अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु

अकोल्यात दोघा बहि‍णींना फेकल्याच्या संशयाने खळबळ, नदी पात्रात शोध मोहिम सुरु


अकोला: अकोला जिल्ह्यातील बाळापूर शहरातील भीमकुंड नदीत दोघा बहीणींना अज्ञातांनी फेकून दिल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. या दोघी बहिणी काल दुपारपासून घरी न आल्याने त्या हरविल्याची तक्रार त्यांच्या पालकांनी काल दाखल केली होती. परंतू या बहिणींना नदीच्या पात्रात फेकल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी पाणबु्ड्यांच्या मदतीने नदीच्या पात्रात शोध सुरु केला आहे. रात्रीची वेळ असल्याने शोधकामात अडथळे येत आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार,  बुलढाणा जिल्ह्यातील लाखनवाडा गावातल्या दोन अल्पवयीन मुलींना अकोल्यात भिकुंड नदीत फेकून दिल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मुलीच्या नातेवाईकांनीच हे कृत्य केल्याचा संशय देखील बुलढाणा पोलिसांना आहे. दरम्यान, काल दुपारपासून या दोन अल्पवयीन बहिणी बेपत्ता आहेत.  या अल्पवयीन बहिणी बेपत्ता असल्याची तक्रार बुलढाणा जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस ठाण्यात दाखल आहे. कालपासून बुलढाणा पोलिसांकडून या दोन्ही मुलींचा शोध सुरु आहे.  याच दरम्यान पोलिसांना काही माहिती हाती लागली आहे.  दोन्ही अल्पवयीन मुलींना नदीत फेकून दिल्याचा संशय आता पोलिसांकडून व्यक्त केला जातोय. 

भीमकुंड नदीपात्र आणि परिसरात शोधमोहीम

दरम्यान अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातल्या भीमकुंड नदीत काल सायंकाळच्या सुमारास या दोन्ही मुलींना नदीत टाकून दिल्याचा संशय पोलिसांना आहे.  त्यामुळे अकोल्यातील बाळापूर आणि बुलढाणा पोलिसांकडून नदीपात्रात शोध मोहीम सुरू आहे. शोध व बचाव पथकामार्फत ही शोध मोहीम सुरू आहे. नातेवाईकांनीच मुलींना नदीत टाकून देण्याचा संशय पोलिसांना आहे. त्या आधारावरच आता पोलिसांची भीमकुंड नदीपात्र आणि परिसरात  बचाव पथकाच्या मार्फत शोधमोहीम सुरु केली.  आलिया आणि सदफ असं या बेपत्ता मुलींची नाव असल्याचे प्राथमिक माहिती समोर आली. 

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मुली परतल्याच नाही

दरम्यान काल बुलढाण्यातील कदमापूर येथे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी दोघी बहिणी घरून निघाल्या होत्या. मात्र, बराच वेळ झाला, मुली घरी परतल्या नाही, अखेर कुटुंबियांनी मुली बेपत्ता असल्याची तक्रार हिवरखेड पोलिसांत दाखल केली होती.

हे ही वाचा :

Ramraje Naik Nimbalkar : तुतारी हाती घेण्याचा निर्णय नाहीच, पण रामराजे निंबाळकरांनी भाजपबाबतच्या तक्रारींचा पाढा वाचला, म्हणाले….

                                                      

अधिक पाहा..



Source link

दिल्लीवरून फोन आला अन् मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला; ठाकरे गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट

दिल्लीवरून फोन आला अन् मला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला; ठाकरे गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट


Nitin Deshmukh अकोला : मला भाजपच्या एका आमदाराने सांगितलं की, आपण ज्यावेळी सुरतला गेला होता त्यावेळी दिल्लीवरून एक फोन आला होता. कोणत्याही परिस्थितीत नितीन देशमुख परत जाता कामा नये, मारून टाकायचे काम पडले तर गेम करून टाका. तेव्हा टीव्हीवर बातमी पसरवली गेली, मला हृदयविकाराचा झटका आलाय म्हणून. मात्र दिल्लीवरून फोन येतो आणि ऐकत नसेल तर मारून टाका, असे त्यावेळी सांगण्यात आले. हे सर्व मला एका भाजपच्या आमदाराने सांगितले असल्याचा मोठा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी केला आहे. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्यासमोर भाषानातून आमदार देशमुखांनी हे गौप्यस्फोट  केला आहे. 

माझ्या सोबत घात करण्याचा प्रयत्न झाला- नितीन देशमुख

शिवसेना शिंदे गटाने माझी चौकशी लावली खरी, पण आता माझ्या मुलासह आठव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीचीही ACB कडून चौकशी लावलीय. परंतु आपण कधीही डगमगलो नाही. आपण सुरतला गेलो होतो, तेव्हा माझ्या सोबत घात करण्याचा प्रयत्न झाला. मला इंजेक्शन देण्यात आले होते. तेव्हा बातमी पसरली की, आमदार देशमुखांना हृदय विकाराचा झटका आला. आपल्याला कोणताही झटका आला नव्हता असे म्हणत नितीन देशमुखांनी या बाबत स्पष्टीकरण ही दिले आहे. दरम्यान, मला पराभूत करण्यासाठी आज कटकारस्थान रचले जात असल्याचेही आमदार देशमुखांनी यावेळी म्हटले आहे.

मी गद्दारांबरोबर गेलो नाही यामुळे चौकशीचा ससेमिरा 

मी वेळोवेळी चौकशीत सर्व माहिती दिली आहे. सातत्याने माझ्या बेहिशोबी मालमत्ते बाबत चौकशी केली जात आहे. 2019च्या निवडणुकीत दाखल केलेल्या अर्जात माजी संपूर्ण संपत्तीची स्थिती नमूद आहे. आता ज्यांनी तक्रार केली आहे त्यांनी बेहिशोबी मालमत्ता कुठे आहे, याची माहिती दिली असेल. दोन वर्षानंतर एसीबीच्या लोकांना जाग येत असेल तर यावर मी काय बोलावं. अशा अधिकाऱ्यांचा सत्कार केला पाहिजे. मी वेल सांगितला तर ते बेल लिहितात. माझी बेहिशोबी मालमत्ता कुठे आहे? ती माझ्या ताब्यात द्यावी आणि माझ्यावर कारवाई करावी, असे स्पष्ट मत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी व्यक्त केले आहे. 
      
गद्दारांबरोबर मी गेलो नाही. यामुळे चौकशीचा ससेमिरा माझ्या पाठीशी लावण्यात आला आहे. त्या काळातली ही चौकशी झाली पाहिजे. ती का होत नाही? याचे उत्तर कोणाकडेही नाही. माझी चौकशी बंद रूममध्ये नव्हे, तर सर्वांसमोर खुल्या पद्धतीने झाली पाहिजे. असेही मत नितीन देशमुख यांनी व्यक्त केलं आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

अमरावतीत पोलीस स्टेशनवर जमावाकडून जोरदार दगडफेक; 29 पोलीस जखमी, नेमकं प्रकरण काय?

अमरावतीत पोलीस स्टेशनवर जमावाकडून जोरदार दगडफेक; 29 पोलीस जखमी, नेमकं प्रकरण काय?


Amravati News अमरावती : अमरावती (Amravati News)  शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गाझियाबाद येथे स्वामी यती नरसिंहानंद यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद आता अमरावतीतही उमटताना बघायला मिळाले आहे. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या स्वामी यती नरसिंहानंद त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी काल शुक्रवारी अमरावतीच्या नागपूरी गेट पोलीस स्टेशनवर मोठ्या संख्येने जमाव आलेला होता. दरम्यान काही वेळात हा जमाव हिंसक झाला आणि अचानक नागपुरी गेट पोलीस ठाण्यात हजर असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर दगडफेक सुरू केली. अचानक झालेल्या या दगडफेकीत मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या वाहनाचे आणि पोलीस स्टेशनचे देखील नुकसान झालेले आहे.

