नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल; हिंदू जण आक्रोश सभेतील वादग्रस्त वक्तव्य भोवलं

नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल; हिंदू जण आक्रोश सभेतील वादग्रस्त वक्तव्य भोवलं


Maharashtra Politics अमरावती : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या विरोधात अमरावतीच्या (Amravati News) अचलपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितेश राणे यांनी काल(रविवारी) हिंदू जण आक्रोश सभेत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात धार्मिक भावना दुखवणे, कलम 196 आणि 3 (5) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. इमरान खान असलंम खान यांनी अचलपूर पोलीस ठाण्यात तक्रार देत आमदार नितेश राणे आणि सागर भैय्या बेग, कोपरगाव या दोघांवर तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले आहे.  

भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाविरोधात द्वेष निर्माण व्हावा, अशी वादग्रस्त वक्तव्य केलीय. अश्या वक्तव्याने अचलपूर परतवाडा शहरातील शांती भंग करण्याचं काम नितेश राणेंनी केलंय. तसेच हिंदू आणि मुस्लिम धर्मीयांमध्ये वाद वाढावा, अशी वक्तव्ये त्यांनी केलीय. असं या तक्रारीत म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणी आता पोलीस पुढे काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

नितेश राणे हिंदू जण आक्रोश सभेसाठी अमरावतीत

भाजप नेते नितेश राणे हे रविवारी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी जिल्ह्याच्या अचलपूर-परतवाडा या ठिकाणी सकल हिंदू समाजाचा जण आक्रोश भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, नितेश राणे यांच्या या दौऱ्याला आधीपासूनच विरोधाची किनार असल्याचे बघायला मिळाले होते. मुस्लिम समुदायाने या दौऱ्याला विरोध दर्शवला होता. प्रथम पोलीसांनी बाईक रॅली, सभेची परवानगी नाकारत जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात कलम 163 बी एन एस एस लागू केली होती. मात्र रॅलीचा मार्ग बदलला आणि जिल्हाधिकारी यांनी सकाळी काढलेला आदेश रात्री मागे घेतला. तसेच नितेश राणे यांच्या बाईक रॅली आणि सभेलाही पोलिसांनी परवानगी दिली. त्या पार्श्वभूमीवर अचलपूरमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

नेमकं काय म्हणाले होते नितेश राणे?

अचलपूर येथेल सभेत बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले होते की, मी शेवटी आलो अचलपुरात. हे लक्षात ठेवा माझं नाव नितेश नारायण राणे आहे. काही लोक सांगत होते की नितेश राणे को आणे मत दो. मात्र हा आमचा हिंदू राष्ट्र आहे, पाकिस्तान नाही. कुठं गेले ते 15 मिनिटं वाले. सांगा त्या हैदराबादवाल्यांना आम्ही अचलपुरात आहे. कशाला पाहिजे 15 मिनिटं 5 मिनिटाचं काम आहे. एक ही बाल्कनीत पाहून नव्हते मला. कुटुंबांना बाहेरगावी पाठवलं असं मला समजलं. जो नियम सगळ्यांना लागतो तोच नियम आमच्या सर्वांना लागला पाहिजे. आमचा हिंदू जल्लोष करतो, तेव्हा तुम्हाला का मिरची लागते. अकोला, नागपूर प्रत्येक जिल्ह्यात गणपती मूर्त्यांची विटंबना करण्यात आली. जेव्हा आम्ही हा मुद्दा उचलतो, अंगावर जातो, तेव्हा सांगतात की भाईचारा आहे. असे वक्तव्य  आमदार नितेश राणे  यांनी यावेळी केलं. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

आजची राजकीय व्यवस्था हीच समाजासमोरची मोठी आणि खरी देशाची समस्या; संजय महाराज पाचपोर यांची खंत

आजची राजकीय व्यवस्था हीच समाजासमोरची मोठी आणि खरी देशाची समस्या; संजय महाराज पाचपोर यांची खंत


Sanjay Maharaj Pachpore बुलढाणा : आजची राजकीय व्यवस्था हीच समाजासमोरची खरी आणि सर्वात मोठी समस्या आहे.  आजच्या राजकारण्यांना स्वार्थ आणि लोभ असल्याने त्यांना रामराज्याशी काहीही देणंघेणं नाही, अशी टीका करत  ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार’ प्राप्त गुरुवर्य संजय महाराज पाचपोर (Sanjay Maharaj Pachpore) यांनी राजकारण्यांचे कान टोचले आहेत. यावेळी त्यांनी बोलताना त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करत राम राज्यात न्याय व्यवस्था नव्हती , हीच राम राज्याची खरी ओळख असल्याचे म्हटले आहे.  

‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार- 2024’ प्राप्त आणि विदर्भाचे ज्येष्ठ संत ह भ प संजय महाराज पाचपोर यांना ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार मिळाल्याबद्दल बुलढाणा (Buldhana News) आणि अकोला (Akola) जिल्ह्यातील वारकऱ्यांनी त्यांचा आज बुलढाण्यातील वरवट बकाल येथे सत्कार ठेवला होता. त्यावेळी त्यांनी “एबीपी माझा” शी बातचीत केली. त्यावेळी ते बोलत होते.

राम राज्यात न्याय व्यवस्था नव्हती , हीच राम राज्याची खरी ओळख

राज्य शासनाचा संत ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार मला एकट्याला मिळाला नाही तर हा पुरस्कार संपूर्ण वारकरी संप्रदायाचा आहे.  क्रांती ही अध्यात्माशिवाय होत नाही , या देशाला आज सात्विक कामाची गरज आहे. देशात आज अल्पवयीन मुलींवर आत्यचार करणार आजचा समाज हा विकृत करत आहेत. या देशाला लागलेली ही कीड आहे. याची फक्त आपण निंदा करतो. तसेच आजची राजकीय व्यवस्था हीच समजासमोरची मोठी आणि खरी समस्या आहे. राजकीय व्यवस्थेने व्यवस्था म्हणूनच राहावं, समस्या बनून नव्हे आणि दिवसेंदिवस ही समस्या वाढत चालली असल्याची खंतही संजय महाराज पाचपोर यांनी यावेळी बोलून दाखवली आहे.

ज्या राज्यात ज्या देशात न्यायाची व्यवस्था नसते, त्याला रामराज्य म्हणतात. रामराज्यात न्यायाची व्यवस्था नव्हती, ज्या वेळी समस्या असतात त्यावेळी व्यवस्था असते. जिथं अन्यायच नसतो तिथं न्याय व्यवस्था नसते. ज्याच्या समोर फक्त देश असतो त्याच्या समोर ही समस्या नसते. पण ज्याला पदाचा लोभ आणि स्वार्थ असतो तो समस्या निर्माण करतो. सध्याच्या युगात राजकारण्यांना लोभ आणि स्वार्थ असल्याने ते राम राज्य आणण्याबद्दल एकणार नाहीत. अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

कोण आहेत संजय महाराज पाचापोर ?

ह.भ.प.संजय महाराज पाचपोर हे वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ संत म्हणून ओळखले जातात. पश्चिम विदर्भातील सर्व जिल्ह्यात संजय महाराज पाचपोर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तर पश्चिम विदर्भातील राजकीय मंडळीही संजय महाराज पाचपोर यांच्या कायम संपर्कात असतात. अलीकडेच राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा मानल्या जाणारा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार त्यांना मिळाला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

मोठी बातमी : उद्धव ठाकरेंचे आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर सराईत गुंडांकडून प्राणघातक हल्ला

मोठी बातमी : उद्धव ठाकरेंचे आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर सराईत गुंडांकडून प्राणघातक हल्ला


Nitin Deshmukh’s Son Pruthvi Deshmukh, अकोला : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचा मुलगा पृथ्वीराज देशमुख याच्यावर काही सराईत गुंडांनी अकोल्यात हल्ला केलाय. अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. पृथ्वीराज देशमुख हा स्वाद बेकरीसमोरच्या कपड्याच्या दुकानावर उभा असताना काही सराईत गुन्हेगारांनी त्याला अडवून त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय. या हल्ल्यादरम्यान पृथ्वी देशमुखला बेदम मारहाण करण्यात आलीये.

ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात दाखल 

आमदाराच्या मुलावर हल्ल्याची झाल्याची माहिती मिळतात ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने सिव्हील लाईन पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. देशमुखांच्या मुलावर हल्ला करणारे सर्व जण कृषीनगर भागातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. तक्रार दाखल करण्यासाठी स्वतः आमदार नितीन देशमुख आणि शिवसैनिक पोलिस ठाण्यात पोचले आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.दरम्यान, 30 मिनिट पोलिसांचं कुणीही आलं नव्हतं, सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे वाढतायात. पोलीस ठाण्यात हजर राहत नाहीत, आज माझ्या मुलावर चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याने पळ काढल्याने पुढील अनर्थ टळलाये, असं आमदार नितीन देशमुख म्हणाले आहेत. 

पोलिसांनी कारवाई केली नाही, तर गुंडांचा बंदोबस्त आम्हाला करावा लागेल

नितीन देशमुख म्हणाले, मी वारंवार एसपी साहेबांना विनंती केली, शहरात गुन्हेगारी वाढली आहे. काही दिवसांपूर्वी 15 वर्षीय विद्यार्थ्याची हत्या झाली होती. आज तशाच पद्धतीने माझा मुलगा तिथे दुकानाजवळ उभा होता. अचानक माझ्या मुलाच्या अंगावर प्राणघातक हल्ला केला. एकजण चाकू घेऊन आला होता, तर एका जणाने फरशी डोक्यात मारण्याचा प्रयत्न  केलाय. माझा मुलगा आणि त्याचा मित्र दोघांनी पळ काढला. दुकानात लपले. नाहीतर आज सुद्धा अनर्थ घडला असता. वारंवार या भागात गुन्हेगारी कृत्य घडत आहेत. या भागात लहान मुलांचं आणि मुलींचं फिरणं मुश्किल झालं आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही एसपी साहेबांच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. आज पोलीस स्टेशनला आलो तर तीनच पोलीस हजर होते. एवढे मोठे पोलीस ठाणे आहे, अर्धा तास कोणीच नव्हतं. विनंतीनुसार काय कारवाई करतात हे पाहू. पण आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका. पोलिसांनी कारवाई केली नाही, तर गुंडांचा बंदोबस्त आम्हाला करावा लागेल. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Manoj Jarange: मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणारच, बैठकीत झाली घोषणा; नारायण गडावरुन रणशिंग फुंकणार

अधिक पाहा..



Source link

मुस्लिम आणि दलित समाजाची मते मिळाली नसती तर काँग्रेसचं डिपॉझिट जप्त झालं असतं : बच्चू कडू

मुस्लिम आणि दलित समाजाची मते मिळाली नसती तर काँग्रेसचं डिपॉझिट जप्त झालं असतं : बच्चू कडू


Bacchu Kadu on Congress : लोकसभा निवडणुकीत (Loksabha)  काँग्रेसला जर मुस्लिम आणि दलित समाजाची मते (Muslim and Dalit community Vote) मिळाती नसती तर काँग्रेसंच डिपॉजीट जप्त झालं असतं, अशी टीका प्रहार शेतकरी संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केली. ते अमरावतीत बोलत होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर देखील टीका केली.

जयंत पाटील यांनी तिसऱ्या आघाडीवर टीका केली होती. या टीकेला आमदार बच्चू कडू यांनी  चोख प्रत्त्युत्तर दिलं आहे. त्यांच्यात दम राहिला नाह.  त्यांना वाटत असेल की आम्हीउभं राहिल्याने तुमचं नुकसान होत असेल तर तुमची कुवत काय हे माहिती पडते. त्यांची कुवत नाही असंही कडू म्हणाले. दरम्यान, कलेक्टरवर महिना 7 लाख रुपये खर्च होतो तर आमदारावर साडे तीन लाख रुपये महिना खर्च होत असल्याचे कडू म्हणाले. 

 दुकानदारी वाढली की उधार घ्यायला बरं होतं , बच्चू कडूंचा राज ठाकरेंना टोला

दरम्यान, सगळे पक्ष वाढले पाहीजेत. कारण दुकानदारी वाढली की उधार घ्यायला बरं होतं असे म्हणत बच्चू कडू यांनमी मनसे प्रनुख राज ठाकरे यांच्यावर टीका केली. गावात एकच दुकान राहिली तर मक्तेदारी वाढते. दहा दुकानं झाली की दुकान चालते, जे चांगलं देईल त्याची दुकानदारी चालेल असंही कडू म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

राजू शेट्टी धनंजय मुंडेंवर बरसले, बच्चू कडू म्हणाले, सरकारच्या कानफाडीत मारण्याची वेळ आलीय, संभाजीराजेंचीही जोरदार टीका

अधिक पाहा..



Source link

सगळे पक्ष वाढले पाहीजे, दुकानदारी वाढली की उधारी घ्यायला बरं होतं; बच्चू कडूंची राज ठाकरें टीका

सगळे पक्ष वाढले पाहीजे, दुकानदारी वाढली की उधारी घ्यायला बरं होतं; बच्चू कडूंची राज ठाकरें टीका


Maharashtra Politics अमरावती : राज्यातील महिलांसाठी महायुती सरकारने आणलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (CM Ladki Bahin Yojana) सध्या चांगलीच चर्चेत आहे. तर दुसरीकडे याच लाडकी बहीण योजनेवरुन विरोधकांनी सातत्याने सरकारवर टीका करत जोरदार हल्ला केला आहे. दरम्यान, आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील पत्रकारांशी केलेल्या अनौपचारिक चर्चेवेळी लाडकी बहीण योजनेवरुन सरकारवर टीका करत निशाणा साधला आहे. येत्या जानेवारी महिन्यात पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे राहणार नाहीत’ असं राज ठाकरे म्हणाले आहेत. राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर ते चुकीचं आहे. महिलांना अशा प्रकारे पैसे न देता राज्यात नवीन उद्योग आणा” असं म्हणत राज ठाकरेंनी या योजनेवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. 

दरम्यान, राज ठाकरेंच्या या टीकेवर भाष्य करत प्रहारचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडूंनीही (Bacchu Kadu) राज ठाकरेंवर पलटवार केला आहे. याविषयी भाष्य करताना बच्चू कडू म्हणाले की, राज ठाकरे म्हणाले त्या प्रमाणे वस्तुस्थिती काहीशी असू शकते, पण मुळात लाडकी बहीण योजनेमुळे ही अवस्था नाही. तर सरकारी अधिकारी, आमदार पगारामुळे ही अवस्था होईल. त्यामुळे राज ठाकरेंनी याचा अभ्यास केला असता तर चांगलं राहिल असत. असा खोचक सल्ला बच्चू कडूंनी राज ठाकरेंना देत टीका केली आहे. कलेक्टरवर 7 लाख रुपये खर्च होतो. तर आमदारावर साडे तीन लाख रुपये महिना खर्च होतोय. हे देखील लक्षात घेतलं पाहिजेल. असेही ते म्हणाले. 

सगळे पक्ष वाढले पाहीजे, दुकानदारी वाढली की उधारी घ्यायला बरं होतं 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (VidhanSabha Election 2024) पार्श्वभूमीवर मनसे (MNS)पक्ष देखील मैदानात उतरला असून त्या अनुषंगाने राज्यभरात जोरदार तयारी करत आहे. मनसे आगामी विधानसभा निवडणूक ही स्वबळावर लढवणार आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) हे महाराष्ट्र दौरा करत आहेत. दरम्यान, त्यातीलच एक भाग म्हणून राज ठाकरे विधानसभेसाठी ‘मिशन विदर्भ’साठी रणनीती आखत आहेत. 27 आणि 28 सप्टेंबर रोजी दोन दिवस राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर आहेत.

यावेळी ते विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावरही बच्चू कडू यांनी टीका करत निशाणा साधला आहे. राज्यात सगळे पक्ष वाढले पाहीजे. कारण दुकानदारी वाढली की उधारी घ्यायला बरं होतं. गावात एकच दुकान राहिली तर मक्तेदारी वाढते. दहा दुकान झाली की दुकान चालते, जे चांगलं देईल त्याची दुकानदारी चालेल. अशा शब्दांत बच्चू कडू यांनी टीका केली आहे.

….तर काँग्रेसचं डिपॉझिट ही जप्त झाले असतं- बच्चू कडू 

यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी तिसऱ्या आघाडीवर केलेल्या टिकेलाही चोख प्रत्त्युत्तर दिले आहे. 
यावेळी ते म्हणाले की, त्यांच्यात आता दम राहिला नाही. त्यांना वाटत असेल की आम्ही उभं राहिल्याने तुमचं नुकसान होत असेल, तर तुमची कुवत काय, हे माहिती पडते. त्यामुळे त्यांची कुवत नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सत्ता आणू शकलं नाही, मुस्लिम आणि दलित मत मिळाली नसती तर  काँग्रेसचं डिपॉझिट ही जप्त झाले असतं. असेही बच्चू कडू म्हणाले. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

वाढदिवसाची पार्टीत सॉफ्ट ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध पाजत 15 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार

वाढदिवसाची पार्टीत सॉफ्ट ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध पाजत 15 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार


Akola Crime : अकोल्यातून अतिशय धक्कादायक बातमी समोर आलीये. एका अल्पवयीन मुलीवर तिच्या मैत्रिणीच्या मदतीने 3 तरुणांनी सॉफ्ट ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध पाजून तिच्यावर सामूहिक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. हा संपूर्ण प्रकार एका वाढदिवसाच्या पार्टीमध्ये घडला होता. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी तीन तरुणांसह पीडित मुलीच्या मैत्रीणीवर गुन्हा दाखल केलाय. दरम्यान, यात बंटी सटवाले, लल्ला इंगळे आणि एक अज्ञात आरोपीचा समावेश आहे. तर पीडित मुलीची मैत्रीण पायल नामक तरुणीवरही गुन्हा दाखल करण्यात आलाये. सद्यस्थितीत या प्रकरणातील तिघेजण फरार असून पायल एकटीच अटकेत आहे. तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.

पीडितेला जबरदस्तीने सॉफ्टड्रिंकमध्ये गुंगीचा औषध पाजलं

अधिकची माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील एक 15 वर्षीय मुलगी तिच्या चुलत मावशीकडे अकोल्यात शिकायला आली होतीय. ती अकोल्यातील एका शाळेत दहाव्या वर्गात शिकत होती. ती अकोल्यातील एका मुलीची मैत्रीण बनलीय. तिने तिची भेट तिचा मित्र बंटी सटवाले याच्यासोबत करून दिलीय. तसेच तिच्या चुलत मामीशीसुद्धा भेट करुन दिली होतीय. चुलत मामीचा पती लल्ला इंगळेने पीडित मुलीला तिचा वाढदिवस असल्याने त्याच्या घरी रात्री 12 वाजता साजरा करु म्हणून नेले. तेथून पीडितेचा मित्र बंटी सटवाले, त्याची मैत्रीण पायल हे मामीच्या घरी गेले. तेथे लल्ला इंगळे व बटी सटवाले यांनी मद्यप्राशन केलंय. त्यांनी पीडितेला जबरदस्तीने सॉफ्टड्रिंकमध्ये गुंगीचा औषध पाजलं.  यानंतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केलाय. त्यानंतर त्यांनी व्हिडीओ बनवले व ब्लॅकमेल केले. या प्रकरणी पायल पोलिसांच्या अटकेत असून अन्य तिघे जण फरार आहेत.

अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार, अकोल्यातील धक्कादायक घटना.. 
वाढदिवसाच्या पार्टीत सॉफ्ट ड्रिंकमध्ये गुंगीच औषध पाजत सामूहिक अत्याचार. 
3 तरुणांसह एका तरुणीवर गुन्हा दाखल.
अकोल्यातील जुने शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

इतर महत्वाच्या बातम्या

Kolhapur : धावत्या एसटी बसमध्ये सासू-सासऱ्याने जावयाला गळा दाबून संपवलं, मृतदेह कोल्हापूर बस स्टँडवर नेऊन ठेवला

Bengaluru Crime : बंगळुरुत महालक्ष्मीचे 59 तुकडे करुन पळाला, आता मुख्य आरोपीचा मृतदेह ओडिशात सापडला, सस्पेन्स वाढला

 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp