राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी! प्रकाश आंबेडकर घालणार शेतकरी नेते रविकांत तुपकरांना साद

राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी! प्रकाश आंबेडकर घालणार शेतकरी नेते रविकांत तुपकरांना साद


Maharashtra Politics अकोला : राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर आता नव्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) साऱ्यांना वेध लागले आहे. त्या अनुषंगाने स्थानिक पातळीपासून ते देश पातळीवर राजकीय घडामोडींना आता वेग आले आहे. सध्या जरी निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी त्या कधीही आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आता मोर्चे बांधणीसाठी सज्ज झाला आहे. अशातच आता राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी होण्याची शक्यता आहे.

कारण वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे शेतकरी नेते रविकांत तुपकरांना (Ravikant Tupkar) साद घालणार असल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर रविकांत तुपकरांना सोबत घेण्याची चाचपणी करत आहेत. रविकांत तुपकरांनी बच्चू कडू, राजू शेट्टी आणि संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या आघाडीत जाण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर दोन्ही नेते एकत्र येण्याची शक्यता आहे. परिणामी, दोन्ही नेत्यांमध्ये सध्या जरी प्रत्यक्ष चर्चा झाली नसली तरी प्राथमिक बोलणीला सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात नेमकं काय होतं, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

प्रकाश आंबेडकरांची तिसऱ्या आघाडीत जाण्याची शक्यता धूसर

गेल्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून तब्बल अडीच लाख मते घेतली होती. तर एकट्या सिंदखेडराजा मतदारसंघात रविकांत तुपकरांना 30 हजार मतांची आघाडी होती. सोबतच बुलढाणा, मेहकर आणि चिखली मतदारसंघात तुपकरांना लक्षणीय मते होती. राजू शेट्टींनी तुपकरांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून काढल्यानंतर राज्यातील 27 जिल्ह्यात रविकांत तुपकरांचे कार्यकर्ते आणि संघटन सक्रिय झाल्या आहेत. तर दुसरीकडे तुपकरांशिवाय राज्यातील तिसरी आघाडी अपूर्ण असल्याचं मत प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलं होतं. त्यामुळे आंबेडकर तिसऱ्या आघाडीत जाण्याची शक्यता धूसर असल्याचे बोलले जात आहे.

संभाव्य राजकीय मैत्रीसंदर्भात प्राथमिक स्तरावर चर्चा   

प्रकाश आंबेडकर आणि रविकांत तुपकर एकत्र आल्यास याचा फायदा पश्चिम विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे. संभाव्य राजकीय मैत्रीसंदर्भात प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असल्याची माहिती ‘एबीपी माझा’च्या हाती लागली आहे. मात्र अद्याप रविकांत तुपकर आणि प्रकाश आंबेडकरांची प्रत्यक्ष भेट आणि चर्चा होणे बाकी. परिणामी दोन्ही नेत्यांच्या प्रस्तावित युतीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

राज्यातील कृषी विज्ञान केंद्रे ही पगार खाण्यासाठी, संशोधनाच्या नावाने बोंबाबोंब; राधाकृष्ण विखे

राज्यातील कृषी विज्ञान केंद्रे ही पगार खाण्यासाठी, संशोधनाच्या नावाने बोंबाबोंब; राधाकृष्ण विखे


अकोला : देशातील आणि राज्यातील कृषी विज्ञान केंद्रे ही फक्त भारतीय कृषी संशोधन परिषदेचा पगार खाण्यासाठीच बसली आहेत, येथे संशोधनाच्या नावाने बोंबाबोंब असल्याचा गंभीर आरोप राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केला. विखे पाटलांचा हा आरोप म्हणजे आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला असल्याचं बोललं जातंय. राधाकृष्ण विखे पाटील हे अकोला कृषी विद्यापीठाच्या शिवारफेरीसाठी आले होते. समारोपाच्या भाषणात त्यांनी देशातील कृषी विज्ञान केंद्रांच्या व्यवस्थेवर जोरदार टीका केली.

आधीच राज्यातील कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यभारावर अनेक स्तरातून टीका होत आहे. त्यातून कृषीसाठी फायदेशीर काही संशोधन होत नसल्याची टीका सातत्याने होतेय. आता राज्याचे महसूल मंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही कृषी विज्ञान केंद्रांच्या व्यवस्थेवर जोरदार टीका केली. या ठिकाणी संशोधनाच्या नावाने बोंबाबोंब असल्याचं ते म्हणाले. 

सुजय विखेंच्या उमेदवारीवर पक्ष निर्णय घेणार

सुजय विखे यांच्या संगमनेरमधून उमेदवारीबद्दल पक्षच निर्णय घेईल असं वक्तव्य त्यांनी केलं. पक्षाने अद्यापही कुठलेच उमेदवारी जाहीर केले नाहीत. त्यामुळं सुजय आणि मला त्यावर बोलण्याचा कुठलाही अधिकार नसल्याचं ते म्हणाले. सुजय विखेंच्या उमेदवारीवरून पक्ष जो निर्णय घेईल त्यानुसार पुढं पाहू. शेवटी सुजय हा जिल्ह्याचा खासदार राहिला आहे. पक्षाने त्यांना आदेश दिल्यास तो पाळावा लागेल. 

प्रहारचे आमदार बच्चू कडूंनी महायुती सोडल्यावर विखेंनी त्यांच्यावर टीका केली. बच्चू कडू येत-जात असतात, ते त्यांच्या फायद्याचे निर्णय घेत असतात असा टोला यावेळी विखे पाटलांनी लगावला. 

दरम्यान, सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांना पाच प्रश्न विचारणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्यावर राधाकृष्ण विखेंनी टीका केली. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात जाऊन आलेल्यांना असे प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा सवाल त्यांनी विचारला. 

आरक्षणासाठी राज्य सरकार प्रामाणिक

आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, कोणत्याही अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल अशी मुख्यमंत्र्यांची सुरूवातीपासूनच भूमिका आहे. म्हणून विधानसभेच्या पूर्वी विशेष अधिवेशन बोलावलं जाईल. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत सरकार पूर्ण बांधिल आहे. पण आरक्षण संदर्भात अंतिम निर्णय न्यायालयात होणार आहे. राज्य सरकार आरक्षण देण्यासाठी प्रामाणिक आहे.

सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांना पाच प्रश्न विचारणाऱ्या अरविंद केजरीवालांवर त्यांनी टीका केली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात जाऊन आलेल्यांना असे प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार आहे का असे ते म्हणाले.

 

अधिक पाहा..



Source link

सुजय विखे यांच्या संगमनेरमधून उमेदवारीबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे विधान, म्हणाले.

सुजय विखे यांच्या संगमनेरमधून उमेदवारीबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे मोठे विधान, म्हणाले.


Radhakrushna Vikhe Patil अकोला: भाजप नेते आणि अहमदनगरचे माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil)  यांच्या संगमनेरमधून उमेदवारीबद्दल पक्षच निर्णय घेईल, असे विधान राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी केलंय. ते अकोला (Akola) येथे बोलत होते. आज राज्याचे महसूल मंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अकोल्यात होते. कृषी विद्यापीठाच्या शिवारफेरीसाठी ते जिल्ह्यात आले होते. समारोपाच्या भाषणात त्यांनी देशातील कृषी विज्ञान केंद्रांच्या व्यवस्थेवर जोरदार टीका केली. देशातील आणि राज्यातील कृषी विज्ञान केंद्र ही फक्त भारतीय कृषी संशोधन परिषदेचा पगार खाण्यासाठीच बसली आहे. येथे संशोधनाच्या नावाने बोंबाबोंब असल्याचा गंभीर आरोपही विखे पाटलांनी केलाय. विखे पाटलांचा हा आरोप म्हणजे आपल्याच सरकारला घरचा आहेर असल्याचं आता बोललं जातंय.

बच्चू कडू येत जात असतात – राधाकृष्ण विखे पाटील 

दरम्यान, बच्चू कडूंनी महायुती सोडल्यावरही त्यांनी टीका केली. बच्चू कडू येत जात असतात. ते त्यांच्या फायद्याचे निर्णय घेत असतात, असा टोलाही यावेळी विखे पाटलांनी लगावला आहे. दरम्यान, सरसंघचालक डॉ. मोहन भागवतांना पाच प्रश्न विचारणाऱ्या अरविंद केजरीवालांवर त्यांनी टीका केली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात जाऊन आलेल्यांना असे प्रश्न विचारण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा प्रति प्रश्नही त्यांनी  यावेळी केला आहे. 

पक्षाने आदेश दिल्यास मग उभं राहायचंय

आज कांद्याला विक्रम दर मिळतोय, भाव कमी मिळत आहे, असं म्हणणं चुकीचं असणार आहे. किंबहुना याचं राजकारण केल्या जातंय. असेही विखे पाटील म्हणाले. अद्यापही पक्षाने कुठल्याच उमेदवारी जाहीर केल्या नाही. त्यामुळं सुजय आणि मला कुठले अधिकार नाहीये. सुजय विखेंच्या उमेदवारीवरून पक्ष जो निर्णय घेईल, त्यानुसार आम्ही पुढं पाहू. शेवटी सुजय हा जिल्ह्याचा खासदार राहलाये. पक्षाने आदेश दिल्यास मग उभं राहायचंय, असेही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

पुढे बोलताना त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरही भाष्य केलंय. ते म्हणाले की,  मुख्यमंत्र्यांची सुरुवात पासूनच भूमिका राहली आहे की, कोणत्याही अन्य समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कस आरक्षण दिला जाईल. म्हणून विधानसभाच्या पूर्वी स्पेशल अधिवेशन बोलावल्या जाईल. तसेच धनगर समाजाच्या आरक्षण देण्याच्या बाबतीत सरकार पूर्ण बांधील आहे. दरम्यान आरक्षण संदर्भात अंतिम निर्णय न्यायालयात आहे, सरकार आरक्षण देण्यासाठी प्रामाणिक असल्याचेही ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

Jai Malokar Akola Case : जय मालोकर याच्या मृत्यूआधीचं CCTV फुटेज माझाच्या हाती! EXCLUSIVE

Jai Malokar Akola Case : जय मालोकर याच्या मृत्यूआधीचं CCTV फुटेज माझाच्या हाती! EXCLUSIVE


अकोला: अकोला जिल्ह्यात मनसे कार्यकर्ता जय मालोकारच्या मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. जय मालोकारच्या शवविच्छेदन अहवालात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. जय मालोकारचा मृत्यू जबर मारहाणीनं झाल्याचं या अहवालात उघड झालं आहे. 30 जुलैला अकोल्याच्या शासकीय विश्रामगृह येथे मनसे कार्यकर्ते आणि अमोल मिटकरी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली होती. यानंतर गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यांपैकी जय मालोकारचा मृत्यू हृदयविकारानं झाल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे, तर मृत्यूच्या आधी जय नेमका कोणासोबत होता, त्याला कुठे-कुठे नेण्यात आले सर्वांचे कॉल डिटेल्स चेक करा आणि न्याय त्याला द्या, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

पुढे बोलताना ते म्हणाले, मी आताच ही बातमी ऐकली की अकोल्या जिल्ह्यात एका मनसेच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. आधी असे दाखविण्यात आले होते की, हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पण, आता शवविच्छेदन अहवालामध्ये वेगळं समोर आलं आहे. त्यांच्या कुटुंबाकडून आता सुरक्षेची मागणी केली आहे, त्यांच्या कुटुंबाला सुरक्षा देण्यात यावी. मनसे कार्यकर्ता जय मालोकारच्या कुटुंबाच्या समोर सत्य आले पाहिजे.या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे. ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी त्यांच्या कुटुंबांना सुरक्षा द्यावी असंही अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी म्हटलं आहे. 

 



Source link

दंगलीत फक्त गरिबांच्या पोरांचा बळी जातो, त्या भानगडीत पडू नका, आपला धर्म हृदयात: इंदोरीकर महारा

दंगलीत फक्त गरिबांच्या पोरांचा बळी जातो, त्या भानगडीत पडू नका, आपला धर्म हृदयात: इंदोरीकर महारा


अकोला: धर्माचे भांडवल करुन घडवण्यात येणाऱ्या दंगलींमध्ये फक्त गरिबांच्या पोरांचा बळी जातो. या दंगलीत कधीही श्रीमंतांची पोरं आतमध्ये जात नाहीत. त्यामुळे दंगलीच्या (Riots in Maharashtra) भानगडीत पडू नका, असे आवाहन प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर (Indurikar maharaj) यांनी केले. अकोल्यात नुकतेच त्यांचे कीर्तन (Kirtan) झाले. यावेळी इंदोरीकर महाराज यांनी दंगल आणि धर्माच्या मुद्द्यावरुन मांडलेले सडेतोड विचार सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

निवृत्ती महाराज इंदोरीकर त्यांच्या सडेतोड वक्तव्यांसाठी ओळखले जातात. सध्या निवडणुकीच्या हंगामात राजकीय नेत्यांनी त्यांच्या कीर्तनांचा धडाका लावला आहे. या पार्श्वभूमीवर धर्माच्या नावावर दंगली घडवू पहात तरुणाईचा वापर करू पाहणाऱ्या नेत्यांना त्यांनी चांगलेच सुनावले. 

इंदोरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनात म्हटले की, दंगलीत तुम्ही कुठे दिसले तर हसायच्या गोष्टी नाहीत, 10 वर्षांची शिक्षा आहे. दंगलीत आतापर्यंत गरीब आत गेले, मोठ्याचे आत गेले नाही, कधी जाणारही नाहीत. हे मी तुम्हाला तळमळीने का सांगतो, कारण मी तुमचा आहे. एखादा म्हणेल तुम्हाला हिंदू धर्माचा अभिमान नाही का? पण मी त्यांना सांगेन की, तुमचा धर्म माईकवर आहे, आमचा धर्म हृदयात आहे. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी धर्माचे भांडवल करु नका. गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका, असे इंदोरीकर महाराजांनी ठणकावून सांगितले.

आयुष्यभर पोरांना भोंगे बांधायला वापरणारेच आता रोजगार मेळावे घेत आहेत; इंदोरीकर महाराजांची टीका

आपल्या कीर्तनात इंदोरीकर महाराजांनी राजकारण्यांना टोले लगावले. त्यांनी म्हटले की, ज्यांनी आयुष्यभर पोरं भोंगे बांधायला वापरून घेतलीत, तेच आज युवकांना नोकरीचं मार्गदर्शन करण्यासाठी रोजगार मेळावे घेत आहेत. नोकरी महोत्सवात किती तरुणांना नोकऱ्या लागल्यात?, असा सवाल त्यांनी विचारला. आज सगळे कारखाने आणि शाळा मार्गदर्शन करणाऱ्या लोकांचेच आहेत. ‘मी’ मेलो तरी तुम्ही सुधारणार नाहीये. आहे तोपर्यंत बदल होणार नाहीये. पण आपण गेल्यानंतर तुम्हाला माझी आठवण येईल. एखादा म्हणेल तुम्हाला धर्माचं ईमान नाहीये, मात्र तुमचा धर्म माईकवर आहे आणि आमचा हृदयात आहे. तुम्ही स्वार्थासाठी धर्माचं भांडवल करू नका.  धर्म म्हणून आमच्या गरिबांच्या पोरांचा बळी घेऊ नका, असे इंदोरीकर महाराज यांनी म्हटले. तसेच  आपण कोणतीच बँक लुटली नाही तरी आपल्याभोवती 90 लफडी आहेत, असे सांगत इंदोरीकर महाराजांनी त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांविषयी खंत व्यक्त केली.

गणेश विसर्जनाच्यावेळी भिवंडी आणि बुलढाण्यात तणाव

अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जनाच्या दिवशी  मुंबईतील भिंवडी (Bhiwandi)  आणि बुलढाण्यातील जळगाव जामोदमध्ये (Buldhana Jalgaon Jamod)  विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटामध्ये वाद झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे भिवंडी, बुलढाणा आणि जळगावात काहीसे तणावाचे वातावरण होते. भिवंडीत दगडफेक झाल्यानंतर गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यात आंदोलन केले होते. यावेळी पोलिसांना मंडळाच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला होता.

VIDEO: इंदोरीकर महाराज धार्मिक दंगलींबाबत नेमकं काय म्हणाले?

आणखी वाचा

भिवंडी आणि जामोदमध्ये विसर्जन मिरवणुकीदरम्यान तणाव, बुलढाण्यात मूर्तीचे विसर्जन थांबवले

अधिक पाहा..



Source link

Amol Mitkari:

Amol Mitkari:


अकोला: अकोला जिल्ह्यात मनसे कार्यकर्ता जय मालोकारच्या मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. जय मालोकारच्या शवविच्छेदन अहवालात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. जय मालोकारचा मृत्यू जबर मारहाणीनं झाल्याचं या अहवालात उघड झालं आहे. 30 जुलैला अकोल्याच्या शासकीय विश्रामगृह येथे मनसे कार्यकर्ते आणि अमोल मिटकरी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली होती. यानंतर गुन्हा दाखल झालेल्या कार्यकर्त्यांपैकी जय मालोकारचा मृत्यू हृदयविकारानं झाल्याचा दावा करण्यात आला होता. या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे, तर मृत्यूच्या आधी जय नेमका कोणासोबत होता, त्याला कुठे-कुठे नेण्यात आले सर्वांचे कॉल डिटेल्स चेक करा आणि न्याय त्याला द्या, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

पुढे बोलताना ते म्हणाले, मी आताच ही बातमी ऐकली की अकोल्या जिल्ह्यात एका मनसेच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. आधी असे दाखविण्यात आले होते की, हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. पण, आता शवविच्छेदन अहवालामध्ये वेगळं समोर आलं आहे. त्यांच्या कुटुंबाकडून आता सुरक्षेची मागणी केली आहे, त्यांच्या कुटुंबाला सुरक्षा देण्यात यावी. मनसे कार्यकर्ता जय मालोकारच्या कुटुंबाच्या समोर सत्य आले पाहिजे.या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे. ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी त्यांच्या कुटुंबांना सुरक्षा द्यावी असंही अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी म्हटलं आहे. 

मी जर दोषी असेल, माझे कार्यकर्ते दोषी असतील तर आम्हाला फासावर द्या, ह्यात राजकारण करायचं नाही आणि कोणी करूही नका. मृत्यूच्या आधी जय नेमका कोणासोबत होता. त्याला कुठे-कुठे नेण्यात आलं या सर्वांचे कॉल डिटेल्स चेक करा आणि न्याय द्या. ज्या दिवशी मृत्यू झाला, त्या दिवशीच मी म्हटलं होतं की, सविस्तर चौकशी करायला हवी. चौकशीतून दूध का दूध पाणी का पाणी व्हायला हवं असंही अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) म्हटलं आहे. 

काय म्हटलं आहे जय मालोकारच्या शवविच्छेदन अहवालात?

जयला जबर मारहाण झाली. पाठीवर छातीवर डोक्यावर आणि मानेवर जबर मारहाण. 
छातीच्या चार ते पाच बरगड्या मागच्या बाजूने फ्रॅक्चर आहेत. 
डोक्याला सुद्धा गंभीर मारहाण झाली आहे. पोस्टमार्टमवेळी मेंदूवर मोठ्या प्रमाणात सूज. त्यामुळे मेंदूचे वजन वाढलं. 
मानेवर जबर मारहाणीमुळे त्याच्या मज्जातंतूना गंभीर इजा
या सर्व गोष्टींमुळे ‘न्यूरोजनिक शॉक’मुळे मृत्यू

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp