नितेश राणेंना नेपाळला पाठवायला जनता उत्सुक; हिंदु्त्वाच्या मुद्द्यावरुन मिटकरींचा पलटवार

नितेश राणेंना नेपाळला पाठवायला जनता उत्सुक; हिंदु्त्वाच्या मुद्द्यावरुन मिटकरींचा पलटवार


अकोला : राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन चांगलच राजकारण तापलं आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना पुतळा दुर्घटनेवरुन पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाऊन पुतळा दुर्घटनेची पाहणी केली. यावेळी, शिवसेना उबाठा ठाकरे गट आणि राणे पिता-पुत्र आमने सामने आल्याने चांगलाच तणाव निर्माण झाला होता. या तणावाच्या घटनेनंतर शिवसेनेकडून राणे पिता-पुत्रांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. त्यातच, महायुतीमधील आमदार अमोल मिटकरी यांनीही फोटो ट्विट करत पुतळा दुर्घटनेवरुन महायुती सरकारला टोला लगावला. त्यावरुन, आता आमदार अमोल मिटकरी आणि नितेश राणे यांच्यात जुंपली आहे. अमोल मिटकरी यांनी नितेश राणेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना, त्यांना नेपाळला पाठविण्यासाठी महाराष्ट्रातील जनता उत्सुक असल्याचं म्हटलंय. 

सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील पुतळा दुर्घटनेनंतर महायुती सरकारची बाजू मांडत विरोधकांवर राणे कुटुंबीयांकडून प्रतिहल्ला केला जात आहे. विरोधकांच्या टीकेला राणेंकडून पलटवार केला जात आहे. आता, त्यावरुन शिवसेना उबाठ पक्षाचे पदाधिकारी व आमदार नितेश राणे आमने-सामने आल्याचं दिसू येतंय. तर, महायुतीमधील घटकपक्ष असलेल्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari)नितेश राणे (Nitesh Rane) यांच्यातही जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार मिटकरींच्या टिकेवरुन टीका करताना, अमोल मिटकरी यांचं हिंदुत्त्व तपासण्याची वेळ आलीय, असे नितेश राणेंनी म्हटलं होतं. त्यावरुन, मिटकरींनी पलटवार केला आहे.     

भाजप आमदार नितेश राणे यांनी सांगलीत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचं हिंदुत्व तपासण्याची वेळ आल्याचं वक्तव्य केलंय. तसेच, मिटकरींना हिंदू धर्मातून हाकलण्याची वेळ आलीय, असेही त्यांनी म्हटलं आहे. आता, स्वत:वरील टीकेला आमदार अमोल मिटकरींनीही जशात तसं प्रत्युत्तर दिलंय. नितेश राणे सारख्यांनी आपल्याला हिंदूत्व शिकवू नये असे मिटकरींनी म्हटले. तसेच, मालवणच्या पुतळा प्रकरणावर चकार शब्द न बोलणारे नितेश राणे या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्यासाठीच असे वक्तव्य करीत आहेत. राणेंनी हिंदू धर्मात किती वेद, किती शास्त्र आणि किती पुराणं आहेत, याचं उत्तर दिलं तर त्यांना आपण खरं हिंदू समजू, असा टोलाही अमोल मिटकरींनी लगावला आहे. तसेच, महाराष्ट्रातील जनता नितेश राणेंना नेपाळमध्ये पाठवायला उत्सुक असल्याचे म्हणत खोचक टीकाही मिटकरी यांनी केली आहे. 

महायुतीत ठिणगी?

दरम्यान, अमोल मिटकरी हे महायुतीमधील आमदार आहेत. तर नितेश राणे हेही महायुतीमधील भाजपचे आमदार आहेत. विशेष म्हणजे दोघेही सरकारमधील आमदार असल्याने या दोघांमुळे आता महायुतीत ठिणगी पडते की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यापूर्वी महायुतीच्या मेळाव्यात प्रवक्ते, पदाधिकारी व आमदारांना एकमेकांवर टीका करण्यापूर्वी वरिष्ठांना विचारा, असा सल्लाही दिला होता.

हेही वाचा

IAS Transfer : राज्यातील 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; मनीषा आव्हाळेंवर पुण्यात मोठी जबाबदारी

अधिक पाहा..



Source link

अकोला हादरलं! 10 वर्षीय मुलीवर अत्याचार; सुरुवातीला वडिलांकडून पुढं मामानेही केलं लैंगिक शोषण

अकोला हादरलं! 10 वर्षीय मुलीवर अत्याचार; सुरुवातीला वडिलांकडून पुढं मामानेही केलं लैंगिक शोषण


Akola Crime News अकोला: अकोल्यात जन्मदात्या पित्याने 10 वर्षांच्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. त्रास सहन न झाल्यानं मुलीनं अखेर बाल न्यायालयासमोर वडिलांची तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे.  

अकोला जिल्ह्यातल्या हिंगणा तामसवाडी गावात एका 10 वर्षीय मुलीवर अत्याचार (Akola Crime News) झाल्याची घटना समोर आली होती. पीडित मुलीच्या दूरच्या नातेवाईकाने अत्याचार केला होता. मुलीला नातेवाईकांकडे ठेवून आई वडील बाहेर गेले असताना याच संधीचा फायदा घेत पीडित मुलीचा दूरचा नातेवाईक असलेला यश गवई याने तिच्यावर बळजबरी अत्याचार केला. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच अकोटफैल पोलीसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. 

दुसरीच्या वर्गात असल्यापासून वडील अत्याचार करत असल्याची माहिती पीडित मुलीने दिली. पीडित मुलीच्या या तक्रारीनंतर वडिलांवर देखील अत्याचाराचा गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.  सद्यस्थितीत अत्याचार करणारा दूरचा नातेवाईक आणि वडील हे दोघेही अटकेत आहेत. दरम्यान, अत्याचार करणाऱ्या वडील आणि नात्यातील मामावर कठोर शिक्षा व्हावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचं आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले. 

अल्पवयीन मुलींवर अत्याचार-

सिंदखेडराजा तालुक्यातील एका शाळेत अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या आरोपी शिक्षकाला मेहकर सत्र न्यायालयाने बुधवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. 23 ऑगस्ट रोजी तालुक्यातील एका शाळेत चौथ्या वर्गातील मुलींवर शाळेतील शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्याच दिवशी ग्रामस्थांनी एकत्र येऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्याने पोलिसांनी तत्काळ संबंधित शिक्षकाविरुद्ध पोक्सो, अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करत अटक केली होती.

आणखी वाचा:

Jay Malokar’s Mother : अटॅक असता तर रिपोर्टमध्ये आलं असतं, जयसोबत घातपात झाला; राज ठाकरेंच्या भेटीनंतर जय मालोकारच्या आईचा मोठा दावा

अधिक पाहा..



Source link

संभाजीराजेंच्या भेटीनंतर बच्चू कडूंचा सरकारवर हल्लाबोल; तिसऱ्या आघाडीबाबत मोठं वक्तव्य

संभाजीराजेंच्या भेटीनंतर बच्चू कडूंचा सरकारवर हल्लाबोल; तिसऱ्या आघाडीबाबत मोठं वक्तव्य


मुंबई : राज्यात एकीकडे आगामी विधानसभा निवडणुकांचे वेध लागले असताना दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना आणि सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यावरुन राज्यातील राजकारण तापलं आहे. महाविकास आघाडीकडून राज्य सरकारला धारेवर धरलं जात आहे, तर अशा घटनांचे विरोधकांनी राजकारण करु नये, असे सत्ताधारी म्हणत आहेत. तर, मराठा उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तिसरी आघाडी उभारली जाते की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे आणि प्रहारचे बच्चू कडू यांची आज भेट झाली. या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना 15 दिवसांत तिसऱ्या आघाडीचा निर्णय जाहीर करू, असे बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

आज छत्रपती संभाजीराजे (Sambhajiraje) यांच्यासमवेत माझी चर्चा झाली, मी एक कार्यकर्ता म्हणून संभाजीराजेंसोबत आहे. देशातील आर्थिक विषमता दूर करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. एक सैनिक म्हणून आम्ही महाराजांसोबत आहोत, असे म्हणत लवकरच भूमिका जाहीर करणार असल्याचं बच्चू कडू (Bachhu kadu) यांनी म्हटलं. मुख्यमंत्र्यांकडे विविध मागण्या करुनही त्याची कोणतीही अंमलबजावणी होत नाही. कारण, सरकारवर कोणाचाही दबाव राहिलेला नाही. तर, विरोधी पक्षात असलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde), अजित पवार आणि विखेपाटील यांच्यासारखे नेते बाहेर पडल्याने विरोधीपक्ष कमकुवत बनला आहे. त्यामुळेच दबावासाठी तिसऱ्या आघाडीची बांधणी आम्ही करतोय. छ संभाजीराजे, रात्नराज आंबेडकर यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. त्यानुसार, पुढच्या 15 दिवसांत तिसऱ्या आघाडीबाबत आम्ही घोषणा करू अशी प्रतिक्रिया प्रहारचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी दिली.

उठाबशा काढून माफी मागा

दरम्यान, सिंधुदुर्गातील किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी बच्चू कडू यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना, महाराजांच्या पुतळ्याबाबत उद्घाटन प्रसंगी असलेल्यांनी उठाबशा काढून माफी मागावी, असा टोला बच्चू कडू यांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांना लगावला आहे.  तर, संभाजीराजे यांनीही पुतळा दुर्घटनेवरुन सरकारला प्रश्न विचारले आहेत. महाराष्ट्राला हे परवडणारं नाही, यापुढे पुतळा बसवताना सर्व मापदंड लक्षात घेऊनच पुतळ्याची उभारणी करायला हवी, असेही संभाजीराजेंनी म्हटले.  

जानकरांकडून स्वबळाची चाचपणी

राज्यात महायुतीतील आणखी एक पक्ष स्वबळावर लढण्याची चाचणी करतोय. महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षांनं राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातही चाचणी सुरू केली आहे. राज्यात सोहळ्याच्या दृष्टीने तयारी करत असल्याची माहिती रासपचे महादेव जानकर यांनी अकोल्यात बोलतांना दिली. अकोल्यात उद्या रासपचा 21 वा वर्धापन दिन सोहळा होतोय. त्यादृष्टीने जानकर यांनी स्वबळाच्या दृष्टीने केलेल्या वक्तव्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाला आहे. त्यातच, आता बच्चू कडू आणि संभाजीराजे यांनी तिसऱ्या आघाडीबाबत भाष्य केलं आहे. विशेष म्हणजे संभाजीराजे यांनी काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. त्यावेळी देखील जरांगे यांच्यासोबत राजकीय चर्चा झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तर, मनोज जरांगे हे पुढील काही दिवसांत त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत. 

हेही वाचा

मोठी बातमी : म्हाडाच्या 370 घरांच्या किंमतीत कपात, अत्यल्प,ते उच्च सगळ्या घरांच्या किमती उतरल्या, नव्या किमती तुमच्या बजेटमध्ये?

अधिक पाहा..



Source link

गुंडांच्या सततच्या त्रासाला कंटाळून तरुणीचे टोकाचे पाऊल; कुटुंबियांनाही जीवे मारण्याची धमकी

गुंडांच्या सततच्या त्रासाला कंटाळून तरुणीचे टोकाचे पाऊल; कुटुंबियांनाही जीवे मारण्याची धमकी


Akola Crime News : अकोला जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात एका विद्यार्थिनीने एका सडकछाप गुंडाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न (Crime News) केलाय. ही विद्यार्थीनी मुर्तिजापूर तालूक्यातील माना पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या एका गावातील रहिवासी आहे. ती मुर्तिजापूर येथे शिक्षणासाठी गावावरून ये-जा करीत होती. दरम्यान, गावातीलच एका गुंडप्रवृत्तीच्या तरूणाने तिला धमकावत तिच्यासोबत फोटो काढलेत. या फोटोच्या आधारावर तिला तो ब्लॅकमेल करीत लैंगिक अत्याचाराची (Sexual Abuse) धमकी देत होता. अखेर या विद्यार्थीनीने त्याच्या धमक्यांना घाबरत काल, 26 ऑगस्टला घरी किटकनाशक प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केलाय. प्रकृती गंभीर असलेल्या या तरुणीवर अकोला जिल्हा रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरूयेत. 

दरम्यान, या संपुर्ण प्रकाराबाबत पोलिसांना अद्याप कोणतीही माहिती नाहीये. मुलीच्या वडिलांना तक्रार न करण्यासाठी धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप कुटूंबियांकडून होतो.  त्यामुळे भयभीत झालेल्या पिडीत मुलीचे वडील तक्रार न देण्याच्या मनस्थितीत आहेत. तर दुसरीकडे या प्रकरणातील गुंडप्रवृत्तीचा तरूण अद्याप मोकाटच असल्याचे बघायला मिळत आहे. त्यामुळे या प्रकरणी आता नेमकी काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

चिमुकल्यांवरील अत्याचारांच्या घटनेनं महाराष्ट्र हादरला 

सध्या देशभरातली स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोलकात्यात डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरण, बदलापुरातील (Badlapur Crime) चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरण दोन्ही घटनांनी देश पुरता हादरून गेला. अशातच राज्यातील अनेक प्रकार आता पुढे येऊ लागले आहे. सातत्याने घडणाऱ्या या घटनांचे प्रकरण ताजे असतानाच अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा गावातून अशीच एक संतापजनक घटना उजेडात आली आहे.

यात दुचाकीने गावी सोडण्याच्या बहाण्याने एसटी बसची वाट पाहत उभ्या असलेल्या एका 15 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना पुढे आली आहे. हे कृत्य गावच्या सरपंच पुत्राकडून झाले असून मार्डीच्या जंगलात नेत या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री 8.30 च्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा पोलिसांनी गुन्हा नोंदवून उशिरा रात्री त्या नराधमाला अटक केली. मात्र या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली आहे. 

शिक्षकाला रोडरोमियो कडून मारहाण

दुसरीकडे अशीच एक घटना वाशिम येथे घडली आहे. यात वाशिमच्या रिठद  येथील परिसरातील 8 ते 10 गावचे विद्यार्थी शाळेत शिक्षणाचे धडे घेण्यासाठी येतात. मात्र, वाशिम रिसोड मार्गावरील बस थांब्यावर विद्यार्थ्यांनी घरी परतत असतांना काही रोडरोमियो तरुणींची छेडखाणी करत असल्याचे प्रकरण पुढे आले. दरम्यान शाळेतील एक शिक्षक विद्यार्थिनींना सोडण्यासाठी गेले असता त्यांना काही मुलं छेड काढतांना दिसले. त्यावर शिक्षणाने त्यांना टोकले असता या तरुणांनी चक्क शिक्षकांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. तर या संदर्भात वाशिम ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसात गुन्ह्याची नोंदही करण्यात आली आहे. सध्या या घटनेचा अधिक तपास वाशिम पोलीस करत आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

दुचाकीवर घरी सोडण्याचे आमिष, अमरावतीत सरपंच पुत्राचे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

दुचाकीवर घरी सोडण्याचे आमिष, अमरावतीत सरपंच पुत्राचे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार


School Sexual Assault Case : सध्या देशभरातली स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोलकात्यात (Kolkata Case) डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरण, बदलापुरातील (Badlapur Crime) चिमुकल्यांवरील अत्याचार प्रकरण, या दोन्ही घटनांनी देश पुरता हादरून गेला. अशातच बदलापूरची घटना ताजी असतानाच अमरावती (Amravati Crime News) जिल्ह्यातील कुऱ्हा गावातून अशीच एक संतापजनक घटना उजेडात आली आहे.

यात दुचाकीने गावी सोडण्याच्या बहाण्याने एसटी बसची वाट पाहत उभ्या असलेल्या एका 15 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार (Sexual Abuse) केल्याची घटना पुढे आली आहे. हे कृत्य गावच्या सरपंच पुत्राकडून झाले असून मार्डीच्या जंगलात नेत या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री 8.30 च्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा पोलिसांनी गुन्हा नोंदवून उशिरा रात्री त्या नराधमाला अटक केली. मात्र या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

दुचाकीवर लिफ्ट देतो म्हणाला अन् थेट जंगलात नेत अत्याचार  

या प्रकरणातील पीडित विद्यार्थी ही अमरावती येथील शाळेत नवव्या वर्गात शिकते आणि दररोज एसटी बसने ये-जा करते. शनिवारी सायंकाळी ती स्टँडवर एसटी बसची वाट पाहत उभी होती. याच दरम्यान अमरावती येथे आलेल्या सरपंच पुत्राने गावाच्या वाटेवर तिला हेरले. त्याने तिला गावी सोडण्यासाठी दुचाकीवर लिफ्ट देतो म्हणाला, तेव्हा विद्यार्थीनीने सुरुवातीला नकार दिला, मात्र त्यानंतर तिने मोबाईलवरून कुटुंबीयांना त्याच्यासोबत घरी येत असल्याची माहिती दिली. दरम्यान, गावापासून अवघ्या काही अंतरावर आरोपीने अचानक दुचाकी जंगलाच्या दिशेने वळवली. तो तिला गावाच्या मार्गातील जंगलात घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला. हे संपूर्ण प्रकरण उजेडात येताच याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली असून पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.  

खर्ऱ्याची उधारी वसूल करण्यासाठी लैंगिक अत्याचार

बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलींवर सफाई कामगारानेच लैंगिक अत्याचार केल्याने महाराष्ट्रासह संपूर्ण देशात खळबळ उडाली. या घनटेनंतर राज्यात प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेनंतर छत्रपती संभाजीनगर, सातारा, नाशिक, पुणे अशा महत्त्वाच्या आणि मोठ्या जिल्ह्यांतूनही अल्पवयीन मुली, महिलांवरील अत्याचाराची अनेक प्रकरणं समोर आली. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या या प्रकरणांचा निषेध म्हणून विरोधकांनीही संपूर्ण राज्यभर आंदोलन केले. दरम्यान, आता चंद्रपूर जिल्ह्यातून अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराची आणखी एक गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार खर्ऱ्याची उधारी वसूल करण्यासाठी चंद्रपूरमध्ये एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करण्यात आलं आहे. चंद्रपूर शहरातील दुर्गापूर येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या लैंगिक शोषणातून पीडित मुली गर्भवती झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. 

हे ही वाचा 

 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp