उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांना दिल्या खास शुभेच्छा!

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांना दिल्या खास शुभेच्छा!



उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांना  खास शुभेच्छा दिल्या आहेत.   शरद पवारांच्या संसदीय कारकीर्दीचं 60व्या वर्षांत पदार्पण केले आहे. 



Source link

कुर्ला BKC परिसरातील ट्रफिकमधून सुटका; अंधेरी आणि चेंबूरला जोडणाऱ्या मेट्रो प्रकल्पातील अत्यंत महत्वाचा टप्पा पूर्ण

कुर्ला BKC परिसरातील ट्रफिकमधून सुटका; अंधेरी आणि चेंबूरला जोडणाऱ्या मेट्रो प्रकल्पातील अत्यंत महत्वाचा टप्पा पूर्ण


 Mumbai Metro B2 : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांच्यामार्फत मुंबई मेट्रो लाईन २बी (डी. एन. नगर – मंडाले) अंतर्गत कुर्ला येथील हलाव पूलावर  दोन यू-गर्डरचे यशस्वी लाँचिंग पूर्ण करण्यात आले. या कामगिरी मुळे मुंबई अधिक वेगवान व परस्पर-संलग्न  घडविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठरली आहे.

Add Zee News as a Preferred Source

मेट्रो लाईन  2 बी हा महत्त्वाचा पूर्व–पश्चिम कॉरिडोर असून, डी. एन. नगर, बीकेसी, कुर्ला, चेंबूर आणि मंडाले या प्रमुख निवासी आणि व्यापारी केंद्रांना जोडणारा मार्ग आहे. या तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीच्या कामाची यशस्वी पूर्तता ही दररोज प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांसाठी विश्वासार्ह व कार्यक्षम सार्वजनिक परिवहन व्यवस्था उभारण्याच्या दिशेने सातत्यपूर्ण प्रगती दर्शविते.

हलाव पूल परिसर विमानतळाच्या फनेल झोनमध्ये येत असल्याने मेट्रो व्हायाडक्ट आणि विद्यमान पूल यांच्यामधील उभ्या अंतराची मर्यादा केवळ 3.5 मीटर आहे. या तांत्रिक मर्यादांचा विचार करून संबंधित  यंत्रणांची आवश्यक मंजुरी प्राप्त केल्यानंतर काम अत्यंत अचूक नियोजनाद्वारे सुरळीतपणे पूर्ण करण्यात आले.सार्वजनिक सोयीचा विचार करून ही उभारणी प्रक्रिया वाहतूकदृष्ट्या व्यस्त असलेल्या या परिसर असल्याने रात्रीच्या वेळी पार पाडण्यात आली. त्यामुळे वाहतुकीतील अडथळे कमी झाले, सुरक्षितता सुनिश्चित झाली व जड यंत्रसामग्रीचे कार्यक्षम नियोजन शक्य झाले. हलाव पूलावरून हलकी वाहने जसे की रिक्षा, टॅक्सी, टेम्पो व रुग्णवाहिका यांची वाहतूक सुरू असून, जड वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहे.

हलाव पूलासमोरील एस. जी. बर्वे मार्ग मेट्रो स्थानक विमानवाहतूक उंची निकषांनुसार एकस्तरीय स्वरूपात नियोजित करण्यात आले आहे. स्थानकाच्या पायाभूत व पिअर कामांसह हलाव पूलाच्या दोन्ही बाजूंवरील व्हायाडक्टचे काम पूर्ण झाले असून, यामुळे समन्वयित व वेळेवर अंमलबजावणी झाल्याचे दिसून येते. प्रत्येकी 20 मीटर लांबीचे दोन यू-गर्डर (P610–P611 LHS) हे 500 मेट्रिक टन क्षमतेच्या क्रेनद्वारे तंत्रज्ञांच्या देखरेखीखाली उभारण्यात आले. या टप्प्यानंतर प्रकल्प ट्रॅक बसविणे, ओव्हरहेड कॅटेनरी प्रणाली, वीजपुरवठा व्यवस्था व दूरसंचार पायाभूत सुविधा उभारणी अशा पुढील कामांकडे प्रगती करीत आहे. तत्परतेने परिसर विकास उपक्रमही राबविण्यात येत आहेत. ए. एच. वाडिया रोडच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव बृहमुंबई महानगर पालिका यांच्या समन्वयाने राबविण्यात येत असून, यामुळे वाहतूक सुलभ होण्यास तसेच गणेश विसर्जन व इतर गर्दीच्या कालावधीत वाहतुकीचे सुकर नियमन होण्यास मदत होईल. बाधित संरचनांचे पुनर्वसन नियोजित व न्याय्य पद्धतीने करण्यात येत असून, सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. हलाव पूलावरील यू-गर्डर उभारणी ही सूक्ष्म नियोजन, तांत्रिक कौशल्य व सार्वजनिक हिताचा समतोल राखण्याचे द्योतक आहे. प्रत्येक महत्त्वपूर्ण टप्प्यासह मेट्रो लाईन 2 बी ही मुंबईकरांसाठी विश्वासार्ह व कार्यक्षम वाहतूक व यास हातभार लावणार आहे.





