PHOTOS : उद्धव ठाकरेंचा एक आदेश अन् ‘मशालीं’नी आसमंत उजळला; अमरावती, अकोल्यातील सभेला तुफान गर्दी

PHOTOS : उद्धव ठाकरेंचा एक आदेश अन् ‘मशालीं’नी आसमंत उजळला; अमरावती, अकोल्यातील सभेला तुफान गर्दी


तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!



Source link

ओबीसींनो, आरक्षण वाचवायचे असेल वंचितच्या उमेदवारांना निवडून द्या : प्रकाश आंबेडकर 

ओबीसींनो, आरक्षण वाचवायचे असेल वंचितच्या उमेदवारांना निवडून द्या : प्रकाश आंबेडकर 


Prakash Ambedkar : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निर्णयाने थांबवण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर माध्यमातून शिक्षण आणि नोकऱ्या यामधील आरक्षण थांबवले जाईल असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं. हे आपल्याला मान्य आहे का? मान्य नसल्यास किंतु, परंतुची चर्चा न करता वंचित बहुजन आघाडीने उभे केलेले ओबीसींचे, एससी, एसटी आणि मुस्लीम उमेदवार की ज्यांची निशाणी गॅस सिलिंडर आहे त्यांना डोळे झाकून मतदान करा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं. 

मनोज जरांगे पाटील यांनी शरद पवार यांची जी घोषणा आहे की, 200 आमदार विधानसभेत असतील, या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे. पहिल्यांदा उमेदवारी अर्ज भरा असे म्हणून सर्वांना अर्ज भरायला लावले. निजामी मराठ्यांच्या बैठका झाल्या. निजामी मराठ्यांनी काही ठिकाणी गरीब मराठा आणि काही ठिकाणी ओबीसी उमेदवार उभे करून घेतले आणि इतर ठिकाणी मराठा विरूध्द मराठा असे चित्र उभे करण्यात आले आहे. या बैठकांमध्ये मराठा आमदार कसे निवडून येतील याचीच रचना आखण्यात आली. या खेळात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे एकत्र आहेत हे ओबीसींनी पहिले लक्षात घ्यावे. हे लक्षात घेतले नाही, तर आपण हुकणार हे लक्षात घ्या, असे आंबेडकर म्हणाले. 

एससी, एसटी, ओबीसी आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान करा

मराठ्यांनी मराठ्यांनाच मतदान दिले पाहिजे असा त्यांचा निर्णय झाला आहे. आता ओबीसींनी आरक्षण वाचवण्यासाठी मत हे एससी, एसटी, ओबीसी आणि वंचित बहुजन आघाडीच्या मुस्लीम उमेदवारांनाच दिले पाहिजेत अशी भूमिका घेतली पाहिजे. ही भूमिका जर बजावली तरच ओबीसींचे उमेदवार निवडून येतील असेही आंबेडकर यांनी म्हटले आहे.

आपण आपल्या वाडवडिलांच्या, पूर्वजांचा धर्म सोडणार का?

एक प्रचार निश्चित केला जाणार आहे आणि तो म्हणजे धर्म संकटात आहे. मी तमाम ओबीसींना विचारतो की, आपण आपल्या वाडवडिलांच्या, पूर्वजांचा धर्म सोडणार आहात का ? तो आपण मुघलांच्या काळात सोडला नाही, तर आताच्या काळात कसा सोडणार? ही चर्चा निरर्थक आहे. ही चर्चा भाजप, आरएसएस, बजरंग दल, हिंदू महासभा यांच्यामार्फत केली जाते. पण तुम्ही त्यांना विचारा की, तुम्ही आमच्या आरक्षणाच्या बाजूने का नाही. ओबीसी आरक्षणाचे समर्थन आपण का करत नाही. धोका धर्माला नसून, आरक्षणाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने थांबवण्यात आल्याचेही प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Prakash Ambedkar : लाडक्या बहिणींना 3500, घरगुती वीज मोफत; वंचितचा जाहीरनामा, जोशाबातून आश्वासनांचा पाऊस

अधिक पाहा..



Source link

सदाभाऊ खोत यांच्यावर महायुतीतून पहिली टीका, राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी इशारा देत म्हणाले…

सदाभाऊ खोत यांच्यावर महायुतीतून पहिली टीका, राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी इशारा देत म्हणाले…


Amol Mitkari On Sadabhau Khot : भाजपाचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) पातळी सोडून वैयक्तिक टीका केलीय. शरद पवारांना महाराष्ट्र स्वतःच्या तोंडासारखा करायचा आहे का?, असा सवाल केलाय. सदाभाऊ खोत यांच्या या टीकेला राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. सदाभाऊ खोत यांनी आपली क्षमता ओळखून शरद पवारांवर टीका करावी असं मिटकरी म्हणालेय. शरद पवारांवरील पातळी सोडून केलेली टीका आमचा पक्ष सहन करणार नसल्याचा इशारा ही त्यांनी सदाभाऊ खोत यांना दिलाय.

निवडणुका म्हटलं की आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात, दिग्गज नेत्यांवर टीका टीपण्णी करण्यात येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अनेक बडे नेते टीका करताना दिसून येतात. त्यात, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि भाजपसोबत असलेल्या रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्याकडून सातत्याने टीका होत असते. आता, भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेतून सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. जत विधानसभा मतदारसंघातील जाहीर सभेत बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर बोचरी व शारिरीक व्यंगावरुन टीका केली. आता, त्यांनी केलेल्या या टीकेवरुन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार पलटवार केला आहे. 

सदाभाऊ खोत शरद पवारांबद्दल नेमकं काय म्हणाले

शरद पवारांनी बँका हाणल्या, कारखाना हाणाला, पण येवढं हाणलं तरी शरद पवार भाषणात म्हणतात, मला महाराष्ट्र बदलायचा आहे…मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. अरे कसला चेहरा…महाराष्ट्र तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का?, असा सवाल उपस्थित करत सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली. तसेच गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य आणायचे काम कोणी केले असेल, ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी…असंही सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

शरद पवारांबद्दल बोलताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही- जितेंद्र आव्हाड

सदाभाऊ खोत शरद पवारांबद्दल बोलताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही. चौथ्या स्टेजचा कॅन्सर असल्यामुळे त्यांचा जबडा काढण्यात आलेला आहे. ज्यावेळी त्यांचं ऑपरेशन झालं त्याच्या काही दिवसानंतर लगेच शरद पवार रक्त येत असताना देखील सभांमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे आपण काय बोलतो याची काही समज नाही का आपल्याला. महाराष्ट्र घडवण्यात तुमचा एक टक्का वाटा नाही, शरद पवारांचा शंभर टक्के वाटा आहे. त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची अक्कल शून्यता लक्षात येते. तुमची अक्कल धुळीला मिळालेली आहे. सदाभाऊ खोत तुमच्या वडिलांची तुम्ही अशी टिंगल केली असती का? तुमच्या चेहऱ्यावर डाग पडला तर घरातून बाहेर पडणं मुश्किल होईल, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर पलटवार केला आहे. 

हेही वाचा

अधिक पाहा..



Source link

घरगुती खानावळच्या नावाखाली नको ते कृत्य; स्थानिकांनी महिलांसह पुरुषांना घरात कोंडलं, अन् पुढे..

घरगुती खानावळच्या नावाखाली नको ते कृत्य; स्थानिकांनी महिलांसह पुरुषांना घरात कोंडलं, अन् पुढे..


Akola Crime News अकोला : अकोल्यातील मोठी उमरी भागातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात घरगुती जेवणाच्या मेसच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय (Prostitution Business) सुरू असल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, देहविक्रीचा हा प्रकार लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी हा देहविक्रीचा व्यवसाय उघडा पाडला. तसेच स्थानिक नागरिकांनी देहविक्री करणाऱ्या दोन महिलांसह चार पुरुषांना घरात कोंडून ठेवलं होतं. त्यानंतर याची माहिती पोलिसांनी देत सिव्हिल लाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि दोन महिलांसह चार पुरुष ग्राहकांना ताब्यात घेतले आहे. मात्र घरगुती खानावळच्या नावाखाली सुरू असलेल्या या  प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

घरगुती खानावळच्या नावाखाली नको ते कृत्य, स्थानिकांनी केला भांडाफोड 

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार प्रति ग्राहकांकडून 2 हजार रुपये घेत या महिला आपला देहविक्रीचा व्यवसाय चालवत असल्याचं समोर आलंय. अकोल्यातल्या मोठी उमरी भागातील उच्चभ्रू वस्तीत हा देह विक्रीचा व्यवसाय सुरू होता. घरगुती जेवणाच्या मेसच्या नावाखाली हा संपूर्ण गोरखधंदा चालायचा. मात्र, आज स्थानिक नागरिकांनी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणलाय. या प्रकरणात अधिक तपास आता सिव्हिल लाईन पोलीस करत आहेत. जवळपास दीड ते दोन तास घटनास्थळावर नागरिकांनी चांगलाच गोंधळ घातला होता. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर स्थानिक नागरिकांचा संताप शांत झालाय. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक

 पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा इंधन भरताना दुर्घटना झाल्याचं यापूर्वी पाहायला मिळालं आहे. मात्र, जळगावमध्ये वाहनात गॅस भरताना सिलेंडरचा स्पोट होऊन ओमिनी गाडी जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत गॅस भरणारे 3 जण आणि गाडीमालक असे चार जण गंभीररीत्या भाजले गेले आहेत. विशेष म्हणजे बेकायदेशीररित्या तसेच अवैध पद्धतीने वाहनात गॅस भरला जात होता, त्यातूनच ही गंभीर घटना घडली असल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, दुर्घटनेतील जखमींना 

सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर ओमनी गाडीने पेट घेतला त्यानंतर भीषण आग लागली. त्यात गॅस भरणाऱ्याचे दुकान तसेच एक दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या आगीच्या दुर्घटनेत भाजलेल्या चारही जणांना रुग्णालयात हलवण्यात आलेलं असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. याबाबत घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन बंबाने घटनास्थळ गाठून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत संपूर्ण ओमिनी कार आणि दूचाकी, व दुकान पूर्णपणे जळून खाक झाले होते.

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

प्रचार दौरा सोडून अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले बच्चू कडू, जखमींना केलं रुग्णालयात रवाना

प्रचार दौरा सोडून अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले बच्चू कडू, जखमींना केलं रुग्णालयात रवाना


Akola Accident News : बच्चू कडू (Bacchu Kadu) आज अकोला (Akola) जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी मूर्तिजापूर मतदारसंघात (Murtijapur Constituency) दौऱ्यावर असताना बच्चू कडू हे अपघातग्रस्त (Accident) व्यक्तींच्या मदतीसाठी धावून गेल्याचं पाहायला मिळालं. बच्चू कडू यांनी तातडीनं जखमींना उपचारासाठी रुग्णालयात रवाना केलं.  दरम्यान, रुग्णसेवा व प्रहारचे नाते अतुट आहे. बच्चू कडू हे अकोल्यात मुर्तीजापुर मतदारसंघाचे प्रहारचे उमेदवार रवी राठी यांच्या प्रचारासाठी गेले होते. यावेळी ही अपघाताची घटना घडली.
 
अकोल्यातल्या मुर्तिजापुर आणि पिंजर रस्त्यावर हा अपघात झाला होता. प्रचार दौरा मागे ठेऊन बच्चू कडू यांनी अपघातातील जखमींच्या मदतीसाठी दावले. जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर बच्चू कडू पुढील दौऱ्यासाठी निघून गेले.

अधिक पाहा..



Source link

शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे जितेंद्र आव्हाडांचं थोबाड फोडणार का? अमोल मिटकरींचा सवाल

शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे जितेंद्र आव्हाडांचं थोबाड फोडणार का? अमोल मिटकरींचा सवाल


Amol Mitkari on Jitendra Awhad  : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad) यांनी अजित पवारांवर (Ajit Pawar) अतिशय खालच्या भाषेत टीका केली होती. या टीकेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे  आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी जोरदार टीका केली आहे. आव्हाडांच्या वक्तव्यांना शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचं समर्थन आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे. यासोबतच आव्हाडांचं वक्तव्य अजित पवारांच्या आई-वडिलांचा अपमान करणार आहे. त्यामुळं शरद पवार आणि सुप्रिया सुळे आता जोडे मारुन आव्हाडांचं थोबाड फोडणार का? असा सवालही आमदार मिटकरींनी केलाय.

आव्हाडांच्या वक्तव्याला सुप्रिया सुळे आणि शरद पवारांचं समर्थन आहे का? 

जितेंद्र आव्हाडांच्या टीकेला त्यांच्या मुंब्र्यात येऊन उत्तर देणार असल्याचं प्रतिआव्हानही आमदार मिटकरींनी आव्हाडांना दिलं आहे. दरम्यान नवाब मलिक यांच्या संदर्भात भूमिका घेणाऱ्या भाजपने धर्म पाळावा असा आवाहन‌ आमदार मिटकरी यांनी भाजपाला केलं. खालच्या भाषेत बोलणं ही आव्हांडांची संस्कृती असल्याचे मिटकरी म्हणाले. आमच्यावर आमच्या आई-वडिलांचे आणि पक्षाचे तसे संस्कार नाहीत. आव्हाडाचं वक्तव्य हे अजित पवारांच्या आई-वडिलांचा अपमान करणारं असल्याचे मिटकरी म्हणाले. आव्हाडांच्या वक्तव्याला सुप्रिया सुळे आणि शरद पवारांचं समर्थन आहे का? असा सवालही मिटकरींनी उपस्थित केला आहे.जर समर्थन नसेल तर सुप्रिया सुळे आणि शरद पवारांनी आव्हाडांचं थोबाड फोडावं. आव्हाडांना त्यांच्या कळवा मुंब्र्यात येऊनच उत्तर देणार असल्याचे मिटकरी म्हणाले. 

नेमकं काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?

अजित पवारांनी हिंमत असेल तर नवं चिन्ह घेऊन निवडणूक लढवावी असं आव्हान शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिलं आहे. चोरांच्या टोळीपासून सावध राहा असाही सल्लाही आव्हाड यांनी दिला आहे. अजित पवारांनी धक्के मारुन शरद पवारांना (Sharad Pawar) बाहेर काढलं आणि चिन्ह पण चोरलं अशी टीका देखील आव्हाडांनी केली होती. ठाण्यातील चंदननगर मुंब्रा या ठिकाणी आयोजित केलेल्या सभेत जितेंद्र आव्हाड बोलत होते. यावेळी त्यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना आणि आर्थिक सहाय्यता देण्याचे आश्वासन दिले आहे. राज्यात महंगाई वाढली त्यात सरकारची तिजोरी देखील रिकामी बदलापुर हत्याकांडावर भाजपा सरकारच्या धोरणांवर कठोर टीका केली. मतदात्यांना जागरूक राहून जुल्मी विरोधी लढाईत सहभागी होण्याचं आवाहन जितेंद्र आव्हाडांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

अजित पवारांनी धक्के मारुन शरद पवारांना बाहेर काढलं आणि चिन्ह पण चोरलं, चोरांच्या टोळीपासून सावध राहा, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल 

 

 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp