भाजपच्या प्रकाश भारसाकळेंना तिसऱ्यांदा संधी; अमोल मिटकरी यांचे विधानसभा लढण्याचा स्वप्नं भंगलं?

भाजपच्या प्रकाश भारसाकळेंना तिसऱ्यांदा संधी; अमोल मिटकरी यांचे विधानसभा लढण्याचा स्वप्नं भंगलं?


Akot Assembly Constituency 2024: अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघातून भाजपने तिसऱ्यांदा विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे (Prakash Bharasakle) यांना दिली संधी आहे. प्रकाश भारसाकळे यांचे नाव जाहीर झाल्यामुळे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांचा अकोटवरील दावा संपुष्टात आला आहे. महायुतीमध्ये आमदार अमोल मिटकरी यांनी पक्षाकडे अकोट मधून उमेदवारीची मागणी केली होती.‌ मात्र, भाजपच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ सोडण्यास भाजपने नकार दिलाय. त्यामुळे आमदार अमोल मिटकरी यांचे विधानसभा लढण्याचा स्वप्नं भंगलं असल्याचे बोलले जात आहे.  

अकोटमध्ये तिसर्‍यांदा उमेदवारी मिळालेल्या प्रकाश भारसाकळेंचे आमदार अमोल मिटकरी यांनी अभिनंदन केलंय. दरम्यान, अजितदादा आणि पक्षासाठी अकोटवरचा दावा सोडला असल्याचेही ते म्हणाले. शेवटी महायुती विजयी होणं हेच लक्ष्य असल्याची प्रतिक्रिया आमदार मिटकरींनी ‘एबीपी माझा’ला दिली. महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान करू,  असेही आमदार मिटकरी म्हणाले.

कोण आहेत प्रकाश भारसाकळे?

अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघात गेल्या दोन टर्मपासून भाजपचे प्रकाश भारसाकळे विजयी झालेत. प्रकाश भारसाकळे हे मूळचे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरचे आहेत. त्यांनी याआधी दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे पाचवेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. 2009 मध्ये आपला मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर त्यांनी अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघाकडे आपला मोर्चा वळवला. 2009 च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून 35000 मतं प्रकाश भारसाकळे यांनी घेतली होती. 2014 च्या निवडणुकीआधी त्यांनी भाजपात प्रवेश घेत 2014 आणि 2019 च्या दोन्ही निवडणुकीत पक्षाकडून विधानसभेत विजयश्री खेचून आणली. मात्र या निवडणुकीत स्थानिक उमेदवारी या मुद्द्यावर मतदारसंघात भारसाकळे यांच्या विरोधात वातावरण होते.  हे दाखविण्याचा प्रयत्नही इतर राजकीय पक्षांकडून होत होता. यासोबतच वाढलेलं वय आणि भारसाकळे यांच्या प्रकृतीच्या कुरबुरी या मुद्द्यावरूनही त्यांना उमेदवारी देऊ नये, असा आग्रह त्यांच्याच पक्षातील इतर इच्छुक करताना दिसून आले. मात्र आज अकोट मतदारसंघातून भाजपने तिसऱ्यांदा विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांना दिली संधी आहे 

काँग्रेसच्या महेश गणगणे विरुद्ध प्रकाश भारसाकळे सामना 

काँग्रेसने नुकतीच जाहीर केलेल्या यादीत अकोट मधून महेश गणगणे यांना उमेदवारी देण्यात आलीये. महेश गणगणे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री सुधाकरराव गणगणे या यांचे सुपुत्र आहेय. महेश गणगणे यांचे वडील सुधाकरराव गणगणे यांनीसुद्धा अकोटचं विधानसभेत प्रतिनिधित्व केलंये. महेश गणगणेंना तिकीट जाहीर झाल्यानंतर अकोटमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष केलाय. घरी त्यांच्या आईने त्यांचं औक्षण करीत त्यांना शुभेच्छा दिल्यात. या आधी 2014 मध्येही महेश गणगणे यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली होतीय मात्र, त्या निवडणुकीत भाजपाचे प्रकाश भारसाकळे यांनी त्यांचा पराभव केला होताय. यावेळीही भाजपने प्रकाश भारसाकळे यांना परत उमेदवारी दिल्यास गणगणी विरुद्ध भारसाकळे अशी लढत पुन्हा होण्याची शक्यता आहेय.

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

22 कोटींची शेती, 87 लाखांचे दागिने; काँग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांची संपत्ती नेमकी किती?

22 कोटींची शेती, 87 लाखांचे दागिने; काँग्रेसच्या उमेदवार यशोमती ठाकूर यांची संपत्ती नेमकी किती?


Yashomati Thakur Property : राज्यात सध्या विधानसभेचा (Maharashtra Assembly Election 2024 ) रणसंग्राम सुरु असून प्रत्येक पक्षाकडून त्यांचे उमेदवार रिंगणात उतरवले जात आहेत. नुकतीच काँग्रेसने (Congress) त्यांची पहिली यादी जाहीर केली असून एकूण 48 उमेदवारांना पक्षाकडून संधी देण्यात आली आहे. यामध्ये अनेक दिग्गजांचा समावेश असून बरेच विद्यमान आमदार पु्न्हा एकदा मैदानात उतरले आहेत. दरम्यान काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये केवळ तीनच महिलांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये तिवसा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस यशोमती ठाकूर यांना परत एकदा विधानसभेच्या रिंगणात उतरवले आहे. 

