EXCLUSIVE: विधानसभा निवडणुकीतून माघार का घेतली? मनोज जरांगे यांनी केला खुलासा, म्हणाले…

EXCLUSIVE: विधानसभा निवडणुकीतून माघार का घेतली? मनोज जरांगे यांनी केला खुलासा, म्हणाले…


Manoj Jarange on Election: मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) निवडणुकीच्या मैदानातून अखेर माघार घेतली आहे. मनोज जरांगे पाटील आपल्या उमेदवारांची नावं जाहीर करतील अशी अपेक्षा असतानाच त्यांनी माघार घेत असल्याचं जाहीर केलं आणि सर्व उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. इतकंच नाही तर आता पाडापाडी करणार असा इशाराही जरांगेंनी दिला आहे. दरम्यान ‘झी 24 तास’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी आपण ना माघार घेतली आहे, ना यु-टर्न असा दावा केला. 

“ना मी माघार घेतली आहे, ना मी यु-टर्न घेतला आहे. मी मराठा समाजाच्या हिताचा निर्णय घेतला आहे. तो अडचणीत येता कामा नये. त्याला वेठीस धरलं जाऊ नये. प्रामाणिक मनाने समाज पाठीशी उभा आहे. त्यांना संकाटत न आणता जास्तीत जास्त फायदा देण्याची जबाबदारी होती. निर्णायक भूमिका घेत ती पार पाडली,” असं मनोज जरांगे यांनी सांगितलं. 
 
“विधानसभेत शेतकऱ्यांचे, गोर-गरीब मुस्लीम, मराठा, दलितांचे प्रश्ना मांडायला हवे असं वाटत होतं. ती इच्छा लपवून ठेवण्याचं कारण नाही. आपले 5-10 निवडून आले म्हणून लगेच आरक्षण मिळणार अशी बाब नव्हती. तरीही आरक्षणासाठी संघर्ष करावा लागलाच असता. मराठा समाज अडचणीत येऊ नये यासाठी मी हा निर्णय घेतला,” असा दावा मनोज जरांगे यांनी केला.

Maharashtra Assembly Election: निवडणुकीतून माघार कोणी घेतली? वाचा सर्व उमेदवारांची यादी

 

मराठा समाज नेमका कसा अडचणीत आला असता? असं विचारलं असता ते म्हणाले की, “एका जातीवर निवडणूक लढवणं शक्य नाही आणि जिंकूही शिकत नाही. मग उगाच उभे करायचे आणि पडले तर समाजाला खाली मानून बघावं लागेल. कोणी टोमणे मारेल. टोचणे देईल, शब्दाचे घाव हे मला सहन होणार नाही. मराठ्यांबद्दल द्वेष असणारे सहा कोटी होते 5 निवडणू नाही आणू शकले असं म्हणतील. त्यामुळे समाजाच्या हिताचा निर्णय घेतला”.

पुढे त्यांनी सांगितलं की, “ही जाणीव मला आधीही झाली होती. यासाठी मेहनत घेत सर्वांना एकत्र करण्याचा निर्णय घेतला होता. पण वेळेअभावी अनके गोष्टी झाल्या नाहीत. समाज भरडेल असं मला वाटलं”. आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उभा राहताही पाडू शकतो. आम्हाला संपवणारे हे कोण हे 7-8 तारखेपर्यंत सांगणार असंही त्यांनी जाहीर केलं. 

सत्ताधारी टार्गेट आहेत का? असं विचारलं असता, काही विघ्नसंतोषी लोकांचं ऐकून त्यांनीच खेळ केला असा आरोप त्यांनी केला. गोरगरीबाच्या मुंडक्यावर पाय देण्याचं काम केलं, त्यांना याची फळं चाखावी लागतील. सरकारचं ऐकून माकडासारखी उत्तरं देतात, स्वत:च्या लायकीचा पत्ता नाही. आम्ही त्यांच्या तोंडावर थुकतही नाही, तरी थुका चाटणारे म्हणतात असा संताप त्यांनी व्यक्त केला. 





Source link

Maharashtra Assembly Election: निवडणुकीतून माघार कोणी घेतली? वाचा सर्व उमेदवारांची यादी

Maharashtra Assembly Election: निवडणुकीतून माघार कोणी घेतली? वाचा सर्व उमेदवारांची यादी


Maharashtra Assembly Election: मतदान तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतशी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक रंगात येऊ लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला असून, इतर नेतेही आता वादळी सभांना सुरुवात करण्याच्या तयारीत आहे. यादरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीकडे बंडखोरांना शांत करण्याचं मोठं आव्हान होतं. ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या पक्षातील बंडखोरांना अर्ज मागे घेण्यास सांगितलं होतं. त्यातच आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज शेवटची मुदत होती. यादरम्यान अर्ज कोणी माघार घेतले आहेत त्यांची नावं जाणून घ्या. 

