मोठी बातमी : वंचितचे दहा उमेदवार जाहीर, सर्वच्या सर्व मुस्लिम, प्रकाश आंबेडकरांची रणनीती काय?

मोठी बातमी : वंचितचे दहा उमेदवार जाहीर, सर्वच्या सर्व मुस्लिम, प्रकाश आंबेडकरांची रणनीती काय?

Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडीच्या गोटातून एक महत्वाची बातमी पुढे आली आहे. वंचितच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी आज आगामी विधानसभा निवडणुकीच्या (VidhanSabha Election 2024) अनुषंगाने 10 मुस्लिम उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. पहिल्या यादीत आम्ही नांदेड दक्षिणमधून मुस्लिम उमेदवार दिला आहे. आज परत दुसऱ्या यादीत आम्ही 10 मुस्लिम उमेदवारांची यादी जाहीर करतोय. सोबतच राज्याच्या राजकारणात आम्हाला मुस्लिमांना प्रतिनिधित्व द्यायचे असल्याची माहिती रेखा ठाकूर यांनी दिली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची आगामी विधानसभेसाठी नेमकी रणनीती काय? असा प्रश्न आता साऱ्यांना पडू लागला आहे. 

काँग्रेसचे माजी आमदार नातिकोद्दीन खतीब यांचा वंचितमध्ये प्रवेश

दरम्यान,अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार नातिकोद्दीन खतीब यांनी आज वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे. खतीब हे प्रदेश काँग्रेसचे विधान परिषदेचे माजी आमदार आणि पक्षाचे माजी उपाध्यक्ष राहिले आहे. गेल्या साठ वर्षांपासून बाळापुर नगरपालिकेवर खतीब घराण्याची सत्ता राहिली आहे. तर 2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीत अनुक्रमे खतीब आणि त्यांच्या पत्नीचा अतिशय अत्यल्प मतांनी पराभव झाला होता. बाळापुर मतदारसंघ हा महाविकास आघाडीत नितीन देशमुख यांच्या वाट्याला जाणार असल्याची शक्यता आहे. अशातच त्या अनुषंगाने खतिबांनी वंचित बहुजन आघाडीची वाट धरली असल्याचेही बोलले जात आहे. खतीब यांच्या वंचित मधील प्रवेशाने बाळापुर मधील समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. तर खतीब यांच्या काँग्रेस सोडण्याने अकोल्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. 

वंचितच्या 10 मुस्लिम उमेदवारांची यादी 

मलकापूर – शहजाद खान सलीम खान 
बाळापूर – खतीब सैयद नतीकुद्दीन 
परभणी – सैयद साहेबजान 
औरंगाबाद सेंन्ट्रल – जावेद कुरेशी 
गंगापूर – सैय्यद गुलाम नबी सय्यद 
कल्याण पश्चिम – अयाज मौलवी 
हडपसर – अॅड. मोहम्मद मुल्ला 
माण – इम्तियाज नदाफ 
शिरोळ – आरीफ पटेल 
सांगली  – अल्लोद्दीन काझी

काँग्रेससह परभणीत महाविकास आघाडीला हादरा?

दरम्यान, काँग्रेसचे माजी उप महापौर आणि विद्यमान महापालिकेचे सभागृह नेते सय्यद समी सय्यद साहेबजान (माजु लाला) यांची वंचित कडून परभणी विधनसाबेसाठी उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या दहा मुस्लिम उमेदवारांच्या यादीत सय्यद समी यांच्या नावाचा समावेश आहे. सय्यद समी परभणी काँग्रेसचे दिग्गज नेते मानले जातात. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सय्यद सामी यांचे भाऊ सय्यद खालेद यांनी विधानसभा निवडणूक लढवत 45 हजार मतदान घेत दुसरा क्रमांक गाठला होता. त्यामुळे काँग्रेससह परभणीत महाविकास आघाडीला मोठा हादरा बसल्याचे मानले जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..

Source link

शिवसेनेने राजकुमार पटेल यांना उमेदवारी दिली तर…., रवी राणा यांचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा

शिवसेनेने राजकुमार पटेल यांना उमेदवारी दिली तर…., रवी राणा यांचा थेट मुख्यमंत्र्यांना इशारा

Maharashtra Politics अमरावती : अमरावती जिल्ह्यात पुन्हा आमदार रवी राणा(Ravi Rana) आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu)यांच्यात वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण प्रहारचे आमदार राजकुमार पटेल (Rajkumar Patel) यांना शिवसेना शिंदे (CM Eknath Shinde) गटात बच्चू कडू यांनीच पाठवलंय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात साठ गाठ आहे. बच्चू कडू यांचीच ही खेळी आहे. असा खळबळजनक गौप्यस्फोट आमदार रवी राणा यांनी केलाय. तर मेळघाटमध्ये शिंदे सेनेने राजकुमार पटेल यांना उमेदवारी दिली तर त्यांच्या विरोधात युवा स्वाभिमान पार्टीचा उमेदवार उभं करू आणि त्याला निवडून आणू, असा इशाराही आमदार रवी राणा यांनी दिलाय. त्यामुळे रवी राणा हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे.

मेळघाटमध्ये एकतर कमळ पाहीजे, नाहीतर युवा स्वाभिमान पक्ष

महायुतीचं पालन बच्चू कडू यांनी केलं नाही. त्यामुळे संपूर्ण मेळघाटची मागणी आहे की, मेळघाटमध्ये एकतर कमळ पाहीजे, नाहीतर युवा स्वाभिमान पक्ष पाहिजे. दर्यापूर मतदारसंघात देखील अजून कोणाला जाईल हे निश्चित झालं नाही. जेव्हा होईल तेव्हा आम्ही निर्णय घेऊ. युवा स्वाभिमान पार्टीने मेळघाट आणि दर्यापूरची जागा मागितली आहे. तर अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात भूमिका घेतली असली तरी महायुतीने अजून उमेदवारी जाहीर केलेली नाही. त्यामुळे या मतदारसंघावर एकप्रकारे दावा करत आमदार रवी राणांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आम्हाला बाहेरचे पार्सल अजिबात चालणार नाही- नवनीत राणा 

दर्यापूर मतदारसंघात आम्हाला बाहेरचे पार्सल अजिबात चालणार नाही. या मतदारसंघात केवळ कमळचाच उमेदवार निवडून येईल आणि तो अमरावती जिल्ह्याचाच राहील, असा टोला नवनीत राणा यांनी अभिजित अडसूळ यांना लगावला. सोमवारी शिवसेना शिंदे गटाचा मेळावा दर्यापूर मध्ये पार पडला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. दरम्यान अभिजित अडसूळ यांनी दर्यापूरसाठी दावा केला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाष्य करताना नवनीत राणा यांनी अभिजित अडसूळ यांचे नाव न घेता हा टोला लगावला आहे. लोकसभेत नवनीत राणा यांचा प्रचार अडसूळ पिता-पुत्रांनी केला नाही, असा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे आता विधानसभेत दर्यापूर मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत चांगलंच रान उठणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..

Source link

Akola Rada News Update : अकोल्यात दोन गटातील वादानंतर राडा, अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ

Akola Rada News Update : अकोल्यात दोन गटातील वादानंतर राडा, अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ

अकोला : एकीकडे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं असून नेतेमंडळी व कार्यकर्ते  आमने-सामने येत आहेत. त्यातच, अकोल्यात मे 2023 मध्ये दंगल झालेल्या हरिहरपेठ भागात पुन्हा दोन गटात तणाव निर्माण झाला आहे. या तणावावरुन अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक झाल्याची प्राथमिक माहिती असून मोठा जमाव रस्त्यावर उतरल्याचंही दिसून आलं. या घटनेनंतर तात्काळ घटनास्थळावर मोठा पोलीस फौजफाटा दाखल झाला आहे. पोलिसांकडून जमावाला पांगवण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आणली जात आहे. 

हरिहरपेठ भागात गाडगे महाराजांचा पुतळा आहे, त्या परिसरात ही दगडफेक आणि जाळपोळ सुरू आहे. दोन गटात शुल्लक कारणावरून तणाव निर्माण झाला असल्याची प्राथमिक माहिती असून पोलिस व सुरक्षा फोर्स घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सुरक्षा जवानांच्या पथकांकडून जमावाला पांगवण्यात येत आहे. 

दरम्यान, अकोल्यातील हरिहर पेठ भागात झालेली दगडफेक आणि जाळपोळ अकोला पोलिसांचं अपयश आहे. पोलिसांची गुप्तचर यंत्रणा कुचकामी असून यासंदर्भात गृहमंत्र्यांकडे चौकशीची मागणी करणार असल्याचं आमदार अमोल मिटकरी यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले. 

Source link

Akola News : अकोल्यातल्या हरिहर पेठ भागात तणावाची स्थिती; दोन गटात आधीही झाला होता राडा

अकोल्यात दोन गटांत तणाव, दगडफेक अन् जाळपोळ; पोलिसांसह दंगा काबू पथकंही रस्त्यावर

हेही वाचा

Video : फडणवीसांची रावडीस्टाईल… ”देवाभाऊ जो बोलता है वो करता है, जो नही बोलता वो डेफिनेटली करता है”

अधिक पाहा..

Source link

अकोल्यात बापानेच पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकलं, काठावर बघ्यांची गर्दी, अखेर रात्री चिमुकली

अकोल्यात बापानेच पोटच्या मुलींना भीमकुंड नदीत फेकलं, काठावर बघ्यांची गर्दी, अखेर रात्री चिमुकली

अकोला: जिल्ह्यातील बाळापूर परिसरात एका व्यक्तीने आपल्या दोन लहान मुलींना नदीत फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये दोन्ही मुलींचा मृ्त्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलींच्या वडिलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळापूर परिसरात दोन अल्पवयीन बहिणींना भीमकुंड नदीपत्रात (Bhimkund River) पुलावरून फेकून दिल्याचा संतापजनक प्रकार शनिवारी समोर आला होता. काल रात्री उशिरा दोघींचे मृतदेह शोध व बचाव पथकाच्या हाती लागले. आलिया आणि सदफ असे या दोघी मृत बहिणींचे नाव आहे. मृत मुलींच्या नातेवाईकांनीच म्हणजेच वडिलांनी हे कृत्य केल्याचा संशयदेखील पोलिसांना आहे. त्या आधारावर वडिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस ठाण्यात सात आणि पाच वर्षीय अल्पवयीन बहिणी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. बुलढाणा पोलिसांकडून (Buldhana News) या दोन्ही मुलींचा शोध सुरु होता. याच दरम्यान पोलिसांना काही माहिती हाती लागली. दोन्ही अल्पवयीन मुलींना नदीत फेकून दिल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात होता. त्यानंतर भीमकुंड नदीत काल सायंकाळच्या सुमारास पोलिसांनी नदीपात्रात शोध मोहीम सुरु आहे. शोध व बचाव पथकाच्या मार्फत ही शोधमोहीम सुरू झाली. रात्री उशिरा दोघींचे मृतदेह हाती लागले. त्यानंतर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. 

दरम्यान, वडिलांनीच मुलींना नदीत फेकून दिल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान काल बुलढाण्यातील कदमापूर येथे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी दोघी बहिणी घरुन निघाल्या होत्या. मात्र, बराच वेळ झाला, मुली घरी परतले नाहीये, अखेर कुटुंबियांनी मुली बेपत्ता असल्याची तक्रार हिवरखेड पोलिसांत दाखल केलेली होती. तपासा दरम्यान वडिलांनी मुलीला पुलावरून नदीत फेकून दिलाचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अधिक तपास बुलढाण्यातील हिवरखेड पोलीस करत आहेत.

आणखी वाचा

पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 

अक्षय शिंदेचं एन्काऊंटर ही चांगली गोष्ट नाही, सरकारने शिक्षा द्यायला हवी; प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, पीडित मुलीचे आई-वडिल पहिल्यांदाच बोलले

अधिक पाहा..

Source link

YouTube
Instagram
WhatsApp