Source link

'संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे तीनदा गावी आला'

'संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे तीनदा गावी आला'



Krushna Aandhale: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आतापर्यंत सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, वाल्मीक कराड, प्रतीक घुले, सिद्धार्थ सोनवणे, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार यांना अटक करण्यात आली आहे. असे असले तरी मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे.



Source link

'मला माफ करा', वडेट्टीवारांनी राहुल गांधींसह काँग्रेस हायकमांडची मागितली माफी; वरिष्ठ म्हणाले 'हे ठीक नाही झालं…'

'मला माफ करा', वडेट्टीवारांनी राहुल गांधींसह काँग्रेस हायकमांडची मागितली माफी; वरिष्ठ म्हणाले 'हे ठीक नाही झालं…'


Vijay Wadettiwar apology in Congress Meeting: चंद्रपुरात काँग्रेसकडे आपला महापौर बसवण्याची संधी असतानाही दोन गट निर्माण झाल्याने हातची सत्ता गमावली. दुसरीकडे भाजपाने संधी साधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती करत आपला महापौर बसवला आहे. दिल्ली दरबारी जाऊनही विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यातील वाद मिटला नाही. धानोरकर -वडेट्टीवार गटातील संघर्ष शिगेला पोहोचला होता. या सर्व घडामोडींमुळे काँग्रेसचे वरिष्ठ नेते नाराज झाले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसच्या वरिष्ठांनी आज दिल्लीत झालेल्या बैठकीत आपली नाराजी बोलून दाखवली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

विजय वडेट्टीवारांनी मागितली माफी

चंद्रपूर महापालिका निवडणुकीत झालेल्या गोंधळाबाबत काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. चंद्रपूर महानगर पालिकेत झालेल्या पराभवाबद्दल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माफीही मागितली आहे. बैठकीच्या सुरुवातीलाच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि के सी वेणुगोपाल यांची त्यांनी माफी मागितली. मला माफ करा (I am Sorry) म्हणत विजय वडेट्टीवार खेद व्यक्त केला. यावर वरिष्ठांनी हे योग्य झालं नाही आणि ही योग्य वेळ नाही (THIS IS NOT DONE AND THIS IS NOT RIGHT TIME) असं म्हटल्याचं समजत आहे. 

महापौर निवडणुकीवरुन चंद्रपुरात विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात वर्चस्वाची लढाई सुरु झाली होती. एकमेकांचे नगरसेवक पळविणे त्यांचे जवळजवळ अपहरण करणे इथपर्यंत प्रकार झाले. काँग्रेसच्या अंतर्गत वर्चस्वाचा वाद जिल्हा, विभाग ,प्रदेश आणि थेट दिल्लीत पोहोचला. त्यात समेट झाल्यानंतर काँग्रेसच्या 27 नगरसेवकांचा एक गट अगदी 2 दिवस आधी नोंदला गेला. धानोरकर गटाला महापौरपद तर उपमहापौरपद वडेट्टीवार गटाला असा फॉर्म्युला निश्चित झाला होता. सहकारी पक्षांना स्थायी समिती देण्याचेही निश्चित झाले होते. मात्र सर्व खेळ उबाठा शिवसेना- वंचित आणि अपक्ष यांच्या दहा जणांच्या गटावर अवलंबून होता. 

महाराष्ट्रासंदर्भात पार पडली वेगळी बैठक

 
महाराष्ट्राच्या संदर्भात राजधानी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत वेगळी बैठक पार पडली. बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,  विजय वड्डेटीवार आणि खासदार रजनी पाटील उपस्थित होत्या. चंद्रपूर महापालिका सत्ता स्थापनेत झालेला गोंधळ, राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या सुरू असलेल्या चर्चा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आलेल्या अपयशासंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचं समजत आहे. 

हर्षवर्धन सपकाळ यांनी दावा फेटाळला

चंद्रपूरमध्ये सगळे नगरसेवक एकसंघ राहिले, आमच्यात फूट पडली नाही. मात्र, शिवसेना ठाकरे गटाने थेट भाजपला मतदान केले. त्यांनी ते मतदान केले नसते तर आमचा महापौर बसला असता असं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. 

तसंच बैठकीत चंद्रपूरसंदर्भात चर्चा झाली नाही असा दावा केला आहे. परभणीत उलट परिस्थिती असताना आमच्या नगरसेवकांना विविध पक्षांकडून प्रस्ताव होता. आम्ही त्यांना सोबत घेतले असते तर आमचा महापौर झाला असता. आम्ही परभणीत जी भूमिका घेतली ती भूमिका त्यांनी चंद्रपूर येथे घ्यायला हवी होती असं ते म्हणाले आहेत. 

बहुमत नसल्याने रस्सीखेच

34 हा बहुमताचा आकडा कुणालाही मिळालेला नव्हता. त्यामुळेच काँग्रेस आणि भाजपात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत घेण्याचा पर्याय उपलब्ध होता. मात्र शिवसेनेने पहिला महापौर आपलाच हवा अशी ठाम भूमिका घेतली होती. त्यावरून गेले सुमारे 20 दिवस चर्चा -संवाद यावर सस्पेन्स जारी होता. 

भाजपच्या गोटात या मनपा निवडणुकीत 2 तंबू बघायला मिळाले. सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांनी प्रत्येक जागा, प्रत्येक पद याबाबत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. शेवटी मुख्यमंत्री फडणवीस यांना महसूलमंत्री बावनकुळे यांना चंद्रपुरात पाठवून तात्पुरता समेट घडवावा लागला.





Source link

'त्यांच्या बुडाला…', शिंदे-राज भेटीने उद्धव ठाकरेंचा जळफळाट? प्रश्नावर राऊत चिडून म्हणाले, 'ते मूर्ख..'

'त्यांच्या बुडाला…', शिंदे-राज भेटीने उद्धव ठाकरेंचा जळफळाट? प्रश्नावर राऊत चिडून म्हणाले, 'ते मूर्ख..'


Sanjay Raut On Raj Thackeray Meeting Eknath Shinde: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीवरुन वेगवेगळ्या शक्यता बोलून दाखवल्या जात असतानाच या भेटीमुळे उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा जळफळाट झाल्याची टीका शिंदेंच्या नेत्यांकडून केली जात आहे. या टीकेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये उत्तर दिलं आहे.

Add Zee News as a Preferred Source

शिंदे-राज भेटीसंदर्भात ठाकरेंशी काही बोलणं झालं का?

राज ठाकरेंनी शिंदेची भेट घेतली. या भेटीसंदर्भात तुमचं उद्धव ठाकरेंशी काही बोलणं झालं का? असा सवाल राऊत यांना विचारला. या प्रश्नावर राऊत यांनी थोड्याश्या चिडलेल्या स्वरातच, “बरं झालं असेल तर मी इथं कशाला सांगू? माझं बोलणं झालं असेल तर मी इथे का सांगू? मी कॅमेरावर का सांगू? हा आमचा अंतर्गत विषय आहे. कोणी कोणाला भेटावं हा अंतर्गत विषय आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे, स्वाभिमानाचे शत्रू आहेत. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अमित शाहांच्या मदीतने चोरली. म्हणून ते महाराष्ट्राचे किंवा शिवसेनेचे प्रमुख होऊ शकत नाही. हा खटला न्यायप्रविष्ठ असून आम्ही तो जिंकू,” असं उत्तर दिलं.

आम्ही ते भांडण टोकाला नेऊ

पुढे बोलताना, “एकनाथ शिंदे आमचं भांडण आहे आणि राहील. ते भांडणं व्यक्तिगत नसून महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं, हिताचं, नैतिकतेचं आहे. हे भांडण आम्ही टोकाला नेऊ. याउपर मी काही बोलायचं नाही. असं सांगूनही तुम्ही वारंवार हा प्रश्न विचारताय,” असं म्हणत राऊत पत्रकारांवरच चिडले.

मूर्ख लोक म्हणत राऊतांचा टोला

मैत्री अशी आहे की समोरच्याचा जळफळाट व्हावा, असं उदय सामंतांचं स्टेटमेंट आहे, असं म्हणत पत्रकाराने प्रश्न विचारला. यावर संजय राऊतांनी, “कोण जळलं? त्यांचा रोख कोणावर असेल? त्यावर आमच्या पक्षाने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे का? कोणी काही बोललं का? ते स्वत: जळत आहेत. त्यांच्या बुडाला आग लागली आहे. या विषयावर त्यांनी चर्चा करु नये. ते मूर्ख लोक आहेत,” असं म्हणत प्रश्न उडवून लावला. 

राज्यसभेसंदर्भात राऊत काय म्हणाले?

राज्यसभेसाठी कोणाला उमेदवारी दिली जाणार याबद्दल महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा करुन निर्णय घेतील असं राऊतांनी म्हटलं आहे. शरद पवार या जागेसाठी उत्सुक असले तरी तिन्ही पक्ष एकत्र बसूनच यासंदर्भात अंतिम निर्णय घेतली असं राऊतांनी पत्रकारांना सांगितलं.





Source link

YouTube
Instagram
WhatsApp