आणि हेलिकॉप्टर मधील बॅग तपासणीवरून वादविवाद सुरू असताना आज रामदास आठवले यांनी यावर टीका करणाऱ्यांना चोख उत्तर दिले. निवडणूक काळात बॅगा तपासणी हा निवडणूक आयोगाचा अधिकार असून यात सरकारचा काय संबंध, असा सवाल करीत एकट्या उद्धव ठाकरे यांची बॅग तपासली नसून माझी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याही बॅगा तपासल्या असल्याचे आठवले यांनी सांगितले.

माझ्या बॅगेत काय सापडणार?

प्रचाराला विमान, हेलिकॉप्टर गाड्या घेऊन फिरताना त्यामधील सामान तपासणी करणे हे निवडणूक अधिकाऱ्यांचे काम आहे, असे सांगत जरी बॅग तपासली तरी माझ्या बॅगेत काय सापडणार? अशा शब्दात आठवले यांनी खिल्ली उडवली. चार दिवसापूर्वी लातूरला गेले असता तिथे फडणवीस आणि माझी बॅग तपासली. आज सोलापुरात आल्यावर हेलिकॉप्टर मधून उतरताच तेथेही माझ्या बॅगेची तपासणी झाली, असे आठवले यांनी सांगितले.

निवडणुका झाल्यावर आमदार, मंत्रीपद, महामंडळ देण्याचे मान्य

आज सांगोला येथे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या प्रचारासाठी आले असता आठवले माध्यमांशी बोलत होते. लोकसभेला आणि विधानसभेला तीन मोठे पक्ष एकत्र आल्याने आम्हाला जागा मिळाल्या नाही. जागा मिळायला हव्या होत्या पण त्या दिल्या नाही. निवडणुका झाल्यावर आमदार मंत्रीपद, महामंडळ देणार असल्याचे मान्य केला आहे. आणि हे पद कार्यकर्त्यांना मिळण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचे ही आठवले यांनी सांगितले. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp