अवघ्या काही तासांच्या पावसाचा हाहाकार! हजारो शेतकर्‍यांना अतिवृष्टीचा फटका, बळीराजा हवालदिल

अवघ्या काही तासांच्या पावसाचा हाहाकार! हजारो शेतकर्‍यांना अतिवृष्टीचा फटका, बळीराजा हवालदिल

Maharashtra Rain Update : गेल्या कित्येक दिवसांपासून दांडी मारून बसलेल्या वरुणराजाने अखेर विदर्भातील (Vidarbha Weather Update) काही जिल्ह्यांना अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं (IMD) वर्तवविलेले अंदाजानुसार आज देखील विदर्भात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) अंदाज आहे. तर रविवारच्या रात्री पासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे (Heavy Rain) सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाल्याचे बघायला मिळाले. अशातच या पावसाचा सर्वाधिक फटका अकोला, बुलढाणा, वाशिमसह  इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसला आहे.

विदर्भातील अनेक जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एकट्या बुलढाणा (Buldhana Rain News) जिल्ह्यातील 17 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने जवळपास 11 हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान झालं आहे. तर पंधरा हजार शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. एकीकडे पश्चिम विदर्भाला पावसाने झोडपून काढले असताना पूर्व विदर्भ मात्र अद्याप दमदार पावसाच्या प्रतीक्षेतच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत सापडाला आहे.

हजारो शेतकर्‍यांना अतिवृष्टीचा फटका, बळीराजा पुन्हा हवालदिल

बुलढाणा जिल्ह्यात काल, सोमवारी दिवसभर झालेल्या पावसाने कहरच केला आहे. यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील 17 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने जवळपास 11 हजार  हेक्टर वरील पिकाचे नुकसान झालं आहे. तर पंधरा हजार शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं शेती साहित्य सुद्धा वाहून गेला आहे. त्यामुळे आता शेतकरी हवालदिल झाला आहे. जिल्ह्यातील मोताळा, खामगाव, नांदुरा आणि शेगाव या चार तालुक्यात काल दिवसभर पाऊस कोसळला. सर्वात जास्त पाऊस खामगाव तालुक्यातील आवार या महसूल मंडळात 219.3 मिलिमीटर पाऊस कोसळला. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती असून शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत सापडला आहे.

पावसाचा पोलीस भरती प्रक्रियेवरही परिणाम, विद्यार्थ्यांची तारांबळ

अमरावती ग्रामीण पोलि‍सांची भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी अमरावतीच्या जोग मैदानावर सुरू आहे. मैदानी चाचणी देण्यासाठी महिला उमेदवार सकाळी 4 वाजता पासून दाखल झाल्या आहेत. मात्र, गेल्या दोन दिवसापासून अमरावतीत मुसळधार पाऊस सुरू असल्याने मैदान अक्षरक्ष: चिखलमय झाले आहे. मैदानावर चिखल असल्याने मुलींना धावण्यात अडथळा निर्माण होतो. मात्र मैदानात चिखल असल्याने मैदानी चाचणी देतांना मोठ्या दुर्घटनेलाही समोर जावे लागू शकते. त्यामुळे मैदानी चाचणी पुढे ढकलावी, अशी मागणी काही मुलींनी केली आहे. तर काही मुली आतमध्ये मैदानी चाचणी साठी गेल्या आहेत.

विदर्भात मुसळधार पावसाची दाणादाण

एकट्या अकोल्यात गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसानं जनजीवन पार विस्कळीत केलंय. अकोल्यातील अनेक सखल भागांत पाणी साचलंय. अकोला शहरातील मुख्य रस्त्यांपैकी एक असलेल्या दुर्गाचौक ते जठारपेठ रस्त्याला अक्षरश: नदीचं स्वरूप आलंय. या रस्त्यावरून वाहनं चालवतांना नागरिकांना मोठी कसरत करावी लागतीये. महापालिकेनं केलेलं नालेसफाईचा दावा या रस्त्यावर साचलेल्या पाण्याने धुवून काढलाय. या पावसामुळे सर्वत्र एकच  दाणादाण उडवली असल्याचे चित्र आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

Source link

शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

अकोला :  अकोला जिल्ह्यातील (Akola News)  मोरगाव भाकरे येथील शहीद जवान प्रविण जंजाळ यांच्यावर भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आलेयेत. मोरगाव भाकरे गावालगतच्या मैदानावर त्यांना लष्करी इतमामात अंतिम निरोप देण्यात आलाय. अकोल्यातील शहीद प्रविण जंजाळ यांना आज अंतिम निरोप देण्यात आलाय. दुपारी 3 वाजता नागपूरमार्गे त्यांचं पार्थिव त्यांचं गाव असलेल्या मोरगाव भाकरेमध्ये दाखल झालं होतंय. यावेळी गावातून पुष्पवृष्टी करीत त्यांच्या पार्थिवाची मिरवणूक काढण्यात आली. हवेत बंदुकीच्या फैरी झाडत त्यांना मानवंदना देण्यात आलीय. यावेळी जिल्ह्यातील हजारो नागरिकांसह अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे, अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे, बाळापूरचे आमदार नितीन देशमुखांसह इतर अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात 6 जून रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात प्रविण जंजाळ शहीद झाले होतेय. या चकमकीत प्रविणसह दोन जवान शहीद झाले. दरम्यान, अंत्यसंस्कारासाठी प्रशासनावे काहीच व्यवस्था केली नसल्याचा आरोप शरीराच्या भावाने केलाय. तर खासदार बळवंत वानखडे यांनी प्रशासनाच्या असंवेदनशीलतेवर टीका केलीय. मुलगा शहीद झाल्याचा सार्थ अभिमान असल्याची कुटुंबियांची भावना हिच या देशाच्या महानतेची साक्ष देणारी आहे.

गावावर शोककळा

अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे गावातील प्रवीण प्रभाकर जंजाळ हे राहायला होते.  2019 मध्ये प्रवीण जंजाळ हे भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते. त्यांच्या लग्नाला नुकतंच झालं. त्यांच्या मृत्यूच्या पश्चात पत्नी, आई-वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे . प्रवीण जंजाळ चार महिन्यांपूर्वीच गावी सुटीवर आले होते. या सुटीत त्यांचा विवाह झाला होता. प्रवीण यांची ही कुटुंबासोबतची शेवटची भेट ठरली. प्रवीण यांचे प्राथमिक शिक्षण गावात तर बारावीपर्यंतचे शिक्षण गायगाव येथे झाले होते. त्यांच्या मित्रांनी प्रवीण यांच्या गावातील शेवटच्या भेटीतील आठवणींनी रात्र जागून काढली.

प्रवीण यांचे दोन काकाही होते सैन्यदलात

प्रवीण हे सैन्यदलात दाखल झालेले जंजाळ कुटुंबातील तिसरे जवान होते. त्याच्या पूर्वी त्यांचे मोठे बाबा भास्करराव बाजीराव जंजाळ आणि त्यांचे काका रविंद्र जंजाळ हे सैन्यदलात होते. भास्करराव यांचे चार वर्षांपूर्वी हृदविकाराने निधन झाले आहे.

हे ही वाचा :

4 महिन्यांपूर्वी स्वत:च्या लग्नासाठी गावाकडं आला तो शेवटचाच; शहीद प्रवीणच्या मित्राने आठवणींनी जागवली रात्र

अधिक पाहा..

Source link

पावसानं वावरातलं सारंच नेलं! शेतकर्‍यांच्या चिमूकल्याने फोडला टाहो, मांडली शेतकर्‍यांची दाहकता

पावसानं वावरातलं सारंच नेलं! शेतकर्‍यांच्या चिमूकल्याने फोडला टाहो, मांडली शेतकर्‍यांची दाहकता

