महिला म्हणाल्या ‘बच्चूभाऊ तूम आगे बढो’ बच्चू कडू म्हणाले, अगं माऊले मी आणखी आगे बढलो तर…

महिला म्हणाल्या ‘बच्चूभाऊ तूम आगे बढो’ बच्चू कडू म्हणाले, अगं माऊले मी आणखी आगे बढलो तर…


अकोला : सध्याच्या राजकीय गरमागरमीत हलकेफुलके क्षण फारच कमी वेळा अनुभवायला मिळतात. असाच अनुभव आला आहे तो आमदार बच्चू कडू यांच्या संदर्भात. आमदार बच्चू कडू ओळखले जातात ते त्यांच्या मिश्कील आणि मोकळ्या ढाकळ्या स्वभावासाठी. महिला कार्यकर्त्यांनी ‘बच्चूभाऊ तूम आगे बढो’ असं म्हणतात आणखी आगे बढलो तर खाली पडेन असं बच्चू कडू म्हणाले. त्यावेळी लोकांमध्ये हास्याचा फवारा उडाला. 

आमदार  बच्चू कडू हे  मंगळवारी अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर मतदारसंघातल्या बार्शीटाकळी येथील प्रचार सभेत बोलत होते. ते मूर्तिजापूरचे उमेदवार रवी राठोड यांच्या प्रचार सभेसाठी आले होते. यावेळी बच्चू कडू यांचे भाषण सुरू असताना व्यासपीठावरील महिला कार्यकर्तीने मध्येच ‘बच्चूभाऊ तूम आगे बढो’ अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. त्याचवेळी हजरजबाबी पणे बच्चू कडूंनी महिला कार्यकर्तीला उद्देशून “अगं माऊले!, मी आणखी आगे बढलो तर खाली पडेन” असं मिश्किल उत्तर दिलंय. 

टाळ्या वाजवणाऱ्यांना सुनावलं

दरम्यान, सोयाबीनला 7 हजार भाव जाहीर करून 5 हजार रुपये सरकारने भाव दिला असं बच्चू कडू म्हणाले. त्यावर काही लोकांनी टाळ्या वाजवल्या. टाळ्या वाजवणाऱ्या लोकांनाही बच्चू कडू यांनी चांगलं सुनावलं. आपल्यालाही खरंच लाज कशी वाटत नाही असा संतप्त सवाल त्यांनी केला. काँग्रेसने कायम मुस्लिमांचा वापर केल्यानंतरही मुस्लिम काँग्रेसला का मतदान करतात? असा सवालही त्यांनी मुस्लिम समाजाला विचारला.

ही बातमी वाचा: 

 

अधिक पाहा..



Source link

नेहरूंपासून आजपर्यंत काँग्रेसने बाबासाहेबांना अपमानित केलं; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर घणाघात

नेहरूंपासून आजपर्यंत काँग्रेसने बाबासाहेबांना अपमानित केलं; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर घणाघात


Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसने (Congress) महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा (Dr. Babasaheb Ambedkar  ) वारंवार अपमान केला. नेहरूंपासून आतापर्यंतच्या कांग्रेस नेतृत्वाने बाबासाहेबांचा वारंवार अपमान केलाय. त्यांचं योगदान काँग्रेसने नाकारलंय. काँग्रेसचे लोक बाबासाहेबांचा अपमान करतात, त्यांची संविधान निर्माता ही ओळख काँग्रेसला खुपते, कारण ते दलित मातेचे सुपूत्र होते.

मात्र महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार माझ्यासाठी सदा-सर्वदा पूजनीय आहेत आणि राहतील. आम्ही देशभरात त्यांची स्मारकं उभारली. मी अकोल्यातून काँग्रेसच्या शाही परिवाराला आव्हान देतो की त्यांनी बाबासाहेबांच्या पंचतिर्थाला वंदन केलं हे सिद्ध करावं. असे थेट आव्हान देत अकोल्याच्या सभेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi)  यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली आहे. 

काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूर होईल- नरेंद्र मोदी

काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूर होईल. काँग्रेस दलित, आदिवासी आणि ओबीसींची प्रगती पाहू शकत नाही. कांग्रेस दलितांमधील जातीजातीत भांडणं लावत आहे आणि हिच चाल आणि चरित्र काँग्रेसचे आहे, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.’एक है तो,सेफ है असे म्हणत हरियाणात काँग्रेसचे मनसुबे उधळून लावलेत. जम्मू काश्मीर विधानसभेत काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी कलम 370 लागू करण्याचा प्रस्ताव पुन्हा मंजूर केला.

मात्र तुम्हाला वाटतं का असं व्हावं? दहशतवादी संघटना, पाकिस्तानने हे कलम हटविण्याचा विरोध केला होता. काँग्रेस तिच भाषा बोलतेय. 370 लागू केलं तर काश्मीरमध्ये बाबासाहेबांचं संनिधान संपुष्टात येईल.दरम्यान, कोऱ्या पानांचं संविधान पुस्तक घेऊन फिरणारे लोक पापी आहेत, असे म्हणत मोदींनी राहूल गांधींना अप्रत्यक्षपणे टोला लागवला आहे.

सभेतील गर्दी विजयाचा विश्वास देणारी

370 हटवल्यानंतर जम्मू आणि काश्मिरमधल्या आदिवासी, दलितांना आरक्षण मिळालं होतं. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्राला नवी दिशा द्यायची आहे. महायुतीच्या उमेदवारांना बहूमताने जिंकवा. काल दोन सभा आणि आजची सभेतील गर्दी ही विजयाचा विश्वास देणारी आहे. असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकोल्याच्या सभेतून व्यक्त केला घरी. 

नरेंद्र मोदी बाबासाहेब आंबेडकरांशी एकनिष्ठ-रामदास आठवले 

नरेंद्र मोदींना हटवू पाहणाऱ्याला आम्ही मिटवल्याशिवाय राहणार नाही. 370 कलम हटविण्याचा निर्णय क्रांतीकारी आहे. नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेसला काश्मिरमध्ये परत 370 कलम आणायचे आहे. या देशाचे संविधान कुणीच बदलवू शकत नाही. राहुल गांधी संविधानाचे पुस्तक दाखवत ते संविधान बदलायच्या गोष्टी करतात. मात्र नरेंद्र मोदी बाबासाहेब आंबेडकरांशी एकनिष्ठ आहेत. असेही रामदास आठवले म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

महाविकास आघाडीच्या घोटाळेबाजांचे एटीएम बनू देऊ नका! पीएम मोदींकडून ‘काँग्रेस’ टार्गेट

महाविकास आघाडीच्या घोटाळेबाजांचे एटीएम बनू देऊ नका! पीएम मोदींकडून ‘काँग्रेस’ टार्गेट


PM Modi In AKola : काँग्रेसचे लोक बाबासाहेबांचा अपमान करतात, त्यांची संविधान निर्माता ही ओळख काँग्रेसला खुपते कारण ते दलित मातेचे सुपूत्र होते. माझ्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सदा-सर्वदा पूजनीय आहेत. आम्ही देशभरात त्यांची स्मारकं उभारली. काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूर होईल. काँग्रेस दलित, आदिवासी आणि ओबीसींची प्रगती पाहू शकत नाही. काँग्रेस दलितांमधील जातीजातीत भांडणं लावत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद मोदी यांनी अकोल्यामधील सभेतून केली. मोदी यांनी महाविकास आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. मात्र, पवार ठाकरेंच्या तुलनेत त्यांच्या भाषणातील सर्व रोख काँग्रेसवर दिसून आला. मोदी यांनी पुन्हा एकदा ‘एक है तो, सेफ है’ सांगण्याचा प्रयत्न केला. 

महाराष्ट्र सरकार कसं असेल याची झलक आमच्या जाहीरनाम्यात

मोदी यांनी सांगितले की, कापूस उत्पादकांची स्थिती आता सुधारत आहे. विदर्भात टेक्सटाईल पार्कचं भूमिपूजन केलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जननी म्हणजे काँग्रेस आहे महाराष्ट्र आणि विदर्भात पाण्याचं संकट वाढलं, परंतू काँग्रेसवाले घोटाळ्यात मग्न राहिले. महायुतीचं सरकार आल्यावर सिंचन प्रकल्पांना गती मिळाली. महाराष्ट्र सरकार कसं असेल याची झलक आमच्या जाहीरनाम्यात आहे. महायुतीचे सरकार, करील स्वप्नं साकार असे ते म्हणाले. 

महाआघाडी म्हणजे भ्रष्टाचार, महाआघाडी म्हणजे भ्रष्टाचार, खंडणी

अकोल्यातील जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महायुतीच्या जाहीरनाम्यात महाआघाडीच्या घोटाळ्याचे पत्रही आले आहे. आता संपूर्ण देशाला माहित आहे की महाआघाडी म्हणजे भ्रष्टाचार, महाआघाडी म्हणजे भ्रष्टाचार, खंडणी, महाआघाडी म्हणजे टोकन मनी. संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटणाऱ्या मराठीला भाषेचा दर्जा देणे हा बहुमान आहे, महाराष्ट्रातील जनतेची मागणी मोदीने पूर्ण केल्याचे ते म्हणाले. नरेंद्र मोदी म्हणाले की, “केंद्रातील आमच्या नवीन सरकारने लाखो कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू करून केवळ 5 महिने झाले आहेत. त्यात महाराष्ट्राशी संबंधित पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. वाढवण बंदराची पायाभरणी काही दिवसांपूर्वी झाली होती, आज एकट्या वाढवण बंदराची क्षमता भारतातील सर्व बंदरांच्या दुप्पट होणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

पंतप्रधान आहे पळणारा चित्ता, म्हणून गिरवतात विकासाचा कित्ता; रामदास आठवलेंची कवितेतून फटकेबाजी

पंतप्रधान आहे पळणारा चित्ता, म्हणून गिरवतात विकासाचा कित्ता; रामदास आठवलेंची कवितेतून फटकेबाजी


Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज अकोल्यात (Akola) महायुतीची (Mahayuti) जाहीर सभा होत आहे. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची प्रमुख उपस्थिति असणार आहे. अकोल्यातली डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मैदानावर ही भव्य सभा होत आहे. पश्चिम विदर्भातल्या वऱ्हाड भागातील अकोला, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील 15 मतदारसंघांसाठी ही मोदींची जाहीरसभा होत आहे . दरम्यान या सभास्थळी पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रतापराव जाधव, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसुळ, खासदार अनुप धोत्रे व्यासपीठावर उपस्थित आहेत. यासोबतच अकोला, बुलढाणा आणि वाशिममधील महायुतीचे सर्व उमेदवार मंचावर उपस्थित.

दरम्यान, या सभास्थळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आपल्या खास शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कविता करत जोरदार फटकेबाजी केली आहे. “मोदीसाहेब अकोल्यामध्ये येत आहे आत्ता.. मग का येणार नाही राज्यामध्ये महायुतीची सत्ता? पंतप्रधान आहे पळणारा चित्ता, म्हणून तर गिरवत आहेत विकासाचा कित्ता”  असे म्हणत पंतप्रधान मोदींच्या सभेत रामदास आठवलेंनी कवितेतून जोरदार फटकेबाजी केली आहे. 

आम्ही दोघंही एकत्र येऊ, सोबत मिळून थोडं-थोडं खाऊ- रामदास आठवले

“महायुतीच्या बाजूने आम्ही हाय, कारण आमचं नाव आहे आरपीआय” असेही रामदास आठवले यावेळी म्हणाले. तुकड्या-तुकड्या विखुरलेला समाज एकत्र करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावे, असे म्हणत प्रकाश आंबेडकरांच्या बालेकिल्ल्यात आठवलेंनी पुन्हा एकदा आंबेडकरांना एकीची साद आठवले यांनी घातली आहे. आंबेडकरांनी पक्षाचं अध्यक्ष व्हावं. मी दुसरं पद घेईल. मी त्यांना मोदींकडे घेऊन जाईल. आम्ही दोघंही एकत्र येऊ, सोबत मिळून थोडं-थोडं खाऊ, अशा मिश्किल शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केलंय.

