'पुष्पा 2' पाहायला गेला आणि चांगलाच फसला, नागपुरातील सिनेमागृहात एकच थरार

'पुष्पा 2' पाहायला गेला आणि चांगलाच फसला, नागपुरातील सिनेमागृहात एकच थरार


Nagpur Crime News: पुष्पा 2 हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून विविध कारणांमुळं चर्चेत आहे. दक्षिणेकडे हा सिनेमा वादातदेखील सापडला होता. मात्र, महाराष्ट्रात चक्क या सिनेमामुळं एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. नागपुरात ही घटना घडली आहे. हत्या आणि अमली पदार्थाच्या प्रकरणात आरोपीला नागपुर पोलिसांनी पुष्पा-2 बघताना अटक केली आहे. बुधवारी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सिनेमागृहात चित्रपटाचे स्क्रिनींग सुरु असतानाच पोलिसांनी आरोपी विशाल मेश्राम याला अटक केली. पोलिसांची ही कारवाई सुरू असताना प्रेक्षकांमध्येही एकच गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर प्रेक्षकांना अश्वस्त केलं की ते आता चित्रपटाचा आनंद आधीसारखाच घेऊ शकतात. 

आरोपी विश्वास मेश्राम असं या आरोपीचे नाव असून तो 10 महिन्यांपासून फरार होता. नागपूर येथील पाचपावली पोलिसानी त्याला  पुष्पा 2 चित्रपट पाहताना अटक केली. विशाल हा साथीदारां सोबत पुष्पा -2 चित्रपट पाहण्यासाठी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सुद्धा पुष्पा 2 चित्रपट तिकीट खरेदी केली. तो बसलेल्या सीटच्या मागील बाजूस पोलीस बसून राहिले होते. 

आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता. आरोपी आत सिनेमागृहात असताना बाहेरही पोलिसांचे एक पथक तैनात होते. आतापर्यंतच्या त्याच्या पार्श्वभूमी पाहता तो पोलिसांवर हल्ला करतो, अशी माहिती पोलिसांकडे होती. त्यामुळं पोलिसांनी विशेष खबरदारी घेऊन त्याला अटक केली. पोलिसांनी त्याच्या वाहनाची चित्रपट सुरू असतानाच हवा काढून ठेवली होती. जेणेकरुन तो पुन्हा पोलिसांच्या हातातून निसटू नये. 

पोलिसांनी त्याला अटक करुन त्याच्यावर कारवाई करत कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. 2012 पासून विशाल मेश्राम हा गुन्हेगारी क्षेत्रात वावरत आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे 27 गुन्हे दाखल आहे. 302, जबरी चोरी, डकेती, तडीपार, मोका, सुद्धा लावण्यात आला आहे. अमली पदार्थ संबंधीदेखील गुन्हे दाखल आहेत.





Source link

राहुल गांधींचा दौऱ्यावर आरोपांच्या फैरी, परभणी प्रकरण कोणत्या दिशेने चाललंय?

राहुल गांधींचा दौऱ्यावर आरोपांच्या फैरी, परभणी प्रकरण कोणत्या दिशेने चाललंय?


Rahul Gandhi Parabhani: परभणीतील सोमनाथ सुर्यवंशींच्या कोठडीतल्या मृत्यूनंतर आता राजकारण बरंच तापलंय.राहूल गांधी यांनी सुर्यवंशी कुटुंबाची भेट घेत त्यांचं सांत्वन केलंय. आणि सरकारवर आरोपांचा भडीमार केला.गांधींच्या या दौऱ्यावर सत्ताधाऱ्यांनी सडकून टीका केली.परभणी प्रकरण कोणत्या दिशेने चालंलय? जाणून घेऊया.

परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतल्या मृत्यूवरुन आता आरोप प्रत्यारोप सुरु झालेत. गेले 12 दिवस हा विषय राज्यभरात चर्चिला जातोय.शरद पवारांसह अनेक महत्वाच्या नेत्यांनी कुटुंबाची भेट घेतल्यानंतर आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहूल गांधी यांनी भेट घेतली.या भेटीनंतर गांधींनी आरएसएस, भाजप सरकार, मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गंभार आरोप केलेत.दलित असल्यामुळेच सोमनाथ यांची हत्या केल्याच गांधी म्हणाले.

आम्हाला मदत नको, न्याय हवा.यातील दोषींना फाशी द्यावी अशी मागणी आपण राहुल गांधींकडे केल्याची माहीती सोमनाथ कुटुंबीयांनी दिलीये.दरम्यान राहुल गांधींचा हा दौरा, राजकीय हेतूने प्रेरित असून नौटंकी असल्याची टीका मुख्यमंत्र्यांसह, मंत्री संजय शिरसाट यांनी केलीये.

परभणीत संविधानाच्या विटंबनेमुळे आंदोलन झालं.पोलिसांनी कारवाई करत आंदोलकांना ताब्यात घेतलं.त्यावेळी ताब्यात असलेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांचा कोठडीत मृत्यू झाला.त्यानंतर भीम अनुयायी आक्रमक झाले.कारवाईच्या मागणीसाठी फक्त परभणीचं नाही तर राज्यभरात आंदोलनं झाली.विधीमंडळात देखील मुख्यमंत्र्यांनी मदतीसह कारवाईची घोषणा केली.तरीही प्रकरण काही थंड झालं नाही.राहुल गांधींच्या दौऱ्यानंतर सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचा मुद्दा देशभर गाजण्याचे संकेत मिळू लागलेत.

सोमनाथ सुर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळणार का?

याप्रकरणी उद्धव ठाकरे यांनीही सरकारवर टीका करत, लोकांना न्याय मिळत नाही, सरकार करतंय काय असा सवाल उपस्थित केला. तर परभणीची घटना अतिशय निंदनीय आहे. हा एक सुनियोजित कट होता, त्याची चौकशी झालीच पाहिजे.जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ करा अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली. परभणी प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनीही सरकारवर ताशेरे ओढले.सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलीस मारहाणीत झालाय, याचा तपास व्हावा असं सुषमा अंधारे म्हणाल्या. राज्यभरात ठिकठिकाणी भीम अनुयायांनी आंदोलन करत सरकारला जाब विचारलाय.पोलिसी बळाचा वापर करत मारल्याचा आरोप होतोय.आता राजकीय पक्ष आणि नेतेही पुढे सरसावलेत.त्यामुळे कारवाईचा वेग वाढेल, हिच अपेक्षा.परभणी घटनेवरून विरोधक आक्रमक झालेत. आरोपींवर कारवाई करण्यासाठी  विरोधकांनी विधानभवनाच्या पाय-यावर आंदोलन केलं. त्यानंतर विधानसभेतही गोंधळ झाला. विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. बीड, परभणी घटनेवरून सरकार गंभीर नाही, असा आरोप करत विरोधकांचा सभात्याग केलाय.





Source link

भीषण! पुण्यात मद्यधुंद डंपर चालकाने 9 जणांना चिरडलं; तिघांचा मृत्यू

भीषण! पुण्यात मद्यधुंद डंपर चालकाने 9 जणांना चिरडलं; तिघांचा मृत्यू



Pune Accident News : भीषण अपघातनं पुणे हादरलं… घटनास्थळाची दृश्य पाहून उडाचा प्रत्यक्षदर्शींचा थरकाप… पाहा मोठी बातमी 
 



Source link

Weather Day : पुढील 5 दिवस यलो अलर्ट; थंडी ओसरुन पावसाची शक्यता

Weather Day : पुढील 5 दिवस यलो अलर्ट; थंडी ओसरुन पावसाची शक्यता


राज्यात पुढील दिवसांमध्ये वातावरणात मोठा बदल होताना दिसणार आहे. मुंबई आणि ठाण्यात शनिवारी पहाटे दाट धुक्यांची झालर पसरली होती. पण येत्या काही दिवसांत राज्याच्या अनेक भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुणे वेध शाळेच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा पुढे सरकणार आहे. आणि यामुळे पूर्व-इशान्येकडे दाब वाढणार असल्याने इशान्येकडील राज्यांत व विदर्भात पुढील दोन पावसाची शक्यता आहे.

ख्रिसमसच्या दिवशी पाऊस

24 आणि 25 डिसेंबर रोजी विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातही आर्दता वाढणार असल्याने या ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. तर किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.  25 ते 29  डिसेंबरदरम्यान महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. 26 ते 8 डिसेंबरपर्यंतच्या तीन दिवसांत पावसाची शक्यता अधिक आहे. त्यामुळे यंदा नाताळात थंडी नाही तर पाऊस अनुभवता येणार आहे. पण पुन्हा 30 डिसेंबरपासून थंडीत वाढ होईल, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.

मुंबईसह कोकणात मात्र थंडी

मुंबईसह कोकण सोडून इतर महाराष्ट्रात 24 डिसेंबरपर्यंत पहाटे पाचचे किमान तापमान सरासरीपेक्षा 1 ते 4 अंशाने अधिक असल्यामुळे तेथे माफक थंडी जाणवणार आहे. मुंबईसह कोकणात मात्र हेच तापमान सरासरीपेक्षा 1 ते 2 अंशाने खालावले आहे. त्यामुळे मुंबईसह कोकणात, उर्वरित महाराष्ट्राच्या मानाने तेथे अधिक थंडी आहे. मुंबईचे किमान तापमान 19 अंश असून, रात्रीसह पहाटेच्या वातावरणातील गारवा कायम आहे.

भारतातील हवामान 

भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये पुढील 5 दिवस थंडीची लाट कायम राहील. राजस्थान आणि पंजाबमध्ये दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार असून, येथेही थंडीच्या लाटेबाबत इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, थंडीची लाट लक्षात घेता, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशमध्ये पुढील 5 दिवसांसाठी पिवळा अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये हवामान खूप थंड असेल. IMD नुसार, उत्तर-पश्चिम भारतात थंड लाटेचा प्रभाव नंतर कमी होईल, परंतु 23 डिसेंबरपासून पंजाब आणि हरियाणामध्ये तीव्र धुक्याचा प्रभाव दिसून येईल. या दोन्ही राज्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.





Source link

महाराष्ट्रात 303 मोठे प्रकल्प, 2 लाख 1300 हजार रोजगार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

महाराष्ट्रात 303 मोठे प्रकल्प, 2 लाख 1300 हजार रोजगार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा



येत्या काही वर्षात महाराष्ट्रात 300 पेक्षा जास्त मोठे प्रकल्प येणार आहेत. यामुळे महाराष्ट्रात लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे. 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp