by Hansraj Agrawal | Nov 27, 2024 | Trending News
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे जाहीर झालं नसलं तरी दिल्लीनं मात्र मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवल्याची खात्रीलायक माहिती झी 24 तासच्या हाती आली आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असं ठरवल्याची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नावावर कसं शिक्कामोर्तब झालं याची झी 24 तासच्या हाती आलेली ही इनसाईड स्टोरी…
दिल्लीत ठरला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?
मोदी-शाहांच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब?
मुख्यमंत्री ठरल्याची इनसाईड स्टोरी झी 24 तासवर
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे अजून जाहीर झालेलं नाही. मात्र पडद्यामागं बऱ्याच घडामोडी घडू लागल्यात. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची राजधानी दिल्लीत चर्चा झाल्याची माहिती झी 24 तासच्या हाती आली आहे. दिल्लीश्वरांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती दिल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितलं आहे.
स्थळ- नवी दिल्ली
मध्यरात्री 12.40 मिनिटं
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत बैठक सुरु झाली.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असावा यावर चर्चा सुरु झाली
बैठकीत संघाच्या वरिष्ठ नेत्यांचाही सहभाग होता
नेतृत्व कुणाकडं सोपवावं यावर सखोल चर्चा झाली
मुख्यमंत्रिपदासाठी एकदोन मराठा नेत्यांच्या नावांचाही विचार झाला
देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रिपदासाठी योग्य नेते असल्याचं सगळ्यांचं मत पडलं
संघाच्या नेत्यांनीही देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती दिली
दिल्लीतल्या या बैठकीत काही नावांवर चर्चा झाली. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संघाच्या नेत्यांची पहिली पसंती देवेंद्र फडणवीस हेच राहिले. मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांचं नावच योग्य असल्याचा निष्कर्ष या नेत्यांनी काढल्याचं सांगण्यात येतंय.
अमित शाह आणि मोदींची ही चर्चा सुरु असतानाच एकनाथ शिंदेंचा मुंबईतून फोन आला. एकनाथ शिंदेंनीही भाजपनं मुख्यमंत्री ठरवावा आपण पाठिंबा देऊ अशी भूमिका घेतली.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावालाच दिल्लीतील भाजप वर्तुळात पहिली पसंती मिळालीय. दिल्लीतून नव्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांना हिरवा कंदिल मिळालाय. आता उत्सुकता आहे फक्त औपचारिक घोषणेची.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 27, 2024 | Trending News
Maharashtra Assembly Election 2024 BJP Stand On CM Post: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदासाठी अडून बसलेले असताना भारतीय जनता पार्टीने आपली भूमिका स्पष्टपणे मित्रपक्षांना सांगितली आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 26, 2024 | Trending News
Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची दारुण पराभव झाल्यानंतर त्यांनी EVM वर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केलाय. EVM विरोधात कोर्टाची पायरी चढण्याचा इशारा दिलाय.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 26, 2024 | Trending News
Maharashtra Assembly Election Eknath Shinde Likely To Resign: राज्य सरकारचा कार्यकाळ आज संपणार आहे. 26 नोव्हेंबर ही विद्यमान विधानसभेच्या कार्यकाळाची शेवटची तारीख असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. मात्र नवे मुख्यमंत्री निवडेपर्यंत राज्याचा कारभार शिंदेच पाहणार असल्याचे समजते. सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र कार्यवाहू मुख्यमंत्री म्हणून ते नवं सरकार स्थापन होईपर्यंत कारभार संभाळणार आहेत. (दिवसभरातील घडामोडींचे LIVE UPDATES पाहाण्यासाठी येथे क्लिक करा.)
विधानसभा होणार बरखास्त
मुख्यमंत्री कोण याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना विधानसभेचा पंच वार्षिक कार्यकाळ संपलेला आहे. विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने तांत्रिक बाब म्हणून यासाठी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागतो. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतरच विधानसभा बरखास्त होते. मुख्यमंत्री सकाळी 11 वाजता राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करतील अशी सूत्रांची माहिती आहे. पुढील मुख्यमंत्री कोण हे निश्चित होत नाही तोपर्यंत कार्यवाहू मुख्यमंत्री म्हणून शिंदेच जबाबदारी पाहतील असं सांगितलं जात आहे. नवीन विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर कारभार नव्या मुख्यमंत्र्यांकडे सोपवला जाईल. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा मंत्रिमंडळाचा राजीनामा समजला जात असल्याने मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याबरोबरच मंत्रिमंडळही बरखास्त होणार आहे.
दबाव तंत्राचा वापर
मुख्यमंत्री पदासाठी भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडूनही जोर लावला जात असल्याचं चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच कायम रहावेत असं त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी मागील दोन दिवसांमध्ये वेगवगेळ्या प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. यामध्ये दीपक केसरकर, संजय शिरसाट यासारख्या नेत्यांचा समावेश आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घ्यावी असं भाजपाच्या कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं भाजपा नेत्यांनी बोलून दाखवलं आहे. यामध्ये प्रवीण दरेकर, राहुल नार्वेकर यांच्यासहीत आशिष शेलार यांचाही समावेश आहे ज्यांनी मुख्यमंत्री पदासाठी फडणवीस असावेत अशी मागणी केली आहे.
नक्की वाचा >> राजकीय घडामोडींना वेग! रात्री 12.53 AM ला CM शिंदेंची पोस्ट; म्हणाले, ‘अशा पद्धतीने माझ्या…’
केंद्रीय नेतृत्वाच्या माध्यमातून होणार चर्चा
भारतीय जनता पार्टीने विधानसभा निवडणुकीमध्ये 132 जागांवर विजय मिळवला असून शिंदेंच्या शिवसेनेनं 57 जागांवर विजय मिळवला आहे. अजित पवारांच्या पक्षाने 41 जागांवर विजय मिळवला आहे. महायुतीचा मुख्यमंत्री कोण यासंदर्भात केंद्रीय नेतृत्वाशी बोलून आम्ही योग्य तो निर्णय घेऊन असं एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वेळोवेळी सांगितलं आहे.
नक्की वाचा >> निवडणुकीनंतरचा राज्यातील सर्वात मोठा निर्णय! गृह खात्याने…; फडणवीसांची ‘ती’ भेट कारणीभूत
दरम्यान आज मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे निश्चित होणार असून उद्या म्हणजेच बुधवारी मुख्यमंत्री पदी कोण असेल याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 25, 2024 | Trending News
Rohit Pawar Meet Ajit Pawar : अजित पवार आणि रोहित पवार या काका-पुतण्यात जवळपास दीड वर्षांत असा खुमासदार संवाद पाहायला मिळाला. यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहण्यासाठी रोहीत पवार कराडच्या प्रितीसंगमावर गेले होते. रोहित पवार तिथून परतत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार प्रितीसंगमावर आले होते.
यावेळी काका-पुतणे समोरासमोर आल्यावर काय होणार असा प्रश्न तेथील कार्यकर्त्यांच्या मनात होता. अजित पवार यांनी मात्र राजकीय अभिनिवेश बाजूला सारत रोहित पवार यांचा हात हातात घेतला. काकांच्या अधिकारवाणीनं पायापड असं देखील अजित पवार यांनी रोहित पवार यांना सांगितलं. एवढंच नाही तर अजित पवार रोहित पवार यांना म्हणाले की, रोहित वाचलास, जर मी एक सभा घेतली असती तर काय झालं असतं हे तुला माहिती आहे ना म्हणत अजित पवार यांनी रोहित पवार यांना सुनावलं.
रोहित पवार काय म्हणाले?
कराडच्या प्रितीसंगमावर रोहित पवार-अजित पवार आमने-सामने आले होते. यावेळी दोघांमध्ये खास गप्पा झाल्या. यावेळी रोहित पवार अजित पवार यांच्या पाया देखील पडले. यावेळी अजित पवार यांनी रोहित पवार यांना शुभेच्छा देत म्हणाले की, वाचलास रोहित, जर मी एक सभा घेतली असती तर काय झालं असतं तुला माहिती आहे ना असं अजित पवार म्हणाले. त्यावर रोहित पवारांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार काकांच्या अधिकारवाणीनं बोलले आहेत. आमचे वैचारिक मतभेद कायम असल्याचं रोहित पवार यावेळी म्हणाले.
अजित पवारांचा घूमजाव
अजित पवार रोहित पवार यांना जे म्हणाले ते सगळ्या जगानं ऐकलं. परंतु, अजित पवार यांनी त्यावर घूमजाव केला. जामखेडच्या सभेबाबत आपण काहीच बोललो नसल्याचं अजित पवार म्हणाले.
राष्ट्रवादी फुटल्यानंतर रोहित पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यांत अबोला होता. दोघं कधीही सार्वजनिक ठिकाणी एकमेकांशी बोलले नव्हते. उलट एकमेकांवर टीकेची एकही संधी त्यांनी सोडली नव्हती. प्रितीसंगमावर मात्र काका-पुतण्यांच्या नात्यामधील ओलावा स्पष्ट जाणवला.
Source link
by Hansraj Agrawal | Nov 24, 2024 | Trending News
Kasara Tunnel : कसारा घाटातील त्रासदायक प्रवास आता सोपा होणार आहे. ठाण्यातून नाशिकला जाताना कसारा घाट लागणार नाही. आठ मिनिटांत इगतपुरी ते कसारा अंतर पार होणार आहे.
Source link