उमेदवारी अर्ज कोणी मागे घेतले?

1) अंधेरी पश्चिम येथून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार मोहसीन हैदर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अशोक जाधव यांना काँग्रेसची अधिकृत उमेदवारी आहे. माजी नगरसेवक मोहसीन हैदर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्या उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अशोक जाधव यांना दिलासा मिळाला आहे. 

2) औसा विधानसभा मतदारसंघातून संतोष सोमवंशी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.  औसा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे एकमेव अधिकृत उमेदवार दिनकर माने हे आहेत.

3) पालघर विधानसभेतील बंडखोरी मोडीत काढण्यात देखील महायुतीला यश आलं आहे. भाजपामधून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले माजी आमदार अमित घोडा यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. पालघर विधानसभेत बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल करून अमित घोडा मागील तीन दिवसांपासून नॉट रिचेबल होते. 

4) माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी बीड विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली. बीड विधानसभा मतदारसंघात सलग चार वेळेस निवडून आलेले जयदत्त  क्षीरसागर यांनी आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.  जय दत्त क्षीरसागर हे अपक्ष म्हणून बीड विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते.

 माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे दोन पुतणे निवडणुकीच्या मैदानात आहेत. महायुतीकडून  राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडून पुतणे योगेश क्षीरसागर,  तर दुसरे पुतणे महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गट संदीप क्षीरसागर आहेत.  

5) तुळजापूरमधील काँग्रेसचे बंड शमले

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. तुळजापूर मधून उमेदवारी न मिळाले बंडाचा झेंडा फडकत मधुकरराव चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

पक्षश्रेष्ठींच्या शिष्टाईनंतर मधुकरराव चव्हाण यांनी माघार घेतली. काँग्रेसचे धीरज पाटील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपाचे राणा जगजीत सिंह पाटील व काँग्रेसचे धीरज पाटील यांच्यातील लढत निश्चित आहे.

6) शिवसेनेने देवळाली मतदारसंघात दिलेला एबी फॉर्म मागे घेतला. देवळाली मतदारसंघातील उमेदवार राज्यश्री अहिरराव यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. राजश्री अहिराव कालपासून नॉट रिचेबल होत्या.  

शिवसेनेने आदेश देऊनही त्यांनी प्रतिसाद न दिल्याने पक्षांतर्गत बैठक होऊन निवडणूक अधिकाऱ्यांना उमेदवारी रद्द करण्याच्या लेखी सूचना देण्यात आल्या. देवळालीप्रमाणे दिंडोरी विधानसभा मतदारसंघातही धनराज महाले यांचीही अधिकृत उमेदवारी पक्षाकडून रद्द करण्यात आली. 

7) तुमसर येथून मधुकर कुकडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला 

8) अकोला पश्चिम मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार झिशान हुसैन यांनी माघार घेतली. झिशान हुसैन यांना काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली होती आणि वंचित मध्ये प्रवेश घेतला होता. यानंतर वंचित बहुजन आघाडीने झिशान हुसैन यांना अकोला पश्चिमची उमेदवारी दिली होती. झिशान हुसैन हे माजी राज्यमंत्री अझर हुसैन यांचे सुपुत्र आहेत.

9) रायगड – अलिबागमधून ठाकरे गटाचे सुरेंद्र म्हात्रे यांची माघार

उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे

10) सांगली – मिरज विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे बंडखोर सी आर सांगलीकर,मोहन व्हनखंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बंडखोर बाळासाहेब व्हनमोरे या तिघांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

11) नाशिकमध्ये काँग्रेसच्या प्रवक्त्या आणि अपक्ष बंडखोर उमेदवार हेमलता पाटील यांनी आपला उमेदवारी घेतली मागे घेतला. 

12) कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसची माघार, माधुरीमा राजे यांनी अर्ज मागे घेतला. 

13) दिंडोरी विधानसभा मतदारसंघांमध्ये शिंदे सेनेचे धनराज महाले यांनी घेतली आपली उमेदवारी मागे, वेळेवर एबी फॉर्म घेऊन नरहरी शिरवळ यांना दिले होते आव्हान

14) नाशिक पश्चिममधून कामगार नेते माकपचे डॉ. डी. एल कराड यांची माघार. संजय राऊत यांच्याशी चर्चा केल्यानंतर घेतली माघार.

15) चोपडा विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादी कडून अपक्ष उमेदवारी दाखल करणारे बंडखोर उमेदवार माजी आमदार जगदीश वळवी यांची माघार 

मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा निष्ठावान कार्यकर्ता असून शरद पवारांसोबत पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्याने मी माघार घेत असल्याची जगदीश वळवी यांची माहिती

16) गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भाजप बंडखोर विद्यमान आमदार डॉ. होळी यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे, भाजप श्रेष्ठींनी केलेल्या मध्यस्थीनंतर डॉ. होळी नरमले, डॉ. होळी यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती, भाजप उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांचा मार्ग झाला सुकर

17) भाजपाचे सांगली विधानसभा मतदारसंघातील बंडखोर शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी घेतली माघार.

भाजपाने उमेदवारी दिली नाही,,म्हणून शिवाजी डोंगरे यांनी दाखल केली होती उमेदवारी.

18) नाशिक मध्यचे उमेदवार अजित पवार गटाचे बंडखोर शहराध्यक्ष अपक्ष रंजन ठाकरे यांनी घेतली माघार

19) उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे रणजीत पाटील  यांनी निवडणुकीतून माघार घेतली. शेवटची पाच मिनिटं बाकी असताना फॉर्म मागे घेतला. शरद पवार यांच्या शिष्टाईला यश. शरद पवार यांनी रंजीत पाटील यांना फोन केला होता. 





Source link

नाशिकच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! ऐनवेळी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म दिलेले शिवसेनेचे 2 उमेदवार नॉट रिचेबल

नाशिकच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! ऐनवेळी हेलिकॉप्टरने एबी फॉर्म दिलेले शिवसेनेचे 2 उमेदवार नॉट रिचेबल



Shivsena 2 Candidate Not Reachable:  विधानसभेआधी नाशिक जिल्ह्यात खळबळ पाहायला मिळत आहे. 



Source link

Maharashtra Weather News : नोव्हेंबर महिन्यातही पावसाची रिपरिप सुरुच; ढगाळ वातावरणासह कोरडी हवा

Maharashtra Weather News : नोव्हेंबर महिन्यातही पावसाची रिपरिप सुरुच; ढगाळ वातावरणासह कोरडी हवा


मुंबईत पुन्हा एकदा उष्णता वाढली आहे. मुंबई, ठाणे आणि उपनगरात पुन्हा एकदा लाहीलाही वाढली आहे. मुंबईतील तापमानाची नोंद 34 ते 35 डिग्री आहे.  राज्यातील काही ग्रामीण भागात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. आधी पाऊस नंतर ढगाळ वातावरणामुळे हैराण झालेल्या लोकांना दिलासा मिळाला आहे. 12 जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आणि किरकोळ पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच पावसाची रिपरिप देखील होत आहे. 

कोकणात मात्र आठवडाभरापासून पाऊस नुसता धो-धो कोसळत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एकदा हवामान विभागाने अलर्ट दिला आहे. या भागात सोसाट्याचा वारा सुटेल, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. भाऊबीजेच्या दिवशी कसं असं वातावरण? आज राज्यात मिश्र वातावरण राहील मुंबई, पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात कोरडे आभाळ राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेडमध्ये पावसाचा अंदाज ठरविण्यात आला आहे.

भाऊबीजेच्या दिवशी कसं असं वातावरण? 

आज राज्यात मिश्र वातावरण राहील मुंबई, पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात कोरडे आभाळ राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेडमध्ये पावसाचा अंदाज ठरविण्यात आला आहे. 

थंडी वाढणार 

राज्यात हिवाळ्यात सुरुवात लवकरच होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. राज्यातील कमाल तापमान 33 अंश सेल्सियस तर किमान तापमान 22 अंश सेल्सियस इतकं नोंदव्यात आला आहे. काही दिवसांमध्ये राज्यात तापमान घसरले आणि थंडीचे प्रमाण देखील वाढेल असा अंदाज वर्तवला जात आहे. लवकरच महाराष्ट्रात गुलाबी झालर अनुभवता येणार. 





Source link

शिंदेंचा बालेकिल्ला, ठाकरे बंधूंची ऐकी, अंबरनाथमध्ये नव्या समीकरणाची नांदी?

शिंदेंचा बालेकिल्ला, ठाकरे बंधूंची ऐकी, अंबरनाथमध्ये नव्या समीकरणाची नांदी?



माहीमच्या उमेदवारीवरुन वाद सुरु असताना एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या अंबरनाथमध्ये वेगळंच समीकरण पाहायला मिळत आहे.  



Source link

मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण? CM शिंदे म्हणाले, 'मी टीमचा लीडर…'

मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण? CM शिंदे म्हणाले, 'मी टीमचा लीडर…'


पुढील
बातमी

अमित ठाकरेंविरोधात उमेदवार का दिला? मुख्यमंत्री म्हणतात, ‘त्यांनी परस्पर…’





Source link

YouTube
Instagram
WhatsApp