अमोल मिटकरींची गाडी काल दुपारी फोडली, आज दुपारी मनसे पदाधिकाऱ्यांना जामीन; तिघांची सुटका

अमोल मिटकरींची गाडी काल दुपारी फोडली, आज दुपारी मनसे पदाधिकाऱ्यांना जामीन; तिघांची सुटका


अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं. अकोल्यातली शासकीय विश्रामगृहाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांची कार मनसे कार्यकर्त्यांनी फोडल्यानंतर येथे चांगलाच राडा झाला. अकोल्यातील मनसेच्या जिल्हाध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांनी कुंड्या व दगडाने अमोल मिटकरी यांच्या कारच्य काचा फोडल्या. त्यानंतर, आमदार मिटकरी (Amol Mitkari) यांनी संताप व्यक्त करत मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावरुनच माझ्यावर हल्ला झाल्याचं त्यांनी म्हटलं. विशेष म्हणजे फिर्यादही राज ठाकरेंचं नाव घेण्यात आलंय. याप्रकरणी पोलिसांनी 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आता तीन आरोपींना न्यायालयाने (Court) जामीन मंजूर केला आहे. 

अमोल मिटकरी आणि मनसेच्या राडा प्रकरणातील तीन प्रमुख आरोपींना अकोला न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. जामीन मंजूर झालेल्यांमध्ये मुख्य आरोपी आणि मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सौरभ भगत आणि दिपक बोडखे यांचा समावेश आहे. याप्रकरणी एकूण 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी, 3 आरोपींचा 24 तासांच्या आत जामीन मंजूर झाला आहे. अकोल्याच्या शासकीय  विश्रामगृहातील राडा प्रकरणी झाले होते 13 लोकांवर सिव्हील लाईन पोलिसांत गुन्हे दाखल़. त्यातील आरोपींपैकी जय मालोकार यांचा काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता. आता, उर्वरीत 9 आरोपींनीही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

दरम्यान, मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यांमधील वाद आणखी टोकाला गेला आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. आमदार अमोल मिटकरी यांना माझं ओपन चॅलेज आहे. पोलिस सुरक्षा बाजूला कर, मी समोर येतो अन् एकदा काय ते होऊनच जाऊ दे, असं थेट आव्हान मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे अमोल मिटकारींना दिलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते असलेल्या आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर सुपारीबाज म्हणत टीका केली होती. यापूर्वीही त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. त्यामुळे, मनसे कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी थेट खळखट्याकचा अवलंब केल्याचं दिसून आलं. 

त्यामुळे सुरू झाला वाद

राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर पुण्यातील पूरपरिस्थितीवरून टीका केली होती. त्यानंतर त्याला राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर देत राज ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यानंतर मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी अकोल्यात मिटकरींची गाडी फोडली. 

हेही वाचा

मोठी बातमी : परळी, कागल ते आंबेगाव, शरद पवारांनी 20 जागा हेरल्या, दादांच्या आमदारांविरुद्ध तरुण उमेदवार देणार!

अधिक पाहा..



Source link

अजित पवारांवर हत्येचा गुन्हा दाखल करा, मिटकरी हल्ल्यातील कार्यकर्त्याच्या मृत्यूनंतर मनसे आक्रम

अजित पवारांवर हत्येचा गुन्हा दाखल करा, मिटकरी हल्ल्यातील कार्यकर्त्याच्या मृत्यूनंतर मनसे आक्रम


छत्रपती संभाजीनगर: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी राज ठाकरेंवर (Raj Thackeray) केलेल्या एका वक्तव्याने राज्याचा राजकारणात मोठा वादंग निर्माण झाला आहे. यात संतप्त झालेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी अकोल्यात  (Akola News) राडा घालत अमोल मिटकरी चक्क गाडी फोडल्याची घटना घडली आहे. मिटकरींच्या गाडी तोडफोड आणि राडा प्रकरणात आता पर्यंत 13 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तर यातील तिसरा संशयित आरोपीलाही आता ताब्यात घेण्यात आले आहे. 

दरम्यान, कालच्या अकोल्यातील मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यांच्या राड्यानंतर जय मालोकार या मनसे कार्यकर्त्याचा हृदयविकाराने मृत्यू पावल्याची दुदैवी घटना देखील घडली आहे. या संपूर्ण प्रकाराला अमोल मिटकरी हेच जबाबदार असल्याचा दावा मनसेचे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी केला आहे.

…. तर आम्ही देखील आंदोलन करू

तर आम्ही फक्त मोदी यांना पाठिंबा दिलाय. अजित पवार यांना महायुतीमध्ये राहायचं नाही, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहे. अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास आम्ही देखील आंदोलन करू, असा थेट इशाराही मनसे नेते प्रकाश महाजन यांनी दिला आहे. त्यामुळे आता मनसे विरुद्ध राष्ट्रवादीतील हा वाद आणखी टोकाला गेल्याचे दिसून येतंय. अमोल मिटकरी हे एका संविधानक पदावर आहेत. यांच्याकडे काय पुरावा आहे की राज ठाकरे सुपारीबाज आहे? गाडीवर झालेल्या हल्ल्याचे समर्थन होणार नाही. मात्र, या संपूर्ण घटनेत आमच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झालाय. ही घटना का झाली, तर अमोल मिटकरी यांनी पोलीस ठाण्यात जाऊन कारवाईची मागणी केली. त्यातूनच त्याला हृदयविकाराचा झटका येऊन त्यात त्याचा मृत्यू झालाय.

अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करा- प्रकाश महाजन

सुपारीबाज अजित पवार आहेत. पंतप्रधान यांनी 70 हजार कोटींचा आरोप त्यांच्यावर या पूर्वी केलाय. गेल्या निवडणुकीत मनसे नेत्यांना त्यांनी मणावले. आम्ही काम केले नसते तर अजित पवार गटाचे तटकरे निवडूनही आले नसते. आमच्या कार्यकर्त्याच्या मृत्यला जबाबदार असलेल्या सर्वांवर गुन्हा दाखल करा, त्यात अजित पवार यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा. अशी मागणीही  मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे.

मनसे कार्यकर्त्यावर आज दुपारी अंत्यसंस्कार

दरम्यान, कालच्या अकोल्यातील मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यांच्या राड्यानंतर हृदयविकाराने मरण पावलेल्या जय मालोकार या मनसे कार्यकर्त्यावर आज दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार होणार  असल्याची माहिती पुढे आली आहे. जय याच्या निंबी मालोकार या गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. जयच्या अंत्यसंस्कारासाठी प्रदेश सरचिटणीस राजू उंबरकर आणि प्रदेश उपाध्यक्ष तसेच अकोला संपर्कप्रमुख विठ्ठल लोखंडकार उपस्थित राहणार आहेत.

अकोल्यातील कार्यकर्त्यांशी मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी देखील संवाद साधल्याची माहिती पुढे आली आहे. पुढच्या काही दिवसांत अमित ठाकरे मालोकार कुटुंबियांच्या भेटीसाठी अकोल्यात येण्याचीही शक्यता आहे. सध्या जयचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला जिल्हा रूग्णालयात आहे. 

हे ही वाचा

अधिक पाहा..



Source link

मनसेच्या राड्यानंतर अमोल मिटकरींचा पोलीस ठाण्यातच ठिय्या; 8 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

मनसेच्या राड्यानंतर अमोल मिटकरींचा पोलीस ठाण्यातच ठिय्या; 8 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल


Amol Mitkari : अकोला : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींवर (Amol Mitkari) केलेला हल्ला आणि गाडीची तोडफोड केल्या प्रकरणी 8 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. अकोल्यातील (Akola News)  सिव्हील लाईन पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणातील संशयित आरोपींमध्ये मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे, जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, राजेश काळे, सौरभ भगत, महिला जिल्हाध्यक्ष प्रशंसा अंबेरे, बार्शीटाकळी तालुकाध्यक्ष सचिन गालट यांच्यासह इतर कार्यकर्त्यांचा समावेश.

या प्रकरणातील हल्लेखोरांना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत अकोल्यातील सिव्हील लाईन पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आमदार अमोल मिटकरी यांनी दिला होता. त्यानंतर आता हा कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. मात्र या प्रकरणातील सर्व मनसे कार्यकर्ते फरार असून पोलीस सध्या त्यांचा शोध घेत आहेत.

मनसेच्या राड्यानंतर अमोल मिटकरींचा पोलीस ठाण्यातच ठिय्या

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्या विरोधात मनसे आज चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले आहे. अमोल मिटकरी यांची गाडी मनसे कार्यकर्त्यांनी फोडल्याची घटना आज अकोल्यात घडलीय. दरम्यान, अमोल मिटकरींनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका केल्यानं मनसैनिक आक्रमक झालेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज असा केल्याने अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात  आली आहे.

राज ठाकरे यांच्याविषयीच्या टिप्पणीमुळे संतप्त झालेल्या मनसैनिकांनी अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. मात्र, मनसे कार्यकर्त्यांच्या हल्ल्यात अमोल मिटकरी यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. या घटनेनंतर मनसे आणि अजित पवार गटातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे या हल्ल्याला राज ठाकरे जबाबदार असल्याचा आरोप अजित पवार गटाचे नेते उमेश पाटील यांनी केला आहे. 

अमोल मिटकरी यांनी राजकारणात  चुकीचा पायंडा  पाडला-  वैभव खेडेकर

राजकीय जीवनात राजकीय मर्यादा पाळल्या पाहिजेत. सर्वांच्या बोलण्यावर मर्यादा असल्या पाहिजेत. अमोल मिटकरी हे सातत्यानं अर्वाच्च भाषेत किंवा खालच्या भाषेत टीका करीत आहेत. अमोल मिटकरी यांनी चुकीचा पायंडा राजकारणात पाडलेला आहे. यावर संतप्त होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी फोडलेली आहे. मी महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकांचं समर्थन करतो. अभिनंदन करतो की राजकीय व्यभिचारी करणाऱ्या अशा व्यक्तींना जशास तसं उत्तर मिळालं पाहिजे. राजकीय सभ्यता पाळली पाहिजे.

आमच्यावर टीका करणाऱ्या अमोल मिटकरी यांनी अनेकदा हिंदू धर्मावर शंका उपस्थित केली आहे. त्यांनी अनेक वेळा भाजपवरती खालच्या दर्जाची टीका केलेली आहे. आज हेच लोक भाजपच्या मांडीवर जाऊन बसलेले आहेत. यानंतर सुद्धा अमोल मिटकरी यांनी त्यांची भाषा आणि सभ्यता पाळावी, असा माझा आमदार अमोल मिटकरी यांना सल्ला आहे, अशी खोचक टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी अमोल मिटकरी यांच्यावर केली.

हे ही वाचा 

 

अधिक पाहा..



Source link

मोठी बातमी : UPSC नंतर आता MPSC मधील दिव्यांग कोटा रडारवर, 9 अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रावर संशय

मोठी बातमी : UPSC नंतर आता MPSC मधील दिव्यांग कोटा रडारवर, 9 अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रावर संशय


Akola News अकोला : यूपीएससीत निवड झालेल्या पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रावरुन वादंग उठला आहे. त्यानंतर आता इकडे MPSC च्या पदभरतीतही असाच प्रकार झाल्याची शक्यता आहे. ‘यूपीएससी’ (UPSC) नंतर आता ‘एमपीएससी’च्या (MPSC) पदांमधील दिव्यांग कोट्यात खोटी प्रमाणपत्रे सादर करण्यात आल्याची शंका आहे. त्यामुळे 9 जण जे असे प्रमाणपत्र दाखवून अधिकारी झाले आहेत, ते रडारवर आहेत. या नऊ जणांची आजपासून पुढचे दोन दिवस नव्याने शारीरिक चाचणी होण्याची शक्यता आहे.

10 पैकी नऊ उमेदवारांची प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात

2022 मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील दिव्यांग कोट्यातून निवड झालेल्या 10 पैकी नऊ उमेदवारांची प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात आहे. या सर्व उमेदवारांची शारीरिक तपासणी करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने एमपीएससीला दिले आहेत. या सर्व उमेदवारांच्या आजपासून पुढचे दोन दिवस नव्याने शारीरिक चाचण्या होण्याची शक्यता आहे. एकूण 623 पदांसाठी परीक्षा झाली होती. यातील 10 जागा दिव्यांगांसाठी राखीव होत्या. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे तक्रार दखल 

दिव्यांग कोट्यातून उपजिल्हाधिकारी पदावर निवड झालेल्या बुलढाणा येथील एका उमेदवाराचं दिव्यांग प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात आहे. दिव्यांग कोट्यातून निवड झालेल्या या उमेदवाराने  याआधी खेळाडू, अंध आणि इतर कोट्यांचा फायदा घेतला होता. त्यांच्या निवडीवर आक्षेप घेत, त्यांची तक्रार ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’चे अध्यक्ष रजनीश शेठ यांच्याकडे करण्यात आली आहे.

यासंदर्भात तक्रार करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari)  यांच्या कानावरही हा प्रकार घातला आहे. आमदार मिटकरींनी यासंदर्भात सरकार आणि प्रशासकीय पातळीवर यासंदर्भात चर्चा करीत कारवाईची मागणी केलीये.  

पूजा खेडकरांचे कारनामे, ‘माझा’ कडून पोलखोल

– 9 जुलै – पूजा खेडकरांनी आयएएस होण्यासाठी सादर केलेले दिव्यांग प्रमाणपत्र संशयास्पद असल्याचं समोर.

– 10 जुलै – पूजा खेडकरांनी दिव्यांगांच्या कोट्यातून परीक्षा देण्यासाठी दृष्टीदोष आणि मेंटल इलनेस सर्टिफिकेट मिळवल्याचं समोर. 

– 11 जुलै – ओबीसी कोट्यातून परीक्षा देण्यासाठी नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट मिळवल्याचं समोर आलं. 

– 12 जुलै – पूजाची आई मनोरमा खेडकरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून शेतकऱ्यांना धमकावल्याचं समोर. 

– 13 जुलै – पूजा खेडकरांनी लाल दिवा वापरताना नियमांचा भंग केल्याचं स्पष्ट, पोलिसांकडून कारवाई सुरू.

– 14 जुलै – पूजा खेडकरांनी वापरलेली ऑडी कार पोलिसांकडून जप्त, पूजा खेडकरांचे आई-वडील गायब असल्याचं स्पष्ट.

– 15 जुलै – एमबीबीएस करताना पूजा खेडकरांचं काशीबाई नवले महाविद्यालयात वेगळं नाव असल्याचं समोर. 

– 15 जुलै – वडील क्लास वन अधिकारी असतानाही नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट देऊन एमबीबीएसला प्रवेश घेतल्याचं समोर. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

मी माझ्या परीक्षेत नापास झाली, हरली पण हार नाही मानली; आता तयारी करून परत उतरणार : नवनीत राणा

मी माझ्या परीक्षेत नापास झाली, हरली पण हार नाही मानली; आता तयारी करून परत उतरणार : नवनीत राणा


Navneet Rana Amravati : मुलांच्या भविष्यासाठी मी आज पहिल्यांदा बाहेर पडली आणि भाषण करतेय. विद्यार्थी जीवनात असे मंच फार महत्वाचे आणि प्रेरणादायी ठरत असतात. आपल्या कामाला आणि त्यामागील मेहनतीला प्रोत्साहन मिळालं तर आपण अधिक जोमाने काम करत असतो. असे असले तरी मी माझ्या राजकीय परीक्षेत नापास झाली. मी कुठं तरी कमी पडली असेल, मात्र मी कधीही हार मनाली नाही. माझ्या पराभवाचा काही जणांना खूप आनंद झाला. मात्र चमकणारा तारा नेहमी चकमतच राहतो, मग  तो कुठेही राहो. आता आगामी काळात मी परत तयारी करून परत राजकारणाच्या नव्या मैदानात उतरणार, असे म्हणत माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी निर्धार केला आहे. अमरावती (Amravati) येथे युवा स्वाभिमान पार्टीद्वारा आयोजित दहावी आणि  बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्यात त्या बोलत होत्या.

माझी अमरावती 10 वर्ष मागे गेलीय, त्याची जबाबदारी आता कोण घेईल?

आधी नवनीतला हरवलं आता रवी राणाला हरवू, असे काही लोक म्हणतात. पण जनतेचा आशिर्वाद आमच्या पाठीशी आहे. मी हरली पण मी कधीही हार नाही मानली. माझ्या पराभवानंतर आमदार रवी राणा यांनी मला प्रोत्साहित केलं. किंबहुना त्यांनी मला पुन्हा उभे राहण्याचेही सुचवले. आयुष्यात ते कायम माझ्या पाठीशी राहिले आहे. असे प्रोत्साहन नक्कीच यश खेचून आणण्यासाठी उपयुक्त ठरत असतात. गेल्या निवडणुकीत ज्यांनी मतदान केलं त्यांचे आभार, पण ज्यांनी नाही केलं त्यांना एकच सांगते की, 10 वर्ष अमरावती मागे गेलीय, त्याची जबाबदारी आता कोण घेईल. आपण सगळ्यांनी मेहनत केली. आता देखील कंबर कसून विधानसभेत तुमची तयारी हवी आणि यावेळी पुन्हा एकदा ताकद दिसली पाहीजे. असे आवाहन ही नवनीत राणा यांनी केलंय.

नवनीत राणा यांना किती मतं मिळाली?

अमरावती लोकसभा मतदारसंघ काँग्रेस उमेदवार बळवंत वानखेडे यांना 526271 मिळाली. नवनीत राणा यांना 506540 मतं मिळाली. राणा यांना पराभवाचा सामना करावा लागला. 57.46 टक्के मतदान झालं होतं. 2019 मध्ये अमरावतीमधून नवनीत राणा विजयी झाल्या होत्या. अपक्ष म्हणून निवडणूक लढवत त्यांनी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांचा 36 हजार 951 मतांनी पराभव केला होता. नवनीत राणा यांना 510947 मते मिळाली. तर आनंदराव अडसूळ यांना 4 लाख 73 हजार 996 मते मिळाली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

नवनीत राणा गेल्यावेळी माझ्यामुळे खासदार, यावेळी मतं काढून घेतल्यावर पडल्या: यशोमती ठाकुर

नवनीत राणा गेल्यावेळी माझ्यामुळे खासदार, यावेळी मतं काढून घेतल्यावर पडल्या: यशोमती ठाकुर


अमरावती : नवनीत राणा (Navneet Rana) या गेल्यावेळी माझ्या मतांवर खासदार झाल्या होत्या, यावेळी मतं काढून घेतल्यावर त्या पडल्या अशा शब्दात काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकुर (Yashomati Thakur) यांनी राणांना टोला लगावला. गेल्यावेळी आम्ही त्यांना मतं दिली, ती यावेळी काढून घेत आमची ताकद दाखवली असंही त्या म्हणाल्या. यशोमती ठाकुर या पंढरपूरमध्ये आल्या असता एबीपी माझाशी संवाद साधला.   

गेल्या वेळी सर्वात जास्त चर्चेत राहिलेल्या नवनीत राणा या आपल्या मतावर अमरावतीतून खासदार झाल्या होत्या. पण यावेळी आमची मते काढून घेतल्यावर पडल्या असं यशोमती ठाकुर म्हणाल्या. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचा काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी पराभव केला आहे. 2019 सालच्या निवडणुकीत नवनीत राणा या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून गेल्या होत्या. पण निवडणूक झाल्यानंतर त्यांनी भाजपला साथ दिली. त्याचा वचपा आता महाविकास आघाडीने काढला आणि राणांचा पराभव झाला. 

येणारी विधानसभा निवडणूक ही महाविकास आघाडी एकत्रित लढणार असून सत्ताही जिंकणार असल्याचा दावा आमदार यशोमती ठाकुर यांनी केला. 

लाडकी बहीण योजना चुनावी जुमला

महायुतीकडून निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केलेली लाडकी बहीण योजनेमध्ये सुरुवातीपासूनच अडचणी येत असून अर्थ विभागानेही त्याला विरोध केल्याचे समजते आहे. राज्याची आर्थिक स्थिती पाहता ही योजना निवडणुकीनंतर गुंडाळली जाईल आणि हा फक्त चुनावी जुमला राहील असा टोला यशोमती ठाकूर यांनी लगावला. 

या आधी नवनीत राणा यांनी आमदार यशोमती ठाकुर यांच्यावर टीका केली होती. मी जे काही करते ते ओरिजनल आहे. आता ब्रँडला कॉपी करणारे खूप सारे कॉपी घेऊन जातात, पण ब्रँड हा ब्रँड असतो असे म्हणत नवनीत राणांनी यशोमती ठाकूर यांना टोला लगावला होता. माझा कोणासोबतही सामना नाही, मी माझ्या जनतेची सेवा करण्यासाठी या क्षेत्रात आली आहे. ती सेवा मी शेवटच्या श्वासापर्यंत करणार असं नवनीत राणांनी म्हटलं होतं. 

ही बातमी वाचा:

                                                                            

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp