बाबा सिद्दिकींच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणाऱ्या फेसबुक पोस्टची चौकशी; गँगचे अकोला कनेक्शन?

बाबा सिद्दिकींच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणाऱ्या फेसबुक पोस्टची चौकशी; गँगचे अकोला कनेक्शन?


Baba Siddiqui Murder Case अकोला : अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui ) यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणाऱ्या फेसबुक पोस्टची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी केल्या जातं असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, शुबू लोणकर हा लॉरेन्स बिश्नोईच्या जवळचा असल्याच म्हटल्या जातंय. शुबू हा शुभम रामेश्वर लोणकर आहे का? याचा तपास केल्या जातं आहेय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुबू लोणकर ज्यांचे हे फेसबुक हँडल आहे, त्याचे खरे नाव शुभम लोणकर असू शकते. असा अंदाज वर्तवला जात आहे.

सद्यस्थितीला देखील पोलीस तपास करतायेत. शुभम लोणकर हा मूळ अकोला (Akola) जिल्ह्यातील अकोट येथील रहिवासी असल्याच समजते. या आधीही शुभम लोणकरला अकोला पोलिसांनी कारवाई करत तब्बल तीन पिस्टल त्याच्याकडून जप्त केल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणात संशयाची सुई आता शुबू लोणकर यांच्याकडे वळवण्यात आली आहे.   

शुबू लोणकर हा शुभम लोणकर असू शकतो?

शुभम लोणकर संदर्भात अकोला पोलिसांना विचारले असता, आपण त्याच्यावर फेब्रुवारी महिन्यात कारवाई केल्याचं पोलिसांनी म्हटलं होत. मात्र, आज फेसबुक पोस्ट करणारा शुबू लोणकर आणि शुभम लोणकर हा एकच आहे का? हे अद्याप कळू शकले नाहीये. त्यामुळं आपण याबद्दल जास्त सांगू शकणार नाही, अशी माहिती अकोला पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी दिली.

शुबू लोणकर नेमकं काय म्हटलं फेसबुक पोस्टमध्ये

ओ३म् जय श्री राम जय भारत जीवन का मूल समजता हु, जिस्म और धन को में धूल समजता हु || किया वही सत्कर्म था जो, निभाया मित्रता का धर्म था जो || सलमान खान हम ये जंग चाहते नहीं थे पर तुमने हमरे भाई का नुकसान करवाया… आज जो बाबा सिद्दीके के शराफत के पुल्ल बंद रहे है या एक टाइम में दाऊद के साथ मकोका एक्ट में था…. इस के मरने का कारन अनुज थापन और दाऊद को बॉलीवुड, राजनीती, प्रॉपर्टी डीलिंग से जोड़ना था…. हमारी किसी से कोई दुश्मनी नहीं है पर जो भी सलमान खान और दाऊद गैंग की हेल्प करेगा अपना हिसाब किताब लगा के रखना…. हमारे किसी भी भाई को कोई भी मरवाए गा तो हम प्रतिक्रिया जरूर देगे हम ने पहले वार कभी नहीं किया…. जय श्री राम जय भारत सलाम शहीदां नू.. अशा प्रकारचे फेसबुक पोस्ट ‘शुबू लोणकर’ यांनी शेअर केली आहेय.

तेव्हा शुभम लोणकरवर अकोला पोलिसांकडून अशी झाली कारवाई

गैंगस्टर लॉरेंस बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असणाऱ्या शुभम लोणकरला बंदुकीच्या तस्करी प्रकरणात अकोला पोलिसांनी गजाआड केलं होतं. अंदाजे फेब्रुवारी महिन्यात सुरुवातीलाच ही कारवाई झाली होती. शुभम हा बंदूक तस्करीचा मुख्य सूत्रधार असल्याचं समजलं होतं. त्याने अनेकांना बंदुका सप्लाय केल्या आहेत. अकोट पोलिसांनी त्याच्याकडून बंदूक खरेदी करणाऱ्या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. तपासा दरम्यान शुभम लोणकर हा या टोळीचा प्रमुख असल्यास समोर आले. शुभम हा मूळ अकोला जिल्ह्यातील अकोटचा रहीवासी आहे. ‘तो’ गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील वार्जे शहरात रहायचा, अकोट शहर पोलिसांनी शुभलला पुण्यातून ताब्यात घेतलं होतं. सद्यस्थितीत तो आता जामिनावर सुटका झाली होती. दरम्यान, तो सध्या बाहेर असल्याचे समजते आहे.

तेव्हा 6 जणांसह 3 बंदूक, 14 जिवंत काडतूस जप्त केल्या

या संपूर्ण तपासात अकोला पोलिसांनी 3 बंदूक 14 जिवंत काडतूस आणि काही मॅक्झिन्स जप्त केल्या आहे. ही कारवाई कार्यवाही IPS अनमोल मित्तलसह स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शंकर शेळके केली होती. तेव्हा शुभम लोणकर यांच्यासह अंकुश गायबोले (वय 30), रोहित कोकाटे (वय 25) आणि अक्षय अरबाड (वय 26) यांना देखील अटक झाली होती.

शुभम लोणकर अन् गैंगस्टर बिश्नोईच्या संपर्कातील कॉल रेकॉर्डिंग् केल्या होत्या जप्त

शुभम लोणकर हा गैंगस्टर लॉरेंस बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या चांगला संपर्कात होताय, त्यां दोघांच्या संपर्काचे अनेक विडिओ कॉल रेकोर्डिंग फोन रेकॉर्ड पोलिसांच्या हाती लागले. दुबई, इंटरनॅशनलमधील गुन्हेगारासोबत शुभमचा चांगला संर्पक होताय. फोन कॉल’मध्ये हे सर्व समजलं होतं. विशेष म्हणजे गैंगस्टर लॉरेंस बिश्नोई हा सध्या तुरुंगात असून 700 जणांच्या टोळीचा तो प्रमुख म्हणून अशी त्याची ओळख आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

बाबा सिद्दिकींना ज्यांनी मारलं त्यांनी जबाबदारी घेतली, मात्र…; नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेड

बाबा सिद्दिकींना ज्यांनी मारलं त्यांनी जबाबदारी घेतली, मात्र…; नेमकं काय म्हणाले प्रकाश आंबेड


अकोला : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी  (Baba Siddique Shot Dead) यांची काल रात्री तीन जणांनी गोळ्या घालून हत्या केली. झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ही अत्यंत दुःखद घटना आहे. निवडणुकीच्या तोंडावर आणि विजयादशमीच्या दिवशी बाबा सिद्दिकी यांची हत्या झाली. या घटनेची आम्ही निंदा करतो. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे. ज्यांनी मारले त्यांनी जबाबदारी घेतली आहे. कशासाठी मारलं? का मारलं? नेमकी दुश्मनी काय होती? पोलिसांनी याचा तपास केला पाहिजे.

प्रकाश आंबेडकरांची मागणी

मारेकऱ्यांनी कोणाची सुपारी घेतली. पोलिसांनी हे देखील शोधलं पाहिजे, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. राज्यातल्या संपत्तीवरून अथवा राज्यबाहेरील वाद होता का? असा सवाल देखील आंबेडकर यांनी उपस्थित केलाय. मारणारी गँग ही बाहेरील राज्यातील आहे. त्यांना प्रोत्साहन देणारा कोण? आणि सुपारी देणारा राजकीय व्यक्ती किंवा बिल्डर आहे का? हे तपासलं गेलं पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. 

मुख्यमंत्री जबाबदारी स्वीकारावी : बाळासाहेब थोरात

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. त्यांनी म्हटलंय की, बाबा सिद्दिकींच्या हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. महत्त्वाच्या व्यक्तीची भर रस्त्यात हत्या झाली. राज्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत. सरकार सत्तेत कसे यायचे याच्यातच गुंग झालंय. राज्यात कोणतेही नियंत्रण राहिलेले नाही. गृहमंत्र्यांपेक्षा मुख्यमंत्री महत्त्वाचे आहेत. मुख्यमंत्र्यांचे नियंत्रण सर्व गोष्टींवर असले पाहिजे. त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. एकाच महिन्यात अत्याचाराच्या तीन-चार घटना घडल्या. राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्या होताय. मात्र, सरकार सत्तेच्या उद्योगात व्यस्त आहे. महाराष्ट्र अत्यंत वाईट परिस्थितीतून जातोय. राज्य शासनाचे नियंत्रण हरवले आहे. जीवे मारण्याच्या धमक्या आणि हत्या या काळजीच्या गोष्टी आहेत, असे म्हणत बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: बाबा सिद्दीकी प्रकरणानंतर शरद पवारांची राजीनाम्याची मागणी; फडणवीस म्हणाले, ‘त्यांना फक्त सत्ता…’

मोठी बातमी! बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीची ओळख पटली, पुण्याचा ‘शिवा’ नेमकं काय करतो?

अधिक पाहा..



Source link

दसऱ्याला रावण दहनाची प्रथा बंद करा, अमोल मिटकरींची मागणी; रावणाच्या मंदिरासाठी 20 लाख निधी

दसऱ्याला रावण दहनाची प्रथा बंद करा, अमोल मिटकरींची मागणी; रावणाच्या मंदिरासाठी 20 लाख निधी


अकोला: देशभरात मोठ्या उत्साहात विजयादशमी दसरा (Dasara) साजरा होत असून सकाळपासूनच सर्वजण एकमेकांना विजयादशमीच्या शुभेच्छा देत आहेत. देशातील अनेक भागात विशेषत:उत्तर प्रदेशात आज रावणाचे दहन करण्याची प्रथा आहे. राजधानी दिल्लीतही सेलिब्रिटी व बड्या नेत्यांच्या उपस्थितीत रावण दहन केले जाते.  मात्र, देशात आणि राज्यात रावणदहनाच्या प्रथेवर बंदी आणण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केली आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी आज अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावात रावणाची महाआरती केली. यावेळी आदिवासी समाज आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे, गेल्यावर्षी दसऱ्या दिनी आमदार अमोल मिटकरींनी सांगोळा गावातील रावण मंदिराचा जिर्णोद्धार करण्याची भूमिका मांडल्यानंतर देशभरात मोठा गदारोळ निर्माण झाला होता. आता, त्यांनी देशात रावण दहन ही प्रथाच बंद करण्याची मागणी केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

आमदार अमोल मिटकरींच्या हस्ते रावणाची मनोभावे पूजा आणि आरती पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. हे दृष्य रावणाची पुजा करणाऱ्या कोणत्या दाक्षिणात्य राज्यातलं नाही. हे दृष्य आहेय आपल्या महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यातलं. अकोल्यापासून 50 किलोमीटरवर असलेलं पातूर तालूक्यातील सांगोळा हे गाव आहे. या गावाच्या अगदी सुरुवातीलाच एका मंदिरवजा चौथऱ्यावर रावणाची एक अतिशय सुंदर, रेखीव मूर्ती आहे. सुमारे अडीचशे वर्षांची परंपरा या मूर्तीला असून मोठा इतिहास गावाला आहे. 

मिटकरींनी 20 लाखांचा निधीही दिली

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी आज सांगोळ्यात जात रावणाची महाआरती केली. गेल्यावर्षी त्यांनी आपल्या आमदारनिधीतून 20 लाखांचा निधी मंदिराच्या सभागृह आणि जीर्णोद्धारासाठी दिला होता. त्यानंतर राज्य आणि देशभरात मोठा गदारोळ उडाला होता. आज परत मिटकरींनी सांगोळ्यात येत रावनदहनाच्या परंपरेवर देशभरात बंदीची मागणी केली आहे. आमदार मिटकरींच्या मागणीनंतर या विषयावरून पून्हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहेत. सध्या राज्यात आदिवासी संघटनांचा रावणदहनाला विरोध आहे. आता, चक्क विधापरिषद सदस्य असलेल्या आमदार अमोल मिटकरींनी अशी मागणी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.  

रावणाबद्दल काय म्हणाले मिटकरी

रावणाला जाळणारे रामासारखे पवित्र आहेत का?. 
रावण हा ज्ञानी आणि सत्पुरूष. त्याचातील चांगुलपणावर समाजाचं दुर्लक्ष. 
रावणाने सीतेचं एका बापाच्या भूमिकेतून अपहरण करीत तिला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला होता. 
मागच्या वर्षी मी रावणमंदिराच्या जिर्णोद्धाराचा निर्णय घेतल्यानंतर मला राजकीय अडचण झाली. मला तो निर्णय मागे घ्यावा लागला. 
आता सामजिक संघटनांच्या मदतीने मंदिराचा जिर्णोद्धाराचे प्रयत्न करू.

हेही वाचा

राज ठाकरेंना 10 वीच्या बोर्ड परीक्षेत किती मार्क?; मनसे अध्यक्षांनीच सांगितली टक्केवारी, साधेसुधे नव्हते..

अधिक पाहा..



Source link

काँग्रेसचे 4 आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार, अमोल मिटकरींचं वक्तव्य, एकाचं नावही सांगितलं

काँग्रेसचे 4 आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार, अमोल मिटकरींचं वक्तव्य, एकाचं नावही सांगितलं


Amol Mitkari : पुढच्या चार ते पाच दिवसात काँग्रेसचे (Congress) चार आमदार अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी दिली आहे. रविवारी अमरावतीच्या काँग्रेस आमदार सुलभा खोडके अमरावतीत एका मेळाव्यात अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे मिटकरी म्हणाले. आज राष्ट्रवादीतील इनकमिंगची सुरूवात सिने अभिनेते सयाजी शिंदेपासून सुरू झाल्याचं मिटकरी म्हणाले. 

अमोल मिटकरी उद्या अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार

दरम्यान, आमदार अमोल मिटकरी उद्या अकोल्यात प्रकाश आंबेडकरांची भेट घेणार आहेत. अकोल्यातील ‘यशवंत भवन’ या आंबेडकरांच्या निवासस्थानी आमदार मिटकरी आंबेडकरांची भेट घेणार आहेत. अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी आगामी विधानसभा निवडणुकीत एकत्र यावं, अशी साद आमदार अमोल मिटकरींनी दिली आहे. आंबेडकरांच्या काही अटीशर्ती असतील तर आपण मध्यस्थी म्हणून काम करू असेही ते म्हणालेत. या संदर्भातच आज रात्री अजितदादांसोबत आपण स्वतः बोलणार असल्याचंही मिटकरी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंच्या तोंडाला पट्टा लावावा 

नितेश राणे या व्यक्तीबद्दल बोलावं वाटत नाही. प्रत्येक तरुण सुशिक्षित झालाय, अशा बावळट लोकांच्या नादाला लागणार नाही असे अमोल मिटकरी म्हणाले.  नितेश राणेंचे वक्तव्य कोणीही लोकशाहीमध्ये खपवून घेणार नाही. त्यांना आवरलं नाही तर त्यांच्याच पक्षांना नुकसान भोगावे लागेल. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या तोंडाला पट्टा लावावा असेही मिटकरी म्हणाले. अशा प्रकारचे वक्तव्य करून जातीय दंगल भडकवण्याचं पाप नितेश राणेंनी करू नये, असा सल्ला मिटकरींनी दिला. 

पक्ष प्रवेश करणाऱ्या सर्वांची नावं माहिती आहेत, पण सध्या घेणार नाही

अभिनेते सयाजी शिंदे यांच्या पक्षप्रवेशापासून सुरुवात झाली आहे.. लवकरच अमरावती काँग्रेस आमदार सुलभाताई खोडके यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यापुढेही काँग्रेसचे तीन आमदार लवकरच पक्ष प्रवेश करणार आहेत. सर्वांची नावं माहिती आहेत, पण सध्या घेणार नाही असे मिटकरी म्हणाले. 
तुतारी गटात बंपर पक्षप्रवेश सुरू आहे याबाबत बोलताना मिटकरी म्हणाले की, त्यातले लोक कंटाळलेत. ते सुद्धा पुढं अजितदादांचं नेतृत्व करताना दिसले तर नवल वाटून घेऊ नका असे मिटकरी म्हणाले. अजितदादांवर विश्वास ठेवून अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची माहिती अमोल मिटकरी यांनी दिली आहे. 

महत्वाच्या बातम्या:

अमोल मिटकरींना शरद पवार गटाकडून ऑफर, पक्षाचं स्टार प्रचारक, आमदार ते राज्यमंत्रीपद, बड्या नेत्याचा फोन 

 

अधिक पाहा..



Source link

अमोल मिटकरींना शरद पवार गटाकडून ऑफर, पक्षाचं स्टार प्रचारक, आमदार ते राज्यमंत्रीपद

अमोल मिटकरींना शरद पवार गटाकडून ऑफर, पक्षाचं स्टार प्रचारक, आमदार ते राज्यमंत्रीपद


Amol Mitkari : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून प्रवेशाची ऑफर आली आहे. शरद पवार गटाच्या राज्यातील बड्या नेत्यांनं मिटकरींना पक्षप्रवेशाची ऑफ दिली आहे. या बड्या नेत्याचा फोन आल्याच्या बातमीला आमदार मिटकरींनी देखील दुजोरा दिला आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाचं स्टार प्रचारक पद, सत्ता आल्यानंतर राज्यमंत्रीपद आणि परत विधान परिषदेचे आमदारकी अशी ऑफर दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

आमदार अमोल मिटकरींनी शरद पवार गटाची ऑफर विनम्रपणे नाकारली आहे. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत अजितदादांशी गद्दारी करणार नसल्याचं आमदार मिटकरींनी शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला सांगितले आहे. आपल्या सात पिढ्या अजित पवारांच्या ऋणातून उतराई होणार नसल्याचे अमोल मिटकरी म्हणाले. शरद पवार गटाकडून अजित पवार गटातल्या बड्या नेत्यांना पक्षप्रवेशाच्या ऑफर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.  

नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी?

शरद पवार गटाकडून आलेल्या ऑफरबाबत प्रसारमाध्यमांनी अमोल मिटकरींना माहिती विचारली. यावेळी मिटकरी म्हणाले की, याबाबत तथ्य आहे. पण काही जणांशी सौजन्याचे नाते असल्यामुळं काही गोष्टी बोलता येत नाही. याबाबत मी सगळे आमच्या नेत्यांनी कळवल्याचे अमोल मिटकरी म्हणाले.  अजित पवार यांनी माझ्यासारख्या छोट्या समुहातील, सामान्य कुटुंबातील व्यक्तिला मोठं पद दिलं आहे. त्यामुळं त्या नेत्याच्या विचाराशी मी कधीही प्रतारणा करणार नाही. अजितदादा यांच्यासमोर सर्व ऑफर शून्य आहेत. अजितदादांकडे बघूनच आम्ही पक्षात आलो आहोत. आमच्या पुढच्या सात पिढ्या देखील अजितदादांच्या उपकारातून मुक्त होऊ शकत नसल्याचे मिटकरी म्हणाले.

मरेपर्यंत अजित पवार यांना सोडणार नाही

शरद पवार गटातील संबंधित मोठ्या नेत्याला मी सांगितलं होतं की मला माझ्या पक्षापेक्षा दुसरा कोणताही पक्ष मोठा नाही. तसेच माझ्या नेत्यापेक्षा दुसरा कोणताच नेता मला मोठा नाही असे अमोल मिटकरी म्हणाले. त्या नेत्याचं नाव आहे अजितदादा. मरेपर्यंत अजित पवार यांना सोडणार नसल्याचे मिटकरी म्हणाले. 
तुम्ही एका चळवळीतून आला आहात. आज तुम्ही शांत आहेत. कोणत्याही ठिकाणी भाषण करत नाहीत. त्यामुळं तुम्ही आमच्या पक्षात या. आमचे स्टेज तुमच्यासाठी खुलं आहे. आमच्या पक्षात तुम्हाला खुली बॅटिंग करण्याची संधी असल्याचे शरद पवार गटाच्या नेत्याने सांगितल्याचे मिटकरी म्हणाले. त्यांना मी सांगितले की, आमच्या पक्षात मला काही अडचण नाही. मी खुल्या मनाने पक्षात माझी भूमिका मांडल्याचे अमोल मिटकरी म्हणाले. मला मंत्रीपद, आमदारकी याचा मोह नसल्याचे मिटकरी म्हणाले. सत्तेचा ताम्रपट घेून कोणीही जन्माला आला नसल्याचे मिटकरी म्हणाले. एकवेळी जीव देऊ पण अजित पवार यांच्याशी गद्दारी करणार नसल्याचे मिटकरी म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..



Source link

दीक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नका; प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र

दीक्षाभूमीकडे येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नका; प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र


मुंबई : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दिक्षाभूमी नागपूर, बुद्ध लेणी औरंगाबाद, अकोला आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणी तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी प्रवास करणाऱ्या अनुयायांकडून टोल घेतला जाऊ नये, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash ambedkar) यांनी सरकारला केले आहे. तसेच याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र पाठवून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने टोल न घेण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वी गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी टोलमुक्तीचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तर, पंढरीच्या वारीला येणाऱ्या भाविकांकडूनही टोल न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर घेतला होता. त्यामुळे, आता धम्मचक्र परिवर्तन दिनासाठी नागपूरला येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नये, अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे. 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विजयादशमी दिनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली हा दिवस जगभरातील अनुयायांसाठी सन्मानाचा, मुक्तीचा दिवस असल्याचे ॲड. आंबेडकरांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, दरवर्षीप्रमाणे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त 12 ते 13 ऑक्टोबर 2024 दरम्यान दिक्षाभूमी नागपूर, बौद्ध लेणी औरंगाबाद, अकोला आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी लाखो बौद्ध अनुयायी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यासाठी प्रवास करत असतात. महाराष्ट्र आणि देशभरातील ग्रामीण भागातून लोक येथे तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी प्रवास करत असतात. आम्ही वंचित बहुजन आघाडीकडून मागणी करतो की, आपण धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रवास करणाऱ्या बौध्द अनुयायांकडून आकारण्यात येणारा टोल माफ करावा, असे या पत्रात म्हटले आहे.

वंचितकडून 21 उमेदवारांची घोषणा

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी तयारी सुरू केली असून आत्तापर्यंत 21 मतदारसंघात उमेदवारांची घोषणा केली आहे. यापूर्वी, प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीसोबत येतील अशी चर्चा होती. मात्र, लोकसभा निवडणुकीत त्यांनी स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले. त्यानंतर, आता विधानसभा निवडणुकांसाठीही 21 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामध्ये, 11 उमेदवार मुस्लिम असून वंचितच्या दुसऱ्या यादीतील सर्वच्या सर्व 10 विधानसभा उमेदवार मुस्लिम आहेत. 

अधिक पाहा..





Source link

YouTube
Instagram
WhatsApp