मोदींकडे परदेशातील गोळीबारावर प्रतिक्रिया द्यायला वेळ, पण मणिपूरवर बोलायला नाही: प्रकाश आंबेडकर

मोदींकडे परदेशातील गोळीबारावर प्रतिक्रिया द्यायला वेळ, पण मणिपूरवर बोलायला नाही: प्रकाश आंबेडकर


मुंबई : पंतप्रधान मोदींकडे (PM Modi) परदेशात झालेल्या गोळीबारावर कमेंट करण्यासाठी वेळ आहे. पण देशातल्या मणिपूरमधील (Manipur) आदिवासींच्या होत असलेल्या हत्याकांडावर बोलायला त्यांच्याकडे वेळ नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी ट्विट करत  पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर केली आहे. भारतापेक्षा अमेरिका त्यांना जास्त प्रिय आहे का? ते मणिपूरला भारताचा भाग मानत नाहीत का? भारतातील आदिवासींवर त्यांचे प्रेम नाही का? असे सवालही ॲड. आंबेडकर यांनी उपस्थित केले आहेत.

भारतापेक्षा अमेरिका मोदींना प्रिय आहे का? – ॲड. प्रकाश आंबेडकर

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात डोनाल्ड ट्रम्प जखमी झाले आहेत. पेनसिल्व्हेनिया येथे आयोजित केलेल्या प्रचार सभेत त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. हल्ला इतरा भयंकर होता की, या हल्ल्यात डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले आहेत. हल्ल्यात ट्रम्प यांच्या कानाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.  अमेरिकेतील बटलर, पेनसिलव्हेनिया येथे रविवारी 14 जुलै रोजी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत गोळीबार झाला होता. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आणि या घटनेचा निषेध केला. मात्र, मणिपूर येथील घटनेवर मोदींनी मौन बाळगले आहे. किंबहुना अजूनही ते मणिपूर येथील आदिवासी बांधवांच्या हत्याकांडाविषयी बोलायला किंवा मणिपूर येथे पीडितांची भेट घ्यायला तयार नाहीत. याच पार्श्वभूमीवर ॲड. आंबेडकर यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

गोळीबार होताच काय घडलं?

ट्रम्प स्टेजवर भाषण देत असताना take a look at what Happens म्हणत असतानाच चिक चिक करत गोळीबाराचे आवाज आले. तेव्हा एकच आक्रोश निर्माण झाला. ट्रम्प यांच्या दिशेने गोळी येताच त्यांच्या उजव्या कानाच्या वरच्या भागावरून घासून गेली. यानंत एका क्षणात ट्रम्प खाली बसले. तेव्हाच सुरक्षा रक्षकांनी त्यांना रिंगण करत बाजूला केले. तेव्हा कान आणि चेहरा रक्ताने माखलेला होता. अवघ्या 12 सेकंदामध्ये हा प्रकार घडला. 

या गोळीबारात रॅलीत उपस्थित असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून 2 गंभीर जखमी झाले आहेत. पेनसिल्व्हेनिया पोलिसांनी सांगितले की ट्रम्प यांना सुमारे 400 फूट अंतरावरील इमारतीच्या छतावरून गोळीबार करण्यात आला. AR-15 रायफलमधून 8 राउंड फायर करण्यात आले. पहिल्या फेरीत 3 तर दुसऱ्या फेरीत 5 गोळ्या झाडण्यात आल्या. पोलिसांनी सांगितले की, संशयित शूटर मारला गेला आहे. त्याचे वय 20 वर्षे होते. हल्ल्याचा हेतू अद्याप समजू शकलेला नाही.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

प्रशिक्षणार्थ आदिवासी विभागात रुजू होणाऱ्या पूजा खेडकरांचा बदलीत मोठा ट्विस्ट; नेमकं कारण काय?

प्रशिक्षणार्थ आदिवासी विभागात रुजू होणाऱ्या पूजा खेडकरांचा बदलीत मोठा ट्विस्ट; नेमकं कारण काय?


Akola News अकोला :प्रशिक्षणार्थी आएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांची पुणे, वाशिमनंतर आता पूजा खेडकरांची बदली अकोल्यात (Akola News) करण्यात आली होती. मात्र, 11 जुलैला  काढण्यात आलेल्या आदेशात आता बदल करण्यात आला आहे. अकोला येथील आदिवासी विभागात प्रकल्प अधिकारी म्हणून त्या उद्या, सोमवार 15 जुलै  पासून 19 जुलै पर्यंत आठवडाभर कामकाज प्रशिक्षण करिता रुजू होणार होत्या. तर त्यानंतर 22 जुलै पासून त्या विविध शासकीय अधिकारी यांची भेट घेऊन कामकाजाचा अनुभव घेणार असल्याचेही या आदेशात सांगण्यात आले होते.

मात्र आता त्यात बदल करण्यात आले आहे. वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने काढण्यात आलेल्या सुधारित आदेशपत्रात या बाबत बदल करून काही नवीन बदल केले आहे. तर याबाबत उद्या वाशिम जिल्हाधिकारी एस बुवनेश्वरी हे स्वत: या संदर्भात माहिती देणार आहेत.  त्यामुळे सध्यातरी पूजा खेडकरांची बदली अकोल्यात (Akola News) करण्यात आली नसल्याची माहिती आहे.

वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांचे नव्याने आदेश! 

प्रशिक्षणार्थी आएएस अधिकारी पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांची सध्या राज्यासह देशभरात चर्चा सुरू आहे. पूजा खेडकर यांची नियुक्ती, यूपीएससी परीक्षा देताना त्यांनी सादर केलेले दिव्यांग असल्याचे प्रमाणापत्र, नॉन क्रिमेलियरचे प्रमाणपत्र असे सर्वकाही संशयाच्या भोवऱ्यात आले आहे. याच कारणामुळे त्यांची पुण्याहून (Pune) थेट वाशिमला बदली करण्यात आली होती. दरम्यान, पुणे, वाशिमनंतर आता पूजा खेडकरांची बदली अकोल्यात (Akola News) करण्यात आली आहे. उद्या, सोमवार 15 जुलै  पासून 19 जुलै पर्यंत अकोला येथील प्रकल्प अधिकारी आदिवासी विभाग म्हणून त्या आठवडाभर कामकाज प्रशिक्षण करिता हजर होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

तर त्यानंतर 22 जुलै पासून त्या विविध शासकीय अधिकारी यांची भेट घेऊन कामकाजाचा अनुभव घेणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. मात्र आता आदेशामध्ये बदल करण्यात आले असून पुढील बदली संदर्भातील माहिती उद्या वाशिम जिल्हाधिकारी एस बुवनेश्वरी हे स्वत: या संदर्भात माहिती देणार आहेत.

पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पुणे पोलिसांची नोटीस

पुणे पोलिसांनी बाणेर रोडवरील घराबाहेर मनोरमा खेडकरच्या नावे नोटीस लावली (IAS officer Pooja Khedkar) आहे. तिचा शस्त्र परवाना रद्द करण्याबद्दल ही नोटीस आहे. पुणे शहर पोलीसांकडून मनोरमा खेडकरला नोटीस बजावत तुमचे पिस्तूलाचे लायसन्स रद्द का करण्यात येऊ नये असं या नोटीशीच्या माध्यमातून मनोरमा खेडकरला विचारण्यात आलं आहे. मनोरमा खेडकर विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आल्यानं पिस्तूलाचे लायसन्स रद्द करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. मनोरमा खेडकरच्या घरी पुणे ग्रामीण पोलिस आणि पुणे शहर पोलीसांची पथकं पोहचली. त्यांनी पिस्तूलासंबधीची नोटीस घराबाहेर भिंतीवरती लावली आहे. पूजा खेडकर(IAS Pooja Khedkar)ची ऑडी कार ताब्यात आली आहे. त्यामुळे आता पोलिस याप्रकरणात आणखी कोणती कारवाई करतात, हे पहावं लागणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Manorama Khedkar: पिस्तूल वापराच्या चौकशीसाठी पुणे पोलीस मनोरमा खेडकरांच्या दारावर, पण पोलिसांना अजूनही नो एंट्री

 

अधिक पाहा..



Source link

शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा ; भाजपच्या महिला सरपंचाचा गंभीर आरोप

शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा ; भाजपच्या महिला सरपंचाचा गंभीर आरोप


Akola Crime News : अकोल्यात शिवसेना ठाकरे गट आणि भाजप मधील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. यात भाजपच्या (BJP) महिला सरपंचानी शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर गंभीर आरोप केले आहे. या प्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा (Crime News) दाखल करण्यात आला आहे.

अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलाय. अकोला जिल्ह्यातील हिंगणी बुजरूक गावाच्या भाजपच्या सरपंच डॉ. कल्पना पळसपगार यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. पळसपगारांनी तक्रारीत दातकर यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा केला आरोप. परिणामी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दातकर यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपच्या महिला सरपंचाचा गंभीर आरोप 

अकोल्यातील हिंगणी बुजरूक हे गोपाल दातकरांचं गाव आहे. तर अकोला पूर्व विधानसभेसाठी ते ठाकरे गटाकडून दावेदार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे भाजपने जाणीवपुर्वक या गुन्ह्यात आपल्याला अडकवल्याचा दातकर यांचा आरोप आहे. हा संपूर्ण प्रकार उघडकीस येताच राजकीय वर्तुळासह जिल्ह्यात एकच चर्चेला उधाण आले आहे. या प्रकरणी आता ठाकरे गटाचे  आमदार नितीन देशमुख हे चांगलेच आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले. गुन्हा का दाखल केला?, याचा जाब विचारण्यासाठी आमदार नितीन देशमुख थोड्याच वेळात पोलीस अधिक्षक कार्यालयात भेट देणार आहे. त्यामुळे या प्रकरणी नेमकी काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

अकोला (Akola) जिल्ह्यातून अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कुटुंबियांच्या मनाविरुद्ध लग्न केलेल्या तरुणीच्या ऑनर किलींगचा (Honour killing) प्रयत्न हाणून पाडणाऱ्या पोलिसांवर तरुणीच्या कुटुंबियांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना पातूर (Patur) तालुक्यातल्या पेडका पिंपरडोळी गावालगत घडली आहे. उमेश सांगळे असं हल्ला झालेल्या पोलिसाचं नाव आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती लागला आहे.  

तिघांवर गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या कुटुंबियांनी उमेश सांगळे या पोलीस शिपायावर हल्ला केला आहे. या हल्ल्याचा ‘एक्सक्लूझिव्ह’ व्हिडीओ ‘एबीपी माझा’च्या हाती लागलाय. काल संध्याकाळी ही घटना घडली आहे. पोलीस उमेश सांगळेंच्या सतर्कतेमुळं या घटनेतील प्रेमविवाह केलेली तरुणी बचावली आहे. दरम्यान, या घटनेत मुलीची आई आणि दोन भाऊ अशा तिघांवर अकोला जिल्ह्यातील चान्नी पोलिसांत जीवे मारण्याचा प्रयत्न आणि शासकीय कामांत अडथळा निर्माण करण्याचा गुन्हे दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना चान्नी पोलिसांनी अटक केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..



Source link

धक्कादायक! तरुणीच्या ऑनर किलींगचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या पोलिसावर हल्ला, 3 जणांवर गुन्हा दाखल

धक्कादायक! तरुणीच्या ऑनर किलींगचा प्रयत्न हाणून पाडणाऱ्या पोलिसावर हल्ला, 3 जणांवर गुन्हा दाखल


Akola News: अकोला (Akola) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कुटुंबियांच्या मनाविरुद्ध लग्न केलेल्या तरुणीच्या ऑनर किलींगचा (Honour killing) प्रयत्न हाणून पाडणाऱ्या पोलिसांवर तरुणीच्या कुटुंबियांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना पातूर (Patur) तालुक्यातल्या पेडका पिंपरडोळी गावालगत घडली आहे. उमेश सांगळे असं हल्ला झालेल्या पोलिसाचं नाव आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती लागला आहे.  

तिघांवर गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या कुटुंबियांनी उमेश सांगळे या पोलीस शिपायावर हल्ला केला आहे. या हल्ल्याचा ‘एक्सक्लूझिव्ह’ व्हिडीओ ‘एबीपी माझा’च्या हाती लागलाय. काल संध्याकाळी ही घटना घडली आहे. पोलीस उमेश सांगळेंच्या सतर्कतेमुळं या घटनेतील प्रेमविवाह केलेली तरुणी बचावली आहे. दरम्यान, या घटनेत मुलीची आई आणि दोन भाऊ अशा तिघांवर अकोला जिल्ह्यातील चान्नी पोलिसांत जीवे मारण्याचा प्रयत्न आणि शासकीय कामांत अडथळा निर्माण करण्याचा गुन्हे दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना चान्नी पोलिसांनी अटक केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

धक्कादायक! नाशिकमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलावर प्राणघातक हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

 

 

अधिक पाहा..



Source link

विदर्भात कोणाचं वर्चस्व? कोणत्या पक्षाचे किती आमदार? सविस्तर माहिती एका क्लिकवर

विदर्भात कोणाचं वर्चस्व? कोणत्या पक्षाचे किती आमदार? सविस्तर माहिती एका क्लिकवर


Vidarbha MLA List June 2024 मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) आता अवघ्या काही महिन्यावर येऊन ठेपली आहे. महाराष्ट्रातील मागील विधानसभा निवडणुका ऑक्टोबर 2019 मध्ये झाल्या होत्या. त्यामुळे नवी विधानसभा त्यापूर्वीच अस्तित्वात येणे अपेक्षित आहे. येत्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) होऊ शकतात. महाराष्ट्र विधानसभेत 288 आमदार (Maharashtra 288 MLA list) निवडले जातात. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यावेळी भाजप (BJP) आणि शिवसेना युती म्हणून निवडणुकीला सामोरे गेले होते. त्यावेळी एकसंघ शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर होती. भाजप-शिवसेना युतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी लढली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 आमदारांसह चौथ्या स्थानावर होती.

लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) रणधुमाळी संपली आहे. यानंतर आता राज्यात पुढच्या काही महिन्यातच विधानसभेच्या निवडणुका (Vidhansabha Election) होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. काही नेत्यांनी तर विधानसभा निवडणुकींच्या दृष्टीनं दौरे सुरु केले आहेत. राज्यात भाजप-शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)  यांची सत्ता आहे. मात्र, नागपूरसह विदर्भात लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. परिणामी आगामी निवडणुकीत कोणात्या पक्षाची सत्ता येणार आता हा येणारा काळच ठरवणार आहे. दरम्यान, विदर्भात सध्या नेमकं कोणाचं वर्चस्व आहे? कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत? याबाबतची सविस्तर माहिती  जाणून घेऊया. 

नागपूर जिल्ह्यातील आमदार : 12  (Nagpur MLA List)

1) काटोल विधानसभा – अनिल देशमुख (राष्ट्रवादी- शरद पवार)
2) सावनेर विधानसभा –  सुनील केदार (काँग्रेस)
3) हिंगणा विधानसभा – समीर मेघे (भाजप)
4) उमरेड विधानसभा – राजू पारवे (काँग्रेस) – सध्या शिवसेना एकनाथ शिंदे
5) नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा-  देवेंद्र फडणवीस (भाजप)
6) नागपूर दक्षिण विधानसभा – मोहन मते  (भाजप)
7) नागपूर पूर्व विधानसभा – कृष्णा खोपडे (भाजप)
8) नागपूर मध्य विधानसभा – विकास कुंभारे (भाजप)
9) नागपूर पश्चिम विधानसभा – विकास ठाकरे (काँग्रेस)
10) नागपूर उत्तर विधानसभा – नितीन राऊत (काँग्रेस)
11) कामठी विधानसभा – टेकचंद सावरकर (भाजप)
12) रामटेक विधानसभा – आशिष जयस्वाल (अपक्ष)

बुलढाणा जिल्ह्यातील आमदार : 07  (Buldhana MLA List)

1) मलकापूर विधानसभा –  राजेश एकाडे (काँग्रेस)
2) बुलढाणा विधानसभा –  संजय गायकवाड (शिवसेना – शिंदे)
3) चिखली विधानसभा –  श्वेता महाले (भाजप)
4) सिंदखेड राजा विधानसभा –  राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)
5) मेहकर विधानसभा – संजय रायमूलकर (शिवसेना शिंदे)
6) खामगाव विधानसभा – आकाश फुंडकर (भाजप)
7) जळगाव जामोद विधानसभा – संजय कुटे (भाजप)

अकोला जिल्ह्यातील आमदार : 05  (Akola MLA List)

1) अकोट विधानसभा – प्रकाश भारसाकळे (भाजप)
2) बाळापूर विधानसभा – नितीन देशमुख  (शिवसेना – उद्धव ठाकरे)
3) अकोला पश्चिम विधानसभा – गोवर्धन शर्मा (भाजप) (निधन)
4) अकोला पूर्व विधानसभा – रणधीर सावरकर (भाजप)
5) मूर्तिजापूर विधानसभा –  हरीश पिंपळे (भाजप)

वाशिम जिल्ह्यातील आमदार : 03  (Washim MLA List)

1) रिसोड विधानसभा –  अमित झनक (काँग्रेस)
2) वाशिम विधानसभा – लखन मलिक (भाजप)
3) कारंजा विधानसभा – राजेंद्र पाटनी (भाजप)

अमरावती जिल्ह्यातील आमदार : 08  (Amravati MLA List)

1) धामणगाव रेल्वे विधानसभा – प्रताप अरुण अडसड (भाजप)
2) बडनेरा विधानसभा – रवी राणा (अपक्ष)
3) अमरावती विधानसभा – सुलभा खोडके (काँग्रेस)
4) तिवसा विधानसभा – यशोमती ठाकूर (काँग्रेस)
5) दर्यापूर विधानसभा- बळवंत वानखेडे (काँग्रेस) (लोकसभेवर निवड)
6) मेळघाट विधानसभा – राजकुमार पटेल (प्रहार जनशक्ती)
7) अचलपूर विधानसभा – बच्चू कडू (प्रहार जनशक्ती)
8) मोर्शी विधानसभा – देवेंद्र भुयार (स्वाभिमानी) – सध्या अजित पवारांसोबत

वर्धा जिल्ह्यातील आमदार : 04 (Wardha MLA List)  

1) आर्वी विधानसभा – दादाराव केचे (भाजप)
2) देवळी विधानसभा – रणजित कांबळे (काँग्रेस)
3) हिंगणघाट विधानसभा – समीर कुणावार (भाजप)
4) वर्धा विधानसभा – पंकज भोयर (भाजप)

भंडारा जिल्ह्यातील आमदार : 03 (Bhandara MLA List)  

1) तुमसर विधानसभा – राजेंद्र कारेमोरे (राष्ट्रवादी – अजित पवार )
2) भंडारा विधानसभा – नरेंद्र भोंडेकर (अपक्ष) सध्या एकनाथ शिंदे यांना पाठिंबा
3) साकोली विधानसभा – नाना पटोले (काँग्रेस)

गोंदिया जिल्ह्यातील आमदार : 04 (Gondia MLA List)  

1) अर्जुनी मोरगाव विधानसभा – मनोहर चंद्रिकापुरे (राष्ट्रवादी – अजित पवार)
2) तिरोरा विधानसभा – विजय रहांगदळे (भाजप)
3) गोंदिया विधानसभा – विनोद अग्रवाल (अपक्ष)
4) आमगाव विधानसभा – मारुती कारोटे (काँग्रेस)

गडचिरोली जिल्ह्यातील आमदार : 03  (Gadchiroli MLA List)

1) आरमोरी विधानसभा – कृष्णा गजबे (भाजप)
2) गडचिरोली विधानसभा – डॉ. देवराव होळी (भाजप)
3) अहेरी विधानसभा – धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी- अजित पवार)

चंद्रपूर जिल्ह्यातील आमदार : 06 (Chandrapur MLA List)

1) राजुरा विधानसभा – सुभाष धोटे (काँग्रेस)
2) चंद्रपूर विधानसभा – किशोर जोर्गेवार (अपक्ष)
3) बल्लारपूर विधानसभा – सुधीर मुनगंटीवार (भाजप)
4) ब्रह्मपुरी विधानसभा – विजय वडेट्टीवार (काँग्रेस)
5) चिमुर विधानसभा – कीर्तीकुमार भांगडिया (भाजप)
6) वरोरा विधानसभा – प्रतिभा धानोरकर (काँग्रेस) (सध्या लोकसभेवर)

यवतमाळ जिल्ह्यातील आमदार  : 07  (Yavatmal MLA List)

1) वणी विधानसभा – संजीव रेड्डी बोदकुलवार (भाजप)
2) राळेगांव विधानसभा – अशोक उईके (भाजप)
3) यवतमाळ विधानसभा – मदन येरावार (भाजप)
4) दिग्रस विधानसभा – संजय राठोड (शिवसेना- एकनाथ शिंदे)
5) आर्णी विधानसभा – संदीप धुर्वे (भाजप)
6) पुसद विधानसभा – इंद्रनिल मनोहर नाईक (राष्ट्रवादी – अजित पवार)
7) उमरखेड विधानसभा – नामदेव ससाणे (भाजप)

महत्वाच्या बातम्या:

Maharashtra MLA List : महाराष्ट्रातील सर्व आमदारांची नावे, 288 विधानसभा, जिल्हानिहाय आमदारांची यादी

अधिक पाहा..



Source link

माझाच्या बातमीचा दणका! शहीद जवानाच्या अंतिम संस्काराला दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई

माझाच्या बातमीचा दणका! शहीद जवानाच्या अंतिम संस्काराला दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई


Akola News अकोलाअकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे येथील शहीद जवान प्रविण जंजाळ  (Pravin Janjal) यांच्या अंत्यसंस्कारासाठीच्या तयारीत दिरंगाई करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर आता कारवाई बडगा उगारण्यात येणार आहे. शहीद जवान प्रवीण जंजाळ यांचं पार्थिव काल त्यांच्या मूळ गावी मोरगाव भाकरे येथे अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले होते. मात्र या परिसरात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडत असतांना ही जिल्हा प्रशासनाने या गावात कुठलीही तयारी केली नाही, शिवाय कुठलाही अधिकारी देखील या परिसरात फिरकला नाही.  हे संपूर्ण धक्कादायक वास्तव सर्वप्रथम ‘एबीपी माझा’ने लावून धरत ही बातमी प्रसारित केली होती. परिणामी माझाच्या बातमीची दखल घेत या विषयी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर आता कारवाई करण्यात येणार आहे.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले चौकशीचे आदेश 

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी आज विधान परिषदेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे विषय लावून धरला. अंत्यसंस्कार स्थळी प्रशासनाकडून कोणतीच तयारी करण्यात आली नव्हती, शिवाय संबंधित अधिकाऱ्यांने शहीदाच्या कुटुंबियांची साधी विचारणा देखील केली नव्हती हा संपूर्ण प्रकार असंवेदनशीलतेचा असून यामूळेच  शहीद जवानाच्या  अंत्यसंस्काराला विलंब झाल्याचा आरोप शहीदाच्या कुटुंबियांसह गावकऱ्यांनी केला होता. परिणामी आता या प्रकरणी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर  कारवाई केली जाईल, असे आदेश मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir) कुलगाम जिल्ह्यात रविवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झालेत. या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी चार दहशतवाद्यांना ठार केले . मात्र या चकमकीत भारतीय सैन्य दलाचे दोन जवान शहीद असून यामध्ये महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील प्रवीण जंजाळ (Pravin Janjal) या जवानाचा देखील समावेश आहे. प्रवीण जंजाळ शहीद झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या मोरगाव भाकरे या गावावर एकच शोककळा पसरली आहे.

अकोल्यातील शहीद जवान प्रवीण जंजाळ यांचं पार्थिव आज त्यांच्या मूळ गावी मोरगाव भाकरे येथे येत आहे. मात्र या परिसरात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस आहे. असे असतांना मात्र जिल्हा प्रशासनाने या गावात आद्यप कुठलीही तयारी केली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. परिणामी  गावकरी आणि शहीद प्रवीण यांचे भाऊ प्रशासना विरोधात प्रचंड आक्रमक झाले आहे. यावेळी त्यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रशासनावर आपला रोष व्यक्त करत सरकारचा निषेध केला. अद्याप ही प्रशासनाचे कुठलेही अधिकारी गावात पोहचले नाहीत. त्यामुळे गावकरी चांगलेच संतापले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp