यंदाची निवडणूक देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय करिअरचा टर्निंग पॉईंट ठरणार? सलग सहाव्यांचा विजयी होणार का?

यंदाची निवडणूक देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय करिअरचा टर्निंग पॉईंट ठरणार? सलग सहाव्यांचा विजयी होणार का?


Maharashtra Assembly Elections 2024 :  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी पहायला मिळत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India Press Conference) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यात. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेत. सलग पाचवेळा विधानसभा निवडणूक जिंकणारे देवेंद्र फडणवीस विजयाचा

षटकार ठोकण्यास सज्ज झालेत. फडणवीसांसाठी हा सामना खूप सोपा असला तरी विधानसभा निवडणुकीची मॅच जिंकण्याचं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. राज्यातील भाजपचे सरसेनापती फडणवीस क्रिकेटर धोनीसारखा विजयी षटकार ठोकून निवडणुकीचा सामना जिंकून देतात का याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झालीय.

देवेंद्र फडणवीस आमदारकीचा षटकार ठोकण्यासाठी नागपूरच्या रणमैदानात उतरलेत. सलग पाचवेळा नागपुरातून निवडून आलेले फडणवीस सहाव्या वेळी मैदान मारण्यासाठी सज्ज झालेत. देवेंद्र फडणवीसांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 असे सलग पाच वेळा देवेंद्र निवडून आले आहेत. आता सहाव्यांदाही सहज विजय मिळवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी निघालेल्या रॅलीत देवेंद्र फडणवीस भावी मुख्यमंत्री असतील अशा आशयाच्या घोषणा दिल्या गेल्या. फडणवीसांनी राज्याच्या राजकारणात प्रवेश केल्यानंतर सातत्यानं एक एक पायरी वर चढत थेट मुख्यमंत्रिपदाला गवसणी घातली होती. 2019मध्ये त्यांना मुख्यमंत्रिपदानं हुलकावणी दिली. यावेळी मात्र मुख्यमंत्रीपद पक्कं असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांना आहे.

नागपूरचा विजय फडणवीसांसाठी अगदी सोपा आहे. सत्तेच्या मॅचमध्ये आमदारकीचा सिक्सर फडणवीस सहज ठोकतील. पण महाराष्ट्राच्या सत्तेची फायनल मॅच त्यांना जिंकायचीय. फडणवीसांचा षटकार धोनीच्या षटकारसारखा असावा अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. दुसरीकडं त्यांचे नागपुरातील विरोधक प्रफुल्ल गुडधेंनी फडणवीसांना जोरदार टक्कर देण्याचा निर्धार केलाय.

फडणवीसांसाठी 2014चा सामना खूपच लकी ठरला होता. थेट मुख्यमंत्रिपदाचा मुकूट फडणवीसांनी परिधान केला होता. आता बरोब्बर दहा वर्षानंतरची निवडणूक फडणवीसांच्या राजकीय करिअरचा टर्निंग पॉईंट ठरणार का याची उत्सुकता निर्माण झालीय.





Source link

पुण्यात कंटेनरमध्ये सापडलं 138 कोटींचं सोनं; नाकाबंदीदरम्यान पोलीस कारवाईत यश

पुण्यात कंटेनरमध्ये सापडलं 138 कोटींचं सोनं; नाकाबंदीदरम्यान पोलीस कारवाईत यश



Maharashtra Assembly Election 2024 Pune Police Found 138 Crore Gold: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख शहरांमध्ये जागोजागी करण्यात आलेल्या नाकाबंदीदरम्यान पुणे पोलिसांना हे यश मिळालं आहे.



Source link

10 वर्षांची मुलगी व्हेंटिलेटरवर; कारण ठरलं शिक्षिकेचा मार

10 वर्षांची मुलगी व्हेंटिलेटरवर; कारण ठरलं शिक्षिकेचा मार



Tuition Teacher Slapped Child : अनेक लोकांना आजही वाटतं की, मुलांना शिस्त लावण्यासाठीस त्यांना फटके देणे गरजेचे आहे. या वाक्याला खरं ठरवणारा प्रकार नालासोपाऱ्यात घडला आहे. 



Source link

कुडाळ मतदारसंघात शिवसेना वि. शिवसेना, ठाकरेंच्या वैभव नाईकांविरोधात शिंदेंचा मेगाप्लान

कुडाळ मतदारसंघात शिवसेना वि. शिवसेना, ठाकरेंच्या वैभव नाईकांविरोधात शिंदेंचा मेगाप्लान



Maharashtra Politics : निलेश राणेंनी धनुष्यबाण हाती घेतला. सिंधुदुर्गातील कुडाळ इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत निलेश राणेंनी शिवसेनेत प्रवेश केलाय. निलेश राणेंना शिवसेनेकडून कुडाळ इथून निवडणुकीच्या मैदानात उतरवलं जाणार आहे, हे जवळपास निश्चित मानलं जातंय.
 



Source link

मनसेचा मेगाप्लान! माजी आमदारपुत्राला मैदानात उतरवले, गोल्डनमॅनचा मुलगा वाढवणार राष्ट्रवादीचे टेन्शन

मनसेचा मेगाप्लान! माजी आमदारपुत्राला मैदानात उतरवले, गोल्डनमॅनचा मुलगा वाढवणार राष्ट्रवादीचे टेन्शन



MNS Candidate List 2024: आगामी विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मनसेने दुसरी यादी जाहीर केली आहे. 



Source link

YouTube
Instagram
WhatsApp