मोदींकडून राज ठाकरेंचं कौतुक! महायुतीच्या आमदारांना म्हणाले, 'दुस-या राज्यात किंवा…'

मोदींकडून राज ठाकरेंचं कौतुक! महायुतीच्या आमदारांना म्हणाले, 'दुस-या राज्यात किंवा…'


PM Modi Praises Raj Thackeray: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी एक दिवसीय दौऱ्यादरम्यान महायुतीच्या आमदारांशी संवाद साधला. या बैठकीमध्ये मोदींनी आमदारांना काही महत्त्वाचे सल्ले दिले. याच वेळेस बोलताना मोदींनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंचा उल्लेख करत त्यांचं कौतुक महायुतीच्या आमदारांसमोर केलं. नेमकं मोदींनी राज ठाकरेंबद्दल कशासंदर्भात आणि काय म्हटलं जाणून घेऊयात…

मोदी काय म्हणाले?

लोकप्रतिनिधींनी नेमकं कसं काम करायला हवं? या संदर्भात मार्गदर्शक मोदींनी बैठकीत केलं. राजकीय जीवनातील आपले काही अनुभव सुद्धा मोदींनी आमदारांसमोर मांडले. सामान्यातल्या सामान्य माणसाचं काम लोकप्रतिनिधी केलं पाहिजे, सामान्य कार्यकर्ता म्हणून आपण जनसामान्यात वावरुन त्यांची काम केली पाहिजेत, असंही मोदी म्हणाले. सरकारमध्ये महायुतीतील पक्षांनी एकमेकांमध्ये समन्वय पाळला पाहिजे, अशी अपेक्षा पंतप्रधांनी व्यक्त केली. केंद्र आणि राज्य सरकारच्या सरकारी योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा त्यांचा लाभ त्यांना द्या, या काही सूचना सुद्धा मोदींनी आमदारांशी बोलताना केल्या.

मोदींनी आमदारांना काय सल्ला दिला?

पंतप्रधान मोदींनी विधानसभेच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच प्रत्यक्षपणे आमदारांशी संवाद साधताना त्यांना, “जनतेपर्यंत पोहोचा, जनसंपर्क वाढवा” असा सल्ला दिला. तसेच महायुतीमधील आमदारांना सल्ला देताना मोदींनी, “एकमेकांविषयी द्वेषभाव ठेवू नका. महायुती म्हणून काम करतांना समन्वय ठेवा,” असं आवाहन केलं. तसेच पुढे बोलताना, “लोकप्रतिनीधींनी आरोग्याकडेही लक्ष द्यायला हवं. नियमीत योगासने करा. कुटुंबाकडे लक्ष द्या. घरातील पत्नी- मुलेमुली यांकडेही लक्ष द्या,” असंही पंतप्रधान म्हणाले.

100% मतदान कसं होईल यासाठी…

त्याचप्रमाणे मोदींनी सर्व आमदारांना, जास्तीत जास्त धार्मिक कार्यक्रम घेण्याचा सल्ला दिला. तसेच, “अधिकाधिक वेळ जनतेत घालवा. जनतेशी सातत्याने संपर्कात राहा. ज्या व्यक्तींनी, घटकांनी मतदान केले नाही त्यांना देखील प्राधान्याने महत्त्व द्या. त्यांची ही काम प्राधान्याने करा. 100% मतदान कसं होईल यासाठी अधिकाधिक लोकोपयोगी कामे करा,” असंही मोदींनी आमदारांना सांगितलं. “विरोधकांशी द्वेषपूर्ण वागणूक टाळा,” असंही पंतप्रधान म्हणाले. 

राज ठाकरेंचं कौतुक

महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन करताना मोदींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नावाचा उल्लेख केला. “दुस-या राज्यात किंवा मतदारसंघात एखादी गोष्ट चांगली असेल तर त्याबाबत अभ्यासदौरा करा,” असा सल्ला पंतप्रधान मोदींनी भाषणादरम्यान महायुतीच्या आमदारांना दिला. यावेळी मोदींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुजरात दौ-यावर आले होते त्याचं उदाहरण उपस्थित आमदारांना देत राज ठाकरेंचं कौतुक केलं. 

मोदी पालक स्वरुपात

पंतप्रधान मोदी आज पालक स्वरुपात होते. महायुती आजच्या भेटीनं अधिक मजबुत झाली आहे. पंतप्रधान मोदींचं बोलणं ऐकुन आज मंत्रमुग्ध झालो. मोदी बोलत राहावेत आणि आम्ही ऐकत रहावं असं वाटत होतं. जनसेवेचा वसा घेऊन जनसंपर्क वाढवा हा सल्ला त्यांनी दिला. पुढे जाताना घराकडेही लक्ष द्या अशा सूचना त्यांनी केल्या. दिनचर्या कशी असावी, आरोग्य कसं राहावं याबाबत मार्गदर्शन केलं,” असं भाजपाच्या विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी या बैठकीनंतर म्हटलं. 

प्रचंड ऊर्जा घेऊन निघालो

“मोदीजींनी आम्हाला आमची दिनचर्या विचारली. त्यात कुटुंबाला कधी वेळ देतात ते विचारले. त्यांनी आम्हाला योग आणि आरोग्याचे महत्व सांगितले. आजचा अनुभव अविस्मरणीय होता. महायुती भक्कम आहे हे आजच्या बैठकीतून अधोरेखित झालं आहे. जनसंपर्क कसा वाढवावा हे मोदींनी सांगितले. मोदींनी स्वत: कश्या पद्धतीनं संघर्ष केला हे सांगितले. आज प्रचंड ऊर्जा घेऊन निघालो आहोत,” अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि मंत्री संजय शिरसाठ यांनी बैठकीनंतर नोंदवली.





Source link

Walmik Karad Wife Statement : वाल्मिक कराडच्या पत्नीच्या नव्या आरोपानं खळबळ, 'सुरेश धस, बजरंग सोनवणेंच्या भानगडी…'

Walmik Karad Wife Statement : वाल्मिक कराडच्या पत्नीच्या नव्या आरोपानं खळबळ, 'सुरेश धस, बजरंग सोनवणेंच्या भानगडी…'



Walmik Karad Wife Statement : वाल्मिक कराड याच्यावर मकोका दाखल केल्यानंतर कराडच्या पत्नी या आक्रमक झाल्या आहेत. सुरेश धस, बजरंग सोनावणेसह अनेकांवर वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराडने गंभीर आरोप केले आहेत. 



Source link

महाराष्ट्रातील सर्वात पावरफुल महाराणी चांद बीबी! अहमदनगरमध्ये एका रात्रीत थेट मुलघांना मोठे चॅलेंज दिले

महाराष्ट्रातील सर्वात पावरफुल महाराणी चांद बीबी! अहमदनगरमध्ये एका रात्रीत थेट मुलघांना मोठे चॅलेंज दिले


पुढील
बातमी

शरद पवार अमित शहांबद्दल असं म्हणाले तरी काय? भाजपने थेट लवासाची फाईल काढू असा इशारा दिला





Source link

बीडचं पालकमंत्रीपद घेणार का? अजित पवारांनी अखेर सांगून टाकलं, म्हणाले '19 जानेवारीला…'

बीडचं पालकमंत्रीपद घेणार का? अजित पवारांनी अखेर सांगून टाकलं, म्हणाले '19 जानेवारीला…'


Ajit Pawar on Beed Guardin Minister: बीडमधील संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder) प्रकरणानंतर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं अशी मागणी होत आहे. मात्र अद्याप पालकमंत्रीपदासंबंधी अधिकृत निर्णय झालेला नाही. मात्र आता 19 जानेवारीच्या आधी पालकमंत्रीपदाबाबत निर्णय होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. तसंच जे दोषी असतील त्या सर्वांवर कारवाई केली जाईल अशी माहिती दिली आहे. प्रसारमाध्यमांसी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. 

“एक महिना उलटून गेला असल्याने कुटुंब चिंतेत आहे. पोलीस त्यांचं काम करत आहेत. सीआयडी, एसआयटी तपास करत आहे. न्यायाधीशांच्या मार्फतही चौकशी केली जात आहे. दोषींना थारा द्यायचा नाही अशी भूमिका आहे. ही निर्घृण हत्या आहे. कोणीही दोषी असेल तर त्यांचे धागेदोरे, चौकशीत मिळाले तर कारवाई केली जाणार आहे. राज्याचे प्रमुख आणि एकनाथ शिंदे यांनीही हे संगितलं आहे. ही अतिशत निर्घृणण आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे,” असं अजित पवार म्हणाले आहेत. 

Santosh Deshmukh Murder: वाल्मिक कराडवर मकोका, आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी

“कोणालाही थारा दिला जाणार नाही. चांगले एसपी पाठवले आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जे वाटेल ते करण्याचा अधिकार त्यांना दिला आहे,” असंही ते म्हणाले. दरम्यान बीडतं पालकमंत्रीपद घेणार का? असं विचारलं असता ते म्हणाले, ‘पालकमंत्रीपद विभागाचं वाटप हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय असतो. निवडणुका झाल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार, खातेवाटप, पालकमंत्रीपदासाठी वेळ लागला हे खरं आहे. उद्या पंतप्रधान येणार आहेत. उशिरापर्यंत त्यांचे कार्यक्रम आहेत, सर्व आमदारांना ते भेटणार आहेत. मुख्यमंत्री दिवसभर व्यग्र असतील. त्यात 19 तारखेला दावोसला जाणार आहेत, त्याच्या आधी पालतमंत्रीपदाच्या जाबदाऱ्या वेगवेगळ्या मंत्र्यांना देतील”. 

वाल्मिकला पोलीस कोठडी का दिली नाही? वकिलाने सांगितलं कारण, म्हणाले ‘पुन्हा तेच 10 मुद्दे…’

 

जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री सांगितल्याप्रमाणे कारवाई करत आहेत असं ते म्हणाले. 

हार्वेस्टर अनुदानात घोटाळ्यात धनंजय मुडे यांच्या जवळच्या वाल्मिक कराडने शेतकऱ्यांकडून पैसे घेतले असल्याच्या आरोपाविषयी विचारलं असता अजित पवार म्हणाले की, “जे आरोप झाले आहेत त्याची चौकशी केली जाईल आणि दोषीवर कारवाई केली जाईल. माझ्या इतक्या वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी कधीही जात, पातीचा विचार केलेला नाही. प्रत्येकाने आपली जाबबदारी पार पाडली पाहिजे. अजून तपास सुरु आहे. जर लाच द्यावी लागली असेल तर पुरावा द्या आणि चौकशी करु आणि दोषींना शासन करु”.





Source link

मुंबईत ‘आरटीई’चे फॉर्म निघाले; आठवी पर्यंत मोफत शिक्षण; पालकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

मुंबईत ‘आरटीई’चे फॉर्म निघाले; आठवी पर्यंत मोफत शिक्षण; पालकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी



RTE Form Date 2025 : सन २०२५ -२६ या शैक्षणिक वर्षाची आर.टी.ई. २५ टक्के प्रवेश प्रक्रिया  १४ जानेवारी २०२५ पासून सुरू होणार Eus. 
बृहन्मुंबई परीक्षेत्रातील ३२७ शाळांमध्ये ६ हजार ५३ जागा उपलब्ध आहेत. 
 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp