Maharashtra Weather News : थंडीतही पावसाचीच सरशी; राज्याच्या कोणत्या भागांवर ढगाळ वातावरणाचं सावट?

Maharashtra Weather News : थंडीतही पावसाचीच सरशी; राज्याच्या कोणत्या भागांवर ढगाळ वातावरणाचं सावट?


पुढील
बातमी

उद्धव ठाकरेंची भेट, मुखपत्रातून कौतुक; आता आदित्य ठाकरेंनी घेतली भेट, शिवसेना आणि भाजप युतीबाबतच्या चर्चांना उधाण





Source link

महाराष्ट्राच्या मातीतील कंपनीची रशियात क्रेझ; तुम्हीही नक्कीच वापरला असेल हा प्रोडक्ट

महाराष्ट्राच्या मातीतील कंपनीची रशियात क्रेझ; तुम्हीही नक्कीच वापरला असेल हा प्रोडक्ट


Maharashtra Russia Connection : जगाच्या पाठीवर रशिया हा देश सध्या विविध कारणांनी चर्चेचा विषय ठरतोय. युक्रेनसोबत सुरू असणारं युद्ध असो किंवा मग अगदी जन्मदरवाढीसाठी या देशात सुरू असणारे प्रयत्न असो. रशियाची ही अशी चर्चा सुरू असतानाच आता याच देशाशी एका वेगळ्या आणि काहीशा खास कारणानं असणारं महाराष्ट्राचं कनेक्शनही नुकतंच समोर आलं आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे व्हायरल होणारं एक Reel. 

सोशल मीडियावर दर दिवशी कैक रील व्हायरल होत असतात. पण, vaicharikkida या पेजवर एका मुलाखतीतील दर्जेदार माहितीचा तुकडा शेअर करत काही सेकंदांमध्ये सर्वांचं लक्ष वेधण्यात आलं आहे. ही माहिती आहे एका अशा प्रोडक्टची, जिचा वापर इथं तर अनेकजण करतात. पण, सातासमुद्रापार रशियातही या प्रोडक्टला कमालीची लोकप्रियता आहे. 

हे प्रोडक्ट म्हणजे मराठमोळ्या व्यक्तीनं सुरू केलेलं कैलास जीवन. बहुविध कारणांसाठी वापरात येणारं कैलास जीवन हे मलम अगदी रशियामध्येही मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. खुद्द कैलास जीवनचे संचालक परेश कोल्हटकर, यांनी vaicharikkida शी संवाद साधताना याबाबतच्या माहितीवरून पडदा उचलला. 

रशियामध्ये कैलास जीवन इतकं फेमस का? 

कोल्हटकर याविषयी माहिती देत म्हणाले, ‘गोव्यात ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात जवळपास 70 टक्के रशियन पर्यटक भेट देतात. तिथं रशियन पाट्याही दिसतात. इतकंच काय तर, हॉटेलांमध्ये रशियन नॉवेलही दिसतात. याचं निरीक्षण केल्यानंतर कंपनीनंरशियन भाषेतील पॅम्प्लेट काढले.’

कोल्हटकर यांच्या माहितीनुसार त्यांचा पोलिश वितरक (Polish Distributer) गोव्यात राहतो. रशियात हे ट्रेडमार्क रजिस्टर, तिथं त्यांचा एक इंपोर्टरही आहे जो 8 -10 उत्पादनं खास भारतातून मागवतो. एकदा तिथं तो एक जागा भाडेतत्त्वावर घेण्यासाठी म्हणून गेला. जागा देणाऱ्या व्यक्तीनं ती नेमकी कशासाठी हवी आहे, याबाबतचा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर आपल्याला कैलास जीवन मागवायचं आहे, असं खरं कारण वितरकांनी सांगितलं. कारण करताच त्या माणसानं आपण  ही जागा 10000 रुबल कमी घेऊन भाड्यानं द्यायला तयार आहोत असं थेट सांगितलंय. वितरकांनं यामागचं कारण विचारलं असता, ‘मी गेली 30 वर्ष कैलास जीवन वापरतोय, तू चांगलं प्रोडक्ट आणतोयस’ असं म्हटलं. 

रशियामधील ही लोकप्रियता हीच या प्रोडक्टची ताकद आहे असं सांगत कोल्हटकर यांनी कौतुकानं हे रशिया कनेक्शन जगापुढे आणलं. सध्या कैलास जीवनच्या रशिया कनेक्शनवरून पडदा उचलणारा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनाही ही बाब कौतुकास्पट वाटतेय असं म्हणायला हरकत नाही. 





Source link

बारावी, पदवीधरांना CBSE मध्ये नोकरी मिळवण्याची संधी, पगारही भरमसाठ; जाणून घ्या तपशील

बारावी, पदवीधरांना CBSE मध्ये नोकरी मिळवण्याची संधी, पगारही भरमसाठ; जाणून घ्या तपशील


CBSE Recruitment 2025: बारावी किंवा पदवीधर असून चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जारी करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.  

CBSE अंतर्गत अधीक्षक आणि कनिष्ठ सहाय्यक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. येथे काम करू इच्छिणारे कोणीही CBSE च्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. CBSE च्या या भरतीद्वारे एकूण 212 पदांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये अधीक्षक पदाच्या 142 आणि कनिष्ठ सहायकाच्या 70 पदांचा समावेश आहे. अधीक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय 30 वर्षे असावे. कनिष्ठ सहाय्यक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल 27 वर्षे असावे.

कोण करु शकतो अर्ज?

अधीक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. उमेदवाराला विंडोज, एमएस ऑफिस, मोठा डेटाबेस, इंटरनेट असे संगणक आणि त्याच्या ऍप्लिकेशन्सचे ज्ञान असणे आवश्यक आहे.कनिष्ठ सहाय्यक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून इयत्ता बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कॉम्प्युटरवर इंग्रजीमध्ये 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये 30 शब्द प्रति मिनिट टायपिंगचा वेग असणे आवश्यक आहे.अधीक्षक आणि ज्युनिअर असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या अनारक्षित/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून 800 रुपये अर्ज शुल्क घेण्यात येणार आहे.  एससी/एसटी/पीडब्ल्यूबीडी/महिला/माजी सैनिक/विभागीय उमेदवारांना अर्जातून सवलत देण्यात आली आहे. 

किती मिळेल पगार?

अधीक्षक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना स्तर-6 अंतर्गत वेतन दिले जाईल. ज्युनिअर असिस्टंटसाठी पगार लेव्हल-2 द्वारे दिला जाईल.

अर्जाची शेवटची तारीख

प्राथमिक तपासणी चाचणी (OMR आधारित),मुख्य परीक्षा (वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक प्रकार) आणि टायपिंग चाचणीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यासाठी अर्ज करणारे इच्छुक उमेदवार 31 जानेवारी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्या.

पदभरतीचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा





Source link

Exclusive : वाल्मिक कराड नोकर ते परळीचा बेताज बादशाह! झी 24 तासाचा ग्राऊंड रिपोर्ट

Exclusive : वाल्मिक कराड नोकर ते परळीचा बेताज बादशाह! झी 24 तासाचा ग्राऊंड रिपोर्ट


Mafia Raaj Zee 24 Taas Ground Report Part 2 (विशाल करोळे, झी 24 तास परळी) : आधीच बीड हा जिल्हा राजकीय जाणिवा जागृत असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. बीड जिल्ह्यात कायम वर्गसंघर्ष कायम राहिला. ऊसतोड कामगारांचं शोषण होत राहिलं. गरिबी, दारिद्रात खितपत पडलेल्या समाजातून काहीजण पुढं येतात. पण त्याचा लोकशाहीपेक्षा ठोकशाहीवर जास्त विश्वास… त्यामुळंच वाल्मिक कराडसारखे गुंड इथल्या तरुणाईचे आदर्श झालेत. वाल्मिक कराड हा मुंडेंचा नोकर होता. नोकर ते परळीचा बेताज बादशाह असा त्याचा प्रवास हेवा वाटणारा वाटतो. त्यातूनच गल्लोगल्ली माफिया तयार झालेत. वाल्मिक कराडसारखा गुंड तरुणांना देव वाटू लागलाय. वाल्मिक फरार झाल्यानंतर रिल्सबाज टपराट गुंड वाल्मिकचं महिमामंडन करणा-या रिल्सचा रतिब सोशल मीडियावर घालतायते. आप्पा नाना, अण्णा काका अशी नावापुढं बिरुदं लावलेले गुंड गल्लोगल्ली फिरतायत. बीडचं राजकीय गुन्हेगारीकरण भयंकर वेगानं होऊ लागलंय.

बीडच्या राजकीय गुन्हेगारीबाबत आता सामान्य लोकंही बोलू लागलेत. राजकीय पक्षाचा विनयशील कार्यकर्ताच बीड, परळीत दुर्मिळ झालाय. गुंडाची फौज पदरी बाळगणारे नेते जिल्ह्यात तयार झालेत. सामान्यांशी अदबीनं, सन्मानानं बोलणारा कार्यकर्त्याच दिसत नाही. शिवराळ कार्यकर्त्यांच्या फौजाच बीडमध्ये फिरत असल्याचं स्थानिक सांगतात.

 

 

बीडमध्ये गेल्या काही वर्षांत जमिनीला सोन्याचा भाव आलाय. सातबारा रिकामा करवून घेणाऱ्या टोळ्यांचा जन्म झालाय. शासकीय प्रकल्पांसाठी अधीग्रहण होणाऱ्या जमिनींबाबत सरकार दरबारी असलेल्या बाबूंकडून आणि नेत्यांकडून माहिती मिळते. मग त्या माहितीच्या आधारे जमिनी जबरदस्तीनं विकत घेतल्या जातात. सुरुवातीला प्रेमानं नाही ऐकला तर पिस्तूलाची नळी कानाला लावून व्यवहार केले जातात. जमीन दे नाहीतर खल्लास अशी परिस्थिती बीडची आहे.

बेकायदा धंद्यातून बीडमध्ये पैसाच पैसा अशी स्थिती आहे. झटपट हातात आलेल्या पैशातून बीड जिल्ह्यात दारुचे पाट वाहतायत. एकट्या बीडचा विचार केल्यास बीडमध्ये 600 बारचे परवाने आहेत. बेकायदेशीर विक्री होणाऱ्या दारुचा हिशोबच न केलेला बरा… बीड शहरात पावलोपावली तुम्हाला बिअर बार दिसतील. बीड बायपासला तर फक्त दारुचीच दुकानं आहेत की काय अशी स्थिती आहे.

राखेतून पैसा, पैशातून दहशतीचं राजकारण सुरू आहे. इथं सुरक्षेपेक्षा मिरवण्यासाठी बंदुकांचे परवाने घेतले गेल्याचा आरोप होतोय. परवानाधारक बंदूक आणि पिस्तुलाचा वापर दहशत पसरवण्यासाठी केला जातो. मराठवाड्यात 1281 शस्त्रांचे परवानेने आहेत.  मराठवाड्यात सर्वाधिक परवानाधारक शस्त्र एकट्या बीडमध्ये आहेत. गेल्या काही वर्षांत बीडमधील गुन्हेगारीचा आलेख सातत्यानं वाढतोय. दिवसाढवळ्या मुडदे पाडले जातायत.

बीड जिल्ह्यात मागील पाच वर्षात 308 खुनाचे गुन्हे दाखल आहेत.

तर मागील पाच वर्षात खुनाचे प्रयत्नाचे तब्बल 765  गुन्हे दाखल आहेत.

मागील पाच वर्षात बीड जिल्ह्यात 782 बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत.

कोरोना काळात लॉकडाऊन असताना देखील बीड मध्ये 2020 मध्ये 32 खून झाले.

 तर 2021 मध्ये 59 जणांच्या हत्या करण्यात आल्या.

2024 म्हणजे मागील वर्षी नोव्हेंबरपर्यंतच्या माहिती नुसार बीडमध्ये 39 हत्या झाल्यात.

बीड परळीतून माणूस गायब झाला की तो सापडतच नाही अशी अख्यायिका आहे. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाला बिहारची उपमा दिली जाते. पण परळीच्या राजकारणाच्या गुन्हेगारीकरणानं त्याची परिसिमा गाठलीये. महाराष्ट्राचं राजकारण हे देशात आदर्श राजकारण म्हणून ओळखलं जात होतं. पण परळीच्या राजकारणाच्या गुन्हेगारी पॅटर्ननं राजकीय संस्कृतीची राखरांगोळी केलीये हे खेदानं म्हणावं लागेल.





Source link

शून्य मोजता मोजता थकून जाल… वाल्मिक कराडच्या संपत्तीचा आकडा पाहून अधिकारी थक्क! ED ने पाठवली नोटीस

शून्य मोजता मोजता थकून जाल… वाल्मिक कराडच्या संपत्तीचा आकडा पाहून अधिकारी थक्क! ED ने पाठवली नोटीस


Walmik Karad Property ED Notice: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाशीसंबंधित खंडणी मागितल्याने मंत्री धनंजय मुंडेंचे समर्थक वाल्मिक कराड यांना सीआयडीने अटक केली आहे. 31 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड पोलिसांना शरण आल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली जात असतानाच आता वाल्मिक कराडसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराडला यापूर्वीच सक्तवसुली संचलनालयाकडून म्हणजेच ईडीकडून नोटीस आली होती. वाल्मिक कराडने जमवलेल्या संपत्तीचा आकडा पाहून ईडीच्या अधिकारीही थक्क झाल्याची चर्चा आहे.

अनेक नेत्यांकडून जाहीर भाषणांमधून आरोप

बीडचे खासदार बजरंग सोनावणेंबरोबरच भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी कशाप्रकारे वाल्मिक कराडने बेकायदेशीर उद्योगांच्या माध्यमातून बीडमध्ये दहशत पसरवली असून त्या माध्यमातून पैसा गोळा केल्याचं अनेक ठिकाणी झालेल्या आक्रोश सभांमध्ये जाहीर भाषणांमधून सांगितलं आहे. याचदरम्यान सुरेश धस यांनी अगदी सविस्तरपणे संतोष देशमुख हत्याकांड कसं घडलं आणि खंडणी कशी मागितली आणि दिली जाते याबद्दलची माहिती जाहीर कार्यक्रमांमध्ये दिली.

वाल्मिकची संपत्ती किती?

‘झी 24 तास’ला ‘टू द पॉइण्ट’ कार्यक्रमात दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये सुरेश धस यांनी हावरटपणाचे राजकारण धनंजय मुंडेंनी केलं. धनंजय मुंडेंनी वाळुतून पैसा, राखेतून पैसा कमावला असून घरकुलांसाठी त्यांनी 10-10 हजार रुपयांची वसुली केल्याचा गंभीर आरोप केला. याच मुलाखतीमध्ये धस यांनी वाल्मिक कराडने 1500 कोटींची संपत्ती जमवल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. याच संपत्तीसंदर्भातील चौकशीसाठी ईडीची दोन महिन्यांपूर्वीच वाल्मिकला नोटीस आल्याचंही धस यांनी म्हटलं आहे. म्हणजेच आकड्यात सांगायचं झालं तर वाल्मिक कराडची संपत्ती 1500,000,00,00,000 इतकी आहे.

नक्की पाहा हे फोटो >> महाराष्ट्राला हादरवणाऱ्या सरपंच हत्याकांडात वाल्मिक कराडचं नाव का घेतलं जातंय? तो आहे तरी कोण?

काहीतरी पुरावा असणारच

धस यांनी केलेल्या या दाव्यासंदर्भात खासदार बजरंग सोनावणेंनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे. “सुरेश धस हे पाचव्या टर्मचे आमदार आहेत अभ्यास करून बोलणारे ते आहेत त्यांच्याकडे काहीतरी पुरावा असेल तेव्हाच ते बोलले आहेत. शासनाने आणि पोलीस यंत्रणेने तो तपासला पाहिजे. महाराष्ट्रातील जनता याच्याकडे कसं पाहते आणि सरकार याच्याकडे कशा नजरेने बघत हे पाहिलं पाहिजे,” असं म्हणत बजरंग सोनवणे यांनी धस यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया नोंदवली आहे. “सुरेश धस यांच्याकडे पुरावा असेल म्हणून ते बोलत आहेत. त्यांचं बोलणं पोलीस यंत्रणा आणि सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजे. या सर्वांची चौकशी झाली पाहिजे,” असंही सोनावणे यांनी वाल्मिक कराडच्या बेकायदेशीर संपत्तीसंदर्भात बोलताना म्हटलं आहे.

नक्की वाचा >> …तर लोक मला जोड्यानं मारतील! सुरेश धसांचं विधान; पंकजा पालकमंत्री का नको हे ही सांगितलं

सरकारने लक्ष दिलं पाहिजे

कराडकडे 1500 कोटींची संपत्ती असल्याच्या धस यांच्या विधानावर बोलताना, “ते काही चुकीचं बोलतात असं मला वाटत नाही. ते पहिल्या टर्मला आमदार झालेत असं नाही. ते सरकारमधले आमदार आहेत. त्यांच्या बोलण्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे. हे प्रकरण सीबीआयकडे, ईडीकडे द्या, असा आम्हीही म्हणत आहोत. असं झालं तरच याच्यात खरी चौकशी होईल,” असं बजरंग सोनवणे म्हणालेत.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp