‘ही’ तर बालिश नेत्याच्या डोक्यातील घाण; अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर बोचरा आरोप

‘ही’ तर बालिश नेत्याच्या डोक्यातील घाण; अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर बोचरा आरोप


Amol Mitkari: अकोला : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit pawar) आपले काका म्हणजेच राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांची साथ सोडून भाजप महायुतीसोबत सत्तेत सहभाग घेतला. मात्र, शरद पवारांनी विरोधात राहणं पसंत केलं असून लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी त्यांची जादू आजही कायम असल्याचं दाखवून दिलंय. त्यातच, आता अजित पवारांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा स्थान नाही. शरद पवारांनी (Sharad pawar) अजित पवारांसाठी परतीचे दोर कापले आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आता, आमदार अमोल मिटकरी यांनी याबाबत बोलताना थेट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनाच लक्ष्य केलं आहे. कुठल्याही नेत्यांने असं व्यक्तव्य केल्याची सत्यता नाही, तसा व्हिडिओही समोर आला नाही. या केवळ मीडियातील चर्चा आहेत. काल बारामतीमध्ये एका बालिश नेत्याने ते लिहून व्हायरल केलं अन् तेच बातम्या चालवल्या जात आहेत. त्याच्याच सडक्या मेंदूतील ही घाण, असल्याचे म्हणत आमदार अमोल मिटकरी यांनी नाव न घेता आमदार रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. 

अजित पवार यांनी बारामतीतील भाषणातून थेट सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केला होता. तसेच, गेल्या काही दिवसांत त्यांच्या भाषणात झालेल्या बदलावरुन ते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका करत असल्याचं पाहायला मिळालं. बारामती लोकसभेची लढाई कोणत्याही परिस्थितीत जिंकायची असा चंग बांधलेल्या अजित पवारांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता आपल्या घरातील लोकांनाच अंगावर घेतले होते. परंतु, अलीकडच्या काळात अजित पवार यांची शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याविषयी भाषा कमालीची मवाळ झाली आहे. एवढेच नव्हे तर अजित पवार यांना आपल्या चुकांची उपरतीही झाली आहे. त्यामुळे अजित पवार पुन्हा घरवापसीच्या तयारीत आहेत का, अशी कुजबुज सुरु झाली होती. मात्र, शरद पवार गटातील एका ज्येष्ठ नेत्याने अजित पवार यांचे परतीचे सर्व दोर कापले गेले असल्याचे वक्तव्य केल्याचे वृत्त होते. आमदार मिटकरी यांनी या वृत्ताचे खंडन केले असून कुठल्याही नेत्याने तसं विधान केलं नाही.  

अजित दादांना राष्ट्रवादीचे दार बंद, एन्ट्री नाही ह्या फक्त बातम्या आहेत, फक्त मनाचं समाधान होण्यासाठी हे सर्व सुरू असून यात कुठलेही तथ्य नाही, हे बिनबुडाचं आहे, असे मिटकरी यांनी स्पष्ट केलं. तसेच, कुठल्याही नेत्यांने असं व्यक्तव्य केल्याची सत्यता नाही, तसा व्हिडिओही समोर आला नाही, या केवळ मीडियातील चर्चा आहेत. काल बारामतीमध्ये एका बालिश नेत्याने ते लिहून व्हायरल केलं अन् तेच बातम्या चालवल्या जात आहेत. त्याच्याच सडक्या मेंदूतील ही घाण, असल्याचे म्हणत आमदार अमोल मिटकरी यांनी नाव न घेता आमदार रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला.

मला आंदोलनासाठी निमंत्रण नव्हतं – मिटकरी

राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात राज्यभर भाजप महायुतीने आंदोलन पुकारलं होतं. ठिकठिकाणी भाजपच्या पुढाकारातून हे आंदोलन करण्यात आलं. मात्र, मला अकोल्यातील आंदोलनाचं निमंत्रण नव्हतं, त्यामुळे आपण कुठेही आंदोलनात सहभागी झालो नसल्याचंही मिटकरी यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. 

हेही वाचा

विधानसभेचा बिगुल वाजणार, मुंबईत आयुक्तांनी घेतला आढावा; प्रशासकीय यंत्रणा लागल्या कामाला

अधिक पाहा..



Source link

मी मुलासाठी पोलिसांवर दबाव आणला नाही, अमित शाहांनाही काहीच बोललो नाही: चंद्रशेखर बावनकुळे

मी मुलासाठी पोलिसांवर दबाव आणला नाही, अमित शाहांनाही काहीच बोललो नाही: चंद्रशेखर बावनकुळे


अकोला: नागपूर हिट अँड रन प्रकरणात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याचा सहभाग असल्याने याप्रकरणाची (Nagpur Hit and Run case) सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. नागपूर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास आणि इतर कारवाई करताना केलेली दिरंगाई टीकेचा विषय ठरत आहे. संकेत बावनकुळे (Sanket Bawankule) यांना वाचवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न होत असल्याचा आरोपही विरोधक करत आहेत. हे सर्व आरोप चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekar Bawankule) यांनी फेटाळून लावले आहेत. मी माझ्या मुलासाठी पोलिसांवर कोणताही दबाव आणत नसल्याचा दावा त्यांनी केला. ते शुक्रवारी अकोल्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर हिट अँड रन प्रकरणात सत्ताधारी भाजप पोलिसांवर दबाव आणत असल्याच्या आरोपांचे खंडन केले. त्यांनी म्हटले की, पोलीस चौकशीवर दबाव येणार नाही. मी कधीही पोलिसांना फोन केला नाही, फक्त एकदा माहिती घेतली. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात आले होते. मी त्यांना सुद्धा या प्रकरणाविषयी काहीही बोललो नाही. 

पोलिसांनी कोणाचाही मुलगा असो माझा असो सामान्य घरातील, त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी. फक्त आता एकच प्रश्न उरतो तो म्हणजे गाडी चालवणारा आणि गाडीत बसणाऱ्यांवर कोणते गुन्हे दाखल होणार? पोलीस सध्या त्यादृष्टीने तपास करत असल्याचे चंद्रशेकर बावनकुळे यांनी म्हटले.

लोकसभेला मोदींवर जास्त विसंबून राहिल्याने भाजपला फटका: बावनकुळे 

महायुतीतील 75 टक्के जागावाटपावर मतैक्य झाल्याचा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय. बावनकुळे कालपासून अकोला, वाशिम आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांचा तीन दिवस विधानसभानिहाय आढावा घेत आहेत. या जागांवर महायुतीतील तिन्ही पक्षांचं एकमत असल्याचं ते म्हणाले. ज्याचा उमेदवार चांगला त्याला जागा,असे सूत्र आहे. कोणताच पक्ष कोणत्या जागेसाठी आग्रह धरणार नसल्याचं ते म्हणाले. 

दरम्यान, भाजपचा गड असलेल्या विदर्भात आमच्याच अतिआत्मविश्वासाने लोकसभेत पराभूत झाल्याचं ते म्हणाले. आम्ही मोदी आहेत याच गोष्टींवर विसंबून राहत जास्त प्रयत्न न केल्याचे बावनकुळे यांनी मान्य केले.

नितेश राणेंच्या वक्तव्याचा विपर्यास केला, बावनकुळेंचा दावा

नितेश राणे यांचे म्हणण्याप्रमाणे या देशातील अनेक भागात मुस्लिम परिवार एकत्र राहतात. बांगलादेशातील घटनेचा आधार घेऊन काही युवा पिढी अमितभाई, मोदीजी, फडणवीसांना कापून टाकू असे व्हिडीओ व्हायरल करत आहे. त्याआधारावर नितेश राणे बोलले आहे, त्यावर आपण विचार केला. हे आपल्याला मान्य नाही. नितेश राणे यांचे वक्तव्य सरळ आहे. हिंदू विरोधी आणि देश विरोधी वागणाऱ्या लोकांच्या आम्ही विरोधातच आहोत.नितेश राणे यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. देशविरोधी मुस्लिमांकडून काही खरेदी करू नका, असं ते म्हणाल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणावर बावनकुळे काय म्हणाले?

मराठा समजाला आरक्षण दिले गेले पाहिजे. ज्या ठिकाणी समाज मजबूत नाही तिथे अगोदर दिले पाहिजे. मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जबाबदारी घेतली आहे. जरांगे आणि मुख्यमंत्री हे एकत्र बसून चर्चा करणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. 

भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणावर चंद्रशेखर बावनकुळेंचं भाष्य

विदर्भातील जनेतेला दोष देण्यापेक्षा आपण कुठे चुकलो हे पाहावे लागेल. आम्हाला वाटलं मोदीजी आहेत, त्याच हवेने निवडून येऊ, इथेच आम्ही चुकलो, अशी कबुली बावनकुळे यांनी दिली. यावेळी बावनकुळेंनी भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणाच्या निकालावरही भाष्य केले. हा जनतेचा सर्व्हे नाही, मनाला शांत करणारा सर्व्हे आहे. निवणुकीच्या निकालानंतर खरी परिस्थिती समजेल. बहुमतात आम्ही सत्तेत बसू. लोकसभेच्यानंतर आता आमचा कॉन्फिडन्स वाढला आहे आणि आम्ही खूप काही शिकलो आहोत. आम्ही कुठे चुकलो, कुठे हरलो हे बघत आम्ही विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. लोकसभेत 12 जागा आम्ही 50 हजारांच्या आत हरलो. काही ठिकाणी अल्पशा कमी मतांनी हरलो. देशाचे मुद्दे बाजूला पडले आणि निवडणूक लोकवर (पंचायत) गेली. मोदीजी आले तर आरक्षणाला धक्का लागेल. विविध संभ्रम तयार करण्यात आले. त्याचा आम्हाला थोडा फटका बसला, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले.

आणखी वाचा

बावनकुळेंच्या लेकाच्या मित्रांचा ब्लड रिपोर्ट आला, दोघेही सुटण्याची शक्यता, सात तासांनी खेळ फिरला

अधिक पाहा..



Source link

शिवसेना फुटीत माघारी परतलेल्या आमदाराच्या पराभवासाठी महायुतीत व्यूहरचना; बाळापुरात कोणाची बाजी

शिवसेना फुटीत माघारी परतलेल्या आमदाराच्या पराभवासाठी महायुतीत व्यूहरचना; बाळापुरात कोणाची बाजी


अकोला : शिवसेनेतील फुटीच्या वेळी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेले आणि नंतर गुवाहाटीहून परत आलेले ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख राज्याच्या राजकारणात अचानक चर्चेत आले होते. मात्र त्यांच्याच बाळापूर मतदारसंघावरून आता महायुतीत ओढाताण सुरू झालीये. महायुतीतील (Mahayuti)  तिन्ही प्रमुख पक्षांनी बाळापूरवर आपल्या दावा ठोकलाय. मात्र, ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी कुणीही आपल्याविरोधात असलं तरी फरक पडणार नसल्याचं म्हटलंय. परिणामी आगामी विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024) कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

अकोला जिल्ह्यातील बाळापूर विधानसभा मतदारसंघहा  (Balapur Vidhan Sabha Constituency) विदर्भातील ठाकरे गटाचा आमदार असलेला एकमेव मतदारसंघ आहे. 2021 मधील राज्यातील ऐतिहासक सत्तानाट्यात हा मतदारसंघ आणि येथील आमदार देशभरात चर्चेत आलेय. याचं कारण ठरलंय सत्तानाट्यात शिंदे गटात गेलेले आमदार नितीन देशमुखांनी गुवाहाटीतून परत येत उद्धव ठाकरेंची साथ देणं, हे होय. त्यानंतर आमदार नितीन देशमुखांनी सातत्याने एकनाथ शिंदे, त्यांची शिवसेना आणि देवेंद्र फडणवीस यांना सातत्याने लक्ष्य केलंय. त्यामूळे आता या मतदारसंघात देशमुखांना कोणत्याही परिस्थितीत पराभूत करण्याची व्युहरचना महायुतीनं केलीये.

बाळापुर मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत वाद होण्याची चिन्ह? 

दरम्यान, अकोला जिल्ह्यात जागा वाटपावरून बाळापुर मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत वाद होण्याची चिन्ह आहेत. भाजपने जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकलाय. तर बाळापुर विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाचा आमदार असल्याने या मतदारसंघावर शिवसेनेच्या शिंदे गटानं मागणी केलीये. आता याच मतदारसंघावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने देखील दावा ठोकलाय. तर महायुतीतील एक घटकपक्ष असेलल्या जानकरांच्या रासपचीही बाळापुरात चाचपणी सुरूये.

महायुतीतील या पक्षांची ही नावे आहेत चर्चेत

 भाजप : तेजराव थोरात, माजी आमदार बळीराम सिरस्कार, नारायण गव्हाणकर. 
शिवसेना शिंदे गट : माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, प्रदेश समन्वयक रामेश्वर पवळ आणि माजी जिल्हाप्रमुख विठ्ठल सरप
राष्ट्रवादी अजित पवार गट : युवा नेते संदिप पाटील आणि जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे. 

तिरंगी लढतीचा हाय व्होल्टेज ड्रामा

हा मतदारसंघ महाविकास आघाडीत ठाकरे गटाला मिळण्याचं जवळपास निश्चित आहे. नितीन देशमुख येथून परत शड्डूू ठोकून आहे. दरम्यान, बाळापुर मतदारसंघात महायुतीतून कोणीही निवडणूक लढावं, आपल्याला भीती नसल्याचं आमदार देशमुख म्हणालेय.अकोला जिल्ह्यातील विधानसभेच्या पाच मतदारसंघापैकी चार जागांवर सध्या भाजपचे आमदार आहे. त्यामूळे बाळापूर ताबा मिळविण्यासाठी महायुती, महाविकास आघाडी आणि वंचित अशा तिरंगी लढतीचा हाय व्होल्टेज ड्रामा रंगणारेय.

2019 मधील बाळापूर मतदारसंघात प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते 

उमेदवार              पक्ष              मिळालेली मते 
नितीन देशमुख      शिवसेना       69,343
डॉ. धैर्यवर्धन पुंडकर वंचित         50,555
डॉ. रहमान खान      एमआयएम  44,507

विजयी : नितीन देशमुख : शिवेसना 

हे ही वाचा

अधिक पाहा..



Source link

विदर्भात ‘कोसळधार’, अनेकांच्या घरांसह गणरायांच्या मंडपातही पाणीच पाणी; डिझेल टँकरही गेला वाहून

विदर्भात ‘कोसळधार’, अनेकांच्या घरांसह गणरायांच्या मंडपातही पाणीच पाणी; डिझेल टँकरही गेला वाहून


Vidarbha Weather Update : नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना दमदार पावसाने (Heavy Rain) अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक भागात जलमयस्थिती निर्माण झाली असून अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर, अनेकांच्या शेतातील हातातोंडाशी आलेला भात पीक आणि इतर पिके जमीनदोस्त झाल्याचे चित्र आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भातील भंडार, गोंदिया, चंद्रपुर, गडचिरोलीसह आसपासच्या गावांना बसला आहे. तर अनेक गणेश मंडळात देखील पाणी शिरल्याचे बघायला मिळाले आहे. सोमवारपासून पावाचा जोर वाढल्याने अनेक गावांचा संपर्क तुटल्याचीही माहिती पुढे आली आहे. ऐकुणात या पावसाने सर्वत्र एकच दाणादाण उडवल्याचे चित्र आहे.  

नदी पुलावरून डिझेल टँकर गेला वाहून, व्हिडिओ व्हायरल 

गोंदिया जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान, वाघनदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या इशारा देण्यात आला असताना सुद्धा लोहारा जवळील वाघ नदीपात्रामध्ये एक डिझेलचा टँकर रस्त्यावरून गेला. दरम्यान हा डिझेलचा टँकर पाण्यात वाहून गेल्याच व्हिडिओ सध्या समाज मध्यमांमध्ये  मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. वारंवार प्रशासनाने सतर्कतेच्या इशारा देऊनही या ट्रक चालकाने पुलावरून पाणी वाहत असताना आपला ट्रक टाकला आणि पाण्यामध्ये वाहून गेला आहे. 

मोर्णा नदीपात्रात गेल्या 24 तासात दोन मृतदेह

दरम्यान, अकोल्यातल्या मोर्णा नदीपात्रात गेल्या 24 तासात दोन मृतदेह आढळून आले आहेत. यात एका 6 वर्षीय बालकाचा मृतदेह मोर्णा नदीच्या पाण्यात तरंगताना दिसून आलाय. या घटनेनंतर पुन्हा राजेश्वर सेतू पुलाजवळ एका 56 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळलाय. आढळून आलेल्या दोन्ही मृतदेहाचे अंतर हे अर्धा किमीपर्यत होतं. तर दोन्ही मृतकांची ओळख समोर आली असून 6 वर्षीय बालकाचे नाव दुर्गेश अनिल भालेराव असल्याचे समोर आले आहे. ज्याची बेपत्ता असल्याची तक्रार आधीच पोलिसांकडे दाखल होती. तर दुसऱ्या घटनेतील राजेश्वर सेतू पुलाजवळ आढळलेला मृतदेह सिंधी कॅम्प येथील लक्ष्मण मोहन ढोकणे यांचा असल्याची माहिती समोर आलीय. सध्या अकोला पोलीस या प्रकरणांचा तपास करत असून, मृत्यूच मूळ कारणाचा तपासही पोलीस शोधत आहेत.

रुग्णालयात शिरले पुराचा पाणी, साहित्याचं नुकसान

गोंदिया शहरात सोमवारच्या रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी शिरले आहे. गोंदिया शहरातील खाजगी सहयोग रूग्णालयमध्ये देखील पावसाचे पाणी शिरले असून यामुळे रुग्णालयातील साहित्याची नासधुस झालेली आहे. तर सरकारी बाई गंगाबाई रुग्णालयात देखील पाणी शिरल्याची माहिती पुढे आली आहे. या दोन्ही रुग्णालयात पाणी शिरल्याने रूग्णालय प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

पुरात अडकलेल्या तीन लोकांना वाचविण्यात यश  

 दुसरीकडे पुरात अडकलेल्या तीन लोकांना वाचविण्यात स्थानिक प्रशासनाला यश आले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीम सदस्यांनी तिन्ही लोकांना रेस्क्यू करून  बाहेर काढले आहे. देवरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने देवरी तालुक्यातील शिरपूर धरणाचे दरवाजे सातही दरवाजे हे साडेतीन मीटर उंचीने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वाघनदीला मोठ्या प्रमाणामध्ये पूर आलेला आहे आणि अशाच परिस्थितीत शिरपूर जवळील गावात पुरात दोन पुरुष आणि एक महिला हे अडकले होते त्यांना वाचविण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन  टीम ही दाखल झाली असून या तीनही पूर पिडीताना वाचवण्यात यश प्राप्त झाले असून यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

महायुतीत खटका… ”आजच्या घटनेमुळे शिंदे गट बदनाम झालाय”; अमोल मिटकरींचा शिवसेनेला इशारा

महायुतीत खटका… ”आजच्या घटनेमुळे शिंदे गट बदनाम झालाय”; अमोल मिटकरींचा शिवसेनेला इशारा


Amol Mitkari: अकोला : महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (Shivsena) पक्षातील शीतयुद्ध सातत्याने पुढे येत आहे. कधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरुन दोन्ही पक्षातील मतभेद चव्हाट्यावर येतात. तर, कधी दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांकडून त्यांच्या नेत्यांचे फोटो न वापरल्यावरुन कार्यकर्ते एकमेकांसमोर येतात. आता, बारामतीत शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा (Ajit pawar) फोटो काळ्या कपड्याने झाकल्याने महायुतीत पुन्हा एकदा खटका उडाला आहे. या घटनेवर आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) टिका केलीय. तर अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी दोन्ही पक्षांना टोला लावला आहे. हवसे, गवसे, नवसे कार्यकर्ते असतात, त्यातलाच हा देखील नवसा कार्यकर्ता असल्याचं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय. 

प्रत्येक पक्षात हवसे-नवसे-गवसे कार्यकर्ते असतात, त्यातलाच हा देखील नवसा कार्यकर्ता असेल. प्रकाश झोतात राहायचं होतं, म्हणून दादांनी आम्हाला वेळ दिला नाही हे कारण पुढे करत काळा कपडा टाकल्याचे अमोल मिटकरी यांनी म्हटलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्यावतीने बारामतीमध्ये गणेश फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या कमानी बारामती शहरात विविध ठिकाणी लावण्यात आल्या आहेत. त्यात, एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत. बारामती शिवसेनेच्यावतीने आयोजित एकनाथ महोत्सवाच्या उद्घाटनाला अजित पवार न आल्याने शिवसेनेच्या सुरेंद्र जेवरे यांनी अजित पवारांच्या फोटो वरती काळं कापड टाकल्याने पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना ताब्यात घेतलं होतं. त्यामुळे, बारामतीमधील हा प्रकार राज्यभर चर्चेचा विषय बनला आहे. आता, त्यावर, आमदार अमोल मिटकरी यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. त्यामुळे, महायुतीत पुन्हा एकदा शिवसेना-राष्ट्रवादी आमने-सामने आले आहेत. 

शिंदे गट बदनाम झालाय

अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना वेळ भेटला नसेलय. काळा कपडा टाकून ठेवला म्हणजे बारामतीचा विकास झाकला असं नाहीय. दरम्यान, काळा कपडा टाकून सूर्याला झाकण्यासारखं हा प्रकार असल्याचंही मिटकरी यांनी म्हटलंय. तसेच, काळे झेंडे दाखवणारे आणि आजचा हा प्रकार करणारे हौसे कार्यकर्ते, त्यांच्या वागण्याने त्यांच्याच पक्षाची प्रतिमा मलिन होते. आजच्या प्रकारामुळे शिंदे गट बदनाम झालाय, तिन्ही पक्षात एकवाक्यता असल्याशिवाय विधानसभेच्या निवडणुकीत यश प्राप्त होऊ शकणार नाही. त्यामुळं वरिष्ठांनी अशांना सक्त तंबी दिली पाहिजे, असेही मिटकरी यांनी म्हटले. आमच्याही भावना आहेत, भावनांचा उद्रेक झाल्यास मोठा विध्वंस होणार, असा इशाराही मिटकरी यांनी शिवसेनेला दिलाय. 

काय आहे प्रकरण

सुरेंद्र जेवरे हे शिवसेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष आहेत. अजित पवारांना तीन ते चार वेळा कार्यक्रमाला येण्यासाठी विनंती केली परंतु अजित पवारांनी या कार्यक्रमाला पाठ फिरवली. अजित पवारांच्या कुटुंबाला देखील बोलावलं होतं, परंतु अजित पवारांनी बारामतीतल्या छोट्या मोठ्या गणपती मंडळांना भेटी दिल्या, पण एकनाथ फेस्टिवलला आले नसल्याने अजित पवारांच्या फोटोवर शिवसेनेकडून काळ कापड टाकण्यात आलं. तसेच, अजित पवारांचा निषेध केला, त्यानंतर पोलिसांनी सुरेंद्र जेवरे यांना ताब्यात घेतले होते.

हेही वाचा

ठाकरेंना दे धक्का! मराठवाड्यातील माजी आमदार साथ सोडणार; विधानसभेपूर्वीच घेतला निर्णय

अधिक पाहा..



Source link

प्रकाश आंबेडकरांच्या मतांचा फायदा थेट भाजपला; काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांचा घणाघात 

प्रकाश आंबेडकरांच्या मतांचा फायदा थेट भाजपला; काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांचा घणाघात 


Balwant Wankhede अकोला : अमरावतीचे (Amravati) काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे (Balwant Wankhede) यांनी वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)  यांच्यावर नाव न घेता टीका केलीये. महाविकास आघाडीचं मतविभाजन करू पाहणाऱ्या लोकांपासून जनतेने सावध राहण्याचं आवाहन खासदार बळवंत वानखेडे यांनी केलंय. ते अकोला येथे बोलत होते. आंबेडकरांच्या मतांचा फायदा थेट भाजपला होत असल्याचा आरोपही त्यांनी त्यांचं नाव न घेता केलाय. आंबेडकरांनी अमरावती मतदारसंघात उमेदवार उभा केला होता. मात्र, आपण आंबेडकरांच्या रक्ताचा आणि विचारांचा वारसदार असल्याचं खासदार बळवंत वानखेडे म्हणालेय.

प्रतापराव जाधव यांना सत्तेच्या शिवाय दुसरं काहीच सुचत नाही  

दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील गोमाल गावातील तीन अतिसाराच्या(Diarrhea) रुग्णांचा  मृत्यू  झाला आहे. गोमाल हे गाव अतिशय दुर्गम भागात असल्याने या ठिकाणी कुठल्याही प्रकारे वाहन जायला रस्ता नसल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे तीन रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतरही आरोग्य प्रशासनाला या रुग्णांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप अस्पष्ट असल्याचं तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उज्वला पाटील यांनी एबीपी माझा शी बोलताना सांगितलंय. त्यामुळे गोमाल गावात अतिसाराची लागण असल्यावरही बुलढाणा आरोग्य प्रशासन मात्र याबाबत अनभिज्ञ असल्याची माहिती आहे.  याविषयी बोलताना खासदार बळवंत वानखडे यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर टीका केलीय. त्या लोकांना सत्तेच्या शिवाय दुसरं काहीच सुचत नसल्याचं खासदार वानखेडे म्हणालेय.

राहुल गांधींनी आपला स्वभाव बदलल्याने कार्यकर्त्यांना मोठी ताकद- बळवंत वानखडे

लवकरच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. हीच शक्यता लक्षात घेता राज्यभरातील पक्षांनी आतापासूनच या निवडणुकीची तयारी केली आहे. सभा, बैठका, रॅली यामार्फत लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न राज्यातील सर्वच पक्ष करत आहेत. विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळाव्यात यासाठी राजकीय रणनीतीकारांची मदत घेतली जात आहे. भाजपासारखा राष्ट्रीय पक्ष केंद्रातील नेत्यांनाही महाराष्ट्रात प्रचारासाठी बोलवणार आहेत. असे असतानाच आता काँग्रेसनेही या निवडणुकीसाठी मोठी योजना केली आहे. पक्षातर्फे काँग्रेसचे सध्याचे सर्वोच्च नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. ते विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रभर जाहीर सभा घेणार असून त्यासाठी काँग्रेसने नियोजन चालू केले आहे. 

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या सभांचा मोठा फायदा काँग्रेसला होणार असल्याचेही काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे म्हणाले. राहुल गांधींनी आपला स्वभाव बदलल्याने कार्यकर्त्यांना मोठी ताकद मिळाली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदावर काहीही बोलायला त्यांनी नकार दिलाय.

हे ही वाचा  

 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp