शिंदे समर्थक नॉट रिचेबल झालेले श्रीनिवास वनगा मातोश्रीवर आले तर? राऊत म्हणाले, 'आम्ही त्यांना टेबलावर…'

शिंदे समर्थक नॉट रिचेबल झालेले श्रीनिवास वनगा मातोश्रीवर आले तर? राऊत म्हणाले, 'आम्ही त्यांना टेबलावर…'


Srinivas Vanga on Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने श्रीनिवास वनगा (Srinivas Vanga) नाराज असून ते घर सोडून गेले आहेत. त्यांचे दोन्ही फोन स्विच ऑफ लागत असल्याने चिंता वाढली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) बंडात सहभागी झाल्याने पालघरमधून (Palghar) आपल्याला उमेदवारी मिळेल अशी त्यांना आशा होती.  पण पालघरचे श्रीनिवास वनगा (Srivinas Vanga) यांना मात्र नशिबाने साथ दिलेली नाही. श्रीनिवास वनगा बंडात सहभागी होऊनही उमेदवारी न मिळालेले एकमेव उमेदवार ठरले आहेत. त्यांच्या जागी राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांना संधी देण्यात आली आहे. 

संजय राऊत यांनी श्रीनिवास वनगा यांच्या नाराजीबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, “हे आमदार एकनाथ शिंदेमुळे नाही तर उद्धव ठाकरेंमुळे झाले. पण हे महायश सूरत, गुवाहाटी, गोव्याला गेले. आम्ही टेबलावर त्यांना नाचताना पाहिलं. तेव्हा त्या भागातील अनके शिवसैनिकांना रडू कोसळलं होतं. याला आम्ही निवडून दिलं आणि आज अशा प्रकारे तांडव करत आहे. आता ही कर्माची फळं असतात, आणि ती अनेकांना भोगावी लागतात. एकनाथ शिंदेंनहाी ही कर्माची फळं भोगावी लागणार आहेत. 26 तारखेनंतर एकनाथ शिंदेंनाही रडू कोसळेल”. 

‘उद्धव ठाकरे आमच्यासाठी देव होते, मात्र एकनाथ शिंदेंनी फसवलं’; ‘या’ आमदाराने सोडलं अन्न पाणी; म्हणतो ‘मी आयुष्य…’

 

त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत का? असं विचारलं असता या प्रश्नाला अर्थ नाही. पश्चाताप झाला असेल तर घरी बसा असं ते म्हणाले. 

“शेतकरी कामगार पक्ष आमचा मित्रपक्ष आहे. यासाठी आमच्या शिवसेनेच्या कोट्यातील रायगडमधील किमान दोन जागा सोडण्यास आम्ही तयार आहोत. काँग्रेस आणि आमच्यात काही टोकाचे मतभेद नाहीत. आघाडीत किंवा कोणत्याही युतीत एखाद्या जागेवरुन शेवटच्या मिनिटापर्यंत चर्चा सुरु असते. म्हणजे त्यावरुन बिनसलं असं नाही. नाना गावंडे यांच्याशी चर्चा झाली. दक्षिण सोलापूरचा विषय मिटवला आहे असं त्यांनी सांगतलं. इतर ठिकाणीही आम्ही समन्वयाने भूमिका घेणार आहोत,” असं संजय राऊतांनी सांगितलं. 

शिंदेच्या शिवसेनेत पहिलं बंड होणार? गुवाहाटीला जाऊनही तिकीट नाकारलं; ‘हा’ नेता घर सोडून गेला, जाण्याआधी म्हणाला…

 

अमित ठाकरेंना पाठिंबा देणार का? असं विचारलं असता ते म्हणाले, “हा त्या दोन पक्षांचा प्रश्न आहे. मनसे आणि सदा सरवणकरांचा पक्ष हे एकाच आघाडीतील पक्ष आहेत. आम्ही वेगळे लढत आहोत असं ते दाखवत आहेतत. त्या दोन पक्षांनी निर्णय घ्यायचा आहे. आमच्या पक्षात चर्चा होईल तेव्हा त्यासंबंधी निर्णय घेतला जाईल”. 

पुढे ते म्हणाले की, “दादर-माहीम मतदारसंघात यशवंतराव चव्हाण किंवा जॉर्ड फर्नांडिस निवडणूक लढवत नाही आहेत. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पक्षाचे उमेदवार लढत असतात. अनेक नेत्यांची मुंलं निवडणूक लढत आहेत. राजकारणात करिअर करायचं असेल तर तुम्हाला निवडणूक लढावी लागते. मग माझे वडील, आई, आजोबा कोण आहेत याचा विचार न करत निवडणूक लढायची असते. तुम्ही याचा फार बाऊ करु नका. हे राज्य फार मोठं आहे, आमच्या पक्षातील निर्णय उद्धव ठाकरे घेतील”.





Source link

शिवसेनेच्या तिसऱ्या यादीत मोठा ट्विस्ट; भाजपच्या हायप्रोफाईल उमेदवाराला ठाकरेंविरोधात तिकीट दिले नाही

शिवसेनेच्या तिसऱ्या यादीत मोठा ट्विस्ट; भाजपच्या हायप्रोफाईल उमेदवाराला ठाकरेंविरोधात तिकीट दिले नाही



Shivsena Candidate List : शिवसेनेची तिसरी उमेदवार यादी जाहीर झाली आहे. या यादीत 15 नावे जाहीर करण्यात आली आहेत. 



Source link

शरद पवारांना अहिल्यानगरात सापडले दुसरे लंके, सर्वसामान्य कार्यकर्त्याला पवारांनी दिली संधी

शरद पवारांना अहिल्यानगरात सापडले दुसरे लंके, सर्वसामान्य कार्यकर्त्याला पवारांनी दिली संधी



Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. विविध राजकीय पक्षांनी प्रचारास सुरुवात केली आहे. 



Source link

निष्ठावंतांच्या पदरी पुन्हा निराशाच? आयारामांच्या भरतीमुळे कसं बदललय नाशकातलं राजकारण? जाणून घ्या

निष्ठावंतांच्या पदरी पुन्हा निराशाच? आयारामांच्या भरतीमुळे कसं बदललय नाशकातलं राजकारण? जाणून घ्या



Nashik Poitics: नाशिक जिल्ह्यातही महायुती आणि मविआसह मनसेनं आपले काही उमेदवार जाहीर केलेत. तर मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं जिल्ह्यात आयारामांना संधी दिलीये.



Source link

'शिंदे म्हणालेत, वाटेल त्या परिस्थितीत…'; अमित ठाकरेंसाठी माघार घेण्यावरुन सरवणकर स्पष्टच बोलले

'शिंदे म्हणालेत, वाटेल त्या परिस्थितीत…'; अमित ठाकरेंसाठी माघार घेण्यावरुन सरवणकर स्पष्टच बोलले


Maharashtra Assembly Election Mahim: माहिम मतदारसंघामधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार तसेच विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी आपण काहीही झालं तरी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. महायुती आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये झालेल्या समझोत्यानुसार महिममधून शिंदेंचा पक्ष माघार घेत अमित ठाकरेंना पाठिंबा दिला जाईल अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्याच पार्श्वभूमीवर सरवणकर यांच्या शाखेबाहेर शनिवारी रात्री शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली. निवडणुकीतून माघार न घेण्याची कार्यकर्त्यांनी मागणी केली. सदा सरवणकर यांनी माघार घेवून महायुतीचा पाठिंबा मनसेच्या अमित ठाकरेंना देण्याची चर्चा सुरू झाल्याने सरवणकर यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. याच पार्श्वभूमीवर रात्री उशीरा त्यांनी शाखेच्या बाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

मिडियामध्ये उमेदवारी मागे घेणार अशाप्रकारच्या…

जमलेल्या समर्थकांशी संवाद साधताना सदा सरवणकर यांनी, “आपण सर्वजण मोठ्या संख्येनं आलात त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतोय. आपल्या येण्याचं कारणही मला कळलं आहे. मिडियामध्ये उमेदवारी मागे घेणार अशाप्रकारच्या बातम्या येत आहेत. मात्र या बातमीत किंचितही सत्यता नाही,” असं म्हटलं. यानंतर समर्थकांनी घोषणाबाजी करत आपला पाठिंबा दर्शवला. 

आपण सर्वजण मागील अनेक वर्षांपासून…

सरवणकर यांनी पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्याला आशिर्वाद दिला असल्याचं म्हटलं. “राज्याचे मुख्यमंत्री आणि प्रमुख नेते एकनाथ शिंदेंनी आपल्याला पूर्ण आशिर्वाद दिलेला आहे. महायुतीच्या सर्वच नेत्यांनी आशिर्वाद दिलेला आहे. त्यांची इच्छा एकच आहे, माननिय शिवसेना प्रमुखांच्या विचाराचा उमेदवार हा इथे निवडून आला पाहिजे. आपण सर्वजण मागील अनेक वर्षांपासून शिवसेनाप्रमुखांचे आदेश पुढे घेऊन जात आहोत. एकनाथ शिंदेंही शिवसेनाप्रमुखांच्या विचार पुढे घेऊन जाण्याचं काम करत आहेत. म्हणून आपण निश्चिंत राहायला हरकत नाही,” असं सरवणकर समर्थकांशी संवाद साधताना म्हणाले.

जे जे शक्य आहे ते…

“मुख्यमंत्री शिंदेंवर आपला पूर्ण विश्वास आहे. त्यांनी एबी फॉर्म दिला. त्यांनी फॉर्म कधी भरायचं हे देखील सांगितलं. हे ही सांगितलं की वाटेल त्या परिस्थितीमध्ये दादार, माहीम, प्रभादेवीमधला आपला उमेदवार निवडून आलाच पाहिजे. त्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व करु. त्यांनी आशिर्वाद दिल्याने ज्या काही अफवा पसरवल्या जात आहेत त्यावर विश्वास ठेऊ नका. निश्चिंत होऊन घरी जा,” असा सल्ला सरवणकर यांनी समर्थकांना दिला. 

तयारीला लागा…

तसेच भाषणाच्या शेवटी सरवणकर यांनी, “आपण सोमवारी सकाळी दहा वाजता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघणार आहोत,” असं सांगत तयारीला लागा असं म्हटलं.





Source link

अखेर भाजपाची दुसरी यादी जाहीर, धुळ्यापासून जतपर्यंत 22 उमेदवारांची घोषणा, मुंबईचा सस्पेन्स कायम

अखेर भाजपाची दुसरी यादी जाहीर, धुळ्यापासून जतपर्यंत 22 उमेदवारांची घोषणा, मुंबईचा सस्पेन्स कायम


पुढील
बातमी

उद्धव ठाकरेंच्या तिसऱ्या यादीत फक्त मुंबईला स्थान; कोण आहेत ‘हे’ 3 शिलेदार





Source link

YouTube
Instagram
WhatsApp