'आधी भावाला…', रितेश देशमुखने धर्मावरुन टीका केल्यानंतर शिवसेना खासदाराने सुनावलं, 'जातीचं…'

'आधी भावाला…', रितेश देशमुखने धर्मावरुन टीका केल्यानंतर शिवसेना खासदाराने सुनावलं, 'जातीचं…'



Maharashtra Assembly Election: जे लोक आणि पक्ष तुम्हाला धर्म बचाओ सांगत आहेत ते खरं म्हणजे धर्माला प्रार्थना करत आहेत की आमचा पक्ष धोक्यात आहे तुम्ही आम्हाला वाचवा अशी टीका रितेश देशमुखने भाजपावर केली आहे. यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी त्यांना उत्तर दिलं आहे.
 



Source link

'हे तर लाडक्या बहिणींचे 'जिहादी' भाऊ', त्यांची…; ठाकरेंच्या शिवसेनेचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

'हे तर लाडक्या बहिणींचे 'जिहादी' भाऊ', त्यांची…; ठाकरेंच्या शिवसेनेचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल


Maharashtra Assembly Election: “राज्यातील सत्ताधारी ‘लाडकी बहीण’ योजनेवरून स्वतःला ‘लाडके भाऊ’ वगैरे म्हणवून घेत असतात तर विरोधकांना ‘सावत्र भाऊ’ असे संबोधत असतात. प्रत्यक्षात मात्र राज्यकर्त्यांच्याच मनात माता-भगिनींविषयी दुष्टपणा भरलेला आहे आणि त्याचा प्रत्यय त्यांचीच वाचाळवीर मंडळी आणून देत आहेत. आता भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी अशीच मुक्ताफळे उधळली असून ‘लाडकी बहीण’ योजनेचे 1500 रुपये घेणाऱ्या बहिणींना थेट धमकीच दिली आहे. ‘‘लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या बहिणी जर काँग्रेस पक्षाच्या रॅलीत दिसल्या, तर त्यांचे फोटो काढून ठेवा. त्यांची नावे लिहून ठेवा. ती आमच्याकडे द्या. आम्ही त्यांची व्यवस्था करतो,’’ अशा शब्दांत महाडिक महाशयांनी सत्ताधारी ‘लाडक्या भावां’चे खायचे दात कोल्हापुरातील एका सभेत दाखविले,” असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लागावला आहे. 

हा निव्वळ एक ‘व्यवहार’

“महाडिकांच्या या वादग्रस्त विधानावर अपेक्षेप्रमाणे प्रचंड टीका झाली. त्यामुळे त्यांनी सोशल मीडियावर ‘पोस्ट’ टाकून माफीनामा सादर केला. मात्र माफीची मखलाशी करताना आपली ही प्रतिक्रिया ‘व्होट जिहाद’ करणाऱ्या महिलांमुळे स्वाभाविकपणे आली, अशी मल्लिनाथीही त्यांनी केली. माफी मागण्याचे नाटक तर करायचे, परंतु त्याच वेळी ओठातून बाहेर आलेले मनातले विषही नाकारायचे नाही, असाच हा प्रकार आहे. मुळात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ ही योजना सत्ताधारी पक्षाने विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच  जाहीर केली. 1500 रुपये घ्या आणि आम्हालाच मते द्या, हीच देवाणघेवाण राज्यकर्त्या मंडळींना लाभार्थी माता-भगिनींकडून अपेक्षित आहे. कुठल्याही बंधुप्रेमापोटी किंवा माता-भगिनींच्या काळजीपोटी ही योजना यांनी सुरू केलेली नाही. त्यांच्यासाठी हा निव्वळ एक ‘व्यवहार’ आहे,” अशी टीका ‘सामना’मधून करण्यात आली आहे.

‘जिहाद’ या शब्दाचे भलतेच भरते

‘‘आम्ही तुम्हाला दरमहा 1500 रुपये देत आहोत ना. मग तुम्ही फक्त आणि फक्त सत्ताधारी पक्षांच्याच रॅली, सभा, प्रचारात सहभागी व्हायचे. सत्तापक्षांनाच मते द्यायची. आमच्या योजनेचा लाभ घ्यायचा आणि विरोधी पक्षांचा प्रचार करायचा, त्यांचे झेंडे फडकवायचे, असे कसे चालेल?’’ लाडकी बहीण योजनेमागची सत्ताधारी मंडळींची खरी मानसिकता ही अशी आहे. भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी ‘लाभार्थी’ बहिणींना धमकावण्याचे कारण तेच आहे. तुम्ही जर खरंच माता-भगिनींच्या काळजीपोटी ही योजना सुरू केली असेल, तर त्यांना धमक्या का देत आहात? पुन्हा माफी मागताना ‘व्होट जिहाद करणाऱ्या स्त्रियांमुळे आलेली ही स्वाभाविक प्रतिक्रिया’ आहे, असा शिरजोरपणा का करीत आहात? सध्याच्या राज्यकर्त्यांना दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वत्र ‘जिहाद’ या शब्दाचे भलतेच भरते आलेले आहे,” असा टोला ठाकरेंच्या पक्षाने लगावला आहे.

हा माफीनामा कसा म्हणता येईल?

“‘लव्ह जिहाद’चे भूत तर ते नेहमीच नाचवीत असतात. आता लोकसभा निवडणुकीपासून ते ‘व्होट जिहाद’चे भूत नाचवीत आहेत. या निवडणुकीत भाजपवाल्यांना महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात जो जबर तडाखा बसला तेव्हापासून त्यांना लागलेली ‘व्होट जिहाद’ची उचकी थांबायला तयार नाही. लाभार्थी ‘लाडक्या बहिणीं’ना बघून घेऊ असा दम भरणारे भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनाही स्त्रियांच्या व्होट जिहादची उचकी लागली, तीदेखील महिलांची माफी मागताना. महाडिक यांचा हा माफीनामा कसा म्हणता येईल?” असा सवाल ठाकरेंच्या पक्षाने उपस्थित केला आहे.

लाडक्या भावाच्या मुखवट्याआड…

‘‘लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलात ना. मग मते तर आम्हालाच द्या, विरोधकांच्या प्रचारातही दिसू नका! दिसलात तर तुमची व्यवस्था करू’’ ही ‘लाडक्या भावा’ची भाषा कशी म्हणता येईल? दहशतवाद्यांच्या तोंडी जी भाषा असते, तीच सध्या राज्यकर्त्यांच्या तोंडी दिसत आहे. त्यातूनच मिंध्यांचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे प्रचार फेरीमध्ये वृद्धाला शिवी हासडत आहेत आणि ‘‘तुला नाही पुरा केला तर नाव नाही सांगणार’’ अशा शब्दांत धमकी देत आहेत, तर कोल्हापुरात भाजपचे खासदार धनंजय महाडिक ‘‘लाडक्या बहिणींनो, विरोधकांच्या रॅलीमध्ये दिसलात तर याद राखा’’ असा दम भरत आहेत. लाडकी बहीण योजनेच्या गरजू लाभार्थी माता-भगिनींना ‘व्होट जिहाद’च्या तागडीत ढकलत आहेत. हे लाडके भाऊ नसून लाडक्या भावाच्या मुखवट्याआड दडलेले ‘जिहादी’ भाऊ आहेत. त्यांची मानसिकता दहशतवादी आहे,” असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.





Source link

'उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात चिखल केला', म्हणणाऱ्या काका राज ठाकरेंना आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, 'तुम्ही गुजरातच्या…'

'उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात चिखल केला', म्हणणाऱ्या काका राज ठाकरेंना आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, 'तुम्ही गुजरातच्या…'



Aditya Thackeray on Raj Thackeray: महाराष्ट्रात जो चिखल झालाय, त्या सर्वाचे कारण उद्धव ठाकरेच (Uddhav Thackeray) आहेत अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) झी 24 तासला दिलेल्या ‘टू द पॉईंट’ मुलाखतीत केली आहे. यावर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) व्यक्त झाले असून मनसे आता गुजरातच्या भुमिपूत्रांसाठी लढत आहे असा टोला लगावला आहे. 
 



Source link

निवडणुकीत जातीयवादाचा मुद्दा, महाराष्ट्राच्या मतदारांना कितपत भावणार?

निवडणुकीत जातीयवादाचा मुद्दा, महाराष्ट्राच्या मतदारांना कितपत भावणार?


Maharashtra Casteism Issue: विधानसभा निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है च्या घोषणा दिल्यात. भाजपनं हिंदू मतांच्या एकीसाठी ही घोषणा दिलीये हे लपून राहिलेलं नाही. शरद पवारांनी भाजपच्या या रणनितीवर टीका केलीय. भाजप निवडणुकीत जातीयवाद करत असल्याचा आरोप शरद पवारांनी केलाय. भाजप जातीजातीत भांडणं लावत असल्याचा आरोप केलाय. तर भाजपनंही शरद पवारांवर पलटवार केलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातल्या पहिल्या प्रचारसभेपासून एक है तो सेफ है चा नारा दिलाय. तर योगी बटेंगे तो कटेंगे अशी भीती हिंदू मतदारांना दाखवू लागलेत. भाजपच्या या निवडणूक रणनितीवर शरद पवारांनी निशाणा साधलाय. भाजप महाराष्ट्रातली निवडणूक जातीयवादाकडं नेत असल्याचा आरोप शरद पवारांनी केलाय. जाती-जातीत, धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप शरद पवारांनी केलाय.

एक है तो सेफ है या भाजपच्या घोषणेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंही निशाणा साधलाय. मोदी आणि शहांच्या महाराष्ट्रातील प्रचारामुळं सामान्यांना असुरक्षित वाटू लागल्याचा टोला संजय राऊतांनी लगावलाय.

महाराष्ट्रातल्या मतदार उत्तरेतील राज्यांतील मतदारांसारखा नाही त्यामुळं बटेंगे तो कटेंगे ची घोषणा महाराष्ट्रात चालणार नाही असं अजित पवारांना वाटतंय.

शरद पवारांनी केलेला आरोप भाजपनं फेटाळलाय. जातीयवादावर निवडणुका कोण लढवत होतं हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे असा टोला दरेकरांनी लगावलाय.

लोकसभा निवडणुकीत राम मंदिरसारखा मुद्दा महाराष्ट्रातल्या मतदारांना भुरळ पाडू शकला नाही. त्यामुळं एक है तो सेफ है हा मुद्दाही महाराष्ट्रातल्या मतदारांना कितपत भावेल याबाबत शंका व्यक्त केली जातेय.

‘मौलवी उद्धव ठाकरेंसाठी फतवे काढत आहेत’

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वरळीत (Worli) प्रचारसभा घेत उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर  त्या अडीच वर्षांमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या नावापुढील हिंदूह्रदयसम्राट उपाधी काढण्यात आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला वाईट वाटेल म्हणून त्यांनी ते काढून टाकलं अशी टीका राज ठाकरेंनी केलं. तसंच  आज त्याच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दल मौलवी फतवा काढतात असा संतापही त्यांनी व्यक्त केला. मनसेने वरळीतून आदित्य ठाकरेंविरोधात (Aditya Thackeray) संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. “मुस्लिम मौलवी आज फतवे काढत आहेत.  उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले हे तुम्हाला माहित आहे. विचारधारा नावाची काही गोष्टत नाही.  2019 मध्ये निवडणुका झाल्यानंतर सगळ्यांनी आपापल्या अब्रू बाजूला ठेवल्या. एके दिवशी सकाळी सहा वाजता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस शपथ घेत आहेत. अर्धा तास लग्न टिकलं आणि घटस्फोट झाला.  घटस्फोट झाल्या झाल्या उद्धव ठाकरे यांनी बघितलं आपल्याला कोण कोण डोळा मारत आहे.. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष नको म्हणून लोकांनी शिवसेना आणि भाजपला मतदान केलं.  किंवा शिवसेना भाजप नको म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीला काही लोकांनी मतदान केलं. पण  भाजप आणि राष्ट्रवादी यांचा शपथविधी आधी होतो. मग त्यातली एक उठते आणि उरलेल्या दोघांबरोबर संसार करायला लागते. जनाची नाही कशाशी लाज नाही,” अशी टीका राज ठाकरेंनी केली.





Source link

50 जागांवर लढून तुम्ही मुख्यमंत्री कसे होणार? अजित पवार हसतच समजावली आकडेमोड

50 जागांवर लढून तुम्ही मुख्यमंत्री कसे होणार? अजित पवार हसतच समजावली आकडेमोड


Zee 24 Taas Exclusive Ajit Pawar React On Getting Less Seats And Becoming CM: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जागावाटपावरुन बरीच चर्चा झाली. असेच काहीसे चित्र महाविकास आघाडीमध्ये दिसून आलं. अनेक जागांवर तर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत निर्णय झाला नव्हता. सारं बेरीज-वजाबाकी करुन प्रत्येक घटक पक्षाच्या वाट्याला कमी अधिक जागा आल्या. यामध्ये महायुतीत सर्वाधिक जागा भारतीय जनता पार्टीला मिळाल्या. त्या खालोखाल मुख्यमंत्र्यांच्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जागा मिळाल्या आणि सर्वात कमी जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाल्या. त्याचवेळी दुसरीकडे महायुतीमधील मुख्यमंत्री कोण हा प्रश्नही चांगलाच चर्चेत आहे. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ‘झी 24 तास’च्या ‘टू द पॉइण्ट’ या कार्यक्रमात 50 जागांवर लढूनही कशाप्रकारे मुख्यमंत्री होणार? या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. ‘झी 24 तास’चे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दोन उदाहरणं दिली. 

एका पक्षाचं सरकार येईल असं वाटत नाही

युतीच्या सरकारमध्ये काही तडजोड करावी लागते, असं अजित पवारांनी ‘झी 24 तास’च्या मुलाखतीमध्ये सांगितलं. हाच धागा पकडून कमलेश सुतार यांनी, “निवडणुकीच्या राजकारणात तुम्हाला फार तडजोड करावी लागली का? तुमच्याकडे 40 आमदार आहेत त्यांच्याकडेही 40 आमदार आहेत. तुम्हीच म्हणालात त्या कार्यक्रमात, मी काही बोलत नाही. 40 त्यांच्याकडे ते मुख्यमंत्री झाले. 40 आमदार त्यांचे त्यांना 80 जागा मिळतात. तुम्हाला 50 जागा मिळतात,” असा प्रश्न विचारला. यावर अजित पवारांनी हसतच, “ते मुख्यमंत्री आहेत. मी उपमुख्यमंत्री आहे. त्यामुळे थोडा फरक पडणार,” असं उत्तर दिलं.

“कार्यकर्त्यांमध्ये यातून काही मेसेज जातो असं वाटतं का?” या प्रश्नावर अजित पवारांनी, “तुमच्या माझ्या महाराष्ट्रात 85 पासून एका पक्षाचं सरकार कधीच आलं नाही. महाराष्ट्राची राजकीय, भौगोलिक परिस्थिती आणि राज्यातील जनतेची विचार करण्याची पद्धत बघता मला नाही वाटत पुढील 20-25 वर्षात एका पक्षाचं सरकार येईल. 2014 ला भाजपाने प्रचंड प्रयत्न केला पण तो यशस्वी नाही झाला,” असं अजित पवार म्हणाले. 

नक्की वाचा >> ‘शाहांना वाटलं असेल देवेंद्रजींची सीट जरा अडचणीत आहे म्हणून…’; अजित पवारांचं विधान

अजित पवारांनी हसत दिली दोन उदाहरणं

“जागा कमी असल्याने कार्यकर्त्यांमध्ये काय मेसेज जातो? तुम्ही म्हणाल कार्यकर्त्यांचा उत्साह आहे की दादांना मुख्यमंत्री म्हणून बघायचं आहे. पण 50 जागांमध्ये अजितदादा कसे मुख्यमंत्री होणार?” असा प्रश्न कमलेश सुतार यांनी विचारला. त्यावर उत्तर देताना अजित पवारांनी हसतच, ‘कमलेशजी, एकनाथराव शिंदे किती जागांवर मुख्यमंत्री झाले? देवेगौडाजी किती जागांवर पंतप्रधान झाले?’ मी आपलं तुम्हाला आठवण करुन देतोय,” असं उत्तर दिलं. “तुम्ही असं म्हणताय की 50 जागांवर दादा मुख्यमंत्री होऊ शकतात,” असं हे उत्तर ऐकल्यावर कमलेश सुतार यांनी म्हटलं. त्यावर अजित पवारांनी, “नाही तसं नाही. राज्यामध्ये आधी महायुतीच्या सरकारच्या पावणेदोनशेपेक्षा अधिक जागा जिंकण्याचं लक्ष्य आहे. त्या निवडून आल्यानंतर आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ,” असं म्हटलं. 





Source link

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारे पुस्तक; भुजबळ भाजपसोबत कसे गेले याबाबत मोठा खुलासा

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारे पुस्तक; भुजबळ भाजपसोबत कसे गेले याबाबत मोठा खुलासा



Chhagan Bhujbal : छगन भुजबळांबाबत एका पुस्तकात खळबळजनक दावा करण्यात आलाय.. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडालीय..  ईडीपासून सुटका मिळवण्यासाठी भाजपसोबत गेल्याचं भुजबळांनी म्हटलंय.. 2024 द इलेक्शन दॅट सरप्राइज्झ इंडिया या इंग्रजी पुस्तकात भुजबळांनी हा दावा केल्याचा उल्लेख आहे.



Source link

YouTube
Instagram
WhatsApp