भाजपने एबी फॉर्म दिलेल्या मतदारसंघात अजित पवारांनीही उमेदवार उतरवला, ठिणगी पडणार की मैत्रीपूर्ण

भाजपने एबी फॉर्म दिलेल्या मतदारसंघात अजित पवारांनीही उमेदवार उतरवला, ठिणगी पडणार की मैत्रीपूर्ण

अमरावती: राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना अमरावतीमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अमरावतीमधील वरुड-मोर्शी विधानसभा मतदारसंघ महायुतीत कोणाच्या वाट्याला जाणार, यावरुन खल सुरु असताना अजित पवार यांनी एक वेगळीच चाल खेळली आहे. अजित पवार यांनी वरुड-मोर्शी मतदारसंघातून (Varud Morshi Vidhansabha) निवडणूक लढण्यासाठी त्यांचे कट्टर समर्थक देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म दिला आहे. देवेंद्र भुयार हे अपक्ष आमदार होते. मात्र, त्यांनी अलीकडेच अजितदादांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता अजित पवार यांनी वरुड-मोर्शी मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देऊन वेगळीच चाल खेळली आहे.

देवेंद्र भुयार हे वरुड-मोर्शी मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. मात्र, यंदा त्यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यास भाजपचा विरोध आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही जागा भाजपच्या उमेश यावलकर यांच्यासाठी सोडावी, असा आग्रह धरला होता.  काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी उमेश यावलकर यांना कामाला लागण्याचे निर्देश दिले होते.  त्यामुळे महायुतीत ही जागा नक्की कोणाच्या वाट्याला जाणार, याचा फैसला अद्याप होऊ शकला नव्हता. तरीही अजित पवार यांनी आपल्याला एबी फॉर्म दिल्याची माहिती देवेंद्र भुयार यांनी प्रसारमाध्यमांना दिली. आता आपण काहीवेळातच उमेदवारी अर्ज भरु, असे देवेंद्र भुयार यांनी सांगितले. त्यामुळे आता वरुड-मोर्शी मतदारसंघावरुन महायुतीत वादाची ठिणगी पडणार की या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढत होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी पण भुयारांना अखेर एबी फॉर्म मिळालाच

देवेंद्र भुयार यांनी विधानसभेची उमेदवारी मिळवण्याच्यादृष्टीने अजित पवार गटात प्रवेश केला होता. मात्र, पहिल्या दोन उमेदवारी याद्यांमध्ये त्यांच्या नावाचा समावेश नव्हता. त्यामुळे देवेंद्र भुयार मुंबईत ठाण मांडून बसले होते. मात्र, अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची चिन्हे दिसत नसल्याने देवेंद्र भुयार नाराज होऊन माघारी परतले होते. यानंतर त्यांनी आपल्या सोशल मीडियाच्या स्टेटसला ‘उमेदवारी अर्ज भरायला चला’, असे स्टेटस ठेवले होते. त्यामुळे देवेंद्र भुयार अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार असे दिसत होते. मात्र, अजितदादा गटाकडून त्यांना शेवटच्या क्षणी एबी फॉर्म मिळाला.

आणखी वाचा

महाराष्ट्रात सत्तापरिवर्तनाची साद, मविआच्या एकजुटीविषयीचं संशयाचं धुकं दूर केलं, शरद पवारांनी एका फटक्यात विधानसभा निवडणुकीचा नरेटिव्ह सेट केला

अधिक पाहा..

Source link

महायुतीत रामदास आठवले वेगळ्या ‘मूड’ मध्ये? रिपाईला अपेक्षित जागा न मिळाल्यास स्वबळाचा नारा

महायुतीत रामदास आठवले वेगळ्या ‘मूड’ मध्ये? रिपाईला अपेक्षित जागा न मिळाल्यास स्वबळाचा नारा

Maharashtra Assembly Election 2024 मुंबई : महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत रिपाई आठवले गट (RPI) नाराज आहेत का? असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे. त्यामागील कारण म्हणजे रिपाइं आठवले गटाला सहभागी न करणे, मुख्यमंत्र्यांच्या भेटीला लागलेला विलंब, याबाबत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale) यांची मोठी नाराजी असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आठवलेंना मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वेळ लागल्यमुळे रिपाईत अस्वस्था असल्याची माहिती पुढे आली आहे.

महायुतीत रामदास आठवले वेगळ्या ‘मूड’मध्ये?

महायुतीत’रिपाइं’ने सर्वात आधी 12 जागांचा प्रस्ताव दिला होता. त्यातील धारावी, चेंबूर, केज, पुणे जिल्ह्यातील एक जागा आणि यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडच्या अशा 5 जागांवर रिपाइं आठवले गटाचा आग्रह होता. मात्र, शेवटी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड मतदार संघावरचा दावा सोडायला आठवलेंनी नकार दिला. दरम्यान, या एका जागेवर कोणतीही तडजोड होणार नसल्याचा आता रामदास आठवले यांनी पवित्रा घेतला आहे.

… अन्यथा स्वबळावर रिपाईचे 12 उमेदवार रिंगणात

यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड जागेसाठी  ‘रिपाइं’ आग्रही आहेत. उमरखेडमधून पक्षाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष महेंद्र मानकर यांना उमेदवारी देण्यासाठी आठवलेंचा आग्रह आहे. मानकर यांना भाजपच्या ‘कमळ’ चिन्हावर लढवण्यासाठी आठवले तयार असल्याची माहिती आहे. मात्र, उमरखेडमधून महेंद्र मानकर यांची उमेदवारी जाहीर होत नसल्यामुळे आठवले नाराज असल्याचे बोलले जातंय. परिणामी आठवले 12 जागांवर स्वतंत्र उमेदवार उभे करण्याच्या तयारीत ही केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) आहेत. मात्र याबाबत लवकरच ते चित्र स्पष्ट करणार आहे.

उमरखेडमधून सध्या भाजपचे नामदेव ससाणे आमदार आहेत. भाजपकडून माजी आमदार उत्तमराव इंगळे आणि राजेंद्र नजरधणे इच्छुक आहेत. तर रिपाइंचे महेंद्र मानकर यांना कमळावर लढविण्याचा प्रस्ताव दिला आहे. मात्र उमरखेडवर समेट न झाल्यास आठवले स्वबळावर राज्यभरात 12 उमेदवार उतरवणार असल्याच्या तयारीत आहे.

अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुरमध्ये भाजपातील (BJP) राजीनामा सत्र सुरूच असल्याचे पुढे आलंय. काल मुर्तीजापुर (Murtijapur) तालुक्यातील तीनशेहून अधिक  भाजप कार्यकर्त्यांनी राजीनामे दिलेय. त्यानंतर आज या मतदारसंघातील बार्शीटाकळी तालुक्यातल्या जवळपास 200 च्या वर कार्यकर्त्यांनी पक्षाकडे राजीनामे दिलेयेत. दुसऱ्या यादीतही नाव नसल्याने अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळेंचं तिकीट कापलं जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येतीय. पिंपळेंऐवजी ऐनवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून आलेल्या रवी राठींना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने मुर्तीजापूरमध्ये भाजपमध्ये धुसफुस वाढली आहे. याविरोधात आज बार्शीटाकळी तालूक्यातील शेकडो भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतलाय.

हे ही वाचा

अधिक पाहा..

Source link

भाजपमध्ये राजीनामा सत्र सुरूच! मुर्तीजापुरमध्ये हरीश पिंपळेचं तिकीट कापल्याच्या चर्चेने धुसफुस

भाजपमध्ये राजीनामा सत्र सुरूच! मुर्तीजापुरमध्ये हरीश पिंपळेचं तिकीट कापल्याच्या चर्चेने धुसफुस

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुरमध्ये भाजपातील (BJP) राजीनामा सत्र सुरूच असल्याचे पुढे आलंय. काल मुर्तीजापुर (Murtijapur) तालुक्यातील तीनशेहून अधिक  भाजप कार्यकर्त्यांनी राजीनामे दिलेय. त्यानंतर आज या मतदारसंघातील बार्शीटाकळी तालुक्यातल्या जवळपास 200 च्या वर कार्यकर्त्यांनी पक्षाकडे राजीनामे दिलेयेत. दुसऱ्या यादीतही नाव नसल्याने अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळेंचं तिकीट कापलं जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येतीय. पिंपळेंऐवजी ऐनवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून आलेल्या रवी राठींना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने मुर्तीजापूरमध्ये भाजपमध्ये धुसफुस वाढली आहे. याविरोधात आज बार्शीटाकळी तालूक्यातील शेकडो भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतलाय.

हरीश पिंपळेचं तिकीट कापल्याच्या चर्चेने धुसफुस

यामध्ये भाजपाचे तालुकाध्यक्ष, शहर प्रमुख, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांनी हरीश पिंपळीशिवाय दुसरा उमेदवार चालून घेणार नसल्याचा इशारा पक्षाला दिलाय. हे सर्व कार्यकर्ते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेडमध्ये असल्याने त्यांना भेटायला नांदेडकडे निघाले आहेत. पक्ष उमेदवारी देणार नसेल तर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी केलाय. त्यामुळे मुर्तीजापुरमध्ये हरीश पिंपळेचं तिकीट कापत नव्या चेहऱ्याला संधी दिली जाते? की हरीश पिंपळेचं तिकीट नक्की होतं, तसेच असे न झाल्यास ते काही वेगळी भूमिका घेतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

नक्की झाले काय?

शनिवारी रात्री हरीश पिंपळेंच्या मुर्तिजापूर येथील लकडगंज भागातील घरासमोर मतदार संघातील भाजपचे शेकडो संतप्त कार्यकर्ते एकत्र आलेत. पक्षाने हरीश पिंपळेंना भाजपने उमेदवारी दिली नाही तर मतदारसंघातले 390 बुथ प्रमुख, शाखाप्रमुख पदाधिकारी एकाचवेळी राजीनामा देणार असल्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिलाय. यावेळी हरीश पिंपळे यांच्या समर्थनात मूर्तिजापूर मतदारसंघातले पदाधिकारी आणि बूथ प्रमुखांनी घोषणाबाजी केलीय.. मुर्तीजापुर मतदारसंघात आयात केलेला उमेदवार नको. बाहेरील उमेदवाराला संधी दिल्यास, आपण पक्षाचे काम करणार नाही आणि राजीनामा देणार, असा इशारा या पदाधिकाऱ्यांनी दिलाय.

नव्या चेहऱ्याला देणार संधी?

मुर्तिजापूर मतदारसंघात रवी राठींऐवजी शरद पवार गटाने सम्राट डोंगरदिवेंना उमेदवारी़ दिली आहे.. त्यामूळे रवी राठी नाराज होते. त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत आपली नाराजी व्यक्त केली होती. आणि भाजपची वाट धरली आहे. 2019 मध्ये रवी राठींनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर मुर्तीजापुरमधून 42 हजार मते घेतली होती. महायुतीत मुर्तीजापुर मतदारसंघ हा भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळं भाजप मुर्तीजापूरमधून विद्यमान आमदार हरीश पिंपळे ऐवजी आता नवीन चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता असल्याचं भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अकोला जिल्ह्यातील एकमेव राखीव असलेला विधानसभेचा एकमेव मतदारसंघ म्हणजे मुर्तीजापूर. मुर्तीजापूर अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. महाराष्ट्र निर्मितीनंतर एक अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी देणारा मतदारसंघ ठरला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Jayashree Thorat : आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वसंत देशमुखांच्या अटकेवर जयश्री थोरातांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, सभेतील प्रमुखांना….

अधिक पाहा..

Source link

Amol Mitkari: अकोल्यात आमच्या पक्षाला एकही जागा न मिळणं वेदनादायी, अमोल मिटकरींनी जाहीरपणे मनात

Amol Mitkari: अकोल्यात आमच्या पक्षाला एकही जागा न मिळणं वेदनादायी, अमोल मिटकरींनी जाहीरपणे मनात

Akot Assembly Constituency 2024: अकोला जिल्ह्यातील एकुण पाच विधान सभा मतदारसंघापैकी ४ जागा भाजपा ला तर १ जागा शिवसेना शिंदे गटाला मिळाली. अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघातून भाजपने तिसऱ्यांदा विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे (Prakash Bharasakle) यांना संधी देण्यात आली आहे. प्रकाश भारसाकळे यांचे नाव जाहीर झाल्यामुळे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांचा अकोटवरील दावा संपुष्टात आला आहे. महायुतीमध्ये आमदार अमोल मिटकरी यांनी पक्षाकडे अकोट मधून उमेदवारीची मागणी केली होती.‌ मात्र, भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ सोडण्यास भाजपने नकार दिला. त्यामुळं आमदार अमोल मिटकरी यांचं विधानसभा लढण्याचा स्वप्नं भंगल्याच्या चर्चा होत्या, मात्र आज अमोल मिटकरी यांनी याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

एकही जागा पक्षाला न मिळणे हे वेदनादायी

अमोल मिटकरी यांनी याबाबत सोशल मिडियावर पोस्ट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मिडिया पोस्टमध्ये मिटकरींनी म्हटलं आहे, “अकोला जिल्ह्यातील एकुण पाच विधान सभा मतदारसंघापैकी ४ जागा भाजपा ला तर १ जागा शिवसेना शिंदे गटाला सुटली. मी स्वत: जिल्ह्यात चार वर्ष प्रामाणिकपणे काम केले. पक्ष वाढीसाठी तीन जागेची मागणी केली मात्र एकही जागा पक्षाला न मिळणे हे वेदनादायी आहे”, असं मिटकरींनी म्हटलं आहे.

पश्चिम विदर्भात अकोला, वाशिम, बुलडाणा जिल्ह्याबाबत प्रतिक्रिया

पश्चिम विदर्भात अकोला, वाशिम , बुलडाणा जिल्ह्यात एकाही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार  नसणे हे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी वेळी निश्चित आमच्याकरिता चिंताजनक बाब राहील. तिन्ही जिल्ह्यात घड्याळ चिन्हच नाही याचा खेद वाटतो, अशी पोस्ट देखील अमोल मिटकरींनी यावेळी केली आहे.

माझं अकोट यांचे विधानसभा लढण्याच स्वप्नं भंगलंं

महायुतीमध्ये आमदार अमोल मिटकरी यांनी पक्षाकडे अकोट मधून उमेदवारीची मागणी केली होती.‌ मात्र, भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ सोडण्यास भाजपने नकार दिला. यामुळे अकोटमधून लढण्याचं मिटकरींचं स्वप्न भंगलं आहे, याबाबत पोस्ट करत मिटकरी म्हणाले, “माझं अकोट यांचे विधानसभा लढण्याच स्वप्नं भंगलंं. मी या भागात चार वर्ष अखंड मेहनत घेतली. पण पक्षाचा निर्णय अंतिम असतो. अकोटमध्ये तिसऱ्यांदा उमेदवारी मिळालेल्या प्रकाश पाटील भारसाकळे यांचेअभिनंदन. अजितदादा आणि पक्षासाठी अकोटवरचा दावा सोडला. शेवटी महायुती विजयी होणं हेच लक्ष असेल”,असंही त्यांनी म्हटलं आहे.

अधिक पाहा..

Source link

Rajendra Shingane : डॉ.राजेंद्र शिंगणेंनी मागितली मविआच्या लोकसभेच्या पराभूत उमेदवाराची माफी; भ

Rajendra Shingane : डॉ.राजेंद्र शिंगणेंनी मागितली मविआच्या लोकसभेच्या पराभूत उमेदवाराची माफी; भ

सिंदखेड राजा: सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारांच्या पक्षात शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सिंदखेडराजा मतदार संघात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काल (शनिवारी)  डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर घेण्यात आलेल्या जाहीर सभेत डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार असलेले प्रा. नरेंद्र खेडेकर यांची भर सभेत माफी मागितली. माफी मागताना डॉ. राजेंद्र शिंगणे म्हणाले की, "मी नरेंद्र खेडेकर यांची माफी मागतो! आज मी घेतलेला निर्णय जर चार ते पाच महिन्यांपूर्वी घेतला असता तर आज प्रा. नरेंद्र खेडेकर हे खासदार म्हणून निवडून गेले असते. मात्र ते दिवस आता निघून गेलेत  आता मी काम करून व्याजासकट त्याची भरपाई करेल.

डॉ.राजेंद्र शिंगणे हे सिंदखेड राजा मतदारसंघातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. त्यांनी अलीकडेच अजित पवार गटातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रा नरेंद्र खेडेकर यांच्या विरोधात महायुतीच्या उमेदवारासोबत डॉक्टर राजेंद्र शिंगणे होते.

काय म्हणाले डॉ.राजेंद्र शिंगणे?

भर सभेत बोलताना डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले, आज खंत फक्त एका गोष्टीची वाटते, हा निर्णय पाच ते सहा महिन्यांपुर्वी झाला असता तर, नरेंद्र खेडेकर खासदार असते. नरू भाऊ, माफी मागतो, चूक झाली, पण आता त्याला काही पर्याय नाही पण,भविष्यात जर कधी मोठी संधी मिळाली, तर व्याजासकट या गोष्टीची भरपाई करून देऊ, हे तुम्हाला मी आज सांगतो.

आपल्याच काकांच्या विरोधात गायत्री शिंगणे बंडाच्या तयारीत
एकीकडे राजेंद्र शिंगणे यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झाला असताना दुसरीकडे शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे नाराज आहे. आपल्याच काकांच्या विरोधात गायत्री शिंगणे बंडाच्या तयारीत आहे. गायत्री शिंगणे अपक्ष राजेंद्र शिंगणेच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याची माहिती आहे. याबाबतची माहिती गायत्री शिंगणे यांनी एबीपी माझाला दिली आहे. गद्दारी करुन गेलेल्या राजेंद्र शिंगणे यांना पक्षात घेणं चुकीचं असल्याचे गायत्री शिंगणे म्हणाल्या.

Source link

मुर्तीजापूरमध्ये तिकिटासाठी भाजपमध्ये धुसफुस वाढली , हरीश पिंपळेचं तिकीट कापत नव्या चेहऱ्याला स

मुर्तीजापूरमध्ये तिकिटासाठी भाजपमध्ये धुसफुस वाढली , हरीश पिंपळेचं तिकीट कापत नव्या चेहऱ्याला स

Maharashtra Vidhansabha Election 2024: राज्यात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर राजकीय घटनांना वेग आला आहे. बहुतांश पक्षांच्या आता उमेदवारांच्या पहिल्या याद्या आल्या आहेत. अनेकांनी दुसऱ्या याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अकोल्यातील मुर्तिजापूरात भाजपमध्ये असंतोष उफाळून आलाय. निमित्त आहे उमेदवारी जाहीर होण्यास विलंब होत असल्याने आमदार हरीश पि़पळेंच्या तिकिट कापल्याच्या चर्चेचं.  मुर्तिजापूरच्या भाजप आमदार हरीश पिंपळे यांचं तिकीट कापलं जाणार अशा भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्याऐवजी ऐनवेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून आलेल्या रवी राठींना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याविरोधात मुर्तिपूरात भाजपमध्ये असंतोष उफाळून आला आहे. पक्षाने हरीश पिंपळेंना उमेदवारी दिली नाही तर मतदारसंघातील बुथ प्रमुख, शाखाप्रमुख आणि पदाधिकारी मिळून एकाच वेळी राजीनामा देणार असल्याचा इशारा देत संतप्त कार्यकर्ते एक आले होते.

नक्की झाले काय?

शनिवारी रात्री हरीश पिंपळेंच्या मुर्तिजापूर येथील लकडगंज भागातील घरासमोर मतदार संघातील भाजपचे शेकडो संतप्त कार्यकर्ते एकत्र आलेत. पक्षाने हरीश पिंपळेंना भाजपने उमेदवारी दिली नाही तर मतदारसंघातले 390 बुथ प्रमुख, शाखाप्रमुख पदाधिकारी एकाचवेळी राजीनामा देणार असल्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिलाय. यावेळी हरीश पिंपळे यांच्या समर्थनात मूर्तिजापूर मतदारसंघातले पदाधिकारी आणि बूथ प्रमुखांनी घोषणाबाजी केलीय.. मुर्तीजापुर मतदारसंघात आयात केलेला उमेदवार नको. बाहेरील उमेदवाराला संधी दिल्यास, आपण पक्षाचे काम करणार नाही आणि राजीनामा देणार, असा इशारा या पदाधिकाऱ्यांनी दिलाय…

नव्या चेहऱ्याला देणार संधी?

मुर्तिजापूर मतदारसंघात रवी राठींऐवजी शरद पवार गटाने सम्राट डोंगरदिवेंना उमेदवारी़ दिली आहे.. त्यामूळे रवी राठी नाराज होते. त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत आपली नाराजी व्यक्त केली होती. आणि भाजपची वाट धरली आहे. 2019 मध्ये रवी राठींनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर मुर्तीजापुरमधून 42 हजार मते घेतली होती. महायुतीत मुर्तीजापुर मतदारसंघ हा भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळं भाजप मुर्तीजापूरमधून विद्यमान आमदार हरीश पिंपळे ऐवजी आता नवीन चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता असल्याचं भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अकोला जिल्ह्यातील एकमेव राखीव असलेला विधानसभेचा एकमेव  मतदारसंघ म्हणजे मुर्तीजापूर….मुर्तीजापूर अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. महाराष्ट्र निर्मितीनंतर एक अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी देणारा मतदारसंघ

मुर्तिजापूर मतदारसंघात 2019 मध्ये पहिल्या तीन उमेदवारांना मिळालेली मते

भाजपाचे हरीश पिंपळे 1,910 मतांनी विजयी

उमेदवार                   पक्ष             मते
हरिश पिंपळे             भाजप       59527
प्रतिभा अवचार          वंचित        57617
रविकुमार राठी          राष्ट्रवादी      41155

हेही वाचा:

Murtijapur Assembly Election 2024 : मुर्तिजापुरमध्ये वंचितकडून डॉ. सुगत वाघमारे रिंगणात; भाजप, राष्ट्रवादीचा तिढा सुटेना, कोण मारणार बाजी?

अधिक पाहा..

Source link

YouTube
Instagram
WhatsApp