by Hansraj Agrawal | Dec 1, 2024 | Trending News
पश्चिम रेल्वेचे तीन महत्त्वाचे अपडेट्स आपण या बातमीत पाहणार आहेत. रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल ते भिवानी दरम्यान विशेष भाड्यावर सुपरफास्ट स्पेशल ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. मुंबई-उधनादरम्यान विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. तर या ट्रेनचे वेळापत्रक कसं असेल, कोणत्या विशेष लोकल कोणत्या वेळेत सोडल्या जाणार आहेत.
असं आहे रेल्वेच वेळापत्रक?
ट्रेनक्रमांक 09001 भिवानी सुपरफास्ट स्पेशल मुंबई सेंट्रल येथून दर मंगळवार आणि शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता निघेल. ही ट्रेन 3 ते 17 डिसेंबरदरम्यान धावणार आहे. तसेच ट्रेन क्रमांक 09002 ही गाडी भिवानी येथून दर बुधवार आणि शनिवारी दुपारी 2.45 वाजता सुटणार आहे. ही ट्रेन 4 ते 18 डिसेंबरपर्यंत धावणार आहे. वांद्रे-उधना स्पेशलचा विस्तार ट्रेन क्रमांक 09055 वांद्रे टर्मिनस-उधना स्पेशल यापूर्वी 28 नोव्हेंबर 2024 पर्यंत अधिसूचित करण्यात आली होती, ती 31 डिसेंबर 2024 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक ०९०५६ उधना-वांद्रे टर्मिनस स्पेशल या परतीच्या गाडीची मुदतही ३१ डिसेंबर वाढवण्यात आली असल्याने
प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वेचा मोठा निर्णय
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यानुसार फलाट तिकिटांच्या विक्रीवर 2 ते 9 डिसेंबरपर्यंत निर्बंध घातले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशविदेशातील लाखो अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी येतात. त्यामुळे रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर प्रचंड गर्दी होते. त्यामुळे फलाटांवरील गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने लांब पल्ल्यांच्या स्थानकांवर फलाट तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वेची मेगा भरती परीक्षा
भारतीय रेल्वेने रेल्वेची मेगा भरती सुरु केली आहे. परीक्षा विविध झोन, विभाग आणि कार्यशाळा यामधील गैर- तांत्रिक लोकप्रिय श्रेणी आणि तांत्रिक श्रेणी या दोन्हींमध्ये रिक्त जागा भरण्यासाठी 23 रेल्वे भरती बोर्डमार्फत अधिसूचना जारी केली होती. भरती मोहिमेत सहायक लोको पायलट, स्टेशन मास्टर, ट्रेन मॅनेजर, कनिष्ठ अभियंता, तंत्रज्ञ, कमर्शियल क्लर्क, ट्रॅक मेंटेनर, पॉइंट्समन आणि मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशनमधील विभागीय सहायक पदांचा समावेश होता.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 30, 2024 | Trending News
Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीत मविआचा दारूण पराभवानंतर मविआच्या नेत्यांनी इव्हीएमवर शंका उपस्थित केली. सुरूवातीला ईव्हीएमबाबत अधिकृत माहिती आल्याशिवाय बोलणार नाही असं शरद पवारांनी स्पष्ट केलं होतं. मात्र आता पवारांनी ईव्हीएम विरोधात सूर आळवत थेट जनतेनं उठव करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केले आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 29, 2024 | Trending News
महाराष्ट्रातील एका गावात नवा नियम लागू होणार आहे. शिव्या देणाऱ्यांकडून दंड आकारला जाणार आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 29, 2024 | Trending News
Sanjay Shirsat on Eknath Shinde: राज्यात महायुतीला बहुमत मिळालेलं असतानाही अद्याप सरकार स्थापन झालेलं नाही. त्यात मुख्यमंत्रीपदी कोण होणार? याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. दिल्लीत गुरुवारी रात्री राज्यातील नवं सरकार, मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री यावर यासंदर्भात खलबतं झाली. मात्र त्यानंतरही अधिकृतपणे काही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आधीच मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला असून, त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाईल अशी चर्चा आहे. त्यातच आता शिवसेना नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी मोठं विधान केलं आहे.
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्विकारणार नाहीत असा अंदाज संजय शिरसाट यांनी व्यक्त केल आहे. तसंच एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्याच राजकारणात राहतील असंही म्हटलं आहे. ते म्हणाले की, “एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्याच राजकारणात राहतील असं वाटतं. कदाचित उपमुख्यमंत्रिपद स्विकारणार नाहीत असा माझा अंदाज आहे. ही फार मोठी गोष्ट असू शकते.”
दिल्लीतील बैठकीत गाजलेले पाच मुद्दे
– मुख्यमंत्री भाजपचा. मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब प्रतीक्षेत
– एकनाथ शिंदेंकडून महत्वाच्या खात्यांची मागणी
– बैठकीत अजित पवारांच्या मागण्यांवरही चर्चा
– गृह, अर्थ, नगरविकास, महसूल अशा महत्त्वाच्या खात्यांवर चर्चा झाल्याची माहिती
– शिंदे दादांच्या वाटेला काय येणार याबद्दल उत्सुकता कायम
Source link
by Hansraj Agrawal | Nov 28, 2024 | Trending News
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेसंदर्भात दिल्लीत बैठकांचा जोर वाढला आहे. एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचले तेव्हा शिवसेना खासदारांनी शिंदेंचं दिल्ली विमानतळावर स्वागत केलं. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ दिल्लीत आल्याची प्रतिक्रिया शिंदेंनी यावेळी दिली. महायुतीचा मुख्यमंत्री होण्यात अडचण नसल्याचं यावेळी शिंदेंनी म्हटलंय. तर जे.पी.नड्डा आणि अमित शाहांमध्ये अमित शाहांच्या निवासस्थानी बैठक आयोजीत करण्यात आली. कोणत्याही क्षणी मुख्यमंत्रीपदाचे नाव जाहीर होऊ शकते.
अमित शाहांच्या घरी रात्री साडे दहा वाजता महायुतीची बैठक सुरु झाली. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे अमित शाहांच्या घरी बैठकीसाठी हजर होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हेही अमित शाहांच्या घरी आधीच पोहोचले. महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीत मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होणार का याकडे आता लक्ष लागलं आहे.
अजित पवार आणि फडणवीसांमध्ये सुनील तटकरेंच्या निवासस्थानी बैठक पार पडली. फडणवीस आणि अजित पवार यांच्यात सुमारे 2 तास बैठक झाली. बैठकीत अजित पवाराकडून काही प्रस्ताव ठेवले गेले अशी चर्चा आहे. महायुतीच्या बैठकीच्या पूर्वी राष्ट्रवादी च्या मंत्रिमंडळाला घेऊन प्रस्तावा वर चर्चा झाल्याचेही समजते.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 28, 2024 | Trending News
Rupali Chakankar Big Deamd: राज्यामध्ये महायुतीला मोठं यश मिळालं असून यामध्ये अजित पवारांच्या पक्षाचा महत्त्वाचा वाटा आहे. दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक स्ट्राइक रेट असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला नेत्याने मोठी मागणी केली आहे.
Source link