डीएपी खतांच्या बॅगेत चक्क माती, शेतकऱ्यांना 5400 बॅग विकल्या; पुण्यातील कंपनीविरुद्ध गुन्हा

डीएपी खतांच्या बॅगेत चक्क माती, शेतकऱ्यांना 5400 बॅग विकल्या; पुण्यातील कंपनीविरुद्ध गुन्हा


Amravati News : सध्या सर्वत्र पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे शेतीच्या कामाला देखील गती प्राप्त झाली असून बळीराजा (Farmer) शेतीच्या कामांमध्ये गुंतल्याचे चित्र आहे. अशातच आता शेतकऱ्यांची फसवणूक (Fraud) करणाऱ्या कंपनीवर परत एकदा कृषी विभागाने मोठी कारवाई केलीय. शेतकर्‍यांना बोगस डीएपी खतांची विक्री करणाऱ्या आणि मिश्र खतांच्या नावाखाली माती विकणात आल्याच्या धक्कादायक प्रकार अमरावतीमध्ये (Amravati News) उघडकीस आला आहे.

शेतकर्‍यांच्या कष्टाची माती करणाऱ्या या कंपनीवर अमरावती कृषी विभागाने कारवाई करत हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गासह बोगस खते आणि बियाणे विकणार्‍यामध्ये मोठी खळबळ उडाली असून, अशावर कडक कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. 

453 खतांची पोती जप्त, पुण्यातील कंपनीविरुद्ध गुन्हा

अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा येथे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. यात एका कृषी केंद्रातील खताचे नमुने घेतले असता, त्याचा अहवाल आल्यानंतर त्यामध्ये माती असल्याचे उघडकिस आलं आहे. पुण्यातील खत निर्माण करणारी “रामा फर्टीकेम लिमिटेड” या कंपनीने अमरावती जिल्ह्यात 3 हजार 300 बॅग डीएपी आणि 10 : 26 : 26 या खताच्या 2100 बॅग अशा 5 हजार 400 खतांच्या बॅगची विक्री केली आहे. यामध्ये अनेक नमुने हे चुकीचे आढळून आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आता या कंपनीचे 453 खतांची पोती जप्त करण्यात आली असून यामध्ये पुणे येथील रामा फर्टिकेम कंपनीच्या विकास नलावडे विरुद्ध अमरावती शहर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. तर खत विक्री करणाऱ्या कंपनी आणि विक्री करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.

18 हजार हेक्टरवरील शेत पिकांचं नुकसान 

भंडारा जिल्ह्यात आलेल्या अतिवृष्टीतमुळं पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. याचा सर्वाधिक फटका  पवनी आणि लाखांदूर तालुक्याला बसलेला आहे. या अतिवृष्टीचा जिल्हा प्रशासनानं नजर अंदाज अहवाल तयार केला आहे. त्यात, 239 गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून 39 हजार 141 शेतकऱ्यांचं सुमारे 18 हजार हेक्टरमधील शेतपिकांचं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळं 315 घरांचं आणि 16 गोठ्यांचं नुकसान झालं आहे. 681 घरांमध्ये अतिवृष्टी झाल्यानं पुराचं पाणी शिरलं. नुकसान झालेल्या शेतीकांमध्ये भात पीक, सोयाबीन, तूर, कापूस, भाजीपाला यांचा मुख्य समावेश आहे यासोबतच व्यावसायिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ही नजर अंदाज आकडेवारी असून सर्वेक्षण झाल्यानंतर नेमकी आकडेवारी समोर येणार आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

पोषण आहार विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय का? मिलेट्स युक्त चॉकलेट मध्ये पुन्हा आढळल्या अळ्या

पोषण आहार विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय का? मिलेट्स युक्त चॉकलेट मध्ये पुन्हा आढळल्या अळ्या


Amravati News : अमरावतीच्या (Amravati News) अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या मेळघाट मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मेळघाट मधील गडगाभांडुप येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत दिल्या जाणाऱ्या मिलेट बारमध्ये चक्क अळ्या आढळून आल्या आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा भाग म्हणून हा मिलेट्स बार दिला जातो. मात्र हा खळबळजनक प्रकार उघड येताच या प्रकारानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केलाय. शाळेत निकृष्ट दर्जाचा बार दिला जात असल्याचा आरोप संतप्त पालकांनी केलाय. त्यामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. परिणामी, शालेय पोषण आहार हा विद्यार्थ्यांच्या जिवावर उठलाय की काय? असा सवाल आयात उपस्थित  केला जातोय. 

मिलेट्स युक्त चॉकलेट मध्ये पुन्हा आढळल्या अळ्या

शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करण्यासाठी  तसेच शाळेची गोडी लागण्यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील एक शालेय पोषण आहार ही योजना आहे. मात्र अनेकदा ही योजना  वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शालेय पोषण आहार हा आता विद्यार्थ्यांच्या जीवावर उठला आहे की काय, अशी शंकाही  या पोषण आहार पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांच्या मानसिकतेमधून वेळोवेळी पुढे आली आहे. या अगोदर देखील  यवतमाळच्या (Yavatmal News) उमरखेड तालुक्यातील चातारी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत वितरित करण्यात येत असलेल्या मिलेट्स चॉकलेट मध्ये  अळ्या आढळून आल्या होत्या.

पोषण आहार विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय का?

शिक्षण विभागाच्या (Education Department) आदेशाप्रमाणे मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना पोषण आहार म्हणून चॉकलेट वितरित केले. त्यातील 65 पालकांनी हे चॉकलेट घरी नेले. मात्र, त्यापैकी बहुतांश पालकांना चॉकलेटमध्ये पांढऱ्या रंगाच्या अळ्या असल्याचे आढळून आल्या. हा धक्कादायक प्रकार लक्षात येताच त्यांनी शाळेत येत मुख्याध्यापकांना जाब विचारत ते चॉकलेट परत केले होते. या सर्व प्रकारामुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. तर असाच काहीसा प्रकार  पंढरपुरात देखील घडला होता. यात चक्क पोषण आहारात  मृत बेडूक आढळून आला होता. कासेगावच्या भुसेनगरमधला हा धक्कादायक प्रकार त्यावेळी घडला होता. त्यामुळे सातत्याने घडत असलेल्या या घटना लक्षात घेता पोषण आहार विद्यार्थ्यांच्या जीवावर उठलाय का? असा सवाल या निमित्याने उपस्थित करण्यात येत आहे. 

विषबाधा झाल्याचे अनेक प्रकार समोर

शालेय विद्यार्थ्यांना शाळेसोबत शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शालेय पोषण आहार योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र या योजनेसाठी पुरवठा केला जाणार आहारातील माल निकृष्ठ दर्जाचा पुरवठा होत असल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात असून यातून नक्की पोषण कुणाचे केलं जातय, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. शाळेत शालेय पोषण आहारासाठी या अगोदर अळ्या, किडे,  पाल पडल्याने विषबाधा झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी करून अशा प्रकारे शाळेत निकृष्ट दर्जाचं शालेय पोषण आहार देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी देखील होऊ लागली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

Shiv Sena: विदर्भात शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढणार; ठाकरे गटाच्या ‘या’ दिग्गज नेत्याची घरवापसी

Shiv Sena: विदर्भात शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढणार; ठाकरे गटाच्या ‘या’ दिग्गज नेत्याची घरवापसी


Maharashtra Politics :  विधानसभेची निवडणूक (Vidhan Sabha Election 2024) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीय. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जवळ जवळ सर्वच महत्त्वाचे पक्ष कामाला लागले आहेत. सक्षम उमेदवाराची निवड, चांगली ताकत असलेले मतदारसंघाची निवड करण्याची प्रक्रिया इत्यादि बाबी राज्यातील पक्षांकडून चालू आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी पक्षांकडून आतापासूनच रणनीती आखण्यात येत आहे. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीत विदर्भात महायुतील फारसे यश न आल्याचे बघायला मिळाले. तर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) विदर्भात घरवापसी करत मोठे यश संपादन केले आहे.

परिणामी लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election) धक्कादायक निकाला अंती विदर्भात महायुतीने काहीसे अधिक लक्ष घातल्याचे दिसून आले आहे. अशातच आता विदर्भात शिवसेना ठाकरे गटाची ताकद आणखी वाढणार असल्याची बातमी समोर आली आहे. कारण नुकतेच उद्धव सेनेतील प्रमुख नेते आणि माजी आमदार रमेश कुथे (Ramesh Kuthe) यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत (Uddhav Thackeray Shiv Sena) पुन्हा घरवापसी करण्याची भूमिका घेतली आहे. 

माजी आ. रमेश कुथे पुन्हा शिवबंधन बांधणार

शिवसेनेतून भाजपात प्रवेश करणारे माजी आ. रमेश कुथे यांनी महिनाभरापूर्वी भाजप नेत्यांनी पक्ष प्रवेशापूर्वी दिलेल्या आश्वासनपूर्ती न केल्याचा आरोप करत भाजपला रामराम ठोकला होता. त्यांनी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली होती. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा देखील रंगल्या होत्या. दरम्यान असे असताना त्यांनी उद्धव सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेत पुन्हा घरवापसी करण्याची भूमिका घेतली आहे. यासाठी ते आपल्या समर्थकांसह काल गुरुवारी मुंबईला रवाना झाल्याची माहिती आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ते आज शिवबंधन बांधणार आहेत.

कोण आहेत रमेश कुथे?

गोंदियाचे माजी आमदार आणि भाजपचे नेते रमेश कुथे हे आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून घरवापसी करणार आहेत. आज दुपारच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्षप्रवेश होणार आहे. 2018 साली रमेश कुथे यांनी शिवसेना सोडली होती आणि भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर 1995 आणि 1999 या दोन टर्म शिवसेनेच्या तिकिटावर रमेश कुथे हे विधानसभा निवडणुका आधी जिंकले आहेत. त्यानंतर ते काही काळ राजकारणातून बाहेर होते. मात्र  त्यानंतर 2018 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ते राज्यातील भाजपनेत्यांवर नाराज होते. मध्यंतरी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचीही भेट घेतली होती. त्यावेळी काँग्रेसमध्ये जाणार का या चर्चा रंगल्या  होत्या. मात्र आता त्यांनी शिवसेना ठाकरे गटात अखेर घरवापसीचा निर्णय घेतला आहे.

अमरावतीत ठाकरे गटाला धक्का

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात फेरबदल होत असताना दिसून येत आहे. त्याच अनुषंगाने दर्यापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे माजी संपर्क प्रमुख गजू पाटील वाकोडे यांनी उद्धव ठाकरे यांना अखेरचा जय महाराष्ट्र करत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकताच त्यांनी पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि माजी आमदार अभिजीत अडसूळ यांच्या सह   मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत  त्यांचा हा पक्ष प्रवेश पार पडला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

Heavy Rain : पूर्व विदर्भात पावसाचे थैमान! अनेक गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

Heavy Rain : पूर्व विदर्भात पावसाचे थैमान! अनेक गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत


गेल्या काही दिवसापासून उपराजधानी नागपूरसह (Nagpur News) विदर्भात सुरू असलेल्या धुव्वाधार पावसाने (Heavy Rain सर्वत्र एकाच दाणादाण उडवली आहे.

तर पूर्व विदर्भात अतिवृष्टी सदृश्य  पावसामुळं (Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झालं असून शहरातील रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झालं आहे.

तर पूर्व विदर्भात अतिवृष्टी सदृश्य पावसामुळं (Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झालं असून शहरातील रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झालं आहे.

दरम्यान, काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा नागपूरसह विदर्भातील बहुतांश ठिकाणी पावसाची जोरदार रिपरिप सुरू आहे.

दरम्यान, काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा नागपूरसह विदर्भातील बहुतांश ठिकाणी पावसाची जोरदार रिपरिप सुरू आहे.

परिणामी अनेक नदी नाले ओसंडून वाहू लागल्याने अनेक नदीनाल्याच्या काढच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सोबत अनेक गावांची मुख्य शहरांशी संपर्क तुटल्याची माहिती आता समोर येऊ लागली आहे.

परिणामी अनेक नदी नाले ओसंडून वाहू लागल्याने अनेक नदीनाल्याच्या काढच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सोबत अनेक गावांची मुख्य शहरांशी संपर्क तुटल्याची माहिती आता समोर येऊ लागली आहे.

महाराष्ट्र मध्यप्रदेशच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीचे विहंगम दृश्य

महाराष्ट्र मध्यप्रदेशच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीचे विहंगम दृश्य

गोंदिया जिल्ह्यात सलग सहा दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरून वाहणारी वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे.

गोंदिया जिल्ह्यात सलग सहा दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरून वाहणारी वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे.

सततच्या पावसामुळे वैनगंगेने रौद्ररूप धारण केले असुन तिरोडा तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतजमीन वैनगंगेच्या पाण्याखाली आली आहे.

सततच्या पावसामुळे वैनगंगेने रौद्ररूप धारण केले असुन तिरोडा तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतजमीन वैनगंगेच्या पाण्याखाली आली आहे.

मध्यप्रदेश राज्यातील संजय सरोवर तसेच महाराष्ट्रातील पुजारीटोला धरणांमधून पाणी नदीपात्रात सोडल्यामुळे वैनगंगा नदीचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. ही दृश्य नीरज सोनवाणे आणि सोनु भगत तीरोडा यांनी आपल्या ड्रोन कॅमेरात कैद केले आहे.

मध्यप्रदेश राज्यातील संजय सरोवर तसेच महाराष्ट्रातील पुजारीटोला धरणांमधून पाणी नदीपात्रात सोडल्यामुळे वैनगंगा नदीचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. ही दृश्य नीरज सोनवाणे आणि सोनु भगत तीरोडा यांनी आपल्या ड्रोन कॅमेरात कैद केले आहे.

मध्यप्रदेश आणि गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळं मध्यप्रदेशातील पुजारी टोला, संजय सरोवर या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. आणि त्याचं पाणी महाराष्ट्राच्या सीमेतील भंडारा जिल्ह्यातील बावनथडी प्रकल्पाच्या माध्यमातून वैनगंगा नदीत प्रवाहित होत आहे.

मध्यप्रदेश आणि गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळं मध्यप्रदेशातील पुजारी टोला, संजय सरोवर या धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. आणि त्याचं पाणी महाराष्ट्राच्या सीमेतील भंडारा जिल्ह्यातील बावनथडी प्रकल्पाच्या माध्यमातून वैनगंगा नदीत प्रवाहित होत आहे.

परिणामी, तुमसर तालुक्यातील बपेरा येथील बावनथडी नदीवरून तीन फूट पाणी वाहत असल्यानं महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांना जोडणारा मार्ग हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे.

परिणामी, तुमसर तालुक्यातील बपेरा येथील बावनथडी नदीवरून तीन फूट पाणी वाहत असल्यानं महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांना जोडणारा मार्ग हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे.

सध्या गोसीखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. अनेक गावांचा अजूनही संपर्क तुटला असून प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थेच्या वतीनं मदत दिली जात आहे. प्रशासनानं नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सध्या गोसीखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. अनेक गावांचा अजूनही संपर्क तुटला असून प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थेच्या वतीनं मदत दिली जात आहे. प्रशासनानं नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Published at : 24 Jul 2024 06:07 PM (IST)

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..



Source link

‘विखे पाटलांना कोरोना काळ लागलाय’, आमदार नितीन देशमुखांचा टोला, ठाकरे गट आक्रमक

‘विखे पाटलांना कोरोना काळ लागलाय’, आमदार नितीन देशमुखांचा टोला, ठाकरे गट आक्रमक


Akola News: अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) ‘ऑनलाइन पालकमंत्री’ असल्याचा टोला ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी लगावलाय. आमदार अमोल मिटकरींच्या (Amol Mitkari) प्रतिक्रीयेनंतर आता ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. अकोल्यात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या प्रतिक्रियेनंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांसह  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केलंय.

राज्याचे महसूल मंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील वेळ देत नसल्याची प्रतिक्रिया मिटकरी यांनी केली होती. त्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला असून पालकमंत्री विखे पाटलांचा विरोधात त्यांनी घोषणाबाजीसह ठिया आंदोलनही केलंय.

विखे पाटील ऑनलाइन पालकमंत्री- आमदार नितीन देशमुख

अकोल्यात आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विखे पाटील ऑनलाइन उपस्थित राहणार असल्याचे कळताच आमदार नितीन देशमुख यांनी विखे पाटलांवर चांगलाच निशाणा साधलाय. यावेळी विखे पाटील हे ऑनलाईन पालकमंत्री असल्याची टीका करत ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान पालकमंत्री विखे पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली. विखे पाटलांना आता कोरोना काळ सुरू झाला असेल म्हणूनच ऑनलाईन बैठका घेत असल्याचा टोला आमदार नितीन देशमुख यांनी लगावलाय. 

अकोल्यात  आता युतीतील घटक पक्षातील आमदार अमोल मिटकरी यांच्या नाराजीनंतर काँग्रेस आणि ठाकरे गट अकोल्याचे पालकमंत्री ऑनलाईन पालकमंत्री असल्याची टीका करताना दिसतायत.

अमोल मिटकरी काय म्हणाले?

आमदार अमोल मिटकरी यांनी दिलेल्या प्रतिक्रिया नंतर ठाकरे गट अकोल्यात चांगलाच आक्रमक झालेला दिसतोय. राज्याचे महसूल मंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री असणारे राधाकृष्ण विखे पाटील अकोल्याला वेळ देत नाहीयेत अशी प्रतिक्रिया आमदार अमोल मिटकरी यांनी दिली होती. दरम्यान अकोल्यात आज होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विखे पाटील ऑनलाइनच उपस्थित राहणार असल्याचे कळताच ठाकरे गटाने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधत ठिय्या आंदोलन केलंय.

अमोल मिटकरी बोलताना म्हणाले की, “अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत. गेल्या सहा महिन्यांत अकोला जिल्ह्यातील वेगवेगळ्या घटना पाहता, राधाकृष्ण विखे पाटील स्वतः अजिबात उपस्थित राहिले नाहीत. मागची जिल्हानियोजन बैठक होती, त्यावेळीही ते व्हिसीद्वारे उपस्थित होते. गेल्या आठ दिवसांपासून अकोल्यातील शेतकऱ्यांसंदर्भातील विषय फार महत्त्वाचे असल्याचं पाहायला मिळत आहे. संबंध जिल्ह्यात भरपूर पाऊस आहे. बऱ्याच ठिकाणी पंचनामे झालेले नाहीत. तर पोलीस भरतीचाही घोळ कायम आहे. तसेच, काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे निघाले. जिल्ह्यातील प्रश्न आम्ही बोलायचे कोणासोबत? साधारण जिल्ह्याची पूरपरिस्थिती पाहता, सोयाबिन, कापसासंदर्भात मी पालकमंत्र्यांना वारंवार फोन करतोय, त्यांच्या ओएसडींना फोन केला, पण काहीच उपयोग झालेला नाही.”    

हेही वाचा:

Amol Mitkari on Vikhe Patil: विखे पाटील ‘ऑनलाईन पालकमंत्री’; त्यांच्याऐवजी भाजपच्या या आमदाराला पालकमंत्री करा; अमोल मिटकरींची मागणी

अधिक पाहा..



Source link

कामाच्या शोधात दिल्लीतील तरुणी अकोल्यात आली; मित्रासोबतचा वाद विकोपाला गेला, अन् घात झाला

कामाच्या शोधात दिल्लीतील तरुणी अकोल्यात आली; मित्रासोबतचा वाद विकोपाला गेला, अन् घात झाला


Akola Crime News: अकोला : अकोला (Akola) जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात दिल्लीतल्या एका 26 वर्षीय तरुणीची हत्या (Crime News) करण्यात आलीय. अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर शहरातील प्रतिक नगरात हा हत्येचा थरार घडलाय. सोबत राहणाऱ्या तिच्या मित्रानेच हा खून केल्याचा संशय मूर्तिजापुर पोलिसांकडून व्यक्त केलाय. तरुणीच्या डोक्यावर अधिक वार केल्याने तिचा मृत्यू झाल्याचं प्राथमिक कारण तपासात पुढे आलंय. शांतीक्रिया प्रशांत कश्यप (वय 26) असं खून करण्यात आलेल्या तरुणीचं नाव आहे. तर कुणाल उर्फ़ सनी शृंगारे असं संशयित मारेकरी तरुणाचं नाव आहे. 

हाती आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील दोघांची सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री झाली होती. यात कुणालनं काम देतो म्हणून शांतीक्रियाला दिल्लीहुन अकोल्यात बोलावून घेतलं होतं. त्यानंतर दोघे सोबत राहू लागले होते. मात्र काल रात्री दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला, अन् रागाच्या भरात कुणालने तिच्या डोक्यावर धारदार शस्त्रानं वार केल्याने दुर्दैवी मृत्यु झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. अकोल्यात या हत्येच्या घटनेने मात्र मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं काय होतंय संपूर्ण प्रकरण?

शांतीक्रिया प्रशांत कश्यप (वय 26) मूळ आसाम राज्यातील रहीवासी असून अनेक वर्षापासून ती तिच्या आईबरोबर दिल्ली शहरात राहत होती. शांतिक्रिया ही प्रसिद्द टॅटू आर्टिस्ट (Tattoo Artists) होती. दरम्यान काही महिन्यांपूर्वी तिची ओळख यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस इथल्या कुणाल उर्फ़ सनी शृंगारे या तरुणासोबत झाली. कुणालने शांतिक्रीयाला काम देतो म्हणून अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापुर शहरात बोलावलं होतं. साधारणतः 21 जुलै रोजी ‘ती’ मुर्तीजापुर शहरात दाखल झाली. कुणाल हा तिला सोबत घेत शहरातील वैशाली वाईन बारमध्ये गेला, आणि काम मागितले. मात्र बार मालकानं काम द्यायला स्पष्ट नकार दिला. त्यानंतर दोघेही तिथून परतले. विशेष म्हणजे कुणाल हा पाच ते सहा महिन्यांपूर्वी याच वाईनबार मध्ये  वेटरशिप करत असायचा. 

काम शोधात खाली हात परतल्याने पुढं दोघांनाही मूर्तिजापूर शहरात राहायचं ठरवलं. शहरातील प्रतिक नगर येथील शुभम महाजन आणि मनोज व्यास यांच्या जागेत खोली करून ते राहू लागले. दोन दिवस व्यवस्थित गेलेत, मात्र कुणालला दारूचे व्यसन असल्यामुळे दोघांमध्ये वाद झाले, काल मध्यरात्रीही दोघांमध्ये वाद झाले, याचं वादातून त्याने शांतीक्रिया हिच्या डोक्यात जड अवजारांना वार करून गंभीर स्वरूपात जखमी केलंय, त्यात तिचा मृत्यु झाल्याच समजते आहे. विशेष म्हणजे हत्येच्या घटनेपासून कुणाल हा फरार आहे. अशी माहिती मूर्तिजापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांनी ‘माझा’शी बोलतांना दिली.

हत्येनंतर मारेकरी फरार 

आज सकाळी घरमालक शुभम महाजन यांना खोलीत शांतिक्रियाचा मृतदेह दिसून आला. लागलीच या संदर्भात मूर्तिजापूर शहर पोलिसांना माहिती देण्यात आली, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्यास्थित पंचनामा करून मृतदेह वैद्यकिय तपासणीसाठी अकोला शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय. कुणालच्या शोधार्थ पोलिसांच्या स्थानिक शाखेचे पथक आणि स्थानिक पोलिसांचे विविध पथक रवाना झाले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp