Akola girl who is preparing for upsc end her in lifee in delhi maharashtra marathi news

Akola girl who is preparing for upsc end her in lifee in delhi maharashtra marathi news


 अकोला : महाराष्ट्रातील पूजा खेडकर (Pooja khedkar)  प्रकरणामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (UPSC) आणि कारभार सध्या देशभरात चर्चेचा विषय झालाय. दिल्ली स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची होत असलेली आर्थिक आणि मानसिक पिळवणूक सध्या चर्चेत आलीये. अकोल्यातील गंगानगर भागातल्या अंजली गोपनारायण या दिल्लीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीने 21 जुलैला फाशी घेत आत्महत्या केली आहेय. तिच्या सुसाईड नोटमध्ये तिने अनेक धक्कादायक बाबींवर प्रकाश टाकलाय. परीक्षेचा अभ्यास करताना येणारा मानसिक तणाव, शिकवणी वर्ग, घर मालक, वस्तीगृह संचालक आणि यासाठी कार्यरत असलेल्या दलालांकडून होणाऱ्या आर्थिक निवडणुकीवर प्रकाश टाकलाय. 

 अंजली अनिल गोपनारायण  तिनं‌ काही दिवसांपूर्वी बनवलेली ही रील  दिवा असलेली अधिकाऱ्याची गाडी हे तिचं स्वप्न होतंय… अंजली ही अकोल्यातील गंगानगर भागात राहतेय. पोलीस शिपाई असलेल्या वडिलांची मुलगी असणाऱ्या अंजलीनं सनदी अधिकारी होण्याचं स्वप्नं‌ पाहत दोन वर्षांपूर्वी दिल्ली गाठलीय… अधिकारी बनल्यानंतर अंबर दिव्याची गाडी घेऊन घरी यावं असं स्वप्न तिने उराशी बाळगलं होतंय. मात्र, 23 जुलैला ॲम्बुलन्स गाडीतून आलेला मृतदेहच तिच्या कुटुंबीयांना पहावा लागलाय. 

भाड्याच्या खोलीत घेतली फाशी

21 जुलैला अंजलीने दिल्लीतील राहत असलेल्या जुने राजेंद्रनगर भागातील आपल्या भाड्याच्या खोलीत फाशी घेऊन आत्महत्या केलीय. अभ्यास आणि परीक्षेमुळे येणारा ताण-तणाव, सध्या या परीक्षांमध्ये होणारे गैरव्यवहार, शिकवणी वर्ग वस्तीगृह आणि दलाल यांच्याकडून होणारी आर्थिक आणि मानसिक पिळवणूक यातून जीवन संपवलंय. आपल्या काळजाच्या तुकड्यांनं असा निर्णय घेतल्याने तिच्या कुटुंबियांची सर्व स्वप्न पार विरुन‌ गेली आहेत. 

अंजलीच्या ‘सुसाईड नोट’मध्ये तिने नेमकं काय लिहिलंय?

 सुसाइड नोटमधून स्पष्ट होते की, त्या विद्यार्थिनीला किती मानसिक आणि आर्थिक ताणाचा सामना करावा लागत होता.  तिने आपल्या नोटमध्ये लिहिले की पीजी आणि होस्टेल मालक विद्यार्थ्यांकडून फक्त पैसे उकळत आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना ते परवडू शकत नाही. सुसाइड नोटमध्ये तिने तिच्या आई-वडिलांची माफी मागितली आहे. तिने सांगितले की तिने खूप प्रयत्न केले परंतु पुढे जाऊ शकली नाही. तिने डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण ते शक्य झाले नाही. तिचं एकच स्वप्न होता की, ती पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी क्लिअर करेल. तिने तिच्या सर्व मित्र आणि कुटुंबियांना धन्यवाद दिले आहे, ज्यांनी तिला समर्थन दिले, पण तिला असे वाटत होते की ती असहाय्य आहे. 

