जन्मदात्या पित्याला जिवंत पेटवलं; निर्दयी कृत्यानंतर मद्यधुंद नराधम मुलगा फरार, नेमकं घडलं काय?

जन्मदात्या पित्याला जिवंत पेटवलं; निर्दयी कृत्यानंतर मद्यधुंद नराधम मुलगा फरार, नेमकं घडलं काय?


Akola Crime News: अकोला : तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून लहानाचं मोठं केलेल्या बापालाच मुलानं जीवंत जाळण्याचं कृत्य केलं आहे. एवढंच नाहीतर नराधम मुलानं अंथरुणाला खिळलेल्या बापाला पेटवून दिलं आणि तिथून थेट पळ काढला. याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी मुलालाही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, संपूर्ण अकोला (Akola News) जिल्हा या घटनेनं हादरला आहे. 

अकोला (Akola Crime) जिल्ह्यातील बाळापूरमध्ये वडील आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. आपल्या आजारी वडिलांना दारूत व्यसनाधिन झालेल्या मुलानं जीवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अजाबराव इंगळे असं मृत वडिलांचं नाव आहे. तर आकाश इंगळे असं तीस वर्षीय आरोपी मुलाचं नाव आहे. याप्रकरणी मुलानं वडिलांनी जीवंत पेटवलं आणि तिथून पळ काढला. पोलिसांनी मुलाचा माग घेत अखेर त्याला बेड्या ठोकल्या आहेत.

…अन् वडिलांची खाटंच त्यानं पेटवली  

बाळापूर तालुक्यातील धनेगाव येथील इंगळे कुटुंब मजुरीसाठी शहरातील लोटणापूर इथे वास्तव्यास होतं. तीन तरूण मुलं आणि आजारी वडील अजाबराव इंगळे असं संपूर्ण कुटुंब लोटणापूर इथे वास्तव्यास होतं. अजाबराव इंगळे गेल्या अनेक दिवसांपासून अंथरुणाला खिळून आहेत. 14 जुलैला दुपारी अजाबराव यांचा मुलगा आकाश इंगळे मद्यधुंद अवस्थेत घरी पोहोचला. यावेळी आकाश दारूच्या नशेत होता. त्यावेळी आकाशचा अर्धांगवायूनं अंथरुणाला खिळलेल्या वडिलांसोबत वाद झाला. यावेळी आकाशनं रागाच्या भरात वडील ज्या खाटेवर झोपलेले त्या खाटेलाच आग लावली आणि तिथून पळ काढला. बघता बघता आगीनं पेट घेतला. आगीत अजाबराव इंगळे गंभीररित्या होरपळले गेले. ही घटना घडली, त्यावेळी घरात कोणीच नव्हतं. 

घडलेला प्रकार समजताच इतर कुटुंबीयांनी घराकडे धाव घेतली. आगीत होरपळून निघालेल्या अजाबरावांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची प्रकृती फारच गंभीर होती. अखेर बुधवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

दरम्यान, आधी अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, प्रकरण बाळापूर पोलिसांकडे वर्ग झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. आरोपीचा लहान भाऊ गौरव याच्या तक्रारीवरून आरोपी आकाशवर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर बाळापूर पोलिसांनी आकाशचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

इंटरनेटवर जोडप्याचा प्रायव्हेट VIDEO अपलोड केला; ब्लॅकमेलिंगचा कट रचला, मित्रानेच घात केला!

अधिक पाहा..



Source link

मोठी बातमी : ठाकरेंच्या आमदाराने तहसीलदारांना नगरपालिकेत कोंडलं, नेमकं काय आहे प्रकरण?

मोठी बातमी : ठाकरेंच्या आमदाराने तहसीलदारांना नगरपालिकेत कोंडलं, नेमकं काय आहे प्रकरण?


अकोला : बाळापूरचे शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी बाळापूरचे तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना नगरपालिकेत कोंडलं. आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी विमा कंपन्यांच्या तक्रारीविरोधात नगरपालिकेत सर्व अधिकारी आणि विमा कंपन्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला विमा कंपन्यांचे आणि कृषी विभागाचे अधिकारी गैरहजर राहिले. त्यामुळे संतापलेल्या आमदार नितीन देशमुखांनी  तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना कोंडून ठेवलं. अनुपस्थित अधिकारी आल्याशिवाय कुणालाच आतून सोडणार नाही असा पवित्रा आमदार नितीन देशमुख यांनी घेतला. 

नेमकं प्रकरण काय?

शेतकऱ्यांच्या पीकविमाबाबत अनेक तक्रारी आहेत. कुणाला पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत, कुणाला विमा उतरवताना अडचणी येत आहेत तर काही तांत्रिक कारणं आहेत. या सर्वांवर तोडगा काढण्यासाठी आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी बैठकीचं आयोजन केलं होतं. नगरपालिकेत ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीसाठी नगरपालिकेत सर्व अधिकारी आणि विमा कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं होतं. मात्र विमा कंपन्यांचे आणि कृषी विभागाचे अधिकारी या बैठकीसाठी आलेच नाहीत. त्यामुळे नितीन देशमुख प्रचंड संतापले. त्यांनी थेट तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना कोंडून ठेवलं.

जोपर्यंत विमा कंपनीचे पदाधिकारी याठिकाणी येत नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढच नाहीत तोवर तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना आम्ही सोडणार नाही,सर्व दरवाजे लावून घ्या असंही आमदार नितीन देशमुख यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आणि तक्रारी आहेत. अनेक शेतकऱ्यांना विम्याचे पैसै मिळात नाहीत. तर अनेकांना पीक विमा भरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर नितीन देशमुखांनी (Nitin Deshmukh) बैठक आयोजित केली होती. या बैठकीला नगरपालिकेत सर्व अधिकारी आणि विमा कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत सांगण्यात आलेलं होतं. मात्र त्यांनी या बैठकीला उपस्थित न राहिल्याने देशमुखांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी थेट तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना कोंडून ठेवल्याचं समोर आलं आहे. 

बैठकीला बोलवून देखील उपस्थित न राहिलेले अधिकारी आणि विमा कंपन्यांच्या पदाधिकारी जोपर्यंत हजर होत नाहीत, तोपर्यंत तहसीलदार आणि कृषी अधिकाऱ्यांना कोंडून ठेवणार असल्याचं सांगत आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी शेतकऱ्यांना दार लावालाच्या सूचना केल्या. अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरती देखील त्यांनी संताप व्यक्त केला आहे. याचा व्हिडिओ देखील आता समोर आला आहे. 

 

 

 

 

अधिक पाहा..



Source link

Heavy Rain Update: राज्यात मुसळधार पावसाचा हाहाकार! आमदार अमोल मिटकरींच्या गावचाही संपर्क तुटला

Heavy Rain Update: राज्यात मुसळधार पावसाचा हाहाकार! आमदार अमोल मिटकरींच्या गावचाही संपर्क तुटला


Maharashtra Rain Update : राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र दिसून येत आहे. तर आजपासून पुढचे तीन दिवस विदर्भातील (Vidarbha Weather Update) सर्वच्या सर्व जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून (IMD) वर्तविण्यात आला आहे. अशातच गेल्या कित्येक दिवसांपासून दांडी मारून बसलेल्या वरुणराजाने अखेर विदर्भातील (Vidarbha Weather Update) बहुतांश जिल्ह्यांना अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. तर मागील दोन दिवसांपासून विदर्भातील (Vidarbha) बहुतांश जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे (Heavy Rain) सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाल्याचे बघायला मिळाले. या पावसाचा सर्वाधिक फटका शेतीला देखील बसला आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांवर दुबार ते तिसऱ्यांदा पेरण्या करण्याचे संकट ओढवले आहे.

आमदार अमोल मिटकरींच्या गावचा संपर्क तुटला

अकोला जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. परिणामी या पावसाचा फटका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गावाला देखील बसला असून गावचा संपर्क तुटला आहे. काल रात्री आणि आज पहाटेच्या कुटासा परिसरात धुवाधार पाऊस झाला. त्यामुळ अकोला आणि कुटासा गावाला जोडणारा रस्ता बंद झाला आहे. या रस्त्यावरील लवकी नाल्याला पुर आल्याने कुटासा गावचा संपर्क तुटला आहे. कुटासा हे गाव आमदार अमोल मिटकरींचं गाव आहे. या नाल्याला आलेल्या पूरामूळ शेतकऱ्यांच्या शेत जमिनी पाण्याखाली गेल्या आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान ही यात झालंय.आज सकाळी वाहतूक सुमारे काही तासांसाठी प्रभावित झाली होती. मात्र आता काहिस नाल्याचं पाणी कमी झालेय. पुढील दीड तासात रस्ता खुला होण्याची शक्यता आहे.

शेतातील पिके खरडुन गेल्याने शेतकरी संकटत

विशेष म्हणजे कुटासा परिसरात 15 दिवसांपूर्वी पेरणी झाली होती. मात्र काल संध्याकाळी झालेल्या धुवाधार पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पावसाचे पाणी साचले आहे. शेत जमीन पाण्याखाली गेल्याने शेतातील पिके खरडुन गेल्याने शेतकरी संकटत सापडले आहेत. दरम्यान कुटासा रस्त्यावरील लवकी नाल्यावरील पुलावर उंची कमी असल्याने हा पुल पाण्याखाली जाऊन या रस्त्यावरील वाहतूक दरवर्षी प्रभावीत होते. त्यामुळ या पुलाची उंची वाढवण्यात यावी, लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घ्यावा. अशी मागणी येथील ग्रामस्थांकडुन केली जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

Akola : भाजपचे खासदार अनुप धोत्रे यांच्या निवडणुकीला हायकोर्टात आव्हान; नेमकं कारण काय?

Akola : भाजपचे खासदार अनुप धोत्रे यांच्या निवडणुकीला हायकोर्टात आव्हान; नेमकं कारण काय?


Akola Lok Sabha Election 2024 :  अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजपचे नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे (Anup Dhotre) यांच्या निवडीला आव्हान देण्यात आलंय. यासंदर्भातील याचिका उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलीये. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील उमरदरी येथील मतदार गोपाल चव्हाण यांनी ही याचिका दाखल केलीये. अनुप धोत्रे यांनी निवडणुकीत जिंकण्यासाठी भ्रष्ट मार्गांचा उपयोग केल्याचा आरोप त्यांनी याचिकेत केलाये. धोत्रे यांनी निवडणूक आयोगाने (Election Commission) ठरवून दिलेली एकूण खर्चाची 95 लाखांची मर्यादा ओलांडल्याचा आरोपही त्यांनी या याचिकेत केला आहे. त्यामुळे त्यांची निवड रद्द करण्यात यावी, असे याचिकाकर्ते गोपाल चव्हाण यांचे म्हणणे आहे.  

याचिकाकर्त्याचे नेमकं म्हणणं काय?  

खासदार अनुप धोत्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर केलेल्या खर्चाच्या माहितीमध्ये स्वत: 81 लाख 17 हजार 102 रुपये खर्च केल्याचे नमूद केले आहे. यासोबतच भाजपने त्यांच्यासाठी 6 लाख 55 हजार 830 रुपये खर्च केल्याची माहिती त्यांनी सादर केली आहे. हा एकूण खर्च त्यांनी 87 ला 72 हजार 932 एवढा दाखवला आहे. मात्र भाजपने धोत्रे यांच्या प्रचारासाठी प्रत्यक्षात 1 कोटी 24 लाख 60 हजार 590 रुपयांच्या जाहिराती प्रसिद्ध केल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. धोत्रे यांनी ही माहिती निवडणूक विभागाला खर्चाच्या हिशोबात देणे आवश्यक होती. परंतु त्यांनी तसे न करता ही माहिती लपवून  निवडणुक आयोगाची दिशाभूल केली असून  त्यांची निवड रद्द करण्यात यावी, असे याचिकाकर्ते गोपाल चव्हाण यांचे याचिकेमधून म्हणणे आहे.

पहिल्याच निवडणुकीत अनुप धोत्रे ठरलेत जायंट किलर 

अकोल्यातून भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या डॉ. अभय पाटील यांचा पराभव केलाय. शिवाय वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर देखील पराभूत झाले आहेत. चाळीशीतील  अनुप धोत्रे ठरलेत जायंट किलर ठरले आहेत. त्यांनी पहिल्याच निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांसह काँग्रेस उमेदवाराचा दारूण पराभव केला. अनुप धोत्रे यांचे वडील संजय धोत्रे याआधी सलग चार वेळेस खासदार झाले होते. संजय धोत्रे आजारी असल्याने अनुप धोत्रेंना भाजपनं मैदानात उतरवलं होतं. त्यात त्यांनी एकहाती यश खेचून आणले आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..



Source link

चोरट्यांचा धुमाकूळ! कुठं एटीएम मशीनच लंपास; तर कुठं चोरीच्या प्रयत्नात लाखोंची रक्कम भस्मसात

चोरट्यांचा धुमाकूळ! कुठं एटीएम मशीनच लंपास; तर कुठं चोरीच्या प्रयत्नात लाखोंची रक्कम भस्मसात


Maharashtra Crime News : झटपट पैसे कमवण्याच्या नादात चोर आणि सराईत गुन्हेगार (Crime News) वाट्टेल त्या थराला जात असतात. त्यात अगदी जीवघेणे कृत्य करण्यासही ते तत्पर असतात.काही प्रमाणात त्यांच्या या कारवाई त्यांना अतिअल्प यशही येतं, मात्र पोलिसांच्या नजरेतून या गुन्हेगारांची क्वचितच सुटका होत असते. अशाच काही चोरीच्या घटनांनी आज राज्यात धुमाकूळ घातल्याचे समोर आले आहे. यात कुठं चक्क एटीएम (ATM) मशीनच लंपास केल्याची घटना घडली आहे, तर कुठं चोरीच्या प्रयत्नात लाखोंची रक्कम डोळ्यादेखत भस्मसात झाल्याची घटना घडली आहे. 

 थेट एटीएम मशिनच केलं लंपास        

बँकेत दरोडा, एटीएम मधून पैसे गायब झाल्याच्या घटना आपण नेहमीच ऐकतो. मात्र चोरट्यांनी आता थेट एटीएम मशिनच लंपास केल्याची घटना नाशिकच्या सटाणा तालुक्यातील लाखमापुर येथे घडली. हे चोरलेले एटीएम मशीन गाडीत ठेवून पळून जात असताना चोरट्यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जागरूक ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे. हे चोरटे सद्यस्थितीत छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या ताब्यात असून लवकरच त्यांना सटाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गॅस कटरने एटीएम फोडताना आग, लाखोंची रक्कम डोळ्यादेखत भस्मसात

तर दुसरीकडे चोरट्यांकडून एसबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरने फोडण्याच्या प्रयत्नात 13 लाख 61 हजारांची रोकड जळून खाक झालीय. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील माळीवाडा भागामध्ये सोमवारी पहाटे 4 वाजता नाशिक रोडवरील माळीवाडा भागात ही घटना घडलीय. यात अज्ञात चोरट्यानी गॅस कटर ने बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला, यावेळी गॅस कटर मुळे एटीएम मधील रोख रकमेने पेट घेतला, या आगीत ATM मधील सर्व रक्कम जळून खाक झाली.

दरम्यान, ही घटना घडत असताना आजूबाजूच्या नागरिकांना कुणकुण लागल्याने चोरट्यांनी येथून पळ काढला. यावेळी चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे देखील फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैद झालीय. याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेले शोरूम चोरट्यांनी फोडलं

अशीच एक चोरीची घटना अकोल्यात घडली आहे. यात कपड्यांच्या शोरूममधून हजारोंच्या मालावर चोरटयांनी हात साफ केलाय. अकोल्यातल्या सिव्हिल लाईन चौकातील नामाकिंत तायेबा  शोरूम मधील हा सर्व प्रकार असून चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. अकोल्यातल्या सिव्हिल लाईन चौकात असलेलं तायेबा शोरूम चोरट्यांनी फोडले आहे. आज पहाटे 5 वाजताच्या सुमारास हा चोरीचा प्रकार घडलाय. चोरीचा संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय. पाच ते सहा चोरट्यांनी कपड्यांच्या शोरूमचं शटर वाकवून आत प्रवेश केलाय. शोरूममधील कपडे शर्ट, टिशर्ट आणि पॅंटसह गल्ल्यातील 40 ते 50 हजार रुपये हे चोरटे चोरी करत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन पासून शोरूम अगदी 500 मीटरवर अंतरावर आहेय. त्यामुळे कुठेतरी अकोला पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उभा होतोय.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..



Source link

तू गजाननभक्त म्हणून शेवटचं सांगतोय…, भाजप आमदाराची फोनवरून धमकी; ऑडिओ व्हायरल

तू गजाननभक्त म्हणून शेवटचं सांगतोय…, भाजप आमदाराची फोनवरून धमकी; ऑडिओ व्हायरल


अकोला : जिल्ह्यातील मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीष पिंपळे यांनी धमकी दिल्याचा आरोप एका व्यक्तीने केला आहे. आमदार पिंपळे आणि या व्यक्तीमधील मोबाईल संवादाची ऑडियो क्लिप सध्या व्हायरल होत आहे. मुर्तिजापूर शहरातील एका वॉट्सअॅप गृपवरील चॅटिंगवरून हा वाद झाल्याचं बोललं जातंय. अर्जुन लोणारे असं या व्यक्तीचं नाव असून तो वारकरी असल्याचं बोललं जातंय. 

अर्जुन लोणारे यांनी मोदींच्या कार्यकर्त्यांबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरल्यानेच त्याला फोनवर जाब विचारल्याचं आमदार पिंपळेंनी ‘एबीपी माझा’शी बोलतांना सांगितलं. तर शहरातील रस्त्याच्या बांधकामात भ्रष्टाचारावरून जाब विचारल्यानेच आमदार पिंपळेंनी मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या व्यक्तीनं केला आहे. पोलिसांच्या माध्यमातून आपल्यावर माफी मागण्यासाठी दबाव टाकल्या गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मात्र काहीही झाले तरी आपण माफी मागणार नसल्याचं अर्जुन लोणारे यांनी स्पष्ट केलंय. 

आमदार हरीष पिंपळे आणि अर्जुन लोणारे यांच्यातील संवाद… 

लोणारे : हा बोला! 
आमदार पिंपळे : तू वारकरी भक्त आहेस. तू ‘मल’ म्हणजे ‘X’ खाऊ लागले म्हणतो मोदींचा. मग तू का राहुल गांधीचा खाऊ लागला का मग?. 
लोणारे : मी कुणाचं नाव नाही घेतलं भाऊ. 
आमदार पिंपळे : पण आता तू… हे पहा तुले आता आखरी इंटीमेशन देऊ लागले. तू चांगला वारकरी आहे. गजानन महाराजांचा भक्त आहे म्हणून मी तुले काही करू नाही लागलो. तू आम्हाले ‘मल’ म्हणजे आम्हाले X खाणारा समजू लागला का?. 
लोणारे : पण मी कुणाचं नाव नाही घेतलं ना भाऊ. 
आमदार पिंपळे : नाव नाही घेतलं म्हणजे कुणाचं नाव घेऊ लागला रे तू. मोदीभक्त म्हणजे कोण आहे रे? मोदीभक्त म्हणजे कोण आहे? 
लोणारे : जो असेल त्याले लागल. 
आमदार पिंपळे : म्हणजे मग मोदी भक्त आहे. मग तू राहूल गांधीचा भक्त आहे का? तू तर लेका वारकरी आहेस ना. मग ते ‘मल’ शब्द का लिहिला. तू अंधभक्त लिही ना. तू मल कायले लिहिलं. ‘मल’ म्हणजे X खाणारे दिसू लागलो की तुले आम्ही. 
लोणारे : तुमचं नाव घेतलेलं नाही आहे. 
आमदार पिंपळे : बरं तू थांब आता. तुले आखरीचं सांगू लागलो मी. तू असं वाईट लिहू नको. तू गजानन भक्त आहे म्हणून मी तुले वारंवार सांगू लागलो. 
लोणारे : मी वाईट नाही लिहू लागलो. 
आमदार पिंपळे : ‘मल’ म्हणजे X. मग तू राहूल गांधींचा खा़ऊ लागला का?
लोणारे : मी कोणाचाच नाही खाऊ लागलो. तुमचं नाव लिहिलं का? 
आमदार पिंपळे : बरं ठिक हाय ना. तुले आखरी इंटीमेशन अहे. तु आता हे फक्त लिही. ते ‘मल’ फक्त तू काढू नको आता. मग तू पाय फक्त आता.
लोणारे : मी तुमचा शब्द काढून टाकू लागलो. तुम्ही काही बोलू लागलो का मी. 
आमदार पिंपळे : ‘मल’ शब्द ठेवला ना तू. तू “मल’ शब्द काढू नको आता, मग पाय तू. 
लोणारे : अरे बाबा मी तुम्हाला काही बोललोच नाही. तुमचं नाव तरी आहे का त्याच्यात. 
आमदार पिंपळे : तू ‘मल’ शब्द लिहिला ना. मोदीभक्त आहो आम्ही. मी मोदीभक्त आहो. मग मी की X खाऊ लागलो का?
लोणारे : तुम्ही कशाला लावून घेता मनाला. 
आमदार पिंपळे : मी सांगू लागलो मी मोदीभक्त आहो. तू ते लिहिलं ना. तू ते काढतो का अता मार खातोस. 
लोणारे : मी तुमचं नाव घेतलं का?. 
आमदार पिंपळे : तुले माणुसकीने सांगू लागलो. तु गजाननभक्त आहेस. शिल्लकचे कामं करू नकोस. तुले कोणत्या पक्षाचं घेणदेणं नाही आहे. 
लोणारे : मले कोण्या पक्षाचं देणंघेणं नाही. 
आमदार पिंपळे : तु का आमाले X खाणारे म्हणत असशील तर तुया तोंडात का घातला नाही तर नावाचा आमदारच नाही. 
लोणारे : हो, ठिक आहे. ठिक आहे. काही हरकत नाही. 
आमदार पिंपळे : कुठे आहे तू. 
लोणारे : अकोल्याला आहो सध्या. 
आमदार पिंपळे : मुर्तिजापूरले ये तू आता. 
लोणारे : ओके, ठिक आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp