आमदार रवी राणा महायुतीचे अधिकृत उमेदवार?  बॅनरमुळे चर्चेला उधाण, तर रवी राणा म्हणतात… 

आमदार रवी राणा महायुतीचे अधिकृत उमेदवार? बॅनरमुळे चर्चेला उधाण, तर रवी राणा म्हणतात… 


Maharashtra Politics अमरावती :  अमरावती जिल्ह्याच्या बडनेरा विधानसभेचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांचे एक बॅनर सध्या चर्चेत आले आहे. या बॅनरमुळे आमदार रवी राणा यांनी स्वतःच महायुतीची (Mahayuti) उमेदवारी जाहीर केली का? असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळातून विचारला जाऊ लागला आहे. सोशल मीडियावर महायुतीचे अधिकृत उमेदवार असा उल्लेख असलेले बॅनर फिरत आहे. मात्र यात मतदारसंघ कोणता हे मात्र लिहलं नसल्याने अनेक चर्चा आता रंगू लागल्या आहे. अशातच यावर आता स्वत: आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी माहिती देत याबाबत खुलासा केला आहे.

देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कडून हिरवी झेंडी- रवी राणा   

गेल्या दहा पंधरा वर्षांपासून मी महायुती सोबत आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते माझ्यावर प्रेम करतात, शुभेच्छा देतात, बॅनर लावतात, तोच उत्साह त्या बॅनरच्या माध्यमातून झळकला आहे. मीच आमदार आहे, मीच अधिकृत उमेदवार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील हिरवी झेंडी दिली आहे. जे आमदार महायुती सोबत आहेत त्यांच्यासाठी त्या जागा सुटणार आहेत. तर काही जागा आम्ही मागितल्या आहेत. मात्र, काही विघ्न संतोषी लोक असतात.  ज्यांना आपण लोकसभेमध्ये देखील पाहिलं. आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला पाडण्याचं काम काही लोकांनी केलं. आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ते काम करतात. त्याला काही इलाज नाही. त्यांचा पक्ष, त्यांचे नेते त्या बाबत निर्णय घेतील. असे म्हणत त्यांनी या प्रकरणावर स्पष्टोक्ती देत नाव न घेता बच्चू कडू यांच्यावर टीका ही केली आहे.

 बच्चू कडू हे नेहमी बालिश वक्तव्य करतात- रवी राणा 

नवनीत राणा यांना रवी राणांनी मतदार संघात 28 हजारांची लीड दिली. बच्चू कडू हे नेहमी बालिश वक्तव्य करतात. लोकसभे आधी त्यांनी कुणाची सुपारी घेतली होती हे सर्वांनी पाहिलं. त्यांचा एकच नारा होता, नवनीत राणांना पाडायचं आहे. जो व्यक्ती नेहमीच सुपार्‍या घेऊन काम करतो, त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की बडनेरा मतदारसंघाने 28 हजारांचा लीड नवनीत राणाना दिला. त्यामुळे ते आता काहीही बोलले तरी अचलपूर मतदार संघातील जनता त्यांना प्रश्न विचारणार आहे. अशी टीका करत रवी राणांनी बच्चू कडू यांना लक्ष्य केलं आहे. 

हे ही वाचा

अधिक पाहा..



Source link

नवनीत राणांना खुद्द रवी राणा यांनी खासदार होऊ दिलं नाही, बच्चू कडू नेमकं असं का म्हणाले? 

नवनीत राणांना खुद्द रवी राणा यांनी खासदार होऊ दिलं नाही, बच्चू कडू नेमकं असं का म्हणाले? 


Bacchu kadu on Ravi rana : नवनीत राणा (Navneet rana) यांना खुद्द रवी राणा (Ravi rana) यांनी खासदार होऊ दिलं नाही, असं वक्तव्य प्रहार जनशक्ती पक्षाटे प्रमुख बच्चू कडू (Bacchu kadu) यांनी केलं आहे. नवनीत राणा या खासदार होऊ नये, याला रवी राणा हेच जबाबदार आहेत. एखाद्याला निवडणूक लढायची असते तेव्हा सगळ्यांना समजून घ्यायला लागतं असेही कडू म्हणाले.

अमरावती येथील सगळ्या भाजपच्या नेत्यांशी रवी राणांनी वैर घेतलं होतं. त्यांच्याशी वाद घातला होता. त्यामुळेच नवनीत राणा यांचा पराभव झाल्याचे बच्चू कडू म्हणाले. आता विधानसभेला काय होतं ते बघा असेही ते म्हणाले. बच्चू कडू हे आज पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. पुण्यात आज परिवर्तन महाशक्तीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी (Raju Shetti) उपस्थित होते. या बैठकीत 150 जागाबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच इतर जागांवरचा निर्णय देखील घेण्यात येणार आहे. या बैठकीनंतर बच्चू कडू बोलत होते. 

अमरावती लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या बळवंत वानखेडेंनी केला नवनीत राणांचा पराभव 

महाराष्ट्रातील अमरावतीमधून भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला आहे. अमरातवीत भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या समोर काँग्रेसचे बळवंत वानखेडे उभे होते. या लढतीत वानखेडे यांनी राणांचा पराभव केला. या दोघांमधली ही स्पर्धा खूपच चुरशीची होती. मतमोजणी सुरु झाल्यापासून कधी नवनीत राणा तर कधी बळवंत वानखेडे आघाडीवर होते पण जनतेने वानखेडेंचीच निवड केल्याचं चित्र स्पष्ट झालं. अमरावती मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान पार पडलं होतं. 2019 च्या निवडणुकीत नवनीत राणा यांनी शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांचा पराभव करून विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदी सरकारला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर 2014 मध्ये नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती, ज्यात त्यांचा पराभव झाला होता. अमरावती लोकसभेची जागा अनेकवेळा शिवसेनेकडे गेली आहे. मात्र, येथून भाजपला कधीही विजय मिळाला नाही. नवनीत यांनीही अपक्ष म्हणून विजय मिळवला होता. मात्र, यावेळी त्या भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. मात्र, यावेळीही अमरावतीतून भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

अधिक पाहा..



Source link

बारामतीच्या कार्यक्रमात शरद पवार आणि सुनेत्रा पवारांमध्ये अबोला, अमोल मिटकरी संतापून म्हणाले…

बारामतीच्या कार्यक्रमात शरद पवार आणि सुनेत्रा पवारांमध्ये अबोला, अमोल मिटकरी संतापून म्हणाले…


अकोला : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल बुधवारी वाजले. यानंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येत आहे. त्यातच बारामतीत वेगळं चित्र पाहायला मिळालं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या खासदार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) आणि युगेंद्र पवार (Yugendra Pawar) एकाच मंचावर दिसून आले. बारामतीमधील (Baramati) विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संकुलाच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्त खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र या कार्यक्रमात शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या अबोला दिसून आल्याची चर्चा आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. यावरून अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

अमोल मिटकरी संतापले

शरद पवार आणि सुनेत्रा पवारांच्या बारामतीच्या कार्यक्रमातील अबोल्याच्या बातम्यांवरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी माध्यमांनाच खडेबोल सुनावले आहेत. पवार साहेब आणि सुनेत्रा वहिनी माध्यमांच्या कॅमेऱ्यांना पाहून बोलणार का? असं सवाल त्यांनी उपस्थित केलाय. हा विषय पवार कुटुंबियांचा कौटुंबिक विषय असल्याचंही आमदार मिटकरी यांनी म्हटले आहे. 

राजेंद्र शिंगणेंवर अमोल मिटकरींचा हल्लाबोल

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना सोडून जाणाऱ्या डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne) यांच्यावर अमोल मिटकरी यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. 1800 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी देऊनही डॉ. शिंगणे यांनी अजित पवारांशी विश्वासघात केल्याचे त्यांनी म्हटले आहे. जे अजित पवारांचे होऊ शकले नाही, ते शरद पवारांचे होतील का?, असा सवालही अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलाय.

अजित पवार विक्रमी मतांनी निवडून येतील

दरम्यान, बारामती विधानसभा मतदारसंघासाठी (Baramati Assembly Constituency) चर्चा सुरू असलेल्या युगेंद्र पवार आणि अजित पवार यांची तुलना होऊ शकत नाही, असेही आमदार अमोल मिटकरी म्हणाले आहेत. युगेंद्र पवारांची तेवढी राजकीय आणि वैचारिक उंची नसल्याचंही ते म्हणाले. बारामतीत यावेळी अजित पवार विक्रमी मतांनी निवडून येतील, असा आशावादही अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलाय.  

इतर महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : न्यायदेवतेच्या हातातील तलवार अन् डोळ्यावरील पट्टी काढली; संजय राऊत भडकले; म्हणाले, आता उघड्या डोळ्यांनी भ्रष्टाचार पाहा!

मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचा नेता उत्तररात्री पावणेदोनला अंतरवाली सराटीत, गुप्त खलबतं, भाजपकडून मनधरणीच्या हालचाली?

अधिक पाहा..



Source link

मंत्री असणाऱ्यांनी काय दिवे लावलेत? भाजपच्या आमदाराचे आपल्याच मंत्र्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह

मंत्री असणाऱ्यांनी काय दिवे लावलेत? भाजपच्या आमदाराचे आपल्याच मंत्र्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह


अकोला : अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे ओळखले जातात त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी. 1990 पासून सतत सात टर्म आमदार असलेल्या प्रकाश भारसाकळेंना अद्यापही मंत्रीपदाची लॉटरी लागली नाही.‌ याच मंत्रिपदावरून त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांना घरचा आहेर दिला. जे लोक मंत्री होते त्यांनी काय दिवे लावलेत असा सवाल त्यांनी विचारला. आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या या वक्तव्याची आता चर्चा सुरू आहे. 

आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या प्रचारासाठी अकोटमध्ये आलेल्या नितीन गडकरींनी 2014 मध्ये त्यांना मंत्री करणार असल्याचं आश्वासन जाहीर सभेतून दिलं होतं. मात्र त्यानंतर दोनदा अकोटमधून निवडून आल्यानंतरही भारसाकळेंना मंत्रिपदाने हुलकावणी दिलीय. यावर बोलताना त्यांनी मंत्री असणाऱ्यांनी काय दिवे लावलेत?, असं म्हणत गडकरी यांच्यासह आपल्याच मंत्र्यांच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. मात्र आपण काय बोलून बसलो हे कळल्यानंतर आमदार भारसाकळे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. 

काय म्हणाले आमदार प्रकाश भारसाकळे? 

आमदार प्रकाश भारसाकळे म्हणाले की, मी हौशी माणूस नाही. ते मंत्री होते, त्यांनी काय दिवे लावलेत हे तुम्हाला माहित आहे. गडकरी हा फार मोठ्या मनाचा माणूस. त्यांनी म्हटलं होतं की मला मंत्री करणार. परंतु मी मंत्री झालो नाही.  मी पक्षाकडे कधीच काही मागत नसतो. मी मंत्री नसलो तरी आमदार तर आहे ना?  मी आता निवडून आलो की मंत्री‌ होईन. मला जे मिळते त्यात मी खूश असतो.

कोण आहेत प्रकाश भारसाकळे? (Who Is Prakash Bharsakale) 

– 1990 पासून तब्बल सात वेळा दोन वेगवेगळ्या मतदारसंघातून आमदार म्हणून विधानसभेवर प्रतिनिधित्व. 
– 1990, 1995, 1999, 2004 आणि 2005 मधील पोटनिवडणुकीत अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार. 
– 2005 मध्ये नारायण राणे यांच्यासोबत शिवसेना सोडत काँग्रेसमध्ये प्रवेश. 
– 2009 मध्ये दर्यापूर मतदारसंघ राखीव झाल्यानंतर अकोला जिल्ह्यातील अकोटकडे मोर्चा वळवला. 
– 2009 मध्ये अकोटमधून काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर अपक्ष म्हणून 35,000 मतं घेतली. 
– 2014 मध्ये भाजपात प्रवेश. भाजपच्या उमेदवारीवर अकोट मतदारसंघातून विजयी. 
– 2019 मध्ये अकोटमधून दुसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर विजयी.

ही बातमी वाचा: 

 

अधिक पाहा..



Source link

अकोल्यात भाजपचा आमदार, मिटकरी आणि बाजोरियांनीही ठोकला दावा; तिढा सुटणार?

अकोल्यात भाजपचा आमदार, मिटकरी आणि बाजोरियांनीही ठोकला दावा; तिढा सुटणार?


Akola Vidhan Sabha Election : अकोला : विधानसभेची निवडणूक (Vidhan Sabha Election 2024) जाहीर झाल्यानं राज्यातील राजकीय रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. मात्र, जागा वाटप झाल्याचा दावा करणाऱ्या महायुतीत अनेक मतदारसंघावरून घमासान होण्याची चिन्ह आहेत. भाजपच्या (BJP) ताब्यात असलेल्या अकोला (Akola District) जिल्ह्यातील अकोट मतदारसंघावरून माहितीतल्या तिन्ही पक्षात कलगीतुरा रंगला. या मतदारसंघातून लढण्याची इच्छा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी व्यक्त केली आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) यांनीही अकोटमधून (Akot) उमेदवारीसाठी शड्डू ठोकलाय. मिटकरी आणि बाजोरियांनी या मतदारसंघात भाजपच्या आमदाराविषयी नाराजी असल्याचा दावा केला आहे.                      

अकोट… अकोला जिल्ह्यातील गेल्या दहा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेला विधानसभा मतदारसंघ. भाजपचे प्रकाश भारसाकळे 2014 पासून सलग दोनदा येथून विजयी झाले आहेत. मात्र, भाजपच्या ताब्यातील याच मतदारसंघावर महायुतीत भाजपचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीचा डोळा आहे. महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे फायरब्रँड आमदार अमोल मिटकरींनी येथून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मिटकरी अकोट तालुक्यातील कुटासा गावचे रहिवाशी आहेत.      

अकोट मतदार संघावर शिंदे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनीही दावा केला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी अकोट मतदार संघात कामालाही सुरुवात केली आहे. गोपीकिशन बाजोरिया शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते असून ते सलग तीन टर्म विधान परिषदेचे आमदार होते. 2021 मध्ये अकोला स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत त्यांचा भाजपच्या वसंत खंडेलवाल यांनी पराभव केला होता. तेव्हापासून बाजोरिया नवीन संधीच्या शोधात आहेय. सलग तीन वेळा मागच्या दाराने विधिमंडळात गेलेल्या बाजोरिया यांना यावेळी जनतेतून विधानसभेत जाण्याची इच्छा आहे.             

महायुतीतील दोन्ही मित्रपक्ष भाजपच्या या मतदारसंघावर दावा करीत असले तरी आमदार प्रकाश भारसाकळे मात्र निर्धास्त आहेत. त्यांनी मिटकरी आणि बाजोरियांच्या दावेदारीकडे फारसं गांभिर्याने घेतलेलं नाही. पक्ष तिसऱ्यांदाही आपल्यालाच उमेदवारी देणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

दरम्यान, अकोटच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा मोठे नेते चर्चेतून सोडवतीलही. मात्र, तिन्ही पक्षातील नेत्यांच्या दुभंगलेल्या मनाचं कार्यकर्त्यांत उमटणारं प्रतिबिंब पुढच्या काळात कोणतं रूप घेतंय? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

अधिक पाहा..



Source link

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणाऱ्या फेसबुक पोस्टची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणाऱ्या फेसबुक पोस्टची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी


Baba Siddiqui Murder Case : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची (Baba Siddiqui Murder Case) जबाबदारी स्वीकारणाऱ्या फेसबुक पोस्टची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी सुरु झाली आहे. फेकबुक पोस्ट करणारा शुभू लोणकर हा मूळ शुभम रामेश्वर लोणकर (Shubham Lonkar) आहे का? याचा तपास केला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभू लोणकर ज्यांचे फेसबुक हँडल आहे, त्याचे खरे नाव शुभम लोणकर असू शकते, असा संशय मुंबई पोलिसांना आहे.

शुभम लोणकरच्या घराला कुलूप, पुण्यात असल्याचा संशय

शुभम लोणकर हा मूळ अकोला (Akola) जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील नेव्होरी बुजरुक गावाचा रहिवासी आहे. दरम्यान, आता अकोला पोलिसांनी देखील लोणकर कनेक्शनचा तपास सुरू केला आहे.  अकोला पोलीस दलातील आयपीएस अनमोल मित्तल यांचे पथक अकोट तालुक्यातील नेव्होरी बुजरुक गावात शुभम लोणकर यांच्या घरी पोहोचलं होतं. मात्र, शुभम लोणकर याच्या घराला कुलूप लावलेल दिसून आलं आहे. त्याच्या घरी कोणीही नसल्याचं पोलिसांना दिसून आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभम हा जूनच्या पहिल्या आठवड्यापासून गावात नाही. तो पुण्यात असल्याचा संशय आहे. 

शुभम लोणकर हा लॉरेन्स बिश्नोई गँगचा जवळचा असल्याची चर्चा 

विशेष म्हणजे या आधीही शुभम लोणकरवर अकोला पोलिसांनी कारवाई करत तब्बल तीन पिस्टल आणि 11 जिवंत काडतूस त्याच्याकडून जप्त केल्या होत्या. शुभम लोणकर हा लॉरेन्स बिश्नोई गँगचा जवळचा असल्याच म्हटलं जातंय. 4 फेब्रुवारी 2024 रोजी अकोला पोलिसांनी शुभमला पुण्यातील वारजे भागातल्या भालेकर वस्तीतून अटक केली होतेय. बेकायदा शस्त्रविक्रीप्रकरणी अकोला पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती, अशी माहिती अकोल्याचे सहायक पोलीस अधिक्षक अनमोल मित्तल यांनी दिली. 

आतापर्यंत दोन जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात 

लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. याप्रकरणी आतापर्यंत दोन जणांना  पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर तिसऱ्या आरोपीची ओळख  पटल्याची माहिती समोर आली आहे.  काल रात्री ही घटना घडली असून झिशान सिद्दिकींच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केला. या गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली आहे. दाऊदचे निकटवर्तीय असल्याने हत्या केल्याचा उल्लेख कथीत  पोस्टमध्ये केला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Baba Siddiqui Murder case : बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणातील मोठी अपडेट समोर, चौथ्या आरोपीची ओळख पटली

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp