गणेश चतुर्थीपूर्वीच भाजपने गणेश हाकेंचं विसर्जन करू नये, अमोल मिटकरींचा पलटवार

गणेश चतुर्थीपूर्वीच भाजपने गणेश हाकेंचं विसर्जन करू नये, अमोल मिटकरींचा पलटवार


Maharashtra Politicis अकोला : भाजप प्रवक्ते गणेश हाके (Ganesh Hake) यांच्या अजित पवारांवरील (Ajit Pawar) वक्तव्याचा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी जोरदार समाचार घेतलाय. गणेश हाकेंवर टीका करताना आमदार मिटकरींनी हाकेंसारख्या विद्वान माणसाच्या ज्ञानाचा भाजप उपयोग करत नसल्याचं म्हटलंय. त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी हाकेंनी असं विधान केल्याचे मिटकरी म्हणालेय. आमचा पक्ष हाकेंसारख्यांना कवडीची किंमत देत नसल्याचंही मिटकरी म्हणालेय. गणेश चतुर्थीपूर्वीच भाजपाने गणेश हाकेंचं विसर्जन करू नये, ही काळजी त्यांनी घ्यावी असा टोलाही यावेळी आमदार अमोल मिटकरी यांनी लगावलाय

गणेश हाकेंची पक्षातली अवस्था बाण लागलेल्या राजहंसा सारखी- अमोल मिटकरी

भाजपचे प्रवक्ते  गणेश हाके हे अतिशय सज्जन,सात्विक आणि बुद्धिमान प्रतिमा असलेले व्यक्तिमत्व  आहे. मात्र त्यांच्या या सज्जनतेला आणि बुद्धिमत्तेला त्यांच्या भाजप पक्षाने का गांभीर्याने घेतलं नाही, हा माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला पडलेलं  कोडं आहे.  इतक्या वर्षांपासून उपेक्षित असलेले गणेश हाके यांना आता तरी विधानसभे साठी संधी मिळेल, या आशे पोटी त्यांनी राष्ट्रवादी पक्षावर टीका केली.  मात्र गणेश हाके यांची त्यांच्याच पक्षातली अवस्था बाण लागलेल्या राजहंसा सारखी आहे. त्यामुळे त्यांना नवी ऊर्जा प्राप्त होण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. मात्र आम्ही त्यांना कवडीचीही किंमत देत नाही. अशा सज्जन माणसाचे  हाल देखील आम्हाला बघवत नाही. त्यामुळे गणेश हाके यांनी गणेश चतुर्थीच्या आधीच पक्षाने त्यांचे विसर्जन करू नये, या बाबत काळजी घ्यावी, अशी बोचारी टीका आमदर अमोल मिटकरी यांनी गणेश हाकेंवर केली आहे.

नेमकं काय म्हणाले होते गणेश हाके?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. अशातच आता महायुतीतील नेते ऐकमेकांवर टीका टिप्पणी करताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर झालेली युती ही दुर्देवी आहे. हा असंगाशी संग केला असल्याचे वक्तव्य भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी केलं आहे. दरम्यान, हाके यांच्या वक्तव्यामुळं महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जातेय. 

लोकसभा निवडणुकीत अहमदपूरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार बाबासाहेब पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते बाहेर पडलेच नाहीत. यामुळे भाजपाच्या खासदाराचा पराभव झाल्याचे गणेश हाके म्हणाले. त्यामुळं अजित पवार गटाबरोबर झालेली युती दुर्देवी आहे. खरं म्हणजे ती युती ना त्यांना पटली ना आम्हाला पटली. असंगशी संग म्हणतात असा संग आमच्यासोबत घडवला आहे असं हाके म्हणाले. दरम्यान, हाके यांच्या वक्तव्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते काय भूमिका घेणार हे पाहणं देखीवल महत्वाचं ठरणार आहे. कारण मागील दोन दिवसापूर्वीच शिवसेना शिंदे गटाचे नेते आमि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसवर जहरी टीका केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी ताँग्रेसचे नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

Akola Crime : चॉकलेटचं आमिष दाखवून 3 चिमुकल्यांवर अत्याचार; बदलापूर घटनेची अकोल्यात पुनरावृत

Akola Crime : चॉकलेटचं आमिष दाखवून 3 चिमुकल्यांवर अत्याचार; बदलापूर घटनेची अकोल्यात पुनरावृत


Akola Crime News अकोला : राज्यभरात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना समोर येत असतानाच अकोल्यातून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. यात अकोला जिल्ह्यातल्या पातुर शहरात चॉकलेट आणि बिस्कीटचं आमिष दाखवून 3 लहान मुलांची छेड (Sexual Abuse) काढल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. पातूरात तीन अल्पवयीन मुलांना एक व्यक्ती सतत चॉकलेटचं आमिष दाखवत सोबत नेण्याचा प्रयत्न करीत होता.

दरम्यान,एक दिवस तिन्ही मुलं सोबत जाण्यास नकार देत असल्याने या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून मुलांनी शाळेत जाणं टाळलं होतं. त्यामुळे नातेवाईकांनी मुलांना विचारणा केली असता, मागील महिनाभरापासून एक व्यक्ती सतत त्रास देत असल्याचं (Crime News) त्यांनी सांगितलं आणि पुढे हा प्रकार समोर आलाय. धक्कादायक बाब म्हणजे पातुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतरही कुठलीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. त्यामुळे बदलापूर प्रकरणाची पुनरावृत्ती अकोल्यात तर नाही ना, असा संशय आता व्यक्त केला जात आहे.

बदलापूर प्रकरणाची पुनरावृत्ती

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आरोपी चॉकलेटच आमिष देत मुलांना कपडे काढायला लावायचा, असा आरोप कुटुंबियांनी केलाय. या प्रकरणात पातुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. परंतु अद्यापपर्यंत आरोपीवर कुठलीही कारवाई न झाल्याने अखेर कुटुंबियांनी  पोलीस अधीक्षक कार्यालय गाठलेय. मुलांना त्रास देणाऱ्या संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबीयांकडून केली जात आहे. घटनेतील आरोपी पातूरमध्येच एका शासकीय नोकरीवर असल्याची माहिती समोर आलीये. मात्र या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. 

10 वर्षीय मुलीवर अत्याचार

नुकतीच अशीच एक घटना अकोल्यात घडली झाली होती. यात  जन्मदात्या पित्याने 10 वर्षांच्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. त्रास सहन न झाल्यानं मुलीनं अखेर बाल न्यायालयासमोर वडिलांची तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे.  

अकोला जिल्ह्यातल्या हिंगणा तामसवाडी गावात एका 10 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. पीडित मुलीच्या दूरच्या नातेवाईकाने अत्याचार केला होता. मुलीला नातेवाईकांकडे ठेवून आई वडील बाहेर गेले असताना याच संधीचा फायदा घेत पीडित मुलीचा दूरचा नातेवाईक असलेला यश गवई याने तिच्यावर बळजबरी अत्याचार केला. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच अकोटफैल पोलीसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 

सुरुवातीला वडिलांकडून पुढं मामानेही केलं लैंगिक शोषण

दुसरीच्या वर्गात असल्यापासून वडील अत्याचार करत असल्याची माहिती पीडित मुलीने दिली. पीडित मुलीच्या या तक्रारीनंतर वडिलांवर देखील अत्याचाराचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. सद्यस्थितीत अत्याचार करणारा दूरचा नातेवाईक आणि वडील हे दोघेही अटकेत आहेत. दरम्यान, अत्याचार करणाऱ्या वडील आणि नात्यातील मामावर कठोर शिक्षा व्हावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

भाजपच्या उत्तर भारतीय आघाडीच्या उपाध्यक्षावर प्राणघातक हल्ला; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ 

भाजपच्या उत्तर भारतीय आघाडीच्या उपाध्यक्षावर प्राणघातक हल्ला; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ 


Akola Crime News अकोला : अकोला शहरातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. यात अकोल्यातील भाजप (BJP) पदाधिकारी तथा बिल्डरवर चाकू हल्ला झाल्याची खळबळजनक घटना उजेडात आली आहे. दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी हा चाकू हल्ला (Crime News) केल्याची माहिती पुढे आली आहे. तर रामप्रकाश मिश्रा असे या हल्ल्यात जखमी झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांचे नाव आहे. मिश्रा हे घरासमोर वाहनातून खाली उतरले असता त्यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक चाकू हल्ला केलाय.

काल रात्री उशिरा ही घटना घडली आहे. मात्र हा हल्ला नेमका का? आणि कुणी केला? हे अद्याप कळू शकलेलं नाहीये. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. मात्र या घटनेमुळे अकोल्याच्या राजकीय वर्तुळासह शहरातही मोठी खळबळ उडाली आहे.

अकोल्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ       

दरम्यान, चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या मिश्रा यांना तातडीने त्यांचे वाहन चालक आणि नातेवाईकांनी उपचारार्थ रुग्णालयात दाखल केलेय. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काल रात्री उशिरा त्यांच्यावर वैद्यकीय शस्त्रक्रिया पार पडलीय. जमखी रामप्रकाश मिश्रा हे मुळ बिल्डर व्यावसायिक असून ते भाजपमध्ये सक्रिय आहेत. भाजपमध्ये  ते उत्तर भारतीय आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत. मिश्रा यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्याचे मूळ कारण  हे अद्यापपर्यंत समजलं नाहीय. याप्रकरणी खदान पोलीस अधिक तपास करत आहेत. मिश्रा हे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे प्रबळ दावेदार आहे. त्यामुळे राजकीय संघर्षापोटी तर हा हल्ला झाला नाही ना? अशी शंकाही वर्तवली जात आहे. मात्र पोलीस तपासात यातील अंतिम सत्य बाहेर येणार असले तरी सध्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या वाहनाची महसूल मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाला धडक, दोन जखमी

महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे लोणी येथून संगमनेर शहरात एका कार्यक्रमासाठी येत असताना शहर पोलीस ठाण्याचे वाहन आणि पालकमंत्री विखे-पाटील यांच्या ताफ्यातील कार्यकर्त्यांचे वाहन यांच्यात धडक झाली. या अपघातत महिला पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी असे दोन जण जखमी झाले. रात्री नऊच्या सुमारास कोल्हार-घोटी राज्य मार्गावर समनापुर येथील गणपती मंदिरासमोर हा अपघात घडला. सहायक पोलीस निरीक्षक सोनल फडोळ, पोलीस कॉन्स्टेबल विजय आगलावे अशी जखमी झालेल्या पोलिसांची नावे आहेत. तर महसूल मंत्री विखे-पाटील यांनी जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची रुग्णालयात येऊन भेट घेत योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

   

इतर महत्वाच्या  बातम्या 

अधिक पाहा..



Source link

धक्कादायक! शालेय पोषण आहाराच्या मसाल्यामध्ये चक्क मृत पाल; अकोल्यात चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ

धक्कादायक! शालेय पोषण आहाराच्या मसाल्यामध्ये चक्क मृत पाल; अकोल्यात चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ


Akola News अकोला : अकोल्यातून एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. यात अकोल्याच्या (Akola News) शालेय पोषण आहाराच्या मसाल्यामध्ये चक्क मसाल्याच्या सिल पॅकेटमध्ये मृत पाल आढळलीये. अकोल्यातल्या तेल्हारा तालुक्यातल्या तळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये हा खळबळजनक प्रकार घडलाय. काल, गुरुवारी  दुपारी 2 वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आलाय. 

दरम्यान, मृत पाल आढळल्याचा मुद्दा अकोला जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभेत प्रचंड गाजलाय. सत्ताधारी वंचितचे जिल्हा परिषद सदस्य रामकुमार गव्हाणकर यांनी हा मुद्दा उपस्थित केलाय. जिल्ह्यात पूरवठा केलेला शालेय पोषण आहाराचा पुरवठा परत बोलावून घ्या आणि तात्काळ शालेय पोषण आहार थांबवण्यात यावा, अशी मागणी गव्हाणकरांनी सभागृहात केलीय. तर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्या जात आहे, आणि शालेय पोषण आहार मसाला पूरवठा करणाऱ्याला ब्लॅकलिस्ट करण्यात येणार असल्याचा अहवाल पाठवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी सभागृहात दिलीय.

दरम्यान, राज्यात सतत घडणाऱ्या या प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील जिल्हा परिषद शाळेत पोषण आहार म्हणून देण्यात येणारं पोषण आहार आता विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय का?  शाळेत मध्यान्ह भोजनाचा भाग असलेला आहाराच्या माध्यमातून चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ खेळला जातोय का? की एखादी मोठी दुर्घटना झाल्यावरच या प्रकाराला आळा बसणार आहे? असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहे. काही दिवसांपूर्वी सांगलीमध्ये पोषण आहारात मृत साप आढळला होता. तर त्यानंतर  उंदराची विष्ठाही आढळून आली होती. तर तिकडे वाशिम, यवतमाळ, अमरावती मध्ये मिलेट्सयुक्त चॉकलेटमध्ये चक्क अळ्या आढळून आल्याचे प्रकरण पुढे आले आहे. त्यामुळे प्रशासनाचा उद्देश जरी चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी फोल ठरली असल्याने ही योजना आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तर दुसरीकडे यातून एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यताही बळावली आहे.

विषबाधा झाल्याचे अनेक प्रकार समोर

शालेय विद्यार्थ्यांना शाळेसोबत शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शालेय पोषण आहार योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र या योजनेसाठी पुरवठा केला जाणार आहारातील माल निकृष्ठ दर्जाचा पुरवठा होत असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असून यातून नक्की पोषण कुणाचे केलं जातय, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. शाळेत शालेय पोषण आहारासाठी या अगोदर अळ्या, किडे,  पाल पडल्याने विषबाधा झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी करून अशा प्रकारे शाळेत निकृष्ट दर्जाचं शालेय पोषण आहार देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी देखील होऊ लागली आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

सिंधुदुर्गातील शिवाजी महाराजांचा पुतळा पडला की पाडला? प्रकाश आंबेडकरांची खळबळजनक शंका

सिंधुदुर्गातील शिवाजी महाराजांचा पुतळा पडला की पाडला? प्रकाश आंबेडकरांची खळबळजनक शंका


Prakash Ambedkar अकोला : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्यासंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी अतिशय मोठं आणि धक्कादायक विधान केलंय.‌ पुतळा कितीही कमजोर असला तरी पडू शकत नाहीय. त्यामुळे मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला की पाडला गेलाय? असा संशय प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलाय.

प्रकाश आंबेडकरांच्या या दाव्यानंतर मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहेय. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी ही प्रकाश आंबेडकर यांनी केलीये. तर या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे जनतेची माफी का मागत नाही?, याचाही खुलासा करण्याचं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. दरम्यान, तिसऱ्या आघाडी संदर्भात 10 सप्टेंबरला बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल असं ते म्हणाले. ते अकोला येथे बोलत होते.  

संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा-  प्रकाश आंबेडकर

सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारका संदर्भात अनेक वक्तव्य पुढे आले आहेत. परंतु धातूचा पुतळा हा कितीही कमजोर असला तरीही तो पडू शकत नाही. जुन्या काळात देखील बाबासाहेबांचा, महात्मा फूले किंवा इतर महापुरुषांचे पुतळे असतील ते गावागावत बसवले गेलेत. त्यावेळी ते नुसते चबुतर्‍यावर बसवले गेलेत. मात्र ते कधी पडल्याची घटना घडली नाही. पुतळे विद्रूप करण्याच्या, विटंबना करण्याच्या बातम्या आजवर आल्या आहेत. मात्र पुतळा पडल्याच्या बातम्या माझ्या तरी बघण्यात अथवा ऐकण्यात नाही. त्यामुळे मला असा संशय येतो आहे की हा पुतळा पडला की पाडला?

कारण राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती बघता ती कधी या बाजूला तर कधी त्या बाजूला आहे. त्यामुळे जनतेचे लक्ष विचलित करण्याचे काम तर यात केल्या गेल्या नाही ना? अशा संशयाला जागा आहे. त्यामुळे या पुतळा पडला की पाडला याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

स्ट्रक्टरल कन्सल्टंट चेतन पाटीलला मध्यरात्री कोल्हापुरातून उचललं

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला बांधकाम सल्लागार (स्ट्रक्चरल कन्सल्टंट) चेतन पाटील याला पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री कोल्हापूरमधून ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतल्यानंतर त्याला मालवण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. त्यानंतर चेतन पाटील (Chetan Patil) याला पुढील चौकशीसाठी मालवणात नेण्यात आले. पोलिसांचे पथक त्याला घेऊन तातडीने मालवणच्या दिशेने रवाना झाले होते. चेतन पाटीलला मालवण पोलीस स्थानकात आणण्यात आले असून दुपारी साडेतीन  वाजता मालवण दिवाणी न्यायालयात दाखल केले जाणार आहे.  या सुनावणीत काय घडणार, हे पाहावे लागेल.

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

तानाजी सावंतांकडून काय अपेक्षा करणार? त्यांना हाफकिन माणूस आहे की संस्था? हे समजत नाही : मिटकरी

तानाजी सावंतांकडून काय अपेक्षा करणार? त्यांना हाफकिन माणूस आहे की संस्था? हे समजत नाही : मिटकरी


Amol Mitkari on Tanaji Sawant : आता बस्स झालंय… आता राष्ट्रवादीची महायुतीतील घटक पक्षांकडून होत असलेली अवहेलना सहन होत नसल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केलं आहे. त्यांनी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी राष्ट्रवादीवर केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतलाय. तानाजी सावंत सारख्या माणसाला हाफकिन माणूस आहे की संस्था?  हे ज समजत नाही, त्याच्याकडून काय अपेक्षा करणार? असा टोला आमदार अमोल मिटकरी यांनी लगावला.  

अमोल मिटकरी हे अकोला येथे ‘एबीपी माझा”शी बोलत होते. यावेळी त्यांनी तानाजी सावंत यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी आता या दोन्ही पक्षांच्या लोकांना आवर घालावा. नाहीतर आता आमचा संयम सुटेल असा इशारा आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या पक्षाला दिला. तानाजी सावंत सारख्या माणसाला हाफकिन माणूस आहे की संस्था?,  हे ज समजत नाही त्याच्याकडून काय अपेक्षा करणार आहे? असा टोला आमदार अमोल मिटकरी यांनी यावेळी लगावलाय. 

नेमकं काय म्हणाले तानाजी सावंत? 

आपण हाडामासाचे शिवसैनिक आहोत. आयुष्यात कधी आपले काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आज जरी कॅबिनेटमध्ये पटलेले नाही. राष्ट्रवादीबरोबर मांडीला मांडी लावून बसत असलो तरी बाहेर आलो की उलट्या होतात, आपल्याला त्यांची अॅलर्जी आहे, असे वक्तव्य आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केल्याचे एका व्हायरल व्हिडिओतून समोर आले आहे. तानाजी सावंत नागरिकांशी संवाद साधतानाचे व्हिडिओ वायरल झाले आहेत. यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तोंडसुख घेतल्याच्या चर्चा आहेत. यामध्ये ते म्हणतात, अगदी शिकत असल्यापासून आपल्यात शिवसेनेचे विचार परिपूर्ण भिनलेले आहेत. म्हणूनच काँग्रेस, राष्ट्रवादीची आपल्याला अॅलर्जी आहे. पुडी खाल्ल्यावर जशी उलटी होते तशी. आम्ही तत्वाशी बांधील आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.

तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा

दरम्यान, तानाजी सावंत यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीआधी (Vidhan Sabha Election 2024) महायुतीतील (Mahayuti) धुसपूस समोर आली आहे. आता यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या (NCP Ajit Pawar Group) नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. तानाजी सावंत यांच्यावर कारवाई करावी. नाहीतर तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा अशी मागणी केलीय.

महत्वाच्या बातम्या:

तानाजी सावंतांमुळे कॅबिनेटची लेव्हल खाली आली, एकतर त्यांना बाहेर काढा नाहीतर आम्हाला बाहेर पडू द्या; अजितदादा गटाचा नेता संतापला

 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp