'राज ठाकरे अप्रत्यक्षपणे सत्तेतच, मोदी-शहांना…'; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले

'राज ठाकरे अप्रत्यक्षपणे सत्तेतच, मोदी-शहांना…'; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले


Sanjay Raut On Raj Thackeray: वरळी मतदारसंघात झालेल्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर थेट भाष्य केलं आहे. राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती. तसंच, 48 तासांत राज्यातील मशिदींवरचे भोंगे उतरवणार, असंही ते म्हणाले होते. यावर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. तुम्ही अप्रत्यक्षपणे सत्तेतच आहात, असा टोला संजय राऊतांनी राज ठाकरेंना लगावला आहे. 

संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, ‘हा भोंगा आम्ही गेले 20-25 वर्ष ऐकतो आहोत त्यासाठी सत्तेची गरज नाही. तुम्ही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मोदी शहांबरोबर आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहात म्हणजे सत्तेसोबतच आहात. तुमच्या हातात सत्ता येईल ना येईल हा पुढचा प्रश्न. पण एखादा पक्षाचा कार्यक्रम असतो तेव्हा सत्तेची गरज नसते. शिवसेनेने गेल्या 50-55 वर्षात कोणत्याही सत्तेशिवाय अनेक कार्यक्रम राबवले आहेत.’

राज ठाकरे यांनी भाषणात म्हटलं होतं की, सत्ता आल्यानंतर मी पोलिसांना मुंबई साफ करण्यास 48 तास देईन, त्यावरही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. मुंबई कशी साफ करणार? असा सवाल राऊतांनी केला आहे. सगळ्यात आधी मोदी-शहा, अदानींना साफ करा ते परप्रांतिय आहेत. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. यांनीच मुंबई नासवली आहे. मुंबई हातातून काढून घेण्याचं त्यांचं षडयंत्र आहे. पण दुर्दैवाने राज ठाकरे मोदी-शहांना मदत करत आहेत, अशी टीका राऊतांनी केली आहे. 

भुजबळ काय म्हणत आहेत किंवा प्रफुल्ल पवार काय म्हणत आहे प्रताप सरनाईक काय म्हणत आहेत भावना गवळी काय म्हणत आहेत त्याला आता काही अर्थ नाही हे सगळे एकनाथ शिंदे सह अजित पवार यांच्यापासून सगळे हे पक्ष सोडून गेले आहेत ते ईडी पासून बचाव करण्यासाठी स्वतःचा कातडी वाचवण्यासाठी स्वतःची प्रॉपर्टी वाचवण्यासाठी, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. भाजपमध्ये जातात प्रफुल पटेल यांची इस्टेट मोकळी झाली नसती भाजपमध्ये जातात इतर अनेकांच्या प्रॉपर्टी मोकळ्या झाल्या नसत्या आणि सध्या तरी ई डी आणि सीबीआयच्या फायली बंद करून कपाटात ठेवल्या नसत्या, असं त्यांनी म्हटलं आहे. 

काय म्हणाले होते राज ठाकरे?

जिथे माझे उमेदवार असतील तिथे माझ्या पाठीशी उभे राहा. उद्या सत्ता हातात दिल्यानंतर पहिल्या 48 तासात मशिदीवरचे भोंगे काढले नाही तर परत तर राज ठाकरे नाव सांगणार नाही. जर अंगावर येण्याचा प्रयत्न केला तर खाकीवाल्यांना ऑर्डर देईन. ते रझा अकादमीचा बदला घेतील, असं राज ठाकरे यांनी वरळीच्या सभेत म्हटलं होतं. 





Source link

पुतण्याच्या मतदारसंघात राज ठाकरेंनी काढला फतवा, वरळीतील जाहीर सभेत केली घोषणा, म्हणाले 'तर माझं नाव…'

पुतण्याच्या मतदारसंघात राज ठाकरेंनी काढला फतवा, वरळीतील जाहीर सभेत केली घोषणा, म्हणाले 'तर माझं नाव…'


पुढील
बातमी

‘मौलवी उद्धव ठाकरेंसाठी फतवे काढत आहेत’, वरळीत राज ठाकरे कडाडले, म्हणाले ‘आज बाळासाहेब असते तर यांना…’





Source link

'मी आमदार झालो तर तुमची लग्नं लावून देईन'; पवारांच्या उमेदवाराचं आश्वासन! म्हणाला, 'इथे एकही…'

'मी आमदार झालो तर तुमची लग्नं लावून देईन'; पवारांच्या उमेदवाराचं आश्वासन! म्हणाला, 'इथे एकही…'


Maharashtra Assembly Election:  महाराष्ट्रातील दुष्काळी भागामध्ये अनेक लग्नाळू मुलं अविवाहित असल्याच्या बातम्या यापूर्वी तुम्ही अनेकदा वाचल्या आणि पाहिल्या असतील. अनेकदा ग्रामीण भागात रोजगार नसल्यानेही मुलांची लग्न होत नसल्याची, त्यांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. लग्न होत नसल्याने वैतागलेल्या अशा लग्नाळू अविवाहित तरुणांकडून बऱ्याचदा  विवाहासंदर्भात केल्या जाणाऱ्या मागण्या चर्चेत असतात. मात्र सध्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा हा मुद्दा चर्चेत आला आहे. यासाठी कारण ठरलं आहे परळी मतदारसंघातील एका उमेदवाराने केलेलं विधान!

प्रचाराचा शुभारंभ करतानाच आश्वासन

परळी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी प्रचाराला सुरुवात करतानाच दिलेलं एक आश्वासन चर्चेचा विषय ठरत आहे. आपल्या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी एक अजब आश्वासन दिले आहे. परळी मतदारसंघातील घाटनांदुर येथे खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत देशमुख यांनी आपल्या जाहीर भाषणात, “उद्याच्या काळात मी आमदार झालो तर सगळ्या पोरांचे लग्न करुन देऊ,” असे विधान केले. सध्या देशमुख यांच्या या विधानाची जोरदार चर्चा आता जिल्ह्यात होत आहेय

नेमकं काय म्हणाले देशमुख?

राजेसाहेब देशमुख यांनी मुलांचं लग्न लावून देण्यासंदर्भातील सविस्तर भूमिका मांडली. “परळी परिसरात तरुण पोराला नातेवाईक म्हणून (लग्नाचं स्थळ) येत असताना विचारतात नोकरी आहे का? काही कामधंदा आहे का? पालकमंत्र्यांनाच येथे काही उद्योगधंदा नाही, तुमचा कुठून येणार? इथे एकही उद्योगधंदा उभा केला नाही. त्यामुळे मुलांचे लग्न होणे मुश्कील झाले आहे. पण सर्व पोरांना मी या ठिकाणी आश्वासन देतो. जर उद्याच्या काळात मी आमदार झालो सगळ्या पोराचे लग्न करुन देईन. सगळ्या पोरांना कामधंदा देऊ,” असं देशमुख म्हणाले. “अतिशय जोरदार पद्धतीने या ठिकाणी तरुणांची लग्नं करायची आहेत. त्यामुळे ‘आगे बढो’ म्हणल्याशिवाय पर्याय नाही,” राजेसाहेब देशमुखांनी म्हटलं असून त्यांच्या या अजब आश्वासनाची आता जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

नक्की वाचा >> ‘बोलणारा आणि हसणारे दोघेही…’, सदाभाऊ खोतांचा वादग्रस्त Video शेअर करत अजित पवारांच्या NCP चा इशारा

इथे लढत कशी?

बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार तसेच मंत्री धनंजय मुंडेंविरुद्ध राजेसाहेब देशमुख निवडणूक लढवत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने या ठिकाणी काय होणार याकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. शरद पवार या मतदारसंघामध्ये आपल्या उमेदवाराला जिंकून देण्यासाठी काय खेळी करणार आणि त्याला मुंडे भाऊ-बहीण कसं उत्तर देणार हे पाहणं फार रंजक ठरणार आहे.





Source link

महाराष्ट्रासाठी राहुल गांधी यांनी जाहीर केली पहिली मोठी गॅरंटी; थेट महिलांच्या खात्यात जमा होणार इतके पैसे

महाराष्ट्रासाठी राहुल गांधी यांनी जाहीर केली पहिली मोठी गॅरंटी; थेट महिलांच्या खात्यात जमा होणार इतके पैसे



Rahul Gandhi : मुंबईत महाविकास आघाडीची पहिलीच प्रचार सभा झाली. या सभेत राहुल गांधी यांनी मोठी गॅरंटी जाहीर केली आहे.  



Source link

Maharashtra Weather : राज्यात थंडीची चाहूल! पण अजूनही काही ठिकाणी बरसणार पाऊस; IMD चा इशारा

Maharashtra Weather : राज्यात थंडीची चाहूल! पण अजूनही काही ठिकाणी बरसणार पाऊस; IMD चा इशारा


पुढील
बातमी

शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत शह-काटशहाचे राजकारण





Source link

लाडकी बहीण योजना बंद? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट, म्हणाले 'डिसेंबरमध्ये…'

लाडकी बहीण योजना बंद? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट, म्हणाले 'डिसेंबरमध्ये…'


Eknath Shinde on Laadki Bahin Yojna: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ही निवडणूक लाडक्या बहिणींच्या (Laadki Bahin) योगदान व शुभेच्छावर जिंकणार आहे असं म्हटलं आहे. तसंच  सावत्र भाऊ लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले असल्याची टीका केली. कोल्हापूरमधील शिरोळ येथील प्रचारसभेत ते बोलत होते.  लाडक्या। बहिणीना पैसे दिले, यात आम्ही काय पाप केलं? अशी विचारणाही त्यांनी केली. 

“ही निवडणूक लाडक्या बहिणींच्या योगदान व शुभेच्छांवर जिंकणार आहे. लाडकी बहीण सुपरहिट झाली आहे. ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत, त्यांचा खात्यात डिसेंबरमध्ये जमा होतील. लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे. सावत्र भाऊ लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले आहेत. लाडक्या बहिणीना पैसे दिले, यात आम्ही काय पाप केलं?,” अशी विचारणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे. 

लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हफ्ताही येणार; मुख्यमंत्र्यांनी स्वत: जाहीर केली तारीख, म्हणाले…

 

राजेंद्र पाटील यांच्या शेट्टीने समोरच्या विरोधकांची शिट्टी गुल झाली आहे असा टोला यावेळी त्यांनी राजू शेट्टींना लगावला. “काँग्रेस म्हणत आहे की आमचं सरकार सत्तेत आलं की आम्हाला जेलमध्ये टाकणार आहेत. पण लाडक्या बहिणींसाठी 100 वेळा मी जेलमध्ये जायला तयार आहे”.

लाडक्या बहीण योजनेत खोडा घालत आहेत, त्यांना कोल्हापूरी जोडा दाखवा. लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. ती महिला सक्षमीकरणासाठी आहे, महिला सुखी तर देश सुखी, लाडक्या बहिणी अर्थव्यवस्थेचा कणा आहेत असंही एकनाथ शिंदे म्हणाले. हे सरकार देणारे आहे, घेणारे नाही. हे सरकार देना बँक आहे, लेना बँक नाही असा टोला यावेळी त्यांनी लगावला.  शेतकरी आपला माय बाप आहे. तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार आहे असंही त्यांनी सांगितलं. 

डिसेंबरचा हफ्ता कधी जमा होणार?

कुर्ल्यातील आपल्या पहिल्या सभेत एकनाथ शिंदे यांनी 20 नोव्हेंबरला निवडणूक संपताच डिसेंबरचे पैसे जमा होणार अशी घोषणाही केली होती. “आम्ही लोकांमधे जाऊन काम करणारे लोक आहोत. घरी बसून फेसबुक लाईव्ह नव्हे तर फेस टु फेस काम करणारे आहोत. आम्ही लाडक्या बहिणींना 1500 देऊन थांबणार नाही. हे पैसे आम्ही वाढवणार आहोत. आता आचारसंहिता  लागली आहे. विरोधकांना वाटलं की नोव्हेंबरचे पैसे मिळणार नाहीत, त्याच्या आधारे सरकारविरोधात बोंब मारण्यची संधी मिळेल. पण आम्हाला विरोधी चालाख आहेत याची माहिती होती. आम्ही ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पैसे देऊन टाकले. यामुळे त्यांची बोलती बंद झाली,” असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. 





Source link

YouTube
Instagram
WhatsApp