Maharashtra Rain Update : मुंबईसह राज्यातील बहुतांश भागात कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं (Rain Update) अक्षरश: झोडपून काढले आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं (IMD) वर्तवविलेले अंदाजानुसार आज देखील विदर्भात मुसळधार पावसानं (Vidarbha Weather Update) एकच दाणादाण उडवली आहे. रविवारच्या रात्री पासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे (Heavy Rain) सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर दुसरीकडे शेतकर्‍यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्याने शेतीला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असून शेतीची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अशातच एका शेतकर्‍यांच्या शेतीची दाहकता मांडणार व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान वायरल होत आहे. हा चिमुकला शेतकरी पुत्र अकोल्यातली (AKola) बाळापूर तालुक्याच्या सावरपाटी गावचा रहिवासी असून सोहम विरोकार असे त्याचे नाव आहे. त्याच्या कुटुंबियांच्या डोळ्या देखत दोन एकर शेतात कशा पद्धतीने संकट ओढावलं, याचे भीषण वास्तव त्याने आपल्या शब्दात मांडले आहे.

आमचं सारं वावर गेलं पाण्यात,काही समजाले मार्ग नाही बाप्पा

या व्हिडिओ मध्ये हा  चिमुकला शेतकरी पुत्र म्हणाला की,  कालपासून पाणी पडून राहिलं. त्यात आमचं सारं दोन एकर शेत वाहून गेलं. हे काय करताती, आता इथं काय डोक्स पेरावं? हे पाहा डोक्स पेरासाठी चिखल, आता कुणाचं डोक्स पेरावं आम्ही? असा सवाल त्याने विचारला आहे. पुढे तो म्हणाला की, गेलं सारं आमचं वावर पाण्यात. दोन एक्करात एक कणही (बियांचा) राहिला नाही, सारं गेलं पाण्यात वाहून. काही समजाले आम्हाले मार्ग नाही बाप्पा. अशा शब्दात सोहम विरोकार या शेतकरी पुत्राने आपला आक्रोश मांडला आहे.

विदर्भात मुसळधार पावसाची दाणादाण

एकट्या अकोल्यात गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसानं जनजीवन पार विस्कळीत केलंय. अकोल्यातील अनेक सखल भागांत पाणी साचलंय. अकोला शहरातील मुख्य रस्त्यांपैकी एक असलेल्या दुर्गाचौक ते जठारपेठ रस्त्याला अक्षरश: नदीचं स्वरूप आलंय. या रस्त्यावरून वाहनं चालवतांना नागरिकांना मोठी कसरत करावी लागतीये. महापालिकेनं केलेलं नालेसफाईचा दावा या रस्त्यावर साचलेल्या पाण्याने धुवून काढलाय. या पावसामुळे सर्वत्र एकच  दाणादाण उडवली असल्याचे चित्र आहे.

तर दुसरीकडे काही दिवसापूर्वीच आकोट-अकोला महामार्गावरील नव्याने बांधण्यात आलेला पुल खचला होता. आता पुन्हा या मार्गावरील चोहोट्टा बाजार आणि करोडी फाटा नदीच्या पुलावरील आधार भिंती अक्षरशः पहिल्या पावसात कोसळली आहे. या पुलाला बांधकामाला काही महिनेच उलटले आहे. नुकत्याच कालच्या आणि आजच्या पावसामुळे अकोट अकोला मार्गावरील बांधण्यात आलेल्या पुलाची आवार भिंत कोसळली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

Source link

400 पारचा नारा भाजपच्या पि‍छेहाटीचं कारण ठरलं? शिवसेनेचे केंद्रीय मंत्री स्पष्टच बोलले…

400 पारचा नारा भाजपच्या पि‍छेहाटीचं कारण ठरलं? शिवसेनेचे केंद्रीय मंत्री स्पष्टच बोलले…

Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेत (Lok Sabha Election 2024) दिलेला 400 पारचा नाराच भाजपच्या (BJP) पिछेहाटीचं कारण ठरला का? असा प्रश्न निकालानंतर सातत्याने विचारला जातोय. अशातच आता भाजपच्या मित्र पक्षाचे नेतेही दबक्या आवाजात याच नाऱ्यामुळे पराभवाचं तोंड पहावं लागल्याचं बोलत आहेत. दुसरीकडे केंद्रीय आयुष मंत्रालयाचे स्वतंत्र प्रभार मंत्री आणि शिंदे गटाचे नेते खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनीही असंच वक्तव्य केलंय.

400 पारच्या नाऱ्यामुळेच अनेक ठिकाणी कार्यकर्ते गाफील राहिल्याचं ते म्हणालेय. अकोल्यासह (Akola News) राज्यात आणि देशात यामुळेच महायुतीची पिछेहाट झाल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय. केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान मिळालेल्या जाधव आणि अकोल्याचे भाजप खासदार अनुप धोत्रे यांचा अकोल्यातील मराठा मंडळ मंगल कार्यालयात महायुतीनं जाहीर नागरी सत्कार केलाय. त्या कार्यक्रमात प्रतापराव जाधव बोलत होते.

पाकव्याप्त काश्मीर अन् चीनला धडा शिकविण्यासाठी 400 पारचा नारा

देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी देश आणि राज्य पातळीवर भाजपला चांगलाच धक्का दिला आहे. विदर्भातील भाजपची बऱ्यापैकी पकड असलेल्या मतदारसंघातही महायुतीचा दारुण पराभव झाला आहे. विशेष म्हणजे, विदर्भात काँग्रेसने (Congress)  घरवापसी करत दहा पैकी 7 मतदारसंघात महाविकास आघाडीला यश मिळवून दिले आहे. तर भाजप 2 आणि शिंदेच्या शिवसेनेला अवघ्या 1 ठिकाणी, असे महायुतीला यश आले आहे. त्यामुळे विदर्भात महाविकास आघाडीने (Mahavikas aghadi) चांगलीच मुसंडी मारली असून काँग्रेस विदर्भातही सर्वत मोठा पक्ष ठरला आहे. अशातच आता आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने मविआ, महायुतीसह इतर पक्षही जोमाने तयारीला लागले आहे.

… म्हणून आम्हाला काही अंशी पराभवाला समोर जावं लागले

दरम्यान, 400 पारचा नारा हा पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी आणि चिनला धडा शिकविण्यासाठी असल्याचा दावा केंद्रीय आयुष मंत्रालयाचे स्वतंत्र प्रभार मंत्री आणि शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव यांनी केलाय. लोकसभेच्या निवडणुकादरम्यान विरोधकांनी मोठ्या प्रमाणात खोटे नॅरेटीव्ह पसरवत समाजाची दिशाभूल केली. विरोधकांचा हा डाव हाणून पाडण्यास आणि त्यांना उघडे पाडण्यात आम्ही कुठेतरी कमी पडलो. परिणामी आम्हाला काही अंशी पराभवाला समोर जावे लागल्याचेही मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले. असे असले तरी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत.

निवडणुकांच्या काळात त्यांनी दिलेले चारशे पारचा नारा हा संविधान बदलण्यासाठी नाही, तर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यासाठी आणि चीनला धडा शिकविण्यासाठी होता.असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं. दुसरीकडे 400 पारच्या नाऱ्यामूळे कार्यकर्ते निर्धास्त झाले होते. एखादा कमी असला तर काय होते असं त्यांना वाटत होते. त्यामुळे आम्हाला काही अंशी पि‍छेहाट झाल्याचे बघायला मिळाल्याचे ही मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले.

इतर महत्त्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

Source link

राज्यात मुसळधार पावसाचा हाहाकार! नदीच्या पुरात कार गेली वाहून, भिंत कोसळून एकाचा मृत्यू

राज्यात मुसळधार पावसाचा हाहाकार! नदीच्या पुरात कार गेली वाहून, भिंत कोसळून एकाचा मृत्यू

Maharashtra Rain Update : राज्यातील बहुतांश भागात कोसळणाऱ्या मुसळधार पावसानं  (Maharashtra Rain Update) अक्षरश: झोडपून काढले आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागानं (IMD) वर्तवविलेले अंदाजानुसार राज्यासह विदर्भात मुसळधार पावसानं (Vidarbha Weather Update) एकच दाणादाण उडवली आहे. रविवारच्या रात्री पासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे (Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झाले आहे.

या पावसाचा फटका रेल्वे, रस्ता आणि हवाई वाहतुकीवर देखील झाला असून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या उशीराने प्रवास करत आहे. तर विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, नागपूरसह इतर बहुतांश जिल्ह्यातील नदी नाल्यासह मुख्य रस्त्याला अक्षरश: नदीचं स्वरूप आलंय. अशातच आता बुलढाणा (Buldhana Rain News) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

अक्षरशः डोळ्यादेखत कार गेली वाहून

बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील खामगाव – नांदुरा रोडवरील सुटाळा गावातून जाणारी छोटी नदीला अक्षरश: पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ही नदी प्रचंड पाण्याच्या प्रवाहाने खळखळायला लागली आहे. दरम्यान या नदीच्या कडेला उभी असलेली एक चार चाकी इन्होवा कार अक्षरशः डोळ्यादेखत नदीच्या पाण्याने वाहून नेलीय. नशीबच म्हणावे लागेल की या वाहनात कोणीही बसलेले नव्हते, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.  नदीचा प्रवाह एवढा वाढला होता की, लगतच असलेले एक पानाचे दुकान देखील त्या चार चाकी वाहनाच्या बरोबरीनने वाहून गेले आहे.

विदर्भातील नदी नाल्याला पुराचे स्वरूप

बुलढाणा जिल्ह्याप्रमाणेच अकोल्यातही गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसानं जनजीवन पार विस्कळीत केलंय. अकोल्यातील अनेक सखल भागांत पाणी साचलंय. अकोल्यातल्या अनेक रस्त्याला नद्यांचं स्वरूप आलंय. त्यातच बाळापुर तालुक्यातल्या मन नदिला देखील पुर आलाय. रस्त्यावरील पाणी नदीत जात असल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना वाहन चालवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आहे.

याच दरम्यान बाळापुर येथील रस्त्यावरून वाहत असलेल्या पाण्यात दुचाकी वाहून जात असताना काही लोकांनी दुचाकी चालकाला आणि दुचाकीला सुखरूपपणे बाहेर काढले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. रस्त्यावरून वाहन चालत असताना अनेक नागरिक खाली कोसळत आहेत आणि त्यांच्या अंगाला मोठ्या प्रमाणात जखमा देखील होत आहेत. त्यामुळे वाहन चालवताना काळजी घ्यावी, असा आवाहन नागरिकांनी केलं आहे.

घराची भिंत अंगावर कोसळून इसमाचा मृत्यू

मागील दोन दिवसात भंडारा जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. अशात आज दुपारी घराजवळ काम करीत असताना पावसानं जीर्ण झालेली घराची भिंत अचानक इसमाच्या अंगावर कोसळली. या घराच्या मलब्याखाली दबून इसमाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील करांडला या गावात घडली. योगेश देशमुख (३५) असं मृतकाचं नावं आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

Source link

4 महिन्यांपूर्वी स्वत:च्या लग्नासाठी गावाकडं आला तो शेवटचाच; मित्राने आठवणींनी जागवली रात्र

4 महिन्यांपूर्वी स्वत:च्या लग्नासाठी गावाकडं आला तो शेवटचाच; मित्राने आठवणींनी जागवली रात्र

अकोला : चार महिन्यांपूर्वीच तो गावी आला होता, सैन्यात भरती झालेल्या लेकाच्या लग्नासाठीचे सनई-चौघडेही तेव्हाच वाजले. घरात आनंद होता, गावात उत्साह होता, सगळीकडे आनंदी आनंद होता. लग्नामुळे दोन कुटुंबांच, दोन जीवांचं एक नवं नातं सुरू झालं होतं. पण, चारच महिन्यात दोन्ही कुटुंबातीला आनंदावर दु:खाचा डोंगर पसरला. काश्मीर खोऱ्यातील कुलगाम येथे दहशतवाद्यांचा खात्मा करताना महाराष्ट्रपुत्र, अकोल्याच्या भूमीतला लेक धारातीर्थी पडला. मुलगा शहीद झाल्याची बातमी कानी आली अन् गावावर शोककळा पसरली. अकोला जिल्ह्याच्या मोरगाव भाकरे येथील प्रवीण जंजाळ यांना शनिवारी सायंकाळी वीरमरण आलं. रेजिमेंटकडून फोनद्वारे संपर्क साधत गावात प्रवीण शहीद झाल्याची माहिती देण्यात आली.

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतमातेचे दोन जवान शहीद झाले आहेत. या चकमकीत सैन्य दलाच्या जवानांनी चार दहशतवाद्यांचाही खात्मा केला. मात्र, दहशतावाद्यांचा सामना करताना झालेल्या चकमकीत भारतमातेचे दोन जवान शहीद झाले आहेत. त्यामध्ये, अकोला जिल्ह्यातील मराठमोळ्या प्रवीण जंजाळ यांनाही वीरगती प्राप्त झाली. रात्रीच्या सुमारास मोरगाव भाकरे गावात प्रवीण प्रभाकर जंजाळ हे जवान शहीद झाले आहेत, असा निरोप सैन्याच्या रेजिमेंटकडून आला आणि कुटुंबीयांचा आक्रोश सुरू झाला. आपल्या गावचा लेक सीमारेषेवर धारातिर्थी पडल्याचं समजताच गावावर शोककळा पसरली. दहशवाद्यांशी लढताना प्रवीण यांच्या डोक्याला गोळी लागली. रेजिमेंटकडून गावच्या सरपंच उमाताई माळी यांना फोनद्वारे संपर्क साधून ही माहिती देण्यात आली.

4 महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न

प्रवीण जंजाळ हे सेकंड महार रेजिमेंटमध्ये 2020 मध्ये भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते. भरतीनंतर त्यांची पोस्टिंग मणिपूरमध्ये होती, पण 4 महिन्यांपूर्वी सैन्य दलाच्या राष्ट्रीय रायफलच्या क्रमांक एकच्या तुकडीत त्यांना कुलगाम जिल्ह्यात पाठविण्यात आले होते. विशेष म्हणजे नुकतेच 4 महिन्यांपूर्वी ते स्वत:च्या लग्नासाठी गावी आले होते, मोठ्या उत्साहात आणि आनंदात त्याचा विवाहसोहळा संपन्न झाला. मात्र, लग्नाच्या सुट्टीनंतर पुन्हा सीमारेषेवरील कर्तव्य ड्युटीवर ते रुजू झाले ते परतलेच नाहीत. लग्नासाठी गावी दिलेली भेट ही प्रवीण यांची अखेरची भेट ठरली. त्यामुळे, गावात हळहळ व्यक्त होत आहे.  प्रवीण यांचे प्राथमिक शिक्षण गावात तर बारावीपर्यंतचे शिक्षण गायगाव येथे झाले आहे. त्यांच्या शहीद झाल्याचे वृत्त समजताच एकत्र येत, त्यांच्या मित्रांनी प्रवीण यांच्या गावातील शेवटच्या भेटीतील आठवणींनी रात्र जागून काढली. प्रवीण यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे.

प्रवीण यांचे दोन काकाही होते सैन्यदलात

प्रवीण हे सैन्यदलात दाखल झालेले जंजाळ कुटुंबातील तिसरे जवान होते. त्याच्या पूर्वी त्यांचे मोठेबाबा भास्करराव बाजीराव जंजाळ व त्यांचे काका रविंद्र जंजाळ हेही सैन्यदलात होते. भास्करराव यांचे चार वर्षांपूर्वी हृदविकाराने निधन झाले आहे.

नाकाबंदी व शोधमोहीम सुरूच

जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील फ्रिसल चिन्नीगाम भागात नाकाबंदी आणि शोधमोहीम सुरु असताना सैन्य दलाची दहशतावाद्यांशी चकमक झाली. त्यामध्ये भारतीय सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला.तर, दोन भारतीय जवानांना वीरमरण आलं. काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक वी.के. बिरधी यांनीकुलगाम येथे  नाकाबंदी आणि शोधमोहीम सुरु राहील, असं म्हटलं आहे.सुरक्षा दलांना दहशतवाद्यांचे मृतदेह आढळले आहेत.

Source link

YouTube
Instagram
WhatsApp