तिवसा विधानसभा मतदारसंघातून यशोमती ठाकूर निवडणुकीच्या रिंगणात

दरम्यान, नुकतेच यशोमती ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी तिवसामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू विणेश फोगाट उपस्थित त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी यशोमती ठाकूर यांनी मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीवर दर्शन घेतले आणि  नंतर बाईक रॅली तिवसामध्ये दाखल झाली. यावेळी तिवसामध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आणि त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी आपला नामांकन अर्ज भरलाय. अशातच उमेदवारी अर्ज भरताना काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या संपत्तीचे विवरणपत्र दिले आहे. त्यानुसार यशोमती ठाकूर यांच्याकडे जवळपास 22 कोटी 9 लाख रुपयांची शेतजमीन , 87 लाखांचे दागिने आणि  मौल्यवान वस्तूसह कोट्यवधींची संपत्ती असल्याची माहिती पुढे आली आहे.  

यशोमती ठाकूर यांची  संपत्ती नेमकी किती?

  • रोख रक्कम आणि बँकेतील ठेवी 

वर्ष –  2019
4 लाख 82 हजार 666 रुपये.

वर्ष – 2024
50 लाख 51 हजार 13 रुपये.

  • चार चाकी वाहन 

वर्ष – 2019
मारुती सिआझ – किंमत अंदाजे 13 लाख 50 हजार रुपये.

वर्ष – 2024
मारुती सिआझ – किंमत अंदाजे 7 लाख रुपये.

  • दागिने आणि  मौल्यवान वस्तू 

वर्ष – 2019
सोने – 400 ग्राम, किंमत – 15 लाख रुपये.

वर्ष – 2024
सोने – 400 ग्राम, किंमत – 30 लाख रुपये.

एकूण मूल्य – वर्ष – 2019 –
33 लाख 32 हजार 645 रुपये 50 पैसे..

वर्ष – 2024
87 लाख 51 हजार 13 रुपये.

  •  कुटुंबाकडची एकूण शेतजमीन 

वर्ष – 2019 –  (नाशिक आणि अमरावती जिल्हा)
22 एकर, अंदाजे किंमत – 5 कोटी 95 लाख रुपये..

वर्ष – 2024 (नाशिक आणि अमरावती जिल्हा)
48 एकर अंदाजे किंमत – 22 कोटी 9 लाख 21 हजार 110 रुपये..

वर्ष – 2019
एकूण किमंत अंदाजे – 2 कोटी 80 लाख रुपये.

वर्ष – 2024 – 3 कोटी 14 लाख 452 रुपये.( हिस्याचे मूल्य )

एकूण स्थावर मालमत्ता किंमत ( शेत जमीन + घर )

वर्ष – 2019 – 8 कोटी 75 लाख रुपये
वर्ष – 2024 – 9 कोटी 1 लाख 92 हजार 326 रुपये..

 बँकेचे कर्ज – 

वर्ष – 2019 – 8 लाख 50 हजार 560 रुपये.
वर्ष – 2024 – 4 लाख रुपये.

हे ही वाचा 

 

अधिक पाहा..



Source link

Murtijapur Assembly Election 2024 : मुर्तिजापुरमध्ये वंचितकडून डॉ. सुगत वाघमारे रिंगणात; भाजप,

Murtijapur Assembly Election 2024 : मुर्तिजापुरमध्ये वंचितकडून डॉ. सुगत वाघमारे रिंगणात; भाजप,


Murtijapur Assembly Election 2024 : अकोला जिल्ह्यातील एकमेव राखीव असलेला विधानसभेचा एकमेव  मतदारसंघ म्हणजे मुर्तीजापूर….मुर्तीजापूर अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. महाराष्ट्र निर्मितीनंतर एक अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी देणारा मतदारसंघ…. कधीकाळी काँग्रेसचा सूर्य या मतदारसंघातून मावळत नव्हता असे बोलले जायचे. मात्र, 1990 च्या दशकात प्रकाश आंबेडकरांच्या ‘अकोला पॅटर्न’ आणि भाजपचा या मतदारसंघाच्या राजकीय पटलावर उदय झाला. अन काँग्रेसही येथून हद्दपार झालीय. अन 1995 पासून 2004 चा अपवाद वगळता भाजपने या मतदारसंघावरील आपला प्रभाव कायम ठेवलाय. विशेष म्हणजे भाजपला भारिप-बहुजन महासंघ, काँग्रेस आणि आता राष्ट्रवादीतील मतविभाजनाच्या जोरावरच येथे ताकद वाढवता आली आहे. 2009 पासून गेल्या तीन निवडणुकांत भाजपचे हरीश पिंपळे हे या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. मात्र, सध्या आमदार पिंपळे यांना मोठ्या पक्षांतर्गत विरोधाला सामोरे जावे लागत आहे. सध्याही भाजपसह इतर सर्वच राजकीय पक्षांमध्ये तिकिटांसाठी राजकीय साठमारी सुरु झाली आहे. 