नरेंद्र मोदी बाबासाहेब आंबेडकरांशी एकनिष्ठ आहेत

नरेंद्र मोदींना हटवू पाहणाऱ्याला आम्ही मिटवल्याशिवाय राहणार नाही. 370 कलम हटविण्याचा निर्णय क्रांतीकारी आहे. नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेसला काश्मिरमध्ये परत 370 कलम आणायचे आहे. या देशाचे संविधान कुणीच बदलवू शकत नाही. राहुल गांधी संविधानाचे पुस्तक दाखवत ते संविधान बदलायच्या गोष्टी करतात. मात्र नरेंद्र मोदी बाबासाहेब आंबेडकरांशी एकनिष्ठ आहेत. असेही रामदास आठवले  म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

अकोला जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 5 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!

अकोला जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 5 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!


अकोला : भाजपचा बालेकिल्ला असलेल्या अकोल्यामध्ये विधानसभेसाठी पुन्हा एकदा जोरदार तयारी केली आहे. अकोल्यामध्ये (Akola Vidhan Sabha Election 2024) एकूण 5 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी 4 मतदारसंघ हे भाजपकडे आहेत. तर एक मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. अकोला मतदारसंघात भाजपचे अनुप धोत्रे (Anup Dhotre), काँग्रेसचे डॉ. अभय पाटील (Abhay Patil) व वंचित आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यात तिरंगी लढत झाली. तर नुकत्याच पार पडलेल्या अकोला लोकसभा मतदारसंघात सलग पाचव्यांदा कमळ फुललं आहे. भाजप व काँग्रेस यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांनी बाजी मारली. तर काँग्रेसचे डॉ. अभय पाटील यांचा 40 हजार 626 मतांनी पराभव केला. वंचित आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांची तिसऱ्या स्थानावर गेले. अकोला लोकसभेला भाजपचे अनुप धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील व वंचित आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यात तिरंगी लढत झाली होती. 

सध्याचे अकोला जिल्ह्यातील आमदार : (Akola MLA List)

  • अकोट विधानसभा – प्रकाश भारसाकळे (भाजप) 
  • बाळापूर विधानसभा – नितीन देशमुख  (शिवसेना – उद्धव ठाकरे)
  • अकोला पश्चिम विधानसभा – गोवर्धन शर्मा (भाजप) (निधन)
  • अकोला पूर्व विधानसभा – रणधीर सावरकर (भाजप)
  • मूर्तिजापूर विधानसभा –  हरीश पिंपळे (भाजप)

अकोला जिल्ह्यातील लढती :

एकूण मतदारसंघ : 05

मतदारसंघांची नावे : अकोला पश्चिम, अकोला पूर्व, अकोट, बाळापूर, मुर्तिजापूर (राखीव – अनुसुचित जाती) 

अकोल्यातील 5 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती 









क्रमांक विधानसभा मतदारसंघ महायुती उमदेवार महाविकास आघाडी वंचित/अपक्ष/इतर विजयी उमेदवार
1 अकोला पश्चिम  विजय अग्रवाल : भाजप  साजिदखान पठाण : काँग्रेस 

डॉ. अशोक ओळंबे : प्रहार

 हरीश आलिमचंदानी  अपक्ष

राजेश मिश्रा :  अपक्ष

 
2  अकोला पूर्व रणधीर सावरकर : भाजप गोपाल उर्फ आशिष दातकर : शिवसेना ठाकरे गट ज्ञानेश्वर सुलताने : वंचित बहुजन आघाडी  
3 अकोट प्रकाश भारसाकळे  : भाजप महेश गणगणे : काँग्रेस 

दिपक बोडखे : वंचित बहुजन आघाडी

ललित बहाळे  : स्वतंत्र भारत पक्ष – प्रहार आघाडी 

 
4 बाळापूर बळीराम सिरस्कार : शिवसेना शिंदे गट नितीन देशमुख : शिवसेना ठाकरे गट

नातिकोद्दीन खतीब : वंचित बहुजन आघाडी 

कृष्णा अंधारे : अपक्ष

 
5 मुर्तिजापूर हरीश पिंपळे : भाजप सम्राट डोंगरदिवे : राष्ट्रवादी शरद पवार

डॉ. सुगत वाघमारे : वंचित बहुजन आघाडी

रवी राठी : प्रहार

 

आणखी वाचा

Maharashtra All party candidate List : महाराष्ट्रातील सर्व 288 मतदारसंघातील लढती

अधिक पाहा..



Source link

निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वाद ; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली

निवडणुकीच्या धामधुमीत भाजपात वाद ; अकोल्याच्या माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीसांमध्ये जुंपली


Maharashtra Vidhan Sabha Election 2024: ऐन विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) धामधुमीत अकोल्यात भाजपातील वाद उफाळून आला आहे. अकोल्याच्या माजी महापौर अश्विनी हातवळणे यांनी पक्षाचे आमदार आणि प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर यांच्यावर गुंडशाही आणि एकाधिकारशाहीचा आरोप केलाय. आमदार रणधीर सावरकरांकडून पक्षातल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना वारंवार अपमानित करीत डावललं जात असल्याचा आरोप हातवळणे यांनी केलाय. आज अश्विनी हातवळणे, त्यांचे पती आणि माजी नगरसेवक प्रतुल हातवळणे आणि ॲड.गिरीश गोखले यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केलीय. त्यामुळे अकोल्यात पक्षांतर्गत वाद अधिक उफाळून येण्याची शक्यता आहे.  

अकोला पश्चिम मतदारसंघात भाजपने दिलेल्या उमेदवारीवरून पक्षात अंतर्गत खदखद आहे. भाजपने अकोला पश्चिम मतदारसंघातून माजी महापौर विजय अग्रवाल यांना उमेदवारी दिलीये. विजय अग्रवाल यांना उमेदवारी दिल्यानंतर पक्षातील दोन ज्येष्ठ नेत्यांनी अकोला पश्चिम मतदारसंघात बंडखोरी केलीये. माजी नगराध्यक्ष हरीश आलिचंदानी आणि माजी शहराध्यक्ष डॉ.अशोक ओळंबे यांनी बंडखोरी केली आहे. हातवळणे यांनी केलेल्या आरोपानंतर अकोला भाजपात मोठा स्फोट होण्याची शक्यता आहेय. 

कोण आहेत अश्विनी हातवळणे?

अश्विनी हातवळणे या अकोला शहराच्या द्वितीय महापौर आहेत.
2004 ते 2007 असे दोन दा त्यांनी महापौर पद भुषवलंय 
हातवळणे परिवार संघ परिवाराशी तीन पिढ्यांपासून जुळलेला आहे.  
अश्विनी हातवळणे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, राष्ट्रसेविका समितीत अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. 
राजकारणात येण्या आधी हातवळणे यांच्या कारकिर्दीला वृत्त निवेदिका म्हणून सुरुवात केली आहे. 
1998 ते 2001 या कालावधीत अकोल्यातील स्थानिक वृत्तवाहिनीत वृत्त निवेदिका म्हणूनही त्यांनी कार्य केलंय.
अकोल्यातील नाट्य क्षेत्रात त्या सक्रिय असून अनेक नाटकांमध्येही त्यांनी काम केलं आहे. 
भाजपच्या महिला आघाडीत अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या असून भाजप महिला मोर्चाच्या जिल्हा प्रभारी म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पडली आहे.

अकोल्यात वंचितला मोठा धक्का

अकोल्यात वंचितला मोठा धक्का बसलाय. पक्षाचे जेष्ठ ओबीसी नेते आणि प्रकाश आंबेडकरांचे विश्वासू प्रा. डॉ. संतोष हुशेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. बाळापुर मतदारसंघातील वाडेगाव येथे उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय. डॉ. संतोष हुशेंना वंचितने अकोला पूर्व मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने नाराज होतेय. त्यातून त्यांनी वंचितचा राजीनामा दिला होताय. डॉ़. हुशे अकोला जिल्ह्यातील माळी समाजाचे मोठे नेते आहेयेत. त्यांच्या प्रवेशाने ठाकरे गटाला अकोला पुर्व आणि बाळापुर मतदारंसघात मोठा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp