जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!

जगदीश मुळीक, वळवळ थांबवून थोबाड बंद कर, अमोल मिटकरी यांचं प्रत्युत्तर!


अकोला : राज्यात महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज भाजप नेते आणि मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला. तर, दुसरीकडे पुण्यातील आंबेगाव मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाने ती जागा आम्हाला सोडावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे, महायुतीमधील तीन पक्षांमध्ये आलबेल नसल्याचं सातत्याने समोर येत आहेत. त्यातच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कोटी करणाऱ्यांना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी सातत्याने प्रत्युत्तर देतात. त्यातून, ते अनेकदा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवरही हल्लाबोल करतात. त्यातूनच आमदार मिटकरी आणि भाजपचे जगदीश मुळीक यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. 

अजित पवार (Ajit pawar) यांच्या जनसन्मान यात्रेवेळी नाशिकच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे अजित पवारांच्या ताफ्याला भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले होते. त्यावरुन संतापलेल्या अमोल मिटकरी यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या या कृतीवरुन थेट देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारला होता. यावर पुण्यातील भाजपचे नेते जगदीश मुळीक यांनी आक्रमक होत अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांना चांगलेच फैलावर घेतले. आता, अमोल मिटकरींनी जगदीश मुळीक यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. जगदीश मुळीक यांनी एकेरी व शेलक्या शब्दांमध्ये अमोल मिटकरी यांना लक्ष्य केले होते. त्यामुळे, मिटकरी यांनीही त्याच पद्धतीने मुळीक यांच्यावर प्रहार केला आहे. 

जगदीश मुळीक यांच्या टीकेला अमोल मिटकरींनी एकेरी भाषेतच उत्तर देत मुळीकांवर जोरदार प्रतिहल्ला केलाय. देवेंद्रजींना खुश करण्यासाठी तो माझ्यावर एकेरी भाषेत सरकला, माझ्यावर एकेरी टीका करणाऱ्या जगदीश मुळीक याची लायकी काय?, असा सवाल मिटकरी यांनी केला. तसेच, 2019 मध्ये मतदारसंघात कामे न केल्यामुळे वडगाव शेरीमध्ये लोकांनी मुळीकांचा पराभव केला. भविष्यात मुळीकांनी एकेरी भाषेत टीका केली तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणार असल्याचं आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं. तर, जगदीश मुळीकांसारख्या वळवळणाऱ्या लोकांनी थोबाड बंद करावं, आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी समोरच्या व्यक्तीला एकेरी भाषेत बोलू नये, असेही मिटकरींनी म्हटले. 

काय म्हणाले होते मुळीक

”ए मिटकरी, तुझी पात्रता आहे का? मा. देवेंद्रजींना खुलासा मागण्याची? शेवटी तू बाजारु विचारजंतच, तुझी पात्रता तेवढ्याच डबक्यात राहणार,” अशी टीका जगदीश मुळीक यांनी केली. यावर आता अमोल मिटकरी यांनी मुळीक वळवळ करु नको, थोबाड बंद कर, असे म्हणत पलटवार केला आहे. 

हेही वाचा

गुड न्यूज, मुंबई महापालिकेत 1846 जागांची मेगा भरती, 81 हजारांपर्यंत पगार, अर्ज कधी करायचा? जाणून घ्या सविस्तर

अधिक पाहा..



Source link

नाशिक उड्डाणपुलावरुन वाहू लागले धबधबे; बुलढाण्यात नदी नाल्याचे स्वरुप; राज्यात मुसळधारा

नाशिक उड्डाणपुलावरुन वाहू लागले धबधबे; बुलढाण्यात नदी नाल्याचे स्वरुप; राज्यात मुसळधारा


Maharashtra Weather : गेल्या दोन आठवड्यापासून ब्रेक घेतलेल्या पावसाने (Rain) परत एकदा राज्यासह विदर्भात दमदार हजेरी लावली आहे. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार आज पावसाने राज्यातील बहुतांश भागात एकच दाणादाण उडवली आहे. एकट्या नाशिकमध्ये केवळ अर्ध्या तासाच्या पावसाने शहराला अक्षरक्ष: झोडपून काढल्याचं पाहायला मिळालं. नाशिकमध्ये (Nashik) आज दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. दमदार पावसाने गोदावरीच्या पात्रात गटाराचे पाणी जात होते. तर रस्त्याना नद्यांचे रूप आल्याचे बघायला मिळाले आहे. तर शहरातील उड्डाणपूल अक्षरक्ष: स्विमिंग पुलासरखा भासत होता. याच पुलावरून वाहने जात असताना पुलावरचे पाणी धबधब्यासारखे खालील रस्त्यावर पडत होते. त्यामुळे पुलाला वॉटर कर्टंन लावला आहे का? असाच प्रश्न उपस्थित होत होता.

अशीच काहीशी परिस्थिती उर्वरित महाराष्ट्रतील बहुतांश ठिकाणी बघायला मिळाली आहे. तर पुढील 4 तास पश्चिम विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सर्वदूर ढगांची दाटी असून, काही ठिकाणी विजांसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. संभाव्य पावसाचा धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.  

बुलढाणा तालुक्यातील सैलानी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस

आठवडाभराच्या विश्रांतीनंतर बुलढाणा जिल्ह्यात आज दुपारनंतर अनेक भागात विजांच्या गडगडटासह मुसळधार पावसाने हजेरी लावलीय. बुलढाणा तालुक्यातील सैलानी, पिंपळगाव सराई, रायपुर, ढसाळवाडी या भागात सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास सलग एक तास मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे सैलानी येथील अनेक दुकानात, घरात पावसाचे पाणी शिरले.  त्यामुळे व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच शेती पिकांचे देखील नुकसान झाल्याचे कळते आहे. तर जिल्ह्यातील खामगाव, संग्रामपूर परिसरातही जोरदार पाऊस सुरू आहे. परिणामी शहरातील रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

अनेकांच्या घरात शिरले पावसाचे पाणी    

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात काही भागात पुन्हा ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याच पाहायला मिळाले. शनिवारी रात्री झालेल्या मध्यरात्रीच्या मुसळधार पावसानंतर रात्री पुन्हा मुसळधार पाऊस बरसला आहे. दरम्यान, या पावसामुळे अकोट तालुक्यातल्या रुईखेड गावात अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. त्यामुळं येथील ग्रामस्थांच्या प्रचंड हाल होत आहेत. रुईखेड गावात अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने रात्रभर ग्रामस्थांचे हाल झालेत. आज पहाटे पावसाने विश्रांती घेतलीये, मात्र अक्षरशः गावातल्या रस्त्यावर पावसाच पाणी वाहत असल्याचे बघायला मिळाले. या रस्त्याला जणू नदीचे स्वरूप आल्याचे दिसत होते. तर अनेक  शेत शिवारात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल आहे. त्याचा फटका पिकांना बसतोय. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

Amol Mitkari Akola : काळे झेंडे दाखवून अजितदादांचा अवमान केला, फडणवीसांनी उत्तर द्यावं

Amol Mitkari Akola : काळे झेंडे दाखवून अजितदादांचा अवमान केला, फडणवीसांनी उत्तर द्यावं


अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यभरात सुरू असलेली जनसन्मान यात्रा जुन्नर विधानसभेत पोहचली पण, इथं महायुतीत मिठाचा खडा पडल्याचं चित्र दिसून आलं. भाजपच्या जुन्नर विधानसभा प्रमुख आशा बुचके (Asha Buchake) काळी साडी परिधान करून रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी थेट अजित पवारांच्या ताफ्यालाच काळे झेंडे दाखवले. आता आमच्या गळ्याशी आलंय, कधीही आम्हाला फास लागू शकतो. म्हणूनचं आम्ही असे आक्रमक झाल्याचं आशा बुचकेंनी (Asha Buchake) स्पष्ट केलं आहे. तर महायुतीच्या एकतेला कोणी गालबोट लावत असेल तर भाजपने त्यांना ताकीद द्यावी. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही कठोर भूमिका घेतलीये.

तर दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणावर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) ही तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली केलीये. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवून अजित पवार यांचा एक प्रकारे अपमान केल्याचा प्रकार असल्याचे म्हटलंय. त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) द्यावे आणि त्यांनी तात्काळ आपली भूमिका व्यक्त करावी, अशी मागणी मिटकरींनी केलीय. एक प्रकारे काळे झेंडे दाखवून भाजपला काय पुरुषार्थ साधायचं आहे, भाजपचे याला समर्थन आहे का? असा सवाल ही आमदार अमोल मिटकरींनी उपस्थित केलाय. भाजपनं तात्काळ याचा खुलासा केला पाहिजे, असेही ते म्हणालेय.  

 



Source link

काळे झेंडे दाखवून अजित पवार यांचा अपमान, भाजपला नेमका काय पुरुषार्थ साधायचाय? : अमोल मिटकरी

काळे झेंडे दाखवून अजित पवार यांचा अपमान, भाजपला नेमका काय पुरुषार्थ साधायचाय? : अमोल मिटकरी


अकोलाराष्ट्रवादी काँग्रेसची राज्यभरात सुरू असलेली जनसन्मान यात्रा जुन्नर विधानसभेत पोहचली पण, इथं महायुतीत मिठाचा खडा पडल्याचं चित्र दिसून आलं. भाजपच्या जुन्नर विधानसभा प्रमुख आशा बुचके (Asha Buchake) काळी साडी परिधान करून रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी थेट अजित पवारांच्या ताफ्यालाच काळे झेंडे दाखवले. आता आमच्या गळ्याशी आलंय, कधीही आम्हाला फास लागू शकतो. म्हणूनचं आम्ही असे आक्रमक झाल्याचं आशा बुचकेंनी (Asha Buchake) स्पष्ट केलं आहे. तर महायुतीच्या एकतेला कोणी गालबोट लावत असेल तर भाजपने त्यांना ताकीद द्यावी. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही कठोर भूमिका घेतलीये.

तर दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणावर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) ही तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली केलीये. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवून अजित पवार यांचा एक प्रकारे अपमान केल्याचा प्रकार असल्याचे म्हटलंय. त्याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) द्यावे आणि त्यांनी तात्काळ आपली भूमिका व्यक्त करावी, अशी मागणी मिटकरींनी केलीय. एक प्रकारे काळे झेंडे दाखवून भाजपला काय पुरुषार्थ साधायचं आहे, भाजपचे याला समर्थन आहे का? असा सवाल ही आमदार अमोल मिटकरींनी उपस्थित केलाय. भाजपनं तात्काळ याचा खुलासा केला पाहिजे, असेही ते म्हणालेय.  

नेमकं प्रकरण काय? 

भाजपच्या जुन्नर विधानसभा प्रमुख आशा बुचके (Asha Buchake) या आज काळी साडी परिधान करून रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी थेट अजित पवारांच्या ताफ्यालाच काळे झेंडे दाखवले. राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यभरात सुरू असलेली जनसन्मान यात्रा जुन्नर विधानसभेत पोहचली असताना इथे हा प्रकार घडला.  आज जुन्नरमध्ये पर्यटन विषयाची शासकीय बैठक पार पडत असताना आम्हाला का डावलण्यात आलं? महायुती आहे तर मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो बैठकीत का नाहीत? पालकमंत्री म्हणून फक्त अजित पवारांचा फोटो का लावण्यात आला? या जुन्नर विधानसभेत नेमकं काय शिजतंय? असे अनेक प्रश्न उपस्थित करत आशा बुचकेंनी पालकमंत्री अजित पवारांना धारेवर धरलं. देशात राहुल गांधींच्या रूपाने एक पप्पू आहे, अजित पवार जुन्नरमध्ये अतुल बेनकेंच्या रूपाने दुसरा पप्पू तयार करू इच्छितात. मात्र आम्ही हे कदापी सहन करणार नाही. असं म्हणत भाजपकडून विधानसभा लढायला इच्छुक असणाऱ्या आशा बुचकेंनी शड्डू ठोकला आहे. 

शासकीय कार्यक्रम घेऊन घटक पक्षांना डावललं जात असल्याचा आरोप यावेळी आशा बुचकेंनी केला आहे. अजित पवारांनी पालकत्वाची भूमिका पाळली नाही याबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत बुचकेंनी अजित पवारांच्या कार्यक्रमात काळे झेंडे दाखवण्यासाठी तयारी करत घोषणाबाजी सुरू केली आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

तुम्ही जेवणात बोगस लसूण तर खात नाही ना? अकोल्यात लसणाच्या नावाखाली विकतात सिमेंटच्या पाकळ्या!

तुम्ही जेवणात बोगस लसूण तर खात नाही ना? अकोल्यात लसणाच्या नावाखाली विकतात सिमेंटच्या पाकळ्या!


अकोला :  लसणाची (Garlic)  फोडणी दिल्याशिवाय जेवणाला चव येत नाही. पण हीच फोडणी अकोल्यातल्या एका कुटुंबाला चांगलीच महागात पडली असती. लसणाच्या जागी त्यांना सिमेंटचा गोळा फेरीवाल्याने विकला.अकोल्यात सिमेंटचा वापर करत बनवल्या लसणाच्या गाठी बनवल्याचा प्रकार समोर आलाय. आर्टिफिशियल पद्धतीने सिमेंटचा वापर करत लसूणच्या गाठी बनवल्यात. हा लसूण सोलत असताना  पाकळ्या वेगळ्या होत नव्हत्या. त्यामुळे सदर लसूणच्या गाठीला चाकूच्या सहाय्याने कापले असता सिमेंटपासून तयार केलेल्या लसूणासारखी बनवलेला लसूण असल्याचे समोर आलंय. यावर पांढऱ्या रंगाचा वापर सुद्धा करण्यात आला आहे. फेरीवाल्यांकडून बनावट लसूणची विक्री होत असल्याचं समोर आलंय. 

अकोल्यात लसणाचा (लसूण) काळाबाजार करणाऱ्यांनी अजबगजब शक्कल लढवत नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. अकोला शहरातील बहुतांश भागात फेरीवाले रोज भाजीपाला विक्रीसाठी येत असतात यातीलच काही फेरीवाल्यांकडे डुप्लिकेट लसूण विक्री करत असल्याचे दिसून येत आहे. अकोल्यातल्या बाजोरिया नगर परिसरात राहणाऱ्या पोलीस विभागातून सेवानिवृत्त झालेल्या सुभाष पाटील यांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

 सुधाकर पाटील यांच्या पत्नी यांनी त्यांच्या घरासमोर आलेल्या फेरीवाल्याकडून लसूण विकत घेतले. यात काही हुबेहूब ओरिजनल लसूणा सारखी आर्टिफिशियल पद्धतीने सिमेंटचा वापर करून बनवलेल्या लसणाच्या पाकळ्या असल्याचे दिसून आल्या. लसूण सोलत असताना हा पाकळ्या वेगळ्या होत नव्हत्या त्यामुळे सदर लसणाच्या गाठीला चाकूच्या सहाय्याने कापले असता सिमेंट पासून तयार केलेल्या लसणासारखी बनवलेला लसून असल्याचे समोर आले. यावर पांढऱ्या रंगाचा वापर सुद्धा करण्यात आला आहे. 

तुम्ही खाताय बोगस लसूण?

भाजीची फोडणी असो किंवा वरणाची त्यात लसूण हा आलाच आहे. पण हाच लसूण तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतो. लसणासारखाच दिसत असला तरी हा लसूण नाही तर हा आहे सिमेंटचा दगड आहे.   जो अकोल्यात सर्रासपणे लसूण म्हणून विकला जातोय. अकोला शहरात फेरीवाल्यांकडून ही फसवणूक केली जाते. कधी मीठ, साखरेत प्लास्टिकचे तुकडे आढळतात. तर कधी तांदळामध्ये प्लास्टिकचा तांदुळ मिसळून जिवाशी खेळ केला जातोय. त्यामुळे अशा बोगस विक्रेत्यांपासून सावध राहा आणि आरोग्य जपा..

Watch Video : पाहा सिमेंटने बनवलेला लसूण 

हे ही वाचा : 

पोलीस माग काढत सांगलीतील ‘त्या’ घरापर्यंत पोहोचले, आत घबाडही सापडलं, पण थोड्याचवेळात…

                  

अधिक पाहा..



Source link

Akola : आर्टिफिशियल पद्धतीने सिमेंटचा वापर करत बनवलं लसूण, फेरीवाल्यांकडून बनावट लसणाची विक्री

Akola : आर्टिफिशियल पद्धतीने सिमेंटचा वापर करत बनवलं लसूण, फेरीवाल्यांकडून बनावट लसणाची विक्री


धक्कादायक! दोन अल्पवयीन मुलींवर आश्रमचालकानेच केला अत्याचार, आरोपी जेरबंद, छत्रपती संभाजीनगरमधील घटना



Source link

YouTube
Instagram
WhatsApp