हॉस्टेलचे भाडे अव्वाच्यासव्वा

सुसाईट नोटमध्ये तिने मावशीला धन्यवाद दिले आहे, ज्या नेहमीच तिच्या पाठीशी उभी राहिली. तिने सुसाइड नोटमध्ये एक स्माईल देखील काढली आहे आणि म्हटले आहे की तिला माहीत आहे की आत्महत्या हा कोणत्याही समस्येचे समाधान नाही.  तिने असेही लिहिले आहे की पीजी आणि होस्टेलचे भाडे कमी करावे, कारण अनेक विद्यार्थी हे ओझे सहन करू शकत नाहीत.

विद्यार्थ्यांसाठी सरकार आतातरी संवेदनशील होईल हीच माफक अपेक्षा

 केंद्रीय लोकसेवा आयोगासह इतर स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांना अभ्यासासाठी अतिशय चांगल्या सुविधा आणि वातावरण असणं आवश्यक आहेय. मात्र, दिल्लीत अलिकडे या विद्यार्थ्यांसंदर्भात घडलेल्या घटना या विद्यार्थ्यांसाठी अन सरकारसाठी अतिशय दुर्दैवी आहेय. या देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेचं भविष्य असणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी सरकार आतातरी संवेदनशील होईल हीच माफक अपेक्षा.  

हे ही वाचा :

Pooja Khedkar: अशी ही बनवाबनवी! IAS होण्यासाठी पूजा खेडकरने 7 वेळा नावं बदलून परीक्षा दिली, वाचा सविस्तर रिपोर्ट

अधिक पाहा..



Source link

मिटकरी हे राजकारणातील राखी सावंत, मनसे जिल्हाध्यक्षाची टीका; मिटकरी-मनसेतील वाद थांबता थांबेना!

मिटकरी हे राजकारणातील राखी सावंत, मनसे जिल्हाध्यक्षाची टीका; मिटकरी-मनसेतील वाद थांबता थांबेना!


अकोला: अकोल्यात (Akola News) राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari आणि मनसेतला (MNS) वाद थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. कारण या प्रकरणात आता दोन्ही पक्षाकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप करत टीकेची झोड सध्या होत आहे. अशातच आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या टीकेला उत्तर देत मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी अमोल मिटकरींवर जोरदार पलटवार केलाय.

आमदार मिटकरींची तुलना त्यांनी राखी सावंत हिच्याशी केलीय. मिटकरी हे राजकारणातील राखी सावंत असल्याचे साबळे यांनी म्हटले आहे. आमच्या नेत्याला पळकुटा म्हणणारे मिटकरीच राडयाच्या दिवशी अकोला विश्रागृहाच्या बाथरूममध्ये लपले असल्याचं साबळे म्हणालेय. ते अकोला इथे बोलत होते. जय मालोकार यांच्या मृत्यूचा आज दहावा दिवसही झाला नसताना मिटकरी त्याच्या मृत्युचं राजकारण करत आहेत असंही मनसे जिल्हाध्यक्ष साबळे म्हणालेय.

मिटकरी हे राजकारणातील राखी सावंत- पंकज साबळे

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यांमधील वाद संपता संपत नाहीये. अशातच आता मनसे नेते अमोल मिटकरींवर आणखी आक्रमक झाले आहेत. “अजित पवार चोरलेल्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील नेत्यांनी पातळी सोडून टीका केल्यास कानाखाली आवाज निघेल. अमोल मिटकरींनी पुन्हा थोबाड चालवलं तर कपडे काढून मारणार, असा इशारा मनसे नेते अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी दिला आहे. तर दुसरीकडे अकोल्याचे मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी अमोल मिटकरींची तुलना राखी सावंत यांच्याशी करत  मिटकरी हे राजकारणातील राखी सावंत असल्याचे साबळे यांनी म्हटले आहे. त्यामुळे हा वाद आणखी वाढत असल्याचे एकणात चित्र बघायला मिळत आहे.

20 पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल 

दुसरीकडे आमदार अमोल मिटकरींच्या वाहन तोडफोड प्रकरणातील संशयित आरोपी असलेले दुसरे जिल्हाध्यक्ष राजेश काळे आणि  पदाधिकारी सचिन गव्हाळे यांना अटक करण्यात आली आहे. अकोल्यातील सरकारी बगीचाजवळून त्यांना ही अटक करण्यात आलीय. या प्रकरणात आतापर्यत पोलिसांनी 7 जणांना अटकेत घेतले आहे. तर तिघांना या प्रकरणात जामिन मिळाला आहे. तर यातील एक संशयित आरोपी आणि मनसे पदाधिकारी असलेला जय मालोकार यांचा हृदय झटक्यानं मृत्यू झाला होता.

आतापर्यंत या प्रकरणात 20पेक्षा अधिक मनसेच्या लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र या संपूर्ण प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी कर्णबाळा दुनबळे हे अद्याप फरार असल्याचे चित्र आहे. त्यांच्या शोध घेणासाठी अकोला पोलिसांचे तीन पथक तयार करण्यात आले असून ते मुंबईच्या दिशेने गेल्याचीही माहिती पुढे आली आहे. 

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

जय मालोकरांबाबत काहीतरी अघटित घडलंय, मृत्युपूर्वी त्यांच्यासोबत कोण होतं? अमोल मिटकरींचा दावा

जय मालोकरांबाबत काहीतरी अघटित घडलंय, मृत्युपूर्वी त्यांच्यासोबत कोण होतं? अमोल मिटकरींचा दावा


अकोला: अकोल्यातील दिवंगत मनसे कार्यकर्ता जय मालोकार यांच्याबाबत अजित पवार  गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी एक खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. जय मालोकार हे पुढील काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार होता. याबाबत राष्ट्रवादीच्या अकोला जिल्हाध्यक्षांसोबत जय मालोकर (Jay Malokar) यांचे बोलणे झाले होते. मात्र, जय मालोकार राष्ट्रवादीत जातोय याचा राग अकोल्यातील मनसेच्या (MNS) काही पदाधिकाऱ्यांच्या मनात होता, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला. ते शुक्रवारी अकोल्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

जय मालोकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्यामुळेच त्यांच्यासोबत काहीतरी अघटित घडल्याचा संशय अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला. शासकीय विश्रामगृहाबाहेर झालेल्या राड्यानंतर जय मालोकार यांच्यासोबत कोण होते? हे समोर आले तर या संपूर्ण प्रकरणातील धक्कादायक सत्य बाहेर येईल. अकोला पोलिसांनी या सगळ्या गोष्टींचा तपास करावा, अशी मागणी मिटकरी यांनी केली. अमोल मिटकरी यांच्या या दाव्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. 

अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यांनी 30 जुलैला अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहाबाहेर अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला चढवला होता. यावेळी मिटकरींच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. यावेळी झालेल्या राड्यात सहभागी असलेले मनसेचे कार्यकर्ते जय मालोकार यांचा काहीवेळानंतर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता.

जय मालोकार राड्यात नव्हते, शांतपणे मागे उभे होते: अमोल मिटकरी

जय मालोकार काही दिवसांतच राष्ट्रवादी प्रवेश करणार होता. तो त्या राड्यात देखील सहभागी होता, पण त्याने काहीच केलं नाही मागे शांत होता. जय मालोकार याच्या मृत्यूला मनसेचा कर्नाबाळा दुनबळेच जबाबदार आहे. लवकर सर्व खुलासे उघड होतील अशी शक्यता मिटकरी यांनी वर्तवली. जय मालोकार यांची राष्ट्रवादीत प्रवेश घेण्याची इच्छा होती. अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे प्रवेश करण्याच्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सोबतही मालोकार यांचे बोलणे झाले होते, असे मिटकरी यांनी सांगितले.  

कर्णबाळा सुरुवातपासून पळपुटा होता. मिशीला पीळ देऊन मांड्या ठोकणारा आज मोबाईल बंद करून ठेवतोय. लवकरच त्याला गजाआड करू. अकोला पोलिसांचा शब्द होता. म्हणून कालच आंदोलन मागे घेतले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना माझं सांगणं आहे की, मनसेच्या कार्यकर्त्यांचे लाड करु नका. असा पक्ष सोबत घेतलास जनता मतदान कसं करणार? महायुतीत सडके आंबे नको,त्यांना मोकाट सोडा, त्यांची औकात दिसून जाईल. जो धूर निघतोय रेल्वे इंजिनचा तोही जाईल. असा पक्ष सत्तेत सोबत असणे महायुतीची विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणावे लागेल, असेही मिटकरी यांनी म्हटले. 

आणखी वाचा

अमोल मिटकरी घासलेट चोर, पुन्हा थोबाड चालवलं तर कपडे काढून मारणार; अमेय खोपकर यांचा इशारा

अधिक पाहा..



Source link

अमोल मिटकरींच्या आक्रमक पावित्र्यानंतर पोलीस अ‍ॅक्शनमोडवर; तीन पथकं मुंबईच्या दिशेने रवाना

अमोल मिटकरींच्या आक्रमक पावित्र्यानंतर पोलीस अ‍ॅक्शनमोडवर; तीन पथकं मुंबईच्या दिशेने रवाना


Akola Amol Mitkari vs MNS :  उपमुख्यमंत्री  अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) आणि मनसे यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. या संपूर्ण प्रकराला अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंसह अकोला पोलिसांना जबाबदार धारत गंभीर आरोप केले आहे. मनसे पक्षाच्या खुनशी लोकांना अकोला पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप अमोल मिटकरींनी केला आहे. मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबाळे (Karnabala Dunbale) हे पोलिसांचा लाडका भाऊ आहे का? त्याच्याविरोधात ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत मी पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेरून उठणार नाही. असे म्हणत मिटकरींनी काल आक्रमक पवित्रा घेतला होता. एकंदरीत या प्रकरणात आता अकोला पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे बघायला मिळाले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी मनसे सरचिटणीस कर्णबाळा दूनबळेंच्या अटकेसाठी अकोला पोलिसांचे पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.

मनसे सरचिटणीसांच्या अटकेसाठी  तीन पथकं मुंबईच्या दिशेने रवाना 

अकोला सिव्हिल लाईन पोलिसांचं पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती हाती आली आहे. मात्र मनसे नेते कर्णबाळा हे सध्या संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचेही बोललं जातंय. मनसे सरचिटणी सदुनबळे यांच्या अटकेसाठी एकूण तीन पथकं नेमण्यात आली आहे. दुनबळेंच्या अटकेसाठी काल आमदार अमोल मिटकरींनी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन करत कडक कारवाईची मागणी केली होती. सोबतच अकोला पोलीस मनसे पक्षाच्या लोकांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही केला होता. त्यामुळे आता पोलिसांनीही पुढची कारवाई करण्याचा पवित्रा घेतल्याचे चित्र आहे. मात्र या प्रकरणी आता नेमकी काय कारवाई होते हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

काय म्हणाले अमोल मिटकरी? 

राज ठाकरेंच्या मनसे पक्षाच्या खुनशी लोकांना अकोला पोलीस पाठीशी घालत आहेत. अकोला पोलीस दलातील अधिकारी मनसेच्या (MNS) कर्णबाळा दुनबाळे यांची हॉटेलमध्ये गळाभेट घेतात. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. यावरुन मनसेचे गुंड कोणाच्या जीवावर उडत आहेत, हे दिसून येते. माझ्यावर मनसेच्या गुंडांनी हल्ला केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी माझी फोनवरुन विचारपूस केली. एवढेच नव्हे तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही मला फोन केला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मला फोन करावासा वाटला नाही. माझा जीव गेल्यावर ते शांत होणार आहेत का, असा सवाल अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी उपस्थित केला. ते गुरुवारी अकोल्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज ठाकरेंच्या पक्षासारखे खुनशी लोक महाराष्ट्रात सत्तेवर बसवले तर काही खरं नाही. कर्णबाळा दुनबाळे हा पोलिसांचा लाडका भाऊ आहे का? त्याच्याविरोधात ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत मी पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेरून उठणार नाही. पोलिसांनी त्यांच्या रिव्हॉल्व्हरमधून माझ्या डोक्यात सहाच्या सहा गोळ्या घालाव्यात. गुंडांकडून मरण्यापेक्षा पोलिसांच्या हातून मेलेलं केव्हाही चांगलं आहे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले. 

हे ही वाचा 

 

अधिक पाहा..



Source link

भरधाव ट्रकने बाईकवरुन जाणाऱ्या चौकोनी कुटुंबाला उडवलं, 9 महिन्यांच्या लेकीसह आईचा जागीच मृत्यू

भरधाव ट्रकने बाईकवरुन जाणाऱ्या चौकोनी कुटुंबाला उडवलं, 9 महिन्यांच्या लेकीसह आईचा जागीच मृत्यू


Akola Hit And Run News : राज्यातील हिट अँड रनच्या (Hit And Run) घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच आता अकोल्यातून (Akola) देखील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका भरधाव वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली आहे. ही धडक इतकी जोरदार होती की यात आईसह 9 महिन्याच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर वडील आणि वर्षाचा मुलगा हे गंभीर जखमी झाले आहेत. अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील व्याळाजवळ ही घटना घडली आहे. दुचाकीला धडक दिल्यानंतर चारचाकी वाहन चालक भरधाव वेगाने वाहन घेऊन फरार झाला आहे. 

बाळापुर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद

अकोल्यातील हातरुण येथील उस्मान खान रहमान खान (38) हे त्यांची पत्नी व दोन मुलांसह दुचाकीने (क्र. एमएच 30 एएम 7539) अकोल्यातून वाडेगाव येथे जात होते. व्याळानजीक आले असता अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक देऊन घटनास्थळावरुन पोबारा केला. या अपघातात उस्मान खान यांची पत्नी कशफ (28) यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगी अनाया फातेमा (9 महिने) हिचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला. उस्मान खान व त्यांचा मुलगा सदीम खान (5) हे गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांवर अकोल्यातल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी अकोला जिल्ह्यातीलच बाळापुर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.

राज्यातील सर्वच प्रमुख शहरांत दिवसेंदिवस हिट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ

राज्यातील सर्वच प्रमुख शहरांत दिवसेंदिवस हिट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच मुंबई पुण्यासह अनेक शहरात या घटनांमध्ये कमालीची वाढ होत असल्याचे दिसत आहे. अशा घटनांना कारणीभूत ही मद्यधुंद अवस्थेतील तरुणाई आहे. काही बिल्डरपुत्र आहेत तर काही राजकीय पदाधिकाऱ्यांची मुलं देखील आहेत. त्यामुळे कायद्याच्या चौकटीचं भय या बड्या नेत्यांच्या मुलांना राहिलेलं दिसत नाही. बेफिकीरपणे वाहने चालवताना तरुणाई दिसत आहे. मात्र, त्यामुळं बळी जातात ते सामान्य निष्पापांचे. ज्यांचा यामध्ये काहीही दोष नसतो, त्यांना दुसऱ्याच्या चुकीमुळं जीव गमवावा लागतो. राज्यात सामान्यांसाठी मरण स्वस्त झालंय का? असा सवाल देखील आता उपस्थित होताना दिसत आहे. 

महत्वाच्या बातम्या:

जालन्यात भीषण अपघात! शाळेतून घरी जाणाऱ्या मायलेकीसह चौघांना आयशरची जोरदार धडक, तिघांचा दुर्दैवी अंत, चालक फरार

 

 

 

अधिक पाहा..



Source link

पोलिसांनी रिव्हॉल्व्हरने माझ्या डोक्यात गोळ्या झाडाव्यात, माझा जीव गेल्यावर मुख्यमंत्री शिंदे क

पोलिसांनी रिव्हॉल्व्हरने माझ्या डोक्यात गोळ्या झाडाव्यात, माझा जीव गेल्यावर मुख्यमंत्री शिंदे क


अकोला: राज ठाकरेंच्या मनसे पक्षाच्या खुनशी लोकांना अकोला पोलीस पाठीशी घालत आहेत. अकोला पोलीस दलातील अधिकारी मनसेच्या (MNS) कर्णबाळा दुनबाळे यांची हॉटेलमध्ये गळाभेट घेतात. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. यावरुन मनसेचे गुंड कोणाच्या जीवावर उडत आहेत, हे दिसून येते. माझ्यावर मनसेच्या गुंडांनी हल्ला केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी माझी फोनवरुन विचारपूस केली. एवढेच नव्हे तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही मला फोन केला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मला फोन करावासा वाटला नाही. माझा जीव गेल्यावर ते शांत होणार आहेत का, असा सवाल अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी उपस्थित केला. ते गुरुवारी अकोल्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी त्यांनी मनसेचे स्थानिक पदाधिकारी कर्णबाळा दुनबाळे आणि अकोला पोलिसांवर (Akola Polie) टीकेची तोफ डागली. राज ठाकरेंच्या पक्षासारखे खुनशी लोक महाराष्ट्रात सत्तेवर बसवले तर काही खरं नाही. कर्णबाळा दुनबाळे हा पोलिसांचा लाडका भाऊ आहे का? त्याच्याविरोधात ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत मी पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेरून उठणार नाही. पोलिसांनी त्यांच्या रिव्हॉल्व्हरमधून माझ्या डोक्यात सहाच्या सहा गोळ्या घालाव्यात. गुंडांकडून मरण्यापेक्षा पोलिसांच्या हातून मेलेलं केव्हाही चांगलं आहे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले. 

अकोला पोलिसांनी कर्णबाळा दुनबाळेच्या एव्हाना मुसक्या आवळल्या होत्या. त्याला अद्याप अटक का करण्यात आली नाही. तो राजरोसपणे मुंबईत जाऊन पत्रकारपरिषद घेतो आणि पोलीस त्याच्या केसालाही धक्का लावत नाहीत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्‍यांना माझं सांगणं आहे की, तुमचे आणि राज ठाकरे यांचे कितीही चांगले कौटुंबिक संबंध असतील तरी तुम्ही महाराष्ट्राचे पालक आहात. विधिमंडळाच्या एका सदस्यावर हल्ला होण्याची बाब तुम्ही कशी सहन करु शकता, असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला.

मिटकरीसारख्या फालतू माणसावर मला काही बोलायचे नाही: कर्णबाळा दुनबाळे

कर्णबाळा दुनबाळे यांनी गुरुवारी मुंबईत येऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दुनबाळे यांनी पुन्हा एकदा अमोल मिटकरी यांच्यावर  टीकेची तोफ डागली. अमोल मिटकरीसारख्या फालतू माणसाबद्दल काय बोलणार? अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला झाला तेव्हाची व्हीडिओ क्लीप पाहा, मी कुठेच नाही.  अमोल मिटकरी यांच्यावरील हल्ला क्रियेला प्रतिक्रिया होती, असे दुनबाळे यांनी म्हटले.

आणखी वाचा

मिटकरी काल कुठल्या बिळात लपले होते? मनसे सरचिटणीस रणजीत शिरोळे यांचे मिटकरींना प्रत्युत्तर म्हणाले…

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp