‘लाडकी बहीण’बाबत पैसे काढून घेण्याचं ते वक्तव्य गंमतीने केलं होतं, रवी राणांचे स्पष्टीकरण

‘लाडकी बहीण’बाबत पैसे काढून घेण्याचं ते वक्तव्य गंमतीने केलं होतं, रवी राणांचे स्पष्टीकरण


अमरावती : लाडकी बहीण योजनेबाबत (Ladki Bahin Yojana) केलेलं वक्तव्य हे गंभीरतेने केलं नव्हतं, गमतीमध्ये आणि हसत हसत केलेलं होतं, ते वक्तव्य भावा-बहिणीमधील नात्यामध्ये केलेलं होतं असं स्पष्टीकरण आमदार रवी राणा यांनी दिलं. लाडकी बहीण योजनेचे पैसे कुणीही काढून घेऊ शकत नाही, यावरून कुणीही राजकारण करू नये असंही ते म्हणाले. आम्हाला जर मतं मिळाली नाहीत तर लाडकी बहीण योजनेचे देण्यात येणारे 1500 रुपये काढून घेतले जातील असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी अमरावतीतील कार्यक्रमात केलं होतं. त्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उडाली होती.  

रवी राणा म्हणाले की, त्याच्यामध्ये कुठेही कुणालाही वाईट वाटेल असं वक्तव्य केलं नव्हतं. भाऊ हा बहिणीचं कुठेही काढून घेऊ शकत नाही, उलट भाऊ हा बहिणीला मदत करतो. त्यामुळे कुणाचेही पैसे काढून घेण्यात येणार नाही. 

काँग्रेसने खोटं बोलून मतदान घेतलं, पण हे सरकार तसं करणार नाही. शिंदे सरकारकडून महिलांच्या खात्यावर पहिल्यांदा पैसे टाकण्यात येणार आहे असं रवी राणा म्हणाले.

काय म्हणाले होते रवी राणा? 

अमरावतीमधील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमाणपत्र वितरण सोहळ्यावेळी बोलताना रवी राणा म्हणाले होते की, आमचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये हे आम्ही दुप्पट म्हणजे 3 हजार रुपये करू. आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. मात्र ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ म्हणून ते 1500 रुपये तुमच्या खात्यातून परत घेणार.

या कार्यक्रमामध्ये अमरावती जिल्ह्यातील हजारो महिला उपस्थित होत्या. ज्याचं खाल्लं त्याचं जागलं पाहिजे. सरकार देत राहते, पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे असं मतही रवी राणा यावेळी बोलतांना मांडलं.

आमदार रवी राणांनी केलेल्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे.  रवी राणांवर टीका करताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, हा सरकारचा पैसा आहे. हा पैसा यांच्या बापाचा आहे का? रवी राणा की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा आहे? यांची निती दिसली.  निवडणुकीच्या तोंडावर मतांसाठी योजना आणली. बहिणींना फसवण्यासाठी योजना आणली आहे.  रवी राणा जे बोलला ते सरकारच्या शिंदेच्या मनातील, फडणवीस आणि अजित पवार यांच्या मनातील बोलले आहेत.

ही बातमी वाचा: 

 

अधिक पाहा..



Source link

नवनीत राणांची जात काढणारे परत येतील, त्यांना जोड्याने मारा; खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य

नवनीत राणांची जात काढणारे परत येतील, त्यांना जोड्याने मारा; खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य


अमरावती : लोकसभेच्या कालात नवनीत राणांची जात काढली आणि त्यांना मतदान करू नका असं विरोधकांनी सांगितलं, आता ते लोक परत आले तर त्यांना जोड्याने मारा असं वादग्रस्त वक्तव्य भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केलं. नवनीत राणा यांचा पराभव झाल्याने अमरावतीचे न भरून निघणारे नुकसान झाल्याचंही ते म्हणाले. अनिल बोंडे यांनी अमरावतीच्या एका कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केलं. 

अनिल बोंडे म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात नवनीत राणा या जातीच्या, त्या जातीच्या असं सांगून त्यांना मतदान करू नका असा विरोधकांनी प्रचार केला. आता तेच लोक तुमच्याकडे पुन्हा येणार आहेत, ते परत आले तर त्यांना जोड्याने मारा. 

नवनीत राणांच्या पराभवामुळे अमरावतीचे नुकसान

अनिल बोंडे म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांचा एखादा नेता येतो आणि नवनीत राणा या वेगळ्या जातीच्या आहेत, त्यांना मत देऊ नका असं सांगतो. त्यामुळे नवनीत राणांचा पराभव झाला आणि आपण आपलं नुकसान करून बसलो. नवनीत राणांच्या पराभवामुळे अमरावतीचे न भरून येणारं नुकसान झालं आहे. 

नवनीत राणा यांना पाडल्याचा काही लोकांना विकृत आणि विखारी आनंद झाला असं खासदार अनिल बोंडे म्हणाले. माझ्या जोडीला लोकसभेत नवनीत राणा यांना पाठवले असते तर चांगले झाले असंही ते म्हणाले. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..



Source link

देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात सुरक्षा यंत्रणेची चूक; पोलिसांमध्ये प्रचंड गोंधळ, नेमकं काय घडल

देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात सुरक्षा यंत्रणेची चूक; पोलिसांमध्ये प्रचंड गोंधळ, नेमकं काय घडल


Akola News अकोला : अकोल्यातून (Akola News) एक मोठी बातमी समोर आली आहे. अकोल्यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या ताफ्यात सुरक्षा यंत्रणेची चूक समोर आलीय. देवेंद्र फडणवीस यांचा ताफा मुख्य राष्ट्रीय महामार्गावर लागला तरी फडणवीसांच्या सुरक्षा यंत्रनेतील पोलिसांचा ताफा हा कृषी विद्यापीठातच होता. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेची ही मोठी चूक समोर आली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातल्या (Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth) विश्रामगृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार असं सुरक्षा यंत्रणेला वाटलं होतं. मात्र फडणवीस यांचं वाहन थेट मुख्य महामार्गावर लागल्याने त्यांच्या ताफ्यातील मागील सुरक्षा यंत्रणेचा ताफा हा मागेच राहिला. यात पोलिसांचे वाहन आणि ॲम्बुलन्स इतर वाहने मागेच राहिले होते.

पोलिसांमध्ये काही काळ प्रचंड गोंधळाचे वातावरण

याआधीही फडणीसांच्या ताफामध्ये अकोल्यात अशीच चूक झाली होती. आता पून्हा अकोल्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुरक्षा पुरवणाऱ्या यंत्रणेची चूक समोर आली आहे. त्यांनतर काही काळ पोलिसांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला होता. दरम्यान, भाजपचा जिल्हास्तरीय मेळावा आटोपल्यानंतर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस शिवनी विमानतळावरून नागपूरकरकडे प्रस्थान केलंय. एकुणात या संपूर्ण प्रकारामुळे पोलिसांमध्ये काही काळ प्रचंड गोंधळाचे वातावरण बघायला मिळाले.  

अकोल्यात भाजपाच्या जिल्हा विस्तारित कार्यकारिणीचा आज महामेळावा आयोजित करण्यात आला होता. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात हा महामेळावा पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील पाच हजारांवर पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकारी या महामेळाव्याला उपस्थित होते. भाजप खासदार अनुप धोत्रे यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे सर्व आमदारही या महामेळाव्याला उपस्थित झाले होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रकृती ठीक नसल्याने ते या कार्यक्रमाला आले नाहीत. यावेळी हा गोंधळ झाल्याचे बघायला मिळाले 

आमदार भास्कर जाधव यांचा आजचा अकोला दौरा रद्द

अकोल्यातून अशीच एक राजकीय बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांचा आजचा अकोला दौरा रद्द झालाय. खराब हवामानामुळे त्यांचं विमान चुकल्याने हा दौरा रद्द झालाय. ते मुंबईतून नागपूरला विमानाने येणार होते. तेथून रस्ता मार्गाने ते अकोल्यात येणार होते. आमदार भास्कर जाधव यांचा अकोला जिल्ह्यातील पातूर शहरात आज कार्यक्रम होता. आमदार नितीन देशमुख यांच्या विकासनिधीतून पातूर येथील रेणुका टेकडीवरील मंदिराच्या सभामंडपाचे भूमिपूजन होणार होतंय. यासोबतच ते पातूर आणि अकोल्यात कार्यकर्त्यांना संबोधित करणार होते. मात्र आता आमदार भास्कर जाधव यांचा आजचा अकोला दौरा रद्द झालाय. 

इतर महत्वाच्या बातम्या 

कुरियरद्वारे कोट्यवधीच्या अमली पदार्थांची तस्करी; एनसीबी कडून आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश, सहा जणांना ठोकल्या बेड्या

अधिक पाहा..



Source link

मनोज जरांगे मुख्यमंत्री झाले तरी मराठ्यांना सगेसोयऱ्यांचं आरक्षण मिळणार नाही; अनिल बोंडेंनी डिव

मनोज जरांगे मुख्यमंत्री झाले तरी मराठ्यांना सगेसोयऱ्यांचं आरक्षण मिळणार नाही; अनिल बोंडेंनी डिव


अमरावती: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यभरातील वातावरण तापले असताना भाजप नेते अनिल बोंडे यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना पुन्हा एकदा डिवचले आहे. मनोज जरांगे स्वत: मुख्यमंत्री झाले तरीही सग्यासोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे कोणीही तशी वल्गना करु नये, असे बोंडे (Anil Bonde) यांनी म्हटले. ते रविवारी अमरावती येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

अमरावतीत रविवारी भाजपा ओबीसी मोर्चाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी अनिल बोंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना डिवचणारे वक्तव्य केले. त्यामुळे आता बोंडे विरुद्ध जरांगे वाद पेटण्याची शक्यता आहे. रक्ताची नातं असलेल्या सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणारच आहे, त्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश होईल. पण  सग्यासोयऱ्यांना आरक्षण मिळणार नाही. मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवली आणि ते मुख्यमंत्री झाले तरी ते ही गोष्ट साध्य करू शकणार नाहीत. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान सर्वश्रेष्ठ आहे. संविधानाचे रक्षण करण्यासाठी घटनात्मक संस्था देशात आहेत. त्यामुळे कोणीही तशा वल्गना करू नये, समाजात फूट पाडण्याचं काम करू नये. यात सगळ्यात जास्त नुकसान हे मराठा समाजाचे होईल, असे अनिल बोंडे यांनी सांगितले. 

पुण्यात झळकले ‘भावी मुख्यमंत्री जरांगे’ आशयाचे बॅनर्स

पुण्यातील मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीत ‘भावी मुख्यमंत्री’चे पोस्टर झळकल्याचे दिसून आले. ‘मनोज जरांगे भावी मुख्यमंत्री’ असा आशय असलेले पोस्टर मराठा बांधवांनी हाती घेतल्याचे दिसले.  रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी करण्यात आली.  मनोज जरांगे हे मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी लढा देत आहेत.  त्यांनी विधानसभा निवडणुका लढण्याचे संकेत दिले आहेत. रॅलीला सारसबाग चौकातून सुरूवात होणार आहे. यासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित आहेत. त्यांनी हातात भावी मुख्यमंत्री म्हणून मनोज जरांगे पाटील यांचे बॅनर हाती घेतल्याचे दिसून आले.

दाढी राखणं मर्दाचं लक्षण; मनोज जरांगेंचं नितेश राणेंना प्रत्युत्तर

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे आणि राणे कुटुंबीय आमनेसामने आल्याचं पहायला मिळत आहे. त्यांनी माझ्या दाढीवर नाही, सगळ्याच दाढी राखणाऱ्यांवर आक्षेप घेतला असेल. सगळ्या दाढी राखणाऱ्याची चीड असते एखाद्याला. दाढी ठेवणं हे मर्दाचं लक्षण आहे. मी त्यांचा आदर करतो. ते आता फडणवीसांच्या चपला व्हायला लागलेत, अशा खोचक शब्दांत जरांगे पाटलांनी राणेंना प्रत्युत्तर दिले.

आणखी वाचा

विधानसभेला कोणते 113 आमदार पाडणार? मनोज जरांगे पाटलांनी थेटच सांगितलं, म्हणाले…

अधिक पाहा..



Source link

अडसूळ असो की बच्चू कडू, यांनी कटप्पाच्या भूमिकेत राहून पाठीत खंजीर खुपसलाय : आमदार रवी राणा

अडसूळ असो की बच्चू कडू, यांनी कटप्पाच्या भूमिकेत राहून पाठीत खंजीर खुपसलाय : आमदार रवी राणा


Maharashtra Politics अमरावतीअमरावती मतदारसंघात महायुतीची (Mahayuti) डोकेदुखी दिवसागणिक आणखी वाढत असल्याचे चित्र आहे. कारण राणा दाम्पत्याविरोधात शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul), त्यांचे पुत्र अभिजित अडसूळ (Captain Abhijeet Adsul) आणि प्रहारचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी देखील नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याविरोधात दंड थोपटले आहे. त्यामुळे त्यांच्यात रोज आरोप-प्रत्यारोंप आणि टीकेची झोड रंगताना हल्ली बघायला मिळत आहे. अशातच आमदार रवी राणा यांनी आता पलटवार करत आनंदराव अडसूळ आणि  बच्चू कडू यांची भूमिका कटप्पा सारखी असून त्यांनी पाठीत खंजीर खुपसला असल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. 

आनंदराव अडसूळ, बच्चू कडू कटप्पाच्या भूमिकेत 

शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसुळ यांना मी सन्मान दिला. पण आनंदराव अडसूळ यांनी एका महिलेबाबत किती पातळी सोडून बोलायचं, त्यांनी त्याचे सुद्धा भान ठेवलं पाहिजे. मी महायुती मधून बाहेर पडायचं की नाही, हे सांगणारे अडसूळ कोण? त्या बाबत  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय तो निर्णय घेतील आणि ठरवतील. मी आजही महायुतीमध्ये आहे. उद्याही महायुतीमध्येच राहील. पण त्यांनीच 15 दिवसाचा अल्टिमेट दिला होता. मला जर राज्यपाल पद मिळालं नाही तर मी विचार करेल. असे ते म्हणाले होते.

मुळात आनंदराव अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये काम केलं होतं सिटी को-ऑपरेटिव बँकमध्ये अजून पर्यंत त्यांच्यावर आरोप पत्र दाखल झालं नाही. त्यांनी त्या ठिकाणी मोठा घोटाळा केलाय. त्यामुळे आनंदराव अडसूळ असो की बच्चू कडू यांनी कटप्पाच्या भूमिकेमध्ये राहून पाठीत खंजीर खुपसला आहे. अशा शब्दात आमदार रवी राणा यांनी पलटवार करत निशाणा साधला आहे.

33 महिन्याच्या सरकारमध्ये त्यांनी का दिवा लावला नाही?- रवी राणा

आमदार बच्चू कडू यांनी आज अचानक शरद पवार यांची भेट घेतली. या विषयी भाष्य करताना आमदार रवी राणा म्हणाले की, राजकारणामध्ये प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या भेटी घेत असतो. जे मुद्दे त्यांनी मांडले ते मुद्दे ज्यावेळेस ते अडीच वर्ष मंत्री होते, तेरा खात्याचे मंत्री आणि ते जलसंधारण मंत्री होते तेव्हा त्यांनी अमरावती जिल्ह्यामध्ये कोणतं मोठं काम केलं ते त्यांनी सांगावं. त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील पुनर्वसनचे काम सुद्धा केले नाही. त्यांच्या अचलपूर मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात संत्र्याचे पीक घेतलं जातं. मात्र अजूनही एक संत्रा प्रक्रिया उद्योग त्यांनी उभारला नाही.

निवडणूक आल्यानंतर शेतकऱ्यांचे नाव घेऊन ते राजकारण करत आहे. बच्चू कडू यांनी सर्वात आधी अपंग कल्याण शाळा स्वतःच्या संस्थेत घेतली, त्या ठिकाणी किती विद्यार्थी आहे आणि किती लोकांची ग्रँड घेते आहेत, हे पहावं लागेल. शिवभोजन योजना पण त्यांनी स्वतःच्या घरात घेतली. शेतकऱ्या बद्दल जर त्यांना जिव्हाळा असता तर 33 महिन्याच्या सरकारमध्ये त्यांनी का दिवा लावला नाही? असा सवाल करत  रवी राणांनी बच्चू कडू यांच्यावर निशाणा साधला आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

इथे ओशाळली माणुसकी! घरासमोर कुत्रा भुंकतो म्हणून कुत्र्याला अमानुष मारहाण; चक्क डोळेच फोडले

इथे ओशाळली माणुसकी! घरासमोर कुत्रा भुंकतो म्हणून कुत्र्याला अमानुष मारहाण; चक्क डोळेच फोडले


Akola News अकोला : बातमी आहे क्रुरतेचा कळस गाठनारी आणि हृदय पिळवटून टाकणारी. मुक्या प्राण्यासोबत झालेला क्रूरतेचा प्रकार अकोल्यातून समोर (Akola News) आलाय. सोनू देशमुख नावाच्या व्यक्तीनं शेजारच्या घरातला कुत्रा आपल्या घरासमोर भुंकतो म्हणून त्याचे चक्क डोळे फोडत अमानुष मारहाण केलीये. देशमुखने इतर चारजणांच्या मदतीने कुत्र्याला हॉकी स्टीक आणि काठीने अमानुष मारहाण (Beating of Dog) केलीये. या मारहाणीत कुत्र्याचे डोळे फोडून त्याचा जबडा आणि इतर ठिकाणी फ्रॅक्चर करण्यात आलंये. याप्रकरणी संशयित आरोपी सोनू देशमुखसह इतर चौघांवर रामदासपेठ पोलिसांत (Akola Police) गुन्हे दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटणेमुळे परिसरातून मुक्या श्वाना बाबत हळहळ तर मारेकर्‍यांबद्दल रोष व्यक्त केला जात आहे. 

लाठी-काठीनं बेदम मारहाण, चक्क दोन्ही डोळे फोडले, कंबर ही  फ्रॅक्चर 

अकोल्यातील तापडियानगर भागातील मोहन भाजी भंडारजवळ घडलेल्या एका घटनेनं माणुसकी ओशाळलीये. येथील रहिवासी असलेल्या सुनिता सोनोने या महिलेकडे साधारणत: पाच वर्षाचा पाळीव कुत्रा आहे. शेजारीच राहणाऱ्या सोनू देशमुख याने कुत्र्याचा सततच्या भुंकण्याचा आवाज कानावर पडतो म्हणून कुत्र्यासोबत भयंकर कृत्य केलंय. चार जणांच्या मदतीने त्याने क्रूरतेचा कळस गाठत कुत्र्याचे हातपाय बांधले. पुढं लाठी-काठीनं बेदम मारहाण केलीय. हात कुत्र्याचे डोळे फोडण्यात आलेय. त्यानंतर या कुत्र्याला बांधलेल्या अवस्थेत कचऱ्याच्या गाडीत टाकून दिले. या संपूर्ण प्रकरणात अकोल्यातील पशूप्रेमींनी पोलीस तक्रार दाखल केलीय. रामदास पेठ पोलिसांनी यात गुन्हे दाखल केला आहे. मात्र हा संपूर्ण प्रकार माणुसकीला काळीमा फसणारा असल्याची प्रतिक्रिया आधार फॉर ऍनिमलच्या अध्यक्षा काजल राऊत यांनी व्यक्त केली आहे. 

सध्यास्थितीत या कुत्र्यावर अकोल्यातल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. मात्र मारहाणीत कुत्र्याचे दोन्ही डोळे निकामी झाले असून कंबर ही  फ्रॅक्चर झालीये. तर त्याच्या अंगावर अनेक गंभीर जखमा झाल्याचं उपचार करणार्‍या डॉ अभिनव सोनटक्के यांनी सांगितलंय. या संपूर्ण प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणी नेमकी काय कारवाई करते हे ही पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp