Maharashtra Weather News : राज्यावर एकाएकी पावसाचं सावट; विचित्र हवामानापुढं सगळ्यांनीच मानली हार
Nitesh Rane on Burkha Wearing Student: महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 दरम्यान घेतली जाणार आहे. तर बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत पार पडणार आहे. परीक्षेला महिना शिल्लक असताना विद्यार्थी परीक्षेच्या तयारीत आहेत. दरम्यान भाजप मंत्री नितेश राणे यांनी शालेय शिक्षण विभागाला पत्र लिहिलंय. यात दहावी-बारावीच्या परीक्षेत बुरखा घालून प्रवेश नाकारण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षेत विद्यार्थीनींना बुरखा घालून परिक्षा केंद्रात प्रवेश नको, अशी मागणी मस्त्य विकास मंत्री नितेश राणेंचे शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र लिहून केली आहे. राज्यातील दहावी व बारावीच्या परीक्षांच्या धर्तीवर हे पत्र लिहिण्यात आले आहे. कॉपीचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त करत ही मागणी करण्यात आली आहे.
दहावी, बारावी परीक्षेत बुरखा घातलेल्या विद्यार्थीनींना परीक्षा केंद्रात प्रवेश देऊ नये असे नितेश राणे म्हणाले. माध्यमिक शाळेत उच्च माध्यमिक शाळेत परिक्षेसाठी बुरखा घालून बसण्याची मान्यता देण्याचं प्रमाणपत्र दिल्याचं परिपत्रक आहे. असं लांगुलचालन चालणार नाही अशी भूमिका मी शिक्षण मंत्र्यांकडे मांडल्याचे नितेश राणे म्हणाले. बुरखा घालून परीक्षेला बसल्याचे इतरही धोके आहेत. याचे धोके लक्षात घेऊन हा निर्णय रद्द करावा अशी मागणी शिक्षणमंत्र्यांकडे केल्याचे ते म्हणाले.
लांगुलचालन आम्हाला मान्य नाही. हा निर्णय 2024 सालचा आहे. हे निर्णय रद्द करण्यासाठी मागणी केली. परिक्षेसोबतच मतदानाच्या वेळीही असे प्रकार उघडकीस आलेले आहेत. नेमकी तीच विद्यार्थीनी परीक्षेला आहे का? हे देखील पाहावं लागेल. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे या मुलांनीही आपला धर्म शाळेत आणू नये, असे राणे यावेळी म्हणाले. नितेश राणेंच्या या निर्णयावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. त्याला राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे. विशिष्ठ धर्माचे लांगुलचालन होऊ नये ही सरकारची भूमिका आहे. सरकारचा भाग म्हणून मी बोलतोय. असं परिपत्रक काढलं असेल तर ते तात्काळ रद्द करा, असे ते यावेळी म्हणाले.
महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षेचा पहिला पेपर भाषा विषयाचा असेल तर सामाजिक विज्ञान विषयाचा पेपर शेवटचा असेल. दहावीची परीक्षा 2 शिफ्टमध्ये होणार आहेत. सकाळच्या शिफ्टची परीक्षा सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तर दुपारच्या शिफ्टची परीक्षा दुपारी 3 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होईल. असे असले तरी काही परीक्षा सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत घेतल्या जातील, अशी माहिती महाराष्ट्र बोर्डाकडून देण्यात आली आहे.
दिलेल्या सूचनांचे पालन करून शाळा प्रशासन विद्यार्थ्यांच्या वतीने हॉल तिकीट डाउनलोड करू शकते. यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in वर जा. होमपेजवर उपलब्ध असलेल्या एसएससी हॉल तिकीट 2025 लिंकवर क्लिक करा आणि लॉगिन क्रेडेन्शियल्स सबमिट करा. महाराष्ट्र एसएससी हॉल तिकीट 2025 स्क्रीनवर दिसेल. ते डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या आणि ती विद्यार्थ्यांना वितरीत करा.अधिकृत नोटिफिकेशननुसार, महाराष्ट्र बोर्ड एसएससी हॉल तिकीट 2025 मध्ये दुरुस्त्या करता येतील. विद्यार्थ्याचे नाव, आईचे लग्नापूर्वीचे नाव, जन्मतारीख किंवा जन्मस्थान यासारख्या काही क्षेत्रात चुका असतील तर तुम्ही बदल करू शकता. दुरुस्त्या करण्यासाठी, उमेदवारांना विहित शुल्क भरावे लागेल. विभागीय मंडळाच्या मंजुरीनंतर सुधारित महाराष्ट्र एसएससी हॉल तिकीट 2025 ‘सुधारणा प्रवेशपत्र’ लिंकद्वारे डाउनलोड करता येईल. विषय किंवा माध्यमात बदल करण्यासाठी शाळांना थेट विभागीय मंडळाशी संपर्क साधावा लागेल, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.
शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पोलीस चौकीतून संशयित आरोपी फरार झाला आहे.
Source link
Local Body Election In Maharashtra Supreme Court Case: अनेक वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body Election) प्रलंबित निवडणुकांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात दाखल झालेल्या सर्व याचिकांची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पार पडली. कोर्टाने पुढची तारीख दिली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. 25 फेब्रुवारी 2025 ला पुढील सुनावणी होणार आहे. यामुळे पालिका निवडणुका लांबणीवर पडणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. राज्य सरकार आणि आहे कोर्टाला सागितलं की हा विषय पूर्ण झाला आहे. कुठल्याही पक्षात मतभेद नाहीत. 5 फेब्रुवारी सुरुवातीला कोर्ट म्हणाल होत मात्र त्या दिवशी दिल्लीच्या निवडणुका आहेत. त्यामुळं आता कोर्टाने 25 फेब्रुवारी तारीख दिली आहे. तुषार मेहता यांनी राज्य सरकारच्या बाजूने सांगितल की मी तासाभरात माझं मत मांडतो. मात्र, आज कोर्टाला जास्त वेळ नसल्याने पुढील तारीख पडली आहे. 92 नगरपालिका मधे ओबीसी आरक्षण द्यायचं की नाही याचा निर्णय पुढील सुनावणीत निकाली लागेल. पुढील सुनावणी नंतर प्रशासक राज्य बाजूला होऊन निवडणुका होतील. पंजाब केसाचा देखील दाखला आम्ही आज सुनावणीवेळी दिला अशी माहिती ॲड देवदत्त पालोदकर यांनी दिली.
राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबत आज फैसला येण्याची शक्यता वर्तवली जात होती. सुप्रीम कोर्ट गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीबाबत निर्णय देण्याची शक्यता होती. राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकीबात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि कोटिश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. सुप्रिम कोर्टात याबाबत सुनावणी झाली. त्यामुळे 2 वर्षापासून रखडलेल्या निवडणुकांना मुहूर्त लागणार का? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले होते.
मागच्या सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्यांतर्फे ॲड देवदत्त पालोदकर व ॲड अभय अंतुरकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या असे निदर्शनास आणून दिले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुदतीच्या आत घेणे बंधनकारक असूनही वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या अध्यादेशांमुळे व कायद्यांमुळे निवडणुकीची प्रक्रिया रखडली आहे. राज्य शासनातर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सदर प्रकरण गुंतागुंतीचे झाले असून यामध्ये अनेक याचिका व अर्ज सादर करण्यात आले असल्याचे सांगितले.
त्यानंतर ओबीसी आरक्षण, प्रभाग रचना तसेच राज्य शासनाने निर्गमित केलेले अध्यादेश यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात वेळोवेळी सादर झालेल्या याचीका, त्यात उपस्थित करण्यात आलेले मुद्दे व न्यायालयाने वेळोवेळी पारित केलेले आदेश विचारात घेऊन याचिकाकर्ते, राज्यशासन तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या वकिलांनी एकत्रितपणे प्रकरणातील मुद्दे कायम करणे आवश्यक आहे, ज्यायोगे प्रकरणात पुढील तारखेस योग्य ते निर्देश देता येतील असे मत खंडपीठाने व्यक्त केले. त्याला सर्व वकिलांनी सहमती दर्शविली.
सुनावणी अंती सर्वोच्च न्यायालयाने सदर प्रकरण दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी ‘डायरेक्शन्स‘ साठी ठेवण्याचे तसेच तोपर्यंत ‘जैसे थे‘ आदेश कायम ठेवण्याचे निर्देश दिले होते. 2021 साली राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्य संख्येमध्ये वाढ केली होती. राज्यातील 23 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 284 पंचायत समित्या, 207 नगरपालिका तसेच 13 नगरपंचायती संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचना, आरक्षण तसेच मतदार यादीची कार्यवाही वाढीव सदस्य संख्येच्या आधारावरच पूर्ण केली होती. मात्र 4 ऑगस्ट 2022 रोजीच्या अध्यादेशान्वये सदस्य संख्येत करण्यात आलेली वाढ व निवडणूक आयोगाने केलेली प्रभाग रचना आरक्षण तसेच मतदार यादीची कार्यवाही राज्य शासनाने रद्द केली होती. त्यामुळे या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत.
खाजगी कंपनीचा तणनाशक वापरल्याने नाशिक जिल्ह्यात जवळपास दीडशे एकर शेतीतील कांदा तीन तालुक्यात नेस्तनाबूत झालाय..
Source link
Uday Samant on Chhava Movie : उदय सामंत यांनी नुकत्याच दिलेल्या पत्रकार परिषदेत ‘छावा’च्या दिग्दर्शकांचा उल्लेख करत खुलासा केला आहे.
Source link