मुर्तिजापूर मतदारसंघात 2019 मध्ये पहिल्या तीन उमेदवारांना मिळालेली मते 

भाजपाचे हरीश पिंपळे 1,910 मतांनी विजयी

उमेदवार                   पक्ष             मते 
हरिश पिंपळे             भाजप       59527
प्रतिभा अवचार          वंचित        57617
रविकुमार राठी          राष्ट्रवादी      41155

मुर्तिजापूर मतदारसंघातील एकुण मतदारसंख्या : 

स्त्री : 151121
पुरूष : 158629
तृतीयपंथी : 05
एकूण : 309755

विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांच्यासह सर्वच विरोधी पक्षांमध्ये उमेदवारीसाठी मोठी स्पर्धा आहे ही स्पर्धा पाहता 2019 च्या निवडणुकीच्या वेळी उमेदवार या मतदारसंघात रिंगणात होते त्याहीपेक्षा जास्त उमेदवार रिंगणात राहतील अशी शक्यता वर्तविली जात आहे. सर्वच पक्षांच्या इच्छुकांनी विविध उपक्रम हाती घेतले असून यावेळी ‘मै हु ना’ अशी ग्वाही देत मतदारसंघात जनसंपर्क सुरू केल्याचे दिसत आहे  त्यामुळे मुर्तीजापुर मतदारसंघातील राजकारण चांगलंच तापल्याचं चित्रं आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजपाचे हरीश पिंपळे यांनी फक्त 1910 मतांनी हा मतदारसंघ राखत तिसऱ्यांदा विजयश्री प्राप्त केली होती. मात्र, चौथ्यांदा निवडणुकीला सामोरे जातांना त्यांचा पहिला संघर्ष असेल तो तिकीट मिळविण्यासाठी. त्यानंतर त्यांना पक्षांतर्गत विरोधाला मोठं तोंड द्यावं लागण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपच्या अनुप धोत्रेंना काँग्रेसपेक्षा 8147 मतांची आघाडी मिळाली होती. 

या मतदारसंघात पिंपळे यांच्याशिवाय भाजपचे मातंग समाजाचे नेते आणि लहूशक्तीचे अध्यक्ष परिमल कांबळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रावण इंगळे, पंकज सावळे, संघपरिवारातील मनोहर हरणे, राजश्री बोलके यांच्या नावाची चर्चा आहे. या मतदारसंघात भाजपनंतर सर्वाधिक चुरस आहे ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये. येथे पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठीच्या स्पर्धेतून प्रत्येक इच्छूकाने मोठं शक्तिप्रदर्शन केलं आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रमुख इच्छुकांमध्ये जिल्हा परिषद सदस्य आणि माजी सभापती सम्राट डोंगरदिवे, मागच्या निवडणुकीतील उमेदवार रवी राठी, अकोल्यातील पक्षाचे युवानेते आनंद उर्फ पिंटू वानखडे,  गजानन भटकर आणि अमरावतीचे उद्योजक तेजस जामठे यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेकडून जिल्हा परिषद सदस्य गोपाल भटकर इच्छूक आहेत. 
   
2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्या वेळच्या वंचितच्या उमेदवार प्रतिभा अवचार यांचा 1910 मतांनी थोडक्यात पराभव झाला होता. त्यामूळे वंचितकडूनही इच्छुकांची संख्या मोठी होती. मात्र, वंचितकडून प्रामुख्याने मूळचे अकोल्यातील असलेले मुंबईतील प्रख्यात बांधकाम व्यवसायिक डॉ. सुगत वाघमारे यांना उमेदवारी जाहीर करत सर्वात आधी उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. 

 या मतदारसंघात सध्या आमदार हरीश पिंपळे यांच्यासाठी अतिशय आव्हानात्मक आणि प्रतिकूल परिस्थिती आहे. यात त्यांना चौथ्यांदा तिकीट मिळतं का?. मिळालं तर ते ‘अँटी ईन्कमबंसी’चा कसा सामना करतात?, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

अधिक पाहा..



Source link

Akot Assembly constituency 2024: अकोटमधील परंपरा चालणार की विद्यमान आमदारालाच पुन्हा संधी मिळणा

Akot Assembly constituency 2024: अकोटमधील परंपरा चालणार की विद्यमान आमदारालाच पुन्हा संधी मिळणा


Akot Assembly constituency 2024: अकोट विधानसभा मतदारसंघ… अकोला जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच महत्वाची भूमिका बजावणारा मतदारसंघ… या मतदारसंघात अकोट आणि तेल्हारा या दोन तालुक्यांचा समावेश होतोय. या मतदारसंघात तब्बल 3 लाख 10 हजार 88 मतदार आहेयेत.  अकोला जिल्ह्यातील ‘अकोट विधानसभा मतदारसंघ आपल्या एका ‘खास’ वैशिष्ट्यासाठी. या मतदारसंघात एकदा निवडून आलेला ‘आमदार’ परत दुसऱ्यांदा निवडून येत नाही. या मतदारसंघानं 1985 पासून आपला हा अलिखित नियम अगदी कसोशीनं पाळला आहे. मात्र, 2014 आणि 2019 असे सलग दोनदा भाजपचे प्रकाश भारसाकळे विजयी झाले आहेत. 2014 पर्यंत युतीमध्ये शिवसेनेच्या ताब्यात हा मतदारसंघ होता. 2009 मध्ये येथून शिवसेनेचे संजय गावंडे विजयी झाले होते. मात्र, 2014 मध्ये युती तुटली आणि हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात गेला. 

या मतदारसंघात मराठा आणि कुणबी समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्याखालोखाल दलित आणि मुस्लिम समाजाचा मतदार येथे आहेय. यासोबतच बारी, भोई, धनगर, आदिवासी, माळी, कोळी आणि इतर छोटे समाज या मतदारसंघात आहेयेत. लोकसभेत येथून भाजपला 9168 हजार मतांची आघाडी आहेय. 

अकोट मतदारसंघात 2019 मध्ये पहिल्या तीन उमेदवारांना मिळालेली मते 

भाजपाचे प्रकाश भारसाकळे 7,260 मतांनी विजयी 

उमेदवार                   पक्ष             मते 
प्रकाश भारसाकळे      भाजप       48586
संतोष रहाटे                वंचित        41326
अनिल गावंडे              अपक्ष         28183

अकोट मतदारसंघातील एकूण मतदार संख्या :

स्त्री : 149214
पुरूष : 160873
तृतीयपंंथी :01
एकूण : 310088

अकोटमध्ये इच्छुकांची गर्दी

भाजपकडून आमदार प्रकाश भारसाकळे, कनक कोटक, विशाल गणगणे, डॉ.रणजित पाटील (माजी राज्यमंत्री), जयश्री पुंडकर, कॅप्ट.सुनील डोबाळे, पुरुषोत्तम चौखंडे, काँग्रेसकडून प्रशांत पाचडे, ॲड. महेश गणगणे, संजय बोडखे, निनाद मानकर, प्रहार जनशक्ती पक्षाकडून अनिल गावंडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून कैलास गोंडचर, राजू बोचे, शिवसेना उबाठा पक्षाकडून रामप्रभु तराळे, माजी आमदार संजय गावंडे, दिलीप बोचे, डॉ.मनीषा मते (मा.नगराध्यक्ष), माया ताई म्हैसने, शिवा मोहोड, शिवसेना शिंदे गटाकडून गोपीकिशन बाजोरिया (माजी आमदार), मनीष कराळे, वंचित बहुजन आघाडीकडून दीपक बोडखे (माजी राज्यमंत्री रामदास बोडखे सुपूत्र), ॲड गजानन पुंडकर, अॅड. संतोष रहाटे, प्रदीप चोरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शेख निसार, अॅड.नंदकिशोर शेळके, अॅड. रविंद्र फाटे हे इच्छुक आहेत.

येथील स्थानिक आमदाराच्या विरोधात जनता आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी भाजपच्या चिंतेत भर टाकणारी आहे. भाजपकडून विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांनी परत रिंगणात उतरण्याबद्दल मोठी साशंकता आहे. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात ही जागा ‘रेड झोन’मध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. उमेदवार बदलायचा निर्णय झाल्यास उमेदवारीच्या रांगेत भाजपाचे अनेक नेते आहेत. संजय धोत्रे येथून त्यांचे जवळचे नातेवाईक असणाऱ्या डॉ. रणजित सपकाळ यांचं नाव समोर करण्याची दाट शक्यता आहे. भाजपाच्या इतर प्रमुख दावेदारांमध्ये अकोटचे माजी नगराध्यक्ष पुरूषोत्तम चौखंडे, तेल्हारा शहराच्या माजी नगराध्यक्षा जयश्री पुंडकर, राजेश नागमते यांची नावे चर्चेत आहेत. 

भाजपच्या ताब्यात असलेल्या अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघावरून महायुतीतल्या तिन्ही पक्षात कलगीतुरा रंगला. या मतदारसंघातून लढण्याची इच्छा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केलीये.‌ तर शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरियांनीही अकोटमधून उमेदवारीसाठी शड्डू ठोकला आहे.महाविकास आघाडीत जर ठाकरे गटाला हा मतदारसंघ सुटल्यास माजी आमदार संजय गावंडे यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे. याशिवाय शिवा मोहोड, माया म्हैसने, विजय दुतोंडे आणि दिलीप बोचे हेसुद्धा उमेदवारीच्या शर्यतीत आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून या मतदारसंघाचे माजी आमदार आणि माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे इच्छूक आहेत. तर काँग्रेसला हा मतदारसंघ सुटल्यास माजी राज्यमंत्री सुधाकरराव गणगणे यांचा मुलगा आणि युवानेते महेश गणगणे, जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, महिला नेत्या डॉ. संजीवनी बिहाडे, तालुकाध्यक्ष प्रशांत पाचडे, सहकार नेते हिदायत पटेल, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब बोंद्रे आणि जिल्हा परिषद सदस्य गजानन काकड शर्यतीत आहेत. 

या मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांची मोठी ताकद आहे. वंचितकडून मागचे पराभूत उमेदवार संतोष रहाटे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष रौंदळे, माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या वाघोडे, जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे, काशिराम साबळे यांचाही वंचितच्या उमेदवारीवर दावा आहे. या मतदारसंघात प्रस्थापित राजकीय पक्षांबरोबरच दोन उमेदवारांच्या संभाव्य उमेदवारीचीही मोठी चर्चा आणि उत्सुकता आहे. यामध्ये शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे, प्रहारचे प्रमुख प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांचा समावेश आहे. तसे हा मतदारसंघ अतिशय गुंतागुंतीचा आणि विकासापासून कोसो दूर असलेला आहेय.  या मतदारसंघातील महत्वाच्या समस्या तशाच असतांना आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने सकारात्मक प्रयत्न केलेले दिसून येत नाहीय.

अधिक पाहा..



Source link

Akola East Assembly Election 2024: अकोला पुर्वमध्ये भाजपकडून रणधीर सावरकरांचे नाव जाहीर; तिकिटा

Akola East Assembly Election 2024: अकोला पुर्वमध्ये भाजपकडून रणधीर सावरकरांचे नाव जाहीर; तिकिटा


Akola East Assembly Election 2024: अकोला जिल्ह्याची राजकीय राजधानी असलेला सर्वात मोठा आणि महत्वाचा मतदारसंघ म्हणजे अकोला पुर्व मतदारसंघ. शहरी आणि ग्रामीण तोंडवळा असलेला हा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात अकोला महापालिकेचे 8 प्रभागासोबतच अकोला तालुक्याचा ग्रामीण भाग समाविष्ट आहे. या मतदारसंघातून माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रेंचे भाचे रणधीर सावरकर हे गेल्या दोन टर्मपासून आमदार आहेत. पक्ष तिसऱ्यांदाही त्यांनाच निवडणूकीत उतरवणार असल्याचे स्पष्ट होते. तर महाविकास आघाडीत या मतदारसंघासाठी काँग्रेस आणि ठाकरे गटांमध्ये रस्सीखेच सुरू आहेत. ठाकरे गटाकडून पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि जिल्हा परिषदेतील गटनेते गोपाल दातकर, या मतदारसंघाचे दहा वर्ष आमदार राहिलेले माजी आमदार हरिदास भदे आणि महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख देवश्री ठाकरे यांची नावे चर्चेत आहेत. तर काँग्रेस कडून पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पूजा काळे, राजेश मते आणि ज्येष्ठ नेते हेमंत देशमुख यांचे नाव चर्चेत आहेय.

या मतदारसंघात मोठी ताकद असलेल्या वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार अद्याप स्पष्ट नाहीय. वंचित बहुजन आघाडीकडून पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हा परिषदेतील गटनेते ज्ञानेश्वर सुलताने, जिल्हा परिषद सदस्य सुशांत बोर्डे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बालमुकूंद भिरड, पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि समाजसेवक डॉ. संतोष हुशे आणि डॉ. हर्षवर्धन मालोकार यांची नावं चर्चेत आहेय.

अकोला पुर्व मतदारसंघात 2019 मध्ये पहिल्या तीन उमेदवारांना मिळालेली मते 

भाजपाचे रणधीर सावरकर 24,723 मतांनी विजयी 

उमेदवार                   पक्ष             मते 
रणधीर सावरकर       भाजप         100475
हरिदास भदे              वंचित          75752
विवेक पारसकर         काँग्रेस         9533

अकोला पूर्व मतदारसंघातील मतदारसंख्या : 

स्त्री : 173510
पुरूष : 180165
तृतीयपंथी : 15
एकूुण : 353690

या मतदारसंघाची एकूण मतदारसंख्या 3 लाख 53 हजार 690 इतकी आहेय. 2014 मध्ये युतीत सेनेच्या ताब्यातील या मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपचं कमळ फुललं. गेल्या दहा वर्षांत आमदार रणधीर सावरकर यांनी मतदारसंघावर चांगलीच पकड बसवलीय.  जिल्ह्याच्या राजकारणात धोत्रे गटाचे ‘चाणक्य’ म्हणून जिल्ह्यात रणधीर सावरकर यांची ओळख आहेय. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदारसंघात भाजपला 27 हजार मतांची आघाडी मिळाली होतीय. या निवडणुकीत ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था, खारपाणपट्ट्याचा प्रश्न, त्याबरोबरच मोठे उद्योग नसल्याने वाढलेली बेरोजगारी हे प्रश्न गाजण्याची शक्यता आहेय. सध्या जिल्हा आणि भाजपाच्या राजकारणावर आमदार रणधीर सावरकर यांची मोठी पकड आहे. त्यामुळे आमदार सावरकर यांचे पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरचे विरोधक या मतदारसंघात मोठी ताकद लावण्याची शक्यता आहे. त्यामूळे अकोला पूर्व मतदासंघातील निवडणुक निश्चितच ‘हाय होल्टेज’ असेल यात शंका नाही.

अकोला पूर्वमधून ही नावे आहेत चर्चेत 

काँग्रेसकडून डॉ. सुभाषचंद्र कोरपे (संचालक, जिल्हा मध्यवर्ती बँक), अविनाश देशमुख, पूजा काळे (काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा), डॉ. प्रशांत पाटील वानखडे ही नावे चर्चेत आहेत. शिवसेना उबाठा पक्षाकडून गोपाल दातकर (जिल्हाध्यक्ष, जि.प.सदस्य), मंगेश काळे (माजी नगरसेवक), हरिदास भदे (माजी आमदार) यांची नावे चर्चेत आहेत. भाजपकडून आमदार रणधीर सावरकर, तेजराव थोरात (माजी जिल्हाध्यक्ष) ही नावे चर्चेत आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून श्रीरंग पिंजरकर (जिल्हाध्यक्ष शिंदे सेना) हे नाव चर्चेत आहे. वंचित बहुजन आघाडीकडून बालमुकूंद भीरड (ओबीसी नेते तथा माजी जि.प.अध्यक्ष), प्रा. संतोष हुशे (ओबीसी नेता), ज्ञानेश्वर सुलताने (विरोधी पक्ष नेता), शंकरराव इंगळे, सचिन भांडे (माजी राज्यमंत्री यांचे सुपूत्र), शिरिष देशमुख, गोपाल ढोरे ही नावे चर्चेत आहेत अपक्ष म्हणून गजानन हरणे (सकल गरजवंत मराठा, कुंबी, देशमुख , पाटील असामी समाज), संजय वानखडे (सुशिक्षित बेरोजगार फेडरेशन), मनोज तायडे (शेतकरी संघटना) या नावांची चर्चा आहे. 

अधिक पाहा..



Source link

अकोला जिल्ह्यातील 2 मतदारसंघात भाजप भाकरी फिरवणार?;  विद्यमान आमदारांची उमेदवारी धोक्यात

अकोला जिल्ह्यातील 2 मतदारसंघात भाजप भाकरी फिरवणार?; विद्यमान आमदारांची उमेदवारी धोक्यात


अकोला : ‘घोडा का थांबला?’…  ‘भाकरी का करपली?’,  या दोन्ही प्रश्नांचं एकच सामायिक उत्तर आहे. आणि हे उत्तर आहे, ‘फक्त फिरवली नाही’ म्हणून. भाजपने महाराष्ट्र विधानसभेसाठीच्या आपल्या पहिल्या यादीत 99 मतदार संघातील उमेदवार जाहीर केलेत. राज्यात भाजप 155 ते 160 च्या दरम्यान जागा लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी किमान 55 ते 60 उमेदवारांची नावे जाहीर होण्याची बाकी आहे. भाजपाची (BJP) उमेदवारी जाहीर होण्याच्या प्रतीक्षेत भाजपाचे जवळपास 25 ते 30 विद्यमान आमदार आहेत. भाजप जवळपास 30 टक्के आमदारांची तिकीट कापणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे ज्यांची तिकीट निश्चित होती, त्या उमेदवारांची घोषणा भाजपने पहिल्या यादीत जाहीर केल्याचं बोलले जात आहे. त्यामुळे भाजपचे जवळपास 26 आमदार सध्या वेटिंगवर यात विदर्भातील 10 आमदारांचा समावेश आहे. यातील दोन आमदार अकोला (Akola) जिल्ह्यातील आहे. ‘वेटिंग’वर असलेल्या या आमदारांमध्ये भाजपचे अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे आणि मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांचा समावेश आहे 

भाजपाच्या पहिल्या यादीत 99 जागांचे उमेदवार जाहीर करण्यात आले होते. याच यादीत अकोला पूर्व मतदारसंघातून पक्षाने तिसऱ्यांदा आमदार रणधीर सावरकर यांना संधी दिली आहे. मात्र, अकोला पूर्वची उमेदवारी जाहीर करतांना भाजपने अकोट, मुर्तीजापुर आणि अकोला पश्चिम या मतदारसंघातील उमेदवार जाहीर केलेले नाहीत. जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघ भाजप शिवसेना शिंदे गटाला सोडण्याची शक्यता आहे. तर अकोला पश्चिम मतदार संघातील गेल्यावेळचे विजयी उमेदवार गोवर्धन शर्मा यांचे निधन झाल्यामुळे त्या ठिकाणी भाजपला नवा उमेदवार द्यावा लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तीन विद्यमान आमदारांपैकी दोन आमदारांची आमदारकी सध्या पक्षाने ‘ऑक्सिजन’वर ठेवली आहे. जनमानसात खालावलेली प्रतिमा, ‘अँटी इन्कमब’न्सी मुळे असलेली आमदार विरोधी लाट आणि स्थानिक कार्यकर्त्यांची नाराजी यामुळे अकोट आणि मुर्तीजापुर मतदारसंघत भाजप नवे उमेदवार देणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातही मूर्तिजापूर मतदारसंघात गेल्या तीन निवडणुकांपासून आमदार असलेल्या हरीश पिंपळे यांची उमेदवारी धोक्यात असल्याचे स्पष्ट संकेत पक्षाकडून देण्यात आले आहेत.

मुर्तिजापूर मतदारसंघात 2019 मध्ये पहिल्या तीन उमेदवारांना मिळालेली मते 

भाजपाचे हरीश पिंपळे 1,910 मतांनी विजयी

उमेदवार                   पक्ष             मते 
हरिश पिंपळे             भाजप       59527
प्रतिभा अवचार          वंचित        57617
रविकुमार राठी          राष्ट्रवादी      41155

मुर्तिजापूर मतदारसंघातील एकुण मतदारसंख्या : 

स्त्री : 151121
पुरूष : 158629
तृतीयपंथी : 05
एकूण : 309755

मुर्तीजापुरमध्ये आमदार हरीश पिंपळेंची उमेदवारी ‘डेंजर झोन’मध्ये : 

अकोला जिल्ह्यात उमेदवार बदलाची सर्वाधिक चर्चा आहे ती मुर्तीजापुर मतदारसंघाबद्दल. ऋतुजापुर हा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ आहे. 2009 पासून सलग तीन टर्म आमदार हरीश पिंपळे या मतदारसंघात नेतृत्व करतात. मात्र 2019 च्या निवडणुकीत आमदार हरीश पिंपळे अगदी काठावर निवडून आले होते. शेवटच्या तीन-चार फेऱ्यांमध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार प्रतिभा अवचार यांचा फक्त 1910 मतांनी पराभव केला होता. 2019 च्या निवडणुकीत मुर्तीजापुर आणि बार्शीटाकळी तालुक्यात अनेक गावांमध्ये हरीश पिंपळे यांना लोकांच्या रोशाचा सामना करावा लागला होता. मात्र त्याही परिस्थितीत आमदार हरीश पिंपळे यांनी काठावरचा मताधिक्य राखत मतदारसंघ तिसऱ्यांदा भाजपाच्या ताब्यात राखण्यात यश मिळवलं होतं. मात्र या निवडणुकीत चौथ्यांदा उमेदवारी मिळताना हरीश पिंपळे यांच्यासमोर अनेक आव्हान आहेत ती आव्हान पक्ष बाहेरच्या आव्हानांपेक्षा पक्षांतर्गत अधिक आहेत. हरीश पिंपळे यांची कार्यक्षेली त्यांच्या भोवतालची माणसं आणि यातच दुखावलेले कार्यकर्ते यामुळे त्यांना यावेळी उमेदवारी मिळण्यात अनेक अडचणी येणार असल्याची चिन्ह. अकोला आणि मुर्तीजापुर तालुक्यातील कधीकधी त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी जाता त्यांच्याविरुद्ध बंड केला आहे. 

बार्शीटाकळी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी पुकारला होता आमदार पिंपळेंविरुद्ध ‘एल्गार’ : 

मुर्तीजापुरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांच्या विरोधात सध्या मतदारसंघातील पक्षाचेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उभे ठाकल्याचं चित्र आहे. ते 2009 पासून सातत्याने मुर्तीजापुरमधून भाजपचे आमदार आहेत. मात्र आता त्यांना चौथ्यांदा उमेदवारी नको म्हणून त्यांच्या विरोधात मतदारसंघातील पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकवटले आहेत. मुर्तिजापूर मतदारसंघात मुर्तिजापूर आणि बार्शीटाकळी तालुक्यांचा समावेश आहे. मतदारसंघातील बार्शीटाकळी येथे हरीश पिंपळे यांच्या विरोधात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. या बैठकीत हरीश पिंपळे यांना तिकीट देऊ नये अशी मागणी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे केलीये. आमदार पिंपळेंना दलालांनी घेरल्याचा गंभीर आरोप या कार्यकर्त्यांनी या बैठकीत केला‌ होता. मुर्तिजापूर येथेही असाच नाराज भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा होण्याची शक्यता आहे. 

पक्षांतर्गत ‘सर्व्हे’मध्ये आमदार पिंपळेना निगेटिव्ह मार्किंग : 

लोकसभा निवडणुकीपूर्वी वर्षभरापासून भाजप आपल्या आमदारांच्या मतदारसंघांमध्ये सातत्याने वेगवेगळे ‘सर्व्हे’ करतायेत.‌ पक्षाच्या अनेक ‘सर्व्हे’मध्ये हरीश पिंपळे यांच्या कामाबद्दल नकारात्मक ‘रिपोर्ट’ आल्याची माहिती वारंवार समोर आली आहे. विधानसभा अधिवेशन काळात पक्षाकडून आमदारांना दिलेल्या ‘रिपोर्ट कार्ड’मध्येही आमदार हरीश पिंपळे यांना कामगिरी सुधारण्याच्या सूचना पक्षाकडून देण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतरही सकारात्मक बदल घडून आले नसल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.  लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांना आठ हजारांवर मतांची आघाडी आहे. धोत्रे कुटुंबीयांचा या मतदारसंघाशी धोत्रे कौटुंबिक जिव्हाळा आहे. कारण खासदार अनुप धोत्रेंचे वडील आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे 1999 मध्ये सर्वात पहिल्यांदा याच मतदारसंघावरून विधानसभेवर निवडून गेले होते. त्याच ऋणानुबंधामुळे या मतदारसंघात अनुप धोत्रेमाजींना आघाडी मिळाल्याची भावना पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.

भाजपमध्ये मुर्तीजापुरसाठी या नावांची आहे चर्चा :

 मतदारसंघात पिंपळे यांच्याशिवाय भाजपचे मातंग समाजाचे नेते आणि लहूशक्तीचे अध्यक्ष परिमल कांबळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रावण इंगळे, पंकज सावळे, संघपरिवारातील मनोहर हरणे, राजश्री बोलके यांच्या नावाची चर्चा आहे. 

अकोट : 

अकोला जिल्ह्यातील भाजपसाठी ‘डेंजर झोन’मध्ये असलेला दुसरा मतदारसंघ म्हणजे अकोट मतदारसंघ. राज्यात पहिल्या यादीत समावेश नसलेल्या आमदाराच्या मतदारसंघांमध्ये अकोट मतदार संघाचाही समावेश आहे. गेल्या दोन टर्मपासून या मतदारसंघातून भाजपचे प्रकाश भारसाकळे विजयी झालेत. प्रकाश भारसाकळे हे मूळचे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरचे आहेत. त्यांनी याआधी दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे पाचवेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. 2009 मध्ये आपला मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर त्यांनी अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघाकडे आपला मोर्चा वळवला. 2009 च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून 35000 मतं प्रकाश भारसाकळे यांनी घेतली होती.. 2014 च्या निवडणुकीआधी त्यांनी भाजपात प्रवेश घेत 2014 आणि 2019 च्या दोन्ही निवडणुकीत पक्षाकडून विधानसभेत विजयश्री खेचून आणली. मात्र या निवडणुकीत स्थानिक उमेदवारी या मुद्द्यावर मतदारसंघात भारसाकळे यांच्या विरोधात वातावरण आहे हे दाखविण्याचा प्रयत्न इतर राजकीय पक्षांकडून होत आहे. यासोबतच वाढलेलं वय आणि भारसाकळे यांच्या प्रकृतीच्या कुरबुरी या मुद्द्यावरूनही त्यांना उमेदवारी देऊ नये, असा आग्रह त्यांच्याच पक्षातील इतर इच्छुक करताना दिसून येत आहेत.

स्थानिक आमदाराचा मुद्दा अकोटच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी : 

गेल्या दहा वर्षापासून आमदार प्रकाश भारसाकळे या मतदारसंघाचं नेतृत्व करतायेत. मात्र, यावेळी ‘स्थानिक’च्या मुद्द्यावरून त्यांना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न त्यांचे विरोधक आणि पक्षांतर्गत विरोधक करतायेत. कारण अनेक पक्षातील मतदारसंघाबाहेरचे इच्छुक अकोटमधून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे अकोट मधून कोणत्याही राजकीय पक्षाचा उमेदवार स्थानिकच असला पाहिजे असा येथील राजकीय कार्यकर्ते, पदाधिकाऱी आणि जनतेचा आग्रह आहे.

अकोट विधानसभा मतदारसंघ… अकोला जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच महत्वाची भूमिका बजावणारा मतदारसंघ… या मतदारसंघात अकोट आणि तेल्हारा या दोन तालुक्यांचा समावेश होतोय. या मतदारसंघात तब्बल 3 लाख 10 हजार 88 मतदार आहेयेत.  अकोला जिल्ह्यातील ‘अकोट विधानसभा मतदारसंघ आपल्या एका ‘खास’ वैशिष्ट्यासाठी. या मतदारसंघात एकदा निवडून आलेला ‘आमदार’ परत दुसऱ्यांदा निवडून येत नाही. या मतदारसंघानं 1985 पासून आपला हा अलिखित नियम अगदी कसोशीनं पाळला आहे. मात्र, 2014 आणि 2019 असे सलग दोनदा भाजपचे प्रकाश भारसाकळे विजयी झाले आहेत. 2014 पर्यंत युतीमध्ये शिवसेनेच्या ताब्यात हा मतदारसंघ होता. 2009 मध्ये येथून शिवसेनेचे संजय गावंडे विजयी झाले होते. मात्र, 2014 मध्ये युती तुटली आणि हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात गेला. या मतदारसंघात मराठा आणि कुणबी समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्याखालोखाल दलित आणि मुस्लिम समाजाचा मतदार येथे आहेय. यासोबतच बारी, भोई, धनगर, आदिवासी, माळी, कोळी आणि इतर छोटे समाज या मतदारसंघात आहेयेत. लोकसभेत येथून भाजपला 9168 हजार मतांची आघाडी आहेय.

अकोट मतदारसंघात 2019 मध्ये पहिल्या तीन उमेदवारांना मिळालेली मते 

भाजपाचे प्रकाश भारसाकळे 7,260 मतांनी विजयी 

उमेदवार                   पक्ष             मते 
प्रकाश भारसाकळे      भाजप       48586
संतोष रहाटे                वंचित        41326
अनिल गावंडे              अपक्ष         28183

अकोट मतदारसंघातील एकूण मतदार संख्या :

स्त्री : 149214
पुरूष : 160873
तृतीयपंंथी :01
एकूण : 310088

भाजपकडून या नावांची आहे चर्चा : 

 येथील स्थानिक आमदाराच्या विरोधात जनता आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी भाजपच्या चिंतेत भर टाकणारी आहे. भाजपकडून विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांनी परत रिंगणात उतरण्याबद्दल मोठी साशंकता आहे. भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात ही जागा ‘रेड झोन’मध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. उमेदवार बदलायचा निर्णय झाल्यास उमेदवारीच्या रांगेत भाजपाचे अनेक नेते आहेत. संजय धोत्रे येथून त्यांचे जवळचे नातेवाईक असणाऱ्या डॉ. रणजित सपकाळ यांचं नाव समोर करण्याची दाट शक्यता आहे. भाजपाच्या इतर प्रमुख दावेदारांमध्ये अकोटचे माजी नगराध्यक्ष पुरूषोत्तम चौखंडे, माजी शहराध्यक्ष कनक कोटक, माझी लष्करी अधिकारी कॅप्टन सुनील डोबाळे, तेल्हाऱ्याच्या माजी नगराध्यक्षा जयश्री पुंडकर, राजेश नागमते यांची नावे चर्चेत आहेत. 

भाजपाच्या मतदारसंघावर मित्र पक्षांचा डोळा : 

भाजपच्या ताब्यात असलेल्या अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघावरून महायुतीतल्या तिन्ही पक्षात कलगीतुरा रंगला. या मतदारसंघातून लढण्याची इच्छा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी व्यक्त केलीये.‌ तर शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरियांनीही अकोटमधून उमेदवारीसाठी शड्डू ठोकला आहे. पहिल्या यादीत मतदारसंघाचा उमेदवार जाहीर झाला नसल्यामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने आता या मतदारसंघासाठी जोरदार चाचपणी सुरू केली आहे. पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी यासंदर्भात आमदार अमोल मिटकरी यांना तातडीने मुंबईला पाचारण केल्याने अकोटसंदर्भातला ‘सस्पेन्स’ आणखी वाढवला आहे. अकोट आणि मूर्तीच्यापुर मतदारसंघाबद्दल सुरू असलेल्या चर्चा… त्यातच या दोन्ही मतदारसंघात भाजप खरंच भाकरी फिरवणार का?, भाकरी फिरवली आणि नाही फिरवली तरी याचे पडसाद या दोन्ही मतदारसंघाच्या राजकारणात कसे पडणार?, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.



Source link

YouTube
Instagram
WhatsApp