कोर्ट आवारातली कार, केक अन्…; ठाण्यात महिलेवर लैंगिक अत्याचार! अश्लील फोटो काढून…

कोर्ट आवारातली कार, केक अन्…; ठाण्यात महिलेवर लैंगिक अत्याचार! अश्लील फोटो काढून…


Crime News Women Sexual Herrasment Inside Car: ठाण्यातील कुटुंब न्यायालयाच्या आवारात एका विवाहित महिलेवर दोघा पुरुषांनी कारमध्ये सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हा सारा प्रकार पोलिसांचा सतत वावर असलेल्या न्यायालयासारख्या संवेदनशील इमारतीच्या परिसरात घडला आहे. पोलिसांबरोबरच सर्वसामान्यांची वर्दळ असलेल्या ठाण्यासारख्या गर्दीच्या शहरात सार्वजनिक ठिकाणी हा प्रकार घडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Add Zee News as a Preferred Source

नक्की घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी महिलेला नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने बोलावले होते. या महिलेच्या वाढदिवसानिमित्त आणलेल्या केकमध्ये गुंगीचे औषध मिसळून तिला केक खाऊ घालण्यात आला. त्यानंतर ती बेशुद्ध पडल्यावर आरोपींनी हे घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप आहे. ही घटना 25 ऑगस्ट 2024 रोजी घडली असल्याचे सांगितले जात असून, पीडित महिलेने 5 डिसेंबर 2025 रोजी ठाणे नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

इतक्या दिवस का शांत राहिली महिला?

जवळपास 15 महिन्यांपूर्वी हा प्रकार घडल्याचं सांगण्यात येत असताना पीडित महिला इतक्या दिवस का शांत राहिली असा सवाल उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी आरोपींनी महिलेसोबत घृणास्पद कृत्य केले तेव्हा त्यांनी त्याचे चित्रिकरणही केले होते. या महिलेचा अश्लील व्हिडिओ तयार करून आरोपींकडून महिलेला वारंवार दोघांनी ब्लॅकमेल केलं. त्यामुळेच ही महिला तक्रार करत नव्हती. मात्र सततच्या त्रासाला कंटाळलेल्या या महिलेचा संयम संपला आणि तिने 5 डिसेंबर रोजी म्हणजेच घटना घडल्यानंतर सव्वा वर्षाने तक्रार दाखल केली.

आरोपी कोण?

आरोपींपैकी एक हिरालाल केदार (युट्यूब पत्रकार) याला अटक करण्यात आली असून, दुसरा आरोपी रवी पवार फरार आहे. ठाणे नगर पोलिसांकडून पवार येथे तपास सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, न्यायालयाच्या आवारात अशी घटना घडल्याने सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

ठाण्यात महिला अत्याचाराचं वाढतं प्रमाण

ठाण्यामध्ये मागील काही काळापासून महिलांवरील अत्याचारासंदर्भातील घटना घडल्या आहेत. ठाण्यात एका व्यक्तीने स्वतःच्या सहा वर्षांच्या मुलीवर जून 2025 पासून डिसेंबरपर्यंत सतत अत्याचार केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वीच समोर आला. पीडितेच्या आईने जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, ज्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. आरोपी वडीलांवर गुन्हा दाखल झाला असून, तपास सुरू आहे. ठाण्यातच 14 जुलै रोजी शाळकरी मुलींना ‘मासिक पाळी तपासणी’च्या नावाखाली कपडे काढण्यास भाग पाडण्यात आले. या प्रकरणावरूनही वातावरण चांगलेच तापले होते.

 

 





Source link

निलेश राणे एकनाथ शिंदेंचा पीए व्हायला का तयार झाले?, राणेंनी स्पष्टच सांगितलं, 'माझ्यामध्ये काही तरी खोट…'

निलेश राणे एकनाथ शिंदेंचा पीए व्हायला का तयार झाले?, राणेंनी स्पष्टच सांगितलं, 'माझ्यामध्ये काही तरी खोट…'


Neha Choudhary

नेहा चौधरी या ‘झी 24 तास डिजीटल’मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या ‘झी 24 तास डिजीटल’मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

…Read More





Source link

मुंबईकरांनो उद्या चुकूनही 'या' रस्त्याकडे जाऊ नका! दिवसभर ट्रॅफिकमध्ये अडकून पडाल, कारण…

मुंबईकरांनो उद्या चुकूनही 'या' रस्त्याकडे जाऊ नका! दिवसभर ट्रॅफिकमध्ये अडकून पडाल, कारण…


Mumbai Traffic Update: सामान्यपणे तुम्ही मुंबई आणि उपनगरांमध्ये राहत असाल तर रविवारी रेल्वेच्या मेगाब्लॉक असल्याच्या बातम्या अनेकदा वाचल्या असतील. मात्र मुंबईला गुजरातशी कनेक्श करणाऱ्या एका महत्त्वाच्या मार्गावर उद्या म्हणझेच 7 डिसेंबर रोजी मेगाब्लॉक असणार आहे. शहरातील वाहतुकीचा महत्त्वाचा भाग असलेल्या या रस्त्यावर तुम्ही उद्या चुकून गेलाच तर डिसेंबरमधील पहिलाच रविवार तुमचा वाहतूककोंडीमध्ये जाऊ शकतो.

Add Zee News as a Preferred Source

रस्ता कोणता आणि काय काम सुरु आहे?

मुंबईकडून गुजरातला जाणाऱ्या प्रमुख मार्गांपैकी एक असलेला राज्य महामार्ग 84 म्हणजेच घोडबंदर रोडवरील दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गायमुख ते फाऊंटनदरम्यान रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामातील अंतिम टप्प्यात आहे. रविवार, 7 डिसेंबर रोजी याच कामाचा एक भाग म्हणून ग्राऊटिंग व मास्टिक अस्फाल्टचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठीच घोडबंदर रोड अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे.

संपूर्ण रस्ता कधी बंद असणार?

शनिवार मध्यरात्री 12 ते रविवार मध्यरात्री 12 या कालावधीत संपूर्ण रस्ता बंद राहणार आहे. यावेळी प्रवाशांची वाहतूककोंडी होऊ नये म्हणून पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे.

अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी अनेक त्रास प्रवास

मेट्रोची कामे, अरुंद-नादुरुस्ती रस्त्यांमुळे व अवजड वाहनांची वाहतूक यामुळे घोडबंदर प्रवास जीवघेणा आणि त्रासदायक झाला असून प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. अर्ध्या तासाचे अंतर कापण्यासाठी वाहनचालकांना अनेक तासांच्या वाहतूककोंडीचा सामना करावा लागतोय. हे कमी म्हणून की काय नादुरुस्त रस्त्यामुळे घोडबंदरवर अपघात होऊन अनेकांचे बळीदेखील गेले आहेत. मात्र अपघातांचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी तसेच वाहतूककोंडी फोडण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात गायमुख ते फाऊंटन हॉटेलपर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम आता शेवटच्या टप्प्यात आले असून रस्त्याचे ग्राऊटिंग व मास्टिक अस्फाल्टचे काम रविवारी पूर्ण करण्यात येणार आहे.

कसे असतील निर्बंध:

अवजड वाहनांसाठी: मुंबई आणि ठाणेकडून घोडबंदरकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना माजिवडा व्हाय जंक्शन आणि कापूरबावडी चौकात थांबवले जाईल. या वाहनांना 24 तासांसाठी बंदी आहे.

हलकी वाहने: ठाणेकडून घोडबंदरकडे जाणाऱ्या हलक्या वाहनांना गायमुख चौकीवरून चुकीच्या बाजूने जाण्याची परवानगी आहे, आणि फाऊंटन हॉटेलसमोरच्या कटमधून पुढे जाऊ शकतात.

मिरा-भाईंदर महानगरपालिकेद्वारे फाऊंटन हॉटेल ते काजुपाडा भागात दुरुस्ती होत आहे, ज्यामुळे वाहतुक व्यवस्था पूर्णपणे बदलली जाईल.

पर्यायी मार्ग:

मुंबई/ठाण्याकडून: व्हाय जंक्शनवरून सरळ नाशिक रोडमार्गे खारेगाव टोल प्लाझा, मंकोली, आणि अंजुरफाटा मार्गे. कापूरबावडी जंक्शनवरून उजवीकडे वळून कशेळी आणि अंजुरफाटा मार्गे.

मुंब्रा/कलवा येथून: खारेगाव टोल प्लाझापूर्वी थांबवून खारेगाव बे ब्रिज, खारेगाव टोल प्लाझा, मंकोली, आणि अंजुरफाटा मार्गे.

नाशिककडून: मंकोली नाक्यावर थांबवून मंकोली ब्रिजखाली उजवीकडे वळून अंजुरफाटा मार्गे.





Source link

फडणवीसांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची वर्षभरातली कामगिरी कशी होती? Survey काय सांगतो?

फडणवीसांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची वर्षभरातली कामगिरी कशी होती? Survey काय सांगतो?


Devendra Fadnavis Government Performance: राज्यात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं महायुतीचं सरकार स्थापन होऊन आज वर्ष होत आहे. महायुतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राज्याची धुरा आपल्या हाती घेतली. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी विराजमन झाले. वर्षभरात तिन्ही पक्षांनी सरकार चालवताना नेमकी कशी कामगिरी केली याचा आढावा झी 24 तास आणि JDS या संस्थेनं महासर्व्हेच्या माध्यमातून घेतला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारला 5 डिसेंबर 2025 रोजी पहिले वर्ष पूर्ण होत असताना, झी 24 तास आणि ज्युबिलंट डेटा स्टुडिओ (JDS) यांच्या सहकार्याने महाराष्ट्राचा राज्यव्यापी मतदान सर्व्हे करण्यात आला आहे. महायुती सरकारची गेल्या वर्षभराची कामगिरी कशी राहिली? कोणत्या योजना सामान्य लोकांच्या पसंतीला उतरल्या? सामान्य लोकांचं महायुती सरकारबाबत काय मत आहे? याचा कानोसा झी 24 तास आणि JDS या संस्थेनं एका महासर्व्हेच्या माध्यमातून घेतला आहे. 

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची वर्षभरातली कामगिरी कशी होती? 

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारची वर्षभरातली कामगिरी कशी होती? असा प्रश्न विचारला असता सर्वाधिक म्हणजेच 40 लोकांनी सर्वोत्कृष्ट असल्याचं म्हटलं आहे. तर तब्बल 31 टक्के लोकांनी अतीउत्कृष्ट असल्याचं शिक्कामोर्तब केलं आहे. 23 टक्के लोकांनी साधारण कामगिरी केल्याचं मत नोंदवलं आहे. तर 6 टक्के लोकांनी निराशाजनक म्हटलं आहे. म्हणजेच सरकारच्या कामगिरीवर समाधानी असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. 

झी 24 तास आणि JDS चा महासर्व्हे

14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान हा सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये एकूण 89 हजार 812 जणांना समाविष्ट करण्यात आलं. या सर्वेक्षणात, सामाजिक-राजकीय संशोधन व डेटा विश्लेषणातील दोन पद्धतींचा वापर करण्यात आला आहे. 

पहिल्या पद्धतीत प्रत्यक्ष भेटी व घरघर फिरून सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये 4 महानगरं, 24 जिल्हे, 37 नगरपरिषदा व 48 तालुके समाविष्ट होते. यादरम्यान 22 हजार 654 जणांच्या वैयक्तिक मुलाखती घेण्यात आल्या.

तर दुसरा टेलिया मोबाईल-आधारित AI व्हॉइस सर्व्हे आहे.  मोबाईलद्वारे अत्याधुनिक, संवादात्मक AI-आधारित व्हॉइस सर्व्हेमध्ये 67 हजार 158 जणांना समाविष्ट करण्यात आलं. 

AI टेलिफोनिक व्हॉइस सर्व्हे आणि प्रत्यक्ष संवादामुळे महाराष्ट्रातील जनमताचा कानोसा घेणारे हे सर्वेक्षण आगळे वेगळे ठरले आहे.

महाराष्ट्रातील सर्व्हेची भौगोलिक व्याप्ती

कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्र या विविध विभागांचे संतुलित प्रतिनिधित्व मिळावे यासाठी खालील 4 महानगरं, 24 जिल्हे, 37 नगरपरिषदा व 48 तालुके येथे सर्व्हे करण्यात आला.





Source link

'यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच..' खासदार अमोल कोल्हेंना आला धक्कादायक अनुभव!


MP Amol Kolhe On Indigo: नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) वैमानिक व केबिन क्रू साठी नवे फ्लाइट ड्युटी टाईम लिमिटेशन (FDTL) नियम 1 नोव्हेंबरपासून कठोरपणे लागू केले. यात क्रूना जास्त विश्रांती, कमी सलग ड्युटी आणि रात्रपाळीच्या वेळा कमी करण्यावर भर आहे. परिणामी इंडिगो सारख्या मोठ्या कंपनीत अचानक कर्मचारी-कमतरता निर्माण झाली आणि गेल्या तीन दिवसांत देशभरात 550 हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली. खासदार अमोल कोल्हे यांनाही याचा फटका बसलाय. काय घडलाय नेमका प्रकार? सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

गुरुवारी सर्वाधिक फटका

दिल्लीत 172, मुंबईत 118, बंगळुरूत 100, हैदराबादमध्ये 75, कोलकात्यात 35, चेन्नईत 26 अशी एकूण दहा हून अधिक विमानतळांवर इंडिगोची शेकडो उड्डाणे रद्द झाली. नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत 1232 उड्डाणे रद्द झाली, त्यापैकी 755 फक्त नव्या FDTL नियमांमुळे रद्द झाली.

काय म्हणाले अमोल कोल्हे?

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचीही फ्लाइट प्रथम दोन तास उशिराने, नंतर थेट रद्द झाली. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले, देशांतर्गत विमानसेवेच्या ‘सावळ्या गोंधळा’मुळे फ्लाईटला २ तास उशीर अन् मग 3 तासांनी फ्लाईट कॅन्सल..!सिस्टीम वेळ वाया घालवत असली तरी मी नाही! या अनपेक्षितपणे मिळालेल्या ‘निवांत वेळेत’ एक महत्त्वाचं लेखन पूर्ण केलं. 3 तासांनी फ्लाईट कॅन्सल झाली याचा मनस्ताप आहेच, पण होऊ दिला नाही याचं जास्त बरं वाटतंय..! इंडिगोकडून ही अपेक्षा नव्हती. यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच..!, असे अमोल कोल्हे म्हणाले. 

विमान कंपन्यांची DGCA कडे विनंती

DGCA ने गुरुवारी सर्व प्रमुख विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. कंपन्यांनी नियमांमध्ये तात्पुरती शिथिलता देण्याची विनंती केली आणि पूर्णपणे नियमांची अंमलबजावणी होण्यासाठी किमान तीन महिन्यांचा अवधी मागितला.

इंडिगोला DGCA चे कठोर निर्देश

DGCA ने इंडिगोला नवीन क्रू भरती योजना, प्रशिक्षण रोडमॅप, रोस्टर पुन्हरचना, सुरक्षा धोरण आणि दर 15 दिवसांनी प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. इंडिगोने प्रवाशांची माफी मागितली असून लवकरात लवकर सेवा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले. प्रवाशांची सुरक्षितता आणि क्रूची विश्रांती वाढवण्यासाठी आणलेले नियम सध्या विमान कंपन्यां आणि प्रवाशांसाठी डोके दुखी ठरताना दिसत आहेत.

FAQ

प्रश्न १. DGCA चे नवे FDTL नियम नेमके काय आहेत आणि ते का लागू केले?

उत्तर: DGCA ने वैमानिक आणि केबिन क्रू साठी नवे Flight Duty Time Limitation (FDTL) नियम १ नोव्हेंबर २०२५ पासून कठोरपणे लागू केले आहेत. यात क्रूना जास्त विश्रांती देणे, सलग ड्युटीची वेळ कमी करणे आणि विशेषतः रात्रपाळीच्या (नाइट ड्युटी) वेळा कमी करण्यावर भर आहे. हे नियम क्रूच्या थकव्या कमी करून प्रवाशांची सुरक्षितता वाढवण्यासाठी आणले आहेत.

प्रश्न २. नव्या नियमांमुळे इंडिगोची किती उड्डाणे रद्द झाली?

उत्तर: नव्या FDTL नियमांमुळे इंडिगोला अचानक क्रूची कमतरता भासली. गेल्या तीन दिवसांत ५५० हून अधिक उड्डाणे रद्द झाली, तर नोव्हेंबर महिन्यात आतापर्यंत एकूण १,२३२ उड्डाणे रद्द झाली आहेत, त्यापैकी ७५५ उड्डाणे फक्त नव्या नियमांमुळेच रद्द झाली.

प्रश्न ३. DGCA ने इंडिगो आणि इतर विमान कंपन्यांना काय आदेश किंवा सूचना दिल्या?

उत्तर: DGCA ने इंडिगोला नवीन पायलट-केबिन क्रू भरती योजना, प्रशिक्षण रोडमॅप, रोस्टर पुन्हर्रचना, सुरक्षा धोरण तयार करून दर १५ दिवसांनी प्रगती अहवाल सादर करण्याचे कठोर निर्देश दिले. तसेच सर्व प्रमुख विमान कंपन्यांची बैठक घेऊन कंपन्यांनी मागितलेली तात्पुरती शिथिलता नाकारली असून पूर्ण अंमलबजावणीसाठी तीन महिन्यांचा अवधी देण्यासही नकार दिला आहे.





Source link

पुणे नाशिक हाय-स्पीड रेल्वे बाबत मोठी अपडेट; 24 स्थानके, 48 बोगदे, 200 KM स्पीडने धावणार ट्रेन, 8,900,000,000 रुपयांचा मेगा प्रोजेक्ट

पुणे नाशिक हाय-स्पीड रेल्वे बाबत मोठी अपडेट; 24 स्थानके, 48 बोगदे, 200 KM स्पीडने धावणार ट्रेन, 8,900,000,000 रुपयांचा मेगा प्रोजेक्ट


Pune Nashik Pune High Speed Railway :  पुणे नाशिक हाय-स्पीड रेल्वे बाबत मोठी अपडेट समोर आली आहे.  रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत याबाबत माहिती दिली.  पुणे-नाशिक हाय-स्पीड रेल्वेचा जुना मार्ग, जो नारायणगावमधून जात होता, तो पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे.  जगप्रसिद्ध जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपमुळे हा निर्णय घेण्यात आला. हा टेलिस्कोप 31 देशांतील शास्त्रज्ञ वापरतात. विज्ञान आणि अणुऊर्जा विभागाने इशारा दिला होता की रेल्वे लाईन जवळून गेल्याने रेडिओ लहरींमध्ये व्यत्यय येईल आणि प्रकल्प रुळावरून घसरेल. आता, एक नवीन मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

Add Zee News as a Preferred Source

महाराष्ट्र सरकार आणि सर्व लोकप्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केल्यानंतर, नवीन मार्गांना अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. नाशिक-साईनगर शिर्डी (दुहेरीकरणासाठी डीपीआर तयार), साईनगर शिर्डी-पुणतांबा जंक्शन (दुहेरीकरणासाठी ₹240 कोटी मंजूर), पुणतांबा-निमलक (80 किमी दुहेरीकरण पूर्ण), निमलक-अहिल्यानगर (6 किमी दुहेरीकरण सुरू आहे). अहिल्यानगर-पुणे (चाकण औद्योगिक क्षेत्राला व्यापणारी 133 किमी नवीन दुहेरीकरण मार्ग) 8,970 कोटी खर्च येईल. त्याचा डीपीआर पूर्ण झाला आहे.

रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, नवीन मार्गामुळे जुन्या मार्गाइतकाच प्रवास वेळ लागेल, परंतु त्याचे महत्त्वपूर्ण फायदे होतील. सर्वात मोठा फायदा म्हणजे ही रेल्वे साईनगर शिर्डी थेट नाशिकशी जोडले जाईल, ज्यामुळे लाखो भाविकांना सुविधा मिळेल. नाशिक ते त्र्यंबकेश्वर प्रवास करणे सोपे होईल. त्यांना आता बस, टॅक्सी किंवा वाहतुकीच्या इतर साधनांवर अवलंबून राहावे लागणार नाही. यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाचेल, तसेच प्रवास सोयीस्कर होईल. 

रेल्वेने काळजीपूर्वक विचार करून नवीन मार्ग अंतिम केला, ज्यामुळे जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त फायदा होईल. ते चाकण सारख्या प्रमुख औद्योगिक क्षेत्रांना देखील जोडेल. अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले की वैज्ञानिक हितसंबंध सर्वोपरि आहेत, म्हणून जीएमआरटीच्या संरक्षणासाठी मार्ग बदलण्यात आला. या नवीन संरेखनामुळे पुणे आणि नाशिक दरम्यान जलद रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळेल, तसेच धार्मिक पर्यटन आणि उद्योगाला चालना मिळेल. पुणे-नाशिक नवीन रेल्वे सेमी-हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर 235.15 किलोमीटर लांबीचा आहे. ही लाईन राज्यातील तीन जिल्ह्यांना जोडणार आहे. पुणे, अहमदनगर आणि नाशिक प्रकल्प मार्ग डोंगारातून जातो. 18 बोगदे असणार आहेत. या मार्गावर 24 स्थानके बांधली जातील. असा दावा केला जात आहे की प्रकल्प पूर्ण झाल्यावर सध्याचा प्रवास वेळ दोन तासांनी कमी होईल.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp