नाशिक कुंभमेळ्याचा नामकरणावरुन मोठा वाद! पहिलं नाव कुणाचं यावरुन महंतांमध्ये जुंपली
नाशिकच्या कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरु असतानाच आता नामकरणावरुन मोठा वाद झाला आहे. पहिलं नाव कुणाचं यावरुन महंतांमध्ये जुंपली आहे.
Source link
नाशिकच्या कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरु असतानाच आता नामकरणावरुन मोठा वाद झाला आहे. पहिलं नाव कुणाचं यावरुन महंतांमध्ये जुंपली आहे.
Source link
Raj Thackeray Gudi Padwa Melava 2025: गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्तानं शिवाजी पार्कमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्याची जोरदार तयारी सुरु असतानाच मनसेच्या एका पोस्टरने सर्वाचेचं लक्ष वेधून घेतले आहे. मनसेच्या गुढीपाडावा मेळाव्याच्या पोस्टरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो झळकला आहे. बाळासाहेबांबरोबरच प्रबोधनकार ठाकरेंसहीत राज ठाकरे आणि अमित ठाकरेंचाही फोटो या पोस्टरवर आहे. मनसेच्या पोस्टरवर अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच बाळासाहेबांचा फोटो झळकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शिवसेनेतून राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी, “माझा फोटो वापरायचा नाही”, असे सांगितल्यानंतर आतापर्यंत मनसेने बाळासाहेबांचा फोटो वापरला नव्हता. मात्र आता मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्याच्या निमित्तानं शिवाजी पार्कात लागलेल्या पोस्टरवर बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार यांचे फोटो लावण्यात आले आहेत.
बाळासाहेब ठाकरे यांचे नाव थोर व्यक्तींच्या यादीत राज्य सरकारने समाविष्ट केले आहे. त्यामुळं त्यांचा फोटो कुणालाही वापरता येवू शकतो, असा युक्तीवाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नुकताच केला होता. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली पक्षात फूट पडल्यानंतरपासून सातत्याने बाळासाहेबांचा फोटो वापरत आले आहेत. एकनाथ शिंदेंसहीत त्यांचा पक्ष बाळासाहेबांचा फोटो वापरतो. आता बाळासाहेबांचा फोटो वापरणाऱ्या पक्षांमध्ये आता मनसेचीही भर पडली. त्यामुळे आता तीन पक्ष बाळासाहेबांचे फोटो वापरू लागले आहेत.
उद्धव ठाकरेंना पत्रकारपरिषदेमध्ये मनसेनं बाळासाहेबांचा फोटो वापरल्यासंदर्भात विचारण्यात आलं. यावर उद्धव ठाकरेंनी, “आता सगळ्यांना कळतंय की बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही. आता सगळेच पक्ष बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरत आहेत. त्यांना कळलं आहे की याशिवाय आता पर्याय नाही,” अशी प्रतिक्रिया नोंदवली.
दरम्यान, मनसेचे पदाधिकारी यशवंत किल्लेदार यांनी या बॅनरवरुन स्पष्टीकरण दिले आहे. “ज्याने बॅनर लावला तो पक्षाचा सुरुवातीपासूनच कार्यकर्ता आहे. भावनेच्याभरात त्याने हे बॅनर्स लावले. बॅनर्स काढण्यात येतील,” असं किल्लेदार यांनी म्हटलं आहे. तसेच, “सध्या या बॅनर्सची फक्त मिडिया मध्ये चर्चा सुरू आहे. “ज्या तरुण कार्यकर्त्याने ही बॅनर लावले त्याच्याशी मी बोललो. संदीप देशपांडे आणि इतर नेत्यांनी देखील त्याच्याशी संवाद साधला आहे. हे बॅनर काढले जातील,” असं किल्लेदार यांनी स्पष्ट केलं आहे. मुनाफ ठाकूर नावाच्या कार्यकर्त्याने हे बॅनर्स लावले होते.
राज ठाकरे यांनी 27 नोव्हेंबर 2005 रोजी शिवसेनेचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी तेव्हाच नवीन राजकीय पक्ष सुरू करण्याचा त्यांचा इरादा जाहीर केला. 9 मार्च 2006 रोजी मुंबईत ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. तेव्हापासून त्यांनी कधीच बाळासाहेबांचा फोटो पोस्टर अथवा बॅनर्सवर वापरलेला नाही.
भिकारी पाहिला की आपल्याला दया येते. लगेच आपण दहा वीस रूपये त्याच्या हातावर टेकवतो आणि पुढे होतो.. पण आता असं करण्यापूर्वी विचार करा.. नाहीतर तुमची फसगत होऊ शकते… कारण अनेकांचा मासिक पगारही नसेल इतके पैसे एक भिकारी महिन्याला भीक मागून कमावतो. आपल्या महाराष्ट्रात आहे भारतातीलच नाही संपूर्ण जगातील सर्वात श्रीमंत भिकारी जाणून घेऊया या भिकाऱ्याविषयी.
Source link
No match is being played.
Mar 25, 2025 | Match 5
Indian Premier League, 2025
|
PBKS (20 ov) 243/5 |
VS |
GT 232/5(20 ov) |
| Punjab Kings beat Gujarat Titans by 11 runs | ||
| Full Scorecard → | ||
Mar 24, 2025 | Match 4
Indian Premier League, 2025
|
LSG (20 ov) 209/8 |
VS |
DC 211/9(19.3 ov) |
| Delhi Capitals beat Lucknow Super Giants by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
Mar 23, 2025 | Match 3
Indian Premier League, 2025
|
MI (20 ov) 155/9 |
VS |
CSK 158/6(19.1 ov) |
| Chennai Super Kings beat Mumbai Indians by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
अधिवेशन संपत आलं तरी विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेत्याची निवड केलेली नाही
Source link
Uddhav Thackeray Shivsena On CM Devendra Fadnavis: “नागपुरातील दंगलखोरांना सोडणार नाही व त्यांच्याकडूनच नुकसानभरपाई वसूल करू, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मात्र दंगलखोरांवर कारवाई करणार म्हणजे ते नक्की काय करणार? खरे दंगलखोर फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत व कारवाईचा बडगा सगळ्यात आधी त्यांच्यावरच उगारला जायला हवा. औरंगजेबाची कबर तोडण्यासाठी चिथावणी देणारे मंत्री महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आहेत. हे मंत्री, भाजपचे आमदार, मिंधे गटातील बाटगे हिंदुत्ववादी यांनी महाराष्ट्राचे वातावरण बिघडवले व त्यातून नागपुरात दंगलीची ठिणगी पडली,” असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
“खोटे नरेटिव्ह निर्माण करायचे व लोकांत गोंधळ उडवायचा हे भाजप आणि त्यांच्या लोकांचे धोरण आहे. पाच वर्षांपूर्वी सुशांतसिंह राजपूत या अभिनेत्याने आत्महत्या केली. या आत्महत्येस ‘हत्या’, ‘खून’ वगैरे ठरवून भाजपवाल्यांनीच मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात रिया चक्रवर्ती भरडली गेली. तिच्यावर ठपका ठेवून तुरुंगात ढकलले. आता सीबीआयने सुशांतसिंह प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर केला. या प्रकरणात संशयास्पद असे काहीच आढळले नसल्याचे सीबीआयने त्यांच्या अहवालात म्हटले व रिया चक्रवर्तीला क्लीन चिट दिली, पण मग रिया चक्रवर्तीला आरोपीच्या पिंजऱ्यात ढकलून जी बदनामी केली गेली, तुरुंगवास भोगायला लावला त्याची भरपाई कोणी करायची? येथेही सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात गुन्हे दाखल करणे, याचिका दाखल करणे वगैरे प्रकार केले, पण त्यापेक्षाही भयंकर प्रकार भाजप व त्याच्या भाडोत्र्यांनी केले,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.
“कंगना राणावतसारख्यांना तर मुंबईत राहणे म्हणजे पाकिस्तानात राहण्यासारखे भासत होते. मग आता सीबीआयने सुशांतसिंह प्रकरणात घेतलेल्या भूमिकेवर त्यांना काय वाटते? दंगलखोरांना सोडणार नाही असे मुख्यमंत्री म्हणतात. तसे या ‘फेकाड्या’ लोकांनाही सोडू नका. महाराष्ट्राचे समाजजीवन खतम करण्याचे काम या लोकांनी चालवले आहे. औरंगजेब, सुशांतसिंह राजपूत, दिशा सालियन या मृतांचा बाजार भरवून राजकारण करण्याचा षंढपणा वाढला आहे. मुख्यमंत्री चिंता व्यक्त करतात की, नागपूरच्या दंगलीवरून राजकारण होत आहे? मुख्यमंत्री महोदय, राजकारण नक्की कोण करत आहे आणि दंगलीच्या आगीत तेल कोण टाकत आहे? याचा शोध खरेच घेतला तर सत्य समोर येईल,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
“मुख्यमंत्र्यांनी पुढे जाहीर केले की, जे कोणी देशभक्त आहेत त्यांना हात लावला जात असेल तर सहन केले जाणार नाही. जे कोणी कायदा हातात घेतील, पोलिसांवर हात टाकतील त्यांना सोडणार नाही. मुख्यमंत्र्यांची भूमिका कठोर आहे, पण देशभक्त कोण व देशद्रोही कोण हे ठरवायचे कोणी? औरंग्याची कबर तोडा असे सांगणारे तुमच्याच मंत्रिमंडळात आहेत. देशभक्तीचे प्रमाणपत्र हेच लोक देणार व दंगलींना प्रोत्साहनही तेच देणार हे कसे चालेल?” असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.
“नागपूरचा हिंसाचार ही महाराष्ट्रात मोठ्या दंगली घडवण्याची पूर्वतयारी आहे. लोकांची माथी भडकवणे व हिंसाचार करणे शक्य आहे याची राजकीय चाचपणी नागपुरात झाली. दंगलीचे रॉकेट यशस्वीपणे उडाल्यावर मुख्यमंत्री म्हणतात, ‘‘दंगलखोरांना सोडणार नाही,’’ मात्र जे दंगलखोर मंत्रिमंडळात बसून मुख्यमंत्र्यांना, कायद्याला आव्हान देतात, ‘‘मुख्यमंत्र्यांचा आम्हाला पाठिंबा आहे. आम्ही हवा तसा धुडगूस घालू, आगी लावू, आमचे कोण काय वाकडे करणार?’’ असे उघडपणे बोलतात त्यांचे काय? त्यांच्याकडे दुर्लक्ष करून वर मुख्यमंत्री शहाजोगपणे सांगतात की, दंगलखोरांना सोडणार नाही. खरे तर दंगलखोरांना न सोडण्याची कारवाई मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या कॅबिनेटपासून सुरू करायला हवी,” असा खोचक सल्ला ठाकरेंच्या सेनेनं दिला आहे.
“धनंजय मुंडे यांच्या लोकांनी बीड जिल्ह्यात गुंडगिरी आणि दडपशाहीचा उत्पात माजवला व त्यातून खून, खंडण्यांचे गुन्हे वाढले. मुख्यमंत्र्यांना मुंडेंवरील कारवाईबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले तर त्यांनी उत्तर काय दिले? “उगाच हवेत तीर मारू नका. धनंजय मुंडेंविरोधात काही पुरावे असतील तर घेऊन या. कारवाई करतो,’’ असे ते म्हणाले. म्हणजे पोलीस काहीच करणार नाहीत. खून पडल्यावर आवाज जनतेने उठवायचा आणि पुरावेही जनतेनेच गोळा करून द्यायचे. मग तुम्ही खुर्च्या उबवताय कशाला? अदानीसारख्यांची संपत्ती वाढवायला?” असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.
“राज्यात सरकारात आणि सरकारबाहेर वाढलेल्या दंगेखोरीवर कारवाई करण्याऐवजी त्याकडे डोळेझाक करणे हेच सरकारी धोरण आहे. भ्रष्टाचारावर कारवाई नाही आणि दंगलखोरांवरही कारवाई नाही. सगळाच वरवरचा मामला. राज्याचे मुख्यमंत्री दंगलीचे गुन्हेगार काखेत घेऊन फिरत आहेत आणि पुन्हा सांगत आहेत की, दंगलखोरांवर कारवाई करू. चोर घरातच आहे आणि मालक बाहेर उगाच बोभाटा करीत आहे. दंगली भडकवणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करणार नसाल तर तुमची ही ‘सोडणार नाही’ची भाषा निरर्थक आहे,” असं म्हणत ठाकरेंच्या सेनेनं फडणवीसांना सुनावलं आहे.