अकोल्याचा जवान प्रवीण जंजाळला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण, सुरक्षा दलांकडून चार जणांचा खात्मा

अकोल्याचा जवान प्रवीण जंजाळला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण, सुरक्षा दलांकडून चार जणांचा खात्मा


अकोला : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात आज दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झालेत. त्यानंतर सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केले . तर अन्य चार जण लपून बसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवादविरोधी कारवाई सुरू केली होती, त्यानंतर दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. या चकमकीत भारतीय सैन्य दलाचे दोन जवान शहीद झाले. यामध्ये महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील प्रवीण जंजाळ या जवानाचा समावेश आहे. प्रवीण जंजाळ शहीद झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या मोरगाव भाकरे या गावावर शोककळा पसरली आहे.  

जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील फ्रिसल चिन्नीगाम भागात नाकाबंदी आणि शोधमोहीम सुरु असताना सैन्य दलाची दहशतावाद्यांशी चकमक झाली. यामध्ये भारतीय सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला.तर, दोन भारतीय जवानांना वीरमरण आलं. अजून चार दहशतवादी लपून बसल्याची शंका सुरक्षा दलांना आहे. या  घटनेत अकोल्यातील एक जवान शहीद झाला आहे.

अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे गावातील प्रवीण प्रभाकर जंजाळ हे  जवान शहीद झाले आहेत. प्रवीण जंजाळ शहीद झाल्याची माहिती गावापर्यंत पोहोचताच गावात शोककुल वातावरण पसरलं आहे.  

2019 मध्ये प्रवीण जंजाळ हे भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते. त्यांच्या लग्नाला नुकतंच एक वर्ष झालं आहे. त्यांच्या मृत्यूच्या पश्चात पत्नी, आई-वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे.

सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत चार दहशतवाद्यांना मारण्यात आलं आहे. जिथं चकमक झाली तेथील ड्रोन फुटेजनुसार चार मृतदेह आढळन आले. गोळीबार सुरु असल्यानं ते मृतदेह ताब्यात घेण्यात आले नव्हते. चकमक सुरु असून काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक वी.के. बिरधी यांनी नाकाबंदी आणि शोधमोहीम सुरु राहील, असं म्हटलं. 

सुरक्षा दलांना दहशतवाद्यांचे मृतदेह आढळले आहेत. मात्र, चकमक अजून संपलेली नाही. बिरधी यांनी म्हटलं की जम्मू काश्मीर राष्ट्रीय महामार्गाच्या जवळ चकमक झालेली नसून अंतर्गत भागात झालेली आहे.

इतर बातम्या :

Kirit Somiaya : रवींद्र वायकर यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लीन चीट, भाजप नेते किरीट सोमय्यांची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…

Ravindra Waikar: मोठी बातमी! रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट; सर्व गुन्हे मागे

अधिक पाहा..





Source link

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची स्वबळाची चाचपणी; राज्यभरातल्या इच्छुकांकडून मागवलेत अर्ज

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची स्वबळाची चाचपणी; राज्यभरातल्या इच्छुकांकडून मागवलेत अर्ज


Vidhan Parishad Election 2024 मुंबई : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने जवळजवळ सर्वच राजकीय पक्षाने मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) महाविकास आघाडीला राज्यात मिळालेल्या यशानंतर मविआचा (Mahavikas Aghadi) आत्मविश्वास बळावला आहे. अशातच आज मुंबईत  मविआच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत विधान परिषदेच्या निवडणूक संदर्भात चर्चा होण्याचीही शक्यता आहे.

असे असताना अकोल्यात मात्र एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वबळाची चाचपणी करत असल्याची चर्चा आहे. राज्यातील 288 मतदारसंघातील इच्छुकांकडून काँग्रेसने (Congress) अर्ज मागवले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाविकस आघाडीत प्रमुख पक्ष असून देखील आगामी विधानसभेसाठी काँग्रेस प्लॅन बी तयार करत तर नाहीये ना? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय. 

काँग्रेसने मागवले राज्यातील 288 मतदारसंघातील इच्छुकांकडून अर्ज 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसने राज्यातील 288 मतदारसंघातील इच्छुकांकडून अर्ज मागवले असल्याचे समोर आले आहे. 10 जुलैपर्यंत प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात हे अर्ज जमा करण्याचे आवाहन एका परिपत्रकातून करण्यात आले आहे. अर्जासोबत सर्वसाधारण उमेदवारांना पक्षनिधी म्हणून 20 हजाररुपये जमा करावे लागणार आहे. तर अनुसुचित जाती, जमाती आणि महिला उमेदवारांना 10 हजार रूपये भरावे लागणार आहेत. एकीकडे राज्यात महाविकास आघाडीत लढायचं ठरलेलं असतांना काँग्रेसचं ‘प्लॅन बी’ वर काम करणं सुरू केलंय का? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळातू उपस्थित केला जातोय. त्यामुळे आता आगामीकाळात राज्याच्या राजकारणात काय वेगळं वळण लागतं हे पाहणे महातवाचे ठरणार आहे.

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जणांनी उमेदवारी अर्ज

एकीकडे विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. महायुतीकडून (Mahayuti) 9 उमेदवार रिंगणात असून महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) तीन जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे. 12 पैकी एका उमेदवाराने माघार घेतली तरच निवडणूक बिनविरोध झाली असती. मात्र, ही शक्यता जवळ जवळ मावळली आहे. एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडीकडून आपले सर्व उमेदवार जिंकून येणार, असा दावा करण्यात येत असून आता नेमकं कोणत्या एका उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

इतर संबंधित बातम्या :

अधिक पाहा..



Source link

बारशाच्या जेवणातून 28 जणांना विषबाधा, तर अमरावतीत अन्नातून विषबाधा झाल्याने दोन मुलींचा अंत

बारशाच्या जेवणातून 28 जणांना विषबाधा, तर अमरावतीत अन्नातून विषबाधा झाल्याने दोन मुलींचा अंत


Gadchiroli News गडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील रोपीनगट्टा या गावात बारशाच्या जेवणातून 28 जणांना विषबाधा (Food Poisoning) झाल्याची घटना घडली आहे. या घटनेतील बाधितांमध्ये पाच लहान मुलांचा देखील समावेश असल्याची  माहिती समोर आली आहे. सध्या सर्वच पीडितांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मात्र, यात एका मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. तर इतर सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. या घटनेत मांसाहारी जेवणातून विषबाधा झाली असून नेमकं कारण काय याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. या मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

बारशाच्या जेवणातून 28 जणांना विषबाधा

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातल्या रोपीनगट्टा गावात बारशाच्या जेवणातून 28 जणांना विषबाधा झाल्याची घटना उजेडात आली आहे. या गावातील सुरगु टेकाम यांच्या नातीचा नामकरण सोहळा घरी आयोजित करण्यात आला होता. यात मांसाहारी जेवणाचा बेत आखला गेला. पहिली पंगत उठल्यावर लगेच पंधरा मिनिटांनी जेवण केलेल्या व्यक्तींना उलटी आणि मळमळ होऊ लागली. यानंतर अन्य भोजन पंगत थांबवण्यात आली आणि बाधितांना पेंढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्यानंतर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. काही बाधितांना छत्तीसगड राज्यातील नजीकच्या पाखंजूर येथेही हलविण्यात आले आहे. बाधितांमध्ये पाच लहान मुलांचा समावेश आहे. तर यातील एका मुलाची प्रकृती चिंताजनक असून अन्य सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेत कुणीतरी मांसाहारी भोजनात मुद्दाम विष टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

अमरावतीच्या विरुळ रोघें येथे अन्नातून विषबाधा,दोन मुलींचा दुर्दैवी अंत 

अमरावती जिल्ह्यात देखील अशीच एक विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. यात अमरावतीच्या विरुळ रोघें येथे पहाटेच्या सुमारास विषबाधा झाल्याची  धक्कादायक घटना घडली आहे. यात एकाच कुटुंबातील अचानक दोन मुलींची प्रकृती खालावली आणि यात त्यांचा दुर्दैवी अंत झालाय. या घटनेने विरुळ गावात एकच शोककळा पसरली असून गावात सर्वत्र शोकाकुल  वातावरण निर्माण झालय. नंदिनी साव आणि चैताली साव अशी या मृतक मुलींचे नावे आहेत. या घटनेत अन्नातून विषबाधा झाली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. सध्या पोलीस या   या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेमुळे परिसरात मात्र एकच खळबळ उडाली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

अकोल्यात जिल्हा परिषद शाळेचा भोंगळ कारभार, वर्गखोल्या नसल्याने खुल्या मैदानात भरतेय शाळा

अकोल्यात जिल्हा परिषद शाळेचा भोंगळ कारभार, वर्गखोल्या नसल्याने खुल्या मैदानात भरतेय शाळा


Akola News:अकोल्यात जिल्हा प्राथमिक शाळेचा (ZP school Akola) भोंगळ कारभार समोर आला आहे. अकोल्यातील दिग्रस बुद्रुक गावातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत वर्गखोल्या नसल्याने खुल्या मैदानात शाळा भरत आहे. मात्र, इथं विद्यार्थ्यांसोबत काही वेगळच घडत असल्याचे चित्र आहे. झाडाखाली भरत असलेल्या विद्यार्थ्यांच्या बाकांवर विषारी अळ्या पडत असून त्याचा विद्यार्थ्यांना त्रास होत आहे.

जिल्हा परिषदच्या शालेयमध्ये (Primary education Akola) अपेक्षित वर्ग खोल्या नसल्याने येथील शिक्षक काही वर्ग खुल्या मैदानात भरत आहे. झाडाखाली सुरू असलेल्या शालेय विद्यार्थ्यांचे बेंचवर झाडावरील विषारी अळ्या पडत असल्याने विद्यार्थ्यांचा जीविताला धोका असल्याच पालकांच म्हणणं आहे.

दरम्यान, या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वर्गखोल्या बांधण्यात याव्या अन्यथा रास्ता रोको आंदोलन व शाळेला कुलूप ठोकू, असा इशारा विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलाय. शाळेच्या परिसरात असलेल्या झाडावर मोठ्या प्रमाणांत विषारी अळ्यांचा प्रादूर्भाव दिसून येतोय. त्यामुळे पालकांनी मुलांना शाळेतून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

जालन्यातही शाळा मोडकळीस आल्याने पत्र्यावरचे उपोषण चर्चेत

जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यातील दाढेगावच्या जिल्हा परिषद शाळा मोडकळीस आली आहे. यासाठी ग्रामपंचायत सदस्य राजू काकडे याचे पत्र्यावरचे आमरण उपोषणाची चर्चा होत आहे. प्रशासनाने शाळेची दुरुस्ती आणि नवी इमारत बांधून द्यावी यासाठी शाळेच्या जीर्ण व मोडकळीस आलेल्या पत्र्यावर असून शाळेच्या दूरावस्थेकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. परिणामी आता राज्यातील एकूणच जिल्हा परिषदेच्या शाळांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

हेही वाचा:

Jalna News: मोडकळीस आलेल्या शाळेच्या पत्र्यावर 3 दिवसांपासून उपोषण, आंदोलकाची तब्येत खालावली

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..



Source link

लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांची आर्थिक लुट; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर राज्यात कारवाईचे सत्र

लाडकी बहीण योजनेत लाभार्थ्यांची आर्थिक लुट; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर राज्यात कारवाईचे सत्र


Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांसाठी महत्त्वकांशी ठरणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) नोंदणीला 1 जुलैपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्र आणि नोंदणी प्रक्रियेसाठी ग्रामीण भागासह अनेक शहरात महिलांची मोठी झुंबड उडाल्याचे बघायला मिळाले. दरम्यान अनेक ठिकाणी तलाठी आणि संबंधित शासकिय अधिकार्‍यांकडून     लाभार्थी महिलांची आर्थिक लूट केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. या प्रकरणाची दखल घेऊन आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधत याबाबत कारवाईचे आदेश दिले आहे. परिणामी मुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतर अकोला,अमरावतीसह बुलढाण्यात दोषी अधिकार्‍यांवर निलंबनाच्या कारवाईच सत्र सुरू केलं आहे.  

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर राज्यात कारवाईच सत्र

अकोल्यात लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी आलेल्या महिलांकडून पैसे उकळणारा तलाठी राजेश शेळकेला निलंबित करण्यात आलंय. ‘एबीपी माझा’नं यासंदर्भातील वृत्त दाखविलं होतं. अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे यांनी निलंबनाचे आदेश दिले आहेत. राजेश शेळके हे शहरातील मोठी उमरी भागाचे तलाठी आहेत. मोठी उमरी येथील तलाठी कार्यालयात योजनेसाठी नोंदणी सुरू असतांना हा प्रकार घडलाय. दरम्यान, पैसे स्विकारतांनाचे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. परिणामी की कारवाई करण्यात आलीय. अमरावतीनंतर अकोल्यात लाडकी बहीण योजनेत पैसे घेणाऱ्या तलाठ्यावर प्रशासनाने ही कारवाई केलीय. सरकारने दिलेले कारवाईच्या सक्त आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. तर तलाठी शेळकेच्या या निलंबनाच्या  आदेशात एबीपी माझाच्या बातमीचाही उल्लेख करण्यात आला आहे.

अमरावतीत पहिला गुन्हा दाखल

अमरावतीत (Amravati News) लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची लूट करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. वरुड तालुक्यातील सावंगी येथील तलाठी कार्यालयात काल महिलांकडून पैसे घेत असल्याची बातमी एबीपी माझाने सर्वात आधी दाखवली होती. या बातमीची दखल घेत आज अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून तलाठी तुळशीराम कंठाळे यांच्यावर कारवाई करत तडकाफडकी निलंबन  करण्यात आले आहे. मंडळ अधिकारी संजय मिरासे यांच्या फिर्यादीवरून वरुड पोलिसांनी तलाठी तुळशीराम कंठाळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेकरिता तलाठी तुळशीराम कंठाळे यांनी पन्नास रुपये मागितले होते. या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी याबत आदेश देत निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर आता अमरावतीत योजनेतील बहिणीकडून पैसे उकळल्याच्या प्रकरणात राज्यातील पहिला गुन्हा अमरावतीच्या वरुड पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.

बुलढाण्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांचा संवाद

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांशी अरेरावी करणे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदच्या खेर्डा येथील तलाठ्याला भोवले आहे. या गैरप्रकाराची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) दोषी तलाठ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधत याबाबत कारवाईचे आदेश दिले आहे.

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..



Source link

खळबळजनक! अमरावती पाठोपाठ अकोल्यातही तलाठ्याकडून लाडली बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची आर्थिक लूट

खळबळजनक! अमरावती पाठोपाठ अकोल्यातही तलाठ्याकडून लाडली बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची आर्थिक लूट


Ladki Bahin Yojana : महाराष्ट्र शासनाने राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) ही एक जुलैपासून सुरू केलीय. या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया (Offline Application Process) सुरू झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीसाठी 15 जुलै ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे ठिकठिकाणच्या नोंदणी केंद्राबाहेर महिलांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.

अशातच अमरावतीत (Amravati News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची लूट करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून तलाठी तुळशीराम कंठाळे यांच्यावर कारवाई करत तडकाफडकी निलंबन  करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी याबत आदेश देत ही कारवाई केली आहे. अमरावतीतील (Amravati News) हे प्रकरण ताजे असतानाच  आता अमरावती पाठोपाठ अकोल्यात देखील तलाठी पैसे घेत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. राज्य सरकारनं महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा केलीये. त्यानंतर राज्यात या योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिला तलाठी कार्यालयासमोर मोठी गर्दी करत आहेत. 

अमरावती पाठोपाठ अकोल्यातही लाभार्थ्यांची आर्थिक लूट

यादरम्यान या योजनेचे अर्ज भरताना महिलांची आर्थिक लूट होत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर येत आहे. अकोल्यातून देखील काही व्हिडीओ समोर आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता अमरावती प्रमाणेच अकोल्यात देखील कारवाईचा बडगा उगारला जातो का? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. 

लाडकी बहीण योजनेसाठी उत्पन्नाचा दाखला अपेक्षित असून उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी पटवारीचा दाखला देखील तितकाचं महत्वाचा असतो. त्यासाठी अकोल्यातल्या मोठी उमरी भागातल्या एका तलाठी कार्यालयावर महिलांची प्रचंड गर्दी झाली आहे. या दरम्यान तलाठी चक्क पटवारीचा दाखला देण्यासाठी महिलांकडून 30 रुपयांपासून ते 60 रुपयांपर्यंत शुल्क आकारत आहेत. मोठी उमरीतल्या तलाठी कार्यालयातील आज सायंकाळी 4 वाजताच्या सुमाराचा हा प्रकार समोर आला आहे. त्यामूळे आता अमरावती पाठोपाठ अकोल्यात देखील तलाठी पैसे घेतानाचा हा व्हिडिओ समोर येतो आहे.दरम्यान, या प्रकारामुळे राज्याच्या अनेक भागात लाडकी बहिण योजनेखाली महिलांची लूट सुरू असल्याचं सर्रासपणे दिसून येत आहे.

सेतू सुविधा केंद्रात महिलांची गर्दी

शासनाने नेव्याने सुरू केलंल्या माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत अर्ज भरण्यासाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. त्या अनुषंगाने अधिवास आणि उत्पन्नचा दाखला काढण्यासाठी महिलांची सेतू केंद्रात मोठी गर्दी केल्याचे चित्र सकाळपासून पहावयास मिळत आहे. यातही लाडकी बहिण याची साईट बंद आहे, तर सेतू केंद्राचे सर्व्हर डाऊन असल्याने अर्ज घेण्यास महिलांना दीड ते दोन तास  लागत आहे. अधिवास दाखवण्यासाठी महिलांना जन्मचा दाखल्याची अट असल्याने अनेक महिलांना अडचण निर्माण झाली आहे. अशातच या योजनाचा कालावधी हा 15 दिवसाचा आहे. त्यामुळे योजनेतील अटी शिथिल करून योजनेचा कालावधी वाढवावा, अशी मागणी महिला करीत आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांच्या वयामध्ये शिथिलता कऱण्यात आली आहे. वयोमर्यादा आता 5 वर्षांनी वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता 65 वर्षांपर्यंतच्या महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. याआधी 21 ते 60 वर्षापर्यंतच्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार होता. पण आता ही मर्यादा 65 वर्षांपर्यंत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री जाहीर केला आहे. त्याशिवाय ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नव्हता. परंतु, ही जमिनीची अटही आता शिथिल करण्यात आली आहे. जमिनीच्या मालकीची अट काढण्यात आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..



Source link

YouTube
Instagram
WhatsApp