by Hansraj Agrawal | Oct 22, 2024 | Trending News
Ramdas Athawale On Seat Allocation: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे खासदार रामदास आठवले यांनी ‘झी 24 तास’च्या जाहीर सभेत हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांची खास शैलीत उत्तरे दिली. गेल्या अनेक वर्षात मी सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम केलंय. मी राजकारणात आहे पण मी राजकारणी नाही. माझ्या समाजासाठी, बाबासाहेबांच्या विचाराशी एकनिष्ठ राहणारा मी कार्यकर्ता आहे. राजकारणी बनण्यापेक्षा चित्रपटात यावे, कलाकार व्हावे अशी माझी इच्छा होती. पण सिद्धार्थ काँलेजमध्ये असताना मी पॅंथरच्या माध्यमातून राज्यासह देशात फिरलो. लाखो तरुण माझ्या मागे आहे. यानंतर मला राज्यसभेमध्ये संधी मिळाली. नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात मला तिसऱ्यांदा संधी मिळाली. लोकसभेत खासदार नसताना मला संधी मिळाल्याचे आठवलेंनी यावेळी सांगितले.
राजकारण कोणत्या दिशेने वाहतेय याची हवा मला कळत असते. सध्या हवा ही महायुतीच्या बाजुने आहे. लोकसभेत आम्हाला जागा कमी मिळाल्या. आता ती वेळ गेली आहे. आता विधानसभेची तयारी सुरु आहे. अनेक आघाड्यांवर अनेक उमेदवार लढतायत. याचा आम्हालाच फायदा होईल. पण मुख्यमंत्री कोण होणार? हे मी आता सांगणार नाही, असे त्यावेळी म्हणाली.
5 जागा तरी मिळतील ही अपेक्षा
महायुतीत रामदास आठवले दिसतात पण त्यामध्ये आरपीआयच्या जागा दिसत नाही. याबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना आम्ही 21 जागांची मागणी केली आहे. पण चर्चेत आम्हाला कधी बोलावले नाही. सध्याच्या घडीला 8-10 जागा मागितल्या होत्या पण मिळतील असं वाटत नाही. 5 जागा मिळतील अशी आमची मागणी आहे. अन्यथा आम्हाला एमएलसी, महामंडळ मिळायला हवे. माझ्या पक्षाचे कार्यकर्ते नाराज आहेत. आपल्याला किती जागा मिळाल्या? असे मला रोज फोन येतात, असेही आठवलेंनी यांनी सांगितले.
महायुतीच्या जागावाटपात विचारात घेतले गेले नाही
बाळासाहेबांच्या आवाहनानंतर शिवशक्ती-भिमशक्तीसाठी मी सगळीकडे फिरलो. त्याआधी माझी भाजप विरोधी भूमिका होती.2012 च्या बीएमसी निवडणूकीत आरपीआय आल्यानंतर महायुती तयार झाली. आता दोन मोठे पक्ष आल्याने आरपीआय कुठे दिसत नाही. आरपीआयला दुर्लक्षित करणे चांगल होणार नाही. त्या पत्रकार परिषदेत मला बोलायला दिले नाही. विश्वासात घेतले जात नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
तरी रामदास आठवले युतीसोबत का आहेत?
असं असतानाही रामदास आठवले युतीसोबत का आहेत? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. याला उत्तर देताना ते म्हणाले, ‘मला मोदींनी मंत्रिपद दिलंय हे याचे उत्तर नाही. तर नागालॅण्डमध्ये आमचे 2 खासदार आहे. मणिपूरमध्ये माझ्या उमेदवाराला १७ टक्के बहुमत होते. अनेक राज्यांमध्ये आरपीआयच्या शाखा आहेत. मी मंत्री असल्यामुळे संपूर्ण देशात फिरण्याची मला संधी मिळते. अन्याय होतोय पण लगेच निर्णय घेणे माझ्यासाठी थोडं अडचणीचं आहे, असे उत्तर त्यांनी दिले. सर्व माझ्यासोबत असल्याने मी उलट भूमिका घेत नाही. आम्ही इतका त्याग करतो तर 3 ते 4 जागा द्यायला हव्या, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
Source link
by Hansraj Agrawal | Oct 21, 2024 | Trending News
बॉलीवुडचा सर्वात श्रीमंत स्टार किड कोण जाणून घेऊया. याच्या संपत्तीचा आकडा पाहून डोळे गरगरतील
Source link
by Hansraj Agrawal | Oct 21, 2024 | Trending News
Third Alliance In Maharashtra : महाराष्ट्राच्या राजकारणात परिवर्तन महाशक्ती आपली ताकद दाखवणार आहे. महायुती आणि महाविकासआघाडीला टक्कर देण्यासाठी तिसऱ्या आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
Source link
by Hansraj Agrawal | Oct 20, 2024 | Trending News
Maharashtra Politics : कोकणातील राजकारण म्हटलं की आपसूकच राणे यांचं नावं तोंडावर येतं.. दिर्घकाळ राजकारणात सक्रीय असलेले नारायण राणे आणि त्यांचं कुटूंब हे सध्या भारतीय जनता पक्षात कार्यरत आहेत.. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत माजी खासदार निलेश राणे हे कमळाला बाजूला ठेवून धनुष्यबाण हाती घेणार असल्याची चर्चा आहे.
Source link
by Hansraj Agrawal | Oct 20, 2024 | Trending News
Maharashtra Assembly Election: नाशिक पश्चिम जागेवरून शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष (Uddhav Thackeray) आणि काँग्रेसमध्ये (Congress) खटके उडल्याची माहिती मिळत आहे. नाशिक पश्चिम जागेवर सुधाकर बडगुजर यांना तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत, तर तर काँग्रेस देखील या जागेवर आग्रही आहे. या जागेवर नाना पटोले (Nana Patole) आणि संजय राऊत (Sanjay Raut) दोघेही अडून बसले आहेत. त्यानंतर संजय राऊत तडकाफडकी निघून गेल्याची माहिती मिळत आहे.
विदर्भातील मतदारसंघांवरुनही तणाव
विदर्भातील काही मतदारसंघातवरून महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. दक्षिण नागपूरमधून गिरीश पांडव काँग्रेसकडून इच्छुक आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानेही या जागेवर दावा केला आहे. यवतमाळ शहरावर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि काँग्रेस दावा करीत आहेत. अकोला पश्चिम हा मतदारसंघ कायम काँग्रेसकडे राहिला आहे. मात्र, यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष राजेश मिश्रा या जागेवर इच्छुक आहेत. कारंजा आणि जळगाव जामोद या जागा काँग्रेसच्या आहेत. मात्र. यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने दावा केला आहे. दिग्रससाठी काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे आपल्या मुलासाठी प्रयत्न करीत आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून पवन जैस्वाल यांनी तयारी सुरू केली आहे. या जागांवर काय तोडगा निघणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मातोश्रीवर तातडीची बैठक
उद्धव ठाकरेंनी आज तातडीने बैठक बोलावली. दुपारी साडेबारा वाजता मातोश्रीवर ही बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत जागावाटप आणि उमेदवार निवडीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीला महत्त्वाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात, असे संकेत खासदार संजय राऊतांनी दिले आहेत.
जागावाटप आणि उमेदवार निवडीसाठी उद्धव ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावल्याच समजत आहे. या बैठकीला संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत,सुभाष देसाई उपस्थित आहेत.. बैठकीत काय निर्णय घेतले जातात याकडे सा-यांचं लक्ष आहे. दरम्यान, काही अंतर्गत आजार आहेत. एक्सरे-एमआरआय काढावे लागतील. ते आज बैठकीत होईल.
आज नक्कीच निर्णायक भूमिका घेतली जाऊ शकते असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.
“आम्ही अजिबात नाराज नाही, नाराजी कळविण्याचा देखील प्रश्न येत नाही, आमचा स्वतंत्र पक्ष आहे. आम्हाला आमचे निर्णय घेता येतात. आम्ही कोणाला का नाराजी कळवायची. आम्ही महाविकास आघाडीत आहोत. आम्ही महाविकास आघाडीचा धर्म पाळतो चर्चांना उपस्थित राहतो. आम्हाला भाजपच्या बगलबच्चांचा पराभव करायचा आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
Source link
by Hansraj Agrawal | Oct 19, 2024 | Trending News
पुढील
बातमी
ऐन निवडणुकीच्या तोंडावर नेते साथ सोडून चालले, अजित दादांची भिस्त कोणावर?
Source link