दगडफेकीत 29 पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, जवळ जवळ दोन ते अडीच हजार लोकांचा जमाव याठिकाणी जमला होता. दरम्यान, हा जमाव  पांगवण्यासाठी पोलिसांनी रात्री अखेर हवेत गोळीबार आणि अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडून लाठीचार्ज करावा लागला. तर रात्री एक वाजतानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. जमावाकडून करण्यात आलेला दगडफेकीमध्ये 29 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झालेले आहेत. सध्या या परिसरातसध्या जमाबंदीचे आदेश देण्यात आले असून शांतता राखण्याच्या आवाहन पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी केले.

विजेचा धक्का लागून वेगवेगळ्या घटनेत चौघांचा मृत्यू

वन्य प्राण्यापासून पिकाच्या बचावासाठी शेताच्या कुंपणाला सोडण्यात आलेल्या वीज प्रवाहाचा धक्का लागल्याने यवतमाळच्या रातचंदना येथील शेतकरी दाम्पत्यच्या, तर बुलढाणाच्या डोलारखेड येथे दुर्गा उसत्व मंडळाच्या विधुत तारेला स्पर्श झाल्याने दोन युवकांचा, असा वेगवेगळ्या घटनेत चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. 

यवतमाळ येथे शेतात जागलीला गेलेल्या शेतातील कपाशीच्या पिकाला वन्य प्राण्यांपासून वाचविण्यासाठी  कुंपणाच्या तारेत वीज प्रवाह सोडला होता, मात्र याचा झटका लागून पती-पत्नी यांचा मृत्यू झालाय. आनंदा शंकर कोरंगे (40) अनिता आनंदा कोरंगे (35) पती अशी मृतांची नावे आहे. कोरंगे दाम्पत्यामागे 11 वीत शिकणारा मुलगा आणि आठवीत असणारी मुलगी हे दोघे आहेत. ही दोन्ही मुले पोरकी झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

तर बुलढाणा जिल्ह्यातील डोलारखेड येथे एका सार्वजनिक दुर्गाउत्सव मंडळाची विधुत रोषणाई करत असताना अचानक विद्युत तारेला स्पर्श झाल्याने शुभम गजानन देठे(21) व गोवर्धन संतोष देठे (25) या दोघांचाही जागीच मृत्यू झालाय. दोघेही मंडळाचे सक्रिय सदस्य असल्याने त्यांच्या मृत्यूमुळे देठे परिवारासह संपूर्ण मंडळावर शोककळा पसरली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना ‘या’ मतदारसंघातून उमेदवारी द्या, दंगलीचा डाग पुसला जाईल, सामाजिक का

मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना ‘या’ मतदारसंघातून उमेदवारी द्या, दंगलीचा डाग पुसला जाईल, सामाजिक का


Uddhav Thackeray, अकोला : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) विधानसभेच्या आखाड्यात उतरावं असं आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं होतं. बावनकुळे यांनी आव्हान दिल्यानंतर  उद्धव ठाकरेंना थेट अकोला पश्चिम मतदारसंघातून उभा करण्याची मागणी महाविकास आघाडीकडे  (Mahavikas Aaghadi) करण्यात आली आहे. 

अकोल्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि शिंदे गटाचे माजी नेते जावेद जकारिया (Javed Zakaria) यांनी महाविकास आघाडीकडे ही मागणी केलीये. यासंदर्भात त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thacekray) यांना पत्र लिहलं आहे. 

जावेद जकारिया काय काय म्हणाले? 

उद्धव ठाकरे अकोला पश्चिम मतदारसंघातून उभे राहिले तर अकोल्यातील मतदार त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. दंगलीचा इतिहास असलेल्या अकोला शहरात उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीने जातीय सलोखा निर्माण होणार असल्याचंही जावेद जकारिया यांनी म्हटलंय. जकारीया यांच्या या मागणीला आता महाविकास आघाडी कसा प्रतिसाद देते? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. दरम्यान, गेल्या 30 वर्षांपासून अकोला पश्चिम मतदार संघावर भाजपचे वर्चस्व आहे. 

कोण आहेत जावेद जकारिया?

जावेद जकारिया अकोल्यातील  जकारिया फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. मुस्लिमातील कच्छी मेनन समाजाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. अकोल्यातील सामाजिक क्षेत्रात मोठी ओळख असल्याचेही बोलले जाते. कोरोना काळात 2200 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले होते, त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुकही झाले होते. वर्षभरापूर्वी त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, भाजप आणि शिंदे सेनेतील काही नेत्यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्यांमुळे पक्षाचा राजीनामा  दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अल्पसंख्यांक आघाडीचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम केलं होतं. 

देवेंद्र फडणवीस पाच वेळेस लोकांमधून निवडून आले – चंद्रशेखर बावनकुळे

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकांमधून निवडणूक जिंकली नाही. आमदार म्हणून निवडून आलेले नाहीत. मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी विधानपरिषदेवर आमदारकी मिळवली होती. शिवाय याउलट देवेंद्र फडणवीस हे लोकनेते आहेत. ते पाच वेळा आमदार म्हणून लोकांमधून निवडून आले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी लोकांमधून निवडून येऊन दाखवावे, असं आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महायुतीत राष्ट्रवादीला झुकतं माप? विधानसभेच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाहांसोबत अजित पवारांची वेगळ्या फिल्डिंगच्या चर्चा

 

 

अधिक पाहा..



Source link

महायुतीच्या अडचणीत वाढ? 40 जागा द्या अन्यथा वेगळं लढू, घटक पक्षाची मागणी

महायुतीच्या अडचणीत वाढ? 40 जागा द्या अन्यथा वेगळं लढू, घटक पक्षाची मागणी


अमरावती : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने आम्हाला 40 जागा द्याव्या, अन्यथा आम्ही संपूर्ण 288 जागांवर उमेदवार उभे करू असा इशारा महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने दिला आहे. रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे अमरावती जिल्ह्यात पक्षाच्या मेळाव्यासाठी आले असता पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. 

आपल्या पक्षाची ताकद दाखवण्यासाठी आपल्याला 288 जागा लढवाव्या लागतील अशी भूमिका राज्य कार्यकारिणीने घेतली आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी आम्हाला किमान 12-12 जागा द्याव्या. सध्या आम्ही महायुतीत आहोत. मात्र, त्यांनी आम्हाला जागाच दिल्या नाहीत तर आम्हाला आमची तयारी करावी लागेल असेही महादेव जानकर यावेळी बोलताना म्हणाले.

या आधी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याचं जाहीर केलं आहे. त्यानंतर आता राष्ट्रीय समाज पक्षही स्वबळाची भाषा करत आहेत. या दोन्ही पक्षांनी लोकसभेमध्ये महायुतीला पाठिंबा दिला होता. महादेव जानकरांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातील परभणी लोकसभेतून निवडणूकही लढवली होती. पण त्यांचा पराभव झाला. 

या आधीही स्वबळाची भाषा

महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने या आधीही स्वबळाची भाषा केली होती. विधानसभेच्या 288 जागांवर निवडणूक लढण्याचा निर्णय जर रासपच्या राज्य कार्यकारिणीने घेतला तर सगळ्या जागा लढवून असं महादेव जानकर म्हणाले होते. महायुतीमधून निवडणूक लढवायची असेल तर त्या संदर्भात युतीचा निर्णय नंतर घेतला जाईल. पण सध्या तरी 288 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. 

या आधीही महादेव जानकरांनी महायुतीकडून 50 जागांची मागणी केली होती. राष्ट्रीय समाज पक्ष महायुतीमध्येच आहे, महायुतीने सन्मानजनक जागा द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे. महायुतीत राष्ट्रीय समाज पक्षाला 50 जागा मिळाव्यात अन्यथा महाराष्ट्रात 288 जागा लढवणार असा इशारा महादेव जानकर यांनी दिली होता. शिवाय त्यांनी मुंबईतील गोवंडी आणि मागाठाणे या मतदारसंघांवर त्यांनी दावा ठोकलाय. विशेष म्हणजे सध्या मागठाणे विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश सुर्वे आमदार आहेत.

महायुतीच्या जागावाटपाची चर्चा सुरू

महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अद्यापही सुरू असून लवकरच तोडगा काढला जाईल अशी माहिती आहे. ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार ती जागा त्या पक्षाला या सूत्रानुसार 200 हून जागांचे वाटप झाल्याची माहिती आहे. ज्या जागा वादाच्या आहेत, ज्या ठिकाणी दोन किंवा अधिक पक्षांचा दावा आहे त्यावर सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. 

ही बातमी वाचा :

अधिक पाहा..



Source link

शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांच्या कारवर गोळीबार; पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर?   

शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांच्या कारवर गोळीबार; पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर?   


Amravati News अमरावती : अमरावतीच्या (Amravati News) राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Faction)अमरावती जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांच्या इनोव्हा कारवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. काल, सोमवार 30 सप्टेंबरच्या मध्यरात्रीच्या सुमारास हा गोळीबार झाल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील वलगाव ते दर्यापूर मार्गावर ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार गाडीवर तीन गोळ्या झाडल्या आहेत. तर या प्रकरणी आता अमरावती शहर पोलीसचे दोन DCP वलगावं पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले असून पुढील तपास ते सध्या करत आहेत. मात्र या घटणेमुळे अमरावतीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. 

शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर?  

राज्यात सध्या निवडणुकांचे वारे वाहत असून प्रत्येक पक्ष त्या अनुषंगाने कामाला लागला आहे. दरम्यान, राज्यात मागील काही दिवसांपासून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे विरोधकांकडून बोलले जात आहे. दरम्यान, अमरावतीमध्ये घडलेल्या गोळीबारच्या घटनेने अमरावती जिल्हा परत एकदा हादरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपूर्वी अमरावतीत जिल्हा प्रमुखु अरूण पडोळे आणि गोपाल अरबट यांच्या वाद सुरू होता. दरम्यान, त्यातूनच हा वाद अधिक उफाळून येऊन गोळीबाराची घटना घडल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना शिंदे गटाचे शहर जिल्हाप्रमुख अरुण पडोळे यांच्या सांगण्यावरून माझ्या गाडीवर हल्ला झाला, असे शिंदे गटाचे ग्रामीण जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांनी पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत  म्हटले आहे. त्यामुळे आता हा गोळीबार नेमका कोणी केला आणि त्यामागील नेमकं कारण काय? हे तपासणे आता पोलीसांपुढे आव्हान असणार आहे.

फॉरेंसिक टीमकडून गाडीची तपासणी

दरम्यान, या गोळीबारानंतर आता अमरावतीच्या वलगाव पोलीस स्टेशनमध्ये फॉरेंसिक टीम दाखल झाली आहे. ज्या गाडीवर गोळीबार झाला त्या गाडीची आता फॉरेंसिक टीमकडून तपासणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे गोपाल अरबट यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध वलगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पक्षांतर्गत आणि पदाधिकारी यांच्यातील अंतर्गत वादावरून संपूर्ण प्रकार झाले असावे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. शिंदे गटाचे गोपाल अरबट यांच्या तक्रारीनंतर आता वलगाव पोलीस अधिक तपास करत आहे. मात्र,  शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पडोळे यांच्या सांगण्यावरून माझ्या गाडीवर गोळीबार झाला, अशी तक्रार गोपाल अरबट यांनी पोलिसात केली आहे. 

  

हे ही वाचा 

 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp