Raj Thackeray Vidarbha Tour : राज ठाकरेंचं मिशन विदर्भ, विधानसभेसाठी मनसेनं कसली कंबर

Raj Thackeray Vidarbha Tour : राज ठाकरेंचं मिशन विदर्भ, विधानसभेसाठी मनसेनं कसली कंबर


Raj Thackeray, विदर्भ : मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधानसभेसाठी ‘मिशन विदर्भ’साठी रणनीती आखत आहेत.  27 आणि 28 सप्टेंबर रोजी दोन दिवस मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर असणार आहेत. यावेळी ते विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. 27 तारखेला पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणाअकोला, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्हाचा आढावा त्यांच्याकडून घेण्यात येणार आहे. तर 28 तारखेला नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदियागडचिरोली, आणि चंद्रपूर जिल्हाचा आढावा घेतला जाईल. 

राज ठाकरे लवकरच अमरावती दौऱ्यावर जाणार

राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यापूर्वी 7 उमेदवार जाहीर केले आहेत. आता मनसे विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भातून पहिली यादी राज ठाकरे जाहीर करण्याची शक्यता आहे. 27 तारखेला सकाळी 7.30 वाजता राज ठाकरे यांच अमरावतीत रेल्वे स्टेशनवर आगमन होताच मनसे कार्यकर्ते करणार जोरदार स्वागत करणार आहेत. यावेळीच राज ठाकरे विधानसभा निवडणुकीसाठी विदर्भातील नेत्यांची यादी जाहीर करतील असे बोलले जात आहे. 

राज ठाकरेंनी घोषित केलेले मनसेचे 7 उमेदवार

1. बाळा नांदगावकर – शिवडी, मुंबई
2. दिलीप धोत्रे – पंढरपूर  
3. लातूर ग्रामीण – संतोष नागरगोजे
4. हिंगोली विधानसभा – बंडू कुटे
5. चंद्रपूर – मनदीप रोडे
6. राजुरा – सचिन भोयर
7. वणी – राजू उंबरकर

लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा, विधानसभा स्वबळावर?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वासाठी महायुतीला पाठिंबा दिला होता. त्यावेळी त्यांनी सिंधुदुर्गमुंबई आणि पुणे अशा 4 सभा घेतल्या होत्या. या सभांमधून त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले होते. मात्र, राज ठाकरेंनी सभा घेतल्या तेथील काही उमेदवारांचा निवडणुकीत विजय झाला. मात्र, उर्वरित महाराष्ट्रात महाविकास आघाडीने मुसंडी मारली. महाविकास आघाडी आणि त्यांच्या विचारांच्या महाराष्ट्रात 31 जागा निवडून आल्या. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतलेल्या राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज ठाकरेंनी मराठवाडा, सोलापूर आणि विदर्भाचा दौराही केला होता. 



Source link

विधानसभेसाठी ‘वंचित’च्या निवडणूक आणि समन्वय समित्यांची घोषणा

विधानसभेसाठी ‘वंचित’च्या निवडणूक आणि समन्वय समित्यांची घोषणा


अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी आता वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) ‘ॲक्शन मोड’वर आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून बुधवारी रात्री निवडणूक आणि समन्वय समितीची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही समित्यांच्या अध्यक्षपदी प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक समितीत भारिप-बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने आणि वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पूंडकर हे सहअध्यक्ष असणार आहेत. हे दोघे समन्वय समितीचेही सदस्य असणार आहेत. तर दोन्ही समित्यांच्या इतर सदस्यांमध्ये अरुण जाधव, दिशा पिंकी शेख, गोविंद दळवी आणि सोमनाथ साळुंखे यांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी या दोन्ही समित्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

निवडणूक आणि समन्वय समिती ‘वंचित’ कडून निवडणूक लढवण्यासाठी प्राप्त झालेल्या अर्जांपैकी उमेदवारांची तपासणी केली जाणार आहे. यासोबतच या दोन्ही समित्या उमेदवाराबद्दल अंतिम निर्णय घेणार आहेत.‌ दोन्ही समित्या निवडणूक प्रचाराच्या तयारीची देखरेख करणार आहे.  सोबतच मीडिया समिती, संशोधन विभाग आणि राज्य कोअर कमिटी यांच्याशी समन्वय साधण्याचं कामही या दोन्ही समित्या करणार आहेत.

वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर निवडणूक आणि समन्वय समितीच्या ‘कॅप्टन’ : 

विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची ‘निवडणूक समिती’ ही सर्व शक्तिमान समिती समजली जाते. राज्य आणि प्रत्येक मतदारसंघातील पक्षाची रणनीती, उमेदवारांचे आलेले अर्ज, त्यांची छाननी आणि अंतिम उमेदवारी हे सर्व निर्णय ही समिती घेणार आहे. त्यामुळे या समितीतील नियुक्त्यांकडे वंचित बहुजन आघाडीसह सर्वच राजकीय अभ्यासकांचे लक्ष लागले होते. प्रकाश आंबेडकरांनी या समितीच्या अध्यक्षपदी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांची नियुक्ती करीत त्यांच्यावर मोठा विश्वास टाकला आहे ‌ या समितीत रेखा ठाकूर यांच्या मदतीला भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांची सहअध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. यासोबतच पक्षाच्या समन्वय समितीत या तिघांनाही नेमण्यात आलं आहे. समन्वय समितीच्या अध्यक्षपदी प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर याच असणार आहेत. तर अशोक सोनोने आणि डॉ. धैर्यवर्धन पुंडकर हे समन्वय समितीचेसुद्धा सदस्य असणार आहेत.‌ याबरोबरच दोन्ही समित्यांच्या सदस्यपदी अरुण जाधव, दिशा पिंकी शेख, गोविंद दळवी आणि सोमनाथ साळुंखे यांचा समावेश करण्यात आला आहे.

वंचित बहुजन आघाडी निवडणूक समिती : 

नाव                      जबाबदारी 
रेखा ठाकूर            अध्यक्ष 
अशोक सोनोने        सहअध्यक्ष 
डॉ. धैर्यवर्धन पुंडकर  सहअध्यक्ष
अरुण जाधव            सदस्य 
दिशा पिंकी शेख       सदस्य 
गोविंद दळवी           सदस्य 
सोमनाथ साळुंखे       सदस्य 

वंचित बहुजन आघाडी समन्वय समिती : 

नाव                      जबाबदारी 
रेखा ठाकूर            अध्यक्ष 
अशोक सोनोने        सदस्य 
डॉ. धैर्यवर्धन पुंडकर  सदस्य 
अरुण जाधव           सदस्य 
दिशा पिंकी शेख      सदस्य 
गोविंद दळवी          सदस्य 
सोमनाथ साळुंखे      सदस्य 

समन्वय समितीतील प्रत्येकाकडे कोणकोणत्या जिल्ह्यांची जबाबदारी : 

समन्वय समितीच्या अध्यक्ष रेखा ठाकूर यांच्याकडे नागपूर, लातूर आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या समन्वयाची जबाबदारी असेल. तर समितीचे सदस्य असलेले भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांच्याकडे वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या पाच जिल्ह्यांच्या समन्वयाची जबाबदारी असेल. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांच्याकडे बुलढाणा, अमरावती आणि वाशिम या तीन जिल्ह्यांची जबाबदारी असेल. अरुण जाधव यांच्याकडे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या चार जिल्ह्यांची जबाबदारी असेल. समितीच्या सदस्य दिशा पिंकी शेख यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांची जबाबदारी असेल. वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष आणि समितीचे सदस्य असलेल्या गोविंद दळवी यांच्याकडे मराठवाड्यातील नांदेड आणि परभणी या दोन जिल्ह्यांची जबाबदारी असेल. तर सोमनाथ साळुंखे यांच्याकडे कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर या चार जिल्ह्यांची जबाबदारी असेल.

याबरोबरच समन्वय समितीच्या कोणत्याच सदस्यांकडे जबाबदारी न दिलेल्या बीड, जालना, धाराशिव, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे आणि पुणे या जिल्ह्यांची जबाबदारी वंचितच्या प्रदेश समितीकडे असेल. या जिल्ह्यांचा समन्वय  प्रदेश समिती आणि त्या जिल्ह्यांची समिती मिळून करणार आहे.

वंचितमध्ये रेखा ठाकूर, अशोक सोनोने आणि डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांचं राजकीय ‘वजन’ वाढलं!. 

संपूर्ण विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या या दोन्ही समित्या महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार आहेत. त्यामुळे लोकसभेतील दणदणीत पराभवानंतर या समित्या पक्षाच्या पराभवाचा भूतकाळ पुसून काढणार का?, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागलेली आहे. निवडणूक आणि समन्वय समितीत प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांना अध्यक्ष नेमत आंबेडकरांनी पक्षातील ठाकूर यांच्या विरोधकांना ‘मॅसेज’ दिला आहे. यासोबतच पक्षाची ‘थींक टॅंक’ म्हणून ओळखले जाणारे पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर हे निवडणूक समितीचे सहअध्यक्ष तर समन्वय समितीचे सदस्य असणार आहेत. तर बुलढाणा जिल्ह्यातील पक्षाचे नेते आणि भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांना डॉ. पुंडकरांप्रमाने दोन्ही समित्यांत स्थान देण्यात आलं आहे. तर दोन्ही समित्यांच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आलेल्या अरुण जाधव, दिशा पिंकी शेख, गोविंद दळवी आणि सोमनाथ साळुंखे यांचंही पक्षातील वजन आणखी वाढलं आहे.

दोन्ही समित्यांमध्ये आंबेडकरांचे ‘सोशल इंजिनिअरिंग’ : 

 प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेला ‘अकोला पॅटर्न’ ओळखला जातो तो त्यांच्या राजकारणातील जातीय समतोलासाठी. पुढे याच ‘अकोला पॅटर्न’ला ‘सोशल इंजिनिअरिंग’ या नावाची नवी ओळख मिळाली. समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्य निवडतांना आंबेडकरांनी सर्व समाज घटकांना त्यात सामावून घेत सामाजिक आणि जातीय समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. आदिवासी, बौद्ध, मराठा या मोठ्या समाज घटकांसह न्हावी आणि तृतीयपंथी अशा लहान समाज घटकांनाही या समित्यांमध्ये त्यांनी स्थान दिलं आहे. या दोन्हीही समित्या स्थापन करून वंचितने एकप्रकारे विधानसभा निवडणुकीच्या तयारीचं बिगुल वाजविलं आहे.

 

अधिक पाहा..



Source link

लाडकी बहीण योजनेसाठी 6 पुरुषांचा अर्ज; आधार कार्ड निलंबनाची कारवाई, मागवला खुलासा

लाडकी बहीण योजनेसाठी 6 पुरुषांचा अर्ज; आधार कार्ड निलंबनाची कारवाई, मागवला खुलासा


Ladki bahin yojana अकोला : राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki bahin yojana) चांगलीच लोकप्रिय झाली आहे. या योजनेंतर्गत आत्तापर्यंत 2 कोटींपेक्षा जास्त महिलांना लाभ मिळाला असून थेट त्यांच्या बँक खात्यात ही लाभाची रक्कम जमा झाली आहे. मात्र, या योजनेचा लाभ गैरमार्गानेही देखील काहींनी मिळवल्याचे प्रकरण समोर आले आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी जनसन्मान यात्रेतील भाषणात बोलताना अजित पवारांनी देखील चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या साताऱ्यातील एका व्यक्तीचा उल्लेख केला होता. आता, अकोला (Akola) जिल्ह्यातून 6 जणांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी खोटा कागदपत्रे जमा केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. याबाबत, अकोला जिल्ह्यातील महिला व बालकल्याण अधिकारी गिरीश पुसदकर यांनी माहिती दिली. तसेच, या घटनेतील 6 लाडक्या भावांवर कारवाई करत त्यांचे आधारकार्ड निलंबित करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.  

सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणलीय. मात्र, अकोल्यात या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न चक्क सहा ‘लाडक्या भावां’नी केला आहे. या योजनेसाठी असलेल्या ‘नारीशक्ती दूत’ अॅपवर अकोला शहरातील सहा व्यक्तींनी योजनेचा अर्ज भरलाय. अर्जाच्या छाननीत ही बाब समोर आलीय. यात या सहा पुरुषांनी खोटी माहिती भरत योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केलाय. या सहाही जणांकडून याचा खुलासा मागविण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणारे आहे. दरम्यान, या योजनेसाठी खोटी माहिती भरून लाभ घेऊ पाहणाऱ्या या सहा जणांचे आधार कार्ड महिला आणि बालकल्याण विभागाकडून निलंबित करण्यात आले आहेत, अशी माहिती अकोला जिल्हा महिला आणि बालकल्याण अधिकारी गिरीश पुसदकर यांनी याबाबत माहिती दिली. 

दरम्यान, लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजूनही चालूच आहे. येत्या 30 सप्टेंबरपर्यंत महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे.  या योजनेचा तिसऱ्या हप्त्याचे वितरणे येत्या 29 सप्टेंबर रोजी होणार आहे. याबाबतची अधिकृत माहिती महिला व बालविकास कल्याण विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली. या निर्णयामुळे आता लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना प्रतिमहा 1500 रुपये या हिशोबाने पैसे मिळणार आहेत. 

अजित पवारांनी सांगितला होता किस्सा

अजित पवारांनी जन्मसन्मान यात्रेत बोलताना साताऱ्यातील किस्सा सांगितला होता. सातारा जिल्ह्यात एक पठ्ठ्या  असा निघाला की त्याने बायकोचे वेगवेगळे 28 फोटो काढले. एक पँट शर्ट,  एक सहावारी, नववारी, लांब केस, मोठे केस असे फोटो काढले आणि 28 त्रिक पैसे बायकोच्या खात्यावर घेतली. लगेच आम्हाला कॉम्पुटरवर कळलं आम्ही लगेच त्याला पकडला. कोणीही चुकीचं काम करायचं नाही नाहीतर मग चक्की पिसिंग चक्की पिसींग करायला लावणार आहे. 

हेही वाचा

 शरद पवार परळीत मोठी सभा घेणार, धनंजय मुंडेंना हादरा देणार; पक्षप्रवेशावेळी सगळंच काढलं

अधिक पाहा..



Source link

लाडकी बहीण योजनेवर लाडक्या भावांचा डल्ला!’नारीशक्ती दूत’ अ‍ॅपवर सहा पुरूषांकडून खोटी माहिती

लाडकी बहीण योजनेवर लाडक्या भावांचा डल्ला!’नारीशक्ती दूत’ अ‍ॅपवर सहा पुरूषांकडून खोटी माहिती


Ladki Bahin Yojana : सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojan) आणलीय. मात्र, अकोल्यात या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न चक्क सहा ‘लाडक्या भावांनी’ केला आहे. या योजनेसाठी असलेल्या ‘नारीशक्ती दूत’ अॅपवर अकोला शहरातील सहा व्यक्तींनी योजनेचा अर्ज भरलाय. अर्जाच्या छाननीत ही बाब समोर आलीय. यात या सहा पुरूषांनी खोटी माहिती भरत योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केलाय. या सहाही जणांना याचा खुलासा मागविण्यात आलाय. यानंतर त्यांच्यावर कारवाईही  करण्यात येणारेय. दरम्यान, या योजनेसाठी खोटी माहिती भरून लाभ घेऊ पाहणाऱ्या या सहा जणांचे आधार कार्ड महिला आणि बालकल्याण विभागाकडून निलंबित करण्यात आले आहेत. मात्र या प्रकरणानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

लाडकी बहीण योजनेवर लाडक्या भावांचा डल्ला! 

महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (ladki bahin yojana) सुरू केली आहे. शासनाच्या या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील लाखो महिलांना मिळत आहे. मात्र या योजनेतही अनेक गैरप्रकार होताना दिसून येत आहेत. यामध्ये अनेक जण फसवणूक करत आहेत. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची (ladki bahin yojana) नोंदणी अजूनही सुरूच आहे. या योजनेचा (ladki bahin yojana) लाभ मिळवण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी गैरप्रकार झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरताना आधार कार्डचा नंबर वापरून गैरप्रकार झाल्याचे उघडकीस येत आहे. याप्रकरणी राज्यभरातून हजारो तक्रारी दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी 30 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच या प्रकरणात, संबंधितांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान असाच एक गैरप्रकार अकोल्यातून पुढे आला असून संबंधितांवर कारवाईचा बडगा उगरण्यात आला आहे.

लाडकी बहीण योजनेत फसवणूक कराल तर खबरदार!

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ (ladki bahin yojana) योजनेच्या माध्यमातून सरकारकडून महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येतात. या योजनेसाठी राज्यात्या कानाकोपऱ्यातून ऑनलाइन-ऑफलाइन अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात आली. या योजनेंतर्गत अर्ज भरण्यासाठी राज्य सरकारने या महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजेच 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. एकाच महिलेच्या नावाने 28 अर्ज भरण्यात आले आहेत. यापैकी केवळ एक अर्ज मंजूर झाला आहे. उर्वरित 27 अर्ज रद्द करण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यात दाम्पत्याने बनावट कागदपत्रे दाखवून अनेक अर्ज भरल्याचा प्रकार उघडकीस आला. दोघांनाही अटक करण्यात आली आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योजनेची अर्ज नोंदणी सुरू असली, तरी कागदपत्रांची सखोल तपासणी करून अर्ज मंजूर करण्यात यावेत असे आदेश जिल्हास्तरावर देण्यात आला आहे. गैरप्रकार करून या योजनेचा लाभ घेतला असल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करून केला जाईल त्याचबरोबर मिळालेल्या लाभाची रक्कम वसूल करण्यात येत आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

शिवसेनेच्या धनुष्यबाणाला चोरणारे भाजप आणि शिंदे रावण; आता ठाकरेंच्या आमदाराचा तोल सुटला

शिवसेनेच्या धनुष्यबाणाला चोरणारे भाजप आणि शिंदे रावण; आता ठाकरेंच्या आमदाराचा तोल सुटला


अकोला : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची जीभ छाटणाऱ्यास अकरा लाखांचे बक्षीस देऊ, असे वादग्रस्त वक्तव्य केलेल्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर आज पुन्हा संजय गायकवाड यांनी अंबादास दानवे (Ambadas Danve) आणि अरविंद सावंत (Arvind Sawant) यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली. आमदार दानवे म्हणजे गल्लीतील Xत्रा आहे. तो मागच्या धारा निवडून येतो.  अरविंद सावंतची माझ्यावर बोलण्याची औकात नाही, असे त्यांनी म्हटले. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांचा तोल सुटला आहे. 

बाळापूरचे शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांच्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत. त्यांनी भाजप (BJP) आणि शिंदे गटाला थेट रावणाची उपमा दिली आहे. ते अकोल्यात बाळापूर मतदार संघातील ठाकरे गटाच्या शाखाप्रमुख आणि उपशाखाप्रमुखांच्या मेळाव्यात बोलत होते. याच मेळाव्यात नितीन देशमुख यांनी बाळापुरातून शिंदे गटाचे डिपॉझिट जप्त न केल्यास राजकारणात राहणार नसल्याचं वक्तव्य केले आहे. आमदार नितीन देशमुख यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. नाना पटोलेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी करणाऱ्या नेत्यांवरही त्यांनी पलटवार केलाय. शिवसेना सोबत असल्यामुळेच काँग्रेस एका खासदारावरून तेरा खासदारांपर्यंत गेल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

शिवसेनेच्या धनुष्यबाणाला चोरणारे भाजप आणि शिंदे रावण 

नितीन देशमुख म्हणाले की, शिवसेनेच्या धनुष्यबाणाला चोरणारे भाजप आणि शिंदे हे रावण आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावे ही महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस आणि प्रत्येक हिंदुत्ववाद्याची इच्छा आहे. महाविकास आघाडीने त्यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करावं. शिवसेना सोबत असल्यामुळेच काँग्रेस एका खासदारावरून 13 खासदारावर गेली आणि भाजप 23 खासदारांवरून नऊ खासदांरावर आली. शिंदे गटाच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त केलं नाही तर मी राजकारणात राहणार नाही़. 

शिंदे गटाचं हिंदुत्व आता कुठे गेलंय? 

सुरत आणि गुवाहाटीत शिंदे गटात आपला घातपात करण्याचा प्रयत्न होता, असा खळबळजनक आरोप नितीन देशमुख यांनी पुन्हा एकदा केला आहे. आपल्या निवडणुकीवर सुरत आणि गुवाहाटीचं लक्ष असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ठाकरे गटावर हिंदुत्व विसरण्याचा आरोप करणाऱ्या शिंदे गटावरही त्यांनी जोरदार पलटवार केलाय. मुंबईत बुरखे वाटपाचा कार्यक्रम करणाऱ्या शिंदे गटाचं हिंदुत्व आता कुठे गेलंय? असा सवालही त्यांनी केलाय. दरम्यान, नितीन देशमुख यांनी आज मतदारसंघातील पहिल्यांदाच मतदान करीत असलेल्या 30 हजार मतदारांना पत्र लिहिलंय. बाळापुर मतदार संघात विधानसभा निवडणुकीसाठी 3 लाख 10 हजार मतदार असणार आहेत. ही सर्व पत्र उद्या पक्षाचे शाखाप्रमुख आणि उपशाखाप्रमुख नवमतदारांना घरी नेऊन देणार आहेत. 

आणखी वाचा 

मोठी बातमी ! ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळास कॅबिनेटची मंजुरी

अधिक पाहा..



Source link

धनगर समाजाचा ठिकठिकाणी रास्ता रोको तर जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी बंदची हाक,

धनगर समाजाचा ठिकठिकाणी रास्ता रोको तर जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी बंदची हाक,


मुंबई : धनगर समाजाचा (Dhangar Reservation) अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी पंढरपूर (Pandharpur) येथे सुरू असलेल्या सकल धनगर समाजाच्या आमरण उपोषणाचा आज पंधरावा दिवस असून सर्व सहा उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावलेली आहे. अजूनही शासनाकडून कोणतेच ठोस पाऊल न उचलल्याने आज राज्यभरात ठिकठिकाणी धनगर समाजाकडून रास्ता रोको (Rasta Roko) आंदोलन करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाकडून बंदची हाक देण्यात आली आहे. 

परळीत धनगर समाजाच्या वतीने रस्ता रोको

परळी तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये रस्ता रोको करण्यात आला. यावेळी समाज बांधवांनी केलेल्या रस्ता रोकोमुळे काही काळ परळी-बीड आणि परळी-परभणी ही वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. यावेळेस मोठ्या संख्येने समाज बांधव रस्ता रोकोमध्ये सहभागी झाले होते. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता धनगर समाजाला एसटी या प्रवर्गातून आरक्षण द्यावे. या प्रमुख मागणीसह पंढरपूर, लातूर व नेवासा येथे सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तसेच या सरकारने तात्काळ मागणीचे परिपत्रक काढावे, या मागणीसाठी हा रस्ता रोको करण्यात आला. 

नाशिकमध्ये धनगर समाजाचे आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात

नाशिकमध्ये धनगर समाजाकडून नाशिक-पुणे महामार्गावरील नाशिकरोड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. रास्ता रोको आंदोलनामुळे काही काहीकाळ नाशिकपुणे महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. आंदोलनादरम्यान धनगर समाजाकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना ताब्यात घेतले. 

पंढरपुरात शेळ्या मेंढ्या घेऊन रास्ता रोको

पंढरपूर येथील कराड रोडवर धनगर बांधवांनी शेकडो शेळ्या मेंढ्या घेऊन रास्ता रोकोला सुरुवात केल्याने संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील खिलारे कुटुंबाला दिलेले धनगड म्हणून दाखले आजच्या आज रद्द करावे व तातडीने राज्यात धनगड व धनगर एकच आहे, असा जीआर काढावा अन्यथा धनगर समाज उग्र आंदोलन करेल, असा इशारा आंदोलनकर्त्यानी दिला आहे .

अकोल्यातही रास्ता रोको 

अकोला जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्गावरील रिधोरा गावाजवळ धनगर समाजाचा रास्तारोको सुरू आहे. या आंदोलनात धनगर समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झालेय. धनगर समाजाच्या रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प पडली आहे. धनगर समाजाच्यावतीने मेंढरांना घेवून रस्ता रोको आंदोलन सुरु आहेय. यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेलाय. स्थानिक पोलीसही घटनास्थळी दाखल आहेत.

मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी नांदेडमध्ये बंद

तर जालना येथे मनोज जरांगे पाटील यांनी सहाव्या टप्प्याचे उपोषण सुरू केल्यानंतर आज नांदेडमध्ये सकल मराठा समाजाने बंद पुकारण्यात आलेला आहे. या बंदला चांगलाच पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपले आस्थापने बंद ठेवण्यात आलेली आहे. सकाळी आयटीआय चौकातून सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्चा हा कलेक्टर ऑफिसपर्यंत काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मनोज जरांगे यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य व्हाव्या असे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. नांदेड शहरसह 16 तालुक्यात बंदचे आवाहन सकल मराठा समाजाने केलेले आहे. या बंदसाठी आज पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. स्कूलबस असोसिएशनकडून देखील आज बंद पुकारण्यात आलेला आहे. 

लातूरमध्ये सकल मराठा समाजाकडून बंदची हाक

मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज सकल मराठा समाजाच्या वतीने लातूर जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील खाजगी स्थापना, शैक्षणिक संस्था, महाविद्यालय, बाजारपेठा, दळणवळण कडकडीत बंद करत व्यापाऱ्याने देखील सकाळपासूनच उस्फूर्तच प्रतिसाद दिला आहे. तर जिल्ह्यात ठिकठिकाणी मराठा आंदोलकांकडून आंदोलन देखील करण्यात येणार आहे. लातूर शहर, निलंगा, औसा, अहमदपूर, उदगीर या भागातील बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. 

आणखी वाचा 

Dhangar Reservation: राज्य सरकारने धनगर आरक्षणाचा जीआर काढला तर 65 आमदार राजीनामा देतील, अजितदादा गटातील नेत्याचा निर्वाणीचा इशारा

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp