महिलांना बंदूक बाळगण्याची परवानगी द्या, मी बंदूक वाटप करेल; शिंदे गटाच्या नेत्यांचं अजब वक्तव्य

महिलांना बंदूक बाळगण्याची परवानगी द्या, मी बंदूक वाटप करेल; शिंदे गटाच्या नेत्यांचं अजब वक्तव्य


Maharashtra Politics अमरावतीबांगलादेश (Bangladesh Violence) येथे झालेल्या हिंदू मुलींवर अत्याचार करणाऱ्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे कारवाई करणार आहेच. मात्र मी स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की, महिलांना रिवाल्वर बाळगण्याची परवानगी द्यावी, त्यांनी परवानगी दिली तर मी  अमरावतीमध्ये सर्व महिलांना माझ्या कडून रिवाल्वर घेऊन देईल, असे अजब दावा शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी नानकराम नेभनानी यांनी केला आहे.

बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचारच्या निषेधार्थ आणि पिडीत हिंदूंच्या समर्थनार्थ अमरावती शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने विराट हिंदू मोर्चा आयोजीत करण्यात आला आहे. या विराट मोर्चात भाजप, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि विविध हिंदू संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह हजारो अमरावतीकर रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करत आहे. यात भाजपचे खासदार अनिल बोंडे, नवनीत राणा देखील सहभागी झाल्या होत्या.दरम्यान, हा मोर्चा नेहरू मैदानावरून सुरू झाला असून इर्विन चौकात जाहीर सभा झाल्यावर या मोर्चाचे समापन होणार होतं. यावेळी बोलताना नानकराम नेभनानी यांनी हे वक्तव्य केले आहे.

…तर अमरावतीमध्ये सर्व महिलांना माझ्या कडून रिवाल्वर 

नानकराम नेभनानी हे शिवसेना शिंदे गटाचे मुख्य समन्वयक, शिवसेना प्रणित सिंधी समाज  महाराष्ट्र संघटक असून जिल्हा नियोजन समितीचे ते विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्त आहेत. दरम्यान राज्यात सध्या घडत असलेल्या महिलांवरील अत्याचारांच्या घटनावर भाष्य करताना महिलांना रिवाल्वर बाळगण्याची परवानगी द्यावी, अशी अजब मागणी नानकराम नेभनानी यांनी केली आहे.

तर पुढे बोलताना ते म्हणाले की, याबाबत  परवानगी दिली तर मी स्वत: अमरावतीमध्ये सर्व महिलांना माझ्या कडून रिवाल्वर घेऊन देईल, असे भाकीतही नेभनानी यांनी केलं आहे. त्यामध्ये दोन-तीन लोकं मेले तरी चालेल, पण चुकीचा माणूस वाचू नये, त्याचं मी समर्थन करेल, त्यामध्ये लागणाऱ्या कोर्ट कचेरीचा संपूर्ण खर्चही मी करेल. सोबतच त्यांच्या परिवारावर काही आलं तर त्यासाठी मी समोर राहील. असेही वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे नानकराम नेभनांनी यांनी सकल हिंदू समाजाच्या मोर्च्या दरम्यान केलं आहे.

वाशिमच्या मंगरुळपीर शहर बंदची हाक

बांग्लादेशमध्ये हिंदूवर झालेल्या  अत्याचाराच्या निषेधार्थ  हिंदुत्ववादी संघटने कडून वाशिमच्या मंगरुळपीर शहर बंदची हाक देण्यात आली. या वेळी विविध हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत विशाल निषेध मोर्चाच आयोजन केले. बांगलादेशमध्ये सत्तापालट झाल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारा मध्ये हिंदू बांधवांचा क्रूरपणे छळ झाल्याने हिंदू दैवताचे मंदिर आणि जाळपोळ करून हिंदूंच्या संपत्तीवर जबरण कब्जा करणे, हिंदूंची मंदिरे तोडन्यात आल्याच्या  अनेक घटना पुढे आल्याचे सांगत या घटनेचा निषेध करण्यासाठी आज मंगरुळपिर शहर बंद ठेवण्यात आले. या बंदला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलाय.

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

अमोल मिटकरी-मनसेच्या राड्यानंतर राज ठाकरे प्रथमच आज अकोल्यात, विदर्भ दौऱ्याची सांगता

अमोल मिटकरी-मनसेच्या राड्यानंतर राज ठाकरे प्रथमच आज अकोल्यात, विदर्भ दौऱ्याची सांगता


Akola News अकोला : मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आज आपल्या विदर्भ दौऱ्यातील शेवटच्या टप्प्यात अकोल्यात (Akola News) येणार आहेत. आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास वाशिमवरून राज ठाकरे अकोल्यासाठी निघाले आहेत. राज ठाकरे अकोला शहरातील गोरक्षण मार्गावरच्या शुभमंगल कार्यालयात जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. यावेळी ते अकोला जिल्ह्यातील पक्षसंघटनेचा आढावा देखील घेणार असल्याचे बोलले जात आहे. राज ठाकरे यांच्या दोऱ्यानिमित्ताने मनसेनं त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केलीये. 

दरम्यान, मागच्या महिन्यात मनसे (MNS) आणि  आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्यात झालेल्या राड्यानंतर राज ठाकरे प्रथमच आज अकोल्यात येत आहे. परिणामी, या राड्यावर राज ठाकरे काही बोलतात का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. याबरोबरच अकोल्यातील एखादा उमेदवार ते जाहीर करणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, दिवंगत मनसे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या कुटूंबियांनाही राज ठाकरे भेटतील  अशी शक्यता वर्तवली जात आहे. दुपारी 2 वाजता ते अकोल्यातील बैठक आटोपून बुलडाणा जिल्ह्यातील शेगावकडे प्रयाण करतील, अशी माहितीही पुढे आली आहे.

राज्यात मनसेसाठी पोषक वातावरण – राज ठाकरे

महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, आम्ही त्यात येतं नाही. मात्र आगामी काळात त्यांच्यात तिकीट वाटपावरून इतक्या हाणामाऱ्या होतील की पक्ष बेजार होतील. एक झलक आपण लोकसभेच्या वेळी बघितली. प्रत्येकालाच निवडणुकीसाठी उभं राहायचं असल्याचे चित्र सध्या त्यांच्याकडे दिसत आहे. असेअसले तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी राज्यात पोषक वातावरण आहे. गेल्या पाच वर्षात राज्याच्या राजकारणात जो काही खेळ झाला, त्या सगळ्या खेळीला आता लोक कंटाळले आहेत. त्यामुळे राज्यात अधिकाअधिक जागा आम्ही लढणार असल्याचेही राज ठाकरे यापूर्वीच म्हणाले आहेत. त्यामुळे आज राज ठाकरे अकोल्यातील एखादा उमेदवार ते जाहीर करणार का?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरेंनी घोषित केलेले मनसेचे 6 उमेदवार

1. बाळा नांदगावकर – शिवडी, मुंबई
2. दिलीप धोत्रे – पंढरपूर  
3. लातूर ग्रामीण – संतोष नागरगोजे
4. हिंगोली विधानसभा – बंडू कुटे
5. चंद्रपूर – मनदीप रोडे
6. राजुरा – सचिन भोयर
7. वणी – राजू उंबरकर

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनेचा सिलसिला सुरूच! अकोला, अमरावतीत पुन्हा ‘तेच’ कृत्य

चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचारांच्या घटनेचा सिलसिला सुरूच! अकोला, अमरावतीत पुन्हा ‘तेच’ कृत्य


School Sexual Assault Case : कोलकातामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या महिला डॉक्टरचा अमानुष छळ आणि  त्यानंतर तिची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. ही घटना ताजी असताना अशीच एक धक्कादायक घटना बदलापूर (Badlapur Crime) शहरात घडली. बदलापूरच्या एका नामांकित शाळेतील चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केल्याच्या संतापजनक प्रकार उजेडात आला. या संपूर्ण प्रकारचे पडसाद आता राज्यासह देशातही उमटत असताना राज्यात गेल्या काही दिवसात अशाच प्रकारचे अनेक प्रकरण पुढे आले आहे. 

दरम्यान, अकोला जिल्ह्यातील काजीखेड येथील घटना ताजी असतानाच पुन्हा अकोला जिल्ह्यातील हिंगणा तामसवाडी गावात एका 10 वर्षीय मुलीवर अत्याचार झालाय. तर दुसरीकडे अमरावती शहरातील चपराशीपुरा भागातील मनपा मराठी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 13 मध्ये पिटी शिकवणाऱ्या  शिक्षकाने 14 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनी सोबत विनयभंग  केलाय. त्यामुळे सुसंस्कृत आणि पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय? असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जाऊ लागलाय.

अकोल्यात पुन्हा 10 वर्षीय मुलीवर अत्याचार 

बदलापूर आणि अकोला जिल्ह्यातील काजीखेड येथील घटना ताजी असतानाच पुन्हा अकोला जिल्ह्यातील हिंगणा तामसवाडी गावात एका 10 वर्षीय मुलीवर अत्याचार झालाय. अकोला शहरातल्या अकोटफैल पोलीस स्टेशनमध्ये हद्दीतील हिंगणा तामसवाडी येथे ही घटना घडलीये. तेल्हारा तालुक्यातील कुटुंब काही कामानिमित्त वल्लभनगर येथील आपल्या नातेवाईकांकडे आले होते. त्यानंतर त्यांनी मुलीला नातेवाईकांकड ठेवून ते बाहेर गेले होते. याच संधीचा फायदा घेत मुलीचा दूरचा नातेवाईक असलेला यश गवई याने तिच्यावर बळजबरी करत अत्याचार केलाय. 

दरम्यान, घडलेला सर्व प्रकार 10 वर्षीय चिमुकलीने आई-वडिलांना सांगितला. त्यांनी लागलीच अकोटफैल पोलीस स्टेशन गाठलं.  त्यानुसार या प्रकरणात पोलिसांनी रात्री (376 जुना कायदा) अत्याचार आणि बाल संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणातील संशयित आरोपी यश गवई याला देखील अटक केली आहे. आज सकाळी 4 वाजता हा गुन्हा दाखल झाला आहे. 24 वर्षीय आरोपी यश गवईवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आलीये. पोलीस उपविभागीय अधिकारी सतिष कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात हा गुन्हा दाखल झालाय.

14 वर्षीय विद्यार्थीनीसोबत शिक्षकानेच केला विनयभंग

दरम्यान, अशीच एक संतापजनक घटना अमरावतीत  घडली असून यात एका 14 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनी सोबत पिटी शिकवणाऱ्या शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना उजेडात आली आहे. अमरावती शहरातील चपराशीपुरा भागातील मनपा मराठी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक 13 मधील ही घटना आहे. या प्रकरणी आरोपी शिक्षकावर विनयभंग सह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून शिक्षकाला रात्री अटक करण्यात आली आहे. तर हे प्रकरण उजेडात येताच परिसरात संतापाची लाट उसळली आहे.  

अल्पवयीन मुलगी ही शाळेत गेली तेव्हा शाळेच्या ब्रेक दरम्यान ती आजारी पडल्याने तिला वर्गात बसविले होते.  तेव्हा सगळे मुलं-मुली तिच्या भोवती गोलाकार जमा झाले. तेव्हा पिडित विद्यार्थिनी सर्वांच्या मागे उभी होती आणि तिच्या मागे पिटीचे शिक्षक उभे राहिले. दरम्यान पिडीत विद्यार्थिनीचा या शिक्षकाने विनयभंग केला. यापूर्वी सुद्धा याच शिक्षकाने पिडितेला  असाच प्रकार करत चल बाहेर फिरून येऊ, असे म्हटले होते. हा सगळा प्रकार पिडीत विद्यार्थिनीनी आपल्या आईला सांगितला तेव्हा 22 तारखेला फेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि पिटी शिक्षक रियाज सर याच्यावर विनयभंग सह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून रात्री त्याला अटक केलीय.

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

Akola News: अकोला विनयभंगप्रकरणी मोठी कारवाई, नराधम शिक्षक सेवेतून बडतर्फ

Akola News: अकोला विनयभंगप्रकरणी मोठी कारवाई, नराधम शिक्षक सेवेतून बडतर्फ


अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर (Akola News)  तालुक्यातल्या काजीखेड येथील विद्यार्थिनींचे छेडखानी आणि विनयभंग प्रकरण आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. आरोपी शिक्षक प्रमोद सरदारला सेवेतून बडतर्फ करण्यात आलंय. तर शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र समदूर आणि केंद्रप्रमुखाला कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलंय. तर आता अनेक राजकीय पक्षांनी या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केलीये.

 अकोल्यातील काजीखेडच्या जिल्हा परिषद शाळेत झालेल्या प्रकारामुळे जनमानस चांगलंच संतप्त झालंय. शाळेतील शिक्षक प्रमोद सरदार याने आठ वर्गातील सहा विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज या विरोधात अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी निदर्शने करीत दोषींवर कडक कारवाईची मागणी केलीये. दरम्यान प्रकरणातील आरोपी शिक्षक प्रमोद सरदारवर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आलीये. त्याला जिल्हा परिषदेने शिक्षक पदावरून बडतर्फ केलंय.  दरम्यान बाळापूर ते ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी आज गावातील शाळेला भेट दिलीये. त्यांनी आरोपी शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी सरकारकडे केलीये.

विद्यार्थीनींना अश्लिल व्हिडीओ दाखवत त्यांचा छळ

 काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेतील प्रमोद सरदार नामक शिक्षकाने मुलींच्या असहाय्यतेचा फायदा घेत आठव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थीनींना अश्लिल व्हिडीओ दाखवत त्यांचा छळ केल्याचा आरोप या शिक्षकावर आहे. चित्रफित दाखवित असताना त्याने मुलींना वाईट पद्धतीने स्पर्श करत अश्लील संभाषण केले. हा प्रकार मागील चार महिन्यांपासून सुरू असल्याचा आरोप या शिक्षकांवर विद्यार्थीनींनी केला आहे.

आरोपीवर कठोर कारवाईची मागणी

संतप्त झालेल्या पालकांनी उरळ पोलिसांकडे धाव घेत शिक्षकांविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी उरळ पोलिसांनी शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. दरम्यान विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा शिक्षक प्रमोद सरदार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकारावर राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिरगे यांनी या शिक्षकांवर कठोर कारवाईची मागणी केली..

हे ही वाचा :

चिमुकल्या लेकींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचं वकीलपत्र घेण्यासाठी एकही वकील पुढे येईना, कल्याण कोर्टात काय घडलं?

                                                         

अधिक पाहा..



Source link

बदलापूर पाठोपाठ पुणे, ठाणे, अकोल्यातही संतापजनक प्रकार; अत्याचारांच्या घटनेने महाराष्ट्र हादरला

बदलापूर पाठोपाठ पुणे, ठाणे, अकोल्यातही संतापजनक प्रकार; अत्याचारांच्या घटनेने महाराष्ट्र हादरला


School Sexual Assault Case : कोलकातामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या महिला डॉक्टरचा अमानुष छळ आणि त्यानंतर तिची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला असताना अशीच एक धक्कादायक घटना बदलापूर (Badlapur) शहरात घडली आहे. बदलापूर पूर्वेला असणाऱ्या एका नामांकित शाळेतील चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केल्याच्या संतापजनक प्रकार उजेडात आला. या संपूर्ण प्रकारचे पडसाद आता राज्यासह देशातही उमटत असताना राज्यात गेल्या दोन दिवसात अशाच प्रकारचे अनेक प्रकरण पुढे आले आहे. बदलापूर पाठोपाठ (Badlapur Crime) राज्यात पुणे, अकोला, ठाणे येथे देखील अशाच पद्धतीने लैंगिक अत्याचाराच्या घटना उजेडात आल्या आहे. त्यामुळे सुसंस्कृत आणि पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय? असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जाऊ लागलाय.

अकोल्यात विद्यार्थीनींला अश्लील व्हिडीओ दाखवत अत्याचार      

बदलापूरच्या शाळेत लैंगिक अत्याचाराचे प्रकरण राज्यात गाजत असतानाच आता अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात असाच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातल्या काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने अश्लील व्हिडीओ दाखवत सहा विद्यार्थीनींचा छळ केल्याची ही घटना आहे. ही खळबळजनक घटना मंगळवारी संध्याकाळी उघडकीस आली. या प्रकाराने जिल्ह्याभरात संताप व्यक्त होत आहे.

मागील चार महिन्यांपासून सुरू होतं नको ते कृत्य 

काजीखेड येथे जिल्हा परिषदच्या उच्च माध्यमिक  शाळेतील प्रमोद सरदार नामक शिक्षकाने मुलींच्या असहाय्यतेचा फायदा घेतला. आठव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना अश्लील व्हिडीओ दाखवत त्यांचा छळ केल्याचा आरोप या शिक्षकावर आहे. अश्लील व्हिडीओ दाखवत असताना त्या नराधम शिक्षकाने मुलींना वाईट पद्धतीने स्पर्श करत अश्लील संभाषण केल्याचं उघड झालंय. धक्कादायक प्रकार म्हणजे हे कृत्य मागील चार महिन्यांपासून सुरू असल्याचं विद्यार्थिनींनी सांगितलं. हे प्रकरण उजेडात आल्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी उरळ पोलिसांकडे धाव घेत त्या शिक्षकांविरोधात तक्रार दाखल केली.

6 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनीची छळ झाल्याचा आरोप

दरम्यान, आता या प्रकरणातील संशयित आरोपी शिक्षक प्रमोद सरदार सेवेतून बडतर्फ करण्याची कारवाई झालीय. शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र समदूर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आलंय. तर संपूर्ण प्रकरणात निष्काळीपणा केल्याप्रकरणी केंद्रप्रमुख तायडे यांचंही निलंबन झालंय. जिल्हा परिषदच्या शाळेमधील 6 मुलींचा लैंगिक छळ करणाऱ्या नराधम शिक्षकावर कारवाईला तब्बल 3 दिवस उशीर झाल्याचा आरोप भाजपचे आमदार वसंत खंडेलवाल यांनी केलाय. 17 ऑगस्ट रोजी मुलींनी 1098 या हेल्पलाइनवर तक्रार केली होती, मात्र तक्रारीनंतर 20 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल होतोय. तक्रार दाखल करण्यासाठी हलगर्जी करणाऱ्यांवर आता आमदार खंडेलवाल यांनी कठोर कारवाईची मागणी केलीय. काल स्वतः आमदार खंडेलवाल यांच्या मध्यस्थीनंतर गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात 6 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनीची छळ झाल्याचा आरोप आमदार खंडेलवाल यांनी केलाय. 

पुण्यातील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

बदलापूर,अकोला पाठोपाठ पुण्यात देखील अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे, पुण्यातील शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा (Pune Crime News) प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुण्यातील भवानी पेठ भागातील नामांकित शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी घडला आहे. पीडित मुलगी इयत्ता सातवीमध्ये शिकत आहे. आरोपी तरुण हा त्याच शाळेतील विद्यार्थी असल्याची माहिती आहे. या प्रकरणातील १९ वर्षीय आरोपी तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर आपली चिमुरडी मुलं शाळेत देखील सुरक्षित नसल्याची भावना पालकांनी व्यक्त केली आहे.

42 वर्षीय व्यक्तीचे अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

ठाण्यातील कळवा रुग्णालय नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो.  मात्र, यावेळी रुग्णालयात घडलेल्या एका घटनेन सर्वत्र एकच खळबळ माजलीय. यात एक 42 वर्षीय इसम रुग्णालय परिसरात बागेत बसून एका अल्पवयीन मुलीशी आक्षेपार्ह वर्तन करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्याच वेळी रुग्णालयात कोलकाता येथील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी ज्युनियर डॉक्टर्स आंदोलन करत होते. त्यातील काही आंदोलकांना बागेत ती मुलगी आणि इसम यांचे सुरू आसलेल्या वर्तणुकीचा संशय आला असता, त्यांनी त्या ठिकाणी धाव घेत सुरक्षा रक्षकना बोलावले. त्यानंतर तात्काळ रुग्णालयाचे सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी इसमाला हटकले आणि मुलीला इसमाला ओळखते का या बाबत विचारणा केली. तर मुलीने आपण त्या व्यक्तीला ओळखत नसल्याचं सांगितलं. त्यावरून सुरक्षा रक्षकांनी आणि ज्युनिअर डॉक्टरांनी त्याला धरून कळवा पोलिसांच्या ताब्यात दिले.

हे ही वाचा 

  • Badlapur School : अत्याचाराची ‘बदलापूर फाईल्स’, काय घडलं अन् कुठे घडलं? वाचा थरकाप उडवणारा रिपोर्ट

अधिक पाहा..



Source link

अश्लील व्हिडीओ दाखवून केला सहा विद्यार्थिनींचा विनयभंग, अकोल्यातील धक्कादायक प्रकार

अश्लील व्हिडीओ दाखवून केला सहा विद्यार्थिनींचा विनयभंग, अकोल्यातील धक्कादायक प्रकार


अकोला: बदलापूरच्या शाळेत लैंगिक अत्याचाराचे प्रकरण राज्यात गाजत असतानाच आता अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात असाच एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातल्या काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने अश्लील व्हिडीओ दाखवत सहा विद्यार्थीनींचा छळ केल्याची ही घटना आहे. ही खळबळजनक घटना मंगळवारी संध्याकाळी उघडकीस आली. या प्रकाराने जिल्ह्याभरात संताप व्यक्त होत आहे.
 
काजीखेड येथे जिल्हा परिषदच्या उच्च माध्यमिक  शाळेतील प्रमोद सरदार नामक शिक्षकाने मुलींच्या असहाय्यतेचा फायदा घेतला. आठव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना अश्लील व्हिडीओ दाखवत त्यांचा छळ केल्याचा आरोप या शिक्षकावर आहे. अश्लील व्हिडीओ दाखवत असताना त्या नराधम शिक्षकाने मुलींना वाईट पद्धतीने स्पर्श करत अश्लील संभाषण केल्याचं उघड झालंय. 

गेल्या चार महिन्यांपासून हे कृत्य

हा प्रकार मागील चार महिन्यांपासून सुरू असल्याचं विद्यार्थिनींनी सांगितलं. मंगळवारी पीडित विद्यार्थिनींनी या घटनेसंदर्भात त्यांच्या पालकांना सांगितल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी उरळ पोलिसांकडे धाव घेत त्या शिक्षकांविरोधात तक्रार दाखल केली. 

या प्रकरणी उरळ पोलिसांनी शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, विद्यार्थिनींचा विनयभंग करणारा शिक्षक प्रमोद सरदार याला पोलिसांनी अटकही केली आहे. 

दरम्यान या संपूर्ण प्रकारावर राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिरगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या नराधम शिक्षकावर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp