Blog : नागपंचमी : उत्सव आणि लोकपरंपरा

Blog : नागपंचमी : उत्सव आणि लोकपरंपरा


Blog : सण आणि उत्सव साजरे करणे हा मानवी संस्कृतीचा अविभाज्य असा भाग आहे. दैनंदिन जीवनातील कंटाळवाण्या घटना प्रसंगातून, नित्याच्या जीवनातील तोचतोपणा यातून थोडीशी सुटका करून घेण्यासाठी आणि धर्माचरण पाळण्याचे समाधान मिळण्यासाठी माणसांनी या सण, उत्सवांचा आधार घेतला. त्याचबरोबर सण, उत्सव साजरे केल्याने देवादिकांना, पितरांना, निसर्गातील अद्भुत शक्तींना प्रसन्न करून त्याची कृपा संपादन करता येते, अशी श्रद्धा असल्यामुळे त्याची पूजा केली जाते. या सण, उत्सवांची परंपरा ही आर्यांच्या आगमनापूर्वीच्या काळापर्यंत पाठीमागे जाते. हे सण साजरे करण्यात विधीला आणि संभारणीला विशेष महत्त्व असते.

स्त्री-जीवनात श्रावण महिन्यातील महत्त्वाचा असलेला सण म्हणजे नागपंचमी. श्रावण महिन्यात शुद्ध पंचमीला नागपंचमीचा सण येतो. महाराष्ट्रात तसेच संपूर्ण भारतभर हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या सणांमधे नागाच्या पूजेला महत्त्वाचे स्थान आहे. नागाविषयी अनेक कल्पना आणि लोक-समजुती लोकजीवनात प्रचलित आहेत भारतीय पुराण वाडःमयातही नागाविषयीच्या अनेक कथा आलेल्या आहेत. नागपूजा ही भारतातील जवळजवळ सर्वच प्रांतात पहावयास मिळते. महाराष्ट्रातील स्त्रिया नागपंचमीचा सण मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा करतात. यादिवशी त्या भाजी चिरीत नाहीत, चुलीवर तवा ठेवत नाहीत. भारतामध्ये नागपूजेच्या संदर्भात वेगवेगळी कारणे आहेत. नाग हे चैतन्याचे आणि दिव्यत्वाचे प्रतीक आहे. त्याच्याठिकाणी सार्‍या शक्ती एकवटलेल्या आहेत, असा समज आहे. तिच पर्जन्य देवता आहे, तिच सुफलित भूमी आहे, तिच मृत्यूची विध्वंसक प्रतिमा आहे, तिच रक्षक आहे. म्हणजेच प्रजनन, संरक्षण, संवर्धन, विध्वंस या सार्‍या शक्तीचे आदिम केंद्र आहे, अशी आपली मनोमन धारणा झालेली आहे.

नागपंचमीला नागाची आणि वारुळाची पूजा करण्याला अत्यंत महत्त्व आहे. मातीच्या दगडाच्या किंवा पिठाच्या नाग प्रतिमांची पूजा करण्यात येते. ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घरात भिंतीवर मातीने अगर शेणाने आदल्या दिवशी सारस्वतात नागपंचमीच्या दिवशी त्या जागेवर हळदीने कुंकवाने, किंवा चंदनाने नाग प्रतिमा रेखाटून त्याची पूजा करतात. नैवेद्य म्हणून दुध, दही, तूप, लाह्या वगैरे पदार्थ अर्पण केले जातात. नागाला ‘शेष’ हे मानाचे नाव दिले गेले आहे. त्याच्या पूजेसमयी नागासंबंधीची विविध गाणी, विविध प्रकारे, नागासंबंधीचे महत्त्व लक्षात घेऊन गायली जातात. लोकसंस्कृतीमध्ये नागाची पूजा दोन पातळ्यांवर होत असलेली आपल्याला लक्षात येते. एक प्रत्यक्ष नाग प्राण्याची पूजा तर दुसरी नाग संस्कृतीतील पूर्वजांनी प्रति आदरभाव व्यक्त करणारी पूजा.

नाग हा शेतकऱ्यांचा मित्र आहे, तो त्याच्या शेतीचे रक्षण करतो. या भावनेतून त्याच्याप्रती असलेला आदर भाव व्यक्त करण्यासाठी म्हणून या दिवशी तो त्या नाग प्राण्याची पूजा करतो. नागपंचमीला स्त्रिया झाडाला बांधलेल्या पाळण्यावर झोके घेतात. झोके घेतांना, तसेच वारुळाच्या पूजेला जातांना गायिल्या जाणाऱ्या गीतांना त्यांच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. खेड्यातील स्त्रिया आरती घेऊन वरुळाकडे, नागाच्या पूजेसाठी, गाणी गात जातात. या प्रसंगी म्हटली जाणारी गीते विविध प्रकारची असतात, त्यात विविधता असते. पुराणातील नागविषयक कथा, देव देवतांपर उल्लेख, पतिव्रता स्त्रीच्या कथा आणि सामाजिक असे असलेली गाणी गायली जातात. यासणाच्या निमित्ताने त्या फेरावरची गाणीही गातात. तसेच नागोपासक ज्यांना आपण ‘अरबाडी’ असे संबोधतो, ते ‘नाग बाऱ्या’ गातात.

या गीतांच्यामागे परंपरा आहे. नागपूजा ही वेदपूर्वकाळापासून येथे प्रचलित आहे. म्हणून नाग गीतांची ही परंपरा वेदपूर्वकाळापर्यंत मागे जाते. भारतीय आदिम समाजाचा शेती हा प्रमुख उद्योग होता. शेतीमध्ये स्त्रीला महत्त्वाचे स्थान होते. ऋग्वेदातील कृषीशी निगडित देवता ‘स्त्री देवता’ आहेत. पूर्व वैदिक काळात भूमी सुफलित करण्याचे विधी स्त्रीकडे होते. ज्या स्त्रीत संतती निर्माण करण्याची क्षमता अधिक, तिला शेतीच्या कामात विशेष महत्त्व असे. पावसाने भूमी सुफलित होते, तशीच स्त्री ही सुफलित होते, अशी श्रद्धा होती. आणि नागपंचमीचा सण सफुलिकरणाशी निगडीत असलेला सण आहे. त्या सणाच्या प्रत्येक प्रसंगी स्त्रियांची गाणी गातात, त्यात कृषी जीवनाविषयी अपार श्रद्धा व्यक्त झालेली दिसते. हे सर्व नागाच्या कृपेने आहे असा तिचा भाव असतो.

वावरात नांग येते l
भाव लोकाचा पाह्यते ll
पीकपानी पाहोन l
समदी वाटक् लावते ll

या गीतात नागोबावरील अढळ निष्ठा व्यक्त करण्यात आली असून नागोबाची मनोभावे पूजा केल्याने सर्व संकटे दूर होतात. तोच सर्वस्व आहे. म्हणजेच कृषी जीवनाशी निगडित असलेली ही गीते कृषी जीवनाच्या आदिम अवस्थेपासून मौखिकतेने चालत आलेली आहेत. वेदपूर्व काळापासून गीतांचे प्रचलन आहे असे म्हटल्यास चूक ठरू नये.

या नागपूजेच्या निमित्ताने नागवंशाची स्मृती साठवून ठेवने हाही एक विचार दिसून येतो. या नागपूजेच्या निमित्ताने नागबा-या गाणारा एक विशिष्ट वर्ग या बा-यांचे गायन पूजेच्या वेळी तसेच सर्पदंश झाला असेल तर, त्यावरचा उतारा म्हणून केल्या जाते. या ”बा-या “गाणाऱ्या “अरबाड्यांनी” स्वतःची एक वेगळी संस्कृती जपलेली दिसते.

नागपंचमीच्या सणाला ज्यांच्या घरी नागठाणी आहेत, किंवा जिथे कुठे नागाची ठाणी अस्तित्वात आहेत, तिथे नागपंचमीच्या आधी पाच दिवसापासून ‘नाग-बाऱ्या’ गायिल्या जातात. साधारणतः रात्रीच्या वेळी हा प्रकार साजरा होत असतो. त्याचाही एक विशिष्ट विधी असतो. ‘ठावा’वर ह्यांना बाऱ्या गायिल्या जातात. ‘ठाव’ म्हणजे गुंड, त्यावर एक पालथा कोपर, व तो एका लोखंडी, पितळी कड्याच्या साह्याने वाजवला जातो. त्या संगीताच्या साथीने बा-या गायिल्या जातात. त्याचवेळी अंगात येणे हाही प्रकार चालतो. ‘नाग’ अंगात येतो व ती व्यक्ती डोलायला लागते. नागपंचमीपर्यंत हा प्रकार चालतो. 

नागपंचमी सणाचा विचार करतांना त्यात स्त्रीचा सहभाग हा महत्त्वाचा आहे. आणि याप्रसंगी त्या गाणी गातात. नागपंचमीला स्त्री-जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. पुरुषापेक्षा स्त्री ही अधिक धार्मिक, भाविक, श्रद्धाशील वृत्तीची असल्यामुळे परंपरेत परंपरेने चालत आलेले सण, उत्सव साजरे करण्याकडे तिचा कल अधिक असतो. त्यामुळेच ही परंपरा आजवर टिकू शकली, असे म्हणता येईल.

अधिक पाहा..



Source link

विधानसभेची खडाजंगी : भाजपच्या जिल्ह्यात कोण लावणार सुरुंग? अकोल्यात प्रकाश आंबेडकर ठरणार गेमचें

विधानसभेची खडाजंगी : भाजपच्या जिल्ह्यात कोण लावणार सुरुंग? अकोल्यात प्रकाश आंबेडकर ठरणार गेमचें


Akola Vidhan Sabha Election 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. अशातच भाजपने देखील आपल्या आमदारांच्या बैठका घेण्यास सुरूवात केली आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या अकोल्यामध्ये विधानसभेसाठी पुन्हा एकदा जोरदार मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे. अकोल्यामध्ये (Akola Vidhan Sabha Election 2024) एकूण 5 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी 4 मतदारसंघ हे भाजपकडे आहेत. तर एक मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अकोल्यामध्ये भाजप आपली ताकद वाढवून सर्वच 5 मतदारसंघ आपल्याकडे घेणार की ठाकरे गटाचा बंड झाल्यानंतर गेलेला आणि अर्ध्या रस्त्यातून परत आलेला आमदार आपला गड राखून आणखी ठिकाणी आपल्या पक्षाची मशाल पेटवणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.  

अकोला पूर्व, मूर्तिजापूर आणि अकोट भाजपच्या ताब्यात असून बाळापूर येथे शिवसेना ठाकरे गट व रिसोडमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत. दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनामुळे अकोला पश्चिमची जागा रिक्त असली तरी हा मतदारसंघ गेल्या तीन दशकांपासून भाजपचा गड म्हणून ओळखला जातो. 

 सध्याचे अकोला जिल्ह्यातील आमदार : (Akola MLA List)

अकोट विधानसभा – प्रकाश भारसाकळे (भाजप)
 बाळापूर विधानसभा – नितीन देशमुख  (शिवसेना – उद्धव ठाकरे)
अकोला पश्चिम विधानसभा – गोवर्धन शर्मा (भाजप) (निधन)
अकोला पूर्व विधानसभा – रणधीर सावरकर (भाजप)
मूर्तिजापूर विधानसभा –  हरीश पिंपळे (भाजप)

2019 मधील विधानसभानिहाय लढती आणि मताधिक्य

1) अकोट विधानसभा –

भाजपचे प्रकाश भारसाकळे यांनी विजय मिळवत वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड.संतोष रहाटे यांचा पराभव केला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे प्रकाश गुणवंतराव भारसाकळे 48,586 मते मिळवून विजयी झाले. वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अ‍ॅड. संतोष वसंत रहाटे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. विजयाचे अंतर हे 7,260 इतकं होतं.

2) बाळापूर विधानसभा –

बाळापूर मतदारसंघात झालेल्या चौरंगी लढतीत शिवसेनेने बाळापूर किल्ला काबिज करून भगवा फडकवला. सेनेचे नितीन देशमुख उर्फ नितीन टाले यांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांना मात देत, 18 हजार 788 मतांनी विजय मिळवला. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांनी 69 हजार 343 मते घेतली. देशमुख हे 18 हजार 788 मतांनी विजयी झाले. महाआघाडीचे उमेदवार संग्राम गावंडे यांना 16 हजार 497 मते मिळाली. गावंडे यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार तुकाराम दुधे यांनी 6 हजार 262 मते घेतली. दुधे यांचे डिपॉझिटही जप्त झाले होते. बाळापुरच्या किल्ल्यावर प्रथमच भगवा फडकला होता. 

3) अकोला पश्चिम विधानसभा –

 अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप उमेदवार गोवर्धन शर्मा आणि काँग्रेसचे उमेदवार साजीद खान यांच्यात लढच झाली. यामध्ये साजीद खान यांना 67 हजार 629 हजार मते मिळाली तर भाजप उमेदवार गोवर्धन शर्मा यांचा अवघ्या 2662 मतांनी निसटता विजय झाला होता. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार साजीद खान यांचा पराभव झाला होता.

4) अकोला पूर्व विधानसभा –

अकोला पूर्व मतदारसंघाचे विद्यमान आमदार रणधीर सावरकर यांनी गड कायम राखण्यात यश मिळविले होते. विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचे सावरकर यांनी त्यांचे निकटतम प्रतिस्पर्धी वंचित बहुजन आघाडीचे हरीदास भदे यांना पराभूत करीत सलग दुसऱ्यांदा आमदार होण्याचा बहूमान मिळविला. रणधीर सावरकर 24723 मताधिक्याने विजयी झाले.

5) मूर्तिजापूर विधानसभा –

अटीतटीच्या झालेल्या लढतीत भाजपचे विद्यमान आमदार हरीष पिंपळे यांनी वंचित बहूजन आघाडीच्या प्रतिभा अवचार यांच्यावर निसटता विजय मिळविला. पिंपळे यांना 59227 मते मिळाली, तर प्रतिभाव अवचार यांना 57613 मते मिळाली. पिंपळे 1610 मतांनी विजयी झाले. 

राजकीय परिस्थिती –

2019 मध्ये लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्येही या अकोल्यामध्ये (Akola Vidhan Sabha Election 2024) भाजपचं वर्चस्व दिसून आलं. बाळापूर आणि रिसोड वगळता इतर चारही विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आले.बदललेल्या राजकीय गणितांचाही या मतदारसंघावर फारसा परिणाम दिसून येत नाही. या मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची फार मोठी शक्ती दिसत नाही. त्यामुळं त्यांच्यातील विभाजनाचा इथं फार काही परिणाम झालेला नाही. यावेळी पुन्हा एकदा लोकसभेप्रमाणेच विधानसभेला प्रकाश आंबेडकर संपूर्ण ताकदीने सामोरे जातील किंवा त्यांनी कोणत्या पक्षांसोबत मिळून याठिकाणी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास पुन्हा राजकीय गणित बदलण्याची शक्यता नकारता येत नाही. 

सध्या सुरू असलेल्या एकंदरित राजकीय परिस्थितीवरून प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गट किंवा महाविकास आघाडी यांच्या एकत्र येण्याच्या शक्यता मावळल्या असल्याचं दिसून येत आहे, त्यामुळे पुन्हा एकदा याठिकाणी युती, आघाडी आणि आंबेडकर अशी तिरंगी लढतच पाहायला मिळणार अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचा प्रभाव वाढण्याची शक्यता – 

शिवसेना पक्षफुटीनंतर आणि एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार, खासदार यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेले आमदार नितीन देशमुख हे पुन्हा परत आले, त्यानंतर त्यांनी ठाकरेंच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्याबाबतचा पक्षातील आदर,आणि त्यांची पक्षाविषयी असलेली निष्ठा याच्या प्रभावामुळे या जिल्ह्याच शिवसेना ठाकरे गटाचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. 

अधिक पाहा..



Source link

राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्याच्या भेटीमध्ये कुठेतरी पाणी मुरलंय; अमोल मिटकरींचा आरोपांचा पाढा!

राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्याच्या भेटीमध्ये कुठेतरी पाणी मुरलंय; अमोल मिटकरींचा आरोपांचा पाढा!


Akola News अकोला :  राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीचे आमदार  अमोल मिटकरी (Amol Mitkari) आणि मनसेतला (MNS) वाद थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. कारण या प्रकरणात आता दोन्ही पक्षाकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप करत टीकेची झोड सध्या होत आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या गाडीवरील हल्ला प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (CM Eknath Shinde) देखील गंभीर आरोप करत या प्रकरणात त्यांना गोवलंय. या प्रकरणातील आरोपींना मुख्यमंत्र्यांचं अभय आहे का?, असा प्रश्न आमदार अमोल मिटकरींनी मुख्यमंत्र्यांना केलाय.

मुख्यमंत्री आणि  राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) याच्या दोन तासांच्या झालेल्या बैठकीत आपल्या विरोधात काही शिजलंय का? त्यामुळे त्या प्रकरणातला प्रमुख सूत्रधार कर्णबळा दुनबळेला अटक होत नाहीये, असा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्र्यांवर केलाय. या प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांनी एकदाही आपली साधी विचारपूस केली नसल्याची खंतही आमदार अमोल मिटकरी यांनी यावेळी व्यक्त केलीय.

योगेश चिले हा खंडणीबहाद्दर- अमोल मिटकरी 

दरम्यान, मनसे प्रवक्ते योगेश चिले यांनी केलेल्या आरोपांनाही मिटकरी यांनी उत्तर दिलंय. योगेश चिले हा खंडणीबहाद्दर आहे. पनवेल परिसरात चिलेंनी अनेक कंत्राटदारांकडून खंडणी वसूल केल्याचा आरोप मिटकरींनी केलाय. योगेश चिले हा राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या नावाने राजगडावर बसून कंत्राटदारांकडून खंडण्या वसूल करत असल्याचा गंभीर आरोप आमदार मिटकरी यांनी केलाय. या संदर्भातील अनेक ठोस पुरावे आपल्याकडे असून लवकरच पनवेल येथे जाऊन पत्रकार परिषद घेणार असल्याचं आमदार अमोल मिटकरी म्हणालेय.

मुख्यमंत्र्यांचं आरोपीला अभय?

अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी 30 जुलैला अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहाबाहेर अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला चढवला होता. यावेळी मिटकरींच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. यावेळी झालेल्या राड्यात सहभागी असलेले मनसेचे स्थानिक पदाधिकारी कर्णबाळा दुनबाळे अजूनही फरार असून त्यांना मुख्यमंत्र्यांकडून अभय दिले जात असल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केलाय. राज ठाकरे आणि मुख्यमंत्र्याच्या भेटीमध्ये कुठेतरी पाणी मुरलंय. अकोला पोलीस कर्णबाळाचा शोध का घेत नाही? असा सवाल मिटकरीं यावेळी उपस्थित केलाय. या संपूर्ण प्रकरणामुळे आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण होतोय.

तुमच्यावर मुख्यमंत्र्यांचा दबाव आहे का? हे देखील आता समोर आलं पाहिजे. एका आमदारावर हल्ला होतो, मुख्यमंत्री साधी विचारणा करत नाही. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांचं माझ्यावर प्रेम नाही अथवा कमी झालंय, असेही  अमोल मिटकरीं म्हणाले. मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंच्या दोन तासाच्या बैठकीनंतर कुठेतरी या प्रकरणावर पाणी मुरल्या गेलंय, असा आरोपही त्यांनी केलाय.  

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

बांगलादेशकडून शिका, त्यांनी पंतप्रधानांना पळवून लावलं, मग आम्हाला अवघडं आहे का? : राजू शेट्टी

बांगलादेशकडून शिका, त्यांनी पंतप्रधानांना पळवून लावलं, मग आम्हाला अवघडं आहे का? : राजू शेट्टी


अकोला : माजी खासदार आणि शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या एका वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. बांगलादेशपासून काहीतरी शिकावं, आपण आपल्या पंतप्रधानाला पळवून का लावू शकत नाही असा सवाल त्यांनी उपस्थितांना विचारला. राजू शेट्टी अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे शेतकरी सहविचार सभेत बोलत होते. शेतकरी सहविचार सभेत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, काल जन्माला आलेल्या बांगलादेशकडून आपल्या लोकांनी काही तरी शिकावं. जर त्या देशातील लोकांनी त्यांच्या पंतप्रधानाला पळवून लावले असेल तर आपण असं का करू शकत नाही.

बांग्लादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोकांनी केलेल्या आंदोलनानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि त्या देश सोडून भारतात आल्या. त्याचाच संदर्भ देत राजू शेट्टी यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 

समृद्धी महामार्गाचा फायदा कुणाला झाला? 

समृद्धी महामार्गावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. श्वेतपत्रिका काढली तर याचा लाभ कुणाकुणाला मिळाला हे स्पष्ट होईल असं ते म्हणाले. 2019 पासून राज्यात सुरू असलेल्या सत्तानाट्यात हाच पैसा वापरला गेल्याचा आरोप त्यांनी केला. राधेश्याम मोपलवार हा अधिकारी दोन्ही सरकारच्या काळात मोठ्या पदावर कसा राहतो? असा सवालही राजू शेट्टी यांनी विचारला. याचबरोबर प्रस्तावित शक्तीपीठ मार्ग कुणाच्या भल्यासाठी तयार केला जातोय असाही प्रश्न त्यांनी केला. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या आघाडीसाठी वंचितचे प्रकाश आंबेडकर, प्रहारचे बच्चू कडू आणि मराठा आरक्षणावर लढणारे मनोज जरांगे यांच्यासह शेतकरी चळवळीतील इतर पक्षांसोबत बोलणी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. या संभाव्य आघाडीत रविकांत तुपकर आल्यासही आपली हरकत नसेल असं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं. 

ही बातमी वाचा:

अधिक पाहा..



Source link

Video : ”मनोज जरांगेंचा फोटो घरात लावायचा, विधानसभा होईपर्यंत त्याच्यावर एक हार चढवायचा”

Video : ”मनोज जरांगेंचा फोटो घरात लावायचा, विधानसभा होईपर्यंत त्याच्यावर एक हार चढवायचा”


अकोला : राज्यातील मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापला असताना एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होत आहे. तर, दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा विदर्भात पोहोचली आहे. आपल्या होमग्राऊंड असलेल्या अकोला जिल्ह्यातील पातूरमध्ये सोमवारी आंबेडकरांचे जोरदार स्वागत झाले. शहरातील सिदाजी महाराज मंगल कार्यालयात प्रकाश आंबेडकर यांनी सभेला संबोधित केले. यावेळी, भाषण करताना प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) मनोज जरांगें यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तत्पूर्वी, आंबेडकरांनी मूर्तिजापूर आणि अकोल्यातही त्यांची जाहीर सभा झाली होती. प्रकाश आंबेडकरांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याला विरोध केला आहे. तसेच, मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगेंनाही (Manoj Jarange) टार्गेट केल्याचं दिसून येत आहे. 

पातूर येथील व्यासपीठावर प्रकाश आंबेडकरांचे स्वागत करण्यासाठी काँग्रेस, भाजप आणि शिवसेनेचे ओबीसीतील स्थानिक नेतेही एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. पातूर येथील सभेतूनही प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा मनोज जरांगेंना लक्ष्य केलं. तत्पूर्वी  मनोज जरांगे पाटील सारखा खेळ कोणीही करू शकत नाही. एक तीर मे दो निशान ही साधण्याची कला मनोज जरांगे पाटलांमध्ये आहे, असा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला होता. तर, पातूरमधील सभेतून मनोज जरांगे यांचे आभार मानले आहेत. तसेच, सर्व ओबीसी समाजानेही मनोज जरांगे यांचे आभार मानायला हवे आणि त्यांचा फोटो घरात लावायला हवा, असा उपरोधात्मक टोलाही आंबेडकरांनी जरांगे यांना लगावला. 

मी जरांगे पाटलांचे जाहीर आभार मानतो कारण आम्ही जे 40 वर्षात करू शकलो नाही ते त्यांनी 2 वर्षांत केलं. जरांगेंनी ओबीसींच्या सर्व समाजघटकांत चैतन्य आणि जागृती आणली. ओबीसींना जागं केलं म्हणून सगळ्यांनी जरांगे पाटलांचा फोटो आपल्या घरामध्ये लावायचा, आणि विधानसभेच्या निवडणुका जोपर्यंत होत नाहीत, तोपर्यंत एक हार त्याच्यावर चढवायचा, अशा शब्दात मनोज जरांगे यांना खोचक टोलाही लगावला आहे. जरांगेची भूमिका ही चीत भी मेरी और पट भी मेरी असल्याचेही आंबेडकर यांनी म्हटले. तसेच, ओबीसींच्या आरक्षणाला धोका नाही. कारण, ओबीसींचा राजकीय जीव राज्यातील 169 मराठा राजकीय घराण्यांच्या हाती आहे. त्यामुळे, ओबीसींची संख्या कळण्यासाठी जातीनिहाय जनगणना करावी, अशी मागणीही आंबेडकरांनी केली.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांवर पलटवार करणं टाळल्याचं दिसून येत आहे. मी प्रकाश आंबेडकर यांचा सन्मान करतो, त्यांच्या टीकेवर मी कुठलंही प्रत्युत्तर देणार नाही, असे जरांगे यांनी म्हटले आहे. मात्र, प्रकाश आंबेडकर यांनी अशी भूमिका का बदलली हे मला माहिती नाही, असेही जरांगेंनी म्हटलं होतं. 

हेही वाचा

राज ठाकरे एकाचवेळी मराठा आणि ओबीसी आंदोलकांच्या रडारवर, लक्ष्मण हाके म्हणाले, तुम्ही खरंच प्रबोधनकारांच्या घराण्यात जन्मलात का?

अधिक पाहा..



Source link

बच्चू कडू आयत्या पिठावर नागोबा, नेत्यांना शिव्या देतो, खोड्या करतो; रवि राणांनी डिवचलं

बच्चू कडू आयत्या पिठावर नागोबा, नेत्यांना शिव्या देतो, खोड्या करतो; रवि राणांनी डिवचलं


अमरावती : अकोला जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार रवि राणा आणि आमदार बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्यात चांगलीच जुंपली होती. अमरावतीच्या अचलपूर शहरातील केंद्र सरकारचा उपक्रम असलेली फिनले मिल कोरोना लॉकडाऊनपासून बंद असल्याच्या मुद्द्यावरुन दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. या बैठकीत मिलसाठी देण्यात येणाऱ्या 20 कोटी रुपयांच्या निधीवरुन दोन्ही नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली आहे. आता, आमदार रवि राणा (Ravi Rana) यांनी बच्चू कडूंवर खोचक टीका केली असून आयत्या पिठावर नागोबा म्हणत त्यांना डिवचलं. तर, बच्चू कडू यांनीही फिनले मिल बंद असल्यावरुन येथील कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. 

कापूस उत्पादन क्षेत्र असलेल्या अमरावती शहराला टेक्स्टाईल झोन घोषित करण्यात आलं आहे. त्यासाठी कापूस ते कापड या प्रक्रिया उद्योगात विदर्भात महत्त्वाचे स्थान निर्माण करणारी अचलपूर येथील फिनले मिल देखील सुरू केली. मात्र, अमरावतीचा केंद्रातील मोठा उद्योग असलेली हीच फिनले मिल कोरोना लॉकडाऊनपासून बंद पडला आहे. या फिनले मिलमध्ये किमान 800 ते 900 स्थानिक कामगार काम करत होते. मात्र, मिल बंद असल्याने कामागारांची उपासमार सुरू आहे. या मिलसाठी अनेकांनी शासन दरबारी प्रयत्न केले आहेत. लोकप्रतिनीधींनी केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्र्‍यांपर्यंत हा प्रश्न नेला होता. मात्र, मिल अद्यापही सुरू झालेली नाही. तरीही, दोन्ही आमदारांमध्ये श्रेयवादाची लढाई होत आहे. आमदार रवि राणा यांनी या मिलसाठी खासदार नवनीत राणा यांनी व मी सातत्याने प्रयत्न केल्याचं म्हटलं आहे. तसेच, आमदार बच्चू कडू यांच्यावर खोचक शब्दात टीकाही केली.   

नुकतेच मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिनले मिल संदर्भात आढावा बैठक पार पडली. या बैठकी दरम्यान, फिनले मिल पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती आमदार रवि राणा यांनी दिली. तसेच, ही मिल सुरू करण्यासाठी मी व माजी खासदार नवनीत राणा यांनी सातत्याने प्रयत्न केल्याचंही त्यांनी सांगितलं. मात्र, आमदार बच्चू कडू हे आयत्या पिठावर नागोबा बनले आहेत. बच्चू कडूं विविध जिल्ह्यात जाऊन नेत्यांना शिव्या देतो, खोड्या करतो , नौटंकी करतो, असे म्हणत आमदार राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर जोरदार प्रहार केला.  

दरम्यान, बंद असलेल्या फिनले मिलसाठी राज्य सरकारने 20 कोटी रुपये मंजूर केले. त्यावरून आमदार रवी राणा यांनी चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले. यावेळी आमदार बच्चू कडू यांनी रवी राणा यांना टोला लगावला. त्यावरुन, दोन्ही नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp