महाराष्ट्रात मोठा रेल्वे अपघात! धावता ट्रक रेल्वे ट्रॅकवर घुसला आणि रेल्वेला धडकला; रुळावरुन ट्रक 500 मीटर फरफटत गेला
महाराष्ट्रात जळगावजवळ मोठा अपघात झाला आहे. धावता ट्रक रेल्वे ट्रॅकवर घुसला आणि रेल्वेला धडकला आहे.
Source link
महाराष्ट्रात जळगावजवळ मोठा अपघात झाला आहे. धावता ट्रक रेल्वे ट्रॅकवर घुसला आणि रेल्वेला धडकला आहे.
Source link
Nashik Crime News : पैसा सुरक्षित राहावं म्हणून तो आपणं बँकेत ठेवतो.. शिवाय, बँकेच्या इतर योजनांमधून ठेवींवर अतिरिक्त नफा मिळावा असाही अनेकांचा हेतू असतो. नागरिक आपल्या मेहनतीची जमापुंजी निर्धास्तपणे बॅंक खात्यात जमा करतात. पण बँकेच्या कर्मचाऱ्यांकडूनच तुमची फसवणूक झाली तर? हो असंच काहीसं झालंय नाशिक जिल्ह्यातील मालेगाव भागात. बँकेच्या कर्मचाऱ्यानेच ग्राहकांना 19 लाखांचा गंडा घातला आहे.
कळवण भागातील ॲक्सिस बँकेतील कर्मचारी तुषार गोसावीनं ललिता मोरे या ग्राहकाकडून बँकेतील व्यवहारांसाठी तूषारनं एटीएम, मोबाईल बँकींगची माहीती घेतली. दरम्यान त्यांनं ग्राहकाची एकूण 15 लाखांची फसवणुक केली.
तर दुसरीकडे मालेगावमध्ये आकाश नामदेव इंडाईत यानं महिला बचत गटाचे खोटे कारण सांगून सहीचे, रक्कम नसलेले कोरे चेक घेतले. त्यातून पैसे काढून काही रक्कम त्याने ईएमआय स्वरूपात मनमाड शाखा येथे भरली. त्यापैकी 19 लाख 28 हजार 407 रुपयाची रक्कम अद्याप भरली नाही.. पोलिस या सगळ्याचा तपास करत आहेत.
बँकेतील कर्मचारी थेट तुमच्या घरी येऊन तुम्हाला थेट व्यवहाराच्या सोयी उपलब्ध करून देत असेल तर सावधन व्हा. तुमच्या बँकेतील अकाउंटमध्ये एफडी करण्यासाठी तुमच्या घरी येत असतील तर त्यांच्या आमिशाला बळी पडू नका. तुमचं डेबिट कार्ड आणि मोबाईल अॅप सुरू करून देण्याच्या नावानं पासवर्ड मागत असतील तर देऊ नका.
अशा प्रकरणांमध्ये लोकांचे कोट्यावधी रुपये लुटण्यात आलेत. अनेकांना अद्याप ते मिळाले नाहीत त्यामुळे बँकेतील व्यवहार करताना तिथल्या कर्मचाऱ्यांशी सांभाळूनच व्यवहार करा.. अन्यथा तुमचे बँक खाते साफ होण्यास वेळ लागणार नाही.
Pushpa Ganediwala: मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश पुष्पा गनेडीवाला या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिलेल्या आदेशात म्हटलं आहे की, माजी न्यायाधीश पुष्पा गनेडीवाला यांना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांइतकेच पेन्शन मिळण्याचा अधिकार आहे. पुष्पा गनेडीवाला या त्यांनी काही वर्षांपूर्वी दिलेल्या आदेशांमुळं त्या चर्चेत आल्या होत्या.
पुष्पा गनेडीवाला यांना पोक्सोप्रकरणात अनेक वादग्रस्त निर्णय दिल्यामुळं त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता. गनेडीवाला यांना 12 फेब्रुवारी 2022 रोजी अतिरिक्त न्यायाधीश या पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर जिल्हा सत्र न्यायाधीश म्हणून पदावन्नती (डिमोशन) करण्यात आले होते. पोक्सो कायद्यांतर्गंत लैंगिक अत्याचाराची त्यांची व्याख्या सांगितल्यामुळं मोठा वाद निर्माण झाला होता.
गनेडीवाला या त्यांच्या अनेक निर्णयांमुळं चर्चेत आल्या होत्या. त्यातीलच त्यांच्या एक निर्णय म्हणजे एका 12 वर्षीय मुलीच्या छातीला स्पर्श करणाऱ्या 39 वर्षीय आरोपीला त्वचेला प्रत्यक्ष स्पर्श न झाल्याचे सांगत ‘पोक्सो’ कायद्याअंतर्गत असलेल्या शिक्षेमधून मुक्त करणारा निर्णय न्या. गनेडीवाला यांनी 19 जानेवारीला दिला होता. त्यानंतर हा निर्णय सोश मीडियावर ट्रेंड झाला होता. त्यानंतर अल्पवयीन मुलीचा हात पकडणे आणि पँटची चेन खोलणे हादेखील पॉक्सोअंतर्गंत गुन्हा नसल्याचे त्यांनी म्हटलं होतं.
जुलै 2023 मध्ये, गनेडीवाला यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, ज्यामध्ये उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार (मूळ बाजू) यांनी 2 नोव्हेंबर 2022 रोजी जारी केलेल्या नोटीसला आव्हान दिले होते. ज्यामध्ये उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून पेन्शन आणि इतर लाभांसाठी पात्र/पात्र नसल्याचे घोषित केले होते.
उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पेन्शनची मागणी करताना, गणेडीवाला यांनी असा युक्तिवाद केला होता की त्यांनी स्वेच्छेने निवृत्ती घेतली आहे विशिष्ट वय पूर्ण केल्यानंतर निवृत्ती घेणे योग्य आहे. मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने गुरुवारी नोव्हेंबर 2022 चा पत्रव्यवहार रद्द केला आणि म्हटले की गणेडीवाला फेब्रुवारी 2022 पासून उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशांइतकेच पेन्शनसाठी पात्र आहेत.
न्यायालयाच्या आदेशानंतर, ‘आम्ही रजिस्ट्रीला त्यांचे पेन्शन फेब्रुवारी 2022 पासून सहा टक्के व्याजदराने आजपासून दोन महिन्यांच्या आत निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.’ जुलै 2023 मध्ये याचिका दाखल करताना गणेडीवाला म्हणाले होते की, ‘मला कोणतेही पेन्शन मिळत नाही. “पेन्शन देण्यास नकार देण्याचा प्रतिवादींचा संपूर्ण दृष्टिकोन मनमानी आहे.” 2019 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. गणेडीवाला यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले आहे की, जानेवारी २०२१ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून नियुक्तीसाठी त्यांचा अर्ज मंजूर केला होता. नंतर ही शिफारस मागे घेण्यात आली.
Shivaji Maharaj Rajmudra : पोहचणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील राजमुद्रा आपल्या स्वराज्याची ओळख आहे. प्रत्येकासाठी अभिमानाची बाब आहे आणि पुरातन काळातील मोडी लिपी मध्ये ही राजमुद्रा इतिहासात पहिल्यांदाच प्रतिकृती स्वरूपात केलेली आहे. ही प्रतिकृती आपल्या घरी, कार्यस्थळी, शासकीय व सरकारी कार्यालयात, शाळा – कॉलेज, पार्क – गार्डन अशा अनेक ठिकाणी स्थापित करून याचा आपल्या येणाऱ्या नवीन पिढीला तोंड ओळख व्हावी तसेच लुप्त होत चाललेल्या मोडी लिपीला पुनस्मरण करत अनेकांना त्या लिपीचं प्रबोधन व्हावं या हेतूने ही प्रतिकृती करण्यात आलेली आहे.
ही दुहेरी राजमुद्रा आपल्याला लॉकेट, पेंडंट, टेबल टॉप, वॉल हँगिंग, फ्रेम, पेपर वेट अशा अनेक प्रकारे वापरता येऊ शकते. राज ठाकरे यांच्या हस्ते मोडी आणि देवनागरी लिपी केलेली राजमुद्रा याचा अनावरण आणि लोकार्पण करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्यातील मूळ राजमुद्रा ही पहिल्यांदा मोडी लिपीत केली आहे MDF, ऍक्रेलिक, धातू अशा विविध माध्यमातून ती लोकांच्या संग्रही प्रत्येकाच्या घरोघरी पोहचावी यासाठी ही प्रतिकृती तयार केली असून एका बाजूस मोडी लिपीत तर पाठीमागच्या बाजूस देवनागरी लिपीत रचली आहे. ही दुहेरी राजमुद्रा आपल्याला लॉकेट, पेंडंट, टेबल टॉप, वॉल हँगिंग, फ्रेम, पेपर वेट अशा अनेक प्रकारे वापरता येऊ शकते.
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य दिव्य मंदिर मुंबई जवळच्या ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील मराठे पाडा इथे उभारण्यात आलंय. याच मंदिरात महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सोहळा आणि मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या 14 ते 17 मार्च रोजी मोठ्या उत्साहात होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते हा सोहळा संपन्न होणार आहे. याच कार्यक्रमाची लगबग सुरू असून कार्यक्रमानिमित्त २५ ते ३० हजार लोकं बसतील एवढा मोठा मंडप उभारण्यात येतोय.. मंत्र्यांसाठी हेलिपॅडही तयार करण्यात आलंय.
Gold Price Today: भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत चढ-उतार होताना दिसत आहे. सराफा बाजारातही 86,000च्या जवळपास सोनं ट्रेड करत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. आज $ 2,920 रुपयांवर व्यवहार करत आहे. गेल्या तीन महिन्यात सोन्याच्या किंमतीत 10 टक्क्याने वाढ झाली आहे. तर, या वर्षात आत्तापर्यंत 12 टक्क्यांची तेजी आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनिश्चितता आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थामुळं वाढती चिंता यामुळं डॉलरच्या कमजोरीमुळं सोनं महागला आहे.
डॉलरच्या कमजोरीमुळं गुंतवणुकदार सोन्यात सुरक्षित गुंतवणुक करताना दिसत आहेत. अमेरिकेत वाढत्या चिंतेमुळं गुंतवणुकदार सोन्याचा पर्याय स्वीकारत आहेत. काल सोन्याच्या दरात घसरण झाली होती. त्यानंतर आज मात्र सोन्याचे दर वधारले आहेत. आज 22 कॅरेट सोन्याचे दर 80,650 रुपये झाले आहेत. तर 24 कॅरेट सोन्याचे दर 87, 980 रुपयांवर पोहोचले आहे. 18 कॅरेट सोन्याचे दर 65,990 रुपयांवर पोहोचले आहे.
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 80,650 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 87,980 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 65,990 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 8,065 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 8,798 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 6,599 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 64, 520 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 70,384 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 65,990 रुपये
22 कॅरेट-80,650 रुपये
24 कॅरेट- 87,980 रुपये
18 कॅरेट-65,990 रुपये
Airtel Gallery Marathi Language: मराठी का आलं पाहिजे? असं कुठे लिहिलं आहे? मराठी येत नसेल तर महाराष्ट्रात राहू शकत नाही असं कुठे लिहिलं आहे? अशी विचारणा दुसरीकडे कुठे नाही तर थेट मुंबईत एका तरुणीने केली आहे. एअरटेलच्या गॅलरीत महिला कर्मचाऱ्याने मराठी तरुणाशी वाद घालताना आपण मराठीत बोलणार नाही अशी मुजोरी दाखवली. तरुणाने हा सर्व प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला असून, काही वेळातच हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. चारकोप मधील एअरटेल गॅलरीत हा प्रकार घडला आहे. यानंतर मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या एअरटेल मधील कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा मुंबईत एअरटेलची गॅलरी दिसणार नाही असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी दिला आहे.
व्हिडीओत मराठी तरुण एअरटेल गॅलरीत उभा असल्याचं दिसत आहे. आपण मागील अर्ध्या तासापासून येथे थांबलो असून, आपली समस्या सोडवली जात नाही. तसंच मराठीत बोलण्यास नकार देत उद्धटपणा केली जात असल्याची तक्रार तो व्हिडीओच्या सुरुवातीला करताना दिसतो. यानंतर व्हिडीओत महिला कर्मचारी आपण मराठीत बोलणार नाही असं सांगत वाद घालताना दिसत आहे.
व्हिडीओत तरुण सांगतो की, “मी इथे एअरटेल गॅलरीत आलो आहे. मला माझ्या समस्या सोडवून द्या म्हणून मी विनंती करत आहे. गेल्या अर्ध्या तासापासून मी बसलो आहे. मी मराठीत बोला सांगितल्यावर का मराठीत बोलू? तुम्हाला हिंदी येत नाही का? असं विचारत आहेत. मराठी बोलायला आलंच पाहिजे. मला पोलिसांची धमकी देत आहेत”.
यानंतर व्हिडीओत महिला कर्मचारी दिसते. अरबाज सर, हा कस्टमर व्हिडीओ बनवत आहे. मला म्हणतो महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोला असं ओरडून सांगत आहे अशी तक्रार ती करते. यावेळी बाहेर उभा मुलगा मराठी येत नसेल तर? अशी विचारणा करतो. त्यावर तरुण त्यांना मराठी आलंच पाहिजे असं सांगतो. त्यावर महिला कर्मचारी त्याच्याशी वाद घालत का भाई, का मराठी आलं पाहिजे? असं कुठे लिहिलं आहे? मराठी येत नसेल तर महाराष्ट्रात राहू शकत नाही असं कुठे लिहिलं आहे? अशी विचारणा करते. यादरम्यान तरुण तिला मला हात लावू नका बजावतो. त्यावर तीही मला तुला हात लावण्याची हौस नाही असं सांगते.
महिला कर्मचारी आरडाओरड करत असल्याने तरुण तिला आवाज कमी करा असं सांगतो. त्यावर ती मी असंच बोलणार असं उत्तर देते. हे तुमच्या मालकीचं आहे का? अशी विचारणा तरुण करतो. त्यावर ती मला मराठी समजत नाही, हिंदीत बोलायचं असं सांगते. त्यावर तरुण हिंदीत बोलण्यास नकार देत, मराठी समजून घ्यायचं असं सांगतो. त्यानंतर आपण भारतात राहतो, इथे कोणत्याही भाषेत बोलू शकतो असं सांगते. मॅनेजर आल्यानंतर महिला कर्मचाऱ्याची मुजोरी कमी होताना दिसत नाही. महाराष्ट्रात मराठी महत्त्वाची नाही असं ती सांगताना दिसते.
एअरटेल प्रशासनाने नोंद घेऊन कर्मचाऱ्यांना मराठी भाषेचं महत्त्व समजावून सांगावं. महाराष्ट्रात एअरटेलचे असंख्य मराठी ग्राहक आहेत ते कायम ठेवायचे असतील तर योग्य पाउलं उचला नाहीतर मुंबईत एअरटेल ची गॅलरी दिसणार नाही असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी दिला आहे. तसंच इतर भाषेचा विरोध नाही पण मराठी भाषिक 80 टक्के कर्मचारी असायलाच हवे असंही सांगितलं आहे.