विखे पाटील ‘ऑनलाईन पालकमंत्री’; त्यांच्याऐवजी भाजपच्या या आमदाराला पालकमंत्री करा : अमोल मिटकरी

विखे पाटील ‘ऑनलाईन पालकमंत्री’; त्यांच्याऐवजी भाजपच्या या आमदाराला पालकमंत्री करा : अमोल मिटकरी


Maharashtra Politics : अकोला : महायुतीतील (Mahayuti) धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे. राज्याचे महसूलमंत्री आणि अकोल्याचे (Akola) पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhepatil) वेळ देत नसल्याची आणि फोन उचलत नसल्याची तक्रार राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केली आहे. राधाकृष्ण विखे पाटलांसह त्यांच्या कोणत्याच ओएसडी आणि स्विय सहायकांनी फोन घेतले नसल्याचंही अमोल मिटकरी यांनी सांगितलं आहे. तसेच, पुढे बोलताना विखे पाटील हे ‘ऑनलाईन पालकमंत्री’ असल्याची टीकाही अमोल मिटकरी यांनी केली आहे. त्याचप्रमाणे, गेल्या सहा महिन्यांपासून पालकमंत्री अकोल्यात फिरकले नाहीत. 

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विखे पाटील ऑनलाईन राहणार उपस्थित होते. जिल्ह्यातील प्रश्न, पूर परिस्थिती यावर चर्चा करण्यासाठी मिटकरींनी विखे पाटलांना फोन केला होता. मात्र, अनेक प्रयत्न करुनही त्यांचा मंत्री विखे पाटलांशी संपर्क झाला नसल्याचं त्यांनी सांगितलं. 

विखे पाटील, गिरीष महाजन, रविंद्र चव्हाण, सुरेश खाडे या मंत्र्यांसंदर्भात असाच अनुभव आल्याची तक्रार अमोल मिटकरींनी केली आहे. विखे पाटलांची तक्रार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचंही अमोल मिटकरी यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. अकोल्यात भाजपचे आमदार रणधीर सावरकरांना पालकमंत्री करा, अशी मागणीही अमोल मिटकरी यांनी केली आहे. 

अमोल मिटकरी बोलताना म्हणाले की, “अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत. गेल्या सहा महिन्यांत अकोला जिल्ह्यातील वेगवेगळ्या घटना पाहता, राधाकृष्ण विखे पाटील स्वतः अजिबात उपस्थित राहिले नाहीत. मागची जिल्हानियोजन बैठक होती, त्यावेळीही ते व्हिसीद्वारे उपस्थित होते. गेल्या आठ दिवसांपासून अकोल्यातील शेतकऱ्यांसंदर्भातील विषय फार महत्त्वाचे असल्याचं पाहायला मिळत आहे. संबंध जिल्ह्यात भरपूर पाऊस आहे. बऱ्याच ठिकाणी पंचनामे झालेले नाहीत. तर पोलीस भरतीचाही घोळ कायम आहे. तसेच, काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे निघाले. जिल्ह्यातील प्रश्न आम्ही बोलायचे कोणासोबत? साधारण जिल्ह्याची पूरपरिस्थिती पाहता, सोयाबिन, कापसासंदर्भात मी पालकमंत्र्यांना वारंवार फोन करतोय, त्यांच्या ओएसडींना फोन केला, पण काहीच उपयोग झालेला नाही.”                                                       

दरम्यान, फेसबुकवाले, ऑनलाईन मुख्यमंत्री अशी टीका आम्ही उद्धव ठाकरेंवर करायचो. अशा परिस्थितीत आमचाच पालकमंत्री ‘ऑनलाईन’ पालकमंत्री असल्यानं आम्हाला उद्धव ठाकरेंवर टीका करण्याचा अधिकार कसा राहील. 

अधिक पाहा..



Source link

Heavy Rain : गाभ्रीचा पाऊस! अनेकांचे संसार उघड्यावर, गावांचा संपर्क तुटला; पावसाने रोखले मार्ग

Heavy Rain : गाभ्रीचा पाऊस! अनेकांचे संसार उघड्यावर, गावांचा संपर्क तुटला; पावसाने रोखले मार्ग


Vidarbha Rain Update : गडचिरोली (Gadchiroli News) जिल्ह्यात पावसाचा जोर काही भागात कमी झाला असला तरी पार्लकोटा नदीला कालपासून पूर आला आहे. त्यामुळे जिल्हा मुख्यालयाशी भामरागड तालुक्यातील 100हुन अधिक गावांचा कालपासून थेट संपर्क तुटला आहे. तर भामरागड अक्षरक्ष: जलमय झालं आहे. सद्याची स्थिती बघितलं तर भामरागड शहरातील मुख्य बाजारपेठापर्यत पुराचं पाणी शिरलं आहे. त्यामुळे 50हुन अधिक दुकाने, घरे पाण्याखाली आले आहेत. जिल्ह्यातील पाऊसाची एकंदरीत स्थिती बघितलं तर काही भागात पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याचे चित्र आहे. तर काही भागात रिमझिम पाऊस पडतो आहे.

मात्र जिल्ह्यातील बंद झालेले रस्त्यांची स्थिती बांघितल तर 4 मुख्य महामार्ग बंद झाले आहेत, तर 26 छोटे मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. छत्तीसगढ राज्यात पडत असलेलं जोरदार पाऊस (Heavy Rain) आणि गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्या प्रशासन आणि पोलीस प्रशासन सज्ज असून जिल्ह्यात सगळीकडे आपत्ती व्यवस्थापनाची टीम नजर ठेवून आहे. 

वर्धा नदीला पूर, अनेक मार्ग बंद

यवतमाळ जिह्यात गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहे. तर मारेगाव तालुक्याच्या कोसारा गावाजवळ वाहनाऱ्या वर्धा नदीला पूर आला असून पुलावरून दोन ते तीन फूट पाणी वाहत आहे. त्यामुळे  कोसरा ते सोईट वाहतूक बंद करण्यात आली. तर वणी तालुक्यात आलेल्या पुरामुळे शेलू खुर्द मार्ग आणि शिवणी ते चिंचोली मार्ग बंद झाला आहे. आज सकाळी 10 वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी 42. 90 मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे 24 महसूल मंडळात अतिवृष्टी झालीय. त्यात 16 घरांची ही पडझड झाली.

गोंदियाच्या सडक अर्जुनी येथे अनेक घरांची पडझड

गेल्या दोन दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला असून याचा फटका गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी, मोरगाव अर्जुनी आणि देवरी या तीन तालुक्यांना बसला आहे. यात अनेक घरांची पडझड झाल्याचे देखील समोर आले आहे. नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक घरांमध्ये पाणी देखील शिरलं होत. गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील बाम्हणी या गावांमध्ये जवळपास 10 ते 15 घरांमध्ये पुराचे पाणी शिरलं होतं. त्यापैकी 3 घरांची पडझड झाली असून जीवनावश्यक साहित्याचे देखील मोठे नुकसान झाले आहे. तर घरांची पडझड झाल्याने नागरिकांनी शेजाऱ्यांच्या घरात आसरा घेतलाय. तर शासनाच्यावतीने तात्काळ मदत करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

पावसामुळे 1 हजार 210 हेक्टर पिकांचे नुकसान

यवतमाळ जिल्ह्यात मागील चार दिवसापासून सुरू असलेल्या सतत धार पावसामुळे जिल्ह्यातील साडेचारशे हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर जून महिन्यापासून आतापर्यंत  एक हजार 210 हेक्टर वरील पिकांची नुकसान झाले आहे. अति पाण्यामुळे सोयाबीन आणि कपाशी पिवळी पडण्याच्या मार्गावर आहे. काही शेतकर्‍यांचे पिके अतिपाण्यामुळे चिपडून गेली आहे. शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा काढला. मात्र, विमा कंपनीने दिलेला नंबरवर कॉल लागत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. तर काही शेतकर्‍यांनी नुकसानीची माहिती दिल्यावरही विमा कंपनीचे कर्मचारी पाहणीसाठी आले नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे महसूल विभागाकडून पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांचा वाद विकोपाला; ग्रामीण जिल्हाप्रमुखावर प्राणघातक हल्ला

शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांचा वाद विकोपाला; ग्रामीण जिल्हाप्रमुखावर प्राणघातक हल्ला


Amravati News अमरावती : अमरावती शहराच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अमरावतीच्या शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Faction) जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. शनिवारच्या मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मध्यरा‍त्रीच्या दोन वाजताच्या सुमारास दर्यापूर ते अमरावती मार्गावरील प्रसाद मंगल कार्यालयाजवळ 20 ते 25 अज्ञात व्यक्तीकडून हा हल्ला (Crime News) करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे गटाचे (CM Eknath Shinde) अमरावती शहर जिल्हाप्रमुख अरुण पडोळे आणि त्यांच्या मुलगा राम पडोळे यांच्यासह 20 ते 25 कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचे बोलल्या जात आहे. यात गोपाल अरबट जखमी झाले आहे. या हल्ल्यामुळे अमरावती जिल्ह्यात शिंदे गटात राजकीय भूकंप झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. शिवसेना शिंदे गटाचे दोन्ही जिल्हाप्रमुखांचा हा वाद विकोपाला गेल्याने सर्वत्र मोठी खळबळ उडाली आहे.

शहर जिल्हाप्रमुखांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

हाती आलेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाचे अमरावती शहर जिल्हाप्रमुख अरुण पडोळे आणि त्यांच्या मुलगा राम पडोळे यांच्यासह 20 ते 25 कार्यकर्त्यांनी ग्रामीण जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांच्यावर हल्ला केल्याची माहिती पुढे आली आहे. पक्षातील मतभेदामुळे हा हल्ला झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. या प्रकरणी पोलिसांची उशिरा मदत मिळाल्याने हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाल्याचा गंभीर आरोप जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांनी केला आहे. तर उशिरापर्यंत गुन्हा दाखल न करण्यात आल्याने जिल्हाप्रमुख आणि ठाणेदार यांच्यामध्ये काहीकाळ तू-तू मैं-मैं झाल्याचे देखील बघायला मिळाले आहे.

तर या प्रकरणी दर्यापूर पोलीसांनी अमरावती शहर जिल्हाप्रमुख अरुण पडोळे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस या घटनेचा अधिक तपास सध्या करत आहे. मात्र या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील दोन जिल्हाप्रमुखांमधील वाद विकोपाला गेल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली असून जिल्ह्याच्या राजकारणाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे. 

 

सविस्तर माहिती लवकरच 

हे हे वाचा 

अधिक पाहा..



Source link

विदर्भात पावसाचं थैमान, गडचिरोलीत तब्बल 183 मिमी पाऊस, नागपूरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर

विदर्भात पावसाचं थैमान, गडचिरोलीत तब्बल 183 मिमी पाऊस, नागपूरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर


नागपूर : विदर्भात (Vidarbha) आज सकाळपासून मुसळधार पाऊस (Rain) सुरु आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. विदर्भात आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूरला (Chandrapur) आज रेड अलर्ट (Red Alert) देण्यात आलेला आहे. तर नागपूर (Nagpur), गडचिरोली (Gadchiroli), वर्धा (Wardha), अमरावती (Amaravati) या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. 

नागपूरमध्ये गेल्या दोन तासांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. नागपूरमधील अनेक सखल भागात पाणी शिरले आहे. तसेच ज्या परिसरात नवीन काँक्रिटीकरणाचे काम झाले आहे त्या परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. तसेच नाग नदीच्या संरक्षक भिंतीला अनेक ठिकाणी खचली होती. या भिंतीच्या डागडुजीचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरु होते. मात्र आता या ठिकाणाहून पाणी यायला लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे.  

नागपूरमधील शाळा-कॉलेजला सुट्टी जाहीर 

नागपूरच्या जोरदार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमधील शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी विपीन ईटनकर यांनी घेतला आहे. तर वाढत्या पावसामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. 

गडचिरोलीत पावसाचा कहर

गडचिरोली जिल्ह्यात हवामान खात्याने 48 तास अतिवृष्टीचा इशारा दिला होता. आज जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस सगळीकडे पडत आहे. सध्या मुख्य मार्ग सुरळीत सुरू आहे. काल जिल्ह्यात एकूण सरासरी 52.0 मिमी पावसाची झाले आहे. काल जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस 40 पैकी 13 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा मंडळामध्ये सर्वाधिक 270.8 मिमी पावसाची नोंद झाली. त्यापैकी सिरोंचा मुख्यालयी 184 मिमी पाऊस कोसळला आहे. 

भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस 

भंडारा जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाटासह जिल्ह्यात कुठं हलक्या, कुठं मध्यम तर कुठं जोरदार सरी बसल्यात. पहाटेच्या सुमारास या पावसानं चांगलाच जोर पकडला. या पावसानं जिल्ह्यातील नदी – नाले प्रवाहित झाले आहेत. तर, काही सखल भागात पावसाचं पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Mumbai Rain Updates: मुंबईत मुसळधार पाऊस, येत्या काही तासांत जोर वाढणार, मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वेमार्गावरील लोकल ट्रेन उशीरा

आज महाराष्ट्रात पडणार मुसळधार पाऊस, 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट तर 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज 

अधिक पाहा..



Source link

प्रकाशझोतात राहण्यासाठी काहींची कायम कोल्हेकुई; अमोल मिटकरींचा खासदार अमोल कोल्हेंना टोला 

प्रकाशझोतात राहण्यासाठी काहींची कायम कोल्हेकुई; अमोल मिटकरींचा खासदार अमोल कोल्हेंना टोला 


Akola News अकोला :  खासदार  अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेचा राष्ट्रवादीचे आमदार  अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) चांगलाच समाचार घेतलाय. प्रकाशझोतात राहण्यासाठी काहींची कायम ‘कोल्हेकुई’ सुरू रहात असल्याचा टोला अमोल मिटकरींनी कोल्हेंना लगावलाय. अजितदादांनी (Ajit Pawar) सर्वसमावेशक अर्थसंकल्प मांडल्यानेच काहींच्या पोटात दुखत असल्याचं ते म्हणालेय. दरम्यान, अमोल कोल्हेंनी आपली खासदारकी सांभाळावी, त्यांनी महाराष्ट्र सरकार अन् अजित पवार काय करतायेत याची काळजी करू नये, असा टोलाही मिटकरींनी खासदार अमोल कोल्हेंना लगावलाय. 

कलाकार हा रंगमंचावरच शोभून दिसतो- अमोल मिटकरी

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जो सर्व सर्वसमावेशक अर्थसंकल्प मांडला ते पाहून काही चेले चपाटे कोल्हेकुई करू लागले आहेत. मात्र आम्हाला सल्ला देण्यापेक्षा त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की,  आपण स्वत: इथवर कोणाच्या जीवावर पोहचलो आहे. कोणी आपल्याला पक्षात आणून मान सन्मान दिला, यांचे आत्मचिंतन त्यांनी केलं पाहजेल. उगाच केव्हाही उठून वाट्टेल ते बोलायचं आणि प्रकाशझोतात राहायचं असा प्रयत्न काही लोक करत आहेत. कलाकार हा रंगमंचावरच शोभून दिसतो. ग्राउंडवर उतरून अजितदादा काम करणारे आहेत. दुसरीकडे तुमच्यात शिवरायांबद्दल इतकीच आत्मीयता होती तर विशाळगड सारखे हिंसाचाराचे प्रकरण विशाळगडाच्या पायथ्याशी गजापूर गावात जी घटना घडली, त्या ठिकाणी जाण्याचं औदार्य आपण का दाखवलं नाही? असा सवाल आमदार अमोल मिटकरींनी खासदार अमोल कोल्हेंना केला आहे.

जनतेते उतरून काम करायचे असतात, ते अजितदादा कायम करत असतात. त्यामुळे कोल्हेकुई करणाऱ्या कुणीही नेत्याने महायुती बद्दल बोलावं आणि तोंडसुख घेऊ नये, असेही अमोल मिटकरी यावेळी म्हणाले. आधीच आपली चादर फाटली आहे. ती अधिक फाटू नये याची काळजी घेण्याचा सल्ला ही त्यांनी खासदार अमोल कोल्हेंना दिला आहे. ते अकोला येथे बोलत होते.

अकोट विधानसभा लढवणार का?

अकोला जिल्ह्यातील पाचपैकी तीन मतदारसंघांवर राष्ट्रवादीने दावा केला आहे. त्यात अकोला पश्चिम, बाळापूर आणि अकोटचा समावेश आहे. पक्षाने संधी दिल्यास अकोटमधून विधानसभा लढण्याची तयारी आहे. मी लोकांमध्ये काम करणारा कार्यकर्ता असल्याचे अमोल मिटकरी म्हणाले. 

 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

अखेर विमा कंपनीवर फसवणुकीचे गुन्हे दाखल; नगरपालिकेत तहसीलदारांना कोंडल्यानंतर कारवाईचा बडगा

अखेर विमा कंपनीवर फसवणुकीचे गुन्हे दाखल; नगरपालिकेत तहसीलदारांना कोंडल्यानंतर कारवाईचा बडगा


अकोलाअकोला जिल्ह्यातील (Akola News) बाळापूरमध्ये अखेर विमा कंपनीवर फसवणुकीचे गुन्हे दाखल (Akola Crime) करण्यात आले आहेत. ‘एचडीएफसी अर्गो’ या विमा कंपनीचे राज्य प्रतिनिधी प्रकाश श्रीवास्तव आणि विभागीय प्रतिनिधी सुनिल भालेराव या दोघांवर काल रात्री हे गुन्हे दाखल झाले आहेत. ‘एचडीएफसी अर्गो’ कंपनीने वर्ष 2023-24 मधील खरीप आणि रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी कागदपत्रे कृषी विभागाला अनेकदा मागणी करूनही सादर केली नाहीत.  पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची दावा यादी, सर्वेक्षण झालेली यादी, पात्र आणि अपात्र यांची कारणांसह यादी, खरीप आणि रब्बी पंचनामे प्रतीसह इतर दस्ताऐवज कंपनीने कृषी विभागाला सादर केले नाहीत.

यामूळे बाळापूर तालुक्यातील 7 हजार 556 शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा योग्य परतावा मिळाला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालं. परिणामी, कंपन्यांनी परतावा न देतांना राज्यात हजारो कोटी रूपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आमदार नितीन देशमुखांनी  (Nitin Deshmukh) केला होता. 

‘एचडीएफसी अर्गो’ कंपनीवर फसवणुकीचे गुन्हे दाखल

तर दुसरीकडे काल गुरुवारी  बाळापूरचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी पिकविम्याच्या विषयावर बाळापूरचे तहसीलदार आणि तालूका कृषी अधिकाऱ्यांना बाळापूर नगरपालिकेच्या मुख्य सभागृहात कोंडलं होतं. विमा कंपन्यांच्या तक्रारीविरोधात नगरपालिकेत आमदार देशमुखांनी बैठक बोलावली होती. या बैठकीला विमा कंपन्यांचे अधिकारी गैरहजर असल्याने आमदार देशमुख चांगलेच संतप्त झाले होते. त्यांनी तब्बल दहा तास या अधिकाऱ्यांना डांबल्यानंतर कृषी विभागाने कंपनीविरोधात पोलीस तक्रार केलीय.

दरम्यान, गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यात आलेल्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही आमदार देशमुखांनी टीका केलीय. तर आता याच प्रकरणी जिल्हा कृषी अधिक्षक शंकर किरवे यांच्या तक्रारीवरून कंपनीवर बाळापूर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय.

नेमकं प्रकरण काय?

शेतकऱ्यांच्या पीकविमाबाबत अनेक तक्रारी आहेत. कुणाला पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत, कुणाला विमा उतरवताना अडचणी येत आहेत तर काही तांत्रिक कारणं आहेत. या सर्वांवर तोडगा काढण्यासाठी आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं. नगरपालिकेत ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीसाठी नगरपालिकेत सर्व अधिकारी आणि विमा कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं होतं. मात्र विमा कंपन्यांचे आणि कृषी विभागाचे अधिकारी या बैठकीसाठी आलेच नाहीत. त्यामुळे नितीन देशमुख प्रचंड संतापले. त्यांनी थेट तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना कोंडून ठेवलं.

जोपर्यंत विमा कंपनीचे पदाधिकारी याठिकाणी येत नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढच नाहीत तोवर तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही,सर्व दरवाजे लावून घ्या असंही आमदार नितीन देशमुख यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आणि तक्रारी आहेत. अनेक शेतकऱ्यांना विम्याचे पैसै मिळात नाहीत. तर अनेकांना पीक विमा भरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर नितीन देशमुखांनी (Nitin Deshmukh) बैठक आयोजित केली होती. या बैठकीला नगरपालिकेत सर्व अधिकारी आणि विमा कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत सांगण्यात आलेलं होतं. मात्र त्यांनी या बैठकीला उपस्थित न राहिल्याने देशमुखांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी थेट तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना कोंडून ठेवल्याचं समोर आलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp