गौतमी पाटीलनं नाकारली बिग बॉसची ऑफर; नेमकं कारण काय?

गौतमी पाटीलनं नाकारली बिग बॉसची ऑफर; नेमकं कारण काय?


Gautami Patil Bigg Boss Offer : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो बिग बॉस मराठी सध्या प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसत आहे. यंदा बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन सुरु आहे. बिग बॉसच्या घरातील सर्वच सदस्य एकापेक्षा एक वरचढ ठरताना दिसत आहेत. यंदाचा बिग बॉसचा शो तुफान चर्चेत आहे. प्रेक्षकांचा शोला चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. बिग बॉसचा यंदाचा सीझन सुरु होण्याआधी अनेक सेलिब्रिटींच्या नावाची चर्चा रंगली होती. अनेक सेलिब्रिटींना ऑफर होती, मात्र त्यातील काही सेलिब्रिटींना बिग बॉसची ऑफर नाकारली. नृत्यांगणा गौतमी पाटील हिला बिग बॉस मराठीची ऑफर आली होती, मात्र ही ऑफर तिने नाकारली. यामागचं कारण जाणून घ्या.

गौतमी पाटीलनं नाकारली बिग बॉसची ऑफर

प्रसिद्ध नर्तकी गौतमी पाटील (Gautami Patil) नेहमीच तिच्या डान्समुळे चर्चेत असते. गौतमी पाटीलचा मोठा चाहतावर्ग आहे. बिग बॉसचा यंदाचा सीझन सुरु होण्याआधी गौतमी पाटीलच्या नावाची चर्चा रंगली होती. गौतमी पाटीलने आता या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. गौतमी पाटीलने सांगितलं आहे की, तिला बिग बॉस मराठीची ऑफर होती, पण तिने ही ऑफर नाकारली. ही बातमी समोर येताच आता गौतमी पाटीलने बिग बॉसची ऑफर का नाकारली, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

बिग बॉसची ऑफर नाकारण्यामागचं कारण काय?

गौतमी पाटील हिने तिला बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी ऑफर आल्याचं मान्य केलं आहे. गौतमी पाटीलने अमरावतीमधील एका कार्यक्रमात टीव्ही9 सोबत बोलताना याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी गौतमी पाटीलने सांगितलं की, मला बिग बॉसची ऑफर होती, पण आधीच शो आणि प्रोगाम असल्यामुळे ही ऑफर नाकारली.


‘भविष्यात बिग बॉसमध्ये नक्की जाईल’

गौतमी पाटील पुढे म्हणाली की, ‘माझे कार्यक्रम आधीच बुक असतात. खूप आधीपासून कार्यक्रम बूक होतात, त्यामुळे मला यावेळी बिग बॉसमध्ये जायला नाही जमलं. कारण, मी बरेच आधी कार्यक्रम बूक केले होते आण आपली दहीहंडी, गणपती हे सर्व सण त्याचं काळात आले म्हणून मला जमलं नाही. भविष्यात बिग बॉसमध्ये नक्की जाईल.’, असंही गौतमीनं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..





Source link

गौतमी पाटील विधानसभा निवडणूक लढवणार का? दोन वाक्यात स्पष्ट उत्तर, म्हणाली…

गौतमी पाटील विधानसभा निवडणूक लढवणार का? दोन वाक्यात स्पष्ट उत्तर, म्हणाली…


अमरावती: राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्या नेत्यांना उमेदवारी मिळणार, याची चर्चा सुरु झाली आहे. अशातच प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांना अमरावतीमधील एका कार्यक्रमात राजकीय क्षेत्रात प्रवेश करण्याबाबत विचारणा करण्यात आली. यावेळी गौतमी पाटील (Gautami Patil) याने मी राजकारणात कधीच प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले. 

अमरावतीमधील गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. या पार्श्वभूमीवर तिला विचारण्यात आलं की, तुमची लोकप्रियता एखाद्या राजकीय नेत्याइतकी आहे. मग तुम्ही कधी राजकारणात जाण्याचा विचार केलाय का, तुमचा तसा काही विचार आहे का, असा प्रश्न गौतमीला विचारण्यात आला. यावर गौतमी पाटीलने म्हटले की, मी अगोदरचं म्हटलं आहे की, राजकारणाचा आणि माझा काहीही संबंध नाही. मी एक कलाकार आहे. मी कला दाखवते. मी डान्स करते, बाकी नाही. मी राजकारणात अजिबात  जाणार नाही, असे गौतमी पाटील हिने सांगितले. 

मी पश्चिम विदर्भात पहिल्यांदा आले आहे. अमरावतीत येण्याची पहिलीच वेळ आहे. सकाळपासून मी प्रेक्षकांचं प्रेम पाहते आहे. प्रेक्षकांचं प्रेम पाहून मी भारावून गेले आहे. मला सकाळपासून भेटायला लोक येत आहेत. संतोष बद्रे यांनी मला अमरावतीत बोलावलं त्यांच्यामुळे मला अमरावतीकरांचं प्रेम पाहण्यास मिळतं आहे. मला बुधवारच्या कार्यक्रमातही छान वाटलं. मला सकाळपासून आराम मिळालेला नाही. पण अमरावतीकरांचं प्रेम पाहून मला खूप आनंद झाला, असे गौतमीने म्हटले.

गौतमी पाटीलचा तरुण मुलींना लाखमोलाचा सल्ला

 गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात महिला अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. अमरावतीमध्येही बाहेरुन अनेक मुलं-मुली शिकायला येतात. त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल, असा प्रश्न गौतमीला विचारण्याता आला. त्यावर गौतमीने म्हटले की, इथे बाहेरगाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छिते की, स्वतःची काळजी घ्या. लढायचं राहिलं तर बिनधास्त लढा. कुणाच्या दबावाखाली राहू नका, आवर्जून नडा, असे गौतमी पाटीलने म्हटले.

गौतमी पाटीलसोबत आमदार संदीप धुर्वे यांच्या डान्सची जोरदार चर्चा 

भाजप आमदार संदीप धुर्वे यांनी उमरखेड येथील एका दहीहंडी कार्यक्रमात  नृत्यांगना गौतमी पाटील हिच्यासोबत डान्स केला होता. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यावरुन विरोधकांनी संदीप धुर्वे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. या टीकेला संदीप धुर्वे यांनी प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की, माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आग्रह होता की,आमचे सर्व तरूण मुले आहेत. जमाव अतिशय मोठा होता. गौतमी पाटील या खूप फेमस आहेत. कोणासोबत नाचत नाही, मात्र ती माझ्या सोबत नाचली, असे धुर्वे यांनी म्हटले.

आणखी वाचा

अधिक पाहा..



Source link

अकोल्यात महायुतीत मिठाचा खडा? बाळापूर विधानसभेतून एकनाथ शिंदेंच्या शिलेदारानं ठोकला शड्डू!

अकोल्यात महायुतीत मिठाचा खडा? बाळापूर विधानसभेतून एकनाथ शिंदेंच्या शिलेदारानं ठोकला शड्डू!


अकोला : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर अकोल्यात (Akola) जागा वाटपावरून महायुतीत (Mahayuti) वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यातील विधानसभेच्या पाच मतदारसंघापैकी चार जागांवर सध्या भाजपचे (BJP) आमदार आहेत. तर बाळापूर विधानसभा मतदारसंघात (Balapur Vidhan Sabha Constituency) शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहे. भाजपने जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकला आहे. तर शिवसेनेच्या शिंदे गटाने बाळापूरसह अकोट विधानसभा मतदारसंघाची मागणी केल्याने दोन्ही पक्षात जागा वाटप करून मोठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. 

बाळापूर विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राज्य समन्वयक रामेश्वर पवळ (Rameshwar Pawal) यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. ते पक्षाकडे बाळापुरातून उमेदवारी मिळावी, यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. यासोबतच पक्षाच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पवळ यांना उमेदवारी देण्याची मागणी पक्षाकडे केली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे राज्य समन्वयक असलेले नरेश म्हस्के खासदार झालेले असताना दुसऱ्या राज्य समन्वयकांना शिंदे विधानसभेची उमेदवारी देणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

बाळापुरातून विजयश्री खेचून आणणार

यासंदर्भात शिवसेनेचे राज्य समन्वयक रामेश्वर पवळ म्हणाले की, मतदारसंघावर दावा करणे हा प्रत्येक पक्षाचा अधिकार आहे. मात्र महायुतीतील जागावाटप हे पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेतूनच होईल. अकोला लोकसभा मतदारसंघातील बाळापुर, अकोट आणि रिसोड या तीन मतदारसंघावर आमचा दावा आहे. बाळापूर हा आमचा नैसर्गिक दावा असलेला मतदारसंघ आहे. पक्षाने आपल्याला संधी दिली तर निश्चितच बाळापुरातून विजयश्री खेचून आणू. नितीन देशमुखांनी मतदारसंघात कोणताही विकास केलेला नाही. नितीन देशमुख यांचं राजकारण ब्लॅकमेलिंगच आहे. त्यांच्याकडे कोणत्या ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप असतील त्या त्यांनी खुशाल लोकांसमोर आणाव्यात, असे त्यांनी म्हटले आहे.

कोण आहेत रामेश्वर पवळ ?

रामेश्वर पवळ हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राज्य समन्वयक आहेत. 1990 सालापासून ते राजकारणात सक्रीय आहेत. अकोला, वाशीम आणि बुलढाणा हे तिन्ही जिल्हे त्यांचे राजकीय कार्यक्षेत्र आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटन सचिव आणि प्रदेश सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केले आहे. राष्ट्रवादीत असताना शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. राष्ट्रवादीत असताना राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांना त्यांनी पक्षात आणले होते. 

आणखी वाचा

एकनाथ खडसेंनी सुनेला लोकसभेत पोहोचवलं, आता मुलीसाठी सोयीस्कर राजकारण; चंद्रकांत पाटलांचा टीकेचा बाण

अधिक पाहा..



Source link

पावसाचा हाहा:कार! हाता तोंडाशी आलेलं पीक वाहून गेलं, बैल पोळा सणाला शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी

पावसाचा हाहा:कार! हाता तोंडाशी आलेलं पीक वाहून गेलं, बैल पोळा सणाला शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी


Vidarbha Weather Update : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना दमदार पावसाने (Heavy Rain) अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक भागात जलमयस्थिती निर्माण झालीय. तर, अनेकांच्या शेतातील हातातोंडाशी आलेलं पीक डोळ्यादेखत जमीनदोस्त झाल्याचे चित्र आहे. परिणामी आज शेतकऱ्यांचा सण असलेल्या बैल पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी असल्याचे चित्र पुढे आले आहे. अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळाच्या सक्रीयतेमुळं राज्यभरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे.

तर विदर्भ (Vidarbha Weather Update) मराठवाड्यात पावसानं सर्वत्र एकच हैदोस घातला असून अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसानं दाणादाण उडवली आहे. तर अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती ओढावल्यानं जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिकांचीही तारांबळ उडाली आहे. दरम्यान, हवामान विभागानं आज देखील विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून पावसाचा जोर लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाने नागरिकांना दिल्या आहेत.

बैल पोळा सणाला शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी

यवतमाळ जिल्ह्यात सलग दोन दिवसाच्या पावसाने जिल्ह्यातील 16 तालुक्याला अक्षरशः झोडपून काढलं आहे. यावर्षीच्या पावसाळ्यातील हा सर्वांत मोठा पाऊस मानला जात आहे. या पावसाने शेत शिवारातील पीक खरखून गेली आहे. तर जवळपास 200 घरांची पडझड झाली असल्याची माहिती पुढे आली आहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात 24 तासांमध्ये 83 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. सर्वाधिक 129 मिमी पावसाची नोंद वणी तालुक्यात करण्यात आली. पुसद, बाभूळगाव, कळंब, राळेगाव, घाटंजी, महागाव आणि उमरखेड तालुक्याला या पावसाचा सर्वधिक फटका बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार साडेचार हजार हेक्टरचे नुकसान यात झाले असले तरी वास्तवात मात्र हेच नुकसान आठ ते दहा हजार हेक्टर वर असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोळा या सणाच्या दिवशी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आल आहे. परिणामी, या परिस्थितीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

पुराचे पाणी शिरल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल 

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या अकोलखेड गावात नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे. अकोलखेड गावातील अनेक रस्त्यांवर नदीचे स्वरूप आले. दरम्यान, आज सकाळपासूनच अकोला जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस झालाय. त्यात सातपुडा पर्वतरांगामध्ये देखील संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अकोल्यातल्या सर्वच धरणातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अकोल्यातील अकोट तालुक्यातल्या पोपटखेड धरणात देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळीत वाढ झाली. त्यामुळे आज दुपारपासूनच पोपटखेड धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीला पूर आलाय. 

परिणामी, नदीकाठच्या अकोलखेड गावात पुराचे पाणी शिरल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. तर अचानक आलेल्या नदीच्या पुरामुळे अकोलखेड ग्रामस्थांचे रात्री हाल होत आहेत आणि गावकरी रस्त्यावर आले आहेत. ऐकूणच ग्रामस्थांचा प्रचंड गोंधळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. दरम्यान कालपासूनच संबंधित विभागानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही दिला होता.

आजोबांचं नसतं धाडस चांगलेच अंगलट आलं!

दमदार पावसाचा फटका विदर्भातील वाशिम जिल्ह्याला देखील बसला आहे. यात एका वयोवृद्ध आजोबांचं धाडस चांगलेच अंगलट आलं आहे. पुलावरून पाणी वाहताना पूल पार करणे या आजोबांना महागात पडले आहे. आज कारंजा तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला असून जयपूर – शहा गावाच्या लगत असलेल्या पुलावर पावसाच्या पुराचं पाणी वाहत असतांना एका वयोवृद्ध आजोबांनी नसतं धाडस केलंय. मात्र हे धाडस आजोबाच्या जीवावर बेतता बेतता राहीलंय. 

आजोबा पुलावर पाणी वाहताना वाहून जातांना दोन्ही बाजूला पुलावर उभ्या नागरिकांनी पाहिले आणि धावपळ करत अर्धा किलोमीटर दूर आजोबाला वाचवण्यात यश आलं.  तर पुलावर पाणी वाहताना अनेकांनी ट्रॅक्टरवर काही नागरिकांना बसवून  वाहत्या पुलाच्या पाण्यातून ट्रॅक्टर  चालवण्याचा धाडस केले. सुदैवाने कोणताच अनुचित प्रकार घडला नसला तरी. नसती उठाठेव का बरं नागरिक करतात असा प्रश्न उपस्थित होतांना दिसतोय.

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

विदर्भाला मुसळधार पावसानं झोडपलं; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, अजित पवार यांचा दौराही रद्द

विदर्भाला मुसळधार पावसानं झोडपलं; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, अजित पवार यांचा दौराही रद्द


Vidarbha Weather Update : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना दमदार पावसाने (Heavy Rain) अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसामुळे अनेक भागात जलमयस्थिती निर्माण झालीय. तर, अनेकांच्या शेतातील हातातोंडाशी आलेला भात पीक आणि इतर पिके जमीनदोस्त झाल्याचे चित्र आहे. तर खराब वातावरण आणि मुसळधार पावसामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा पुसद दौरा रद्द करण्यात आला आहे. यवतमाळच्या पुसद मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज नियोजित जनसन्मान यात्रा रद्द झाली आहे. विदर्भात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. खराब वातावरण आणि पावसामुळे हा दौरा रद्द झाल्याची माहिती आमदार इंद्रनील नाईक यांनी दिली आहे.

पावसाचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसला आहे. शनिवाराच्या दुपारपासून कोसळणाऱ्या पावसाने अनेक ओढे, नदी, नाले ओसंडून वाहू लागले आहे. तर पुढील काही तास पावसाचा जोर कायम असल्याच्या इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. अशातच भंडाऱ्यात वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची बातमी पुढे आली आहे. त्यामुळे पवासचा जोर लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

रात्रीभरात 53 मंडळात अतिवृष्टी, पावसाचा रेड अलर्ट जारी

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार यवतमाळ जिल्ह्यात दिवसभवर रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय. काल रात्रीपासून यवतमाळ जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसामुळे प्रकल्प, नदी, नाले ओसंडून वाहू लागले आहे. अशातच काल रात्री जिल्ह्यातील 53 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. महागावच्या अधरपूस प्रकल्पाचे 10 गेट एक सेंटीमीटरने उघडण्यात आले असून 1080 पाण्याचा विसर्ग यातून होत आहे. तर बेंबळा प्रकल्पाचे दहा दरवाजे 50 सेंटिमीटरने उघडण्यात आले असून पाणी पातळी नियंत्रण आणली जात आहे. पुसद येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हा प्रशासनाकडून या ठिकाणी SDRF चे एक पथक नागपूरवरून बोलावण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती पाहता सर्व  विभाग प्रमुख यांना मुख्यालयीच राहण्याचे निर्देश दिले आहे. या पावसामुळे पुसद तालुक्यातील ईसापुर ते शेंबाळपिंपरी, पुसद ते वाशिम, यवतमाळ ते पुसद, दिग्रस ते पुसद हे रस्ते बंद झाले आहेत 

सातपुडा पर्वतरांगात ‘जोर’ धार  

मुसळधार पावसामुळे अकोल्यातील पोपटखेड धरणाचे दरवाजे उघण्यात आले. अकोला जिल्ह्यातील आकोट तालुक्यातल्या सातपुडा पायथ्याशी असलेले पोपटखेड धरणाचे 2 दरवाजे उघण्यात आले. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान सातपुडा पर्वतरांगात सुरू असलेल्या सततंधार पावसामुळे पोपटखेड धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ झालीये.  परिणामी, आज धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

विदर्भ मराठवाड्याच्या संपर्क तुटला

रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने महागाव, पुसद तालुक्याला चांगलेच झोडपले असुन नदी, नाले ओसंडून वाहू लागले आहे. या भागात शेतीचे मोठे नुकसानही झाले आहे. या पावसामुळे यवतमाळच्या महागाव तालुक्यातील धनोडा येथील पैंनगंगा नदीला पूर आला आहे. त्यामुळे विदर्भ मराठवाड्याच्या संपर्क तुटला आहे. आज सकाळी साडे दहा वाजतापसून पुलावरून पाणी जात असल्याने नागरिकांना यावरून वाहतूक करू नये, अशा सूचना प्रसासनकडून देण्यात आल्या आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

Akola Crime : अकोल्यात चॉकलेटचं आमिष दाखवून काढली तीन अल्पवयीन मुलांची छेड

Akola Crime : अकोल्यात चॉकलेटचं आमिष दाखवून काढली तीन अल्पवयीन मुलांची छेड


Akola Crime : अकोल्यात चॉकलेटचं आमिष दाखवून काढली तीन अल्पवयीन मुलांची छेड
आता एक धक्कादायक बातमी आहे अकोल्यातून..
राज्यभरात अल्पवयीन मुलींवर घडत असलेल्या अत्याचाराच्या घटना ताजा असतानाच अकोल्यातील पातुर शहरात चॉकलेटचं आमिष दाखवून तीन अल्पवयीन मुलांची छेड काढल्याची धक्कादायक घटना घडलीये. ‘आत्माराम ससाने’असं या छेड काढणाऱ्याचं नाव आहे. चॉकलेटच आमिष देत मुलांना कपडे काढायला लावायचा, असा आरोप या मुलांच्या कुटुंबियांनी केलाय..परंतु अद्यापपर्यंत ससानेवर कुठलीही कारवाई न झाल्याने अखेर कुटुंबियांनी  पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलेय. मुलांना त्रास देणाऱ्या संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांकडून होतीये 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp