Amol Mitkari : रामगिरी महाराजांना अटक करा, अमोल मिटकरींची मागणी, टीका करताना श्वानाची उपमा

Amol Mitkari : रामगिरी महाराजांना अटक करा, अमोल मिटकरींची मागणी, टीका करताना श्वानाची उपमा


अकोला : सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांनी नाशिक (Nashik) येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनाच्या दरम्यान एका धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या वक्तव्याचे पडसाद आता राज्यभरात उमटताना दिसत आहे. अशातच रामगिरी महाराज यांच्या कथित वादग्रस्त वक्तव्यावर राष्ट्रवादीचे आमदार  अमोल मिटकरी (Amol Mitkari) चांगलेच आक्रमक झाले आहे.

अमोल मिटकरींनी महंत रामगिरी महाराज यांच्यावर टीका करताना वापरलेल्या शब्दावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. रामगिरी महाराजांवर टीका करतांना आमदार मिटकरींनी कुत्र्याचा दाखला दिलाय. भगव्या रंगाचा कुत्रा असला तर तो संत होऊ शकत नाही, असं आमदार अमोल मिटकरी म्हणालेय. याबरोबरच रामगिरी महाराज यांचा उल्लेख त्यांनी लफंगा असा केलाय. रामगिरी महाराजांवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत कारवाई करून त्यांना अटक करण्याची मागणी ही आमदार मिटकरींनी यावेळी केलीये.

संन्यासाच्या वेशात गुंडागर्दी करण्याचा हा प्रकार

भगवे कपडे घातल्यानंतर जर कोणी संत व्हायला लागले असते तर अनेक श्वानांचा रंग सुद्धा भगवा असतो. भगवे श्वान तरी सहज वेश त्याचा, असे संत तुकाराम महाराज यांचे प्रमान आहे. त्यामुळे भगवे श्वान संत होऊ शकत नाही, तसं प्रत्येक भगवे कपडे परिधान केलेला व्यक्ती हा संत होऊ शकत नाही. यापूर्वी देखील अनेक लोकांनी धर्माच्या नावावर जाती जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केलेत. बांगलादेशमध्ये जे प्रकार घडत आहे त्याचे मी समर्थन करणार नाही. मात्र, बांगलादेश इथल्या अत्याचाराचा आणि देशातल्या अत्याचाराचा संबंध काय? कोण देशातलं वातावरण खराब करत आहे? कुठल्या धर्माच्या लोकांनी हिंदू धर्मीयांबद्दल अपशब्द वापरले? किंवा कुठल्या हिंदूंनी मुसलमानांविरुद्ध अपशब्द वापरले? असं काहीही नसताना आपल्या धर्माचे तत्त्वज्ञान सांगत असताना आपल्या धर्मातील  चांगल्या गोष्टी सांगितल्या पाहिजे.

इस्लाम धर्मियांचे जे श्रद्धास्थान आहे.   त्यांच्याबद्दल अपशब्द बोलताना या महाराजांनी विचार करायला हवा. त्यामुळे अशा महाराजांनी बोलत असताना विचार करून बोलावं. तसेच अशा महाराजांवर कायद्याचा वचक असावा. कुठल्याही धर्माची विटंबना होत असताना, कुठल्या ही धर्मीयांच्या भावना दुखवत असताना, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो. त्यांना हे चांगल्याने माहित असताना अशा प्रकारचे विधान करणे म्हणजे संन्यासाच्या वेशात गुंडागर्दी करण्याचा हा प्रकार असल्याची टीका आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.

देशद्रोह्यासारख्या गुन्ह्याखाली त्यांना अटक करा

आपण ज्या विदर्भात राहतो त्याच विदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होऊन गेले. याच तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेमध्ये मोहम्मद पैगंबरांबद्दल उल्लेख आहे. त्यात त्यांनी देखील मोहम्मद पैगंबर यांचे वर्णन केले आहे. स्वतःचे नाव रामगिरी ठेवत असताना त्यांना आपल्या नावाचे देखील भान राहिले नाही. दुसऱ्या धर्माचा अपमान करा, असे कुठल्याही धर्माने सांगितलेले नाही. त्यामुळे रामगिरी महाराज यांनी केलेले वक्तव्य अतिशय चुकीचे आणि निंदनीय आहे. त्याचे कुणीही पाठ राखण करणार नाही. देशद्रोह्यासारख्या गुन्ह्याखाली त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी ही  आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

नितेश राणे यांच्या हिंदू बाहुबली संमेलनाकडे लोकांची पाठ; पोलीस बॉईज संघटनेने दाखवले काळे झेंडे

नितेश राणे यांच्या हिंदू बाहुबली संमेलनाकडे लोकांची पाठ; पोलीस बॉईज संघटनेने दाखवले काळे झेंडे


Akola News अकोला : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या प्रमुख उपस्थित अकोल्यात होत असलेल्य हिंदू बाहुबली संमेलनाकडे नागरिकांनी अक्षरक्ष: पाठ फिरवल्याचे चित्र आहे. अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या सभागृहाची आसन क्षमता 3 हजार आहे. मात्र, सभागृहात फक्त तुरळक लोक उपस्थित असल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहे. या कार्यक्रमाला आमदार नितेश राणे यांच्यासोबतच प्रख्यात बॉडी बिल्डर भारतसिंग वालिया हे सुद्धा उपस्थित आहे. आज दुपारी 4 वाजताची या कार्यक्रमाची वेळ देण्यात आली होती. तर कार्यक्रमाला गर्दी नसल्याने नितेश राणे जवळ जवळ पाऊण तास सभागृहात उशिरा आलेत. परिणामी, सभागृह भरण्याची शक्यता कमी असल्याने आयोजकांचं आयोजन फसल्याचीही चर्चा सध्या रंगू लागली आहे.

पोलीस बॉईज संघटनेने दाखवले काळे झेंडे  

दुसरीकडे राज्यातील कथित लव्ह जिहादबाबत भाष्य करताना भाजप आमदार नितेश राणे यांनी पोलिसांबाबत एक आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन प्रचंड गदारोळ झाला होता. या वक्तव्याचे पडसाद आज अकोल्यात देखील उमटतांना दिसले आहे. अकोल्यात पोलीस बॉईज संघटनेने आमदार नितेश राणेंना काळे झेंडे दाखविले आहेत. भाजपचे नितेश राणे यांनी या ठिकाणी बायकोचा फोन येत नाही त्या ठिकाणी पाठवू अशा शब्दात पोलिसांना धमकी दिलीय. त्यांच्या या विधानाला अकोल्यातील पोलीस बॉईज संघटने कडाडून विरोध केलाय.

आज नितेश राणे अकोल्यातील कार्यक्रमस्थळी जात असताना शहरातील निमवाडी चौकात त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध नोंदविण्यात आलाय. नितेश राणे यांनी मंगळवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या शिवशक्ती-भिमशक्ती जनआक्रोश मोर्चाच्या व्यासपीठावरुन एक स्फोटक वक्तव्य केले होते. सरकार हिंदूंचे आहे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू की जिथून तुमच्या बायकोलाही फोन लागणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर त्यांच्या या विधानावरुन अकोल्यात पोलीस बॉईज संघटनेने हा विरोध दर्शवला आहे. 

माझ्या वक्तव्यावर मी ठामच, पण सगळे पोलीस अधिकारी तसे नसतात- नितेश राणे

राज्यातील कथित लव्ह जिहादबाबत भाष्य करताना भाजप आमदार नितेश राणे यांनी पोलिसांबाबत एक आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन प्रचंड गदारोळ झाला होता. या सगळ्या घडामोडींबाबत भाष्य करताना नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मी माझ्या वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हटले. मी सर्वच पोलीस अधिकाऱ्यांबद्दल बोललो नाही. मात्र, काही पोलीस अधिकारी लव जिहाद व लँड जिहादवाल्यांना मदत करतात. त्यांना आम्ही सोडणार नसल्याचे म्हणत पोलिस अधिकाऱ्यांसंदर्भातल्या वक्तव्यावर आपण कायम असल्याचे एबीपी माझाशी बोलताना नितेश राणे यांनी सांगितले.

पीडित मुलींच्या आईवडिलांचे ऐकून घेणार नसेल, न्याय मिळवून देण्यापेक्षा पीडितांची चौकशी करणार असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून भूमिका घेणे माझे कर्तव्य असल्याचे नितेश राणे म्हणाले. विरोधकांच्या इशाऱ्यावर जे अधिकारी काम करणार असेल तर अशा अधिकाऱ्यांनी आपली वर्दी वाचवून दाखवावी, असा इशारा नितेश राणे यांनी दिला. ज्या अधिकाऱ्यांमुळे गृह खाते बदनाम होत आहे, त्यांची तक्रार गृहमंत्र्यांकडे करुन कारवाईची मागणी करणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

मनोज जरांगेंची शरद पवारांवर टीका तरीही नितेश राणे म्हणतात, जरांगे हा तुतारीचा माणूस!

मनोज जरांगेंची शरद पवारांवर टीका तरीही नितेश राणे म्हणतात, जरांगे हा तुतारीचा माणूस!


Akola News अकोला : मराठा आंदोलक मनोज जरांगे  (Manoj Jarange Patil) यांनी अलिकडे घेतलेली भूमिका लक्षात घेता हीच भूमिका त्यांनी पहिल्या दिवशीच घेतली असती तर त्यावर विश्वास बसला असता. मात्र आज त्यांचे चारही बाजूने दरवाजे बंद व्हायला लागले आहे. त्यामुळे हा तुतारीचा माणूस आहे हे साऱ्यांना कळले असल्याची घाणाघाती टीका भाजप आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) मनोज जरांगे पाटील यांच्यावर केली आहे.  

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)  यांची राजकीय भाषा मराठा समाजाला आवडत नाही. त्यांनी राजकीय भाष्य टाळणं हे त्यांच्यासाठी चांगले आहे. त्यांनी मराठा आरक्षणावर बोललं तर ते त्यांच्या हिताचे आहे. उद्धव ठाकरे, नाना पटोले, शरद पवार यांची भूमिका ओबीसीतून आरक्षण न देता किंवा दुसऱ्यांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) दिले पाहिजे, अशी आहे. त्यामुळे कुठेतरी जरांगे पाटील एकटे पडत चालले आहे. स्वतंत्र मराठा आरक्षण देण्याची तयारी असल्यास त्यावर जरांगे यांनी भूमीक जाहीर करावी. मनोज जरांगे यांच्या राजकारणामुळे मराठा समाजाचे जर नुकसान होईल, तर मराठा समाज नक्कीच यावर भूमिका घेईल. असेही आमदार नितेश राणे म्हणाले. ते अकोला येथे बोलत होते. 

यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांचे नाव खराब होतंय- नितेश राणे 

महाराष्ट्र द्वेषाचा ठेका उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.  त्यांच्या बुडात घुसलेला धनुष्यबाण पहिले काढावा लागेल. परत एकदा बॅगपॅक करून त्यांना लंडनला पाठवण्याची वेळ आली आहे. तर उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राला लागलेली कीड असून ही लागलेली कीड आम्ही कायमस्वरूपी काढू, अशा शेलक्या शब्दात नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. अकोल्यात हिंदू बाहुबली संमेलनासाठी मी आज जात आहे.

सकल हिंदू समाजाचे हिंदुत्वाचे विषय तेथे मांडले जाणार आहे. पोलीस विभागातील काही अधिकारी हिंदू समातील लव्ह जिहादचे विषय आल्यास 10 ते 15 दिवस केस दाखल करत नाही, आई  वडिलांसोबत गौरव्यवहार करताय, अशी माहिती आहे. पोलीस विभागातील या प्रकारामुळे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांचे नाव खराब होतंय. अशा सडक्या आंब्याना त्या पद्धतीचा इशारा आम्ही दिला असल्याचेही नितेश राणे म्हणाले.

महायुतीच सरकार आणण्यासाठी आम्ही तडजोडही करू- नितेश राणे 

महायुतीतील जागावाटपात अलिबागच्या जागे संदर्भात  नितेश राणे यांना विचारले असता ते म्हणाले की, तीन पक्षाची युती असताना त्या पद्धतीने चर्चा होतेच. प्रत्येकाला वाटते, की ही जागा मलाच मिळाली पाहिजे. त्यामुळे आम्ही एकमेकांचे डोकं फोडू, असं काही होणार नाही. तीनही पक्षाचे नेते बसून योग्य तो निर्णय घेतील. महाराष्ट्रात महायुतीच सरकार आणण्यासाठी आम्ही तडजोडही करू. असेही नितेश राणे म्हणाले.

तर अजित पवार यांनी बारामती लोकसभेतील पराभवावर केलेल्या वक्तव्यावर भाष्य करताना ते म्हणाले की, अजित पवार हे अनुभवी नेते आहेत. कुठल्यातरी अनुभवणे ते हे बोलले असतील. त्यांच्या बोलण्याचा महायुतीवर काही परिणाम होईल, असे इमले बंधू नका, एका वक्तव्याने महायुतीच्या बाहेर ते पडततील असे काहीही नाही. असेही नितेश राणे म्हणाले.

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

ठाकरे गटाचे आमदार ACB च्या रडारवर; ‌ऐन निवडणुकीच्या तोंडावर चौकशीमुळे चर्चेला उधाण

ठाकरे गटाचे आमदार ACB च्या रडारवर; ‌ऐन निवडणुकीच्या तोंडावर चौकशीमुळे चर्चेला उधाण


Nitin Deshmukh ACB Inquiry : अकोला जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील (Akola News) बाळापुरचे ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) आमदार नितीन देशमुख  (Nitin Deshmukh) पुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीच्या रडारवर असल्याची माहिती पुढे आली आहे. अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Buero) आमदार नितीन देशमुख अकोला जिल्हा परिषदेचे सदस्य असतानांच्या कार्यकाळाची माहिती अकोला जिल्हा परिषदेकडून मागवली आहे.

अमरावतीच्या एसीबीच्या पथकाने अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत पत्र पाठवले आहे. नितीन देशमुख जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी जिल्हा परिषदेचा वापरलेला विकास निधी, झालेली कामे आणि सदस्य म्हणून घेतलेले भत्ते, याबद्दल संपूर्ण माहिती मागवली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे आहे. 

 ‌ऐन निवडणुकीच्या तोंडावर चौकशीमुळे चर्चेला उधाण

आमदार नितीन देशमुख हे 2009 ते 2019 या काळात अकोला जिल्हा परिषदेचे सदस्य होते. दरम्यानच्या काळात काही गैरप्रकार तर झाला नाही ना, त्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चौकशी करणार आहे. याआधी ‘अमरावती एसीबी’ने बेहिशेबी मालमत्ता आरोप प्रकरणी 17 जानेवारी 2023 रोजी अमरावती येथील कार्यालयात आमदार नितीन देशमुख यांची चौकशी केली होती. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण थंड बस्त्यात पडले होते. मात्र, ‌ऐन निवडणुकीच्या तोंडावर आता परत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आमदार नितीन देशमुख यांच्या संदर्भातली फाईल उघडल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहे.

कृषी कार्यालयात शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन 

यवतमाळच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात कृषी सहाय्यक देण्याच्या मागणीसाठी शेतकर्‍यांनी अर्धनग्न आंदोलन सुरू केलं आहे. वारंवार मागणी आणि समस्या सांगूनही कुठलीच उपाययोजना करण्यात आली नसल्याने आज एका शेतकऱ्याने कृषी अधीक्षक प्रमोद लहाळे यांना फ़ोन केला असता ते उद्धटपणे बोलले, असा आरोप शेतकाऱ्याने केला आहे. अशातच हे संतप्त शेतकरी कृषी अधिकार्‍यांच्या कार्यालयात आले असता जिल्हा कृषी अधीक्षक गैरहजर असल्याने शेतकऱ्यांचा पारा आणखीन भडकला अन् कार्यालयात कपडे काढून त्यांनी अर्धनग्न आंदोलन केलं. 

पदभार असलेल्या अतिरिक्त कृषी सहायक अरेरावी करीत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. जिल्हा कृषी अधीक्षकांसोबत भ्रमणध्वनीवरून आंदोलक शेतकऱ्यांनी संपर्क केला. मात्र समाधान न झाल्याने आंदोलक शेतकरी संतप्त होऊन त्यांनी अर्धनग्न आंदोलन केले.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

रवी राणांच्या वक्तव्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीतही पडसाद; मुख्यमंत्र्यांनी सुनावले खडे बोल!

रवी राणांच्या वक्तव्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीतही पडसाद; मुख्यमंत्र्यांनी सुनावले खडे बोल!


CM Eknath Shinde मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Cabinet Meeting) देखील उमटतांना दिसले आहे. यापुढे प्रत्येक मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी बोलताना विचार करून लोकांशी बोला, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिल्या आहे. अशा प्रकारच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारच्या योजनेवर त्याचा परिणाम पडतो. सोबतच या वादग्रस्त वक्तव्यांचा विरोधकांनाही आयता फायदा होतो. त्यामुळे बोलताना सर्वांनी विचार करून बोला, असे खडे बोल मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुनावले आहेत.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सुनावले खडे बोल 

महायुती सरकारनं अर्थसंकल्प सादर करताना राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरूवात केली. सध्या राज्यभरात या एकाच सरकारी योजनेचं नाव चर्चेत आहे. सरकारने ही योजना जाहीर केल्यापासून महिलांचा या योजनेला प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे विरोधक यावर टीका देखील करताना दिसताय. अशातच या योजनेवरुन अमरावतीतील आमदार रवी राणा यांनी काल एक धक्कादायक वक्तव्य वक्तव्य केलं होतं. आमचं सरकार आल्यावर लाडकी बहिण योजनेचे 1500 रुपयेचे हे आम्ही दुप्पट म्हणजे 3 हजार रुपये करू, तर आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. 

मात्र, ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ म्हणून ते 1500 रुपये तुमच्या खात्यातून वापस घेणार, असे धक्कादायक वक्तव्य रवी राणांनी काल सोमवारी केलंय. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमानपत्र वितरण सोहळा काल अमरावतीत आमदार रवी राणा यांनी घेतला होता. या कार्यक्रमात हजारो महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी हे धक्कादायक वक्तव्य केलं. या वक्तव्यानंतर विरोधकांनी जोरदार पलटवार केला. परिणामी आज मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत मंत्रिमंडळाच्या बैठकीत  मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी बोलताना विचार करून लोकांशी बोला, असे खडे बोल सुनावले आहेत. 

लाडकी बहीण योजनेवरील वादग्रस्त वक्तव्य भोवलं?

दरम्यान, राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत महायुतीच्या समन्वय बैठक आज पार पडत आहे. अमरावतीच्या सांस्कृतिक भवनात तीनही पक्षाची पदाधिकाऱ्यांची या समन्वय बैठकीला हजेरी असणार आहे. तर पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाण्यातली महायुतीचे खासदार,आमदार आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहे. शिवसेना शिंदे गटाकडून मंत्री उदय सामंत, भाजपकडून आमदार प्रसाद लाड, सचिन जोशी, आशिष कुलकर्णी, संजय खोडके इत्यादि प्रमुख नेते या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत.

महत्वाचे म्हणजे या बैठकीसाठी स्थानिक नेते म्हणून प्रहारचे आमदार आणि गेल्या काही दिवसापासून सरकारवर निशाणा साधणारे बच्चू कडू यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. तर दुसरीकडे आमदार रवी राणा यांना मात्र निमंत्रण दिले नसल्याने अनेक चर्चाना सध्या उधाण आले आहे. त्यामुळे महायुतीतील उच्चपदस्थ नेते आमदार रवी राणांवर नाराज तर नाही ना? असा प्रश्नही या निमित्याने आता उपस्थित केला जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

महायुतीच्या समन्वय बैठकीचे रवी राणांना निमंत्रण नाही; लाडकी बहीण योजनेवरील वक्तव्य भोवलं? 

महायुतीच्या समन्वय बैठकीचे रवी राणांना निमंत्रण नाही; लाडकी बहीण योजनेवरील वक्तव्य भोवलं? 


Maharashtra Politics अमरावती :  राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील महायुती सरकारने जोरदार तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या जोरदार राजकीय संघर्षानंतर संपूर्ण राज्याला आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला विदर्भात चांगले यश मिळाले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मविआ (MVA) याच कामगिरीची पुनरावृत्ती करणार का, की महायुती (Mahayuti) या धक्क्यातून सावरत पुन्हा कमबॅक करणार, याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच, आज अमरावतीमध्ये महायुतीच्या समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला पश्चिम विदर्भातील महायुतीचे प्रमुख पदाधिकारी बैठकीत सहभागी होणार आहेत.

विशेष म्हणजे या बैठकीसाठी स्थानिक नेते म्हणून आमदार बच्चू कडू यांना निमंत्रण देण्यात आले असताना  आमदार रवी राणा यांना मात्र निमंत्रण दिले नसल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे अनेक चर्चाना सध्या उधाण आले असून आमदार रवी राणा यांनी नुकतेच केलेलं लाडकी बहीण योजनेवरील वादग्रस्त वक्तव्य त्यांना आता भोवलंय का? असा प्रश्नही या निमित्याने उपस्थित केला जात आहे.

लाडकी बहीण योजनेवरील वादग्रस्त वक्तव्य भोवलं?

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत महायुतीच्या समन्वय बैठक आज पार पडत आहे. अमरावतीच्या सांस्कृतिक भवनात तीनही पक्षाची पदाधिकाऱ्यांची या समन्वय बैठकीला हजेरी असणार आहे. तर पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाण्यातली महायुतीचे खासदार,आमदार आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहे. शिवसेना शिंदे गटाकडून मंत्री उदय सामंत, भाजपकडून आमदार प्रसाद लाड, सचिन जोशी, आशिष कुलकर्णी, संजय खोडके इत्यादि प्रमुख नेते या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत.

महत्वाचे म्हणजे या बैठकीसाठी स्थानिक नेते म्हणून प्रहारचे आमदार आणि गेल्या काही दिवसापासून सरकारवर निशाणा साधणारे बच्चू कडू यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले आहे. तर दुसरीकडे आमदार रवी राणा यांना मात्र निमंत्रण दिले नसल्याने अनेक चर्चाना सध्या उधाण आले आहे. त्यामुळे महायुतीतील उच्चपदस्थ नेते आमदार रवी राणांवर नाराज तर नाही ना? असा प्रश्नही या निमित्याने आता उपस्थित केला जात आहे.

काय म्हणाले होते रवी राणा? 

अमरावतीमधील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमाणपत्र वितरण सोहळ्यावेळी बोलताना रवी राणा म्हणाले होते की, आमचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये हे आम्ही दुप्पट म्हणजे 3 हजार रुपये करू. आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. मात्र ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ म्हणून ते 1500 रुपये तुमच्या खात्यातून परत घेणार.

या कार्यक्रमामध्ये अमरावती जिल्ह्यातील हजारो महिला उपस्थित होत्या. ज्याचं खाल्लं त्याचं जागलं पाहिजे. सरकार देत राहते, पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे असं मतही रवी राणा यावेळी बोलतांना मांडलं.

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp